Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुशिक्षितांमधे आजही असे विचार जीवंत आहेत?

स
संदीप डांगे
Wed, 02/01/2017 - 10:58
🗣 179 प्रतिसाद
arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्‍या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते. ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते. . http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211 ----------------------------------------------- वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय? संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.

प्रतिक्रिया द्या
30566 वाचन

💬 प्रतिसाद (179)
च
चिनार Wed, 02/01/2017 - 11:04 नवीन
संदीपभाऊ...त्याच्यातही आधी चित्पावन,मग देशस्थ,यजुर्वेदी,ऋग्वेदी अशी उतरती क्रमवारी केली नाही हे नशीब समजा की राव!!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 02/01/2017 - 11:12 नवीन
हायला!! खरंच की....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Wed, 02/01/2017 - 11:23 नवीन
तुम्हाला मुळी कश्या कश्याच म्हणून कौतुक नाही... आले लगे त्रिशतकी धागा घेऊन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 12:46 नवीन
कौतुकबुद्धी असलेला एक पुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 12:45 नवीन
चला, आता ती उणिव भरून काढतो. माझ्यामते कोकणस्थ (चित्पावन? सारस्वत? लै घोळै राव) ब्राह्मण हे त्यातल्या त्यात सर्वात प्रखर राष्ट्रवादी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 02/02/2017 - 06:28 नवीन
माझ्या मते कोकणास्थांमध्ये अरुण जोशी हेच तकोकणास्थांमध्येप्रखर राष्ट्रवादी असतात. बाकी सगळे पानी कम आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
न
नितिन थत्ते Wed, 02/01/2017 - 11:26 नवीन
पंचाइत अशी आहे की आर्यांचे मूळ स्थान कुठेतरी आर्क्टिक भागात होते असं लोकमान्य म्हणाले. एकतर "प्रत्यक्ष लोकमान्य चुकले" असं म्हणायला हवं नाहीतर इथे राहणारे -म्हणजे आपण सगळे- आर्य नाहीत असं म्हणायला हवं. :)
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 12:51 नवीन
सायबेरियामधल्या गुफांमधे जे फॉसिल्स मिळाले आहेत त्यामुळे "इथिओपियामूलम अन्यत्रशाखम" असा मानववंशशास्त्राचा वृक्ष उन्मळून पडला आहे. तेव्हा खोट्यारड्यांची लिस्ट बनवण्यासाठी थोडा दम धरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विशुमित Wed, 02/01/2017 - 11:56 नवीन
<<<<ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.>>> -- विशेष म्हणजे ह्या प्रतिक्रियेला जातीने ब्राह्मण असणाऱ्या मिपाकरानी (बऱ्याच लोकांनी तसा उल्लेख केला आहे की मी जातीने ब्राह्मण आहे) बिलकुल आक्षेप घेतला नाही की तुटून पडले नाहीत. गडकरी पुतळा प्रकरणी सगळेच हताश होऊन व्हिक्टिम कार्ड खेळत होते. कालच्या मराठा चक्का जामचा अजून कोणी धागा काढला नाही हे नशीब. जो पर्यंत असा सुलेमानी किडा वळवळत राहणार कथित सुशिक्षित लोकांना ब्रिगेडिंना हिणवायचा नैतिक अधिकार राहणार नाही. असो...
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 02/01/2017 - 12:22 नवीन
तिथे वाक्यरचना गंडली आहे. पूर्ण चर्चा वाचलीत तर लक्षात येईल की नंतरची दोन वाक्ये द्रविड किंवा अन्य कुणासाठीतरी आहेत. मग कुणी कशाला तुटून पडेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
फ
फेदरवेट साहेब Wed, 02/01/2017 - 12:28 नवीन
घ्या समजून, एरवी जोशींच्या वक्तव्यात 'म रा ठा' असा शब्दही दिसून आलेला नसताना मधेच चक्काजामचे शेपूट जोडले की डांगेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बार काढताच येतो, कसं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
व
विशुमित Wed, 02/01/2017 - 12:53 नवीन
कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे विधान मी केले नाही. मराठा मूक मोर्चा निमित्ताने भरभरून मराठा जातीचा माज उद्घृत करताना मजा घेणारे ह्या वेळेस पुढे नाही आले याचे आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
व
विशुमित Wed, 02/01/2017 - 12:56 नवीन
मी पूर्ण चर्चा तेव्हाच वाचली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 08:29 नवीन
मेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 13:52 नवीन
होय, संपूर्ण संदर्भाशिवाय हा धागा वाचणे चूक आहे. ========= संदिप साहेबांच्या प्रश्नात वा धाग्यात कोणतीही "तांत्रिक" चूक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 02/01/2017 - 13:27 नवीन
"ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते." या जोशींच्या वाक्याशी पूर्ण सहमत नाही. खासकरून "सर्वात" या शब्दाशी. पण, इथे ब्राह्मण असणाऱ्या मिपाकरांनी ती प्रतिक्रिया वाचलीच होती हे तुमचे गृहीतक कशासाठी? शिवाय तुटून पडण्याचा काय संबंध? गडकरी पुतळा प्रकरण आणि ब्राम्हण याचा संबंध काय? त्या प्रकरणाला विरोध करणारे सगळेच जण ब्राम्हण होते असे आपल्याला म्हणायचे आहे का? बाकी ते वरील वाक्य संदर्भविरहित दाखवून सोयीस्कर अर्थ काढला गेला आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 13:56 नवीन
मंजे मला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, लिबरल थॉट्स, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, इ इ विषयांच्या बर्‍याच अस्पेक्टांबाबत फार कंफ्यूजने आहेत, पण तो सर्वात शब्द सर्वमान्य असावा असे मला अभिप्रेत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 13:42 नवीन
जातीने ब्राह्मण असणाऱ्या मिपाकरानी (बऱ्याच लोकांनी तसा उल्लेख केला आहे की मी जातीने ब्राह्मण आहे) बिलकुल आक्षेप घेतला नाही की तुटून पडले नाहीत.
संदीप डांगे जातीने ब्राह्मण नाहीत सुस्पष्ट अर्थ या विधानावरून निघतो. माझ्यामते त्यांनी लै जबर्‍या आक्षेप घेतला आहे आणि तुटून पडले आहेत. =============== का हो, यावर ब्राह्मण आणि अब्राह्मण लोकांची रिअ‍ॅक्शन वेगवगळी राहावी (किमान हिरीरी वेगळी राहावी) असे तुम्हाला अभिप्रेत आहे. म्हणजे लोकांना जातीची जातीने जाण आहे. ============= मला अस्सं अजिबात लिहायची इच्छा नव्हती पण लिहितो. मराठी आंतरजालावर (वा कुठेही) असं लिहू नये वा लिहायला लागू नये. माझं राष्ट्रवादावर प्रेम पातळ आणि ब्राह्मणवादावर घट्ट असा अर्थ का काढला जातोय. "ब्राह्मण सर्वाधिक राष्ट्रवादी" या फ्रेजचा अर्थ निगेटिवच असायला पाहिजे का? "भारत सर्वात महान" हे देखिल असंच क्षुद्र विचार करणं आहे का? हे नेसेसरीली निगेटेवच असतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सूड Wed, 02/01/2017 - 13:57 नवीन
"ब्राह्मण सर्वाधिक राष्ट्रवादी" या फ्रेजचा अर्थ निगेटिवच असायला पाहिजे का?
पॉझिटिव्ह अर्थ समजावून सांगा बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 08:28 नवीन
"एवरेस्ट सगळ्यात उंच पर्वत शिखर" चा निगेटिव अर्थ सांगा तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 02/02/2017 - 06:25 नवीन
म्हणजे ब्रिगेड वर टीका केली म्हणून सतत अरुण जोशींच्या लिखाणावर लक्ष ठेवत बसायचे असे आहे का काही ? कैच्या कैच अपेक्षा आहे. अरुण जोशी काहीबाही बाता मारत असतात बर्याचदा. तो त्यांच्या अजेंड्याचा भाग असावा. पण ऐसीवर फुरोगामी मंडळींमध्ये त्यांची जी दहशत आहे त्याबद्दल आणि त्यामुळे मला त्यांचे कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 08:25 नवीन
पण ऐसीवर फुरोगामी मंडळींमध्ये त्यांची जी दहशत आहे त्याबद्दल आणि त्यामुळे मला त्यांचे कौतुक वाटते.
कृतकृत्य झालो. जीवन सार्थकी लागलं. इ इ भाव उमाळून आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
सूड Wed, 02/01/2017 - 12:11 नवीन
तुम्हाला ते लोक सुशिक्षित आहेत असं का वाटलं बुवा?
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 02/01/2017 - 12:28 नवीन
प्रश्न आहे . ते सुशिक्षित का वाटले याचे डांगे सरांनी पहिले उत्तर द्यावं :)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 13:59 नवीन
त्यांना असं वाटलं कारण डांगे सज्जन आहेत. त्यांना इतरांच्या अभिव्यक्तिचा सन्मान आहे. इतरांचे विचार सरळ आणि जमान्यास धरून असे सुयोग्य असायला हवेत अशी अपेक्षा/कळकळ (कैतरी) आहे. शिवाय त्यातली चूक दाखवायची खुमखुमी पण असेल. नैतर तुमच्यासारखं नाही. "सर्वात"-वर-आपण-भाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 02/01/2017 - 14:05 नवीन
अरे वा!! माझ्याबद्दल फारच लवकर निष्कर्षाप्रत पोचलात आपण. तस्मात आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो. आपण लवकर मोठे व्हाल हीच त्या आकाशातल्या बापाचरणी प्रार्थना. ॥ इति लेखनसीमा ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 16:42 नवीन
सुरुवातीला असं होतं. म्हणजे लोक अशिक्षित आहेत असा निष्कर्ष काढायची आपली घाई पाहून ते विधान केले गेले होते. ते असो. ========== तुम्हाला एखादा मुद्दा मांडायचा असेल तर जरूर मांडा, मी सन्मानपूर्वक उत्तर देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
फ
फेदरवेट साहेब Wed, 02/01/2017 - 12:25 नवीन
तुमचा बहुतेक 'सुशिक्षित' अन 'साक्षर' ह्या दोन संकल्पनांत गोंधळ उडालेला दिसतो आहे. मनुष्य साक्षर असू शकतो मग तो फक्त नाव लिहू शकणारा ते पीएचडी सगळे काही असू शकतो. तो फक्त कमी जास्त अक्षरओळख असलेला एक साक्षर प्राणी असतो. 'सुशिक्षित' असणे हा एक चॉईस आहे म्हणजे पर्याय आहे, साक्षरतेला सुशिक्षिततेपर्यंत नेता न येणे ही खरी भारतीय शिक्षणपद्धतीची शोकांतिका आहे. अजून बोलण्यासारखे काही नाही. जोशींना त्यांच्या अडनावावरून जोखण्याइतके हलके माझे संस्कार नाहीत, तरीही एक सेकंदभर मी जोशींचे वक्तव्य ग्राह्य धरतो की 'ब्राह्मण सर्वाधिक देशप्रेमी जमात होती'. मी अर्ध्या वक्तव्यावर परिस्थितीक सहमती दर्शवतोय. ब्राह्मण देशप्रेमी 'होतेच' कारण एकंदरीत आधीपासून राज्यसत्ता अबाधित राहणे किंवा राजाश्रय असणे ह्यावरच ब्राह्मणांचे अस्तित्व अन उपजीविका आधारित होती. आता राजाश्रय असायला राज्य सुस्थापित हवे. त्यामुळे राज्यनिष्ठा ह्या गुणाला थारा देणे सोडून ब्राह्मणांकडे पर्याय नव्हता. हे झाले प्राचीन. आधुनिक काळात फिरंगी जेव्हा भारतात आले तेव्हा सर्वप्रथम पाश्चात्य शिक्षणपद्धती अंगिकारणारा आद्य समाज म्हणजे ब्राह्मण समाज त्यामुळे साहजिकच आधुनिक राज्यशास्त्रातल्या राष्ट्र (नेशन स्टेट) अन राष्ट्रवाद (नॅशनलिझम) ह्या संकल्पनांना जेव्हा ब्राह्मण समजून घेत होते किंवा त्यांना समजून घ्यायचा मौका मिळत होता तेव्हा बरीच जनता गावकुसाबाहेर राहायला भाग होती. आज जेव्हा शिक्षण खुले झाले आहे तेव्हा सगळे समसमान येत आहेत. अश्या काळात जर आधी ब्राह्मण देशभक्त होते म्हणले तर पटायला हरकत नाही (ते ही त्या काळी ब्राह्मणांना वाढीव संधी होत्या हे ध्यानात ठेवुन) पण जर आजही ब्राह्मणच सर्वात जास्त देशभक्त आहेत(च) असे कोणी म्हणत असले तर नारायणदत्त तिवारी नाव असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व कसली देशभक्ती दर्शवते? असा प्रश्न विचारवा वाटतो.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 14:35 नवीन
प्रथमतः इतक्या चांगल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी देखिल डिट्टो हेच विचार मांडलेत (अन्यायी व्यवस्था चालू ठेवणे म्हणजे राष्ट्रवाद अशी वेगळी फोडणी मी दिली आहे, पण म्हणायचं तेच आहे.)
अश्या काळात जर आधी ब्राह्मण देशभक्त होते म्हणले तर पटायला हरकत नाही (ते ही त्या काळी ब्राह्मणांना वाढीव संधी होत्या हे ध्यानात ठेवुन) पण जर आजही ब्राह्मणच सर्वात जास्त देशभक्त आहेत(च) असे कोणी म्हणत असले तर नारायणदत्त तिवारी नाव असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व कसली देशभक्ती दर्शवते? असा प्रश्न विचारवा वाटतो.
राष्ट्रवाद हा अंततः सामाजिक , आर्थिक, इ इ स्वार्थांतून प्रेरित होतो का? मंजे मागे ब्राह्मणांचे प्रभुत्व होते नि स्वार्थ होता म्हणून ते सर्वात राष्ट्रवादी? मग आज अब्राह्मणी जातींचा जो राष्ट्रवाद आहे तो देखिल स्वार्थप्रेरित आहे? मला वाटतं परिस्थीत काही फरक नाही. उलट हा देशच नाही (बल्कि आप पुरुषही नही हो टाईप), तो उगाच बनवला आहे, त्याच्यात कॉमन असं कुठे काही नाही, इंग्रजांनी तो बन्वला आहे, इ इ विचार भयंकर बळावला आहे. देशात ब्राह्मण ही एकच जात सर्वत्र (गुजरात ते मणिपूर, काश्मिर ते तामिळ नाडू) आहे. दुसरे आहेत ते मुस्लिम पण त्यांनी एकदा फाळणी केली आहे. आज ब्राह्मणद्वेष भारतात शिगेवर आहे. तरीही मी भारताचा द्वेष करणारे ब्राह्मण पाहिले नाहीत. असे लोक असण्याची कल्पना देखिल मला विचित्र वाटते. शिवाय ज्या ज्या अन्य जाती आहेत त्यांनी आपापले स्वार्थ थेट मांडले आहेत. आदिवास्यांचे म्हणाल तर भारतातले ४०० जिल्हे लाल होते. (आता ३०-४० झालेत, पण त्यांना भारतातून फूटून निघायचं होतं हे विसरायचं कसं?). दलितांचे म्हणायचे तर एका अत्यंत प्रभावी नेत्याने पाकिस्तानात जायचा प्रयोग झालाय. https://en.wikipedia.org/wiki/Jogendra_Nath_Mandal ईशान्येतले राज्ये तर आजही फक्त नकाशावर भारतात आहेत. काश्मिर आणि पंजाबचे प्रोब्लेम होतेच. द्रविडस्तानी लोक होतेच. मुस्लिमांचा पाकिस्तान झालाच. ब्राह्मणांच समाजातलं स्थान गेलं, पैसे गेले (मागे अन्यायी होते असं नै म्हणायचं मग), इज्जत गेली, लोक दूषणं द्यायला लागली, कशाचाही दोष त्यांच्यामाथी फोडू लागली, तरी या लोकांना भारताबद्दल आणि इथल्या सगळ्या लोकांबद्दल प्रेम असलेले "मला" दिसते. आदित्य कोर्डे चा लेख मी नीट वाचला असेल तर असेच वैतागून दुसर्‍या महायुद्धाआधी ज्यूंनी इस्त्रायल बन्वला होता. भारतात ब्राह्मणांना मार बसायची वा जिनोसाइड व्हायची शक्यता अगदी शून्यच आहे असं म्हणता येत नाही. पण मंडळी कूल आहेत. दलितांबद्दल जेव्हा जागॄती वाढली, तेव्हा त्यांनी अगोदर फक्त ब्राह्मणांवर टिका केली. पण एवढं काही झालं नाही. पण दलितांना आपल्यात पुरेशी ताकद आली आहे असे वाटून त्यांनी जेव्हा क्षत्रियांबद्दल बोलायला चालू केले तेव्हा देशाचा माहौलच गरम झाला आहे. अशा काही कारणांनी मी ब्राह्मणांना आजही सर्वात राष्ट्रवादी म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
व
विशुमित गुरुवार, 02/02/2017 - 05:51 नवीन
स्व जातीचं व्हिक्टिम कार्ड खेळून बघा आलेच का नाही दलित आणि क्षेत्रियांवर ? माझा हाच आक्षेप होता. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 07:42 नवीन
पक्षभार (फेदर्वेट) साहेबांना मी ब्राह्मण हे आज हायड्रोजन आणि नायट्रोजन अणूंपेक्षा राष्ट्रवादी आहेत हे सिद्ध करून पाहिजे होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 12:38 नवीन
आजही सुशिक्षितांत संदीप डांगे यांच्यासारखे लोक, विचार आहेत? मला देखिल कमाल वाटते. =============== आता मला कमाल का वाटते ते सांगतो. तुम्हाला मी ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे म्हणालो याचे नवल वाटले तर ते ठिक आहे. माझ्यासारखे असे मानणारे लोक (सुशिक्षित ब्राह्मण वैगेरे?) आहेत ही गोष्ट नवलाचीच आहे. ते मिसळपाववर सांगणे अजूनच नवलाचे आहे. तर तुमचे हे नवल मला मान्य आहे. या नवलात एक निगेटिवपणा आहे. तो मला १०% मान्य आहे, ९०% नाही. १०% यासाठी मान्य आहे कि राष्ट्रवादाची माझी जी आकलन पद्धती आहे ती चूक असू शकते. शिवाय अभ्यास कमी असू शकतो. ९०% यासाठी नाही कि मला यात अन्य जातींबद्दल काहीही म्हणायचं नाही. =============== आपल्या जातीचा उल्लेख करणे, तिच्या बद्दल काहीतरी चांगले वा वाईट वा सुधारात्मक बोलणे यावर कोणतेही घटनात्मक बंधन नाही. शिवाय लिबरल जमाने के नॉर्म्स के हिसाब से यात काही प्रोटोकॉलच्या विरुद्ध नाही. ==================== ब्राह्मणांचे "सर्वात" (वा कितीही) प्रखर राश्ट्रवादी (ते शरद पवार वाले नै) असणे, तथ्यहिन असेल तर मागे. उगाच व्यक्तिगत बायस ऐतिहासिक सत्यांच्या कुरगोडिला पाठवू नये. (पण लिबरल लोकांना एक प्रश्न आहे. मला असे मत ठेवायचा अधिकार आहे का नाही? शिक्षित असलो तरी? मी समजा असं लिहिलं की ब्राह्मणांनी दलितांवर फार अन्याय केले तर माझं शिक्षण काढलं जात नाही. अहो पण असं अन्याय करत राहाण्यासाठी लागणारी व्यवस्था एत्तद्देशियांच्या हाती ठेवणे (मंजे राष्ट्रवाद!) यासाठी देखिल प्रयत्न केलेच असतील ना त्यांनी असं लिहिलं तर माझं शिक्षण काढलं जातं! यार या तो घोडा बोलो नै तो चतुर बोलो, ये घोडा चतुर घोडा चतुर क्या है?) ========================= आता दुसरा भाग. "हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते." हा तिथल्या चर्चेचा मूळ विषय होता. हे कशाला बोल्ड केलेत? हे ऐतिहासिक सत्य आहे. पेरियार शुद्ध ब्राह्मणद्वेष्टा तर होताच होता "पण म्हणून" त्याला वेगळा द्रविडस्तान पाहिजे होता. https://en.wikipedia.org/wiki/Dravida_Nadu वाचा. (वाटल्यास इथल्या लिंका आणि उपलिंका चाळा.). त्याच्यात आपला महाराष्ट्रही होता थोडा थोडा. लॉजिक काय होतं त्याचं? आर्य , ब्राह्मण या अन्यायकारी लोकांपासून विमुक्त असा वेगळा देश हवा. मग द्क्षिन भारत्तीय ब्राह्मणांचं काय करायचं? आणि उत्तर भारतातले दलित गेले का वार्‍यावर उडत? भारतीय समाज तेव्हा आजच्यासारखा खरोखरीच विभागलेला नव्हता (ब्राह्मण -अब्राह्मण या लाइनवर), नैतर आज बेळगाव काश्मिर राहिला असता. =================
ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
का हो, ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे का नाही? ब्राह्मण भारतीय नाहीत का? भारतातल्या कोणत्याही समाजाचा द्वेष करणे भारताचा द्वेष करणे नाही का? डांगे साहेब सीन लक्षात घ्या. २०१७. भारतात अ ब क द इ फ ..... झ जातीचे लोक राहतात. पैकी य जातीच्या मूठभर लोकांनी उठून आम्हाला अ आणि ब ह्या जातीच नकोत म्हणून दुसरा देश द्या म्हणणे राष्ट्रद्रोह नाही का? ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणजे भारतद्वेष्टे नसणे कसे काय हे तुम्हीच मला सांगाल काय? ============ आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला. पण जाताना त्याचे नुकसान नै केले. म्हणून त्यांना धर्मद्रोही म्हणता येत नाही. पेरियार आणि कं बनिया होती. आंबेडकरांसारखा त्यांच्यावर प्रत्यक्ष अन्याय झालाच नाही. आपल्या जातबांधवांचे दु:ख पाहून आंबेडकर कधी दलितस्थान नै मागून राहिले (जसे त्यांचे स्पर्धक जोगेंद्रनाथ मोंडोल मागून राहिले.). म्हणून धर्मद्रोही वा देशद्रोही हे शब्द आंबेडकरांना लागू पडत नाहीत. (उलट त्यांना ब्रह्मसुधारक ही पदवी देता येईल.) पेरीयारचं काय? ब्राह्मणद्वेषजनित देशद्रोह ही वाक्यरचन्ना मी अशा कारणाने लिहिली आहे. ============== अजून शिक्षण घ्यायला मी ओपन आहे. ============ मी अभ्यासू नाही. "अरुण जोशी नावाचा कोणी राजकीय सामाजिक विचारवंत ऐकून आहे का? आय हॅव नथिंग टू लूज" असं मी लिहिलेल्या धाग्यावर तुम्हीपण होतात. ========== इतरांनी उगाच हवे तसे निष्कर्ष काढून तमाशा करू नये. पेरियार माणूस ड्यांजर होता. नशीबानं देश वाचला त्याच्यापासून. जिन्नापेक्षा मोठ्ठा जमिनीचा लचका तोंडात धरून होता.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 02/01/2017 - 12:53 नवीन
आणि खाली तिवारींचं नाव घेणं हा विरोधाभास नाही का?? राज्यशास्त्र शिकवल्यामुळे राष्ट्र संकल्पना कळते म्हणजे आधी राष्ट्र भावना नव्हती का? अशिक्षितांना अजूनही राष्ट्रभावना कळलीच नाही असे म्हणावे लागेल म्हणजे.किंवा फिरंगी येण्या आधी राष्ट्रभावना नव्हती किंवा स्वतंत्रलढ्यात काही कमी शिकलेले, अशिक्षित होते त्यांची राष्ट्रभावना कमी होती असे म्हणावे का??साहेब शिक्षणाने राष्ट्रभावना येत नसते . राज्यशास्त्रासोबत नागरिकशास्त्र हि शिकले असतील आधीच तर मग रूढी परंपरा जायला इतका वेळ का लागला बरे ? असाही प्रश्न उद्भवतो . गावकुसाबाहेर होते बाकीचे त्यामुळे विचारलं आपलं. राज्य सुस्थापित असायला सैन्य लागत होतं प्राचीन काळात .नुसती राजनिष्ठा नाही .कारण राजनिष्ठेने राज्य अबाधित राहत असत तर तर इतिहासच बदलला असता कि हो .असो प्राचीन काळात आधुनिक राज्यशास्त्र नव्हतं मग राज्य निष्ठा कशी आली ?आणि आधुनिक काळात जे पहिले शिकले त्यांच्यात राज्यनिष्ठ आली म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Wed, 02/01/2017 - 13:28 नवीन
'ब्राह्मण सर्वात प्रखर ....' मध्ये मला 'सर्वात' हा शब्द खटकला आहे, त्यावर जोशी काही बोलले नाहीत तिथेही अन आता इथेही. त्या सर्वात ह्या शब्दाचा फोलपणा दाखवायला मला ब्राह्मण जातीची असलेली अन प्रस्थापित नियमानुसार देशभक्त नसलेली एक व्यक्ती वानगीदाखल देणे क्रमप्राप्त होते, असे मी समजतो. माझे संस्कार अजूनही मी म्हणले तसेच आहेत. 'सर्वात' म्हणले की श्रेष्ठत्वाची फालतू भावना येते. जात्यांतर्गत उच्चनीच 'सर्वात - कमी/जास्त' ह्या मूर्खपणामुळेच एकंदरीत देशाचे किती नुकसान झाले आहे हे मी तुम्हाला सांगू नये, नाहीका? राज्यशास्त्र शिकवल्यामुळे राष्ट्र संकल्पना कळते म्हणजे आधी राष्ट्र भावना नव्हती का? पुन्हा तिसरंच समजला तुम्ही. मी राष्ट्रभावना नव्हती असे म्हणत नाहीये तर तेव्हा 'राष्ट्र' ह्या संकल्पनेचा अर्थच आपण आज ग्राह्य धरतो तसा नव्हता हे म्हणतोय त्याकाळी आधुनिक राष्ट्र ही पोस्ट रेनेसंस संकल्पना विकसित झाली नव्हती. ती कळायला आधुनिक राज्यशास्त्र शिकावे लागते म्हणजे नेशन स्टेट उर्फ 'राष्ट्र' ही आधुनिक व्याख्या स्पष्ट होते. बाकी इतर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लोकांनी ज्यांनी राष्ट्रकार्यात सहभाग नोंदवलाय त्यांच्याबद्दल आदरच आहे. प्रसंगोद्भव नेत्यांनी आधुनिक राष्ट्रवाद सोपा सुलभ करून जनतेला शिकवला होता. म्हणजे एकार्थाने जनतेला आधुनिक संकल्पनांना एक्सपोजर मिळालेच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
अ
अनुप ढेरे Wed, 02/01/2017 - 14:13 नवीन
सर्वात शब्द वापरला की इतर तेवढे नाहीत हे अध्यारूत होतं. जोशींचा प्रतिसाद पटला नाही. निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 15:08 नवीन
सोन्याची वाहकता सर्वात जास्त आहे म्हटले तर बाकी सगळी मूलद्रव्ये फेकून द्यायची असं होतं का? रँकिंगच करणं चूक आहे असं म्हणायचं आहे का? का? माझं रँकिंग चूक आहे तर बरोबर काय ते सांगा. मला तुमच्या मतांचा आदर असेल. ============== मोजमापातच काय चूक आहे? आणि मी असं म्हटल्यानं अहमहमिका चालू झाली, तर मी (खोटं का होईना) तोच माझा उद्देश होता असं सांगेन. राष्ट्रवाद को बढावा देना हर भारतीय का कर्तव्य है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 14:44 नवीन
'सर्वात' म्हणले की श्रेष्ठत्वाची फालतू भावना येते.
संवाद करणारांमधे भाव कसा आहे यावर हे अवलंबून आहे. एकतर अशा गोष्टींची मोजमापं करता येत नाही. ही व्यक्तिगत मत असतात, काहीशा माहितीवर आधारित. कधी खरी असतील खरी नसतील. पण माझ्या संवादात काहीतरी फालतू आहे का नाही हे सर्वस्वी आपले डीसीजन आहे. श्रेष्ठत्वात काय गैर आहे? समजा चुकून ब्राह्मण?सर्व अब्यासाअंती सर्वात राष्ट्रवादी निघाले तर माझ्या श्रेष्ठत्वाच्या भावनेत (मंजे तसे ब्राह्मण श्रेष्ठ मानण्याच्या भावनेत, मी श्रेष्ठ असण्याच्या नाही) चूक काय? ============ सरळ सांगा ना हे नै वाटत हे वाटतात म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
A
arunjoshi123 Fri, 02/03/2017 - 08:53 नवीन
मी राष्ट्रभावना नव्हती असे म्हणत नाहीये तर तेव्हा 'राष्ट्र' ह्या संकल्पनेचा अर्थच आपण आज ग्राह्य धरतो तसा नव्हता हे म्हणतोय त्याकाळी आधुनिक राष्ट्र ही पोस्ट रेनेसंस संकल्पना विकसित झाली नव्हती. ती कळायला आधुनिक राज्यशास्त्र शिकावे लागते म्हणजे नेशन स्टेट उर्फ 'राष्ट्र' ही आधुनिक व्याख्या स्पष्ट होते.
या धाग्यावर हे विधान मला सर्वात अगम्य वाटले. मोहिते म्हणतात त्याच्याशी मी १००% सहमत आहे. शिक्षण आणि "राष्ट्राची आधुनिक आयडिया" यांचा काही संबंध नाही राष्ट्रवादी असण्याशी. सामाजिक स्वार्थ, शिक्षण, राष्ट्र शब्दाची व्याख्या (जी मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी नसल्याने अद्यापि वाचलेली नाही), इ इ चा देशप्रेमाशी संबंध नाही. उलट स्वार्थ हिच ज्यांची प्रेरणा आहे ते लोक गद्दार निघण्याची जास्त संभावना आहे. ========= राज्यशास्त्रः अ‍ॅनि वे, असा व्याख्या शिकलेल्या लोकांच्या आणि न शिकलेल्या लोकांच्या देशप्रेमात काय फरक आहे ते उदाहरणाने, इ सांगाल काय? ========= शिक्षणः उद्या भारतावर संकट आले. एका सिक्षित माणसाने (ज्याला संकट इ इ खरेच डिटेल मधे कळते, किंवा संकट नसेल तर एखाद्या गोष्तीत देशाचे भले आहे हे कळते.) एका अशिक्षित माणसाला आवाहान केले. दोघांनी आपापल्या परीने सेवा केली तर केवळ ज्याला जास्त जाण आहे तो मोठा देशप्रेमी नसेल. मदतीची कळकळ कोणाला आहे हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 16:37 नवीन
मोहिते साहेब, राष्ट्रवादाचा उद्गम कधी नि कशामुळे झाला (नाही) याबद्दल माझं मत आपणाशी बरंच जुळतं. ================ फेदरवेट यांना "होता" हे मान्य पण "आहे" हे अमान्य आहे. आपणांस "होता" हे देखिल अमान्य आहे असे दिसते. पण मग माझी तशी भावना का आहे असं विचारायचं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
म
मोदक Wed, 02/01/2017 - 13:46 नवीन
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले याचे मला प्रचंड आश्चर्य वाटत आहे. अपवाद असला तरी, कांही उच्चविद्याविभूषीत लोकं आर्थिक गुन्ह्यांमध्ये सापडतात, टॅक्स वगैरे चुकवून किंवा सरकारात चांगल्या पदावर असली तर देशद्रोह करतात, बॉम्बस्फोट आणि जिहादबद्दल तर बोलायला नको. मग अशावेळी अरूण जोशींच्या एका विधानाला खास धागा काढण्याइतके महत्व तुम्हाला का द्यावेसे वाटले हे जाणण्यास उत्सुक. अरूण जोशींचे सरसकटीकरण करणारे विधान स्वीकारार्ह नाहीच तसेच (माझ्यासह) कोणीही (विशिष्ट विचारसरणीचा चष्मा न घातलेली) सुजाण व्यक्ती अशा विधानाला सहमत होणारही नाही हे उघड आहे. अशा अनेक पुड्या मिपावर सोडल्या जातात. आपल्या मुद्द्याची भलामण करण्यासाठी वाट्टेल ती काल्पनीक उदाहरणे दिली जातात, एक थिअरी सांगून त्याच थिअरीने निघणारे दुसरे (स्वतःला गैरसोयीचे) निष्कर्ष नाकारले जातात, मग अशावेळी अशा एका विधानासाठी पेश्शल धागा काढून काय साध्य करत आहात ते कळाले नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 14:49 नवीन
अरूण जोशींचे सरसकटीकरण करणारे विधान स्वीकारार्ह नाहीच.
कोणी कोणाला कोणते विधान स्वीकारायला सांगीतले आहे? उद्या मी खीर हेच सर्वात चविश्ट अन्न आहे असे म्हणालो तर गुंड, मवाली, विकृत, दुष्ट, इ इ लोक खीर चवीने खातात असा प्रतिसाद लिहाल कि काय? अवघड आहे बाबा. ======== गर्दी बघून हात मोकळा करून घ्यायची प्रवृत्ती बरोबर नाही हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 02/01/2017 - 15:23 नवीन
कोणी कोणाला कोणते विधान स्वीकारायला सांगीतले आहे? सार्वजनिक ठिकाणी विचार मांडले तर त्यावर प्रतिवाद येणारच. त्याचा आणि गर्दी बघून हात मोकळा करून घेण्याच्या प्रवृत्तीचा काय संबंध कळाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 16:29 नवीन
आपली प्रवृत्ती तशी नाही याचा आनंद आहे. ============== प्रतिवादाचं स्वागत आहे. पण फक्त फेदरवेट या एकाच माणसाने प्रतिवाद केलाय. बाकी हात धूवून घेत आहेत असं मला तरी वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ध
धोणी Wed, 02/01/2017 - 14:29 नवीन
काही सुशिक्षित दिवस दिवस इथे वांझोटे धागे चर्चा काढतात आणि बिझनेस मध्ये यश नाही म्हणून रडतात, कठिणे
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 15:02 नवीन
संदीप भाऊ, तुम्ही असं ढोलकी घेऊन धागा काढायच्या आधी मला लिहायला हवं होतं. पण बरं केलंत धागा काढलात ते. मला खालील गोष्टींची माहिती होइलः १. ब्राह्मणांनी भारतात नेहमी पोलिटिकली करेक्ट आणि सांभाळून सांभाळूनच बोलावे का? २. ब्राह्मण लोकांना एखाद्या सब्जेक्टीव गोष्टीत सुपरलेटिव डीग्री वापरणे देशात बॅनच आहे का? ३. माझे (किंवा कोणाचेही) प्रतिसाद माझे आडनाव डोळ्यासमोर ठेउनच वाचले जातात का? मंजे ब्राह्मणांची अशी येडीवाकडी स्तुती जर एखाद्या अब्राह्मण माणसाने मिसळपाववर केली तर तर त्यालादेखिल अस्साच विरोध व्हायला पाहिजे. तो होतो का? का फक्त स्वतःच्या जातीची स्तुती करणे (आता अभ्यासापोटी एखादे स्तुतीपर वाक्य पडणे असं म्हणणे असू देत.) ४. लोक जनरली समोरच्याला किती मागास वा मूर्ख वा संकुचित मानून चालतात. ५. ब्राह्मणांवर टिका करणे हे फॅशनेबल आणि उपयुक्त आणि त्यांच्याबद्दल काही चांगले बोलणे तोट्याचे असा कै जगाचा ट्रेंड आहे का? शक्यतो लोक ब्राह्मणांबद्दल चांगले बोलणे टाळतच असतील का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 02/01/2017 - 16:03 नवीन
एखाद्याने आपले मत मांडले किंवा तसा त्याचा ग्रह आहे यात वेगळा धागा काढण्यासारखे काय आहे हे कळत नाही. सुशिक्षित असला म्हणजे सुविचारी असतो असे कुठे लिहिलेले आहे? मी १९९४ साली एक डॉक्टर पाहिला आहे ज्याने आपल्या बायकोचा पहिलाच गर्भ मुलीचा असल्यामुळे गर्भपात करवून घेतला होता. तेंव्हा सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत सुविचारी असतोच असे नाही. ( ता. क. यात मला श्री डांगे अथवा श्री अरुण जोशी यांच्या बद्दल काहीच म्हणायचे नाही कृपया व्यक्तिगत घेऊ नये) मत हे घड्याळासारखे असते आणि प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर म्हणून त्यावर वितंडवाद घालणे हा शुद्ध कालापव्यय आहे. देशभक्ती हि कोणत्याही जातीची( ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शूद्र) धर्माची किंवा व्यवसायाची (डॉक्टर वकील लष्करी अधिकारी) मक्तेदारी नाही. तसेच हरामखोरी आणि देशद्रोह हि सुद्धा कोणत्याही जातीची किंवा धर्माची व व्यवसायाची मक्तेदारी नाही. यात काथ्याकूट करण्यासारखे काय आहे? उगाच रिकामा न्हावी आणि कुडाला तुंबड्या लावी
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/01/2017 - 16:26 नवीन
अन्य सगळे म्हणने मान्य आहे.
देशभक्ती हि कोणत्याही जातीची( ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शूद्र) धर्माची किंवा व्यवसायाची (डॉक्टर वकील लष्करी अधिकारी) मक्तेदारी नाही.
मी आणि डांगेसाहेबांनी right to patriotism हा विषय चर्चिला नाही. ऑर्डर ऑफ पॅट्रिऑटिझम हा चर्चिला आहे.
यात काथ्याकूट करण्यासारखे काय आहे?
आहे हो. कालच आदित्य कोर्डे म्हणाले कि भारतीय ज्यू देश बनवण्यासाठी ईस्रायलला गेले. मी वर उदाहरणे दिली आहेत. (नक्षली, मुस्लिम, द्रविड, ईशान्य भारतीय, कास्मिरी, खलिस्तानी, इ इ. काही उत्तर भारतीयांना "जय महाराष्ट्र" मध्ये देखिल तसा वास येतो. ) लोकांच्या अस्मिता काय आहेत, त्या कोणत्या वारश्याशी निगडित आहेत, विद्यमान राष्ट्र त्याची काळजी घेत आहे का, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. असं झालं नाही तर एखादा अरब स्प्रिंग इथल्या व्यवस्थेची वाट लावू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ध
धोणी Wed, 02/01/2017 - 16:32 नवीन
उगाच रिकामा न्हावी आणि कुडाला तुंबड्या लावी
=))
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 02/01/2017 - 17:50 नवीन
सुशिक्षितांमधे आजही असे विचार जीवंत आहेत? मलाही नेमका हाच प्रश्न हा लेख वाचूनही पडला होता.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 02/01/2017 - 18:06 नवीन
आणि लेखकाने आपले मत शेवटी बदलले हे सांगायचे विसरलात काय ट्रु'मन साहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा