Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"कॅश-लेस" आणि "लेस-कॅश" मधिल संभ्रम : खरोखरचा की बनवलेला ???

ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/08/2016 - 09:47
🗣 139 प्रतिसाद
सद्या "कॅश-लेस अर्थव्यवस्था = १००% कॅश-लेस ट्रन्झॅक्शन्स" हे चुकीचे समीकरण सिद्ध करण्यासाठी तथाकथित विचारवंत राजकारणी आणि अर्थतज्ज्ञांमध्ये अहमहमिका चालली आहे. ती इतक्या अतीरेकी स्तरापर्यंत ताणली जात आहे की, त्यामागे असलेला, शाब्दीक विपर्यास करून सामान्य जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जास्त जास्त उघड होत चालला आहे. नकद व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार करण्याला वाव असतो आणि नकद न वापरता केलेल्या व्यवहारांत भ्रष्टाचार करणे फार कठीण असते. यावरून, हे ना ते कारण पुढे करून, सर्व व्यवहार नकदेने करायची सूट असायलाच पाहिजेत असा आग्रह करणार्‍यांच्या उघड-गुप्त उद्येशांची कल्पना करणे फार कठीण नाही. आर्थिक व्यवहार व अर्थव्यवस्थेबद्दल सरकारचे म्हणणे खालीलप्रमाणे आहे... The government has been taking steps to promote "cashless or digital transactions" to take India towards a "less-cash economy". या वाक्यातल्या cashless or digital transactions व less-cash economy या शब्दप्रयोगांतील फरक (जर अगोदर खरोखरच समजला नसेल तर), स्वतःचा गैरसमज टाळण्यासाठी व दुसर्‍यांचा गैरसमज न करण्यासाठी, समजून घेणे जरूर आहे. तो फरक (समजला नसल्यास) इस्काटून असा आहे... १. नकद पैसे न वापरता, बँक / कार्ड / ऑनलाईन इ प्रकार वापरून केलेल्या आर्थिक व्यवहाराला "कॅश-लेस ट्रान्झॅक्शन" म्हणतात... हे प्रत्येक व्यवहारासंबंधीचे विधान आहे. २. जिच्यात शक्य तेवढी जास्तीत जास्त (१००% नव्हे) कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स होतात, अश्या अर्थव्यवस्थेला "लेस-कॅश अर्थव्यवस्था" असे म्हणतात... हे देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधीचे विधान आहे. पूर्णविराम (पक्षी : पिरियड) !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
हितसंबंध
वगैरे
वगैरे...

प्रतिक्रिया द्या
29312 वाचन

💬 प्रतिसाद (139)
म
मोहन Sat, 12/10/2016 - 12:10 नवीन
मला पण दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 12/10/2016 - 12:25 नवीन
पण चित्र दिसत नाही आहेत म्हात्रे काका
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/10/2016 - 13:09 नवीन
आता दिसतात का चित्रे ?
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 12/10/2016 - 17:52 नवीन
भारतातली आय सी ए आय ही अतिशय उच्चत्तम दर्जाची संस्था आहे. सी.ए. कोर्स हा अत्यंत प्रतिष्ठीत आहे. याच्या मेंबरांना तुम्ही डिमॉनेटायझेशन विरोधात निगेटीव्ह मते देऊ नका असा मागास बिन्डोक तालिबानी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणारा फतवा कसा काय काढला जाऊ शकतो. मी स्वतः नोटबंदीच्या पुर्ण १०० % समर्थनात सध्या तरी आहे. मात्र असे फतवे बघुन अस्वस्थता वाढत आहे. इतक्या विद्वान तज्ञ मेंबरांना लोकशाही देशात आपले व्यक्तीगत मत मांडण्याचेही स्वातंत्र्य नसावे हा निव्वळ अतिरेक आहे. विरोध अजिबात दाबला दडपला जाऊ नये. हा प्रकारच चुक आहे. “The members are strictly advised not to indulge in any nefarious act to subvert the intentions of the government in any remote possible way,” it said. . “Members are also advised not to share/write any negative personal views by way of an article or interview on any platform regarding demonetisation,” it said. हे म्हणजे कमाल आहे. म्हणजे एखादा व्यक्ती सीए आहे आणि त्याचे मत डिमॉनेटायझेशन विरोधात असेल तर त्याचे अभ्यासपुर्ण मत ही त्याने नोटबंदी विरोधात मांडायचे नाही ? मिसळपाववरील सीए आदुबाळ , संक्षी इं चे यावर काय मत आहे ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/10/2016 - 18:14 नवीन
याचे नक्कीच आश्चर्य वाटले. त्या ऐवजी, आयसीएआय ने यासंबंधी खालील किंवा तत्सम विषय/उद्येश समोर ठेवून चर्चा/सेमिनार आयोजित करून आपल्या बिरादरीचे आणि जनतेचे शंकानिरसन व ज्ञानवर्धन करणे अपेक्षित होते... अ) कारवाईचा अर्थशास्त्रीयदृष्ट्या असलेला उद्येश व त्यातील बरेवाईटपणा, आ) कारवाईचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर व सर्वसामान्य जनतेवर झालेले, आता होणारे आणि भविष्यात होऊ शकणारे परिणाम, आणि इ) कारवाईच्या परिणामांमुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी काही वास्तविक उपाय शोधणे, इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 12/11/2016 - 07:32 नवीन
यामागे कोणाचा दबाव होता हे बाहेर येणे/आणणे खरेच गरजेचे आहे. अशा गोष्टींनी सरकारच्या योग्य कृतींना खीळ बसतो आणि असहिष्णुतेचा रंग मिळतो असे माझे वैयक्तिक मत आहे. अवांतर : हि ऍडवायजरी होती की रिस्ट्रीक्शन होते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. वर लिहिलेल्या दोन पैकी पहिला मुद्दा तरी योग्य वाटतोय - not to indulge in any kind of nefarious act. काल रात्री दिल्लीच्या एका लॉ फर्मवर टाकलेल्या धाडीत मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बातम्यात सांगण्यात आले की हे लोक सीएन्च्या मदतीने काळ्याचा पांढरा आणि हवालाचे काम करत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sat, 12/10/2016 - 18:02 नवीन
विरोध बघुन निर्णय मागे घेण्यात आला. पण जो काय दडपशाहीचा प्रकार होतो आहे तो फार निषेधात्मक असा आहे. या पुर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी कोणी हा दबाव मुळात आणला होता. ज्या अनिल गलगलींनी संस्थेच्या या निर्णयावर टीका केली त्यांना ब्लॉक करण्याचाही निर्लज्ज प्रकार आयसीएआय ने केला. http://galgalianil.blogspot.in/2016/12/blog-post_81.html http://galgalianil.blogspot.in/2016/12/to-stop-criticism-of-note-ban-icai.html http://www.firstpost.com/india/icai-withdraws-advisory-asking-members-to-not-criticise-demonetisation-3150142.html
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 12/11/2016 - 17:09 नवीन
लोकहो, क्याशलेस की लेस क्याश हे असले प्रश्न या साहेबांना पडलेले दिसंत नाहीत. नोटाबंदीचा असाही एक परिणाम : https://www.majhapaper.com/2016/12/09/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6/ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/11/2016 - 20:07 नवीन
अश्या भ्रष्ट लोकांना त्याचा पक्ष किंवा स्तर न बघता शिक्षा व्हायलाच पाहिजे. किंबहुना जेवढा राजकिय स्तर वरचा तेवढी जास्त शिक्षा व्हावी असा कायदा केला तरी त्याला माझा पाठींबाच राहील, कारण अश्या लोकांकडे सामान्य लोक आणि विशेषतः नवीन पिढी आदर्श/मार्गदर्शक म्हणून पहात असते. त्यमुळे त्यांना सहजी माफ करणे म्हणजे चुकीचे संकेत लोकांच्या मनावर बिंबविल्यासारखेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 12/13/2016 - 06:15 नवीन
काही मंडळी फक्त विरोध...करायचा म्हणुन विरोध करतात ..केजरी टाईप नोट बंदी ने बराच काळा पैसा बाहेर येतोय ..अजुन १७ दिवस आहेत .कर संशोधन विधेयक २०१६ हे वित्त विधेयक लागु होइल दोन एक दिवसात तेव्हा तिही योजना कशी बेकार आहे ह्याचे पाढे चालु होतिल...आयकर खात्याच्या धाडी मध्ये नवीन नोटा सापडत असल्याने देशाचे नागरीकच असलेले बँक कर्मचारी हे गद्दारी करीत असल्याचे दिसते,त्यांचीही योग्य चौकशी होईल,बरेच घरी जातील काहींना जबर दंड बसेल. प्रत्येक संशयास्पद खात्याची चौकशी होइल आणी अजुन बराच काळा पैसा जो बँकेत जमा झाला आहे तो सरकार जमा होइल. आम्हालाही नोटबंदी चा त्रास होतोय उधार्या मिळत नाही पण हरामाचा पैसा सरकार जमा होतोय ते बघुन आंनद होतो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/09/2017 - 16:18 नवीन
Tax collection higher in April-November 2016 despite demonetisation, says finance minister Arun Jaitley प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे. १. सेंट्रल एक्साईज कर : ३१.६% वाढ : हा उत्पादन (manufacturing) वाढल्यामुळेच शक्य होते. २. सर्विस टॅक्स : १२.४% वाढ : हा सर्विस (सेवा) उद्योगात वाढ झाल्याशिवाय शक्य नाही. ३. VAT भरणाही वाढला आहे. यातला लक्षणिय भाग जुन्या नोटांत असावा असा अंदाज आहे, म्हणजे तो बहुदा ०९ नोव्हेंबरनंतर भरला गेला असावा : ही वाढ विक्रीत वाढ झाल्यावर होऊ शकते. ४. याशिवाय, खरीपातली पेरणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे अगोदरपासून माहित झाले आहेच. विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जर (अ) उद्योगधंद्यांना जबर फटका बसला आहे आणि (आ) शेतकरी प्रचंड अडचणीत येऊन शेतीची पेरणी धोक्यात आली आहे; या दोन गोष्टी खर्‍या धरल्या तर वरचे वाढीचे आकडे कसे शक्य आहेत. उद्योगधंद्यांनी उत्पादन कमी झाले असतानाही जास्त कर भरला आहे की शेतकर्‍याने सर्व पेरणी उधारीवर केली / त्याला बियाणे, खत इत्यादी फुकट मिळाले ???!!! बेजबाबदार विरोधी राजकीय विधाने करायला पुरावे लागत नाहीत. तसेच, नसलेल्या पैशाचे सोंग आणता येत नाही. यावरून खरे-खोटे काय ते सुजाण लोक जाणतीलच !
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 01/09/2017 - 16:41 नवीन
>>खरीपातली पेरणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे अगोदरपासून माहित झाले आहेच. खरीपातील पेरणी पावसाळ्यात करतात असं ऐकून आहे. बाकी टॅक्सचा भरणा जास्त झाला हे पहिल्या काही दिवसांतच दिसले होते. Demonetisation windfall: Civic agencies record 268% increase in tax collection ही २३ नोव्हेंबरची बातमी आहे. ही काही उत्पादनवाढ किंवा तत्सम कारणांनी झालेली वाढ नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/09/2017 - 17:01 नवीन
वरचे आकडे माझ्या कल्पनाशक्तीचा अविष्कार नाही, अर्थखात्याने दिलेले आकडे आहेत. Demonetisation windfall: Civic agencies record 268% increase in tax collection ही २३ नोव्हेंबरची बातमी आहे. १. हे म्युनिसिपल कर, वीज कंपन्या व इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या करांबद्दल, ते कर दिमॉनेटाईज्ड नोटांच्या रुपात भरणा केल्याने, झाले होते अशी बातमी होती, असे वाटते. मूळ दुवा दिल्यास किंवा तो तुम्ही स्वतः वाचून सांगितल्यास जरा स्पष्ट होईल. :) २. प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे, हे वाचायला विसरलात का ? पण तरीही, तुम्ही बोलताय म्हणजे मग त्यापुढे भारतिय अर्थमंत्र्यांची आणि भारतीत अर्थखात्याची काय पत्रास म्हणा, अर्थमंत्रीच चूक असणार, नाही का ?! =)) =)) =)) ("चष्मा काढून वाचले असते तर ते सर्व दिसले असते का ?", हा प्रश्न मनात उभा राहीला, पण तो विचारायचा विचार सोडून दिला आहे ;) :) ) तेव्हा, चिल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 01/09/2017 - 17:24 नवीन
सरकारच म्हणतंय की ग्रोथ कमी होणार.... http://www.businesstoday.in/current/economy-politics/gdp-growth-to-decline-at-71-predicts-government/story/243671.html Most private economists have pared India's growth forecast to 6.3-6.4 per cent for the 2016-17 fiscal year, citing the impact of the government's scrapping of high-value bank notes last November, which they reckon would linger for one more year. अर्थात प्रायव्हेट इकॉनॉमिस्ट कोण ठाऊक नाही पण बहुधा परदेशातील असावेत. http://www.hindustantimes.com/business-news/govt-forecasts-economy-losing-momentum-gdp-could-be-lowest-in-3-years/story-cKkCZpjJuWzSZyXWPQ0cRJ.html यातील एक महत्त्वाचे वाक्य... Releasing the data compiled by the Central Statistics Office (CSO), Chief Statistician T C A Anant said the figures for November were available and examined but “it was felt in view of the policy of denotification of notes there is a high degree of volatility in these figures and conscious decision was taken not make projection using the November figure”
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/09/2017 - 18:26 नवीन
मुळ मुद्दे विसरलात काय ? बाजू उघडी पडली की विषय बदलणे अपेक्षितच होते म्हणा =)) =)) =)) पण चला, त्याबाबतचाही गैरसमज थोडासा कमी करूया :) (यानंतरही दिशाबदल केला गेला तर आश्चर्य वाटणार नाही, पण तरीही एक "शेवटचा" प्रयत्न :) ) जीडीपी वेगळा विषय आहे. त्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो... उदा. काळ्या पैश्यांनी खरेदी केल्या जाणार्‍या लक्झरी गाड्या, कोटींमध्ये किंमती असलेल्या सदनिका, जमिनी, सोने, इत्यादींचा खप कमी झाल्यानेही जीडीपी कमी होईल. त्यामुळे होणारी जीडीपी च्या वाढीला "वाढ उर्फ ग्रोथ" पेक्षा अर्थशास्त्रात "सूज उर्फ स्वेलिंग" हा शब्द जास्त योग्य आहे, कारण त्याने काळ्या पैश्याची वाढ होण्याची शक्यता जास्त असूनभाववाढ कमी होणे, नोकर्‍या निर्माण होणे, इत्यादी सामान्य जनतेला उपयोगी परिणाम होण्याची शक्यता नसते. काळ्या पैश्याचे चलन नगण्य झाल्याने कमी होणारी भाववाढ, कमी व्याजदरामुळे वाढलेला घरांचा खप, कमी व्याजदरामुळे उद्योगधंद्यामध्ये झालेली वाढ, इत्यादींमुळे "सूज" गेल्याने झालेली जीडीपी घट पुढच्या "खर्‍या वाढीने" २ ते ३ तिमाह्यांत भरून निघून निघेल; त्याचबरोबर ही वाढ खरी वाढ असल्याने ती नोकर्‍याही निर्माण करेल, जो जनतेच्या फायद्याचा मुख्य मुद्दा आहे. (अ) जमा झालेली/होणार्‍या वाढलेली आयकराची रक्कम व (आ) घरात नकदेच्या स्वरूपात असलेली पण आता बँकात जमा झालेली रक्कम, पाहिल्या तर, सरकारला आणि खाजगी व्यवसायांना सुलभ दराने कर्ज उपलब्ध होणार आहे हे सांगायची गरज नाही, कारण ते आधीच झाले आहे आणि भविष्यात त्यात अजून सुधारणा होत राहील. याचा परिणाम जीडीपी च्या वाढीत तर होईलच पण त्या प्रकारची वाध नवीन नोकर्‍याही निर्माण करेल. १९९१ ते २००३ या कालखंडात जीडीपी वाढ कमी ते मध्यम होती पण नवीन नोकर्‍या निर्माण होण्याचे प्रमाण मोठे होते. त्याविरुद्ध २००४ ते २०१२ मध्ये जीडीपी वाढ बहुतेक वर्षी उच्च स्तरावर होती पण नवीन नोकर्‍या निर्माण होण्याचे प्रमाण तुलनेने कीव करण्याजोगे (पॅथेटिक) होते. हे का ? ते समजण्यासाठी खाली एक युपीए च्या हाय जीडीपी ग्रोथ पिरियड मधील एका शोधनिबंधाचा संदर्भ देऊन सुरुवात करू देत आहे.... ECONOMIC GROWTH AND EMPLOYMENT LINKAGES : The Indian Experience बाकीचे असेच संबंधीत सबळ संदर्भ तुम्ही शोधाल आणि त्यांचा अभ्यास करून मगच "जीडीपी व त्याचा देशाच्या प्रगतीवर परिणाम" अश्या गंभीर मुद्द्यावर प्रतिसाद लिहाल असा आशावाद व्यक्त करतो ! :) यावर तुमच्याकडून काही सबळ पुराव्यांसह काही वाचले की मग आपल्याला जीडीपीसंबंधी दुसर्‍या मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा करता येईल. अन्यथा बेजबाबदार राजकीय वितंडवादामध्ये मला रस नाही. काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
संदीप डांगे Mon, 01/09/2017 - 22:45 नवीन
डॉक्टरसाहेब, माझे काही बाळबोध प्रश्न आहेत, आशा करतो उत्तरं मिळतील. सदर बातमीत प्रत्येक आकडेवारी देतांना एप्रील-ते-नोव्हेंबर असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ काय? नोटाबंदी ८ नोव्हेंबरला झाली. नोटाबंदीचा दुष्परिणाम-सुपरिणाम-नोपरिणाम बघायचा असेल तर १० नोव्हेंबर ते १० जानेवारी ह्या दोन महिन्यांतली आकडेवारी बघायला हवी असे मला वाटते. जेटलींचे कदाचित वेगळे मत असू शकेल ते माझ्या पेक्षा कैक पटीने हुशार आहेत. प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे हे आकडे एप्रिल ते नोव्हेंबर ह्या आठ महिन्यांचे एकत्रित आहेत का? प्रत्येक महिन्याचे आकडे असतात की तिमाही-सहामाही असे एकत्रित आकडे असतात? कर भरणारे दर महिन्याला कर भरतात की तिमाही-सहामाही असे भरतात? असे प्रत्येक महिन्यात किती कर भरला याचे आकडे मिळतील काय? १. सेंट्रल एक्साईज कर : ३१.६% वाढ : हा उत्पादन (manufacturing) वाढल्यामुळेच शक्य होते. २. सर्विस टॅक्स : १२.४% वाढ : हा सर्विस (सेवा) उद्योगात वाढ झाल्याशिवाय शक्य नाही. हा फक्त नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचा आकडा आहे की एप्रिल ते नोव्हेंबरचा ह्या आठ महिन्यांचा? सर्विस टॅक्स व सीईटी भरण्याची नियमित मुदत काय असते? विक्री झाल्यावर पुढच्या महिन्यात भरायची असते की कधी? म्हणजे ऑक्टोबरच्या झालेल्या विक्रीवरचा कर नंतर नोव्हेंबरमधे भरतात की आधीच सप्टेंबरमधे? ३. VAT भरणाही वाढला आहे. यातला लक्षणिय भाग जुन्या नोटांत असावा असा अंदाज आहे, म्हणजे तो बहुदा ०९ नोव्हेंबरनंतर भरला गेला असावा : ही वाढ विक्रीत वाढ झाल्यावर होऊ शकते. ही विक्रीत वाढ 'नोटाबंदीनंतर' झाल्याचे कसे काय सिद्ध होत आहे? वॅट कधी भरतात? माझ्या माहितीप्रमाणे एका महिन्याचा वॅट दुसर्‍या महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत भरायचा असतो. कदाचित काळा पैसा खपवण्यासाठी वॅट चा वापर झालेला असू शकतो. पण ह्याचा अर्थ नोव्हेंबर-डिसेंबरात विक्रीत वाढ झाली असा तर होत नाही. अ‍ॅडव्हान्स वॅट म्हणजे विक्री होण्याआधीच कोणी वॅट भरत असेल तर माहित नाही बॉ. नोव्हेंबर-डिसेंबर तसाही धंद्याच्या दृष्टीने उताराचा काळ असतो, दिवाळी झाल्यानंतर तसाही बाजार आळसावतो. (विशेष म्हणजे काही नोटाबंदीसमर्थक धंदा मंदावण्याच्या मुद्द्यावर ह्याचाच वापर करत होते) तेव्हा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कोणत्या लोकांनी खरेदी केली असावी? (पण लोक तर म्हणत होते की कॅश नसल्याने अनावश्यक खर्च टाळले, बचत झाली, गरजेपुरता खर्च केलाय. ) ४. याशिवाय, खरीपातली पेरणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे अगोदरपासून माहित झाले आहेच. माझ्या माहितीप्रमाणे खरीप लागवड जुलै-ऑगस्टच्या सुमारास होते. ह्यावर्षी खरीपाचा हंगाम डिसेंबरात होता काय? शिवाय मागच्या वर्षी पावसाच्या अभावामुळे पेरण्यांवर परिणाम झाला होता ह्यावर्षी चांगला पाऊस झाला. जुलै-ऑगस्टच्या खरिपाच्या अवघ्या ६ % वाढीचे श्रेय चांगल्या पावसाला न देता नोव्हेंबरात झालेल्या नोटाबंदीला द्यायचे काय संदर्भ असू शकतात? विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जर (अ) उद्योगधंद्यांना जबर फटका बसला आहे आणि >> १. ऑल इन्डिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशन (एआयएमो) ही ३ लाख पेक्षा जास्त लघु, मध्यम व मोठ्या उद्योजकांशी संबंधीत व १३००० प्रत्यक्ष सदस्य असलेली देशातली एक संस्था आहे. ह्यांनी नुकताच एक सर्वे रिपोर्ट जाहिर केलाय . त्यांच्या मते स्पेसिफिकली ह्या दोन महिन्यात ३५% रोजगार कपात व ५० टक्के महसूलात घट झाली आहे. कारणे : कॅशफ्लो नसणे, कॅश काढण्यासाठीचे जाचक नियम, स्टाफ ची गैरहजेरी, भांडवल उभारण्यात आलेला अडथळा, कर्जप्रस्तावांवर काम करण्यात बॅन्कांची असमर्थतता, थांबलेलं रिअल इस्टेट, रुपयाच्या विनिमय दरातली घसरण, परदेशी गुंतवणूकदारांमधे भीतीचे वातावरण, निकृष्ट तयारी व जीएसटीबाबत चा संभ्रम. रोजगार व महसूल, दोन्हींमधे येत्या मार्च २०१७ पर्यंत ६० व ५५% कपात अपेक्षित आहे असे नमूद केले आहे. २. ह्युंदाय मोटर्सचे वीपी राकेश श्रिवास्तव यांच्यामते नोटाबंदीनंतर लगेच शोरुममधली ग्राहकांची वर्दळ ४०% टक्क्यांनी कमी झाली तर एकूण विक्रीत २४-२५% घट आली. पण डिसेंबरमधे मात्र मागच्या वर्षीच्या डिसेंबरपेक्षा ५% वाढ दिसली. तरी स्थिती सामान्य होण्यास किमान एक तिमाही जाईल असे ते म्हणाले. महिन्द्रा चे विक्रीचे आकडे मागच्या वर्षीच्या पेक्षा १.५ % घटलेत. अशोक लेलॅन्ड ने १२% घट झाल्याचे जाहीर केले आहे. मागच्या वर्षीच्या १२१५४ युनिट्स च्या जागी यावर्षीच्या डिसेंबरमधे १०७३१ युनिट्स विकलेत. मारुती उद्योग ४.४% घट. बजाज ऑटो २२% घट. बजाज बाईक्स ११% घट. ह्या सर्वांत फोर्ड इन्डिया ने मात्र मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीच्या विक्रीत ६.०४% वाढ नोंदवली. फोक्सवॅगन ने ६८.७२%, निसान इन्डिया ने २१% यमाहा २८% रॉयल इन्फिल्ड ४१% वाढ मागच्या डिसेंबरपेक्षा जास्त नोंदवली आहे. ह्या कंपन्यांना पार्ट्स सप्लाय करणार्‍या कारखान्यांच्या उत्पादनांत मात्र खंड पडला आहे. सर्व ब्रॅण्डच्या बाईक्सच्या विक्रीत मागच्या डिसेंबरच्या तुलनेत ४०% घट आहे. अनेक कारखान्यांना उत्पादन बंद ठेवण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. अनेकांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. ३. निक्केइ इन्डिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय (पर्चेसिंग मॅनेजर्स इन्डेक्स) पहिल्यांदाच ५० च्या खाली गेलाय. नोव्हेंबरमधे ५२.३ असणारा हा निर्देशांक ४९.६ पर्यंत खाली आलाय. ५० च्या खाली येणे म्हणजे घट व ५० च्या वर असणे म्हणजे वाढ. निक्केइ च्या मते हे सरळ सरळ उत्पादन घटल्याचे निदर्शक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत हा निर्देशांक सुस्थितीत होता. वरील बातम्या ह्या विरोधी पक्षांनी बनवलेल्या नसून पैशाचे सोंग अजिबात आणता न येणार्‍या बाजारातल्या आहेत. शिवाय त्या "नोटाबंदीनंतर" काय झालं याबद्दल बोलतात. (आ) शेतकरी प्रचंड अडचणीत येऊन शेतीची पेरणी धोक्यात आली आहे; >> वर सांगितल्याप्रमाणे खरीप पेरणी ही नोव्हेंबरात होत नाही. रबीच्या पेरणीवर परिणाम होईल असे सांगितले जात होते. ते आकडे मागच्या वर्षीच्या आकड्यांच्या तुलनेत जास्त आहेत असा सरकारतर्फे दावा केला गेला आहे. मागच्या वर्षी पावसामुळे कमी पेरणी झाली. त्यात ह्यावर्षी चांगला पाऊस. हे दोन मुद्दे रबीपेरणीत गृहित धरणे आवश्यक आहे. नोटाबंदीचा परिणाम चांगला वाईट हे त्यानंतर बघावे लागेल. या दोन गोष्टी खर्‍या धरल्या तर वरचे वाढीचे आकडे कसे शक्य आहेत. शक्य आहेत. नोव्हेंबरात झालेल्या नोटबंदीचा परिणाम एप्रिल ते नोव्हेंबर मधे झालेल्या व्यवहारांवर होणार नाही असे मला वाटते. पण आता माझ्यापेक्षा अर्थमंत्री नक्कीच जास्त हुशार आहेत त्यामुळे कदाचित होतही असावा बुवा! तसेच सातत्याने वाढत गेलेले इंधनाचे दर, त्यावरचा वाढता कर, वाढलेले इतर करांचे दर (सर्विसटॅक्स, वॅट इत्यादी) उद्योगधंद्यांनी उत्पादन कमी झाले असतानाही जास्त कर भरला आहे की शेतकर्‍याने सर्व पेरणी उधारीवर केली / त्याला बियाणे, खत इत्यादी फुकट मिळाले ???!!! एप्रिल-ते-नोव्हेंबरचे आकडे जानेवारीत "नोटाबंदीनंतर झालेली वाढ" असे मांडले की काहीही शक्य असू शकते!!!! नाही का??? चूकभूल देणेघेणे. (सूचना: मी दिलेल्या आकडेवारीच्या लिंका गुगलून लगेच मिळतील.)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/10/2017 - 06:37 नवीन
बातमीचे शीर्षक न वाचता तिच्यातला मजकूरही वाचला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मेगॅबायटी प्रतिसादाला अजिबात हरकत नाही... पण किमान तो दिलेला दुवा वाचून त्यावरचा प्रतिसाद लिहिला तरच काही अर्थ आहे ! ते करा मग पुढे चर्चेला अर्थ असेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/10/2017 - 07:08 नवीन
माझा आकडेवारीसह असलेला मेगाबायटी वाचला नाही असे दिसते! अन्यथा मी फक्त शीर्षक वाचले असा अंदाज आपण केला नसता! बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत! फार साधे प्रश्न आहेत, उत्तर नसेल तर राहुद्या पण केवळ शीर्षक वाचले असा आरोप करू नका! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/10/2017 - 12:18 नवीन
बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत!

त्याच (माझ्या दुव्यात दिलेल्या) बातमीतले संबंधीत परिच्छेद, तुमच्या सोयीसाठी खाली कॉपी केलेले आहेत. त्यातील संबंधित मजकूराचे मराठी भाषांतरही माझ्या मूळ प्रतिसादात दिले होते... खालच्या इंग्लिश मजकूरातील December हा शब्द मूळ बातमीतलाच आहे याची कृपया नोंद घ्यावी...

According to preliminary data for December 2016 - a month after the high-value note ban and through the cash shortage period - total indirect tax collection rose 14.2 percent in December 2016 from the comparable year-ago period. Customs duty tax collected has declined to -6.3 percent compared to December 2015. This is primarily because gold imports fell, Jaitley said. For December 2016 central excise tax collection though rose 31.6 percent from December 2016, the growth is related to manufacturing. As for service tax collected in December 2016, that rose 12.4 percent compared with December 2015. In addition, in December 2016, indirect tax collection rose 12.8 percent compared with a month earlier. आता तुमच्या वरच्या दाव्यावर मी अजून काही लिहायला हवेच का ???!!! :O: असं बघा डांगेसाहेब, तुमच्या पद्धतीने वाचन, विचार, तर्क आणि चर्चा मला करता येत नाही असे समजून, तुम्ही माझ्याकडे आणि मी तुमच्याकडे दुर्लक्ष करूया. कसे ? निदान मी तरी यापुढे तसे करणार आहे, तेव्हा गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/10/2017 - 12:24 नवीन
बाकी, नजिकच्या भविष्यात (दोन-तीन तिमाह्यांमध्ये) तुम्ही फार पूर्वी म्हटल्याप्रमाणे तुमच्या ओळखीच्या जाणकारांशी म्हटल्याप्रमाणे "या कारवाईत मारून ठेवलेल्या पाचरींचे" परिणाम स्पष्ट होऊ लागतील व एक एक शंका दूर होऊ लागतीलच ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Tue, 01/10/2017 - 14:18 नवीन
खरोखर माझा मेगाबायटी वाचला असता संपूर्ण तर असा प्रतिसाद खरंच दिला नसता. तेवढा तुमच्या वाचन, विचार, तर्क यावर माझातरी विश्वास होता. तर विषय आहे उद्योगधंदे व बाजारावर नोटाबंदीचा परिणाम. त्या अनुषंगाने उद्योगधंद्यांवर परिणाम झाला नाही अशा अर्थाचा आपण वरिल आकडेवारीवाला प्रतिसाद दिला होता. करसंकलन चे आकडे वाढले म्हणजे उद्योगधंदे वाढले असे सरसकट नसते. इथे फक्त डिसेंबर महिन्याचा उल्लेख झाला म्हणजे सर्व सोपं नाही झालं डॉक्टरसाहेब. त्या डिसेंबरात कोणते कर भरल्या गेले, कधी भरल्या गेले, कोणत्या महिन्याचे भरल्या गेले हेही बघायला लागतं. त्यासंबंधी मी वर काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर्षीच्या पेट्रोलपासून (वाढलेल्या दरांपासून) सर्व बाबतीत लागू झालेल्या नवीन करांमुळे, वाढीव करांमुळे, आधी टॅक्सेबल नसलेल्या क्षेत्रांमधे कर लागू केल्याने, सेवाकराचे १२.५% चे १५% केल्यामुळे, वॅट ५ पासून ५.५% केल्यामुळे. हॉटेल्सवर ५ चा ८% वॅट केल्याने, जुन्या नोटांमधे करांची थकबाकी भरल्याने मागच्या डिसेंबर पेक्षा ह्या डिसेंबर मधे फरक दिसेलच. नो डाऊट. त्याचे कारण मी दुसर्‍या एका प्रतिसादात वेगवेगळ्या बातम्या दिल्यात त्यात आहे. ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान झालेल्या रुपयाची घसरण आणि शेअरबाजारातल्या दोन्ही निर्देशांकाकडेही बघायचे आहेच. तसेच दोनवेळा झालेली इंधनदरवाढीनेही नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरच्या करात किती वाढ केली हेही बघायला लागेल. फक्त सरकारला कर मिळाला म्हणजे सर्व आलबेल आहे असं नसतं. सरकारची आकडेवारी असली तरीही नीट तपासून टॅली करुन पाहावी लागतेच. बाकी सर्वांना माहित आहेच स्टॅटिस्टीक्स कसे वापरले जातात ते. आता कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असे कोणीतरी मागे कधीतरी बोलत होते. इथे तर देशाच्या पर्यायाने आपल्या सर्वांच्या हक्काच्या पैशाचा प्रश्न आहे. विश्लेषण झाले पाहिजेच. बाकी, अगदी खरीपाच्या प्रश्नालाही आपण बगल दिली आहे, तुमच्यामते खरीपाची पेरणी नोटाबंदीनंतर झाली असेल तर खरेच तुमच्या माझ्या वाचन, विचार, तर्क आणि चर्चा करण्याच्या पद्धतीतली ही तफावत मिपाकरांना संशयास्पद वाटू नये म्हणजे मिळवली. फार सरळ-साधे प्रश्न मी विचारले होते वर. आता दुर्लक्ष करण्याबद्दल का बोलत आहात तेही इथल्या सूज्ञ, सुजाण मिपाकरांना कळत असेलच. कॄपया गैरसमज नकोत, कोणत्याही प्रकारे 'उत्तरे द्याच नाहीतर अमूक मान्य करा' असा पवित्रा मी घेणार नाही. तुम्हाला प्रतिसाद द्यायचा नसेल तर तुमच्या इच्छेचा आदर आहे. धन्यवाद! ------------------------------------------------------------------------------------------------- सूज्ञ, सुजाण मिपाकरांनो, कृपया तुम्हीतरी माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल काय? करसंकलन इत्यादींबद्दल जाणकारांना माझी विनंती आहे जेटलीसाहेबांनी दिलेले आकडे समजून घेण्यात माझ्यासारख्या अजाण मिपाकरांना मदत करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/10/2017 - 17:17 नवीन
(?चष्मा लावल्याने) मी दिलेल्या दुव्यातला "डिसेंबर" दोनदा सांगूनही दिसला नाही... व ते परिच्छेद कॉपी करून दाखविल्यावरही तिकडे दुर्लक्ष केले गेले आहे असेही दिसून आल्याने, पुढच्या चर्चेत अर्थ नाही... असे मला वाटते. सोईचे दिसणे/ न दिसणे, मुद्दा भरकटवणे, इत्यादी सतत होत असल्याने व असे वितंडवाद करण्यात मला अजिबात रस नसल्याने, मी अश्या प्रतिसादांना फाट्यावर मारण्याचा माझा हक्क राखून ठेवलेला आहे... थोडक्यात, राम राम... असाही त्याचा अर्थ होतो. यापेक्षा जास्त इस्काटून सांगणे मला शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/10/2017 - 18:54 नवीन
म्हात्रेसाहेब, "चष्मा लावल्याचे आरोप करणे, मुद्देसूद व आकडेवारीसकट प्रतिवाद करुनही हे वाचलं नाही ते दिसलं नाही अशी बतावणी करणे, मुद्दे भरकटवल्याचे, वितंडवाद, सोयिस्कर दिसते" वगैरे सोयिस्कर पवित्रे आता सवयीचे झाले आहेत.हे तेव्हाच होतं जेव्हा प्रतिपक्षाकडे मुद्दे नसतात. त्यात नवीन काहीही नाही. आधी आपण 'सबळ पुरावे हवेत, तर्कावर आधारित मांडणी हवी' वगैरे भव्यदिव्य शब्द वापरुन प्रतिसाद देत होतात. आता तेच सर्व दिल्यावर 'मेगाबायटी प्रतिसाद, वितंडवाद 'वगैरे हिणवण्याचा प्रयत्न करत आहात. 'हे वाचलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं' असे बेलाशक ठोकून देत आहात. तुम्हाला चर्चा करायची नसेल तर ठिक आहे पण प्रतिपक्षावर असे बिनबुडाचे मनगढंत आरोप करुन स्वत:ची पलायनवादी भूमिका मुत्सद्दीपणा असल्याचे दाखवणे आपल्यासारखे तत्त्वनिष्ठ व्यक्तीने करणे याचे मला आश्चर्य वाटले आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः ह्या उक्तीप्रमाणे एकवेळ 'आकडेवारी जमवणे व त्यातले सत्य पडताळून पाहणे हे वेळखाऊ व मोठे काम आहे, मी यातला तितकासा जाणकार नाही, ह्यात वेळ लागेल व इतर जाणकारांचीही मदत घेऊन यावर चर्चा करुया' असे सांगून आपण माघार घेतली असती, किंवा महिनाभरानंतर ह्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली असती तर खरंच तुमच्याबद्दल आदर वाढला असता व तुम्ही जी नेहमी स्वतःच्या तत्त्वांची भलामण करता त्यातला खरेपणाही दिसला असता. मुद्दे नाहीत म्हणून प्रतिपक्षावर प्रच्छन्न आरोप करुन, हिणवून आपली पडती बाजू झाकणे हे अजिबात पटलेले नाही. तुम्ही राम राम नंतर ठोका, तुमच्या तर्कबुद्धीने मला खाली प्रश्नांची उत्तरे एकदाची द्याच. कारण तुम्हीच ती विधानं आरोप म्हणून केली आहेत. त्याचे उत्तर मिलणे आवश्यक आहे, नाहीतर सुजाण मिसळपावकरांना कसे समजेल? (?चष्मा लावल्याने) मी दिलेल्या दुव्यातला "डिसेंबर" दोनदा सांगूनही दिसला नाही... व ते परिच्छेद कॉपी करून दाखविल्यावरही तिकडे दुर्लक्ष केले गेले आहे असेही दिसून आल्याने माझ्या ह्या दोन-तीन प्रतिसादांमधे नेमके कुठे तुम्हाला ^^ हे दिसून आले/जाणवले ते अधोरेखित/स्पष्ट करण्याची कृपा करा. दुसर्‍या प्रतिसादात तर डिसेंबरला धरूनच पूर्ण प्रतिसाद आहे. अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. माझ्या पूर्ण प्रतिसादात डिसेंबर कितीवेळा आलाय मोजा बरं! पाचवेळा आहे. वाचलंय आपण, तरीही...? सोईचे दिसणे/ न दिसणे, मुद्दा भरकटवणे, इत्यादी सतत होत असल्याने व असे वितंडवाद वरील तिन्ही गोष्टी माझ्या तीन्ही प्रतिसादात नेमक्या कुठे झाल्या याबद्दल स्पष्टिकरण द्याल? बाकी कोणता चष्मा लावल्याने खरिपाची पेरणी नोव्हेंबरानंतर झाल्याचे दिसली असावी याचा विचार करतोय. निष्पक्ष असणार्‍यांना इतकी धादांत चूक पुढे येऊन मान्य करायला इतके का जड जात आहे हे मिपाकरांना समजले असेलच! हा प्रतिसाद आठवतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/11/2017 - 08:06 नवीन
माझा आकडेवारीसह असलेला मेगाबायटी वाचला नाही असे दिसते! अन्यथा मी फक्त शीर्षक वाचले असा अंदाज आपण केला नसता! बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत! दोन तीनदा दुव्याकडे लक्ष वेधले असतानाही हे कोणी लिहिलेले आहे ???!!! अश्या चष्मेबहाद्दूर खोदकामाच्या संशोधनाच्या पायावर उभे असलेले प्रतिसाद वाचायची आणि परत परत त्यांचे खंडन करायची तसदी घेण्यासाठी मला वेळ नाही. तेव्हा अगोदर म्हटल्याप्रमाणेच, तुम्ही तुमच्या संशोधनाची पद्धत चालू ठेवून कितिही-बायटी लेख-प्रतिसाद लिहायला मोकळे आहात... मात्र, मी दर वेळेस त्यांच्यावर उत्तर देऊन वितंडवाद चालू ठेवायला कळत-नकळत मदत करेन, अशी अवास्तव अपेक्षा ठेवू नये. कृपया, हे सुद्धा वारंवार सांगायला भाग पाडू नका. राम राम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 01/11/2017 - 10:28 नवीन
बोअरींग असला तरी हा प्रतिसाद वाचावा अशी मी सर्व वाचकांना विनंती करतो. मी जे काही प्रतिसाद लिहिलेत ते आपण सपशेल नाकारत आहात त्यामुळे खरंच तुम्ही माझे प्रतिसाद वाचले असूनही उत्तर नाही म्हणून टाळत आहात असे दिसते. तरी इथे मिपावर होणार्‍या चर्चा ह्या कायमस्वरुपी राहत असल्यामुळे व भविष्यात वाचक हे वाचणार असल्यामुळे मी आपण करत असलेले आरोप खोडून काढणे माझी जबाबदारी समजतो. सुजाण मिपाकरांसाठी ते करणे आवश्यक आहे. वितंडवाद म्हणून प्रतिपक्षावर गैर आरोप करणे बंद होईल तो सुदिन! म्हात्रेसाहेबांनी दिलेली बातमी संपूर्ण इथे देत आहे व त्यास माझे खंडनही लिहित आहे. किमान ह्यावरुन तरी म्हात्रेसाहेबांकडे उत्तर नसल्याने माझ्या मूळ तीन प्रतिसादाकडे मेगाबायटी म्हणून हिणवल्याचे दिसेल. १. the collection of both direct and indirect taxes is up in April-November 2016, from the comparable year-ago period, finance minister Arun Jaitley said today while releasing advance estimates. साधारण इंग्रजी ज्याला समजतं त्याला वर हे आकडे एप्रिल-नोव्हेंबरचे आहेत हे दिसेल. २. "Those reports and figures (saying tax collection would go down) were all panic numbers, the numbers I'm giving you are real. Even economic affairs secretary kept saying there was no need to panic," Jaitley said. जेटली इथे म्हणतात करसंकलन ढेपाळेल असे रिपोर्ट्स आले ते सगळे पॅनिक नंबर होते, मी देत असलेले आकडे खरे आहेत. गंमत म्हणजे पॅनिक नंबर्स हे नोटाबंदीनंतर होणार्‍या परिणामांची उहापोह करणारे तर जेटलींचे नंबर नोटाबंदीआधीच्या काळातले आहेत. जेटलींचे कॅलेंण्डर उलटे चालत असावे. ३. For April-November 2016, overall direct tax collection is 12.01 percent higher than in the same period in 2015. Overall collection of indirect taxes is up as much as 25% in April-November 2016, from the comparable year-ago period. इथे ही ते एप्रिल-नोव्हेंबरचाच आकडा देत आहेत. ४. Of the total tax collected in April-November 2016, central excise tax collection is up 43 percent, service tax collection is up 23.9 percent and customs duty tax collection is up 4.1 percent. All these increases are from taxes collected in the year-ago period. इथे ही ते एप्रिल-नोव्हेंबरचाच आकडा देत आहेत. ५. According to preliminary data for December 2016 - a month after the high-value note ban and through the cash shortage period - total indirect tax collection rose 14.2 percent in December 2016 from the comparable year-ago period. हां, इथे हा तो जगप्रसिद्ध डिसेंबर महिन्यातल्या करसंकलनाचा आकडा. ज्याकडे दुर्लक्ष केल्याचा म्हात्रेंचा दावा आहे. पण ह्यासंबंधी तर मी एक पूर्ण प्रतिसाद स्पेष्यलमधे लिहलाय. वर वाचून घ्यावा. डिसेंबर १६ पेक्षा डिसेंबर १६ चे करसंकलन जास्त असेल हे साधार वर मांडले आहे. त्यात उद्योगधंद्यावर नोटाबंदीचा झालेला विपरित परिणाम दिसणार नाही. म्हात्रेसाहेबांची बातमी देण्यामागची भूमिका "नोटाबंदीचा उद्योगधंद्यावर कोणताही परिणाम झाला नाही" अशी होती हे विशेष लक्षात घ्यावे. ६. Customs duty tax collected has declined to -6.3 percent compared to December 2015. This is primarily because gold imports fell, Jaitley said. For December 2016 central excise tax collection though rose 31.6 percent from December 2016, the growth is related to manufacturing. As for service tax collected in December 2016, that rose 12.4 percent compared with December 2015. इथे ह्याच मुद्द्यावर मी प्रश्न विचारलेला की सीईटी भरण्याची मुदत व पद्धत काय असते. काय तो रोज भरतात, आठवडा, पंधरवड्याला भरतात, महिना, तिमाही, सहामाहीला भरतात? ह्याचे उत्तर मिळालेले नाही. इथेही या डिसेंबरची तुलना मागच्या डिसेंबरमधे केली जिथे इंधनाचे दर, करआकारणी ह्यात खूप तफावत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सर्विसटॅक्स वाढवलेला आहे अडिच टक्क्यांनी हेही लक्षात घ्यायचे आहे. ७.In addition, in December 2016, indirect tax collection rose 12.8 percent compared with a month earlier. म्हात्रेसाहेबांच्या माझ्यावरच्या "दुर्लक्ष करत आहात, सोयीचे बघता" ह्या आरोपाचे व उत्तर न देण्याच्या भूमिकेचे मूळ इथे दडलेलं आहे. इथे म्हटलंय की अप्रत्यक्ष करसंकलनाचे प्रमाण मागच्या महिन्यापेक्षा १२.८ टक्क्यांनी वाढले आहे. सरकारकडे अप्रत्यक्ष कर ज्या महिन्याचे त्याच महिन्यात भरले जतात का? ह्यात इंधनावरचे वाढलेले कर व दर धरलेत काय? पेट्रोलपंपांवर जुन्या नोटा चालत होत्या म्हणून गरज नसतांना हजार-पाचशेचं पेट्रोल टाकायला भाग पडल्याने, काळापैसा पेट्रोलच्या माध्यमातून वळवून घेतलेला असल्याने, अप्रत्यक्ष करांची वाढ दिसण्याची शक्यता आहे. तसेच कॅश नसल्याने कॅशलेस ट्रॅझॅक्शन्स ३००% पर्यंत वाढली हे ही बघायला हवे. त्यातून झालेले करसंकलन मोजावे लागेल. ह्या आकड्यामागे अनेक संदर्भ असल्याने ह्याचे विश्लेषण आवश्यक आहे असे माझे मत आहे. रुपयातली घसरण, निर्देशांकांची घसरण, बाजारातले अहवाल, उद्योगक्षेत्रातल्या अनेकांच्या प्रतिकूल मुलाखती, 'धंद्यावर तात्पुरता परीणाम आहे पण पुढे नीट होइल' असे म्हणणारे दिग्गज उद्योगपती, कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढीत घट, रोख नसल्याने अनावश्यक खर्चांना आवर घातला सांगणारे सामान्य लोक, बंद पडलेल्या कारखान्यांच्या बातम्या, आपाअपल्या गावी परतलेल्या मजुरांच्या बातम्या, मनरेगाच्या मजुरांमधे अचानक झालेली ३००% वाढ, बॅन्कांमधे कॅश नसल्याने रोख व्यवहार करायला आलेल्या अडचणी, इत्यादी सर्व सत्य पुढ्यात असतांना हा करसंकलनाच्या वाढीचा आकडा विसंगत वाटत आहे. ८. "In November, it was being suggested that the demonetisation impact+ would be more in December, but even indirect tax collection rose," the minister said. जेटली साहेब फक्त करसंकलनाचेच आकडे धरुन बसलेत, त्यामागच्या करामती बघायला तयार नाहीत. शेवटी ते देशातल्या अग्रगण्य वकिलांपैकी एक आहेत. ९. From preliminary data available for November, the minister said that VAT collection from states also increased in November 2016, compared to the year-ago period. ह्या आकड्यातही गडबड आहे. ह्यावर सविस्तर विश्लेषण गरजेचं आहे. अनेक राज्यांनी आपले वॅट स्ट्रक्चर बदलले आहे व वॅटच्या आकारणीतही वाढ झाली आहे. १०. "Another thing to remember, the collection estimate for November 2016 - when taxes could be paid in old currency - indicates that VAT must have been paid in old currency. So VAT collection is also up post demonetisation," Jaitley said. जेटली साहेबांनी इथेही मस्त धूळफेक केलीत. काळापैसा खपवायला लोकांनी जुन्या नोटांमधे वॅट भरला असे म्हटले आहे. हे नक्की कसे घडले असेल हे इथे तज्ञांच्या मते. वॅट भरायला लागतो तो ऑक्टोबरमधे झालेल्या विक्रीचा नोव्हेंबरच्या २१ ला, नोव्हेंबरचा २१ डिसेंबरला. म्हणजे विक्री झाल्याचे ऑक्टोबर नोव्हेंबरमधे दाखवायला लागेल खोट्याबिलांसह. तसेच अनेक स्थानिककर ही जुन्या नोटांमधे भरले गेलेत. ह्या माहितीत तथ्य जरी असले तरी करसंकलन झाले ते काळ्यापैशाने, उद्योगधंदे-व्यापार वाढल्याने नाही हे स्पष्ट आहे. अजुनही म्हात्रेसाहेबांना मी दुर्लक्ष करुन सोयीचे वाचले असे म्हणायचे असेल तर ते निश्चित म्हणू शकतात. म्हात्रेसाहेबांनी जेटलींच्या आकड्याच्या आधारे उद्योगधंद्यावर परिणाम झाला ही विरोधकांची खोटी बोंबाबोंब आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला, तो दावा खोडून काढण्याचा मी यथाशक्ती, यथाबुद्धी प्रयत्न केला. आकडेवारी, विश्लेषण व खोदकाम असल्याने हे सर्व कंटाळवाणे असू शकते पण दुसर्‍यांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा हे केलेलं केव्हाही चांगले. बाकी पब्लिक सब जानती है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 01/11/2017 - 11:14 नवीन
मलाही जेटलींचे आकडे खोटे नसले तरी संयुक्तिक वाटत नाहीयेत. याला कुठला दुसरा अँगल असला तर जाणकारांनी इथे मांडल्यास मदत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/13/2017 - 01:48 नवीन
(मूळ प्रतिसादातील मुख्य मुद्द्याचा "डिसेंबर" हा शब्द तीनदा नजरेस आणूनही तो बघायचे टाळल्यामुळे) जो बुंदसे गयी वो (मेगॅबायटी प्रतिसादांच्या) हौदसे नही आती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 01/13/2017 - 04:57 नवीन
फॅक्ट आणी फिगर्स असलेल्या मेगाबायटीला सतत हिणवण्यापेक्षा हौदा हौदाने गेलेली कशी परत आणायची ह्याचा विचार केल्यास बरा दिसेल! आकडेवारी, सबळ पुराव्यांमुळे उघडे पडल्याने दुसर्‍यांना कसंनुसं हिणवण्याशिवाय काही न करता येण्यामागचे कारण हे इथल्या मिपाकरांना आता चांगलेच समजले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Mon, 01/09/2017 - 23:42 नवीन
काही खास आकडेवारी: १. दिनांक १० डिसेंबर २०१६ ची बातमी आहे ही. म्हणजे नोव्हेंबरातल्या विक्री-उत्पादनांचा तसा काही संबंध नसावा. The central government’s direct tax collections increased 15.1 per cent in April-November 2016 compared with the same period a year earlier, while indirect tax collections rose 26.2 per cent in the same eight-month period. However, total indirect tax receipts during November 2016 were 13.9 per cent lower than the collections seen in October 2016. Within direct taxes, net corporate income tax collections grew 8.75 per cent during April-November 2016 while net personal income tax collections grew 23.9 per cent over the same period of the previous year. Within indirect taxes, net central excise collections stood at Rs.2.43 lakh crore in the period between April and November 2016 as compared with Rs.1.69 lakh crore during the corresponding period in the previous financial year, a growth of 43.5 per cent. “If demonetisation happens on November 9, people cannot stop production from November 9 and 10,” M.S. Mani, Senior Director at Deloitte India, said in a telephone interview. “Whatever is there in the cycle, all the raw materials have to get consumed. Goods will get produced and will get dispatched,” he said. “If there is excess stock on account of demonetisation, that will lead to a reduction in production with a two-month delay,” Mr. Mani added. “So the November effect, to my mind, will be felt in January.” http://www.thehindu.com/business/Direct-tax-collections-rise-15-indirect-tax-collections-up-26/article16787015.ece २. दिनांक ९ जुलै २०१६: नोटाबंदीचा 'न' कोणाला माहित नसतांनाची बातमी. एप्रिल ते जून २०१६ या तिमाहीचे एप्रिल ते जून २०१५ च्या तुलनेत वाढलेले आकडे. “The main reason for this increase is the change in the requirement for advance tax payment in respect of individuals made in last Budget. Earlier, there were three installments to be paid by individuals in the month of September, December and March. Now individuals are supposed to pay four instalments of advance tax in June, September, December and March. June installment is 15 per cent,” Adhia said. http://indianexpress.com/article/business/economy/direct-tax-collection-up-25-in-q1-2017-indirect-up-31-2902380/ ३. नेहमीच दरवर्षी मागच्या वर्षीपेक्षा सर्व प्रकारच्या करांच्या कलेक्शनमधे कशी वाढ-घट होते हे दर्शवणारा तक्ता. १९८१ ते २०१२ पर्यंतचे आकडेवारी. http://portal.indiainfoline.com/datamonitor/Public-Finance-Annually/Central-State-Govt-Finance-Combined/Direct-and-Indirect-Tax-Revenues-of-Central-and-State-Governments.aspx ४. काही जुन्या बातम्या: १८ फेब्रुवारी २०१४. आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या बजेटनंतर. करसंकलनध्येय ७७,००० करोड ने हुकलं, कॉन्ग्रेसच्या राज्यात. पी चिदंबरम अर्थमंत्री. The interim Budget documents laid in Parliament by Finance Minister P Chidambaram today showed that the finance ministry has failed to achieve the targets in direct and indirect taxes as laid out in BE. The government had set a Budget target of a 19-per cent jump in the tax mop-up this year too, but the collections as on March 31, 2014 are projected to show only a 11.6-per cent growth as per RE with GDP growth slowing down. Asked whether the next year target of 19 per cent growth was too ambitious, the finance minister said that the targets are always set high at the beginning of the year to encourage higher tax collections. ५. त्यानंतरच्या २०१४-१५ च्या भाजपच्या राज्यात. करसंकलन ध्येय ६९ हजार करोड ने हुकलं. तरी २०१३-१४ च्या तुलनेत करसंकलन १९% टक्क्यांनी वाढले. http://www.thehindubusinessline.com/economy/direct-tax-collection-falls-short-by-14-in-201415/article7167232.ece ६. आर्थिक वर्ष २०१५-१६: भाजपच्या राज्यात करसंकलनाचे ध्येय पूर्ण तर केलेच त्यावर ५००० करोड अतिरिक्त मिळवले. अभिनंदन. The indirect tax revenue exceeded budget estimates (BE) for 2015-16 by Rs 65,618 crore and the RE by Rs 9,885 crore. The collection represents a growth of 31.1 per cent over 2014-15. The direct tax collection, however, is lower than the RE of Rs 7.52 lakh crore. The realisation was 7.61 per cent higher than 2014-15 receipts. http://www.financialexpress.com/economy/at-rs-14-60-lakh-crore-tax-collection-in-2015-16-exceeds-target-by-rs-5000-crore/233410/
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 01/10/2017 - 00:01 नवीन
पेट्रोलच्या किंमतीत मूळ किंमतीपेक्षा टॅक्स जास्त. ६० रुपयाच्या पेट्रोलमधे ३१ रुपयांचा निव्वळ कर. http://www.financialexpress.com/economy/taxes-exceed-actual-cost-of-petrol/163469/ Image removed. http://www.mycarhelpline.com/index.php?option=com_latestnews&view=detail&n_id=417&Itemid=10 इंधनांच्या सदर दरवाढीचा, करवाढीचा एकूण करसंकलनावर किती परिणाम झालाय याचाही विचार व्हावा. तसेच पेट्रोलपंप वर इंधनासाठी जुन्या नोटा चालत होत्या हेही लक्षात घेतलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/11/2017 - 07:49 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/india/13-cooprative-banks-deposited-rs-1600-crore-in-banned-notes/articleshow/56464717.cms?utm_source=toiandroidapp&utm_medium=Email&utm_campaign=list १. नोव्हेंबर १६ ते २१ या कालखंडात १३ कोऑपरेटिव्ह बँकांनी तब्बल १५९६ कोटी रुपये रद्द झालेल्या रु५०० आणि रु १००० च्या नोटांत मुंबईतील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात जमा केले आहेत. २. अजून एका को-ऑप बँकेने रिझर्व बँकेकडे असे रु१४०० कोटी जमा केले आहेत. ३. सुरतेतल्या एका को-ऑप बँकेने असेच रु२० कोटी बँक ऑफ बरोडामध्ये जमा केले आहे. या बँकांना ९ नोव्हेंबरपासून जुन्या नोटा स्विकारायला बंदी होती. तर मग इतके रद्द चलन ०९ ते २१ नोव्हेंबर या कालखंडात त्यांच्याकडे कसे आले याची अर्थातच चौकशी होईलच. ते चलन ०८ नोव्हेंबरपूर्वी जमा झालेले असेल तर ०८ नोव्हेंबरच्या पंतप्रधानांच्या भाषणानंतर इतकी मोठी रक्कम इतके जास्त दिवस त्यांनी स्वतःजवळ का बाळगली या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, जे कठीण आहे हे कोणीही सांगू शकेल. भविष्यात अजून असे प्रकार पुढे येतील यात वाद नाही कारण अश्या सुमारे ३०० बँका ईडीच्या रडारवर आहेत. मात्र, या घटना "को-ऑप बँकांना जुने चलन स्विकारायला परवानगी नाकारली" म्हणून विरोधाचा आवाज उठवण्यार्‍या मनमोहन सिंगसाहेबांसकट सगळे जण उघडे पडले आहेत यात वाद नाही. "माजी पंतप्रधान, थोर अर्थतज्ञ व माजी आरबीआय गव्हर्नर" असलेल्या मनमोहनसिंग इतका प्राथमिक स्तराचा अंदाज नव्हता यावर विश्वास बसत नाही असे मी अगोदर लिहिले होते. त्यांचे राज्यसभेतले भाषण चलाख राजकारण्यांनी लिहून त्यांना वाचायला भाग पाडले असे आजही माझे मत आहे. चुकीच्या राजकारण पाय गुंतले की भल्या भल्यांचे कसे पतन होते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. शहाण्याने त्या फंदात पडू नये आणि चूक झाली असेल तर संधी आहे तोवर सुधारून घ्यावे हेच अंतीम भल्याचे असते.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 01/11/2017 - 10:15 नवीन
चिल माडी....... सहकारी बँकांना नोटा स्वीकारायला बहुधा बंदी नव्हती. नोटा बदलून द्यायला बंदी होती. आणि मेनली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना बंदी होती. आमच्या सोसायटीने चार हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात डिसेंबर महिन्यात ठाणे जनता सहकारी बँकेत भरले आहेत (पे स्लिप हवी असल्यास दाखवीन). तेव्हा सहकारी बँकांनी जे पैसे जमा केले आहेत ते लेजिटिमेट असू शकतील. उशीरा भरले म्हणजे ते काळे असणार वगैरे निष्कर्ष काढण्यासारखी परिस्थिती नाही. तीन ते पाच लाख कोटी रुपये काळे असल्याने बँकांत जमा होणारच नाहीत असे समजणारे उघडे पडले. सुरुवातीच्या काळात "केवढाच्या केवढा ट्याक्स महापालिकांकडे जमा झाला" म्हणून टाळ्या पिटल्या. त्यात किती प्रमाणात काळा पैसा आला असेल याचा अंदाज करणे शक्य नाही. मनमोहनसिंग काही उघडे वगैरे पडले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/11/2017 - 10:21 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 01/11/2017 - 10:31 नवीन
स्वतःचं हसं झालं तर असं जमिनीवर लोळून हसायचं नसतं हो डॉक्टरसाहेब !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/11/2017 - 15:53 नवीन
तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द नोटा कोऑप बँकांमध्ये ०९ नोव्हेंबरनंतर कश्या आल्या असाव्यात ? हा प्रश्न तुमच्या मनात आला नसेल, त्यामुळे तुम्ही केलेला विनोद तुमच्याच ध्यानात आला नाही बहुतेक. थोडे थांबले की चौकशीत बाकी सगळे मुद्दे बाहेर येतील तेव्हा नक्की काय झाले ते कळेलच, तेव्हा बघू. आता तरी ते संशयास्पद आहे याबद्दल संशय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 01/11/2017 - 18:01 नवीन
तुम्ही मुळात सहकारी बँकांना बंदी होती असे म्हणालात. ते गृहीत धरून त्यांनी पैसे नोव्हेंबरात जमा केले म्हणजे ते बॅक डेटेड जमा केले असे पुढचे तर्क चालवलेत. तुमच्या मूळ गृहीतकालाच सुरुंग लागून सुद्धा तुम्ही गडाबडा लोळलात म्हणून आश्चर्य वाटले. >>तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द नोटा कोऑप बँकांमध्ये ०९ नोव्हेंबरनंतर कश्या आल्या असाव्यात ? हा प्रश्न तुमच्या मनात आला नसेल, त्यामुळे तुम्ही केलेला विनोद तुमच्याच ध्यानात आला नाही बहुतेक. १५०० कोटी रुपये काही फार नाहीत. अनेक सहकारी बँका खूप मोठ्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे Wed, 01/11/2017 - 13:33 नवीन
सहकारी बँकांना नोटा स्वीकारायला बहुधा बंदी नव्हती. नोटा बदलून द्यायला बंदी होती. आणि मेनली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना बंदी होती. बरोबर आहे. फक्त जि.म. स.बँकांना केवायसी पुर्ण नसल्यामुळे बंदी होती. सहकारी बँकांवर आरोप करणारे २००० च्या नवीन नोटांना खासगी बँका व सरकारी बँकांतून पाय फुटले होते हे सोइस्करपणे विसरत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/11/2017 - 15:55 नवीन
एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन करणे चूक असते. माझ्या मते दोन्ही गोष्टी चूक आहेत आणि दोघांचीही कसून चौकशी करून दोषी लोकांना शिक्षा व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 01/11/2017 - 19:12 नवीन
एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन करणे चूक असते. समर्थन कोण करतंय? फक्त जि.म.स. बँकांना सापत्न वागणूक दिली गेली हे खटकलं
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा