Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुतळा हटाव

ज
जानु
Tue, 01/03/2017 - 07:28
🗣 175 प्रतिसाद
आज सकाळी बातमी वाचली ती पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने पाडुन टाकला. फार पूर्वी वाचलेले बाळकराम आठवले. त्या काळातील वाचलेले खुसखुशीत लेखन, नाटके, लेख आठवले. पु. ल., चि. वि. यांचे लेखन वाचुन त्यात वाटणारा आनंद किती निर्मळ आणि प्रांजळ होता याची आठवण पुन्हा एकदा झाली. त्या काळात ठकीच लग्न किती आनंददायी वाटलं? खरच गडकरी फेकुन द्यावेत का? कोणाकोणाला फेकायचे याची यादी एकदा बनवायच म्हणा. आपण इतके स्वार्थी झालोत का? की असहाय आहोत? खूप विचार आहेत एकत्रित सुसंबद्ध पणे लिहता येत नाहीत पण व्यक्त तरी करावे म्हणून लिहतो. एवढीच हिंमत आणि समाधान. जिथे मला कोणी ओळखत नाही आणि यावर कोणी सत्ताधारी किंवा त्याचा भाऊ, दादा हाच तो आपल्याला विरोध करणारा असे म्हणणार नाही.

प्रतिक्रिया द्या
35372 वाचन

💬 प्रतिसाद (175)
प
पैसा Sun, 01/08/2017 - 08:28 नवीन
यावर लिहिण्यासारखे बरेच आहे. पण मी जे स्पष्ट दिसते ते बोलते. तुमच्यासारखा काही अजेंडा घेऊन इतक्या नीच पातळीवर कोणावर आरोप करणे मला या जन्मात तरी जमणार नाही. तेव्हा तुमच्यासारखे कोणीतरी शोधून त्यांच्यासोबत चिखलात कुस्ती खेळा. माझा लांबून रामराम. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि असे निनावी राहून पिंका टाकण्यापेक्षा काही विधायक लिहीत चला हा फुकटचा सल्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आबा Mon, 01/09/2017 - 19:13 नवीन
नीचपणा करण्याची सवय नसलेल्यांच्या मानाने तुमचे नीचपणाचे कौशल्य चांगले आहे :) आता इथलेच उदाहरण पहा... मला संघटणेमध्ये घुसवण्याची घाई तुम्हीच केलीत, असो... भन्साळी बद्दलची भक्तांची भूमीका आणि गोविंदाग्रजांबद्दलची भूमीका यातला स्पष्ट विरोधाभास लक्षात येत नसेल तर मी तरी काय सांगणार तुम्हाला ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 01/10/2017 - 05:48 नवीन
थ्यांकू आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 11:14 नवीन
भन्साळीने जे केले ते चूक. पण तो जिवंत आहे. त्याला चूक सुधारायची संधी आहे. गडकरींनी केले ते चूक. पण त्याना मरून शंभर वर्षे झाली. ती चूक सुधारणे शक्य नाही.
हे लाॅजिक गंडत आहे.आता ते कसं गंडत आहे ते तूम्हीच बघा. मी वरच टाईपले आहे,कि कोणीतरी कोणालातरी असं ना तसं पूजतच असतो,तेव्हा इतिहासाची मोडतोड किंवा खरा-खोटा इतिहास हा मुद्दा बाजूला राहू दे,पण तुमचा स्टँड बायस असतो हे मान्य करा.(तुम्ही मान्य करणार नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 01/08/2017 - 12:38 नवीन
सांगा ब्वा. खाली जयंत कुलकर्णी १०० वर्षांपूर्वी माहित असलेल्या इतिहासावरून आता मोडतोड करणे कसे चूक आहे हे सांगत आहेत तेही तुमच्या मते चुकीचे बोलत आहेत तर! मिपा वय एक महिन्याचे असताना कोणाला "बायस्ड आहात आणि ते तुम्ही मान्य करणार नाही" वगैरे बोलायची मला तरी हिम्मत झाली नसती. निव्वळ चिखलफेक करण्यासाठी काही id अजेंडे घेऊन जन्माला येतात त्यातलाच तुमचा id जन्म दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 13:44 नवीन
मिपावरचे वय आणि आयडीचा जन्म विशिष्ठ अजेंड्यासाठी होणे हे मुद्देच गैरलागू आहेत. इथे तटस्थता आणि निष्पक्षता अपेक्षित आहे,किमान अभ्यासू आयडींकडून तरी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 01/08/2017 - 16:49 नवीन
पण तुम्ही आहात तर logic काय चूक सांगा की. सगळ्याना शिकवताय ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
श
श्रीगुरुजी Sun, 01/08/2017 - 16:53 नवीन
ते एकटेच अभ्यासू नाहीत. अजूनही काही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
द
देवेन भोसले गुरुवार, 01/05/2017 - 09:33 नवीन
नेमका काय विरोध कारायचा आहे हे न समजल्याने -- बुद्धिजिवि लोकचा प्रोब्लेम झाला आहे गडकरीं चुक हे कलातय तरिपन विरोध केला पहिजे कारान ब्रिगेड ने केलय म्हानल्यावर गप्प बसल तर अपान हुशार कसे हे कधि धखवयच माग ब्रिगेड दिखावु पना कराताय हे महित अहे सगाल्यन तारिपान अपन हुशार हे दखवलेच पहिजे असा झलाय लोकाच
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 01/05/2017 - 10:41 नवीन
संदीप डांगे,
बाकी, ह्या अधिकाराबाबत हुसैन आणि गडकरी यांना वेगळा न्याय लावणारे काही महाभाग आहेत.
वेगळा न्याय लावलाच पाहिजे ! हुसेन यांच्यावर न्यायालयात खटले प्रलंबित होते. याला कायदेशीर प्रक्रिया राबवणे म्हणतात. गडकरींच्या पुतळ्याच्या बाबतीत कायद्यास फाट्यावर मारण्यात आलं आहे. त्यामुळे कायद्याचा आदर राखण्यासाठी हुसेन आणि गडकरी यांना वेगवेगळे न्याय लावणे अपरिहार्य आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/05/2017 - 11:22 नवीन
२००४ - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था २०१० - जिजामाता बागेतील दादोजी कोंडदेवांचा पुतळा २०१२ - रायगडावरील वाघ्याचा पुतळा २०१७ - राम गणेश गडकरींचा पुतळा ब्रेव्हो! ही नासधूस करणार्‍या व पुतळ्यांची तोडफोड करणार्‍या या शूर मर्द मावळ्यांचा अभिमान वाटतो. गडकरींचा पुतळा तोडून नदीत फेकून दिल्याची बातमी वाचल्यावर उर अभिमानाने भरून आला व कंठ दाटून आला. ही बातमी स्वर्गापर्यत पोहोचली असेलच आणि ती ऐकल्यावर थोरल्या महाराजांची व संभाजी महाराजांची छाती अभिमानाने फुलली असेल. ब्रिगेडींनी आता इथेच थांबू नये. पुण्यात अजून लोकमान्य टिळक, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चिं केळकर, सार्वजनिक काका जोशी, विठ्ठलराव गाडगीळ असे अनेक पुतळे शिल्लक आहेत. 'पु ल देशपांडे उद्यान'नावाचे उद्यानही आहे. क्रमाक्रमाने या सर्व गोष्टींची नासधूस करावी. काही नतद्रष्ट विचारतील की संभाजी महाराजांबद्दल एवढा अभिमान असेल तर अफजुल्याची कबर का तोडत नाही, औरंग्याची कबर का तोडत नाही व त्या शहराला औरंग्याच्या सम्नानार्थ दिलेले नाव का बदलत नाही. अशा नतद्रष्टांकडे सरळ दुर्लक्ष करावे. आपल्या मुख्य लक्ष्यापासून कधीही विचलीत होऊ नये. आपले मुख्य लक्ष्य औरंग्या, अफजुल्या इ. नसून जोशी, कुलकर्णी, देशपांडे असली आडनावे लावणारे नतद्रष्ट आहेत हे कायम ध्यानात राहू देत. जय भवानी! जय शिवाजी!! मनुवाद्यांचे खाली डोके वर पाय!!!
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/05/2017 - 11:48 नवीन
तुमच्या विचारांचा पूर्ण आदर राखून... अशी प्रतिक्रिया देऊन तुम्ही नक्की काय साध्य करताय ? मला तरी यातून फक्त एकाच जातीचे व्हिक्टिमकार्ड खेळ्यालच प्रतीत होतंय. नेमके हेच विचार ही भरकटलेली तरुणाई आपल्या आपल्या जातीची बाजू घेऊन उचलून धरत आहेत. ज्याला कोणाला यातून फायदा उठवून घायचा आहे त्याचा हेतू साध्य होताना दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सूड गुरुवार, 01/05/2017 - 13:33 नवीन
अशी प्रतिक्रिया देऊन तुम्ही नक्की काय साध्य करताय ?
वर "नुसत्या पिंग्यावर त्रिशतकी धागा झाला होता" असं म्हणून तुम्ही जे साध्य केलंत तेच!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
आ
आदूबाळ गुरुवार, 01/05/2017 - 12:15 नवीन
संभाजी ब्रिगेड आणि निवडणुका - गूगल ट्रेंड्स trends.embed.renderExploreWidget("TIMESERIES", {"comparisonItem":[{"keyword":"संभाजी ब्रिगेड","geo":"IN","time":"all"},{"keyword":"निवडणुका","geo":"IN","time":"all"}],"category":0,"property":""}, {"exploreQuery":"date=all&geo=IN&q=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A1,%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE","guestPath":"https://www.google.co.uk:443/trends/embed/"}); क्या मेरी आंखे धोका खा रही हय?
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 01/06/2017 - 10:26 नवीन
क्या बात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ग
गामा पैलवान Fri, 01/06/2017 - 18:32 नवीन
लोकहो, या प्रसंगात भिकारड्या मेकॉलेछाप शिक्षणाचाही सहभाग आहे. आज जर गडकरी कोण आहेत हे नितेश राणे यांना माहीत असतं तर असं आततायी पाऊल उचललं नसतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 09:32 नवीन
मला वाटतं इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे व डॉ. गोखले ही व्यक्तिमत्व मान्यता पावलेली आहेत,त्यांच्या मांडणीला निश्चित सुयोग्य आधार आहे. या इतिहासकारांनी संभाजी महाराजांवर संशोधन करून मांडणी केलेली आहे. त्यामुळे गडकरींनी ललित्याच्या नावावर काहीही खपवण्याची गरज नाही. मुळात जो मुख्यमंत्री नरेंद्र महाराजांच्या आश्रमात जाऊन धर्म शक्तीने राज्यशक्तीला नियंत्रणात ठेवावे म्हणतो त्याला संभाजी महाराजांबद्दल बोलण्याची अशी कोणती नैतिकता राहत नाही कारण शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज, कोणत्याही अत्यंत बिकट परिस्थितीत रयतेला दैव भरवश्यावर, वाऱ्यावर सोडले नाही किंबहुना स्वतःच्या प्राणापलिकडे जपले त्यामुळे हा मुख्यमंत्री पुतळ्यात रमला काय किंवा आणि कुणात, फरक पडत नाही. संभाजी ब्रिगेडच्या कृत्याची लोकशाही राज्याच्या चौकटीत चिकित्सा होऊ शकते आणि ती करायला देखील हवी.
  • Log in or register to post comments
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 09:34 नवीन
डॉ. कमल गोखले आणि वा. सी. बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणण्याआधी संभाजी महाराजांची जी काही प्रतिमा होती तिला अनुसरून गडकरींनी राजसंन्यास मधील संभाजी उभा केला. तसाच तो सावरकरांनी तसाच तो नाथमाधवांनी मांडला. पुढेही मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा इ. चित्रपटांमधून संभाजी महाराजांची बदनामी केली गेलीच! गडकरींनी त्यासाठी तुळसा उभी केली. पोर्तुगीजांकडून महाराज मदिरा आणि मदिराक्षिची मागणी करतात असे दाखवले, मराठी राज्याची शान जरीपटका, तो फाडून स्वतःचा घाम तुळसा पुसते, त्याच्याच कापडाची चोळी करून घालते इ. अनेक प्रसंग रंगवले!
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2017 - 10:26 नवीन
यात एक विरोधाभास भरलेला आहे. एकीकडे तुम्ही मान्य करता //संभाजी महाराजांची जी काही प्रतिमा होती तिला अनुसरून गडकरींनी राजसंन्यास मधील संभाजी उभा केला// तसे असेल तर "बदनामी'' या शब्दाच्या अर्थानुसार ती बदनामी कशी होते ते कळले नाही. बदनामी म्हणजे एखाद्याबद्दल खोटेनाटे लिहून त्याचे चारित्र्यहनन करणे. पण येथे तर जशी प्रतिमा होती त्या अनुसुरुनच नाटक (इतिहास नव्हे) लिहिले गेले होते. मग बदनामी कशी. अशा उदाहरणानुसार जर या काळात वावरायचे असेल तर सगळ्यांचीच टाळकी फुटायला हवीत. अर्थात या शूरमर्द मावळ्यांचे मी कौतुकच करतो. त्यांचे १०० वर्षापूर्वी लिहिलेले वाचून रक्त तरी उसळले. आणि यापुढे त्यांचे व त्यांच्या पुढार्‍यांचे रक्त असेच उसळलेले राहुदेत अशी शिवप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. दिल्लीमधील औरंगजेब रोडचे नाव बदलायला एका पाकिस्तानी नागरिकाला पुढाकार घ्यावा लागला आणि येथे अजून औंरंगजेबाच्या नावाने कायकाय आहे काय माहीत. पण एक वास्तू मला माहीत आहे. ज्याने संभाजी महाराजांचे अवयव एका मागून तोडले, जीभ खेचून बाहेर काढली, ज्यांचे शीर तलवारीच्या टोकावर नाचविले त्या औरंगजेबाची कबर आजही यांच्या छाताडावर पाय रोवून दिमाखात उभी आहे आणि त्याला बोटही लावायची संभाजी ब्रिगेडची हिंमत होणार नाही. या कबरीकडे पाहताना यांचे रक्त सळसळत नाही. कारण माहीत नाही. गडकर्‍यांचा पुतळा व औरंगजेबाची कबर याच्यात मला वाटते शूर (ना) मर्द मावळ्यांना गडकर्‍यांची जास्त भिती वाटत असावी.... :-) आज संब्रि आणि त्यांची पिल्लावळ ज्यांच्या ताटात बिर्याणी चिवडत आहेत ते पाहून काही दिवसांनी काय होईल याचा अंदाज येऊ शकतो. यांना येथेच आत्ता मतांनी ठेचले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 11:37 नवीन
सहमत आहे. औरंगजेबाची कबर मोडायची ब्रिगेंडीची हिम्मत नाहीये.कारण ब्रिगेड्यांनी मुळातच आपले तथाकथित वक्ते, लेखक आणि स्वयंघोषित इतिहाससंशोधकांची फौज उभी करून मराठा सैन्यात मुसलमान वगैरे कसे भरपूर होते तसेच कवी कलशाने संभाजीला दगा दिला,मनुस्मृतीप्रमाणे त्यांची हत्या केली इ.अक्कल पाजळवली आहे.शिवाय औरंगजेब कसा चांगला होता आणि शिवरायांचे खरे शत्रू ब्राह्मण होते वगैरे तारे तोडले आहेत. पण चिंता नसावी,अशा संघटनेला कोणी मत देईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 11:07 नवीन
हो, तोच इतिहास गडकरींनी अनुसरला जो तोवर मुद्दामपणे प्रचलित केला गेला होता! त्यांनी स्वतःहून काहीच संशोधन नव्हते केले! शिवाय त्यात तुळसेचे पात्र टाकून आणखीच फोडणी दिली. कलमदानेच्या तोंडून शिवाजी महाराजांपेक्षा रामदास श्रेष्ठ हे वदवले, संभाजींच्या तोंडून त्यांची स्वतःचीच बदनामी करवली, शाहू बाळराजेंच्या तोंडी संभाजीची जीभ छाटण्याचा तसेच त्यांना हद्दपार करण्याचा संवाद टाकला असे अनेक मुद्दे आहेत!
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2017 - 11:18 नवीन
तुम्हाला मी काय लिहिले आहे की नाही ? बहुदा नाही. अहो ज्याने हे सगळे केले त्त्याची समाधी आज निडरपणे उभे आहे त्याबद्दल काय म्हणणे आहे आपले ? /// कलमदानेच्या तोंडून शिवाजी महाराजांपेक्षा रामदास श्रेष्ठ हे वदवले, संभाजींच्या तोंडून त्यांची स्वतःचीच बदनामी करवली,// ब्रिगेडी.... जरा सवीस्तर माहिती टाका म्हणजे मुद्दे खोडून काढता येतील. अर्थात माझ्या पहिल्या मुद्यातच सगळे मुद्दे खोडून निघतात पण अजून समजावून सांगता येईल हे सगळे मुद्देच नाहीत. हा सगळा नीचपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 11:22 नवीन
औरंगजेब हा उघड शत्रू होता. त्याच्याकडून काय अपेक्षा असणार? गडकरी असतील, सावरकर असतील वा नाथमाधव यांनी थोडाफार प्रामाणिकपणा दाखवावा ही अपेक्षा असते! नाटक हा इतिहास नव्हे. मात्र ऐतिहासिक नाटक लिहिताना तारतम्य ठेवावे लागते. संभाजी ब्रिगेडच का इतर अनेक लोकांनी याआधीही अशा गोष्टींवर आक्षेप घेतलेला होता/आहे. ज्या संभाजी महाराजांची गडकरींनी यथेच्छ बदनामी केली, त्यांच्याच नावाच्या उद्यानात गडकरींचा पुतळा बसवणे कितपत योग्य? खरा इतिहास मांडून अनेक वर्षे होऊन गेलेली असतानासुद्धा आपला खोटा इतिहास गाजावाजा करीत विकणारे लोक आपण पाहताच. चुकीचा इतिहास प्रसृत करणे लोक थांबवित नाहीत त्याला विरोध नाही करत आपण त्याविरुद्ध कोणी बोलले लिहिले कि मात्र त्यावर तुटून पडता!
  • Log in or register to post comments
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 11:25 नवीन
मला वाटलें तुम्ही राजसंन्यास वाचले असेल म्हणून थोडक्यात लिहिले!
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sun, 01/08/2017 - 11:30 नवीन
राजसंन्यास ..ज्यांनी ४२ दिवस हाल अपेष्टा काढल्या मरताना त्यांच्यावर असं नाटक योग्य नव्हे . पुतळा फोडणं अजून योग्य नव्हे . बाकी प्रतापगडावरची कबर हि महाराष्ट्राची शान आहे कारण औदार्य दाखवलं महाराष्ट्राने . अवांतर -जाने भी दो यारो असाही महाभारतावर ब्लॅक कॉमेडी होतं असं एक पिक्चर आलेला आज आला असता तर काय झालं असतं?? पण सांस्कृतिक दहशत वाद केव्हाही धोक्याचा ..त्यामुळे असो . पण तरी नाटक असो व काहीही महाराजांवर लिहिणारे लोक किंबहुना चुकीचं काही कि लोक वैतागणार . हे सत्य आहे .आणि त्याला मुद्दाम खतपाणी घालणारे कमी नाहीत . त्यामुळे त्या तरुणांनीच योग्य विचार करावा . पुतळा फोडून संभाजी महाराज ग्रेट असं नाही आहे ते नेहमीच ग्रेट आहेत .
  • Log in or register to post comments
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 11:35 नवीन
घ्या सविस्तर: पहिल्या अंकाच्या चौथ्या प्रवेशाच्या सुरुवातीस जिवाजी कलमदाने आणि कलुशा कबजी संभाजी महाराजांना मदिरा मदिराक्षित गुंतवून ठेवण्याचा कट करीत असताना दिसतात. त्यावेळी सोयराबाईंना भिंतीत चिणून मारण्यास व राजारामांस नाजरकैद करण्यास आपणच प्रवृत्त केल्याचे जिवाजी सांगतो. तेथे संभाजी तुळशीसह हाती मद्याचा प्याला घेऊन प्रवेश करतात. तुळशी जनरीतीची भीती वाटत असल्याचे त्यांस सांगते त्यावर संभाजी तिला त्याची पर्वा न करण्याबद्दल समजावता. जिवाजी आणि कबजी संभाजींकडे साबाजीची चुगली करत असता तिथे साबाजी बाळराजांसह (शाहू) प्रवेशतात. जिवाजी आणि कबजी जातात. साबाजी संभाजींस समजावत असता त्यांच्यावर संभाजी चिडतात. साबाजी संभाजींस शिवाजींची थोरवी सांगत असता संभाजी तो केवळ नशिबाचा भाग असल्याचे सांगून त्यास विरोध करतात. (" दैवी संपत्ती आबासाहेबांनी मिळवली म्हणता, म्हणजे त्यांनी केलं काय? राजगडावर अनायासे सोन्याच्या मोहरांचा वर्षाव झाला, यालाच दैवी संपत्ती मानावयाची काय?") त्यांस कैद करण्याची धमकी देतात. बाळराजे आपल्या वडलांस विरोध करून ("...राजमुखातील दारू पिणारी जीभ मला छाटावी लागेल.." -शाहू संभाजींना) साबाजीस सोबत घेऊन जातात. संभाजी स्वतःशीच चरफडतात.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2017 - 12:12 नवीन
यात एक विरोधाभास भरलेला आहे. एकीकडे तुम्ही मान्य करता //संभाजी महाराजांची जी काही प्रतिमा होती तिला अनुसरून गडकरींनी राजसंन्यास मधील संभाजी उभा केला// तसे असेल तर "बदनामी'' या शब्दाच्या अर्थानुसार ती बदनामी कशी होते ते कळले नाही. बदनामी म्हणजे एखाद्याबद्दल खोटेनाटे लिहून त्याचे चारित्र्यहनन करणे. पण येथे तर जशी प्रतिमा होती त्या अनुसुरुनच नाटक (इतिहास नव्हे) लिहिले गेले होते. मग बदनामी कशी. अशा उदाहरणानुसार जर या काळात वावरायचे असेल तर सगळ्यांचीच टाळकी फुटायला हवीत. हे तुम्हाला कळतय की नाही ? त्या काळात संभाजीमहाराजांची प्रतिमा तशीच होती त्याला कोण काय करणार? तुमच्या लाडक्या औरंगजेबाच्या कामगिरीबद्दल लिहिल्या गेलेल्या फतूहत-ई-आलमगिरी मधे संभाजीमहाराजांच्या वर्तणूकीबद्दल वर्णन आले आहे. आता जाऊन दिल्ली फोडणार का ? त्यातील पान क्र. २६७ वर त्यांच्या वर्तणूकीबद्दल वर्णन आले आहे. ते खोटे आहे असे मी म्हणतो पण त्या काळात त्यांच्याबद्दल असे बोलले जात होते ही वस्तुस्थिती आहे. मासिर-ई-आलमगिरी या ग्रंथाचा उल्लेख करुन त्यात ही माहीती दिली आहे. फतहुत-ई-आलमगिरी हा ग्रंथ एका इश्र्वरदास नागर नावाच्या माणसाने लिहिला. त्याचे नंतर इंग्रजीमधे भाषांतर केले एका तस्मिन अहमद नावाच्या माणसाने. या भाषांतराला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननचे त्या काळातील अध्यक्ष श्री सतीशचंद्र यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्या युजीसीची इमारत अजूनही दिल्लीमधे दिमाखात उभी आहे. ती फोडायची हिंमत आहे का? ती अगोदर फोडा, कबर फोडा आणि मग यांनी शौर्याच्या गप्पा हाणाव्यात. एका बागेतील एका मास्तरांचा पुतळा फोडण्यास कसलिही मर्दुमकी लागत नाही. खुद्द नेहरुंनी शिवाजी महाराजांना लुटारु म्हटले होते त्यांच्या एकाही पुतळ्याला हात लावायची आजवर संब्रिच्या एकाही शूरवीर मावळ्याची हिंमत झालेली नाहे... हे आपले उदाहरणादाखल... ही तर अगदी अलिकडील गोष्ट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 12:22 नवीन
मी कुठे म्हटलंय पुतळे फोडा म्हणून? कुठल्याही असंवैधानीक मार्गास आपण विरोधच केला पाहिजे. मात्र चुकीच्या गोष्टी किती दिवस चालवून घ्यावयाच्या याचा तरी विचार करायलाच हवा! निदान आपलं चुकलं हे मान्य तरी करावं माणसाने? उदाहरणार्थ दादोजी, रामदास यांना अजूनही शिवाजींचे गुरु म्हटले जात असेल तर काय करायचे? इतकाही लाजमोडेपणा बरा नव्हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2017 - 12:38 नवीन
नेहरुंनी शिवाजीमहाराजांना लुटारु म्हटले म्हणजे त्यांचे पुतळे फोडायला पाहिजेत का ? नाही. तर ते नव्हते हे सिद्ध करायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील अनेक इतिहासकारांनी यदुनाथ सरकारांना ते वेळोवेळी सिद्ध करुन दाखविलेही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन
ज
जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2017 - 12:41 नवीन
//उदाहरणार्थ दादोजी, रामदास यांना अजूनही शिवाजींचे गुरु म्हटले जात असेल तर काय करायच///// ज्यांना म्हणायचे आहे त्यांना म्हणू द्या. काय फरक पडतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 12:49 नवीन
तुम्हाला नाही पडत, अभिमान वाटत असेल. आम्हाला राग येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2017 - 13:05 नवीन
/// कुठल्याही असंवैधानीक मार्गास आपण विरोधच केला पाहिजे// फक्त त्यात वैधानिक मार्गाने हे वाक्य घातलेत तर बरें.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 12:52 नवीन
ते केलंय सिद्ध. आणि आता कोण म्हणत नाही तसं. पण वारंवार सिद्ध करून देखील पुरंदरे टाइप लोक परत परत तेच तेच बोलत, लिहित आणि दाखवत राहतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
श
श्रीगुरुजी Sun, 01/08/2017 - 15:14 नवीन
उदाहरणार्थ दादोजी, रामदास यांना अजूनही शिवाजींचे गुरु म्हटले जात असेल तर काय करायचे? इतकाही लाजमोडेपणा बरा नव्हे!
अजूनही म्हणजे? ते दोघेही होतेच शिवाजी महाराजांचे गुरू! गुरूंना गुरू नाही म्हणायचं तर मग काय शिष्य म्हणायचं का? इतकाही कृतघ्नपणा बरा नव्हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन
स
संदीप डांगे Sun, 01/08/2017 - 15:38 नवीन
इतकाही कृतघ्नपणा बरा नव्हे!
कृतघ्न म्हणजे अहसानफरामोश. म्हणजे उपकारांची जाण न ठेवणारा. दादोजी, रामदास यांनी कोणावर उपकार केलेत ते कळेल काय गुरुजी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/08/2017 - 15:46 नवीन
गुरूंचे योगदान नाकारणे हा कृतघ्नपणा नव्हे काय? रमाकांत आचरेकर हे सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील गुरू होते. त्यांनीच त्याला घडविले. त्यांचे योगदान नाकारणे याला कृतघ्नपणा म्हणता येणार नाही का? हीरा कितीही मौल्यवान असला तरी त्याला पैलू पाडल्याशिवाय त्याला चकाकी येत नाही हे माहित असेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 01/08/2017 - 15:50 नवीन
ओ माय माय! हिरा काय पैलु काय चकाकी काय... असे प्रतिसाद पाहिले की ब्रिगेडी का चिडतात याची कारणे समजतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 15:56 नवीन
अगदीच=)) ब्रिगेडींच्या चवताळण्याला असे लोक्स कारणीभूत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Sun, 01/08/2017 - 16:06 नवीन
चूक. ब्रिगेडींच्या चवताळण्याला लोकांची आडनावे कारणीभूत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
श
श्रीगुरुजी Sun, 01/08/2017 - 16:04 नवीन
माझ्या प्रतिसादात चिडण्यासारखे काय आहे? एखाद्याला हीरा म्हणणे यात चिडण्यासारखे काय आह आहे? कोणीही स्वयंभू म्हणून जन्माला येत नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रात गुरूची गरज असतेच. विद्या असो, क्रीडा असो, कला असो, एखाद्या क्षेत्रातील कौशल्य असो . . . गुरू हा लागतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 15:39 नवीन
थोडा चहा घेता काय?
ते दोघेही होतेच शिवाजी महाराजांचे गुरू! गुरूंना गुरू नाही म्हणायचं तर मग काय शिष्य म्हणायचं का?
कुरूंदकर आणि मेहंदळे काय म्हणतात ते अभ्यासले आहे काय? ही दोन नावे तर निरपेक्ष इतिहास संशोधकांची आहेत,निदान त्यांच्यावर तरी विश्वास ठेवायलाच हवा. मिपावरचाच एक जुना धागा आहे सविस्तर वाचा, http://www.misalpav.com/node/20660 आणि ही एका अभ्यासू निरपेक्ष अन् तटस्थ आयडीची प्रतिक्रिया http://www.misalpav.com/comment/372960#comment-372960 आता तुम्ही त्यांना शिवाजीचे गुरू मानत असाल तर माझा काहीही प्राॅब्लेम नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/08/2017 - 15:59 नवीन
घेऊ की चहा. त्यात नाही म्हणण्यासारखं काय आहे? पांडुरंग बलकवडे, निनाद बेडेकर यांच्यासारखे अनेक निरपेक्ष इतिहास संशोधक आहेत. त्यांच्यावर अविश्वास ठेवायचा का?
आता तुम्ही त्यांना शिवाजीचे गुरू मानत असाल तर माझा काहीही प्राॅब्लेम नाहीये.
गुड! म्हणजे दोन्ही बाजूने काहीही प्रॉब्लेम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 16:06 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ... आयला म्हणजे फक्त ब्रिगेंडींना श्या घालण्यात काही अर्थ नाही तर!! बाकि चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/08/2017 - 16:08 नवीन
बरोबर. त्यांना श्या घालण्याची गरज नसून लाथा घालण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 16:15 नवीन
हान् कि बडिव!!!!!! शुभ कार्यास विलंब नको, साळगावकरांच्या पंचांगात मुहूर्त बघून लवकरात लवकर पहिली लाथ घाला, आम्ही आहोतच तुमच्या मागे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/08/2017 - 16:18 नवीन
चालेल. साळगावकरांऐवजी दाते पंचांग बघितलं तर चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/08/2017 - 16:25 नवीन
पळेल=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2017 - 11:38 नवीन
१ मुद्दा औरंगजेबाकडून काय अपेक्षा करणार हा नाही. मुद्दा त्याने जे केले त्यामुळे त्याच्या कबरीला काय शिक्षा द्यायची आहे हा आहे. २ इतिहासाचा अभ्यास करताना अनेक नवीन बाबी प्रकाशात येत असतात. १०० वर्षापूर्वी जो इतिहास माहीत होत्या त्यावर विसंबून पुतळे फोडणे याला साहेब बिनडोकपणा म्हणतात. ३ आक्षेप घेणे ठीक आहे. पुतळे फोडणे हा नालायकपणा आहे. आणि ते सुद्धा झुंडशाहीचा आधार घेऊन. ४ आपण ताराबाईंनी लिहून घेतलेली बखर वाचलीच असेल. वर कोणी तरी त्याचा उल्लेख केलेला आहे. आता जिंजीला जाऊन तो किल्ला फोडावा असे तुमचे म्हणणे आहे की काय ? ५ गडकरींचा पुतळा संभाजीपार्कमधे बसविला याचे एकमेव कारण तेथे मुबलक जागा होती हा आहे. शिवाय शेजारीच बालगंधर्व हे त्या काळातील उत्तम नाट्यगृह आहे. गडकरींचे त्या क्षेत्रातील योगदान आपल्याला माहीत नसेल पण इतरांना माहीत आहे. ६ ब्रिगेंडीनी खरा इतिहास मांडला आहे असे आपले म्हणणे असेल तर या चर्चेला पुढे कसलाच अर्थ नाही. ब्रिगेडींच्या इतिहासातील प्रत्येक गोष्टी आजवर अनेकांनी खोडून काढलेल्या आहेत. मीच येथे कित्येक गोष्टी खोडून काढलेल्या आहेत. शेवटी दगडावर डोके आपटण्यात अर्थ नाही म्हणून ते काम कंटाळून बंद केले. त्यांना धडा त्यांचेच बांधव शिकवतील याबाबतीत माझ्या मनात तसूभरही शंका नाही. कोणीही काहीही लिहावे व कोणीही ते म्हणणे खोडून काढावे पुराव्यानिशी. त्यात काहीही वावगे नाही. अगदीच फार झाले तर संब्रिला न्यायालयात जाण्यापासून कोणीही रोखलेले नाही. त्यांनी ब.मोंवर खटला दाखल करावा ज्यात त्यांच्या (संब्रिची) अकलेची लक्तरे निदान न्यायालयासमोर टांगली तरी जातील...पण झुंडशाहीला आमचा कायमच विरोध राहील. अगदी बाबरीभंजनालाही मी विरोध केला होता.
  • Log in or register to post comments
स
सुधीरन Sun, 01/08/2017 - 12:02 नवीन
मी ब्रिगेडी आहे असा तुमचा गैरसमज झालाय! बेंद्रे, गोखले, केळुस्कर, कुरुंदकर, शरद पाटील, आ. ह. इ. यांची पुस्तके वाचून जे काही समजलं त्यावर बोलतोय. औरंगजेबाची कबर आहे, अफजल खानाची आहे, परशुरामाची, वामनाची मंदिरे आहेत! पुरंदरेंवर केस चालू आहेच! मी वर जे काही लिहिलेय त्यात कुठेही पुतळ्याच्या तोडाफोडीला समर्थन दिलेले नाही! खोटा इतिहास कुरवाळत बसणाऱ्या आणि एतद्देशीय महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व ती चवीने वाचणाऱ्यांवरच टीका केली आहे! आचार्य अत्रेंनी पुतळा बसवतेवेळी केलेले भाषण मिळाले तर वाचा.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2017 - 12:18 नवीन
तसा स्मज आपले लेखन वाचल्यावर होणे स्वाभाविक आहे. मीही सगळी पुस्तके वाचली आहेत. नवनवीन पुराव्यानुसार इतिहासाची सतत तोडमोड व्हावी लागते हे मला मान्यच आहे. म्हणून पूर्वी लिहिलेल्या इतिहासासाठी इतिहासकारांची घरेदारे जाळण्याचा अधिकार कोणालाच घटनेने दिलेला नाही. हे महत्वाचे आहे. कबर आहे, परशूरामाची आहे, वामनाची आहेत तसाच हाही पुतळा असू द्यावा होता असे माझे म्हणणे आहे. तोडफोडीला आपले समर्थन नाहे असे आपण लिहिलेले वाचून वाटत नाही. मला तरी. मी सगळी भाषणे वाचली आहेत. त्यातून काय अर्थ काढायचा हा ज्याच्या त्याच्या वकुबाचा प्रश्र्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा