ताज्या घडामोडी : भाग ४
आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही.
------------------------------------------------
अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती....
इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))
इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))
💬 प्रतिसाद
(309)
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 08:49
नवीन
ज्यासाठी वाट बघत होतो ती आकडेवारी आली आहे.
नाशिकमध्ये भाजपाचे ४७ नगरसेवक हे आयाराम आहेत तर खरे निष्ठावंत केवळ १९ आहेत. म्हणजे २०१२ च्या तुलनेत भाजपला फक्त ५ जागा वाढल्यात हे स्पष्ट झाले आहे. मागच्या निवडणुकीचे बलाबल बघता.. फक्त प्रस्थापितांचे लेबल बदलून भाजप जिंकल्याचे भासत आहे.
लोकसत्तातूनः
भाजपचे निष्ठावंत केवळ १९, तर ४७ नगरसेवक इतर पक्षांतून आलेले
महापालिकेत सत्तेचा सोपान गाठण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपच्या यशाबद्दल विविध पातळीवर चर्चा होत आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी देत भाजपने सत्ता काबीज केली असून पक्षाचे केवळ १९ निष्ठावंत महापालिकेत पोहोचले आहेत. उर्वरित ४७ नगरसेवक हे निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sat, 02/25/2017 - 09:01
नवीन
'वाहत्या गंगेत हात धुवून घेणे' तसे सध्याच्या मोदी लाटेत हात धुवून घेतलाय नगरसेवकांनी असे वाटतेय. मोदी लाट ओसरली की कितीजण स्वगृही परत जातायत ते बघायला मजा येईल.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 03/07/2017 - 06:45
नवीन
स्वगृही वगैरे काही नाही... डायरेक्ट आऊट ऑफ पॉलिटिकस्स..!!
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 02/25/2017 - 10:15
नवीन
अच्छा म्हणजे थोडक्यात तुम्हाला असे म्हणायचे आहे कि ते लोक तसेही स्वतःच्या जीवावर निवडून येणारच होते फक्त भाजपात आल्यामुळे नाव भाजपचे झाले. या ४७ पैकी किती लोक स्वतःच्या जीवावर आणि किती लोक कमळाच्या चिन्हामुळे निवडून आले आहेत याची माहितीदेखील (ती पूर्वजन्माची कुंडली कि काहीतरी) टाकता आली तर तुमच्या म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल. याशिवाय पडलेल्या आयरामांची आणि निष्ठवंतांची माहिती मिळाली तर चित्र अजून स्पष्ट होईल.
गयारामांना भाजपमध्ये गेल्याने विजयाची खात्री का वाटत असेल हा चर्चेचा विषय ठरू शकतो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 10:25
नवीन
ते लोक तसेही स्वतःच्या जीवावर निवडून येणारच होते फक्त भाजपात आल्यामुळे नाव भाजपचे झाले
>> थोडक्यात कशाला?.. मी तर पूर्वीपासून तेच म्हणत आहे.. अगदी निवडणूकांचा प्रचार सुरु होण्याआधीपासून मी तेच म्हणत आलोय... जे निवडून येणारच होते ते भाजपात गेले... निकालाने ही गोष्ट स्पष्ट केली.. आता कुणाला ही वस्तुस्थिती कशी फिरवून मांडायची असेल तर तो त्याचा प्रश्न... वर आयारामांची संख्या दिली आहे. ह्याउप्पर माझे विधान खोटे सिद्ध करायचे असेल तर ज्याच्या त्याने कुण्डल्या शोधून मांडावे इथे.. माझी काही ना नाही. :-)
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 02/25/2017 - 13:12
नवीन
मला बुवा गरज वाटत नाही कुंडल्या मांडायची, कुणीतरी दुसऱ्या धाग्यावर म्हणत होतं म्हणून म्हणालो. स्वतःच्या जीवावर निवडून येतील"च" याची खात्री नव्हती म्हणून असे लोक भाजपमध्ये गेले ज्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला असे मला वाटते. तुम्ही तर जणू तुमच्याकडे लोकांनी भाजपला मतदान केले की त्या माणसाला याचा हिशेब आहे अशीच वस्तुस्थिती (फिरवून) मांडत आहात. असो...
शिवाय, ते निवडून येणार(च?) होते तर त्यांनी भाजप का जवळ केला हा चर्चेचा विषय बाजूलाच आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 13:23
नवीन
तुम्हाला पुण्यात बसून नाशिकबद्दल काय वाटतं याची फिकिर मी का करावी..?
तुस्सी जो चाहे फील कर सकते हो! त्याने वस्तुस्थितीवर फरक पडत नसतो.
बाकी, सोयिस्कर लोडेड प्रश्न निर्माण करत राहा, आणि उत्तरं तुमची तुम्ही शोधत राहा.
कारण त्यानेही वस्तुस्थिती बदलत नसते... :-)
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 02/25/2017 - 13:50
नवीन
तुम्हाला कोणीही फिकीर करायला संगीतलेलीच नाही. त्यामुळे फिकीर करतच जाऊ नका हो, बरे असते तब्येतीसाठी(माझ्या तब्येतीची काळजी कशाला हाही लोडेड प्रश्न/उत्तर मनाला जाऊ शकतो). सोयीस्कर लोडेड उत्तरे तयार करून कोणी खुश राहत असेल तर त्याला माझा पर्याय नाही.
बाकी नाशकात बसून भारतभराची (किंवा गेला बाजार मुंबईवरील) मते कशी मांडली जात असतील देवच जाणे! काहीच्या काही! मी म्हणेल तीच वस्तुस्थिती खरी हा माझा तसाही दावा नाहीच/नसतो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 14:36
नवीन
दादानु, मुंबई आणि पुणे एवढंच काय मी माझ्या अकोल्याच्या निवडणुनिकबद्दल मी आधी कुठेच भाष्य केले नाही... जिधर मालूम नही उधर मैं बोलताच नही! ;-)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 02/25/2017 - 13:29
नवीन
अनेकदा दोन गोष्टी एकाच वेळी घडल्या की त्यामध्ये कार्यकारणभाव आहे (एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडली आहे) असे चुकीचे अनुमान काढायचा प्रकार खूपच कॉमन आहे. भाजपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आयाराम येणे आणि भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा मिळणे या दोन गोष्टी साधारणपणे एकाच वेळी झालेल्या असल्यामुळे त्यातील पहिल्या गोष्टीमुळे दुसरी गोष्ट झाली आहे असे म्हणणे हा त्यातलाच प्रकार आहे.
बरं सगळीकडे मिळून भाजपमध्ये नक्की किती आयाराम आले आणि त्यापैकी किती निवडून आले याचा कुणी अॅनालिसिस केला आहे का? कुठल्याही परिस्थितीत १००% आयाराम निवडून गेले आहेत हे होणे शक्य नाही. म्हणजे या दोन गोष्टींमधले कोरिलेशन १००% पेक्षा कमी असेल तर जसे मोठ्या प्रमाणावर आयाराम निवडून येणे हा प्रकार कधी झाला तसाच जवळपास सगळे आयाराम हरणे हा पण प्रकार कधीतरी होणारच.
दुसरे म्हणजे जर हे आयाराम स्वतःच्याच जीवावर निवडून येतील इतकी खात्री त्यांना असेल तर मग अपक्ष म्हणून उभे न राहता भाजपमध्येच का गेले ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 13:37
नवीन
आयाराम स्वतःच्याच जीवावर निवडून येतील इतकी खात्री त्यांना असेल तर मग अपक्ष म्हणून उभे न राहता भाजपमध्येच का गेले ?
>> हे तर त्यांनाच विचारलं पाहिजे.. आणि ते जे सांगतात त्यावर अगदी डोळे मिटून विश्वास ठेवला पाहिजे, ;-)
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Sat, 02/25/2017 - 13:47
नवीन
आम्ही फक्त डांगेवरच डोळे झाकून विश्वास ठेवतो. बाकी सगळे झूट.
- Log in or register to post comments
व
वाल्मिकी
Sat, 02/25/2017 - 13:51
नवीन
पुढची निवडणूक लढवाच साहेब
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/25/2017 - 13:45
नवीन
जेव्हा एखादा उमेदवार आपला पक्ष सोडून दुसर्या पक्षात जाऊन निवडणुक लढवितो त्यावेळी तो स्वतःबरोबर स्वतःची थोडी मतेही घेऊन येतो व निवडणुकीत त्याला नवीन पक्षाचीही मते मिळतात. म्हणजे त्याच्या विजयात फक्त स्वतःच्याच मतांचा वाटा नसतो तर नवीन पक्षाचीही मते त्यात असतात.
लोकसभेत बहुतेक वेळा उमेदवार न बघता पक्षाकडे बघून मत देतात (याला काही अपवाद सुद्धा आहेत). विधानसभेत उमेदवार व पक्ष हे दोन्ही बघितले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवाराची स्वतःची मते पक्षाच्या मतांपेक्षा जास्त असतात. परंतु कोणताही उमेदवार (काही तुरळक अपवाद वगळता) फक्त स्वतःच्या मतांवर निवडून येऊ शकत नाही. त्याला विजयासाठी पक्षाचीही मते लागतात.
नाशिकमध्ये भाजपचे जे आयाराम विजयी झाले त्यात त्यांच्या स्वतःच्या मतांबरोबरच भाजप या पक्षाची बेस मतेही असणार आहेत. तसे नसते तर ते अपक्ष म्हणून उभे राहू शकले असते व नंतर स्वतःच्या पाठिंब्यासाठी त्यांनी मोठी किंमत लावली असती.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 14:44
नवीन
नसते तर ते अपक्ष म्हणून उभे राहू शकले असते व नंतर स्वतःच्या पाठिंब्यासाठी त्यांनी मोठी किंमत लावली असती.
^^^
हेच किंमत लावणे निवडणुकी आधी होऊ शकत नाही?
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 02/27/2017 - 06:22
नवीन
पुणे व पिंचिं मध्ये झालेय हे.. भाव दोन तीन महिने आधी फुटला होता.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 02/25/2017 - 14:41
नवीन
अपक्ष म्हणून उभे न राहता भाजपमध्येच का गेले ?
ट्रुमन साहेब
असे अडचणीचे प्रश्न विचारायचे नसतात. आणि ते सुद्धा दिग्गज अभ्यासु आणि सर्वज्ञ लोकांना.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 14:46
नवीन
असले प्रश्न कॉमन सेन्स वाल्याना पडत नाहीत, आकडेवारीवर विसंबून असणाऱ्यांनाच पडतात! :-)
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Sat, 02/25/2017 - 14:48
नवीन
जसा वारा तशी दिशा . पक्षाकडून उभं राहिल्यावर पक्ष ,जाहिराती ह्याचा फायदा असतोच . शिवाय स्टार प्रचारक विनामूल्य येऊ शकतात . तो खर्च पक्षाच्या खात्यात जातो .भाजप ची हवा भाजप कडे गेली लोकं.ज्यांना जिंकायचाच आहे ते कुठेही जातात उद्या काँग्रेस कडे जातील .
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 02/27/2017 - 06:21
नवीन
गॅरीभौ, नाशीकबद्दल ठाऊक नाही, परंतू, पुण्यात संजय काकडे ह्या भाजपच्या राज्यसभा खासदारावर ही इतर पक्षांतून नगरसेवक आयात करण्याची जबाबदारी होती, कोठ्यावधी रूपये(नगरसेवकांना प्रचारासाठी आणि मतदारांना वाटण्यासाठीदेखील) यासाठी खर्च केले गेले. जर निवडणूक अपक्ष लढवायची तर त्यांना इतका प्रचंड खर्च स्वतःला करावा लागला असता. भाजपने आयात केलेले लोक सर्व दृष्टीने बाहूबली असतील तरच घेतलेले आहेत. ज्यांची स्वतःची जातीय समीकरणे तसेच जनसंपर्क दांडगा होता अशांनाच भाजपने तिकीटे दिली. जिथे आयाराम उमेदवार निवडून आले आहेत तिथे एक तर भाजपाचे बळ आधी नव्हते किंवा निवडून येण्याजोगे कार्यकर्ते नव्हते असे चित्र आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा हीच गत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/25/2017 - 13:59
नवीन
म्हणजे भाजपने आयाराम घेतले नसते तर भाजपची संख्या १४ वरून वाढून १९ वरच स्थिरावली असती असा अर्थ होतो का?
ज्याअर्थी भाजपच्या मूळ स्वतःच्या नगरसेवकांची संख्या वाढली आहे त्याअर्थी भाजपला २०१२ च्या तुलनेत २०१७ मध्ये जास्त मते मिळाली आहेत. म्हणजेच इतर प्रभागांमधूनही काही प्रमाणात मते वाढली असणार. म्हणजे भाजप १४ वरून कदाचित ६७ वर गेला नसता, परंतु १९ च्या पुढे नक्की गेला असता. हे ४७ आयाराम जर भाजपऐवजी इतर पक्षाकडून उभे राहिले असते तर त्यातले सर्वजण निवडून आलेच असते असे सांगता येईल का? त्यांच्या मतांमध्ये भाजप या पक्षाचीही मते असणारच आहेत. जर त्यांचे स्वतःचे काम इतके मोठे होते आणि त्यांना मिळालेली सर्व मते फक्त त्यांची स्वतःची होती तर ते मनसेत राहूनही सहज निवडून आले असते. परंतु त्यांना मनसेत राहून निवडून येऊ याची खात्री नसावी व भाजपत गेल्यावर निवडून येण्याची जास्त शक्यता आहे याची खात्री वाटली असावी. म्हणूनच त्यांनी पक्ष बदलला असावा. संपूर्ण महाराष्ट्रात कल बघितला तर मनसेची सर्वत्र पिछेहाट झालेली आहे. फक्त नाशिकमध्येच मनसेने जोरदार कामगिरी केली असती, परंतु २५ नगरसेवकांनी पक्ष बदलल्याने तिथे मनसेची पिछेहाट झाली या समजूतीत तथ्य नाही. २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे नाशिकमध्ये ४० नगरसेवक निवडून आले होते. त्याबरोबरीने मुंबईत २९, पुण्यात २९ व कडोंमपा मध्ये २७ नगरसेवक होते. म्हणजे नाशिकबाहेर इतर काही शहरातही मनसेने बर्यापैकी कामगिरी केली होती. परंतु आता सर्वच शहरात, निमशहरी भागात, ग्रामीण भागात मनसेचा व इतर पक्षांचा बोर्या वाजला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेचे किंवा इतर पक्षांचे आयाराम भाजपमध्ये आले नसते तर भाजपला फक्त १९ जागाच मिळाल्या असत्या असे नाही. कदाचित भाजपला ६७ जागा मिळाल्या नसत्या, परंतु सर्व महाराष्ट्रातील कल बघता त्यांना १९ पेक्षा बर्याच जास्त जागा नक्की मिळाल्या असत्या.
अर्थात आयाराम भाजपमध्ये आले नसते तर भाजपचे ६७ ऐवजी फक्त १९ नगरसेवक निवडून आले असते अशी समजूत करून घ्यायची असेल तर हरकत नाही.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Sat, 02/25/2017 - 14:53
नवीन
म्हणजे दुसऱ्याची कामगिरी नाही म्हणून भाजप ला फायदा होतोय . ह्या मतावर सहमत .६० वर्ष काँग्रेस कशी जिंकली लबाडी करून तशीच भाजप पण जिंकतेय ना
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 15:17
नवीन
तुमचा पूर्ण प्रतिसाद 'असं झालं असेल, तसं झालं असेल, असं असणार तसं झालं असणार' अशा कपोलकल्पित गृहितकांवर अवलंबून आहे.
मी इथे चार वर्षे राहतोय, फार मोठं नाहीये नाशिक, 15 लाख लोकसंख्या फक्त. एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला 20 मुनुते लागतात. गेल्या चार वर्षात काय काय घडामोडी चालल्यात त्यावर लक्ष ठेवून आहे, मोदींची हवा तयार होण्या आधीपासून... खुप छोट्या-मोठ्या, बारीक सारीक घटना घडत होत्या, तेव्हापासूनच नाशिक महापालिकेची निवडणूक कोण्या अंगाने जाणार याची स्क्रिप्ट तयार होती, या बद्दल स्पष्ट सूतोवाच वेळोवेळी केलं आहे. पण कसे आहे की भाजपविरोधी म्हणून कानफाट्या नाव पडल्याने मी इथं मांडत असलेल्या गोष्टी त्याच दृष्टीने पहिल्या जात आहेत.
असो, थोड्यावेळाने याचे विश्लेषण मांडतो. पटो न पटो हा ज्याचा त्याचा प्रश्न.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/25/2017 - 18:10
नवीन
तुम्हाला नाशिकबद्दल भरपूर माहिती असल्याने काही शंका विचारतो.
१) भाजपच्या तिकीटावर जे ४७ आयाराम निवडून आले, ते भाजपत जाण्याऐवजी स्वपक्षाच्या तिकीटावर उभे राहिले असते, तर त्यातले किती जण निवडून आले असते?
२) भाजपने या ४७ आयारामांना तिकीट न देता आपल्याच मूळ कार्यकर्त्यांना तिकीट दिले असते, तर त्यातले किती निवडून आले असते?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 18:49
नवीन
तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर आहे. दोन्ही प्रश्न बघा आणि प्रोसेस करा..
१. जे निवडून आले ते कुठेही निवडून आले असते.
२. आयारामांना टिकिट देण्याचे कारणच मूळ कार्यकर्ते निवडून येणार नाहीत याची भाजपला खात्री होती...
तुमचेच मूळ प्रश्न उलट करुन विचारुन बघा..
१. जे आयाराम निवडून आलेत ते जर स्वपक्षातर्फेच उभे राहिले असते तर त्यांच्या विरोधात निवडून येण्यासाठी भाजपकडे कोण कार्यकर्ते-उमेदवार होते?
२. भाजपच्या नावाने कोणीही निवडून येऊ शकत असेल तर बाहेरच्या, नुकत्याच आलेल्या आयारामांना टिकट देण्याची गरज काय होती...? आपलेच निष्ठावंत उभे करायचे ना?
बाकी निष्पक्ष , वस्त्तुनिष्ठ प्रश्न असतील तरच चर्चा करणे योग्य राहिल, अन्यथा तुम्ही भाजपच्या बाजूने आणि मी विरोधी बाजूने किल्ला लढवत राहण्यात मजा नाही...
बहुतेक नाशिकसाठी वेगळाच धागा काढायला लागेल.... इन्टरेस्टींग आहे नाशिक प्रकरण. वर वर दिसतंय तसं नाही. मनसे, सेना यांचं नक्की काय झालं त्यासोबतच भाजपची मोडस ऑपरेंडीही दिसेल. अनेक पैलू आहेत. एकच एक नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/26/2017 - 10:19
नवीन
नाही. माझे प्रश्न वेगळे आहेत. आपण नाशिकमधील भाजपच्या विजयाकडे कोणत्या कोनातून बघतो त्यावर आपला निष्कर्ष अवलंबून आहे.
समजा भाजपने ४७ पैकी एकाही आयारामाला तिकीट न देता त्या प्रभागातून आपलेच मूळ कार्यकर्ते उभे केले असते तर खालीलपैकी काय होण्याची शक्यता सर्वाधिक होती?
(१) त्या ४७ जागांवर भाजपच्या भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नसता कारण त्या प्रभागात भाजपची स्वतःची ताकद शून्य होती.
(२) त्या ४७ प्रभागांवर भाजपचेच सर्व उमेदवार निवडून आले असते कारण त्या सर्व प्रभागात भाजपची स्वतःची भरपूर ताकद होतीच.
(३) ४७ पैकी काही प्रभागात भाजपचे उमेदवार निवडून आले असते व काही प्रभागात त्यांचा पराभव झाला असता.
माझ्या दृष्टीने वरीलपैकी (१) व (२) एकदम टोकाचे निष्कर्ष आहेत. (३) च खरा असण्याची जास्त शक्यता आहे कारण भाजपने आयारामांचे प्रभाग वगळता इतर प्रभागात आपली संख्या २०१२ च्या तुलनेत काही प्रमाणात वाढविलेली आहे आणि त्याच वेळी आयाराम नसलेल्या प्रभागात भाजप वगळता इतर पक्षांचा जनाधार कमी झालेला दिसतो. त्यामुळे भाजपचे आयाराम नसलेल्या प्रभागात जो कल दिसतो तसाच कल आयाराम असलेल्या प्रभागात दिसण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजेच भाजपने ४७ पैकी एकाही आयारामाला तिकीट न देता त्या प्रभागातून आपलेच मूळ कार्यकर्ते उभे केले असते तर भाजपची संख्या जरी ६७ एवढी मोठी झाली नसती तरी १९ एवढी कमीही राहिली नसती. अंतिम आकडा या दोन आकड्यांच्या मध्येच कोठेतरी आला असता (४५ च्या आसपास).
आता १८० अंशातून वळून चित्र बघू.
समजा हे ४७ आयाराम भाजपमध्ये प्रवेश न करता आपल्या मूळ पक्षाच्या तिकिटावर उभे राहिले असते तर खालीलपैकी काय होण्याची शक्यता सर्वाधिक होती?
(१) ते सर्व ४७ आयाराम निवडून आले असते कारण ते पूर्वी स्वतःच्या व स्वतःच्या पक्षाच्या ताकदीवर निवडून आले होते.
(२) ते सर्व ४७ आयाराम पडले असते कारण त्या सर्व प्रभागात भाजपची स्वतःची भरपूर ताकद होतीच.
(३) ४७ पैकी काही प्रभागात भाजपचे उमेदवार निवडून आले असते व काही प्रभागात आयाराम निवडून आले असते.
जर हे ४७ आयाराम स्वबळावर निवडून येऊ शकत होते तर त्यांना पक्ष बदलण्याची काय आवश्यकता होती? किंवा जर भाजपची या ४७ प्रभागात भरपूर ताकद होती तर या ४७ आयारामांना पक्षात प्रवेश देऊन तिकीट देण्याची काय आवश्यकता होती?
खरे उत्तर या दोन्हींच्या मध्येच कोठेतरी असावे. भाजपची या ४७ पैकी काही मतदारसंघात पुरेशी किंवा बर्यापैकी ताकद असणार आहे, परंतु सर्व ४७ उमेदवार निवडून आणायला ती पुरेशी नाही हे भाजपच्या लक्षात आले असावे आणि म्हणू त्यांनी या आयारामांना पक्षात घेऊन तिकिटे दिली असावीत.
तसेच या ४७ आयारामांपैकी काही जणांची स्वतःची वैयक्तिक ताकद बर्यापैकी असावी, परंतु आपल्या मूळ पक्षात राहून आपण निवडून येऊ शकणार नाही असे त्यांना वाटत असावे. त्यामुळेच १००% विजय मिळविण्यासाठी ते भाजपकडे आले असावेत कारण इतर पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये गेल्यानंतरच आपण नक्की विजयी होऊ असे त्यांना वाटले असावे.
एकंदरीत भाजप व हे ४७ आयाराम या दोघांच्या दृष्टीने ही विन-विन परिस्थिती ठरलेली दिसते. दोघांनाही एकमेकांचा फायदा झालेला दिसतो.
पुन्हा एकदा माझ्या दृष्टीने वरीलपैकी (१) व (२) एकदम टोकाचे निष्कर्ष आहेत. (३) च खरा असण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याची कारणे वरीलप्रमाणेच आहेत. काही आयाराम आपापल्या मूळ पक्षाच्या तिकीटावर निवडून आले असते तर काही जण पडले असते कारण त्यांच्या मूळ पक्षाची ताकद शहरातील इतर प्रभागात कमी झालेली आहे व भाजपची वाढलेली आहे आणि तोच कल या ४७ प्रभागातही थोड्याफार फरकाने दिसला असता. म्हणजेच हे ४७ आयाराम भाजपत प्रवेश न करता आपल्या मूळ पक्षाच्या तिकीटावर उभे राहिले असते तर भाजपची संख्या निश्चित ६७ एवढी मोठी झाली नसती, पण १९ एवढी कमीही राहिली नसती. अंतिम आकडा या दोन आकड्यांच्या मध्येच कोठेतरी आला असता (४५ च्या आसपास).
वरील ३ शक्यतांपैकी (१) किंवा (२) खरे आहेत हे सिद्ध करण्यासाठी २०१७ च्या व २०१२ च्या निवडणुकीतील नाशिकमधील सर्व पक्षाच्या सर्व उमेदवारांना व पक्षांना पडलेली एकूण मतांची आकडेवारी आवश्यक आहे. २०१७ च्या आकडेवारीशी २०१२ च्या आकडेवारीशी तुलना करूनच नंतर ठाम निष्कर्ष काढता येईल.
एकंदरीत भाजपच्या नाशिकमधील यशामागे आयाराम हे एकमेव कारण नसावे (मोठ्या प्रमाणात आयाराम शिवसेनेही घेतले होते, पण त्यांना तितकेसे यश मिळालेले नाही). भाजपची २०१२ च्या तुलनेत वाढलेली ताकद, इतर पक्षांची घटलेली ताकद, आयारामांमुळे मिळालेली वाढीव मते, शिवसेनेतील अंतर्गत मारामार्या, शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांना शिवसेनेच्याच विनायक पांडे समर्थकांकडून झालेली मारहाण, फडणविसांची स्वच्छ प्रतिमा अशी अनेक कारणे त्यामागे असावीत.
___________________________________________________________
नाशिकमध्ये शिवसेनेची खराब कामगिरी ही सुद्धा भाजपच्या पथ्यावर पडलेली आहे.
http://www.loksatta.com/nashik-news/nashik-elections-2017-results-shiv-sena-bjp-mns-2-1419380/
_________________________________________________________________________________
नाशिकप्रमाणे पुण्याची परिस्थिती पाहिली तर भाजपच्या पुण्यातील ९८ नगरसेवकांपैकी ८१ जण मूळ भाजपचेच कार्यकर्ते होते व उर्वरीत १७ आयाराम होते. म्हणजे फक्त १८% आयाराम निवडून आले आहेत व ८२% मूळ कार्यकर्ते निवडून आले आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bjp-pmc/articleshow/57350448.cms
_____________________________________________________________________________
- Log in or register to post comments
ज
जेसीना
Mon, 02/27/2017 - 04:47
नवीन
जर हे ४७ आयाराम स्वबळावर निवडून येऊ शकत होते तर त्यांना पक्ष बदलण्याची काय आवश्यकता होती? :
पक्ष बाडण्याचा एकमेव कारण म्हणजे
पैसा
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 03/07/2017 - 07:00
नवीन
पक्षीय एकनिष्ठेत काही ही उरलेले नाही याची चुणूक २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत बऱ्याच खेळाडूंना आली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घ्या पैसा कमवून..!!
- Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य
Sat, 02/25/2017 - 09:04
नवीन
LOL
विरोधात राष्ट्रवादी अन् शेकाप असणार.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sat, 02/25/2017 - 09:36
नवीन
भाजपा व शिवसेनेच्याच्या सर्वोच्च नेत्यांचे फोटो आहेत पण सोनिया गांधी व राहुल गांधींचे फोटो नाहीत बँनरवर. नवलच आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 12:00
नवीन
नाशिक, अकोला येथे अनेक भाजपेतर उमेदवारांना निकालात इवीएम मध्ये शुन्य मते असल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात ही अशक्य गोष्ट कशी घडली ह्याचे स्पष्टीकरण आयोगाला द्यावे लागणार आहे.
महाराष्ट्रात शेकडो उमेदवारांना हा 'शून्य मताचा' घोटाळा भोवला आहे.
ह्याबद्दल अधिक चौकशी होण्यासाठी राजकिय पक्षांमधून मागणी जोर धरत आहे.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 02/25/2017 - 14:17
नवीन
तुम्ही म्हणता त्याचे डिटेल्स कुठे मिळू शकतील? म्हणजे नेमक्या किती उमेदवारांना शून्य मते पडली? हे उमेदवार कोण? हा फॉल्ट आहे का? असेल तर तिथे पुन्हा निवडणूक व्हावी. "शेकडो" उमेदवारांना फटका बसणे लोकशाहीच्या दृष्टीने हितकारक नाही.
बाकी हि शून्य झालेल्या उमेदवाराची मते विजयी भाजप उमेदवारालाच गेली असतील असं काहीसं मत विरोधासाठी वापरलं जाईल का हा विचार येऊन हसू आले!
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 02/26/2017 - 09:22
नवीन
मनसेवर नाशिककर का नाराज झाले याची संभाव्य कारणे बघायला हवीत. भाजप का आला यापेक्षा. इतके का चिडलेत लोकं?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/26/2017 - 10:29
नवीन
मनसेवर फक्त नाशिकरच नाराज झाले नसून संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे. २०१४ मध्ये विधानसभेत २८८ पैकी फक्त १ आमदार, २०१६ मध्ये नगरपरीषदांमध्ये ४७००+ नगरसेवकांपैकी फक्त ३०-३५ नगरसेवक आणि आता महापालिकेच्या जवळपास १३०० नगरसेवकांमध्ये मनसेचे फक्त ३० च्या आसपास नगरसेवक (जिल्हा परीषदांमध्ये तर मनसेचे नामोनिशाणही नाही) हा कल मनसेचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे स्पष्ट दर्शवितो. २०१२ च्या तुलनेत कडोंमपा मध्ये २७ वरून ९, नाशिकमध्ये ४० वरून ७ वर घसरण, मुंबईत २९ वरून ७ व पुण्यात २९ वरून ७ ही परिस्थिती एक समान कल दर्शवितात.
राज ठाकरेंनी सातत्याने बदललेल्या भूमिका, सोयीनुसार भाजप/शिवसेना/काँग्रेस्/राष्ट्रवादी इ. पक्षांची घेतलेली मदत, कधी मोदींचे कौतुक तर कधी शिव्या, कधी शिवसेनेच्या टाळीला थंडा प्रतिसाद तर कधी स्वतःहून शिवसेनेसमोर टाळीसाठी हात पुढे करणे, राज ठाकरे वगळता पक्षात अन्य नेत्यांचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे मनसे जनतेच्या मनातून उतरलेली दिसते.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sun, 02/26/2017 - 12:38
नवीन
>>
सहमत. मला वाटते मनसेची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे एक तर हा पक्ष स्थापनेपासून एकखांबी तंबू राहिलाय. नेत्यांची मजबूत अशी दुसरी फळी तितकीशी उभी राहिलीच नाही. त्यात भर घालयला राज ठाकरेंच्या सतत बदलत्या भूमिका बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे पक्ष आता शेवटच्या घटका मोजतोय. अजून थोडा जीव शिल्लक आहे पण पक्षप्रमुख राज ठाकरे ह्यांनी पक्ष वाढीसाठी काहीच हालचाल केली नाही (आतापर्यंतचा अनुभव पाहता करतील असे वाटत देखील नाही) तर २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून येणार नाही. आणी त्यावेळी हा पक्ष नामशेष होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 02/26/2017 - 11:52
नवीन
लोकहो,
पुराणांत बालके खाणारे राक्षस असंत. या कामात लावा वगैरे राक्षसीदेखील मागे नव्हत्या. अशा गोष्टींना पुराणातली वानगी पुराणांत असं म्हणून झटकायची सोय राहिली नाही. अशा गोष्टी आजही होतात. फक्त राक्षस राक्षसांसारखे न दिसत तुमच्याआमच्यासारखे दिसतात. इतकाच काय तो फरक.
ही बातमी पहा : http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/nri-woman-two-others-plotted-to-kill-adopted-boy/articleshow/57164144.cms
बळी पडलेल्या दुर्दैवी मुलाबद्दल दु:ख व्यक्त करावं की पुराणांतल्या वानगी खरी झाली म्हणून आनंद व्यक्त करावा या संभ्रमात पडलोय.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 02/26/2017 - 13:04
नवीन
लंडन : परदेशी व्यक्तीशी लग्न केलेल्या ब्रिटिश नागरिकाचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच त्या व्यक्तीला आपल्या पत्नी किंवा पतीला आणि मुलांना ब्रिटनमध्ये घेऊन येण्याची मुभा देणाऱ्या ब्रिटिश सरकारने केलेल्या नव्या नियमांवर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने शेकडो भारतीय कुटुंबांची ताटातूट होण्याची चिन्हे आहेत.
अधिक बातमी इथे :
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
Fri, 03/03/2017 - 21:38
नवीन
दानवे परिवार (औरंगाबाद) आणि क्षीरसागर परिवार (कोल्हापुर) हे दोन डोळे दिपवणारे लग्नसोहळे टिव्हि वर पाहण्याचे भाग्य लाभले कोणि कशावर किति पैसे खर्च करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तरी पण जर तुम्हि समाजकारण / राजकारणात असाल तर मग मात्र तो प्रश्न वैयक्तिक नाहि राहत.
सहज म्हणुन एक विचार मनात आला कि एक उपकार म्हणुनच सहि पण जर हा उडवलेला पैसा जर काहि होतकरु मुलांच्या शिक्षणासाठि / उच्चशिक्षणासाठि चॅरिटेबल ट्र्स्ट स्थापन करुन दान केला असता तर किति शेकडो मुलांचे कल्याण झाले असते.....राज्यातल्या दुष्काळासाठि दान केला असता तर किति कुटुंब तरले असते.... दान हा शब्द सुद्धा ईथे तेव्हाच लागु असेल म्हणा जेव्हा उडवलेला पैसा योग्य मार्गाने कमावलेला असेल किंवा वडिलोपार्जित असेल. असो आम्हि मध्यमवर्गिय असाच विचार करणार, और कर भि क्या सकते है :)) हम भुल जाते है कि खादी और टोपि पहनने के बाद ईंसान तो ईंसान नहि रहता और सिर्फ लेना जानता है देना नहि... देते सिर्फ ये सपने है वो भि पाच साल मे एक बार.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Mon, 03/06/2017 - 13:33
नवीन
वांशिक विद्वेषातून कॅन्ससमध्ये झालेली भारतीय इंजिनीअरची हत्या आणि त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री लॅनकास्टर कंट्री येथे एका भारतीय वंशाच्या दुकानदाराची झालेली हत्येची घटना ताजी असतानाच शुक्रवारी वॉशिंग्टनमधील कँट येथे ३९ वर्षीय शीख तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ‘तुमच्या देशात परत जा’, अशी धमकी देत हल्लेखोराने तरुणावर गोळी झाडली. या घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मटातील हि बातमी
एकंदर अशा बातम्या जास्त उजेडात येत आहेत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 03/07/2017 - 05:55
नवीन
नवव्या लोकसभेचे (१९८९-९१) अध्यक्ष रबी रे यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे.ते सर्वप्रथम १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून ओरिसातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारमध्ये काही काळ आरोग्यमंत्री म्हणून काम बघितले. काही वर्षे ते राज्यसभेचेही सदस्य होते. १९८९ आणि १९९१ मध्ये ते ओरिसातील केंद्रपारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांची ९ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.
लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांची कसोटी पाहणारा एक प्रसंग आला होता. १९८९ मध्ये जनता दलाचे १४२ खासदार निवडून गेले होते. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा थांबवल्यानंतर भाजपने वि.प्र.सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला.त्यानंतर सुरवातीला चंद्रशेखर आणि देवीलाल यांच्या नेतृत्वाखाली एकूण ५४ खासदार जनता दलाबाहेर पडले. या गटाला "समाजवादी जनता दल" म्हणून मान्यताही मिळाली. ७ नोव्हेंबर १९९० रोजी वि.प्र.सिंग सरकारवर विश्वासदर्शक ठराव आणण्यात आला. त्यावेळी मुळातल्या या ५४ खासदारांच्या गटात सामील नसलेल्या विद्याचरण शुक्ला, भागेय गोवर्धन आणि अन्य ५ जनता दल खासदारांनी जनता दलाने जारी केलेला पक्षादेश झुगारून वि.प्र.सिंग सरकारविरूध्द मत दिले होते. त्यावेळी लोकसभा अध्यक्ष रबी रे यांनी हे ७ खासदार जनता दलाच्या खासदारांच्या संख्येच्या १/३ पेक्षा कमी असल्याच्या कारणावरून पक्षांतरविरोधी कायद्यातील तत्कालीन तरतुदींप्रमाणे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. या खासदारांचे म्हणणे होते की त्यांना समाजवादी जनता दलाच्या गटातच धरण्यात यावे पण रबी रे यांनी निर्णय दिला की मुळातल्या ५४ लोकसभा सदस्यांच्या गटाला मान्यता दिल्यानंतर हे आणखी ७ खासदार फुटले आहेत आणि त्यामुळे ७ हा आकडा जनता दलाच्या उरलेल्या खासदारांच्या संख्येच्या १/३ पेक्षा कमी आहे. लोकसभा अध्यक्षांनी हा निर्णय दिला त्यावेळी सुब्रमण्यम स्वामी त्यावेळी चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री होते. या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांनी आपला निर्णय मागे घेतला नाही तर त्यांना अटक करू ही धमकी सुब्रमण्यम स्वामींनी त्यावेळी रबी रे यांना दिली होती. रबी रे यांनी सुब्रमण्यम स्वामींना धूप घातली नाही आणि त्यानंतर पंतप्रधान चंद्रशेखर यांनी लोकसभा अध्यक्ष या घटनात्मक पदाचे महत्व अबाधित राखण्याची जबाबदारी सरकारची आहे हे स्टेटमेन्ट देऊन एका अर्थी सुब्रमण्यम स्वामींचे नाक कापले होते. त्यानंतर स्वामींना माफी मागावी लागली होती.
लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची अल्प कारकिर्द त्या पदाची गरीमा जपणारी होती. त्यांनी त्या पदावरील व्यक्तीकडून असलेल्या अपेक्षेप्रमाणे निष्पक्षपणे काम बघितले. वि.प्र.सिंग जाऊन चंद्रशेखर पंतप्रधान झाले तरी रबी रे यांना हटवून लोकसभा अध्यक्षपदावर 'आपला' माणूस आणावा असे चंद्रशेखर यांना वाटल्याचेही ऐकिवात नाही. त्यातच त्यांचा निष्पक्षपणा दिसून येतो.
ऑगस्ट १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली त्यावेळी रबी रे समता पक्षात सामील झाले. त्यांनी १९९६ ची निवडणुक लढवली नाही आणि ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. त्याचे कारण काय होते याची कल्पना नाही. बहुदा समता पक्षाने भाजपशी हातमिळवणी केली हे त्यांना पटले नाही हे कारण असावे हा माझा अंदाज.
समाजवादी विचार पटले नाहीत तरी त्या विचारांशी असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि तळमळ यामुळे अनेक समाजवादी नेत्यांविषयी आदर वाटत असे. महाराष्ट्रात दत्ता ताम्हाणे यांच्या निधनानंतर त्या मांदियाळीतील फार कोणी राहिलेले नाहीत. महाराष्ट्राबाहेर रबी रे हे असेच एक नेते होते.
रबी रे यांना श्रध्दांजली.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 03/07/2017 - 08:36
नवीन
मधू दंडवते, ग. प्र. प्रधान, एस एम जोशी असे काही मोजके अत्यंत आदरणीय व स्वच्छ नेते सोडले तर समाजवादी पक्षात असलेले उरलेले बहुतेक सर्वजण भोंदू होते/आहेत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 03/07/2017 - 09:15
नवीन
हो नक्कीच. ग.प्र.प्रधान, एस.एम.जोशी, दत्ता ताम्हाणे, मधू दंडवते, प्रमिला दंडवते इत्यादी समाजवादी आणि त्याचबरोबर मुलायमसिंग आणि लालू यादवही समाजवादीच :(
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Wed, 03/08/2017 - 08:24
नवीन
दत्ताजी माझ्या घरापासून ५ मिनिटांवर राहत . लहानपणी आजोबांसोबत त्यांच्याकडे चहाला कित्येकदा गेलोय .ज्यावेळी समाजवादी म्हणजे काय ते पण कळत नव्हतं .
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 03/07/2017 - 08:29
नवीन
गॅरी ट्रुमन,
सहमत. दत्ता ताम्हणे यांच्यासारखी नानासाहेब गोरे, एसेम जोशी, मृणाल गोरे, इंदुमती पटेल ही काही नावं चटकन आठवली.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ल
लिओ
Wed, 03/08/2017 - 05:00
नवीन
दिनांक ६ मार्च २०१७ रोजी भारतीय नौदलातील विमानवाहु नौका आय एन एस विराट सेवानिवृत्त झाली. आय एन एस विक्रमादित्य विमानवाहु नौका एकमेव विमानवाहु नौका नौदलात सध्या कार्यरत आहे. लवकर भारतीय बनावटीची विमानवाहु नौका आय एन एस विक्रांत नौदलात सामील व्हावी.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/08/2017 - 08:41
नवीन
निधर्मी आणि पुरोगामी विचारवंताच्या लाडक्या प्रा. जी एन साईबाबाला नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधामुळे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. साईबाबा हा दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहे. साईबाबाबरोबर अजून ५ जणांना शिक्षा झालेली आहे त्यात हेम मिश्रा हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी सुद्धा आहे. एकंदरीत शिकणे व आणि शिकविणे ही कामे करण्याऐवजी नक्षल्यांशी हातमिळवणी करणे, फाशीची शिक्षा झालेल्या अतिरेक्यांची जयंती/मयंती साजरी करणे, त्यांना दिलेली फाशी म्हणजे न्यायालयीन खून असा प्रचार करणे, देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा देणे म्हणजेच निधर्मी व पुरोगामी विचारवंत असल्याचे लक्षण आहे.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 03/08/2017 - 11:11
नवीन
काही तरी चुकतंय काय?
स्टिंग ऑपरेशनमध्ये सहायक प्रथेविषयी बोलल्याने कारवाई होण्याच्या भितीने मॅथ्यू नावाच्या एका सैनिकाने नाशिक येथे आत्महत्या केली*(असे आर्मीने अधिकृतरित्या म्हटले आहे). त्यानंतर आता आणखी एका जवानाचा व्हिडीओ प्रसारीत झाला आहे.
१. सहायक पद्धत ही वसाहतकालीन प्रथा आहे. केवळ सैन्यातच नव्हे तर पोलीसदलात सुद्धा अशा प्रकारे हवालदार म्हणून भरती केलेल्यांना घरगुती कामांना लावले जाते. कित्येक पोलीसांचे आख्खे आयुष्य अशा प्रकारे अधिकार्यांच्या घरात कामे करण्यात जाते. आणि ते पण पोलिस खात्यांत कर्मचार्यांची कमतरता असताना.
२. अश्या प्रकारे वरिष्ठांच्या घरातील कामे करणे)कुत्र्याला फिरवण्यापासून ते धुणे-भांडी पर्यंत) हे अपमानजनक वाटणारच. कारण त्यांना हायर करताना हे काम करावे लागेल अशी तरतूद काँट्रॅक्टमध्ये नसते. आपण जवान म्हणून आर्मीत भरती झालो आहोत असे वाटणार्या व्यक्तीला असे नोकर म्हणून काम करणे मानहानीचे वाटते यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. आता प्रश्न असा येतो की इतक्या मोठ्या प्रमाणात सैनीक आपला असंतोष व्यक्त करत आहेत त्यांना अधिकृत माध्यमातून वरिष्ठांपर्यंत आपले म्हणणे पोचवणे का शक्य झाले नसावे का? सैन्यातील शिस्त अशा प्रकारामुळे कमकुवत झाल्यासारखी होते हे घातक आहे. पण सैनिकांना मिळणार्या सुविधांच्या दर्जाबाबत, त्यांच्या वरिष्ठांबाबत, सहायकसारख्या व्यव्स्थांबाबत असणार रोषदेखील समजून घेतला पाहिजे. सैन्याने आणि नागरी सरकारने देखील त्यांचा असंतोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहीजे.
३. सहायक या पदासाठी वेगळी भरती घेणे किंवा वरिष्ठ पदावर असणार्या अधिकार्यांसाठी घरगुती कामे करून घेण्यासाठी विशेष भत्ता सुरू करून या प्रकारातील मनुष्यबळ वेगळ्या कामासाठी वापरून घेणे असे पर्याय अधिक योग्य ठरतील असे वाटते.
योग्य पाऊल
४. सैन्याबाबत प्रत्येक नागरीकाला आदर, सन्मान वाटणे आवश्यकच आहे. कारण राष्ट्राचे संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे असणारे कर्तव्य ते आपल्या वतीने बजावत असतात. मात्र तो आदर सामान्य सैनिक आणि अधिकारी यांना समान असावा.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 03/08/2017 - 13:34
नवीन
अजमेर दर्ग्यामध्ये २००७ मध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी, आरएसएसचे प्रचारक असीमानंद यांचं नाव या बॉम्बस्फोटाप्रकरणात आल्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत बोलताना 'हिंदू दहशतवाद' हा शब्दप्रयोग केला होता. हे सुशीलकुमार शिंदे आज चांगलेच तोंडावर आपटले आहेत. कारण आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक स्वामी असीमानंद यांच्यासह सहा जणांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/2007-ajmer-blast-aseemanand-and-others-acquitted-3-convicted-by-nia-court/articleshow/57537904.cms
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 03/09/2017 - 07:18
नवीन
हा दिशाभूल करणारा प्रतिसाद आहे. असीमानंद यांची जरी सुटका झालेली असली तरी इतर दोन आरोपी भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता हे या बाँबहल्ल्यामध्ये दोषी ठरले आहेत. हा बाँब हल्ला हा दहशतवाद होताच. हा घडवणारे हिंदूच आहेत. त्यांनी धार्मिक माथेफिरूपणातून हे बाँबहल्ले केले आहेत. सो हिंदू दहशतवाद हे नाव या बाँब हल्याला देणं चूक नाही/.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 03/09/2017 - 07:40
नवीन
बर,
२०११ मध्ये एन आय ए ने आरएसएसचे प्रचारक असीमानंद यांचं नाव या बॉम्बस्फोटाप्रकरणात गुंतवल्यानंतर(च) तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत बोलताना 'हिंदू दहशतवाद' हा शब्दप्रयोग केला होता. हा बॉम्बस्फोट झाला २००७ मध्ये. मग तेंव्हा हा 'हिंदू दहशतवाद' किंव्हा 'भगवा दहशतवाद' असे का बरे त्यांना म्हणावेसे वाटले नाही.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »