Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुतळा हटाव

ज
जानु
Tue, 01/03/2017 - 07:28
🗣 175 प्रतिसाद
आज सकाळी बातमी वाचली ती पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने पाडुन टाकला. फार पूर्वी वाचलेले बाळकराम आठवले. त्या काळातील वाचलेले खुसखुशीत लेखन, नाटके, लेख आठवले. पु. ल., चि. वि. यांचे लेखन वाचुन त्यात वाटणारा आनंद किती निर्मळ आणि प्रांजळ होता याची आठवण पुन्हा एकदा झाली. त्या काळात ठकीच लग्न किती आनंददायी वाटलं? खरच गडकरी फेकुन द्यावेत का? कोणाकोणाला फेकायचे याची यादी एकदा बनवायच म्हणा. आपण इतके स्वार्थी झालोत का? की असहाय आहोत? खूप विचार आहेत एकत्रित सुसंबद्ध पणे लिहता येत नाहीत पण व्यक्त तरी करावे म्हणून लिहतो. एवढीच हिंमत आणि समाधान. जिथे मला कोणी ओळखत नाही आणि यावर कोणी सत्ताधारी किंवा त्याचा भाऊ, दादा हाच तो आपल्याला विरोध करणारा असे म्हणणार नाही.

प्रतिक्रिया द्या
35372 वाचन

💬 प्रतिसाद (175)
आ
आदूबाळ Tue, 01/03/2017 - 16:04 नवीन
शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे
हे थोर आहे! म्हणजे 'त्यांचं' प्रमाणलेखन आम्ही मानणार नाही वगैरे लॉजिक ठीक आहे, पण "षिवाजी" असाच का लिहायचा म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 06:17 नवीन
<<<<शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे>>> हा हा हा... नववर्षाला एका मित्राला नवर्षाभिनंदन केलं तर म्हणतो कसा मी गुडीपाडव्याला नव वर्ष साजरी करतो. म्हणलं बस बोंबलत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
R
Ranapratap Tue, 01/03/2017 - 14:44 नवीन
गडकऱ्यांचं लिखाण हे फार वर्षापासून चे आहे. याना आता कशी आठवण आली. हा प्रकार जातीय आहे कि राजकीय हे शोधून याना पाठिंबा देणार्यांना शिक्षा झाली पाहिजे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 01/03/2017 - 17:11 नवीन
आज हा पुतळा काढला, मागे एकदा दादोजींचा काढ होता की काहीतरी असेच, उद्या आणखी काही........................एक प्रश्न पडतोय. इतका वेळ यांना मिळतो कसा? नै म्हणजे, आजकाल सगळेजण बिझी असतात असं ऐकलय. पुतळ्याकडे पाहून त्या मनुष्याचे विचार आठवणे, स्फुर्ती घेणे राहू द्यात.............कोणत्या चौकात कोणता पुतळा आहे याकडे लक्ष तरी कसं राहतं? आपल्या घराच्या कोनाड्यात असलेलं गांधीलमाशीचं घर पाडायला जमत नाही, हे उद्योग बरे सुचतात? बरं, राजकीय रंग दिला तरी सगळ्यांना गठ्ठ्याने पैसे मिळत असतात असेही नाही. त्यापेक्षा कष्टाची भाकरी तरी खावी. भाकरीतही व्हरायटी आहे, भाजीत आहे. ही हेव्यादाव्याची कामे करून तब्येतीचे, वेळाचे नुकसान कोण करून घेणार?
  • Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस Tue, 01/03/2017 - 18:19 नवीन
ज्या गडकर्यां मुळे साहित्यीकांच्या पिढ्या घडल्या , त्यांचा असा अपमान तो ही "पुण्या सारख्या" शहरात अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आज आचार्य अत्रे असते तर त्यांनी नवयुगाच्या अग्रलेखातून असल्या करंट्यांना कुत्र्यासारखा झोडपून काढला असता (श्वानमित्रांनी माफ करावे, आणि माझा पुतळा कुठेही नाही)
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Wed, 01/04/2017 - 04:31 नवीन
नवयुगातूनचं का म्हणून बरे? दैनिक 'मराठा' मधून का नाही ? आणि तुमच्या "पुण्यासारख्या" शहरात अपमान होणे हे कधीपासून लाजिरवाणे समजले जाऊ लागले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इल्यूमिनाटस
इ
इल्यूमिनाटस Wed, 01/04/2017 - 05:06 नवीन
अपमान दोन प्रकारचे असतात 1. शाब्दिक अपमान 2. विकृत अपमान "पुण्यासारखे" शहर हे शाब्दिक /वैचारिक अपमानांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचे प्रत्युत्तर देखील तसेच दिले जाते आणि जेव्हा ते जमत नसेल तेव्हा असले घान्येर्डे प्रकार घडतात. त्यामुळे असल्या घटनांना पुण्याच्या संस्कृतीशी जोडण्याचे काहीच कारण नाही राहता राहिला प्रश्न नवयुग कि मराठा कुटं बी छापा कि राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
स
सुबोध खरे Tue, 01/03/2017 - 18:55 नवीन
संभाजी राजांचा अपमान झाल्या सारखे वाटले म्हणून राम गणेश गडकरींचा पुतळा फोडला!! महाराजांशी गद्दारी केली म्हणून खंडूजी खोपडेच्या वंशजांचा निप्पात करणार काय? जावळीतले सगळे मोरे संपवून टाकणार काय? औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करणार काय? महाराजांना दगा केला म्हणून अफजल खानाची कबर तोडणार काय? मिर्झाराजे जयसिंगची समाधी फोडणार काय? एवढी खुमखुमी असेल तर सीमेवर जाऊन लढत का नाही? महाराजांकडून थोडे शिकत का नाहीत देशाचे खरे शत्रू कोण हे सुद्धा यांना कळत नाही!! खरेतर शिवाजी यांचा आदर्श नाही की संभाजीचे यांना कौतुक नाही!! स्वार्थ आणि गलिच्छ राजकारण यांनी बरबटलेली डोकी स्वतःचे सोडा पण कुणाचेच भले करू शकत नाहीत!! जाती द्वेषाच्या दारुनी धुंद झालेली डोकी घेऊन घर जाळायला निघालेले हे शहाणे, कायदा यांना काहीच कसे करीत नाही?? कि कायदाच षंढ झाला आहे आणि जातीयवादाला विकला गेला आहे? सर्व जाती धर्माच्या मराठी समाजा कडून याचा तीव्र निषेध व्हॉटस अॕप वरुन साभार
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 06:55 नवीन
पुतळा हटवण्या पेक्षा ब्रिगेडीनी कायदेशीर मार्गानी गडकरींचे लेखन खोडून काढले असते तर बरं झाले असते. मी काही संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता नाही पण या व्हाट्सअप पोस्टला काही प्रतिप्रश्न विचारू इच्छितो, जाणकारांनी मार्गदर्शन करावं. <<<महाराजांशी गद्दारी केली म्हणून खंडूजी खोपडेच्या वंशजांचा निप्पात करणार काय? जावळीतले सगळे मोरे संपवून टाकणार काय? औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करणार काय? मिर्झाराजे जयसिंगची समाधी फोडणार काय?>>>> -- शत्रू मेला म्हणजे शत्रुत्व मेले, अशी आपली संस्कृती सांगते बहुतेक. वरील दिलेल्याच्या वंशजांना शिक्षा देणे कितपत योग्य आहे ? <<<महाराजांना दगा केला म्हणून अफजल खानाची कबर तोडणार काय?>>> -- ती स्वतः शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या सांगण्यावरून बांधून घेतली होती म्हणे ? महाराजांचा अवमान होईल ना ? (तसे ही ते करताच म्हणा) <<<एवढी खुमखुमी असेल तर सीमेवर जाऊन लढत का नाही?>> -- सैन्यात न जाता सीमेवर लढण्याची परवानगी असते का ? <<<खरेतर शिवाजी यांचा आदर्श नाही की संभाजीचे यांना कौतुक नाही!!>> -- कोणाची कशी आणि किती भक्ती आहे हे कसे मोजणार? <<<स्वार्थ आणि गलिच्छ राजकारण यांनी बरबटलेली डोकी स्वतःचे सोडा पण कुणाचेच भले करू शकत नाहीत!!>> -- प्रचंड सहमत <<<जाती द्वेषाच्या दारुनी धुंद झालेली डोकी घेऊन घर जाळायला निघालेले हे शहाणे, कायदा यांना काहीच कसे करीत नाही??>> -- माझ्या माहिती प्रमाणे पुतळा हटवला आहे घरे नाही जाळली कोणाची. तसे २ सैनेनी एस टी आणि बसेस च्या काचा किती तरी वेळा फोडल्या अजून पण त्यांचे सुप्रीमो आत गेले नाहीत. पण आताचे महाराष्ट्राचे गृहमंत्री योग्य कारवाई करतील याची आशा बाळगणे वावगे आहे का? <<<कि कायदाच षंढ झाला आहे आणि जातीयवादाला विकला गेला आहे?>>> -- कायदा षंड असतो की जातीयवादी ? <<<सर्व जाती धर्माच्या मराठी समाजा कडून याचा तीव्र निषेध>> -- निषेद निषेद निषेद ...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सूड Wed, 01/04/2017 - 10:36 नवीन
शत्रू मेला म्हणजे शत्रुत्व मेले, अशी आपली संस्कृती सांगते बहुतेक.
म्हणजे पुतळा काढून गडकरीं कार्य संपवलं असं वाटतंय का? उलट गडकरींबद्दल शष्प माहित नसणारे लोक पण त्यांचं साहित्य शोधायला लागतील. जातींवर बोलू नये, पण विशिष्ट जातीच्या लोकांना विशिष्ट नेत्यांच्या नावावरुन कोणीही सहज चिथवू शकतो आणि सत्यासत्य न पडताळता हेही जातात घरचं कार्य असल्यासारखे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 11:04 नवीन
<<<म्हणजे पुतळा काढून गडकरीं कार्य संपवलं असं वाटतंय का?>>> -- असे कोठे म्हंटले मी हे कृपया कोणी दाखवेल का? <<<उलट गडकरींबद्दल शष्प माहित नसणारे लोक पण त्यांचं साहित्य शोधायला लागतील.>>> -- चांगलं आहे की त्यामुळे गडकरी नक्की कोण आणि त्यांची योग्यता काय होती हे प्रत्येकाला समजेल. <<<जातींवर बोलू नये, पण विशिष्ट जातीच्या लोकांना विशिष्ट नेत्यांच्या नावावरुन कोणीही सहज चिथवू शकतो आणि सत्यासत्य न पडताळता हेही जातात घरचं कार्य असल्यासारखे!!>>> -- जातीवर बोलू नये म्हणणारे मग कशासाठी बोलत असतील असे घरच कार्य असल्यासारखे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
हकु Wed, 01/04/2017 - 06:15 नवीन
एका बिडीच्या ब्रँड चं नाव 'संभाजी' असल्याचा अभिमान वाटतो बहुतेक ह्यांना !!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 06:22 नवीन
याच्यावर पण काम झाले आहे त्यांचे २०१३ मध्ये काळजी नसावी. http://mumbaimirror.indiatimes.com/news/india/Sambhaji-Bidi-loses-its-facing-after-activists-protest/articleshow/20304162.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/04/2017 - 06:47 नवीन
हा हा हा मला अजिबात आश्चर्य वाटले नाही हे प्रकरण ऐकून ! मी 2 3 वर्षांपूर्वीच म्हणालो होतो की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आगरकर सावरकर कर्वे ह्यांच्या कार्याना काडी ची किंमत राहिली नाहीये. गडकरी बिचारे ब्राह्मण सदृश नाव असल्याने भरडले गेले . मी पैज लावून सांगतो आता ह्या नंतर कोणाकोणाचा नंबर आहे ते शाहू महाराजांशी मतभेद म्हणून टिळकांचा फुलेंशी मतभेद होते म्हणून चिपळूणकारांचा आंबेडकरांशी मतभेद होते म्हणून इरावती कर्वेंचा , मग सहज म्हणून इतर कर्वेंचा गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा =)))) हा हा हा हा हा हा बघूया आता मातीत डोकं खुपसून बसलेले शहामृग कधी डोकं बाहेर काढतात ते :D
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/08/2018 - 06:52 नवीन
गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है >>>> पुण्याचा मानबिंदू असलेले 'बालगंधर्व' पाडणार? http://www.esakal.com/pune/marathi-news-balgandharva-rangmandir-pune-101326 एका वर्षातच आमची भविष्यवाणी खरी ठरत आहे ! ! - अस्सल जातिवंत ज्योतिषी मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बिटाकाका गुरुवार, 03/08/2018 - 07:17 नवीन
तुमच्या वरच्या वाक्याचा अर्थ "गडकरी आडनावामुळे/जातीमुळे पुतळा पडला गेला तसेच एके दिवशी बालगंधर्वांचे होणार" असा प्रतीत होत होता, बरे झाले क्लिअर केलेत. ================== बालगंधर्व पाडण्याचा वगैरे कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पालिकेने सांगितल्याचे वाचले कुठेतरी. दुरुस्तीसाठी राखीव १० कोटींचा खर्च पुनर्विकसन या सदरात टाकल्याने हा गोंधळ झाला असण्याची (किंवा जाणीवपूर्वक आवई उठवली असण्याची) शक्यता नाकारता येत नाही. ================== पण, समजा पुनर्विकसनासाठी पाडली इमारत आणि नवीन बालगंधर्व इमारत बांधली तर चुकीचं काय त्यात? सध्य इमारतीतील मूत्र विसर्जन गृहात गेलो तर वाटते या इमारतीला बालगंधर्वांचे नाव देऊन बालगंधर्वांचा अपमान तर होत नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रकाश घाटपांडे Wed, 01/04/2017 - 09:38 नवीन
मला तर सुरवातीला हे आर्य मदिरा मंडळाच्या सदस्यांचे काम वाटले होते. एकच प्याला च्या निषेधार्ध त्यांनी हे कृत्य केले असावे असे वाटले.
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 01/04/2017 - 11:48 नवीन
निवडणुका तोंडावर आल्याने केलेल्या मूर्ख कृत्याला फक्त राजकिय रंग आहे! बाकी ब्रिगेडी लोकांचे वैचारिक तारे अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या फेबु वाॅलवर वाचून मनोरंजन झाले आहे ! तिकडे अभिमानाने या मर्द मराठ्यांनी पुतळा फोडला असे लिहून त्यांचे फोटो दिले आहेत. त्या पोरांना गडकरी कोण, त्यांचे कसले नाटक वगैरे माहित असण्याची शक्यता शून्य दिसते आहे. जरा हात साफ करुन घेतला वाटतं पोरांकडून. चार वडापाव वर काम झाले असावे!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 11:58 नवीन
पुष्कर तर म्हंटला सन्मानाने पुतळा परत नाही बसवला तर पुण्यात नाटकाचा खेळ करणारच नाही. (या वडापाव खाऊ करंट्यामुळे बिचाऱ्याच्या पोटावर पाय आला. निवडणूक होई पर्यंत पुतळा बसला तर ठीक नाहीतर अवघड आहे त्याचे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
संदीप डांगे Wed, 01/04/2017 - 13:42 नवीन
विशुमित, तुमचा पवित्रा चुकीचा वाटतो आहे. तपासून बघा ही विनंती. गडकर्‍यांनी हे नाटक केव्हा लिहिले, त्यावेळी उपलब्ध साधने (कागदपत्रे इत्यादी) त्यांनी तपासून लिहिलंय की तेव्हा अपुर्‍या संशोधनामुळे उपलब्ध असलेली वाईट रंगवलेली संभाजीराजांची प्रतिमा ही खरेतर मूळाशी आहे हे बघितलं पाहिजे. शंभर वर्षांआधी कुणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय म्हणून आज त्यांचा पुतळा उखडणे योग्य ठरवायचे असेल तर आजची ही पिलावळही शंभर वर्षांआधीच्याच काळात राहते हेही मान्य करावे लागेल. गडकर्‍यांना जो सन्मान आज दिला जातो तो राजांना बदनामीकारक प्रस्तुत केले म्हणून नाही दिला जात एवढे जरी दगडांच्या डोक्यांना कळले तरी पुरे. कारण तसे असते तरच पुतळा उखडणे सुसंगत वाटले असते. संभाजीराजांबद्दल बदनामीकारक मजकूर परवायला कोणी सुरुवात केली हे जरा इतिहासात डोकावून बघायची गरज होती. तसे बघितले असते तर आपलीच घरे फोडायची वेळ आली असती व ते अडचणीचे ठरले असते मग... कोणतीही कारणे दिली तरी एका कलाकाराचा असा अपमान होणे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. गडकर्‍यांच्या संभाजीला उखडायचे असेल तर गडकर्‍यांपेक्षा मोठे होऊन दाखवावे, त्यात मर्दानगी दिसली असती, रात्रीच्या अंधारात जाऊन निर्जीव दगडी पुतळ्यांवर मर्दानगी दाखवणार्‍यांच्या मनगटात नेमकं कोणाचं रक्त वाहतंय याची खात्री करुन घ्या म्हणावं....
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/05/2017 - 05:58 नवीन
<<<विशुमित, तुमचा पवित्रा चुकीचा वाटतो आहे. तपासून बघा ही विनंती.>>> -- तुम्ही माझे प्रतिसाद काळजी पूर्वक वाचता आहात यासाठी पुन्हा एकदा शतशः आभार..!! पवित्रा कोठे चुकीचा वाटतो हे उतघृत केले तर मोठे उपकार होतील. एकच सांगणे -- "कराल ते हित सत्य करा". <<<गडकर्‍यांनी हे नाटक केव्हा लिहिले, त्यावेळी उपलब्ध साधने (कागदपत्रे इत्यादी) त्यांनी तपासून लिहिलंय की तेव्हा अपुर्‍या संशोधनामुळे उपलब्ध असलेली वाईट रंगवलेली संभाजीराजांची प्रतिमा ही खरेतर मूळाशी आहे हे बघितलं पाहिजे.>>> -- ते मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात नमूद केले आहे. <<<शंभर वर्षांआधी कुणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय म्हणून आज त्यांचा पुतळा उखडणे योग्य ठरवायचे असेल तर आजची ही पिलावळही शंभर वर्षांआधीच्याच काळात राहते हेही मान्य करावे लागेल.>>> -- मला हे मान्यच आहे. पुतळा हटवण्याचा मी निषेधच केला आहे. (अवांतर : "मंदिर यही बनायेंगे" म्हणणारी आणखी एक पिलावळी तर मागे 5००-6०० वर्ष मागच्या जगांत जगत आहे. माझ्या माहितीतले, जे पुतळा हटवण्याचा विरोध करत आहेत त्यातले बरेच जण बाबरी तोडल्याचे भारी समर्थन करत होते/आहेत. नरसिह राव वर पुष्प वर्षाव करत होते /आहेत. हा डबल स्टॅंडर्ड चालतो वाटतो) <<< कारण तसे असते तरच पुतळा उखडणे सुसंगत वाटले असते.>>> -- कारणं काहीही असोत अश्या प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कदापि समर्थनीय नाही. <<< तसे बघितले असते तर आपलीच घरे फोडायची वेळ आली असती व ते अडचणीचे ठरले असते मग...>>>> -- "आपलीच घरे" नाही समजले. कृपया विस्कटून सांगता का ? <<<कोणतीही कारणे दिली तरी एका कलाकाराचा असा अपमान होणे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही.>>> -- कोणा ही जीवाचा न घडो मत्सर.. <<<गडकर्‍यांच्या संभाजीला उखडायचे असेल तर गडकर्‍यांपेक्षा मोठे होऊन दाखवावे, त्यात मर्दानगी दिसली असती>>> -- बापुड्यांच्या ४ पिढयांना ते शक्य नाही, ते अंग मेह्नितेचेच काम करणार. <<<मनगटात नेमकं कोणाचं रक्त वाहतंय याची खात्री करुन घ्या म्हणावं....>>> -- DNA टेस्ट म्हणत असाल तर ती कशासाठी? उगाच ऐतिहासिक वाटावं म्हणून हे वाक्य टाकले असेल तर सिनेमॅटिक लिबर्टीला पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 01/05/2017 - 06:28 नवीन
तुमच्या प्रतिसादांचा आशय पुतळा तोडणार्‍यांच्या बाजूने जातोय असं वाटले, तसे नसेल तर ओके!
"मंदिर यही बनायेंगे" म्हणणारी आणखी एक पिलावळी तर मागे 5००-6०० वर्ष मागच्या जगांत जगत आहे. माझ्या माहितीतले, जे पुतळा हटवण्याचा विरोध करत आहेत त्यातले बरेच जण बाबरी तोडल्याचे भारी समर्थन करत होते/आहेत. नरसिह राव वर पुष्प वर्षाव करत होते /आहेत. हा डबल स्टॅंडर्ड चालतो वाटतो
>> मला तर नाही चालत बॉ, अन्य कोणाला चालत असेल तर ठवूक नै, ;-) तरीही बाबरी आणि गडकरी तुलना चुकते आहे. संभाजी राजांचा पुतळा काढून तिथे गडकरींचा नव्हता बसवलेला, तोडफोडीचाच निषेध करायचा तर केवळ तोडफोड बघायची नसते. तोडफोडीचं कारण बघायचे असते. आमच्या नाशकात मागच्या महिन्यात अनेक धर्मस्थले शासकिय यंत्रणेने तोडली. त्यामागे वेगळे कारण होते. बाबरी पाडणे तद्दन राजकिय कृती होती, पुतळा उखडणे ही देखील राजकिय कृती आहे. कार्यकारणभाव महत्त्वाचा. बाकी सगळे धुळीचे ढग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 01/05/2017 - 07:12 नवीन
<<<तुमच्या प्रतिसादांचा आशय पुतळा तोडणार्यांच्या बाजूने जातोय असं वाटले, तसे नसेल तर ओके!>>> -- म्हणजे पुतळा तोडणाऱ्याची बाजू घेतली तर चुकीचा पवित्रा, गडकरींची बाजू घेतली तर बरोबर पवित्रा? म्हणजे कोणाची बाजू घेतली आहे त्यावर आशय बरोबर का चूक ठरणार तर? <<<>> मला तर नाही चालत बॉ, अन्य कोणाला चालत असेल तर ठवूक नै, ;-)>>> -- ज्यांना चालते त्यांच्यासाठीच अवांतर होते <<<तरीही बाबरी आणि गडकरी तुलना चुकते आहे.>>> -- बाबरी काय अन गडकरी काय किंवा संभाजी काय, प्रत्येकाने मनाचा राम करून घायचा म्हंटल्यावर तोडफोड ही होणारच. <<<आमच्या नाशकात मागच्या महिन्यात अनेक धर्मस्थले शासकिय यंत्रणेने तोडली. त्यामागे वेगळे कारण होते.>>> -- शासकीय यंत्रणेने अधिकृतपणे तोडली असणार ती, त्याचा कसा विरोध करू शकतो. <<<कार्यकारणभाव महत्त्वाचा.>> -- "गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है" ही विचारसरणी पसरवणाऱ्या प्रवृत्तीचा पण कार्यकारणभाव कोणी तपसेल ही अपेक्षा ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 01/05/2017 - 08:21 नवीन
'पेहेले उसका साईन लेके आव' असे काही आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 01/05/2017 - 08:12 नवीन
गडकर्‍यांनी हे नाटक केव्हा लिहिले, त्यावेळी उपलब्ध साधने (कागदपत्रे इत्यादी) त्यांनी तपासून लिहिलंय की तेव्हा अपुर्‍या संशोधनामुळे उपलब्ध असलेली वाईट रंगवलेली संभाजीराजांची प्रतिमा ही खरेतर मूळाशी आहे हे बघितलं पाहिजे गडकरी यांनी तत्कालीन उपलब्ध साधनांवरुनच लिहिले आहे. पण मुद्दा तो नाहीच. कागद तपासून पाहणे हे नाटककाराचे काम नाही. नाटककाराला कल्पना विलास करण्याचा अधिकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 01/05/2017 - 08:30 नवीन
आप्पा, हे मत कंसिस्टंट असेल तर आदरास पात्र आहे, बाकी, ह्या अधिकाराबाबत हुसैन आणि गडकरी यांना वेगळा न्याय लावणारे काही महाभाग आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 01/05/2017 - 08:51 नवीन
हुसैन, गडकरी, विजय तेंडुलकर, बाजीराव मस्तानीचा लेखक, चार्ली हेब्दो, बाबरी मशीद, जेम्स लेनचे पुस्तक किंवा इतर कोणाच्याही बाबतीत झुंडशाहीचा निषेध आहे. पण युक्तिवाद करण्यासारखे काही नाही म्हणून 'पुतळा हटाव' धाग्यावर 'बाबरी मशीद'चा संदर्भ ओढून ताणून आणणे हा एक विशिष्ट अजेंडा राबवण्याचा भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 01/05/2017 - 09:15 नवीन
ते तर आहेच. त्याबद्दल बोलणे आवश्यक आहेच. त्याबद्दल आपल्याला समर्थन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
संदीप डांगे गुरुवार, 01/05/2017 - 09:16 नवीन
गैरसमज नको म्हणून प्रतिसादात सुधारणा: ते तर आहेच. त्या अजेंड्याविरुद्ध बोलणे आवश्यक आहेच. त्याबद्दल आपल्याला समर्थन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विशुमित गुरुवार, 01/05/2017 - 10:19 नवीन
<<<<<<<बाकी, ह्या अधिकाराबाबत हुसैन आणि गडकरी यांना वेगळा न्याय लावणारे काही महाभाग आहेत.>>> -- माझा विरोध फक्त अश्याच महाभागांना आणि व्हिक्टिमकार्ड खेळणाऱ्याना आहे म्हणून एवढा लेखन प्रपंच. <<<<हुसैन, गडकरी, विजय तेंडुलकर, बाजीराव मस्तानीचा लेखक, चार्ली हेब्दो, बाबरी मशीद, जेम्स लेनचे पुस्तक किंवा इतर कोणाच्याही बाबतीत झुंडशाहीचा निषेध आहे.>>>> -- अप्पांना कचकटून समर्थन <<< त्या अजेंड्याविरुद्ध बोलणे आवश्यक आहेच>>> -- विचार मांडण्याला अजेंडा म्हणतात हे या चर्चेतून समजलं. ग्वाही देतो मिपाचा फुकट वापर करून कोणाचाही अजेंडा इथे मी राबवत नाही. चर्चेतून जेवढे सकारात्मक विचार घेता येतील याचा प्रयत्न असतो. जर कोणाला मी पुतळा हटाव आणि संभाजी ब्रिगेड यांचे समर्थन करतोय असे वाटत आहे त्यांना सांगू इच्छतो की ती पोरं वाट चुकलेली आहेत. जाणतेपणी म्हणा किंवा अजाणतेपणाने. त्यांच्या अकलेची दिवाळखोरी सिद्ध करण्यापेक्षा सकारात्मक विचारांनी त्यांना योग्य वाटेवर जाण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. बाबरीचे उदाहरण मी जाणूनबुजून दिले आहे. एक काळ असा होता की मी "मंदिर यही बनायेंगे' प्रचंड समर्थक होतो. आता वाटते मंदिरापेक्षा तेथे भव्य हॉस्पिटल व्हावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
महासंग्राम गुरुवार, 01/05/2017 - 10:33 नवीन
ती पोरं वाट चुकलेली आहेत. जाणतेपणी म्हणा किंवा अजाणतेपणाने.
विशुमितजी एवढंच सांगू इच्छितो. ती पोरं अजाणतेपणाने वाट चुकली नाहीत, त्यांच्या फेसबुक वॉलवर जाऊन पहाल तर लगेच लक्षात येईल तुमच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 01/05/2017 - 11:34 नवीन
बरोबर आहे तुमचे पण ती पोरं २२-ते २६ वयोगटातील आहेत, समर्ग विचारशक्ती असेल त्यांची ? त्यातील २ जण खासगी कंपनीमध्ये कामाला होती. पुढचं आयुष्य किती बरबाद होईल याची जाणीव नक्कीच नसावी. फेसबुक वरील दोन्ही बाजूंची चिखलफेक महाभयंकर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/05/2017 - 16:36 नवीन
बरोबर आहे तुमचे पण ती पोरं २२-ते २६ वयोगटातील आहेत, समर्ग विचारशक्ती असेल त्यांची ? त्यातील २ जण खासगी कंपनीमध्ये कामाला होती. पुढचं आयुष्य किती बरबाद होईल याची जाणीव नक्कीच नसावी.
समजून उमजून केलेला गुन्हा आहे हा. २२ ते २६ या वयोगटात आपण काय करीत आहोत याची विचारशक्ति नसते का? मग या संशयाचा फायदा कसाबला सुद्धा द्यायला हवा. तो तर २२ पेक्षा कमी वयाचा होता. आपण काय करीत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पुतळा उखडून नदीत फेकल्यानंतर अत्यंत अभिमानाने स्वतःची चित्रफीत काढून त्यांनी प्रसिद्ध केली. आपल्या कृत्याबद्दल त्यांना जरादेखील खंत वाटलेली दिसत नाही, उलट अभिमानच दिसतो. उद्या त्यांच्या जामिनावर निर्णय आहे. त्यांना उद्या जामीन मिळेलच. त्यांनी जामीन मिळाल्यानंतर एखाद्या जगज्जेत्याच्या थाटात त्यांचे स्वागत होईल. पुढचं आयुष्य बरबाद वगैरे अजिबात होणार नाही. उलट पुढे त्यांची भरभराटच होईल. पूर्वीच्या राजेराजवाड्यांच्या काळात एखाद्या सरदाराने किंवा सैनिकाने पराक्रम गाजविला की राजे, सम्राट त्यांना हातातले सोन्याचे कडे द्यायचे किंवा सुवर्णमुद्रा द्यायचे किंवा एखादे गाव वतन, जहागिर म्हणून द्यायचे. या ४ योद्ध्यांनी रात्रीच्या अंधारात कोणाला सुगावा लागू न देता पुतळा पाडण्याचे काम यशस्वीपणे पार पाडून संभाजीराजांच्या अपमानाचा बदला घेतला आहे (थोरल्या महाराजांनी रात्रीच्या अंधारातच गुपचूप लालमहालावर हल्ला चढवून शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती. तसेच रात्रीच्या अंधारातच त्यांनी पन्हाळ्यावरून सिद्दि मसूदला गुंगारा देऊन विशाळगडावर प्रयाण केले होते.). या महान कृत्यानिमित्त आधुनिक सम्राट श्रीमंत नितेशराजे (धाकटी पाती) किंवा श्रीमंत युवराज प्रवीणराजे हे नक्कीच बक्षिशी म्हणून त्यांच्या चरितार्थाची आजन्म सोय करतील याविषयी निश्चिंत असा. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ!!! मनुवाद्यांचे खाली डोके वर पाय!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Tue, 01/10/2017 - 19:04 नवीन
जामिनावर सुटल्यानंतर या टग्यांचा सत्कार झालेला दिसतोय. Image removed. http://www.loksatta.com/pune-news/4-accuse-in-ram-ganesh-gadkari-vandalized-case-get-bail-1380956/ जय जिजाऊ जय शिवराय, मनुवाद्यांचं खाली डोकं वर पाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Tue, 01/10/2017 - 19:18 नवीन
अपेक्षित होतेच तसेच झाले... लिहिणार होतो त्यादिवशी की जामिनावर सुटल्यावर सत्कार होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 01/17/2017 - 11:01 नवीन
त्यांचे बर्‍याच ठिकाणी सत्कार होताहेत असं वाचनात येतंय. काल नितेश राणेने त्यांचा जाहीर सत्कार करून प्रत्येकी ५ लाख रूपयांचे धनादेश दिले असेही "सकाळ"मध्ये वाचले. एकंदरीत पुतळा तोडल्याने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली आहेच आणि त्याबरोबर आर्थिक भरभराटही होताना दिसतेय. या चौघांनी खरं तर राम गणेश गडकरींचे आभार मानायला हवेत. त्यांनी "राजसंन्यास" नाटक लिहिलेच नसते तर यांनी प्रसिद्धी आणि भरभक्कम आर्थिक लाभ झालाच नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Tue, 01/17/2017 - 11:06 नवीन
इस्लामच्या नावाखाली फतवे काढणारे आणि त्यांना इनाम देणारे कट्टरतावादी अरब देशांमध्ये पहायला मिळतात. पण तीच परंपरा आता स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातही पडताना दिसतेय. कारण पुण्यातल्या संभाजी बागेतील राम गणेश गडकरींचा पुतळा तोडणाऱ्या चार गुंडांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी पाच लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे नितेश राणे हे स्वत:ही काँग्रेसचे आमदार आहेत. काही दिवसांपुर्वी राम गणेश गडकरींनी ‘राजसंन्यास’ नाटकातून छत्रपती संभाजी राजेंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत पुण्यातील संभाजी उद्यानातून त्यांचा पुतळा फोडून, मुठा नदीत फेकला होता. त्याच गुंडांना नितेश राणेंनी काळ तुळापुरात पाच लाख रूपायांचा चेक देऊन त्यांचा सत्कारही केला. गेल्या वर्षी नितेश राणेंनी तुळापूरमध्ये केलेल्या भाषणातच संभाजी बागेतील गडकरींचा पुतळा जो तोडेल त्याला पाच लाख रूपयांचं बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली होती. ती घोषणा आपण पूर्ण करत असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. http://www.ibnlokmat.tv/archives/245145
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Mon, 01/09/2017 - 11:03 नवीन
<<<कागद तपासून पाहणे हे नाटककाराचे काम नाही. नाटककाराला कल्पना विलास करण्याचा अधिकार आहे.>>> -- खरंय का हे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ब
बबन ताम्बे Wed, 01/04/2017 - 14:43 नवीन
नाटक, कादंब-या म्हणजे काही इतिहास नाही हे या लोकांना कधी समजणार ? उद्या हे लोक १००-२०० वर्षांतील कथा कादंब-या चाळतील आणि कुठल्या तरी प्रकरणातील काहीतरी काढून आमुक तमुक व्यक्तीची बद्नामी झाली म्हणून राडे करतील. कायद्याने आता वेळीच असल्या गोष्टींवर धाक बसवायला हवा. मला वाटते आता महाराष्ट्रातील काही समंजस समाजधुरीणांनी पुढे येऊन समजावणे आवश्यक आहे. नाहीतर येणारी तरुण पिढी अशीच वाया जाईल. गडकरींचा पुतळा फोडणारे पंच्विशीच्या आतले तरुण आहेत. तरुणांची दिशाभूल करणा-या आणि जाती जातीत तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेणा-या राजकीय पुढा-यांकडून काहीच अपेक्षा करण्यात अर्थ नाही. जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी बाबा आढावांनी सकाळ मधे छान लेख लिहीला होता. आत्ता देखील त्यांच्या सारख्या किंवा अण्णा हजारेंसारख्या आदरणीय व्यक्तींनी पुढे येऊन भरकटलेल्या तरुणांना दिशा दाखवली तर असे तरूण अशी क्रुत्ये करण्या धजावणार नाहीत असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/05/2017 - 06:50 नवीन
ज्यांना अक्कल येण्याची तीव्र गरज आहे ते असले शहाणपणाचे काही वाचत किंवा ऐकत नाहीत. त्यांना भडकावणारे फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांचा वापर करतात. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला सुसंस्कृत बनवायचा शंभर दीडशे वर्षापूर्वी प्रयत्न करणार्‍या लोकांचे कार्य नाकारण्याचा जो प्रयोग सुरू आहे तो बघता महाराष्ट्रात खरे महनीय काही शिल्लक राहील का अशीच शंका वाटते. इतिहास पुसला जात नाही असे आपण वारंवार म्हणतो. पण तेही खरे नाही. एकच गोष्ट आडमुठ्या किंवा अजाण लोकांच्या झुंडीला जोरात सांगत राहिले तर काही वर्षांनी त्यांना तेच खरे वाटू लागते. उदाहरण हवे असेल तर गोव्यात मराठेशाहीचा इतिहास पोर्तुगीजांनी कसा पुसला ते येऊन बघा. महाराष्ट्रात इतिहासाचे खरे नीट संशोधन विसाव्या शतकाच्या पहिल्या भागात सुरू झाले. ते प्रकाशात येऊन त्याला मान्यता मिळेपर्यंत बखर वाङ्मय हेच काय ते लोकांना इतिहास वाटत होते. संभाजी राजांची बदनामी करणार्‍या बखरी कोणी कोणी आणि का लिहिल्या याच्या मुळापर्यंत गेले तर आता पुतळे फोडणार्‍या दगडांना ते कुपथ्य होईल. संभाजी राजे गेले. बखरकार गेले. नाटकाचे फक्त काही प्रवेश लिहिणारे गडकरीही गेले. संपूर्ण नाटक कसे आकाराला आले असते हे आपण आता सांगू शकत नाही. त्यांना जाऊनही १०० वर्षे होत आली. आपला पुतळा उभा राहील म्हणून त्यांनी काही लेखन केले नव्हते आणि पुतळा फोडला म्हणूनही त्यांना कळणार नाहीये. "शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याच्या तलवारीचा तुकडा पडला तेव्हा तुम्ही काय करत होता" अशी काही वक्तव्ये पाहिली. यावर हसावे की रडावे ते कळत नाही. जर कोणा समाजकंटकानी ते कृत्य केले असेल तर त्यांनाही शिक्षा झाल्याच पाहिजेत. नसेल तर एका अपघाताचे निमित्त करून हे कंटक समाजात तेढ निर्माण करत आहेत. का गडकरींच्या जातीच्या लोकांनी तो तलवारीचा तुकडा मोडला असे यांचे म्हणणे आहे? शिवाजी महाराजांसाठी आणि संभाजी राजांसाठी सर्वोच्च त्याग करणार्‍या कोरडे बंधू आणि चिटणीसांची जात कोणती होती तेही जाऊन तपासा की मूर्खांनो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
म
महासंग्राम गुरुवार, 01/05/2017 - 10:41 नवीन
अण्णा हजारेंसारख्या आदरणीय व्यक्तींनी पुढे येऊन भरकटलेल्या तरुणांना दिशा दाखवली तर असे तरूण अशी क्रुत्ये करण्या धजावणार नाहीत असे माझे मत आहे
. तुम्हाला खरंच अशी आशा वाटते कि लेख लिहिल्याने आजकालची टाळकी सरकलेली तरुण पिढी( यात मी पण येतो ) अशी कृत्ये करणार नाही. सोशल मीडियाचा जमान्यात मुळात किती जण असे लेख वाचतील. बाकी बाबा आढाव अत्यंत सोयीस्कर राजकारणी कमी समाजसेवक आहेत हे मत नोंदवतो. जिथे पुण्यात त्यांच्या रिक्षा पंचायतचे रिक्षाचालकच त्यांच ऐकत नाही तर मग तरुणांची बातच सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/05/2017 - 11:29 नवीन
जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी बाबा आढावांनी सकाळ मधे छान लेख लिहीला होता. आत्ता देखील त्यांच्या सारख्या किंवा अण्णा हजारेंसारख्या आदरणीय व्यक्तींनी पुढे येऊन भरकटलेल्या तरुणांना दिशा दाखवली तर असे तरूण अशी क्रुत्ये करण्या धजावणार नाहीत असे माझे मत आहे.
आढाव थोरल्या साहेबांसारखे सूचक बोलतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी "सकाळ"मध्ये लिहिलेल्या एका लेखात असे लिहिले होते की "पुण्यात अनेक प्रश्न आहेत. शनिवारवाडा महोत्सव भरवून किंवा विश्रामबाग वाड्यात कारंजी थुईथुई नाचवून पुण्यातील प्रश्न सुटणार नाहीत."शनिवारवाडा महोत्सव भरवून किंवा विश्रामबाग वाड्यात कारंजी थुईथुई नाचवून पुण्यातील प्रश्न सुटणार नाहीत हे बरोबर आहे. परंतु फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करून किंवा फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारक एकमेकांना जोडून किंवा विद्यापीठाचे नाव बदलून तरी पुण्यातील प्रश्न सुटणार आहेत का? परंतु याचा उल्लेख न करता फक्त शनिवारवाडा व विश्रामबाग वाडा या नेमक्या दोनच ठिकाणांचा उल्लेख करण्यामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे.
बाकी बाबा आढाव अत्यंत सोयीस्कर राजकारणी कमी समाजसेवक आहेत हे मत नोंदवतो.
माझ्या ओळखीचे ब्राह्मण असलेले काही रिक्षाचालक आहेत. त्यांच्याकडून अशीच माहिती मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
ब
बबन ताम्बे गुरुवार, 01/05/2017 - 11:38 नवीन
अशी कृती, जी लोकांचे विचारपरिवर्तन करील. जसे, गांधीजींनी नोखालीत पदयात्रा काढून दंगे शांत केले. जसे, बाबा आमट्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकले . सोशल मेडियावरील लेख तर वाचतील ना ? परवाच व्हॉट्स अ‍ॅप वर शिवाजी महारा़जांचा खून कोणी केला यावर कुणातरी प्रकांड (?) पंडीताने ज्ञान पाजळले होते. कशासाठी चाललेय हे? कशासाठी ब्राम्हण - ब्राम्हणेतर अशी फुट पाडून महाराष्ट्राला मागे खेचताय ? हे असले जर लेख वाचले जातात तर समंजस लिखाण का नाही वाचले जाणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
स
सूड गुरुवार, 01/05/2017 - 10:51 नवीन
असे दिशा दाखवून लोक सुधारले असते तर बघायला नको!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे गुरुवार, 01/05/2017 - 11:27 नवीन
जे पेटवताहेत , त्यांची पोटे भरलेली आहेत. ज्यांना उद्युक्त केले जातेय, त्यांना काम धंदा नाहीये. अण्णा हजारेंनी दिल्लीत लोकपाल साठी उपोषण केले तेंव्हा तरुणाई त्यांच्या पाठीशी होती. अगदी पुण्यात देखील तरुणांचे मोर्चे निघाले होते त्यांना पाठींबा देण्यासाठी. कुणीच पुढाकार घेतला नाही तर इथून पुढे कठीण आहे. तरूणाईला असेच भरकटवले जाईल. परवाच टीव्ही चॅनेलवर पुतळा हटावचे समर्थन करणा-यांचे अमुल्य विचार ऐकले. धन्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
विशुमित गुरुवार, 01/05/2017 - 12:06 नवीन
१०० पैकी १० सुधारतील? बाकी राहिलेले ९० टप्या टप्याने ("मेरी आवाज सुनो" ने ) बरोबर सुधारतील. (3० वर्ष पूर्वी गावात ९० % पेताड होती. एकदा एका आळंदीच्या बाबांचे कीर्तन होते. पेताडांतील २ जण पहिल्याच कीर्तनात सुधारले. गेलेली प्रतिष्ठा परत मिळायला लागली. त्यांना मिळत असणारी प्रतिष्ठा पाहून बरेचजण सन्मार्गाला लागले आहेत. १-२ % चुकार मकार राहिले आहेत. पुढची ९९.९९ % तरुणपिढी निर्व्यसनी आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आबा गुरुवार, 01/05/2017 - 07:17 नवीन
बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या वेळी विकृती विकृती वगैरे काव-काव करणारे आज... साधन शुचीतेच्या गप्पा मारत आहेत हे ऊदाहरणार्थ थोर आहे... येडे ब्रिगेडी आणि येडे संघोटे :)
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/05/2017 - 07:24 नवीन
नुसत्या पिंग्यावर त्रिशतकी धागा तयार झाला होता. येडे ब्रिगेडी आणि येडे संघोटे -- अब्जावदी वेळा सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
प
पैसा गुरुवार, 01/05/2017 - 07:37 नवीन
याचीच वाट बघत होते. हो, मी बाजीराव सिनेमात विकृती आहे म्हटले होते. कारण मराठी लावणीसुद्धा त्यात धड दाखवली नव्हती. की त्यातल्या लोकांचे कपडे ऐतिहासिक किंवा नीट मराठी पद्धतीचे नव्हते. एक साधी गोष्ट कळत असेल तर बघा. भन्साळीने जे केले ते चूक. पण तो जिवंत आहे. त्याला चूक सुधारायची संधी आहे. गडकरींनी केले ते चूक. पण त्याना मरून शंभर वर्षे झाली. ती चूक सुधारणे शक्य नाही. भन्साळीच्या पुढ्यात सिद्ध झालेला इतिहास असताना त्याने मुद्दाम वाह्यातपणा केला. गडकरींच्या काळात त्यांनी जे लिहिले तेच तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्या कृपेने इतिहास समजले जात होते. दोन परिस्थितीतला फरक तुम्हाला समजेल अशी अपेक्षा नाहीच. पण समजावायचे माझे काम मी केले. तुमच्या माहितीसाठी, मी संभाजी ब्रिगेडमधेही नाही किंवा संघातही नाही. जायचे म्हटले तरी मला संघात प्रवेश मिळणार नाही. मात्र संघिष्ट हा सभ्य शब्द वापरायची संधी असताना संघोटे म्हणलेत त्यावरून तुमची संघटना कोणती त्याचा अंदाज आला. काय पाहिजे ते लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आबा Sat, 01/07/2017 - 16:57 नवीन
भक्त म्हणजे दांभिकतेची एपीट्मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा