Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुतळा हटाव

ज
जानु
Tue, 01/03/2017 - 07:28
🗣 175 प्रतिसाद
आज सकाळी बातमी वाचली ती पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने पाडुन टाकला. फार पूर्वी वाचलेले बाळकराम आठवले. त्या काळातील वाचलेले खुसखुशीत लेखन, नाटके, लेख आठवले. पु. ल., चि. वि. यांचे लेखन वाचुन त्यात वाटणारा आनंद किती निर्मळ आणि प्रांजळ होता याची आठवण पुन्हा एकदा झाली. त्या काळात ठकीच लग्न किती आनंददायी वाटलं? खरच गडकरी फेकुन द्यावेत का? कोणाकोणाला फेकायचे याची यादी एकदा बनवायच म्हणा. आपण इतके स्वार्थी झालोत का? की असहाय आहोत? खूप विचार आहेत एकत्रित सुसंबद्ध पणे लिहता येत नाहीत पण व्यक्त तरी करावे म्हणून लिहतो. एवढीच हिंमत आणि समाधान. जिथे मला कोणी ओळखत नाही आणि यावर कोणी सत्ताधारी किंवा त्याचा भाऊ, दादा हाच तो आपल्याला विरोध करणारा असे म्हणणार नाही.

प्रतिक्रिया द्या
35372 वाचन

💬 प्रतिसाद (175)
प
प्रकाश घाटपांडे Tue, 01/03/2017 - 07:30 नवीन
आता याला जातीय रंग चढवले जातील
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Tue, 01/03/2017 - 08:05 नवीन
याला जातीय रंग च्ढवायची काय जरूरी आहे? हे कृत्य जतियवादीच अहे. नहीतर पुतळे हटवण्यासाठी दुसरे कोणते सयुक्तिक कारण सापडते आहे? २०१० साली घदलेल्या या घटनेची पुनरवृत्ती झली झाली आहे. हे वाचा click here
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अद्द्या Tue, 01/03/2017 - 07:39 नवीन
संभाजी ब्रिगेड हि संघटना जातीय नाही असं म्हणायचंय का तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 01/03/2017 - 07:41 नवीन
नाही नाही तस अजिबात नाही. प्रकरणाला जातीय रंग म्हणतोय मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
अ
अद्द्या Tue, 01/03/2017 - 07:49 नवीन
मी हि तेच म्हणतोय . त्या संघटनेने काही केलं कि ते जातीय रंग बघूनच केलेलं असतं .. असो . सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून तरी पोलीस काही कारवाई करतील हीच आशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सूड Tue, 01/03/2017 - 12:34 नवीन
त्यांना हळूच कुणीतरी सांगा, त्यांच्या ष्टाईलने "त्ये गडकरी कै बामन न्हवतं गड्या!!" दुसर्‍या दिवशी पुतळा आहे त्या अवस्थेत परत येईल. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
न
नावातकायआहे Tue, 01/03/2017 - 08:30 नवीन
नाटक ईथे वाचायला मिळेल.. http://ramganeshgadkari.com/egadlari/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=125&Itemid=266
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 01/03/2017 - 11:48 नवीन
नाटक वाचले- नाटकाचे पहिले आणि शेवटची २-३ पाने हेच मूळ असावे पुतळा हटाव मोहिमेचे (ज्याला दरोडा म्हणायचे आहे त्यांनी म्हणावे ) पण नाटक संपूर्ण नाही आहे त्यामुळे ज्या वेळी नाटक लिहायला घेतले होते त्यावेळेस ज्ञात असलेला संभाजी महाराजांबद्दलचा इतिहास काय होता हे जाणून घेतले पाहिजे. लिहणारे गडकरी होते म्हंटल्यावर आणखी स्फोटक वाटणारच "पुतळा हटाव" वाल्याना. बाकी निवडणूक आली आहे आणि चिखलफेक ही होणार. त्यात संभाजी ब्रिगेड प्रथमच निवडणूक लढवणार आहे आणि त्यांनी असे काही ठोस काम ही पुण्यामध्ये केले नाही त्यामुळे कमी वेळा मध्ये जास्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते असली स्टंटबाजी करणारच. म्हणून सृजन नागरिकांनी त्याला जास्त हवा न देता कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या खात्याच्या कोर्टामध्ये चेंडू ढकलून द्यावा. कृपया शांतता राखावी आणि आपले मत मतपेटीतून द्यावे. महाराष्ट्र पुरोगामी राहिला नाही असली वाक्य फेकून विचारवंतांनी गळे सुद्धा काढू नयेत ही विनंती. त्यामुळे खळ खट्याक करणाऱ्यांना आणखी स्फुरण चढते. (तसे आता अवॉर्ड वापसी सुद्धा कोणी करणार नाहीत, हा भाग अलविदा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
व
विशुमित Tue, 01/03/2017 - 12:16 नवीन
पुण्यामधील सर्वच नेत्यांनी पुतळा हटावचा निषेद केला आहे. निलेश राणे नी मात्र बाजू घेतली आहे पण संभाजी ब्रिगेड नव्हती असे म्हणतात. पोलीस शोध लावतीलच. http://www.loksatta.com/pune-news/pune-mayor-and-other-leaders-reaction-on-removal-of-ram-ganesh-gadkari-statue-1375878/ "राम गणेश गडकरी यांचे लेखन आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याचा प्रतिवाद व्याख्यान, लेखन, विचाराच्या मार्गाने करा, पुतळे फोडून नाही असे माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सांगितले." यांच्या वाक्यामध्ये "इतिहास संशोधन' हा एक शब्द हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 01/04/2017 - 07:10 नवीन
संभाजीच्या चारित्र्य हननाची सुरुवात करणारी बखर मूळातच ताराराणीने लिहून घेतली होती कारण संभाजीचा मुलगा शाहु हा सातारला दुसरी राजगादी स्थापायच्या प्रयत्नात होता. वस्तुतः संभाजीच्या दासी आणि दासिकन्या यांचा तपशीलवार उल्लेख डॉ. सदाशिव शिवदे यांच्या ज्वलज्वलनतेजस या महाराणी येसूबाई यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात डिट्टेलवार आला आहे. दासीकन्या किती व औरंगजेबाने त्यांचे निकाह कोण कोणत्या मुसलमान सरदारपुत्राबरोबर लावून दिले. दासीपुत्र किती व त्यांना बाटवून त्यांची नावे काय काय ठेवण्यात आली. सगळे सगळे सापडेल. आता त्या काळात दास्या ठेवायची पद्धत होती म्हणून कोण याचे समर्थन करू पाहील तर बामणाच्या पेशवाईला का नावे ठेवायची ते ही कळूद्य. आता जा बरं जा त्या ताराराणीचा पुतळा हटवा कावळा नाक्यावरून. आहे का दम पाहुया **मधे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 01/05/2017 - 08:04 नवीन
पेशवे साहेब, संभाजीने किती दास्या ठेवल्या यावरुन त्याचे कर्तॄत्व मोजू नये असे वाटते. ठेवल्याही असतील. तो राजा होता. त्याने त्याची कर्तबगारी कमी होत नाही. संभाजी मुघलांना काही काळा पुरता जाऊन मिळाला होता हे त्याच्या कर्तबगारीला जास्त बट्टा लावणारे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
द
देवेन भोसले गुरुवार, 01/05/2017 - 09:42 नवीन
संभाजीच्या चारित्र्य हननाची सुरुवात करणारी बखर मूळातच ताराराणीने लिहून घेतली होती याचा पुरावा मिलेल का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 01/05/2017 - 10:11 नवीन
जरुर मिलेल. बहुधा शिवाजी अँड हिज टाइम्स मधे. डिट्टेल वार पेशवे सांगतीलच. सुद्द भाषेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवेन भोसले
द
देवेन भोसले गुरुवार, 01/05/2017 - 11:35 नवीन
सुद्द भाषेत. छान वाटल हे वाचुन कळल तुमाच ज्ञान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
A
amit१२३ Tue, 01/03/2017 - 12:42 नवीन
ऐतिहासिक नाटक आहे कि सेक्स कथा ..काय ते शब्द आणि काय ती रचना ..हि संस्कृती होती काय आपली . हा गडकरी असल्या प्रणय कथा सांगतो आणि आम्ही मुकाट्याने वाचतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
व
विशुमित Tue, 01/03/2017 - 13:08 नवीन
<<<<ऐतिहासिक नाटक आहे कि सेक्स कथा>>> -- याच्याशी सहमत पण म्हणून पुतळाच उखडायचा तो पण मध्यरात्री?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit१२३
अ
अप्पा जोगळेकर Tue, 01/03/2017 - 13:33 नवीन
काय ते शब्द आणि काय ती रचना ..हि संस्कृती होती काय आपली आपली संस्कॄती काय होती. जरा विस्कटून सांगा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit१२३
स
सूड Tue, 01/03/2017 - 15:34 नवीन
हि संस्कृती होती काय आपली .
मग काय होतीआपली संस्कृती? जरा सांगा बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit१२३
स
सूड Tue, 01/03/2017 - 15:39 नवीन
हा गडकरी असल्या प्रणय कथा सांगतो आणि आम्ही मुकाट्याने वाचतो
आणि काय हो? राजाला प्रणय करायचा अधिकार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit१२३
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 06:04 नवीन
प्रणय करण्याचा अधिकार सगळ्या प्रौढांना आहे. पण राजाला स्वतःच्या सरदारांच्या बायको बरोबर नसावा. काय म्हणता? ऐतिहासिक पुरावे सुद्धा पाहिजेत त्यासाठी कारण ह्या नाटकातील पात्रे काल्पनिक नाहीत. cinematic लिबर्टी एक वेळ मान्य करू पण एवढी अतिरंजित की राजे शेवटी स्वतःला रंडी बाज वगैरे दूषणे लावून घेतात. आक्षेप हा असावा. हे नाटक गडकरींव्यतरिक कोणीही लिहले असते तरी ते आक्षेपार्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 12:58 नवीन
इसकाळ वरील प्रतिक्रियेतून साभार.. """ amit maruti लोक एखाद्या घटनेचा कसा विचार करतील किंवा मीडिया त्यांना कसा विचार करायला भाग पाडेल याचे उत्तम उदाहरण आज दिसले. लोकांना सत्य काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यामागे कोण असेल , हेतू काय असेल आताच का ? याचा संशय घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे. असो राम गणेश गडकरी एक उत्तम नाटककार पण त्यांच्या राजसंन्यास नाटकाबद्दलच शंका का आहेत .. १) या नाटकाचे ५ भाग आहेत पण यातील २ आणि ४ भाग लिहिलेच नाहीत त्याआधीच त्यांचे निधन झाले असा गडकरी समर्थकांचा दावा आहे. म्हणजे गडकरींनी पहिल्या भागानंतर तिसरा आणि डायरेक्ट पाचवा भाग लिहिला ..ग्रेट कोई मिल गया नंतर क्रिश २ २) हे नाटक ऐतिहासिक आहे कि काल्पनिक ..कारण नावे ऐतिहासिक आहेत पण पात्रांच्या तोंडी शब्द सगळे प्रणय कथेचे आहेत. आता त्यांच्या एकाच प्याला , प्रेमसंन्यास या नाटकांमुळे ते अजरामर झाले पण म्हणून त्यांनी केलेली हि चूक माफ करता येईल का ? हे म्हणजे आसाराम ने दिलेल्या प्रवचनामुळे त्यांना सोडून द्या असे म्हटल्यासारखे होईल. राजसंन्यास या नाटकाच्या पहिल्या भागात सुद्धा काही गोष्टी नाटकाला रंजक बनवण्यासाठी घुसडण्यात आल्या आहेत जसे आजकाल चित्रपटात लव्ह सिन असेल तर सेक्स करताना किंवा किस करताना दाखवले जाते. ऐतिहासिक नाटकात या गोष्टी चालतात का ? बाजीराव मस्तानी मध्ये बाजीराव आणि काशीबाई नाचली तर चालत नाही पण महाराजांच्या नावावर पात्राने चुंबन आणि अश्लील बोललेलं चालतं ..""""
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 01/04/2017 - 13:54 नवीन
तुम्ही हा प्रतिसाद तिकडून इकडे डकवाला आहे म्हणजे तुम्ही त्याच्याशी सहमत आहेत असे गृहीत धरून (नसाल तर तसे सांगा आणि ह्या प्रतिसादाला फाट्यावर मारा)... हे नाटक १०० वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे आणि त्यावर चर्चा गेल्या काही वर्षांपूर्वी सुरु झालीय, आणि पुतळा काल फोडला गेलाय. त्यामुळे "टाईमिंग"वर आणि हेतूवर विचार करण्यात का इंटरेस्ट नसावा? त्यांच्या मधल्या खंडांची जर माहितीच उपलब्ध नसेल तर तसे सांगणे म्हणजे क्रिश २? काहींच्या काही! त्यांनी चूक केलीय कि नाही हे ठरवण्याचा निकष काय असावा ह्याला काही अर्थ आहे कि नाही? आणि माफ न करता काय करायचे तर पुतळा गुपचूपणे फोडून आपला राग व्यक्त करायचा? तुम्ही खाली घाशीराम कोतवालचा उल्लेख केला आहे, तुमचे त्याबद्दल काय मत आहे? ते नाटक तशा पद्धतीने मांडणे योग्य होते कि अयोग्य? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते नाटक अयोग्य असेल तर त्या नाटकावर बंदी आणण्याचा विचार करायचा कि त्या नाटककाराची पद्धतशीर "इज्जत" काढायची? तुम्हाला काय वाटते त्यावर? मुळात तुम्ही वैयक्तिक ते नाटक वाचलं आहे का? मी वाचले नाही, त्यामुळे त्यातल्या संदर्भांवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
आ
आदूबाळ Wed, 01/04/2017 - 14:18 नवीन
या नाटकाचे ५ भाग आहेत पण यातील २ आणि ४ भाग लिहिलेच नाहीत त्याआधीच त्यांचे निधन झाले असा गडकरी समर्थकांचा दावा आहे.
यात काहीही नवल नाही. कादंबरी / नाटक यासारखी मोठी कलाकृती लिनियरली लिहिली गेली आहे असं क्वचितच घडतं. उदा० J K Rowling wrote the final chapter of the last Harry Potter book seven years before the release of the first book.
आजकाल चित्रपटात लव्ह सिन असेल तर सेक्स करताना किंवा किस करताना दाखवले जाते. ऐतिहासिक नाटकात या गोष्टी चालतात का ?
का चालू नयेत यामागचं लॉजिक कळलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सूड Wed, 01/04/2017 - 14:32 नवीन
का चालू नयेत यामागचं लॉजिक कळलं नाही.
कसं चालेल? ऐतिहासिक कथानकं म्हणजे चितळे यांच्या साजूक तुपात बुडवून काढल्याइतकी सात्त्विक असावीत असा अलिखित नियम नाही का? 'पेरनास्थाण' म्हणजे सात्विकच असायला पाहिजे, त्याला त्याचं वैयक्तिक आयुष्य असून कसं चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 01/05/2017 - 08:00 नवीन
असे कितीतरी नाटकांबद्दल आहे. वानगीदाखल 'साष्टांग नमस्कार' हे नाटकसुद्धा अत्रे यांनी असेच नॉन लिनिअरली लिहिले आहे. 'कर्‍हेचे पाणी' या आत्मचरित्रात मधे याचा उल्लेख सापडू शकेल. कित्य्के चित्रपटांचे शूटिंगसुद्धा असेच नॉन लिनिअरली होते. ऐतिहासिक पात्रे आणि काल्पनिक कथा हे तर अगदी कॉमन आहे. 'रायगडाला जेंव्हा जाग येते', 'इथे ओशाळला मॄत्यू', 'सीमेवरुन परत जा' अशी कितीतरी नाटके इतिहासाला १०० % धरुन नाहीत. उगाच इतरांच्या प्रतिक्रिया इथे डकवण्यापेक्षा तुम्हाला 'संभाजी ब्रिगेड'चे क्रूत्य पटले आहे असे का म्हणत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
प्रान्जल केलकर Tue, 01/03/2017 - 14:12 नवीन
दिलेल्या लिंक मध्ये कुठेच दुसरा खंड नाहीये आक्षेप दुसऱ्या खंडावर आहे संजय सोनवणी यांच्या ब्लॉग मध्ये दुसऱ्या खंडातील उतारे दिलेत. पण दुसरा खंड आहे का???? वर दिलेल्या लिंक मध्ये पहिला तिसरा आणि पाचवा खंड आहे ?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
स
संदीप डांगे Tue, 01/03/2017 - 08:40 नवीन
इसतरह माहोल तंग है शहरमें हां, चुनाव आ गये है नजरमें
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 01/03/2017 - 09:49 नवीन
जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती गावात सज्जनांच्या आता तणाव नाही ...या कवीच्या कवितांतही पुढेमागे जाळल्या जायचं पोटेन्शियल आहे. त्यामुळे नाव लिहीत नाही.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 01/03/2017 - 10:30 नवीन
खेदजनक पण शक्य आहे! याच कवीच्या ह्या ओळीत याचं सार आहे - "दूर नाही राहिलेली राजसत्तेची लढाई एरवी, होतास बाबा तू कुणाला प्यार पांडू?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
च
चतुरंग Wed, 01/04/2017 - 15:23 नवीन
बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी आणि मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते असे म्हणणारे भटसाहेब त्यांची अख्खी हयात जळाले आहेत, त्यांना या शेळपटांची काय भीती! त्यांच्या कविता लोकांच्या मनात आणि हृदयात आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ए
ए ए वाघमारे Tue, 01/03/2017 - 09:55 नवीन
रायगडाला कधी जाग येणार आहे?
  • Log in or register to post comments
ए
ए ए वाघमारे Tue, 01/03/2017 - 10:01 नवीन
हे कळल्यावर पहिला विचार मनात आला तो हाच की महाराष्ट्र आता राहायाचा लायक राहिला नाही. पुरोगामी महाराष्ट्र, सांस्कृतिक राजधानी असे शब्द ऐकले की आता हसू येते. जातीयवाद, प्रतीकांचे राजकारण या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. खरी चिंता ही की आपल्याला आपल्या वैचारिक लीगसीचं, आयकॉन्सचं काहीही पडलं नाही.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Tue, 01/03/2017 - 12:33 नवीन
१० / १२ लोकांनी असा पुतळा रात्री बेरात्री भिरकावून देणे हे निश्चितच आक्षेर्पाह आहे. त्या नाटकातील फोलपणा काढणे आणि संभाजी महाराजांची उज्ज्वल बाजू मांडणे हे निश्चितच शक्य आहे. छत्रपती म्हणून ९ वर्ष लढा देणारे आणि केवल लोकापवादांनी बदनाम होणारे अशा एखाद्या लेखाने / नाटकाने अथवा पुस्तकाने कसे बरे बदनाम होतील? त्याचबरोबर गडकर्‍यांचे मोठेपणही कसे बरे अमान्य करता येईल ? पुण्यात अशा घटना पुढे होऊ नये हीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 01/03/2017 - 12:40 नवीन
संभाजी महाराजांची उज्ज्वल बाजू मांडणे हे निश्चितच शक्य आहे.
कशाला उज्ज्वलच बाजू हवी आहे ? नेता मानता ना त्यांना? मग आहे तस स्वीकारा की!! त्यांची कोणतीही बाजू मांडली तरी त्यांनी केलेलं कार्य फिकं पडणार आहे का? कसंय ना, एखाद्या व्यक्तीला देवत्व द्यायच्या नादात ती व्यक्ती माणूस होती आणि त्यामुळे असलेल्या गुण-अवगुणांमुळे त्या व्यक्तीचं महत्त्व कमी होत नाही याची समज यायला तितकी वैचारिक पोच असणं गरजेचं आहे आणि या लोकांकडून त्याची अपेक्षा करणं चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
उ
उपेक्षित Tue, 01/03/2017 - 13:16 नवीन
100 वेळा सहमत सूडराव तुमच्याशी अगदी मनातले बोललात. आपल्याकडे व्यक्तीपुजेचे इतके स्तोम आहे न कि बास, या निमित्ताने मागे एकदा नेपोलिअन वरचे मराठी अनुवादित पुस्तक वाचले होते त्यात त्याचा पराक्रमाबरोबरच त्याच्या रंगेलपणाबद्दल तसेच त्याच्या इतर निगेटिव गोष्टींबद्दल हि बैजवार लिहिले गेले होते अगदी तठस्थपणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 06:09 नवीन
मग "घाशीराम कोतवाल" ला त्यावेळेस एवढा विरोध का बरं झाला असावा ? साहेबा हा भारत आहे, त्यात महाराष्ट्र आहे आणि त्यावरून कडी हे पुणे आहे त्यामुळे नेपोलिअनचे तुणतुणे इथे वाजून काही उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
न
निष्पक्ष सदस्य Tue, 01/03/2017 - 15:51 नवीन
व्यक्तीपूजेचे स्तोम माजले आहे,अगदी कोणीही व्यक्तीपूजक त्यातून सुटला नाही,कोणीतरी कोणालातरी असं ना तसं पूजतच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 06:12 नवीन
हो बरोबर आहे कोणाचा संभाजी तर कोणाचा गडकरी. चालायचं. लोकांना इग्नोर मारा म्हंटलं तर लागले सगळेच गळे काढायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
ब
बाळ सप्रे Wed, 01/04/2017 - 06:17 नवीन
बोलणे इग्नोअर करावे.. झुंडशाही इग्नोअर होता नये. पुतळेच काय कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार्‍यांना ताळ्यावर आणायलाच हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 06:57 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
अ
अप्पा जोगळेकर Tue, 01/03/2017 - 13:31 नवीन
'एखादेच फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शॄंगारिते' या गडकर्‍यांच्याच ओळी आठवल्या. भाई, दादा, आबांचे पोस्टर शहरात गावोगाव मिरवत असताना यांच्याच पुतळ्याच्या नशीबी नदीत फेकले जाणे यावे ही एक केविलवाणी गंमतच. संभाजी ब्रिगेड ही संघटना अस्तित्वात असणे ही संभाजी राजांची सगळ्यात मोठी बदनामी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/03/2017 - 13:32 नवीन
लोकहो, महाराष्ट्राचे शत्रू कोण हे या प्रसंगातनं व्यवस्थित कळतं. मात्र हा हल्ला कोणावर झालाय याचा उहापोह व्हायला हवा. हा हल्ला मराठी भाषेवर आहे. गडकरी कादंबरीकार होते. त्यांना शंभूराजांचा अपमान करायचं काही कारण नव्हतं. तसा हेतूही नव्हता. मग दंभाजी ब्रिगेडला यांत खुसपट काढायचंय कशाला मुळातून? कारण की दंभाजी ब्रिगेडास मराठी भाषेचं खच्चीकरण करायचंय. राम गणेश गडकरी यांनी अलंकारांद्वारे मराठी भाषेस वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. याचा दंभाजी ब्रिगेडास प्रचंड राग येतो. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी याच ब्रिगेडी लोकांनी अशुद्ध मराठी लिहिण्याचा घाट घातला होता. उदा. : शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे. यावरून दंभाजी ब्रिगेड ही मराठीची मारेकरी आहे हे नि:संशयपणे सिद्ध होतं. गडकऱ्यांचा पुतळा मोडण्याचा हा गलिच्छ प्रकार राज्य सरकार मराठी संवर्धन पंधरवडा साजरा करत असतांना मुद्दामून केला गेला आहे. तस्मात, महाराष्ट्राचे शत्रू मराठीचेही शत्रू आहेत हे स्पष्ट व्हावे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य Tue, 01/03/2017 - 15:55 नवीन
मध्यंतरी काही वर्षांपूर्वी याच ब्रिगेडी लोकांनी अशुद्ध मराठी लिहिण्याचा घाट घातला होता. उदा. : शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे.
खेदजनक आहे.
दंभाजी ब्रिगेड
मग हा शुद्धलेखनाचा कोणता प्रकार आहे बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 01/03/2017 - 19:43 नवीन
निष्पक्ष सदस्य, दंभाजी ब्रिगेड हा शुद्धलेखनाचा प्रकार नाही. यास मोडतोड म्हणतात. पुतळ्याची केली ना अगदी तश्शीच मोडतोड. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
न
निष्पक्ष सदस्य Sat, 01/07/2017 - 08:26 नवीन
माननीय,गा. पै
दंभाजी ब्रिगेड हा शुद्धलेखनाचा प्रकार नाही. यास मोडतोड म्हणतात. पुतळ्याची केली ना अगदी तश्शीच मोडतोड.
मग तुमच्यात आणि ब्रिगेडी मंडळीत काही फरक नसावा. आ.न नि.स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 01/07/2017 - 11:01 नवीन
निष्पक्ष सदस्य, एकदम बरोबर बोललात पहा. माझ्यात आणि दंभाजी ब्रिगेड्यांत काहीच फरक नाही. धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट । खटनटाचे नटखट, अगत्य करी ॥ -इति रामदास स्वामी (ब्राह्मण संत) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 04:49 नवीन
लक्षणें ऐकोन मानी वीट | मत्सरे करी खटपट | नीतीन्याय उद्धट तो येक पढतमूर्ख || भरी भरे आला क्रोध नावरे | क्रिया शब्दांस अंतरे | तो येक पढतमूर्ख || || इति श्री रामदास || ( सांगायची गरज नसावी) आ.न नि.स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 01/08/2017 - 09:08 नवीन
निष्पक्ष सदस्य, अचूक श्लोकाबद्दल तुमचं कौतुक आहे. दंभाजी ब्रिगेड पढतमूर्ख आहे हे किती समर्पक शब्दांत सांगितलंत तुम्ही! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 10:58 नवीन
अगदी अगदी!! ब्रिगेडी पिलावळ पढतमूर्ख आहेच,वादच नाही. बाकि, आपला एक वरचाच प्रतिसाद खालील प्रमाणे↓ एकदम बरोबर बोललात पहा. माझ्यात आणि दंभाजी ब्रिगेड्यांत काहीच फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 01/08/2017 - 20:48 नवीन
निष्पक्ष सदस्य, अहो, ती तर तुमच्या बालबुद्धीने मारलेल्या आकलनाच्या प्रदीर्घ मजलेस दिलेली प्रोत्साहनपर कौतुकाची दाद होती. तुम्ही ती फार गांभीर्याने घेतलीत. एकंदरीत बालबुद्धी सार्थ केलीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा