युती संपली, पुढे काय?
जे होणे अटळ होते, जे व्हायलाच हवे होते, जे होणार हे नक्की होते परंतु कधी होणार हा फक्त काही काळाचाच प्रश्न होता, जे व्हावे अशी अनेकांची मनापासून इच्छा होती . . . ते अखेर घडून आलेले आहे. भाजप-शिवसेना यांच्यात मागील २७-२८ वर्षांपासून असलेली महाराष्ट्रातील युती अधिकृतरित्या संपुष्टात आली आहे. २६ जानेवारीला उद्धव ठाकरेंनी युती संपल्याची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा करतानाच आम्ही आता एकटे लढून महाराष्ट्रावर स्वतःच्या जीवावर भगवा फडकावणार, युतीत आम्ही २५ वर्षे सडलो, आता यापुढे युतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन कोणाच्या दारात जाणार नाही, तुमची वज्रमूठ मिळाली तर समोरच्याचे दात पाडून टाकू, मुंबईत ११४ जागा मागून आमचा अपमान केला . . . अशी नेहमीचीच फुशारक्या मारणारी विनोदी वाक्ये होतीच.
तशी यांची युती विधानसभा पातळीला २०१४ मध्येच संपुष्टात आली होती. महाराष्ट्रात भाजपचा जनाधार पक्षाच्या स्थापनेपासूनच, म्हणजे १९८० पासून, शिवसेनेच्या तुलनेत जास्त असताना व तो एखाद्या विशिष्ट भागात साचलेला नसून महाराष्ट्राच्या सर्व भागात अस्तित्वात असताना, १९८४ च्या लोकसभेत फक्त २ जागा मिळविलेल्या भाजपने, पक्षविस्तार करण्यासाठी पडती भूमिका घेऊन १९८९ मध्ये शिवसेनेशी युती केली. वास्तविक पाहता ही युती म्हणजे स्कूटरला पुढचे चाक स्कूटीच्या चाकाच्या आकाराचे व मागचे चाक मोटरसायकलच्या चाकाच्या आकाराचे अशी विपरीत जोड होती. शिवसेचेची १९६६ मध्ये स्थापना झाल्यावर १९८५ पर्यंत महाराष्ट्रात ५ वेळा विधानसभा निवडणुक झाली. यापैकी १९६८, १९७३, १९७८ व १९८० च्या निवडणुकीत शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता, तर १९८५ मध्ये फक्त १ आमदार निवडून आला होता. नाही म्हणायला १९६८ मध्ये मुंबईत कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांचा खून झाल्यावर (ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय हत्या समजली जाते व यात हत्येचा आरोप शिवसेनेवर होता) झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक निवडून आले होते. म्हणजे ५ विधानसभा निवडणुकीत फक्त २ आमदार ही शिवसेनेची कामगिरी. याउअट भाजपने आपल्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या अवतारात १९७७ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत थोडेसे आमदार निवडून आणले होते. अगदी थोडे आमदार निवडून आणले असले तरी पक्षाचे अस्तित्व त्यातून दिसत होते. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर केवळ दीड महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसची मोठी लाट असतानासुद्धा भाजपने महाराष्ट्राने प. महाराष्ट्र वगळता इतर सर्व भागातून आपले एकूण १२ आमदार निवडून आणले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेला आधीच्या सर्व निवडणुकांप्रमाणे भोपळा मिळाला होता.
मुंबई व ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे या भ्रमात अगदी सुरवातीपासून सेना होती. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे २ तुकडे झालेले होते. इंदिरा काँग्रेस व यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटिल, यशवंतराव मोहिते इ. चा समावेश असलेल्या काँग्रेस नेत्यांची रेड्डी काँग्रेस असे दोन्ही तुकडे एकमेकांविरूद्ध लढले. केंद्रात बहुमताने सत्तेवर आलेला जनता पक्ष हा तिसरा पक्ष निवडणुकीत होता. बहुसंख्य मते या ३ पक्षातच विभागली जाणार हे उघड होते. अशा परिस्थितीत आपला बालेकिल्ला समजला जाणार्या निदान मुंबई-ठाण्यात तरी सेनेला किमान १०-१२ ठिकाणी विजय मिळायला हवा होता. सेनेने एकूण ३५ उमेदवार उभे करून एकही आमदार निवडून आला नाही. सेनेला मुंबई-ठाण्यातील काही ठराविक वॉर्डांपलिकडे स्थान नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. परंतु ही वस्तुस्थिती सेनेने किंवा सेनेबद्दल सुरवातीपासूनच सॉफ्ट कॉर्नर असलेल्या मराठी माध्यमांनी कधीच उघडपणे मान्य केली नाही.
१९८० च्या लोकसभा निवडणुकीत देशभर इंदिरा गांधींची प्रचंड लाट होती. भारतातील ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी तब्बल ३५५ मतदारसंघात इंदिरा काँग्रेसने विजय मिळविला होता. महाराष्ट्रात सुद्धा इंदिरा काँग्रेसला ४८ पैकी ३९ जागी विजय मिळाला होता. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती करून शिवसेनेला मुंबईतील २ जागा सोडल्या होत्या. महाराष्ट्रात व देशात इंदिरा गांधींची प्रचंड लाट असताना व याच पक्षाबरोबर युती करून आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुक लढविणार्या सेनेने मुंबईतील दोन्ही जागा खरं तर मोठ्या मताधिक्याने जिंकायला हव्या होत्या. प्रत्यक्षात दोन्ही जागांवर सेनेचा पराभव झाला. मुंबईत फक्त आपलाच आवाज चालतो व मुंबई हा आमचा बालेकिल्ला आहे हा शिवसेनेचा भ्रम पुन्हा एकदा सिद्ध झाला होता.
शिवसेनेने १९७३ मध्ये ठाणे महापालिकेत सत्ता मिळविली होती व नंतर १९७४ मध्ये मुंबईत सत्ता मिळविली होती. ती सत्ता अर्थातच सेनेने पुढील निवडणुकीत गमावली. मुंबई-ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे हा भ्रम तेव्हापासूनच उराशी बाळगलेला आहे. मुंबई-ठाण्याच्या बाहेर तर सेनेला हिंग लावून कोणी विचारत नव्हते. १९८५ मध्ये सुद्धा सेनेने स्वबळावर विधानसभेच्या काही जागा लढविल्या होत्या. परंतु माझगाव मधून निवडून आलेल्या छगन भुजबळांचा अपवाद वगळता इतर सर्व जागांवर सेनेचा पराभव झाला होता. या निवडणुकीत भाजपने जनता पक्ष, पवारांची समाजवादी काँग्रेस व शेकाप यांच्या युतीत निवडणुक लढवून १६ जागा जिंकल्या होत्या. भाजपला जरी युतीचा फायदा मिळाला होता तरी १९८० मध्ये भाजपने पूर्णपणे स्वबळावर इंदिरा काँग्रेसच्या लाटेत १२ आमदार निवडून आणले होते हे विसरता येणार नाही.
एकंदरीत १९८९ मध्ये युती होण्यापूर्वी आधीच्या निवडणुकीवरून जे चित्र दिसत होते ते असे होते की शिवसेनेला मुंबईत थोडेसे स्थान आहे तर भाजपला सेनेच्या तुलनेत मुंबईसकट इतर सर्व भागात जास्त जनाधार आहे. त्यामुळे युती होताना भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत हवा होता.
परंतु १९८४ च्या लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या अनुभवावरून, प्रसंगी पडती भूमिका घेऊन, स्थानिक पक्षांशी युती करून आपला पक्षविस्तार करायचा असे पक्षाध्यक्ष अडवाणींनी ठरविले होते. त्या धोरणानुसार तामिळनाडूच्या धर्तीवर शिवसेनेशी युती करण्याचे ठरविले गेले. लोकसभेत भाजप ३२ व सेना १६ व विधानसभेत याच्या बरोबर उलटे जागावाटप असे ठरविले गेले. या युतीचे प्रमुख शिल्पकार होते बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन. विधानसभेसाठी भाजप १०५ व सेना १८३ असे विषम जागावाटप भाजपने का मान्य केले हे अनाकलनीय आहे. युतीत पहिल्यापासूनच शिवसेना दादागिरीच्या भूमिकेत होती. आपल्यापेक्षा सेनेचा जनाधार कमी आहे हे स्पष्ट असूनसुद्धा भाजपने दुय्यम भूमिका का स्वीकारली हे एक गूढच आहे. सेनेने फारशी शक्ती नसूनसुद्धा २८८ जागांमधील मोठा वाटा मिळविला व त्याचबरोबरीने भाजपने जोपासलेले व बांधलेले काही मतदारसंघ घशात घातले. १९८० व १९८५ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या अण्णा जोशी यांनी निसटता विजय मिळविला होता. भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ सेनेने घशात घातला. १९९० ते २००९ या काळात सलग ५ निवडणुकीत या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार विजयी झाला. मते होती भाजपची पण उमेदवार शिवसेनेचा. हा मतदारसंघ आपलाच आहे हा आधी शिवसेनेचा दावा होता आणि नंतर आपल्या उमेदवाराला मिळालेली मते ही आपलीच आहेत असा भ्रम शिवसेनेला झाला. मतदारांनी शिवसेनेचा भ्रम दूर केला तो २०१४ मध्ये. यावेळी दोघेही एकमेकांविरूद्ध लढले व त्या लढतील भाजपच्या मेधा कुलकर्णींनी आपल्या सेना प्रतिस्पर्ध्यावर तब्बल ६५००० मतांच्या फरकाने विजय मिळविला.
सेनेने जसा शिवाजीनगर ढापला तसाच ठाणे व कल्याणही ढापला. शिवसेनेची ही ढापाढापी २००९ पर्यंत सुरु होती. २००९ मध्ये गुहागरमधून १९८० पासून सातत्याने निवडून येणार्या डॉ. नातू पितापुत्रांना डावलून सेनेने हा मतदारसंघ आपल्या घशात घातला. भाजप नेते, आधी महाजन, नंतर मुंडे व गडकरी असहायपणे सेनेसमोर मान तुकवित होते.
यात बदल झाला तो एकदम २०१४ मध्ये. २०१३ मध्ये मोदी-शहा जोडगोळीच्या हातात भाजपची सूत्रे गेल्यावर त्यांनी सेनेची दादागिरी मोडून काढण्याचे ठरविले. समान जागावाटप होत असेल तरच युती नाहीतर स्वबळावर लढण्याची ताठर भूमिका घेऊन सेनेसमोर नमते घेण्यास त्यांनी नकार दिला. महाराष्ट्रात आपणच भारी हा भ्रम तोपर्यंत सेनेच्या मनात ठाम रूजला होता. त्यामुळे सेनेनेही नमते घेण्यास नकार देऊन स्वबळावर निवडणुक लढविली. शेवटी भाजपने १२२ जागा जिंकताना सेनेला फक्त ६३ जागाच जिंकता आल्या व महाराष्ट्रात कोण भारी यावर शिक्कामोर्तब झाले. तसेही यापूर्वीच्या सर्व निवडणुकात भाजपचा स्ट्राईक रेट हा कायमच सेनेपेक्षा जास्त होता. १९९० मध्ये भाजप १०५ पैकी ४२ तर सेना १८३ पैकी ५२, १९९५ मध्ये भाजप ६५ तर सेना ७३, १९९९ मध्ये भाजप ५६ सेना ६९, २००४ मध्ये भाजप ५४ सेना ६२ अशी परिस्थिती होती. भाजपपेक्षा किमान ५० जागा जास्त लढवूनसुद्धा सेनेला भाजपपेक्षा जेमतेम ८-१० जास्त मिळायच्या. २००९ मध्ये तर भाजपने ११९ जागा लढवून ४६ जागा जिंकल्या तर सेनेने तब्बल १६९ जागा लढवून फक्त ४४ जागाच जिंकल्या. चित्र अगदी स्पष्ट होते. परंतु स्वत:च्या ताकदीच्या भ्रमात गर्क असणार्या सेनेची वस्तुस्थिती मान्य करण्याची तयारी नव्हती.
२००९ मधील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी ६ जागा मनसेने, ५ सेनेने व ४ भाजपने जिंकल्या होत्या (भाजपने अर्थातच सेनेपेक्षा खूप कमी जागा लढविल्या होत्या). सेनेचे मुख्यालय 'मातोश्री' ज्या मतदारसंघात आहे, त्या मतदारसंघात सुद्धा सेनेचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजप व सेना या दोघांनीही स्वतंत्र लढून अनुक्रमे १५ व १४ जागा जिंकल्या. भाजप सेनेपेक्षा मुंबईत सुद्धा जास्त ताकदवान आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
अशा परिस्थितीत २०१७ च्या महापालिका निवडणुकीत युती करायची असेल तर आम्ही ११४ जागा व सेना ११३ जागा ही भाजपची मागणी योग्यच होती. परंतु याहीवेळी सेनेने अहंकार व वस्तुस्थिती मान्य न करण्याचा हेकेखोरपणा यामुळे हे वाटप मान्य केले नाही आणि आता शौर्याचा आव आणून युती स्वतःहून तोडण्याची घोषणा केली आहे.
भाजपने सेनेबरोबर युती अजिबात करू नये किंवा केल्यास स्वतःच्या अटींवर करावी असे माझे पूर्वीपासूनच मत होते. त्यामुळे सेनेने स्वतःहून युती तोडल्यामुळे मला आनंद झाला आहे.
माझ्या मते फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार्या ११ महापालिकांच्या निवडणुकीत खालील चित्र असेल.
१) मुंबई: भाजप ८०-९०, शिवसेना ४०-५०, काँग्रेस ५०-६०
२) ठाणे: मला ठाण्यातील फारशी माहिती नाही. परंतु इथे राष्ट्रवादीसुद्धा प्रबळ आहे. माझ्या मते ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल. भाजप व सेनेला किती जागा मिळतील हे सांगता येणे अवघड आहे.
३) पुणे: भाजप ६०-७० जागा मिळवून सर्वाधिक मोठा पक्ष असेल. त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस व तिसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल.
४) नाशिकः भाजप प्रथम क्रमांकावर व शिवसेना द्वितीय क्रमांकावर असेल.
५) पिंपरी-चिंचवडः राष्ट्रवादी काँगेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल.
६) नागपूरः भाजपला बहुमत मिळेल.
७) अकोला: बहुजन महासंघ, काँग्रेस व भाजप या तीन पक्षात जोरदार चुरस असेल.
८) अमरावती: अमरावतीबद्दल फारशी माहिती नाही.
९) सोलापूरः काँग्रेस प्रथम क्रमांकावर व भाजप दुसर्या क्रमांकावर असेल.
१०) उल्हासनगर: इथे कलानी घराण्याची मोनोपॉली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर असेल.
११) भिवंडी: फारशी माहिती नाही.
भाजप महापालिका पातळीवर अजूनपर्यंत तरी कच्चा खेळाडू आहे. महाराष्ट्रातील २१-२२ महापालिकांपैकी फक्त नागपूरमध्ये भाजप सत्तेवर आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस प्रत्येकी ४-५ महापालिकेत सत्तेवर आहेत. नाशिकमध्ये मनसे, वसई-पालघर मध्ये बहुजन विकास आघाडी, अकोल्यात बहुजन महासंघ, कोल्हापूरमध्ये स्थानिक आघाडी सत्तेवर आहेत. २०१७ मध्ये भाजप नागपूरव्यतिरिक्त पुणे, मुंबई व नाशिकमध्ये सत्तेवर येण्याची शक्यता आहे. शिवसेनेला मुंबई व ठाणे या दोन्ही महापालिकात सत्ता गमवावी लागेल. या दोन्ही महापालिका म्हणजे शिवसेनेचा प्राणवायू आहे व प्राणवायूचा पुरवठा बंद झाला की मृत्यु अटळ असतो. शेकाप, मनसे, मगोप अशा स्थानिक पक्षांप्रमाणेच शिवसेना देखील पूर्णपणे irrelevant होणार आहे. त्याची सुरूवात २०१४ मध्ये झाली, २०१७ मध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल व २०१९ मध्ये शिवसेना पूर्णपणे अस्तित्वहीन झालेली असेल. निदान २०१७ च्या निकालानंतर तरी शिवसेनेच्या फुशारक्या व बढाया थांबाव्यात अशी अपेक्षा आहे. शिवसेना लगेचच फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेईल असे वाटत नाही. परंतु तशी चूक केल्यास चांगले काम करणारे सरकार अस्थिर केल्याचा व मध्यावधी निवडणुकीचा दोष शिवसेनेच्या माथ्यावर येऊन त्यांना किंमत द्यावी लागेल.
💬 प्रतिसाद
(226)
व
वरुण मोहिते
Mon, 01/30/2017 - 11:58
नवीन
अटकेत असलेले नेते सुधाकर चव्हाण हि भाजप मध्ये .विशेष म्हणजे ४ नगरसेवकांना अटक झाली होती त्यातील राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला ह्यांना अजूनही राष्ट्रवादी ने बाजूला ठेवलय तर अपक्ष आणि मधेच मनसे मग अपक्ष असे असलेकल्या चव्हाणांना भाजप ने लगेच पक्षात घेतले . एकंदरीत भाजप चा खोटेपणा उघड सगळीकडेच होत आहे किती वर्ष अजून टिकणार कोण जाणे
राष्ट्रवादी विरुद्ध बोलायची तर ह्यांची बोलतीच बंद झालीये कायमची .
मुख्यमंत्री मूक संमती देत होते का सेनेच्या खंडणी ला जे काल मुख्यमंत्र्यांना कळलं . २५ वर्ष युतीत राहून भाजप ला कळलं आता कळलं .छान
भाजप धुतल्या तांदळासारखा आहे म्हणायचं तेवढेच भक्त खुश
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 01/30/2017 - 16:04
नवीन
सुधाकर चव्हाणांना भाजपमघ्ये घेतले या बातमीचा संदर्भ देता का?
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Mon, 01/30/2017 - 16:10
नवीन
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Mon, 01/30/2017 - 16:16
नवीन
चुकून लिंक आली नाही .फक्त 'सुधाकर चव्हाण ठाणे एबीपी माझा' इतकाच सर्च करा पहिलीच लिंक येईल गुगल वर .आणि निश्चित आहे हे तिकीट .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 01/30/2017 - 16:45
नवीन
जेव्हा त्याला अधिकृत प्रवेश दिला जाईल तेव्हा मी माझे मत लिहीन. तोपर्यंत 'असे सूत्रांकडून समजते', 'असे बोलले जात आहे' असे संदिग्ध लिहिलेल्या बातम्यांवर मी विश्वास ठेवत नसतो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 01/30/2017 - 17:15
नवीन
गोव्यात भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या (तो भ्रष्टाचार सिद्ध करण्यात स्वतः पर्रिकरांची मुख्य भूमिका होती म्हणे) मडकईकरांना सन्मानाने भाजपात घेतले आहे. त्याबद्दल सविस्तर विडियो टाकला होता, तेव्हा आपला काही प्रतिसाद तर आजवर आला नाही, तेव्हा वरच्या प्रतिसादात नमूद केलेल्या अॅटिट्युडवर कोणी विश्वास ठेवेल काय.. =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 01/31/2017 - 10:54
नवीन
कोठे टाकला होता हा व्हिडिओ?
तुम्ही आमच्या अॅटिट्युडवर विश्वास ठेवता का नाही याची आम्हाला फिकीर नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 02/01/2017 - 08:44
नवीन
काय गुरुजी... जणू तुम्हाला माहितीच नाही असं भासवताय.... ;-)
http://www.misalpav.com/comment/909964#comment-909964
घ्या लिन्क, तुमचाच धागा आणि आणि माझ्या विडियोवाल्या प्रतिसादाखाली पहिला प्रतिसाद तुमचाच आहे. स्वतःच्याच धाग्यावरचे प्रतिसाद आपण वाचत नाही का? तेही ताज्याघडामोडी सारख्या नावाच्या धाग्यावर तर प्रत्येक प्रतिसाद वाचायला हवा की नको?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/01/2017 - 10:30
नवीन
त्या चित्रफिती होय? मी त्या चित्रफिती बघितल्या. त्यातील पहिली इंग्लिश व कोकणीत आहे. उरलेल्या दोन्ही कोकणीत आहेत. मला कोकणी समजत नाही. त्यामुळे तो इश्यू नक्की काय आहे ते नीटसे समजलेले नाही.
त्या इश्यूबद्दल मराठी किंवा इंग्लिशमध्ये एखादी लिंक असेल तर पाठवा.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 02/01/2017 - 10:56
नवीन
काय गुरुजी.... पहिलाच विडियो संपूर्ण इश्यूबद्दल नीट स्पष्ट इंग्रजीत आहे. तुम्हाला इंग्रजी अजिबातच समजत नाही असं म्हणायचं आहे का?
याच विडियोत म्हटलंय हे प्रकरण इतकं स्पष्ट आहे की अगदी बालवाडीतल्या पोरालाही समजेल...
"पर्रिकरांनी स्वतःच ज्याचा भ्रष्टाचार सिद्ध केला त्याला स्वतःच सन्मानाने भाजपात घेतलं". इतका स्पष्ट आहे विषय. आता हे खोटं असेल तर तुम्हीच लिण्का शोधा आणि पाठवा....
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/01/2017 - 10:59
नवीन
पहिल्या चित्रफितीत इंग्लिश व कोकणी या दोन्ही भाषांमध्ये संभाषण आहे. उर्वरीत दोन्ही चित्रफिती फक्त कोकणीत आहेत. तिन्ही चित्रफिती एकत्रित समजणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 02/01/2017 - 11:09
नवीन
धडधडीत सत्य समोर असतांना आता ते आपल्या भूमिकेला सोयीचे नसल्याने समजत नसल्याची बालीश कारणे पुढे करत आहात गुरुजी....
सिलेक्टीव डंबनेस असा काही सायकॉलॉजीमध्ये/सायकॅट्रीमधे प्रकार असतो का?
अवांतरः ह्यावरुन सहज आठवले, काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक वेगळ्या प्रदेशात काही गुन्हा करतांना रंगेहात पकडले की 'आपल्याला तिथली भाषा समजत नाही' असा बनाव करतात, जेणेकरुन संशयाचा फायदा घेऊन सुटता यावे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/02/2017 - 09:56
नवीन
सिलेक्टिव्ह डंबनेस कसला आलाय? तीन चित्रफिती आहेत. त्यातल्या दोन मला न समजणार्या भाषेत आहेत. एकीत मला समजणारी भाषा आहे, त्याच बरोबरीने मला न समजणार्या भाषेत सुद्धा काही संभाषण आहे. आपल्याला पूर्णपणे न समजलेल्या घटनांवर प्रतिक्रिया देऊन ठाम निष्कर्ष काढणे मला जमत नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/02/2017 - 11:44
नवीन
सिलेक्टीव डम्बनेस? मडकईकर या इसमावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन ते सिद्धही करणारे पर्रिकर साहेब स्वतःच त्याला भाजपमधे घेते झाले, एवढेच नव्हे तर त्याने केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच नव्हे असेही मखलाशी करतायत, तरी बरे त्यांनी स्वतः इन्वेस्टीगेशन करुन तो उघडकीस आणला. ही घटना काही कोण्या वाहीनीचे स्टींग ऑपरेशन नव्हे एकाच विडियोवर अवलंबून राहायला, ढळढळीत घडलेली घटना आहे, महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधे आली आहे, खुद्द विडियोत आरोप करणारे आणि बाजूला घेऊन बसणारे पर्रिकर दिसत आहेत, पहिला विडियो ही पूर्ण न्यूज आहे, दुसरे दोन विडियो हे त्याच वरच्या बातमीतले स्वतंत्र विडियो आहेत. हे सर्व बहुतेक राहूल गांधीएवढ्या आयक्यू असलेल्या माणसालाही कळेल... :-)
भाषा समजत नाही, तीन चित्रफीत आहेत, कोकणी मला समजत नाही इत्यादी जी नाटके चालली आहेत ह्यालाच सिलेक्टीव डंबनेस म्हणतात.
तिकडे सुधाकर चव्हाणला भाजपने घेतले नाही त्यावर हिरिरीने युक्तिवाद करनारे श्रीगुरुजी इथे मात्र कानात बोट घालून 'मला ऐकुच येत नाही हो' अशी नाटके करत आहेत. एवढेच उघडे पाडायचे होते. ते व्यवस्थित झाले आहे. =)) =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/02/2017 - 19:33
नवीन
काय बळजबरी आहे. भाषा समजत नाही असं सांगितलं म्हणे नाटके चालली आहेत. जगातील प्रत्येक भाषा प्रत्येकालाच समजायला हवी का? कोकणी भाषा भारतातल्या प्रत्येकालाच समजते किंवा समजायलाच हवी अशी तुमची बळजबरी दिसते. तुम्हाला जगातल्या सर्व भाषा येताहेत असं दिसतंय. साहजिकच आहे. ज्यांचे ट्रकवाले रोख २० लाख रूपये घेऊन हिंडतात त्यांना जगातलं सर्व काही येत असतं. दुसर्याला न समजणार्या भाषेत काहीतरी टाकायचं आणि नंतर कांगावा करायचा की बघा हो, यांना हे समजत नसल्याचं नाटक करताहेत. मराठी, इंग्लिश किंवा हिंदीतली चित्रफीत असेल तर टाका, नाहीतर कोठे जायचं ते वेगळं सांगायला नको.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/03/2017 - 06:49
नवीन
कोणतीही बळजबरी करत नाहीए. दिलेला विडियो इंग्रजीत असून समजत नसल्याबद्दलची कारणे देत आहात हे खोटारडेपण नाही तर काय? तुम्हाला इंग्रजी समज्त नाही असे म्हणायचे आहे काय? मला जगातल्या सर्व भाषा येत नसल्या तरी जगातल्या सर्व बातम्या ज्या भाषेत मिळू शकतात ती भाषा कळते. आणि गोवा म्हणजे काय आफ्रिका खंडातले गाव नाही. तुम्ही पुरते उघडे पडलात गुरुजी... कितीही थयथयाट केला तरी तुमचा खोटेपणा लपणार नाहीए. भाजपने आपल्या पक्षात आपणच भ्रष्ट म्हणून सिद्ध केलेल्या माणसाला घेतले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. तुम्हाला कोकणी न समजण्याचा ह्या 'तथ्या'शी काही-एक संबंध नाही. पण तुम्हच्याकडे आता बचावासाठी काहीच नसल्याने मला भाषा समजत नाही, लिन्काच द्या ह्याची नाटके करत आहात. बाकी, मिसळपाववर कोकणी समजणारे अनेक आहेत, मी काही-एक खोटं सांगत असेल तर कोणीही स्पष्ट करावे.
वीस लाखाच्या ट्रकची तुम्ही कितीही उजळणी कराहो.... त्याने तुमच्या उघड्या पडलेल्या खोटेपणावर पांघरुण घालता यायचे नाहीच. वीसलाख आणी ट्रक हा माझा पर्सनल मुद्दा आहे पण भाजप भ्रष्ट लोकांना पक्षात घेते हा कुणाचा पर्सनल मुद्दा नाहीये तरी तुम्ही त्या खोटेपणाला इतकं निर्बुद्ध डिफेण्ड करत हास्यास्पद आणि केविलवाणे होत आहात एवढं कळलं तरी पुरे....
बातमी समजत नसल्याचे गुरुजी खोटं बोलत आहेत हे स्पष्ट झालेले आहे तरीसुद्धा चमचा-फीडिंगः madkaikar parrikar एवढं गुगल केलं तरी हव्या त्या भाषेत बातम्या मिळू शकतील हे बालबुद्धीच्या इसमालाही कळेल... =)) =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/03/2017 - 10:13
नवीन
परत तेच पालुपद. एक सोडून तीन तीन चित्रफिती टाकल्या. आणि म्हणताय की एकच पाहून रलेल्या न बघता प्रतिक्रिया द्या. हे म्हणजे कोणी 'ता' अक्षर उच्चारलं की तो शब्द पूर्ण न ऐकता 'ताकभात' हाच आहे हे मान्य केलंच पाहिजे अशी बळजबरी केल्यासारखं आहे. एखाद्याने म्हटलं तो शब्द पूर्ण ऐकू देत किंवा तो शब्द वेगळा असू शकतो, तर लगेच तुम्ही त्याच्यावर नाटकीपणाचे आणि खोटारडेपणाचे आरोप करून मोकळे होणार. थयथयाट करणे आणि खोटेपणा सातत्याने उघडकीला येणे हे तुमच्याच बाबतीत वारंवार घडतं. माझ्या नाही. मी जे लिहितो याचे पूर्ण संदर्भ देतो. उगाच २० लाख रूपये रोख खिशात घेऊन हिंडणार्या ट्रकचालकांचा सुरस कहाण्या सांगत नाही.
मिपावर कोकणी समजणारे अनेकजण असतील. त्यातील एकानेही प्रतिक्रिया दिलेली नाही यावरूनच काय ते समजा. अखिल मिपावरील जवळपास सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. यामागचे कारण उघडच आहे. २० लाखांच्या बाता मारणार्यांनी इतरांवर खोटेपणाचे दोषारोप करावेत हे अत्यंत हास्यास्पद आहे. बादवे, तो तुमचा पर्सनल मुद्दा राहिलेला नाही. ज्याक्षणी ती सुरस कहाणी तुम्ही सार्वजनिक केलीत त्याच क्षणी त्या बाता सार्वजनिक झाल्या आहेत.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/03/2017 - 10:29
नवीन
भाजप खोटारडा पक्ष आहे व त्याने भ्रष्ट लोकांना आत घेतले आहे हे मडकईकरांच्या बाबतीत गोव्यात घडले एवढे स्पष्ट आहे सगळे, तरी तुम्ही एका चित्रफितीवर अडून बसले आहात आणि तेच पालुपद उकळत आहात. बाकी तुम्हाला काय समजतं नाही समजत याच्या मला काही घेणे देणे नाही. मिपाकरांनी प्रतिक्रिया दिली नाही दिली ह्याचाही काही संबंध नाही. भाजप जो आहे तो आहे, पण तुमचे त्या पक्षाला अंधपणे डिफेन्ड करणे अधिकाधिक मनोरंजक होत चालले आहे...
'गुगल' केले का? का तेही आयतं करुन हवंय....? की तेही 'समजत' नाही तुम्हाला?
(सूचना: 'मेगाबायटीत वाचले नाही' अशी पळवाट काढू नये म्हणून फॉण्ट मोठा केलाय.. :-) )
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/03/2017 - 10:39
नवीन
"भाजप खोटारडा पक्ष आहे व त्याने भ्रष्ट लोकांना आत घेतले आहे" असं तुमचं मत असेल तर ठीक आहे ना. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमचे पुरावे म्हणून जे देता ते लोकांना नीट समजत नसतील व म्हणून ते प्रतिक्रिया देत नसतील तर लगेच त्यांना "नाटकी", "खोटारडे", "निर्बुद्ध" अशी शेलकी विशेषणे लावून त्यांचा उद्धार करण्याची गरजच काय?
हे मडकईकरांच्या बाबतीत गोव्यात घडले एवढे स्पष्ट आहे सगळे, तरी तुम्ही एका चित्रफितीवर अडून बसले आहात आणि तेच पालुपद उकळत आहात. बाकी तुम्हाला काय समजतं नाही समजत याच्या मला काही घेणे देणे नाही. मिपाकरांनी प्रतिक्रिया दिली नाही दिली ह्याचाही काही संबंध नाही. भाजप जो आहे तो आहे, पण तुमचे त्या पक्षाला अंधपणे डिफेन्ड करणे अधिकाधिक मनोरंजक होत चालले आहे...
कमाल आहे. मला काय समजतं किंवा समजत नाही याच्याशी तुम्हाला देणंंघेणं नाही. तुमचे जे मत आहे ते इतरांनी आंधळेपणाने मान्य करावे नाही तर ते "नाटकी", "खोटारडे", "निर्बुद्ध" असे बरेच काही असतात हा तुमचा अॅप्रोच दिसतो.
आता तुम्ही चित्रफिती देण्याचे महान कार्य करता (वेगळ्या भाषेतल्या असल्या तरी), भाजपची यादी मेंटेन करता आणि एवढं सगळं करत आहात तर गुगलूनही द्या की. भीति अशी वाटतेय की देताना तामिळ, अर्धमागधी, पाली, तुळू, स्वाहिली असल्या भाषेतल्या लिंका द्याल आणि नंतर ठणाणा कराल की इतक्या लिंक देऊनसुद्धा समजत कसं नाही.
(सूचना: 'मेगाबायटीत वाचले नाही' अशी पळवाट काढू नये म्हणून फॉण्ट मोठा केलाय.. :-) )
मेगाबायटी प्रतिसाद देण्याची संधी घालविल्याबद्दल क्षमस्व.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 02/03/2017 - 11:01
नवीन
डांगेंजी, "भाजप खोटारडा पक्ष आहे व त्याने भ्रष्ट लोकांना आत घेतले आहे" यातील "त्याने भ्रष्ट लोकांना आत घेतले आहे" हे वाक्य आणि त्याचा अर्थ स्पष्ट आहे. शिवाय त्या वाक्याला पुष्टी देणारी उदाहरणेही डोळ्यासमोर आहेत. पण "भाजप खोटारडा पक्ष आहे" या वाक्याने तुम्हाला काय सूचित करायचे आहे? खोटारडे असणे आणि दुटप्पी असणे यात फरक नाहीये का? भाजपला सरसकट खोटारडा म्हणण्यामागचं तुमचं विश्लेषण सांगाल का?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/03/2017 - 11:27
नवीन
आधी भाजप किंवा कोणताही एक पक्ष म्हणजे काय हे स्पष्ट असू द्या.... नाहीतर परत अमूक कृत्य हे पक्षचे धोरण नव्हे, ते सदस्यांनी चूकून केले, पक्षनेतृत्वाला माहितीच नव्हते असली कातडीबचावू वाक्ये येतात...
खोटारडा की दुटप्पी असे शब्दांचे खेळ केल्याने नक्की साध्य काय होणार आहे? शब्द बदलल्यास घटना बदलतात?
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 02/03/2017 - 12:21
नवीन
डांगेंजी, ते शब्दांचे खेळ बिळ राहूद्या हो! तुम्ही इतक्या ठळक अक्षरात एक विधान केलं आहे आणि मी फक्त तुम्हाला तुमचे त्यामागचे विश्लेषण विचारत आहे. भाजप हा स्वतःला एकीकडे भ्रष्टाचारविरोधी म्हणवतो आणि मग भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या लोकांना पक्षात घेतो असे आपल्याला म्हणायचे असेल तर याला दुटप्पीपणाने वागणे असे म्हणतात. तुम्ही त्याऐवजी खटारडेपणा म्हणत आहेत आणि तेही सरसकटीकरण करून.
बाकी ते कातडीबचाऊ वगैरे वाक्ये जिथे येतील तिथे खोडून काढा, आधीच व्हिक्टीम कार्ड कशाला खेळायला हवे?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/04/2017 - 13:30
नवीन
ठिक आहे ना, दुटप्पीपणा म्हणा की खॉटारडेपणा, कि फर्क पैंदाये? जो गलत वो गलत... शब्दांचा खेळ तर तुम्हीच सुरु केलाय की.. दुटप्पी कि खोटारडे वगैरे वगैरे!
बाकी 'मला' काही 'म्हणायचे' नाही हो, जे 'घडले' ते 'मांडत' आहे, फार बेमालूमपणे नसलेले शब्द समोरच्याच्या वक्तव्यात घुसडणे आपली सवय आहे हे निरिक्षण नोंदवतो.
आधीच विक्टिम कार्ड?? बाकी विक्टीम कार्ड हा आपला आवडीचा शब्द झालेला दिसतोय..! असो. माझा रोख http://www.misalpav.com/comment/916789#comment-916789 ह्या प्रतिसादाकडे होता, आणि तो प्रतिसाद आल्यावरच मी वरची वाक्ये लिहिली आहेत, तेव्हा "आधीच विक्टिम कार्ड" वगैरे सर्व शब्दसमुच्चय बाद होत आहे.
बाकी, मूळ मुद्दा, भाजपने भ्रष्ट लोक पक्षात घेणे हाच व केवळ हाच आहे. त्यावरच राहिलेले बरे. =))
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 02/04/2017 - 14:20
नवीन
शब्दांचे इमले बांधणार्यांना वरील दोन शब्दातील फरक कळत नाही हे पाहून कौतुक वाटले, असो. दुसऱ्यांच्या वाक्यातून स्वतःला हवा असलेला अर्थ काढण्याचे तुमचे कौशल्य काही लपून राहिलेले नाही, त्यामुळे माझी सवय वगैरे राहुद्या(खेदाने). वैयक्तिक होणे हे आपले आवडते शस्त्र असावे असे दिसते, त्यामुळे असोच!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/01/2017 - 06:03
नवीन
खालील बातमी वाचावी.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017-news/bjp-close-doors-to-gangster-in-thane-1395906/
खोडसाळ अफवा, मुद्दाम पेरलेल्या संदिग्ध बातम्या यांवर मी का विश्वास ठेवत नव्हतो ते आता लक्षात आलं असेल.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 02/01/2017 - 07:04
नवीन
ह्या बातमीत असे म्हटले आहे की , प्रवेशासाठी नेते प्रयत्नशील होते पण कार्यकर्त्यानी विरोध केला म्हणून तसे घडले नाही. म्हणजे आधीच्या बातमीत थोडेफार तथ्य होते.
दुसरे असे की, नेत्यांनी आदर्श ठेउन मार्गदर्शन करावे की कार्यकर्त्यांनी ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/01/2017 - 10:24
नवीन
प्रवेशासाठी ते प्रयत्नशील असू शकतील. पण म्हणून लगेच भाजपने त्यांना घेतले, भाजप गुंडांना घेतो इ. निष्कर्ष काढणे योग्य नाही. २०१४ मध्ये पवारांनी भाजपने न मागता बिनशर्त पाठिंबा स्वतःहून जाहीर केला होता. ते पाठिंबा द्यायला उत्सुक असू शकतील, पण याचा अर्थ भाजपने त्यांचा पाठिंबा घेतला असा होत नाही.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 02/01/2017 - 10:27
नवीन
नेते घ्या म्हणताहेत , कार्यकर्ते नको म्हणताहेत त्याचे काय ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/01/2017 - 10:32
नवीन
म्हणू देत की. शेवटी घेतले नाही हे महत्त्वाचे.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 02/01/2017 - 10:43
नवीन
नेत्यांच्या डोक्यात काय आहे हे समजते आणि ते घातक आहे.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 02/01/2017 - 11:19
नवीन
भाजपने तात्पुरत्या फायद्यासाठी ह्या गोष्टी करणे खूप घातक आहे असे मला वाटते. मुळात अशी चर्चासुद्धा माध्यमांपर्यंत पोहोचू नये इतके सरळ धोरण ठेवावे. वादातील लोकांना सक्रिय राजकारणात घेण्याचा विचार सोडून दिला नाही तर भाजपच्या प्रतिमेची मोठी हानी होईल असे वाटते. वरील उदाहरणात पक्षात घेतले नसले तरी पुण्यातील उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 02/01/2017 - 11:30
नवीन
हेच सांगण्याचा प्रयत्न आहे.
सध्या बहुतांश कं. मधे नवीन माणुस घेताना बीजीव्ही (back ground verification) केले जाते . इथे पक्षाच्या प्रतिमेचा प्रश्न असताना असे काहीही केले जात नाही हे आश्चर्यच आहे .
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Wed, 02/01/2017 - 07:12
नवीन
तसाही त्यांचा इतिहास अपक्ष राहून पाठिंबा देण्यातच आहे. त्यामुळे पालिकेत पाठिंबा भाजप लाच असणारे त्यांचा आणि २ नगरसेवकांचा जे त्यांच्या सोबत आहेत . आणि हे फक्त भाजप वर टीकेची झोड उठवली म्हणून एक बाहेरकरणी मुलामा दिलेला आहे .भाजप ला गुंडाना घेणार नाही हे जाहीर करावं लागले याचाच अर्थ भाजप घेत होत गुंडाना . सिम्पल लॉजिक .कारण बाकीच्या ३ आरोपीना वेगळ्या पक्षाने भाजूला ठेवलेले असताना भाजप ह्यांना घ्यायला धडपडत होती .त्यामुळे मानहानी नंतर घेतलेला निर्णय आहे . त्यालाच आता भाजप चा मोठेपणा म्हणायचं असेल तर ओक्के .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/01/2017 - 10:20
नवीन
तुमच्या मूळ प्रतिसादात खालील ठाम निष्कर्ष होते व ते एबीपी माझा ने दिलेल्या "असे बोलले जात आहे", "असे सूत्रांकडून समजते" अशा पद्धतीने दिलेल्या संदिग्ध वाक्यांवर आधारीत होते.
"अटकेत असलेले नेते सुधाकर चव्हाण हि भाजप मध्ये ."
"अपक्ष आणि मधेच मनसे मग अपक्ष असे असलेकल्या चव्हाणांना भाजप ने लगेच पक्षात घेतले ."
मुळात चव्हाणला भाजपमध्ये घेतलेच नव्हते. परंतु त्याला भाजपमध्ये घेतले आहे या गैरसमजूतीवरच तुमचा प्रतिसाद होता.
आता त्यांना भाजपने घेतलेले नाही हे मी दिलेल्या बातमीवरून दिसत असताना, तुमच्या नवीन प्रतिसादात "पालिकेत पाठिंबा भाजप लाच असणारे त्यांचा आणि २ नगरसेवकांचा", "आणि हे फक्त भाजप वर टीकेची झोड उठवली म्हणून एक बाहेरकरणी मुलामा दिलेला आहे .", ""बाकीच्या ३ आरोपीना वेगळ्या पक्षाने भाजूला ठेवलेले असताना भाजप ह्यांना घ्यायला धडपडत होती .त्यामुळे मानहानी नंतर घेतलेला निर्णय आहे ." अशी स्पेक्युलेटिव्ह वाक्ये आहेत. मुळात अजून निवडणुक झालेलीच नाही. निवडणुकीत चव्हाण व त्याचे साथीदार उभे राहणार का नाही हे अजून माहिती नाही. समजा ते उभे राहिले तर ते निवडून येणार का नाही हे अजून माहिती नाही. आणि समजा ते निवडून आले तर ते भाजपला पाठिंबा देतील का अजून कोणाला हे देखील अजून माहिती नाही.
सर्वच गोष्टी अजून अनिश्चित असताना स्पेक्युलेशन कशासाठी? भाजप यांना घ्यायला धडपडत होता या आरोपाचा काही संदर्भ आहे का?
भाजप ला गुंडाना घेणार नाही हे जाहीर करावं लागले याचाच अर्थ भाजप घेत होत गुंडाना . सिम्पल लॉजिक .कारण त्यालाच आता भाजप चा मोठेपणा म्हणायचं असेल तर ओक्के .
आम्ही गुंडांना घेणार नाही याचा अर्थ भाजप गुंडांना घेत होते असा कसा निघतो बुवा?
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Wed, 02/01/2017 - 12:22
नवीन
का आधीपासून रोज भाजप म्हणत होती गुंडाना घेणार नाही असं .अंगाशी आलं म्हणून सांगावं लागलं . घ्या कि सगळ्याच पक्षात असतात पण आम्हीच पारदर्शक ,विकास करणारे, हि भूमिका सोडून द्या . सगळ्या पक्षांसारखा एक पक्ष आहे तो .
आमची गैरसमजूत झाली नाहीये भाजप ला डोळे मिटून दूध पिता येईल असं वाटलं पण जगजाहीर झाल्यावर भूमिका बदलावी लागली.
स्पेक्युलेशन आपण पण करता कि धागे काढून .
भाजप धडपडत होती याचा संदर्भ तुमच्याच लिंक मध्ये आहे आतले अनेक संदर्भ आहेत ठाण्यातच आहेत ते त्यामुळे माहित आहे आता सगळंच कसं सांगू?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/02/2017 - 10:02
नवीन
भाजप धडपडत नसून पक्षातील काही जण तसे करण्याच्या प्रयत्नात होते. ते मोजके स्थानिक नेते म्हणजे पक्ष नव्हे. पक्ष पातळीवर योग्य तो निर्णय घेतलेला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांनी ट्रंपसारखीच भारतानेही मुस्लिम निर्वासितांवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. अजून एकाने असे जाहीररित्या सांगितले होते की हिंदूंनी किमान ४ मुले जन्माला घालावीत. असली वक्तव्ये ही पक्षाची अधिकृत भूमिका नसते व भाजपने या वकत्व्यांना पाठिंबाही दिलेला नाही. इथे सुधाकर चव्हाणला भाजपत आणण्यासाठी काही स्थानिक मंडळी प्रयत्न करीत होती. परंतुने भाजपने त्याला पक्षात घेतलेले नाही. इथेच तो विषय संपला.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 02/02/2017 - 10:59
नवीन
मग पक्ष नेत्रूत्वाने ह्या स्थानिक मंडळीना समज का नाही दिली ? पाठींबा दीला नाही म्हणजे विरोध केला असे होते का ?
का "..... with difference" हे आपले उगीच की ह्यात काही तथ्य आहे ?
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/02/2017 - 11:08
नवीन
हे काही समजले नाही. भाजप हा एक राजकीय पक्ष आहे या पार्श्वभूमीवर नेमकी कशी समज अपेक्षित आहे (म्हणजे जाहीर समज असे आपल्याला अपेक्षित आहे का)?
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 02/02/2017 - 12:02
नवीन
इतरत्र आणि वारंवार घडु नये यासाठी काय उपाय ?
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/02/2017 - 12:49
नवीन
उपाय एकाच असू शकतो, पक्षाचे सरळसोट धोरण! पार्टी विथ डिफरंस यात कोणकोणते डिफरंस येतात याबतीत स्पष्ट धोरण! राजकीय पक्ष असल्यामुळे या ना त्या कारणाने अपरिहार्यता येते तेव्हा तोंडावर पडावे लागू नये असे धोरण!बाकी भाजपला धुतल्या तांदळासारखा समजला जाऊ नये आणि भाजपनेही असले घोंगडे पांघरणे बंद करावे असे माझे वैयक्तिक मत आहे.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 02/03/2017 - 06:07
नवीन
बरोबर. हेच म्हणणे आहे.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017-news/mns-comment-on-bjp-3-1397583/
http://www.loksatta.com/bmc-elections-2017-news/shiv-sena-vs-bjp-in-bmc-election-2017-1397630
http://epaper.loksatta.com/1092215/indian-express/03-02-2017#page/3/2
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/02/2017 - 19:35
नवीन
समज काय तुम्हाला सांगून तुमच्या उपस्थितीत द्यायला हवी होती का?
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 02/03/2017 - 11:24
नवीन
"राजधर्माचे पालन करा" हे सर्व खाजगी होते का ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/04/2017 - 09:55
नवीन
आता युती तुटल्याच्या चर्चेत हे कुठून आलं?
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Mon, 02/06/2017 - 07:03
नवीन
ते तुमच्या आधीच्य प्रश्नाला उत्तर होते .
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/02/2017 - 11:52
नवीन
आणि भाजपात घेतले असते तर बातम्यांची भाषा समजण्याचे बंद झाला असते... =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/02/2017 - 19:37
नवीन
घेतलेच नसल्यामुळे विषय संपलेला आहे. तुमच्या दुर्दैवाने भाजपला शिव्या घालण्याची संधी गेलेली आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/03/2017 - 04:36
नवीन
हा हा हा, भाजपने गुंड व भ्रष्ट लोकांना घेतल्याची यादी देऊ का? मग तुम्हला कोठे जावे लागेल ते सांगायची गरज उरणार नाही.....
:-) =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/03/2017 - 10:02
नवीन
द्या की, कोणी अडवलंय? तुम्ही असल्या याद्या मेंटेन करता हे सर्वांनाच माहिती आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/03/2017 - 10:09
नवीन
हा हा हा.... =)) =)) याद्या कोण मेन्टेन करतं हे माहितीच आहे की सर्वांना.
भाजप सोडून सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांच्या सर्व कुलंगड्या मिपावर मांडतांना कोणाच्या अभ्यासाला आणि भाषेला कसा ऊत येतो तेही सर्वांना माहित आहेच.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »