ताज्या घडामोडी : भाग ४
आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही.
------------------------------------------------
अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती....
इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))
इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))
याच धर्तीवर गायकवाडांच्या हातात फुकट तिकीट होतं की विकतचं होतं हा मुद्दाही गैरलागू ठरतो.जर विमानात बिझनेस क्लासची आसने असताना यांना मुद्दाम जनता क्लासचे आसन दिले असेल तर तक्रार योग्य होती. विमानात बिझनेस क्लासची आसने नव्हती, तरीसुद्धा त्याच विमानातून जनता क्लासमध्ये बसून प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे मूर्खपणा आहे. असे करणे म्हणजे 'शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल' असा फलक लावलेल्या उपाहारगृहात जाऊन शाकाहारी भोजन चेपल्यानंतर मला मटण वाढले नाही म्हणून आरडाओरडा करण्यासारखे आहे.सुदैवाने वा दुर्दैवाने नेमक्या याच कारणासाठी बहुसंख्य लोकांना रवींद्र गायकवाड हा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटतो. रीतसर तक्रार करायचा प्रयत्न का फोल गेला हे कोणीही सांगत नाहीये.लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणे ही एक वेगळी कला आहे. रीतसर तक्रार नक्की कशाबद्दल करायची होती? माझ्याकडे बिझनेस क्लासचे कूपन असल्यामुळे विमानातील इकॉनॉमी क्लासची आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसविली नाहीत म्हणून तक्रार करायची होती का अजून कोणत्यातरी वेगळ्या गोष्टीची तक्रार करायची होती? आणि तक्रार करायची असेल तर त्यासाठी विमानात बसून राहून इतरांचा खोळंबा करणे हा तक्रार करण्याचा मार्ग नाही. हे महाशय खासदार होते म्हणून यांना सभ्य वागणू़क मिळाली. एखाद्या सामान्य प्रवाशाने जागेवरून उठण्यास नकार दिला असता तर कंपनीने पोलिसांना बालावून त्यांची विमानातून उचलबांगडी केली असती.पण यावर रीप्लाय येणार नाहीनेहमीप्रमाणेच केजरीवाल छाप प्रतिसाद! मुनीवर्य, आधी इथे आणि इथे रीप्लाय द्या आणि नंतर इतरांबद्दल बोला. स्वतः पळून जायचं आणि इतरांबद्दल केजरीवाल छाप प्रतिसाद द्यायचे ही केजरीवाल स्टाईल आता सोडा.ही बातमी. नक्की काय ते कळायला मार्ग नाही .१) काहीतरी गोंधळ आहे. लोकसत्तातील वरील बातमीत म्हटले आहे की "त्यानंतर गायकवाड यांनी आपली सॅंडल काढली आणि त्यांना ते मारणार होते.". परंतु मटामधील या बातमीत असे म्हटले आहे की "यातूनच वाद वाढून गायकवाड यांनी पायातील सँडल काढून सुकुमार यांना मारहाण केली व शिडीवरून ढकलले, असे ही हवाईसुंदरी म्हणाली.". म्हणजे एका बातमीनुसार त्यांनी सँडल काढली होती व ते कर्मचार्याला मारणार होते. परंतु दुसर्या बातमीनुसार त्यांनी सँडल काढून सुकुमार यांना मारहाण केली व शिडीवरून ढकलले. दुसरी बातमी खरी असेल तर हे कृत्य खुनाचा प्रयत्न या गुन्ह्याखाली येते. २) ही विशिष्ट बातमी फक्त लोकसत्ता व मटा या मराठी वृत्तपत्राच्या आंतरजाल आवृत्तीत आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत ही बातमी छापलेली नाही. या बातमीतील हवाईसुंदरीचा चेहरा लपविलेला आहे व तिचे नाव देखील छापलेले नाही. या बातमीतील हवाईसुंदरीची ओळख लपविण्याची काय आवश्यकता होती ते समजले नाही. "सकाळ" सारख्या मोठ्या वृत्तपत्राने व इतर माध्यमांनी या बातमीची अजिबात दखल घेतलेली नाही. लोकसत्ता व मटा यांना शिवसेनेविषयी असलेला मृदु कोपरा सर्वश्रुत आहे. या दोन्ही वृत्तपत्रांच्या आंतरजाल आवृत्तीत जवळपास रोज "सामना"च्या अग्रलेखाचे पुनर्छापन केलेले असते व त्याबरोबर "उद्धव ठाकरेंचा मोदींवर सणसणीत प्रहार", "शिवसेनेने भाजपचे वाभाडे काढले", "उद्धव ठाकरेंचा फडणविसांना सणसणीत टोला" असे कौतुकोद्गारही असतात. "सामना"चे अग्रलेख म्हणजे बळवंतराव टिळकांनी लिहिलेले "केसरी"चे अग्रलेख किंवा आचार्य अत्र्यांनी लिहिलेले "मराठा"चे अग्रलेख आहेत अशी यांची समजूत असावी. फक्त याच दोन वृत्तपत्रात हवाईसुंदरीची ओळख लपवून ही बातमी छापून यावी याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही (सकाळ, इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, हिंदू इ. माध्यमांनी या बातमीची अजिबात दखल घेतलेली नाही. निदान माझ्या पाहण्यात तरी आलेले नाही.). गायकवाडांविरूद्ध सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना मुद्दाम अशी संदिग्ध बातमी छापून शिवसेनेबद्दल असलेल्या संतापाच्या धारेची तीव्रता कमी करण्याचा हा प्रयत्न असावा. ३) समजा हवाईसुंदरीच्या दाव्यानुसार गायकवाडांना कर्मचार्याने अपशब्द उच्चारले व त्याची प्रतिक्रिया म्हणून गायकवाडांनीही चार शब्द सुनावले, परंतु मारहाण वगैरे झाली नाही इ. गोष्टी क्षणभर खर्या मानल्या तरी इतक्या उशीरा हे स्पष्टीकरण देऊन काहीही उपयोग नाही. प्रसंग घडला त्याच दिवशी हवाईसुंदरीकडून हे स्पष्टीकरण आले असते तर गायकवाडांच्या विरोधात इतका संताप निर्माण झाला नसता. परंतु प्रसंग घडल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना गायकवाडांनी मोठी फुशारकी दाखवून आपण कर्मचार्याला २५ वेळा सँडलने मारले, भविष्यात पुन्हा अशाच प्रसंगात अशीच मारहाण करीन, ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही, आपण शिवसेनेचे खासदार आहोत अशा बढाया मारल्या होत्या. आपण जणू काही पानपताची लढाई जिंकून आलो आहोत असा आविर्भाव त्यांच्या बोलण्यात होता. आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप किंवा खंत तर सोडाच, उलट त्यांना अभिमान वाटत होता. त्यांच्या अत्यंत संतापजनक, उर्मट बोलण्यामुळे त्यांच्याविरूद्ध मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आणि आता या हवाईसुंदरीच्या दाव्यानंतर सुद्धा त्यांच्याविरूद्द असलेल्या संतापाची धार कमी होणार नाही. ४) शिवसेनेच्या फुफु (फुसक्या फुशारक्या) संस्कृतीप्रमाणे यांच्या फुशारक्या देखील फुसक्या निघाल्या. विमान कंपन्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकल्यानंतर, "माझ्याकडे आज दुपारी ४ च्या फ्लाईटचे तिकीट आहे व मी विमानातून मुंबईला प्रवास करणारच. बघतोच मला कोण अडवतो ते." अशा पोकळ बढाया त्यांनी मारल्या होत्या. प्रत्यक्षात ते घाबरले व विमानतळावर ते फिरकलेच नाहीत. विमानाऐवजी गुपचूप आगगाडीने ते मुंबईला रवाना झाले. अर्थात आगगाडीतही त्यांना वार्ताहरांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे वापीलाच आगगाडीतून उतरून खाजगी मोटारीने ते मुंबईकडे रवाना झाले. तेव्हापासून या क्षणापर्यंत ते लपून बसले आहेत. वार्ताहरांसमोर शूरपणाचा आव आणून मारलेल्या फुशारक्या शेवटी पोकळच ठरल्या. अशा व्यक्तीने किंवा इतरांनी त्याच्या बाजूने आता काहीही स्पष्टीकरण दिले तरी उपयोग नाही. आपल्या कृत्यामुळे व नंतर मारलेल्या उर्मट बढायांंमुळे त्यांची भरपूर बदनामी झालेली आहे आणि आता त्यातून सुटका नाही. _______________________________________________________________________ मुनीवर्य आणि विशुमित, पळून न जाता प्रतिसाद दिल्याने तुमचा हिरमोड झाला असेल व तुमच्या आनंदावर मी विरजण घातले याची मला कल्पना आहे.श्री एन आर नारायण मूर्ती सारखा वादातीत आणि राजकारणी नसलेला मनुष्य राष्ट्रपती म्हणून निवडावा.खरं तर सचिन तेंडुलकरला राष्ट्रपती करावे. तो कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. वागणुकीने अतिशय सभ्य व सुसंस्कृत आहे. कोणताही गाजावाजा न करता तो खासदारनिधीचा अत्यंत योग्य विनियोग करीत आहे. अशी व्यक्ती राष्ट्रपतीपदी असणे देशासाठी भूषणावह ठरेल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर एक अत्यंत सुयोग्य राष्ट्रपती भारताला मिळेल. हे वाचल्यानंतर सचिनबद्दलचा आदर व अभिमान द्विगुणित झाला.कन्हैय्या प्रकरणानंतर देशाच्या संसदभवनावर हल्ला करून, संसदभवन उडवून देणे किंवा कदाचित फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे मंत्रीमंडळ ओलिस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे असे भयंकर प्रकार करायचा इरादा असलेल्या कटात सहभागी असलेल्या हरामखोराचा काही विचारवंत (इथेही आहेतच असे महाभाग) उदोउदो करतात, भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत शांत बसणार नाही वगैरे गोष्टी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपवतात याला सामान्य भारतीयांचा पाठिंबा मिळणे कदापि शक्य नाही.हा लेख वाचा. यातील काही मुक्ताफळे -संघप्रणीत विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोदींच्या सत्ताकाळात नको तेवढे उत्साहात आहेत आणि संघाच्या विचारापासून दूर असणाऱ्यांची वैचारिक नाकेबंदी करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. दुर्दैव याचे की त्यांच्या या धुडगुसाला केंद्र सरकारची साथ आहे. प्रथम पुण्याची एफटीटीआय ही संस्था अशा राजकीय हस्तक्षेपापायी रसातळाला गेली.एफटीआयआय रसातळाला गेली म्हणजे नक्की काय झाले असावे? गजेंद्र चौहानांची नेमणूक होण्यापूर्वी २००८ च्या बॅचचे टगे तिथे ७ वर्षे मुक्काम ठोकून होते. ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम ७ वर्षे घालविल्यानंतर सुद्धा त्यांनी पूर्ण केला नव्हता आणि तेच टगे गुणवत्तेच्या गफ्फा हाणत होते. गजेंद्र चौहांनानी व्यवस्थित योजना आखून २०१६ मध्येच या विद्यार्थ्यांची अॅसेसमेंट करून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करायला लावला. तिथे अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करून प्रस्थापित टग्यांच्या मुजोरीला आळा घातला. असे करणे म्हणजे रसातळास जाणे असावे. विद्यापीठ विस्कळीत झाले म्हणजे नक्की काय झाले असावे?नालंदा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व देशातील सध्याचे एकमेव नोबेल विजेते डॉ. अमर्त्य सेन यांचा नको तसा पाणउतारा स्मृती इराणी या संशयित पदवीधर मंत्रीणबार्इंनी करून त्यांना घालविले. परिणामी त्या ऐतिहासिक महत्त्वाचे विद्यापीठ नासले.अमर्त्य सेन हे वेगळेच प्रकरण आहे. २०१२ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी मनमोहन सिंगांनी त्यांना नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमले. त्याच विद्यापीठात मनमोहन सिंगांच्या मुलीची भक्कम पगारावर इतिहास विभाग प्रमुखपदी नेमणूक करून अमर्त्य सेनांनी मनमोहन सिंगांनी केलेल्या उपकारांची परतफेड केली. त्यांची कुलगुरूपदाची ३ वर्षांची मुदत २०१५ मध्ये संपली. ती मुदत संपली तेव्हा त्यांचे वय ८१ होते व त्यांना अजून एक ३ वर्षांची टर्म हवी होती. परंतु मोदींनी त्यांना मुदतवाढ न देता नवीन कुलगुरूची नेमणूक केल्यावर त्यांना संताप अनावर झाला. माझ्यावर अन्याय झाला, विद्यापीठात यांना उजव्या विचारांची माणसे बसवायची आहेत असा कांगावा त्यांनी सुरू केला. जर मोदींना ते नको असते तर मोदींनी २०१४ मध्येच त्यांना काढले असते. तसे न करता मोदींनी त्यांची ३ वर्षाची टर्म पूर्ण होऊन दिली. वयाच्या ८१ व्या वर्षी या व्यक्तीचा पदाचा मोह सुटत नव्हता. जर मोदींनी विद्यापीठात उजव्या विचारांची माणसे बसवायची होती तर त्यात काय चूक आहे? उजव्या विचारांची माणसे नालायक व डाव्या विचारांची माणसे सर्वगुणसंपन्न असे काही असते का? मनमोहन सिंगांनी त्यांना इतक्या वृद्धापकाळात पद दिले ते आपली माणसे घुसडण्याचे कृत्य नव्हते का?दिल्ली विद्यापीठात डाव्या विचारांची स्टुडण्ट्स फेडरेशन आणि विद्यार्थी परिषद यांच्यात गेले काही महिने सरळसरळ हाणामारी सुरू आहे आणि सरकारने त्यातल्या डाव्या विचारांच्या काही तरुणांना तुरुंगातही पाठविण्याचा अविचार केला आहे. (त्यातून उदयाला आलेले कन्हैयाकुमारचे बुलंद नेतृत्व, त्याला अद्याप थोपविता आले नाही ही बाब वेगळी) कानपुरातही डावे-उजवे हा राडा झाला व तोच अलाहाबाद आणि कोलकात्यातही झाला.डाव्या विद्यार्थी संघटनांना आजवर आव्हान मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांची टगेगिरी निरंकुश सुरू होती. जनेवि मध्ये भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा देणे, अफझल गुरू या महात्म्याचा महानिर्वाण दिन साजरा करणे यात यांना काहीच वावगे वाटत नाही. कन्हैयाकुमारचे बुलंद नेतृत्व वगैरे वाचून हसू आवरले नाही. त्याने विद्यापीठात चारचौघांसमोर (त्यात मुलीसुद्धा होत्या) भर रस्त्यात पोस्ट उघडून लघुशंका केली हे यांच्या मते बुलंद नेतृत्वाचे उदाहरण असावे.