पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे????
महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(143)
स
संदीप डांगे
Tue, 12/13/2016 - 03:56
नवीन
आयाम सोरी!!! प्रतिसाद मागे घेतो! :) ;)
- Log in or register to post comments
इ
इंद्रवदन१
Mon, 12/12/2016 - 22:07
नवीन
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 12/13/2016 - 04:34
नवीन
डिझेलमध्ये घासलेट अंमळ जास्त टाकलं वाटतं पेट्रोल पंपवाल्याने. पुणेकर ना, अशीच हातोहात शेंडी लावतात बाहेरच्यांना. जाऊ द्या. तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. आणि त्या 'आर्य संगीत'वाल्यांची चांगली खरमरीत भाषेत कानउघाडणी केली पाहिजे. गेटवरचे स्वयंसेवक काय झोपले होते का? कुणीही आत घुसतंय म्हणजे काय! असो. बादवे त्या समोरच्या गोऱ्या घाऱ्या यमीचा शिंचा टफी नुसताच सुस्तावलेला असतो. त्याला असले धागे चघळायला दिले पाहिजेत. तेव्हढीच जरा करमणूक. नाही का?
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 12/13/2016 - 05:14
नवीन
बरं मग कधी येताय पुण्यात टफी, चितळ्यांकडच गार गार दुध पिऊया.. काय म्हणता?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Tue, 12/13/2016 - 05:17
नवीन
म्हणजे नक्की कोण?
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 12/13/2016 - 07:03
नवीन
टफीनी धागा ज रा आधी काढला असता तर पैशे तरी वाचले असते.शिवाय आमच्या इमारत संकुलात गोर्या घार्या लोकांची नावंच फार आहेत : -/
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 12/13/2016 - 12:08
नवीन
तरी सांगत होते.................
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Tue, 12/13/2016 - 07:25
नवीन
मला वाटत टफी सारखे विचारवंत ह्यांना पुणेकरांनी आपल म्हणाव आणि भरभरून प्रेम द्याव :) म्हणजे त्यांच मत बदलेल , रचाक बराचस बरोबर लिहिल्य म्हणालो तर पुणेकर मिपा मित्र नाराज होतील :)
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 12/13/2016 - 07:33
नवीन
सगळी इंडस्ट्रीयल डेव्ह्लपमेंट पुणे आणि आसपासच का? आय टी कंपन्या पुण्याऐवजी साता-यात का येत नाहीत ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/13/2016 - 08:25
नवीन
ओ काका , कशाला काय तरीच बोलताय ?
शुभ बोल बबन्या !
नकोच सातार्यात आय टी कंपन्या अन त्या निमित्ताने येणारी भय्या गर्दी . तुम्हाला औंधाला ओन्ध , बाणेर ला बानेर , सिंव्हगडाला सिंहगड वगैरे वगैरे आणि पुण्याला पूना म्हणलेलं चालत असेल पण सातार्यात कोणी सातार्याला सतारा म्हणलेले आम्ही खपवुन घेणार नाही !
:-\
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 12/13/2016 - 09:32
नवीन
बाकी भैया म्हणा, राजस्तानी म्हणा, सगळीकडेच दुकाने थाटून आहेत.
सिंह बरोबर. म्हणून सिंहगड. सिंव्हगड नाही.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 12/13/2016 - 07:36
नवीन
मला वाटते की आफ्रिका खंड सोडून इतर सगळ्या ठिकाणांचे विनाकारण स्तोम माजविले जात आहे. मानव वंशाची सुरवात आफ्रिका खंडात झाली.त्यामुळे इतर कुठेही (भारत,अमेरिका,युरोप इत्यादी) झालेली प्रगती 'बाहेरून' आलेल्यांनीच केलेली आहे.त्यामुळे आफ्रिका सोडून इतर कुठल्याच ठिकाणाचा उदोउदो करणे चुकीचे आहे.
- Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं
Tue, 12/13/2016 - 07:48
नवीन
पार वाट लावलीत राव, नावाप्रमाणेच टर्बोचार्जड आहात.
पुण्यात जाणं झालं बऱ्याचदा पण फिरणं नाही झालं, अख्ख्या ग्रुप ला घेऊन जाणार होतो पुणं फिरायला पण आता आधी सातारला जाऊन येतो म्हणतो.
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Tue, 12/13/2016 - 08:35
नवीन
काय चाललंय काय हे ???
टफीभाऊंना इनो द्या हो कोणीतरी...
कुठे नेऊन ठेवलंय पुणे आमचं...!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 09:08
नवीन
मिपाला टीआरपीची इतकी वानवा आहे?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/13/2016 - 09:17
नवीन
मिपाला नाही. धागालेखकू महाशयाना आहे.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 09:21
नवीन
मग मिपावर असले धागे का राहतात? :(
दिवसेंदिवस दर्जा घसरतच चालला आहे!
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/13/2016 - 09:26
नवीन
चांगला प्रश्न आहे. पण मला नै म्हैत. आपण भेंड्या खेळूया का?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 09:28
नवीन
काढ धागा.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/13/2016 - 09:35
नवीन
हाच बराय खरडफळ्यासारखा. लेखकूला काय प्रतिक्रिया आल्याशी कारण! ;)
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 12/13/2016 - 10:12
नवीन
ण ~ न.
नको देवराया
अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा
फुटो पाहे!
ह.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 12/13/2016 - 10:16
नवीन
हरी नाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते
विनविते, मी तुला, भाववेडी मीरा...
गोड नामी तुझ्या रंगते...
त,...
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/13/2016 - 10:37
नवीन
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
ळ..
- Log in or register to post comments
ए
एकनाथ जाधव
Tue, 12/13/2016 - 10:58
नवीन
तुझ्या कान्ती सम रक्त पताका पुर्वदिशी उगवती
अरुण उगवला प्रभात झाली
ल
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 12/13/2016 - 11:37
नवीन
लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्याचं
बोलणं गं मंजूळ मैनेचं, नारी गंऽऽऽ नारी गंऽऽऽ नारी गं, हो नारी गं हो नारी गं..
ग
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 12/13/2016 - 11:43
नवीन
गोरी तेरा गांव बडा प्यारा
मैं तो गया मारा,
आके यहां रे, आके यहां रे.
रंगीबिरन्गे , फुल खिले है, लोग भी फुलों जैसे
आ जाये इक बार यहां तो, जायेगां फीर कैसे ...
स
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Tue, 12/13/2016 - 12:23
नवीन
सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय..
य
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Tue, 12/13/2016 - 12:53
नवीन
ये रे घना ये रे घना
ये रे घना ये रे घना
नाहू घाल माझ्या मना
न
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 13:32
नवीन
नाही कसे म्हणू तुला, म्हणते रे गीत
परि सारे हलक्याने, आड येते रीत
त
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 12/13/2016 - 14:18
नवीन
तव नयनांचे दल हलले गं,
पानावरच्या दवबिंदूपरी
त्रिभूवन हे डळमळले गं.
ग
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 12/13/2016 - 14:27
नवीन
गगनसदन तेजोमय
तिमिर हरुन करुणाकर
दे प्रकाश देई अभय
य
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 14:32
नवीन
यमुनाजळि खेळू खेळ कन्हैया, का लाजता ?
हलती कशा या लाटा, फुलतो शरीरी काटा
का हो दूर रहाता ? प्रेमगंगा ही वहाता
घ्या उडी घ्या, का पाहता ? चला ना !
बहुमोल अशी ही वेळ अरसिका का दवडिता ?
त
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 12/13/2016 - 14:35
नवीन
ये रातें ये मोसम, नदीका किनारा, ये चंचल हवा ।
कहा दो दिलोंने, के मिलके कभी हम, न होंगे जुदा ।।
द
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 12/13/2016 - 14:46
नवीन
"एक धागा सुखाचा, शंभर धागे ..." लिहीता येईल.
- Log in or register to post comments
स
समीर वैद्य
Tue, 12/13/2016 - 15:19
नवीन
एक धागा सुखाचा.. शंभर धागे टफिचे ।।
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 12/13/2016 - 15:30
नवीन
पण ते शंभर वर थांबतील की नाही शंका आहे.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 12/13/2016 - 14:49
नवीन
यशो, मगाशी त येऊन गेलय म्हणून द घेतिये.
दाटून कंठ येतो,
ओठात येई गाणे,
जा आपुल्या घरी तू,
जा लाडके सुखाने.
न
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 14:53
नवीन
नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा
सगूण कुणी म्हणती देवाला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
विश्वरूप त्या परमेशाचा
चराचराचर असे ठसा
स
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/13/2016 - 14:54
नवीन
ससा तो ससा कि कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धाऊ नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली ||
ल
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 15:00
नवीन
लवलव करी पातं
डोळं नाही थार्याला
एकटक पाहूं कसं
लुकलुक तार्याला
ल
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 12/13/2016 - 15:11
नवीन
लगी लगी है ये दिल की लगी
न समझो इसे दिल्लगी...
मै ने जो चाहा था
मिल गयी वो खुशी
लगी लगी है ये दिल की लगी
न समझो इसे दिल्लगी...
ग
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 12/13/2016 - 15:18
नवीन
गम है कोई तो
दम मारो यारो
गम की दवा पे
दम ही खूशी है
चूर नशे में,
ये जिंदगी है...
हरी ओम ..
म
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 15:25
नवीन
मधु मागशि माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी
आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं न रोष सखया, दया करीं.
र
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 12/13/2016 - 15:12
नवीन
लाय लाय लाय लाय लायेकरनी पोरी लायेकरनी
वाकरे शेंड्याच्या गोयेकरनी
वटीनं खुर्दा वरलीकरनी पोरी वरलीकरनी
सफेद परक्या मोंबयकरनी
लाय लाय लाय लाय लायेकरनी पोरी लायेकरनी
वाकरे शेंड्याच्या गोयेकरनी
न
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 15:15
नवीन
आता ग घ्यावा का न?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 12/13/2016 - 15:18
नवीन
न जाने मेरे, दिल को क्या हो गया ।
अभी तो यही, था मगर खो गया ।।
य
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 12/13/2016 - 15:22
नवीन
या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या
य
- Log in or register to post comments
R
Rahul D
Tue, 12/13/2016 - 15:52
नवीन
ये जो मोहब्बत है, ये उनका हे काम ।
म
- Log in or register to post comments
स
सानझरी
Tue, 12/13/2016 - 15:55
नवीन
मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता,
अगर तूफ़ाँ नहीं आता किनारा मिल गया होता..
त
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 12/13/2016 - 15:55
नवीन
मी डोलकरं मी डोलकरं डोलकरं दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो येजाऽऽऽ
मी डोलकरं मी डोलकरं डोलकरं दर्याचा राजा
ज
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »