Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Mon, 12/12/2016 - 16:28
🗣 143 प्रतिसाद
महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे. तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि. तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते. तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत. पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही. आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत. खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही. तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो. कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
25752 वाचन

💬 प्रतिसाद (143)
य
यशोधरा Tue, 12/13/2016 - 16:00 नवीन
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भार साहे ह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पगला गजोधर Tue, 12/13/2016 - 16:03 नवीन
जा जा .... जा जा .... जा जा .... जा जा .... कबुतर जा जा जा .... कबुतर जा जा जा .... पहले प्यार की पहली चिट्ठी .... साजन को दे आ ..... अ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आदूबाळ Tue, 12/13/2016 - 16:15 नवीन
आज जाने की जिद ना करो... यूंही पहलू में बैठे रहो ह (एवढा उजवीकडचा प्रतिसाद द्यायचं माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी मो० टफी यांचा आभारी आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सूड Tue, 12/13/2016 - 16:26 नवीन
ह्यो ह्यो ह्यो पावना सखूचा मेव्हना तुज्याकडं बघून हासतोय गं, कायतरी घ्वोटाळा दिसतोय गं... ग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पगला गजोधर Tue, 12/13/2016 - 16:27 नवीन
होठों से छूं लो तुम मेरा गीत अमर कर दो | बन जाओ मीत मेरे, मेरी प्रीत अमर कर दो || ना उम्र की सीमा हो, ना जन्मों का हो बंधन | जब प्यार करे कोई तो देखे केवल मन | नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो || आकाश का सूनापन मेरे तनहा मन में | पायल झनकाती तुम आ जाओ जीवन में | साँसे देकर अपनी संगीत अमर कर दो || जग ने छिना मुझ से, मुझे जो भी लगा प्यारा | सब जीता किये मुझ से, मैं हर पल ही हारा | तुम हार के दिल अपना, मेरी जीत अमर कर दो || द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
र
रेवती Tue, 12/13/2016 - 17:07 नवीन
दम मारो दम, मिट जाये गम, बोलो सुबह शाम, हरे क्रिश्ण हरे राम. म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
य
यशोधरा Tue, 12/13/2016 - 17:09 नवीन
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
नीलमोहर Tue, 12/13/2016 - 17:13 नवीन
माई नी माई मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा जोगन हो गई तेरी दुलारी मन जोगी संग लागा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रभू-प्रसाद Tue, 12/13/2016 - 18:22 नवीन
मीट जाये गम .. बोलो सुबह शाम... हरे कृश्न हरे राम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
शिवोऽहम् Tue, 12/13/2016 - 20:11 नवीन
माझ्या नवर्यानं सोडलिया दारू बाई देव पावलाय गं ग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभू-प्रसाद
प
परिधी Wed, 12/14/2016 - 07:00 नवीन
गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवोऽहम्
अ
अनन्त अवधुत Wed, 12/14/2016 - 07:22 नवीन
सागरा प्राण तळमळला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिधी
व
विजुभाऊ Fri, 12/30/2016 - 19:48 नवीन
शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा पोपट होता सभापती मधोमध उभा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रान्जल केलकर Wed, 12/28/2016 - 03:32 नवीन
दुनिया तुफान मेल नहीं भैंया, दुनिया वेड्यांचा बाजार ! दुनिया वेड्यांचा बाजार झांजीबार, झांजीबार, झांजीबार ! एका रात्री इथून पसार दुसर्‍या रात्री दर्यापार हुश्शार, भाईं हुश्शार ! झांजीबार, झांजीबार, झांजीबार ! बुडलो, मेलो, ठार अखेरीस कुठे सुरैया, निम्मी, मीना, नर्गिस लाख खर्चले, वसूल हजार झांजीबार, झांजीबार, झांजीबार ! आली रे आली रसाळ आंबेवाली आरे हड्‌ ! आली, आली नवी निवडणुक पेरा पैका, मते आपसूक मत चिठ्ठ्यांचे गळ्यात हार झांजीबार, झांजीबार, झांजीबार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अद्द्या Tue, 12/13/2016 - 09:33 नवीन
लोकांचं एकूणच सामान्य ज्ञान , सहनशक्ती आणि अक्कल किती कमी आहे. हे कळावं म्हणून असे धागे गरजेचे असतात . असे " लेख" वाचायचे . उगाच हसल्यासारखं करायचं . माउस च्या दोन खर्चिक क्लिक्स आणि २ स्क्रोल वाया घालवले म्हणून स्वतःला शिव्या द्यायच्या . आणि खफ वर दंगा करायला परत जायचं . शिंपला ए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
संजय पाटिल Tue, 12/13/2016 - 10:49 नवीन
अहो त्यानी मागेच कबूल केलय, मला अक्कल कमी आहे म्हणून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
ए
एम.जी. Tue, 12/13/2016 - 10:43 नवीन
पुण्याला शिव्या घालून प्रसिद्ध पावणार्‍यांमधे एकाची भर.....
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 12/13/2016 - 12:14 नवीन
प्रसिद्ध कशाला करायचं त्यांना? आम्ही वर गाण्याच्या भेंड्या सुरु केल्यात. तुम्ही पण त्यात सहभागी होऊ शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.
स
सूड Tue, 12/13/2016 - 12:13 नवीन
बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी
हे गोरे, घारे आणि सानुसासिक स्वर आपल्याला प्रचंड आवडतात ब्वॉ!!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 12/13/2016 - 12:51 नवीन
बाहेरचे जे सगळे आले ते पुणे हे मवाल्यांचे , कम्युनिस्टांचे, दहशतवाद्यांचे , उकाड्याचे गाव नाही म्हणून ,प्रत्येकाचा येण्यातील स्वार्थ वेगवेगळा. पेशव्याना कोकणात कर्त्रुत्व गाजवता आले नसते अन डी वाय ना कोल्हापुरात.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Tue, 12/13/2016 - 15:18 नवीन
आपण किनई पुणेकरांच घर ऊन्हात बांधू हा. 65 वा सवाई साताऱ्यात झालाच पायजे अवांतर जे पी ना बोलवा रे
  • Log in or register to post comments
स
समीर वैद्य Tue, 12/13/2016 - 15:26 नवीन
एक धागा सुखाचा.. शंभर धागे टफिचे ।।
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 12/13/2016 - 15:31 नवीन
टफिंनी आणखी धागे काढावे, जेणेकरुन गाण्याच्या भेंड्या खेळता येतील. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर वैद्य
इ
इंद्रवदन१ Tue, 12/13/2016 - 15:45 नवीन
टफी आणि केजरीवाल कुठे काय बोलतील
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 12/13/2016 - 15:59 नवीन
टफि को नोंसेन्स पसंद है टीआरपी का देस पसंद है बिनडोक का भेस पसंद है
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 12/13/2016 - 17:19 नवीन
सवाई गन्धर्व सोहळा पुढच्या वर्षी प्रत्यक्ष हजर राहून ऐकाव्याचे असल्यास हे करता येईल. १. समारंभाच्या स्थानाला चालत जाता येईल एवढ्या अंतरावरील हॉटेल मध्ये आत्तापासून आरक्षण करा. २. पहिल्या रांगेतील सोफयावरील जागेचे आत्ताच आरक्षण करा. हे परवडत नसेल तर घरी बसून तू नळीवर २०१७ चे कार्यक्रम उपलब्ध होतील तेंव्हा ऐका. तुमच्या तोंडसुख घेण्याने पुण्याची रहदारी किंवा सवाईचे श्रोते सुधारतील या भ्रमात राहू नका.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 12/13/2016 - 18:49 नवीन
आता मुंबईचा नंबर कधी ?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 12/13/2016 - 21:09 नवीन
आवरा
  • Log in or register to post comments
ड
डिस्कोपोन्या Wed, 12/14/2016 - 07:29 नवीन
टर्बोशेठ ...होऊ द्या एखादा मोहोत्सव सातारा कोल्हापुरात , बघा जमतोय का सवाई सारखा , उगीच पुण्यात येण्याचे कष्ट घेऊ नका !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/14/2016 - 10:17 नवीन
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे, ,
सवाई गंधर्व महोत्सव तुमच्यासारख्यांकरता नसतो हो. रसिक, कलाप्रेमी, दर्दी आणि शास्त्रीय व अभिजात संगीतप्रेमी पुणेकरांसाठी ते असतात. तुमच्यासारख्या सातार्करांनी डोक्यावर पांढर्‍या पिसांची गुलछबू टोपी घालावी (शांताराम वणकुद्रे, एम जी रामचंद्रन इ. मंडळी कायम अशा टोपीत दिसायची. या टोपीत माणूस छंदीफंदी दिसतो.), तोंडात पानाचा तोबरा भरावा, गळ्यात ३-४ पदरी जाड सोनेरी गोफ घालावे, "शांताबाईचा जलवा"/"करंट ४४०"/"नाद करायचा नाय" असली नावे असलेल्या वगनाट्याला जावे, स्टेजवरच्या छमकड्या नाचत असताना जोरदार शिट्ट्या माराव्या, "बाई वाड्यावर या"/"आवाज वाढव डीजे"/"पोपट"/"आँटी तुझी घंटी" असल्या चावट द्व्यर्थी गाण्यावर खुर्चीवर चढून नाच करावा, खुर्चीखाली जोरदार पानाची पिंक मारावी, ख्रॅssssssssssक असा जोरदार आवाज काढून खाकरा काढावा, गुटख्याची पुडी तोंडात रिकामी करून रिकामी पुडी खाली फेकावी आणि वगनाट्य संपल्यावर बुलेट ताणून एखाद्या रेस्टॉरंट कम बारमध्ये जाऊन पिऊन आणि नंतर नळी फोडून सावकाश मध्यरात्री घरी जावे. सवाई बिवाई असल्या ठिकाणी जाऊन कशाला डोक्याला ताप करून घेता?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 12/14/2016 - 11:55 नवीन
सातरकडच्याच एका महोत्सवाची माहीती http://mumbaimirror.indiatimes.com/others/sunday-read/Sacred-ground/articleshow/54875086.cms? त्यात एका ठीकाणी काय म्हटले आहे ते पहा “A large part of the audience, including villagers and farmers, know when a performer is approaching the sam (first beat of a rhythmic cycle) even in (less frequently heard) taals like Jhoomra and Tilwada,” he said. “This is something you don’t see in Mumbai.” अजुन एक “Listeners there are hard-core music lovers,” said Samsi. “Despite it being a rural area, they have been exposed to intense, traditional classical music. Many of them even know the Gwalior and Agra gharana khayals being sung. They are not like urban audiences, who keep clapping for everything. You get proper daad (encouragement) and appreciation from the heart.”
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुज्ञ Wed, 12/14/2016 - 10:23 नवीन
यानिमित्ताने आम्हीही याच विषयावर पूर्वी अशाच चालू केलेल्या एका धाग्याची जाहिरात. जरूर वाचा :) http://www.misalpav.com/node/29276
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 12/14/2016 - 16:12 नवीन
पुणेकर आणि गायन लेखात एकत्र आल्याने कायप्पावरला एक जोक आठवला - एका गायकाचं पुण्यात गाणं असतं. पुणेकर सारखं वन्स मोर देतात. गायकाला छान वाटतं. पण वन्स मोर संपत नाही. मग तो विचारतो, "एवढ्या वेळा वन्स मोर का?" पुणेकर: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोर देतोच....
  • Log in or register to post comments
व
विश्वेश Mon, 12/26/2016 - 07:59 नवीन
हे म्हणजे असे आहे कि आपल्या बनियानला भले भगदाड असो पण दुसऱ्याच्या शर्टावरचा डाग बघून फिदी फिदी हसायचे ! पुण्यात बोलावले कोणी होते ? तोंड वर करून यायचे आणि वर आल्या गावाला शिव्या घालायच्या बरं जमत बुआ सातारकरांना ! तुमच्या साताऱ्यात का नाही हो त्या मूर्तीने काढली इन्फोसिस ? पुणेकर १-४ मध्ये झोपल्याने धंद्याचे जेवढे नुस्कान (मुद्दाम शुद्धलेखनाच्या चुका करतो आहे तुम्हाला कळावे म्हणून) करून घेतो ना तेव्हढा तुमचा सातारचा वर्षभराचा टर्न ओव्हर तरी आहे का बघा !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/29/2016 - 20:04 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/29/2016 - 20:07 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/29/2016 - 20:08 नवीन
मोबाईल वरुन येत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 12/30/2016 - 03:17 नवीन
अत्तास नाय, पार पुण्यपत्तन असल्यापासुन माजवलं जात आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/30/2016 - 05:01 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/30/2016 - 05:02 नवीन
एका पुणेरी माणसाला तीन भाषा बोलणारा पोपट दिसतो...... तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवितो.. आणि काही प्रश्न विचारतो.. माणूस – Who are you.?? पोपट – I am Parrot.. माणूस – तुम कोन हो..? पोपट – मैं तोता हु ..l माणूस – तू कोण आहेस..? पोपट – तु बहिरा हाय का बे...?? बैताडया, तुले २ वेळा सांगितलं तरी समजत नाही का बे..? स्वताले जास्त शायना समजून रायला का बे..? आता का कानाखाली वाजवुन सांगु काबे तुले बहिय्रा.. की मी पोपट आहो ते... दिसत नाही का तुले भोकण्या... ** पुणेरी माणूस:- बाप रे, पोपट नागपुरचा आहे वाटतं?
  • Log in or register to post comments
ज
जाबाली Fri, 12/30/2016 - 05:03 नवीन
.पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. ----------- आवरा !
  • Log in or register to post comments
भ
भक्त प्रल्हाद Fri, 12/30/2016 - 21:37 नवीन
तरी नशीब. अजुन शिवाजी महाराज पुण्याचे आहेत हे मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाबाली
व
विजुभाऊ Fri, 12/30/2016 - 19:52 नवीन
पुण्यात खडीचे मैदान आणि खडी मशीन अशी दोन ठिकाणे आहेत. पण एक आहे सोमवार पेठेत तर दुसरे....एकदम कोम्ढव्यात....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा