Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी : भाग ४

स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 08:28
🗣 309 प्रतिसाद
आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही. ------------------------------------------------ अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती.... 1 इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्‍या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))

प्रतिक्रिया द्या
62214 वाचन

💬 प्रतिसाद (309)
श
श्रीगुरुजी Mon, 03/20/2017 - 10:27 नवीन
योआ हे सलग पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आले असले तरी ते भडक जातीयवादी भाषणे, धार्मिक ध्रुवीकरण, लव्ह जिहादला विरोध, गोरक्षा आंदोलन इ. साठीच कुप्रसिद्ध आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव देखील अजिबात नाही. अशा व्यक्तीला उ. प्र. सारख्या गुंतागुंतीच्या राज्यात मुख्यमंत्रीपदावर नेमणे योग्य नाही. मोदी जेव्हा २००२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच झाले होते तेव्हा त्यांनाही प्रशासकीय अनुभव अजिबात नव्हता. किंबहुना ते त्यापूर्वी एकही निवडणुक लढलेले नव्हते. परंतु त्यांच्याबद्दल इतर कोणतेही आक्षेप नव्हते कारण त्यांची पाटी कोरी होती. परंतु योआंचा मागील १९ वर्षांचा इतिहास वादग्रस्त आहे. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा जातीयवाद, ध्रुवीकरण असे अनेक आक्षेप त्यांच्याबद्दल होते. परंतु त्यांनी २०१४ च्या निवडणुक प्रचारात व त्यानंतरही अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हिंदुत्ववाद, जातीयवाद असे वादग्रस्त मुद्दे बहुतांशी दूर ठेऊन फक्त विकास व भ्रष्टाचारमुक्त शासन याच मुद्द्यांवर प्रचार केला होता. ते पंतप्रधान झाल्यानंतर योआ, गिरीराज सिंह, साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती इ. अनेक वादग्रस्त साधुसंन्यासी वादग्रस्त विधाने करीत असताना मोदींनी त्यांना प्रोत्साहन न देता विकासाच्या मुद्द्यांवरच लक्ष केंद्रीत केले होते. किंबहुना मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही मंडळी चेकाळून जिंगोइझमचे प्रदर्शन करीत होती. आता यांच्यातलाच एकजण मुख्यमंत्री झाल्याने ही मंडळी अधिक उन्मादी विधाने करण्याची दाट शक्यता आहे. योआ त्यांना प्रतिबंध घालू शकतील असे वाटत नाही कारण ते त्यांच्यातूनच आलेले आहेत. उ. प्र. ला धार्मिक ध्रुवीकरणाची आवश्यकता नसून इन्फ्रस्ट्रक्चर व विकासाची आवश्यकता आहे. शिवराजसिंग चौहान, नितीशकुमार, नवीन पटनाईक इ. नी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या प्रगतीवरच लक्ष केंद्रीत केल्याने मागील काही वर्षांत त्यांच्या राज्यांची परिस्थिती सुधारत आहे. उत्तर प्रदेश अजूनही खूप मागे आहे कारण मुलायम, मायावती, भाजप, काँग्रेस यांनी आपापला धार्मिक/जातीय अजेंडा पुढे रेटला होता. लालूने बिहारमध्ये १९९० ते २००५ या कालखंडात अशाच पद्धतीने यादव-मुस्लिम राजकारण करून स्वतःचे आसन शाबूत ठेवले होते, परंतु त्यामुळे विकास हा मुद्दा पूर्ण दुर्लक्षित राहिला. तिथे फक्त जातीयवाद व गुन्हेगारीची वाढ झाली. त्यामुळेच उ. प्र. व बिहार या राज्यातून हाताला फारसे काम नसलेल्यांचे लोंढे दिल्ली, मुंबई इ. शहरात स्थलांतरीत झाले व तिथेही कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला. परप्रांतीय स्थलांतरीत तर आता महाराष्ट्राच्या अगदी छोट्या शहरातही घुसले आहेत. हे सर्व कमी करायचे असेल तर उ. प्र. मध्येच उद्योगधंदे, रोजगार इ. मध्ये वाढ होणे आवश्यक आहे. धार्मिक ध्रुवीकरणातून उन्माद वाढू शकेल परंतु त्यातून उद्योगधंदे, रोजगार इ. मध्ये वाढ होणार नाही. योआ दुर्दैवाने लालूच्याच मार्गाने जाऊन उ. प्र. ला उलट दिशेने नेतील अशी भीति वाटत आहे. भाजपला उ. प्र. मधील ३१२ आमदार व ७३ खासदार यातून योआ हेच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लायक उमेदवार का वाटले असावे हे अनाकलनीय आहे. राजनाथ सिंह, दिनेश शर्मा, मजोज सिन्हा, केशवप्रसाद मौर्य असे तुलनेने अनेक जास्त लायक नेते उपलब्ध असताना योआंना मुख्यमंत्री बनविण्यामागे नक्की काय धोरण आहे ते समजत नाही. मोदींच्या विकाचाच्या अजेंड्याशी योआ हे पूर्णपणे विसंगत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
वरुण मोहिते Mon, 03/20/2017 - 10:52 नवीन
धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यवरून भाजप जिंकली आहे . विकासावरून नाही . त्यामुळे योगी आदित्यनाथ हे सर्वोत्तम ऑप्शन होते . अजून एक मोदींचा पण विकासाचा अजेन्डा वैग्रे काही नाही आहे ज्या त्या काळात जी कामे व्हायला हवी त्यावर स्वार होणे हा विकासाचा अजेंडा नसतो . काँग्रेस ची चतुराई भाजप दाखवत आहे . आम्हीच गरिबांचे तारणहार बोले कि संपलं. त्याला भावनिकतेची आणि विकासाची जोड द्यायची . जातीयवाद तर आहेच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नितिन थत्ते Mon, 03/20/2017 - 11:13 नवीन
>> मोदींच्या विकाचाच्या अजेंड्याशी योआ हे पूर्णपणे विसंगत आहेत. पहिल्या तीन शब्दांवर काही लोकांचा अजूनही विश्वास आहे ही मौजेची गोष्ट आहे. भाजप ने खरं तर या सर्व लोकांना स्पष्ट संदेश दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
म
मोदक Mon, 03/20/2017 - 11:29 नवीन
भाजपाने स्पष्ट संदेश काय दिला आहे म्हणे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 03/20/2017 - 11:35 नवीन
कसं बनवल !!! टुक टुक हाच आमचा खरा अजेंडा होता. उत्तरप्रदेशसारखे मोठे राज्य आता हाती आले आहे. आता आमचा खरा अजेंडा राबवणार. विकास म्हटल्यावर तुम्ही लोक आले आमच्या मागे. चला फुटा आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/20/2017 - 11:38 नवीन
मुसलमानांचे शिरकाण करणे हा खरा अजेंडा आहे असे म्हणायचे आहे का..? की राममंदिर उभे करायचे हा अजेंडा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गॅरी ट्रुमन Sun, 03/19/2017 - 13:10 नवीन
अपेक्षेप्रमाणे श्री.रा.रा संजय राऊत आदित्यनाथांच्या मुख्यमंत्रीपदी झालेल्या निवडीविषयी बोलले आहेत. आदित्यनाथांनी 'वादग्रस्त वक्तव्ये न करता केवळ विकासाचीच भाषा बोलावी' असा उपदेश या महाशयांनी केला आहे. त्यामुळे आयरनी परत एकदा शंभर नाही तर हजार मरणे मेली असेल. या पेंग्विनसेना वाल्यांचे समजत नाही. हे लेकाचे स्वतः कधीही विकासाची भाषा बोलणार नाहीत. महापालिका निवडणुकांच्यावेळी तुमचा नक्की पॉझिटिव्ह अजेंडा काय हा प्रश्न कित्येकवेळा विचारूनही हे त्याविषयी काहीही बोलायला तयार नव्हते (बरोबर आहे कसे बोलणार--- आड्यात नाही तर पोहार्‍यात कुठून येणार). सतत पेटवापेटवीची भाषा करणारे, काल्पनिक शत्रू उभे करून त्यांची भिती लोकांना दाखवून आपणच त्या काल्पनिक शत्रूंचे तारणहार म्हणून स्वतःला पुढे आणून मते मिळवणारे हे पेंग्विनसेनेचे लोक इतरांना उपदेश करायला मात्र सगळ्यात पुढे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 03/19/2017 - 13:30 नवीन
मला देखील योगी आदित्यनाथ ही व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून पचनी पडत नाहीये. तसेच २-२ उपमुख्यमंत्री कशाला केलेत ते देखील समजत नाहीये. २ उपमुख्यमंत्री असताना नक्की कुणाचा अधिकार मोठा हे कसे ठरते? पर्रीकरांनी गोव्यात परत जाण्याचा घेतलेला निर्णय अजिबात आवडलेला नाही. देशहित लक्षात घेऊन त्यांनी संरक्षण मंत्री ह्या पदावर काम करत राहणे योग्य होते असे वाटते. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून 'व्यापक देशहित' ह्या नावाखाली त्यांना दिल्लीत हलवले होते तर आता 'गोवा' हाताचे जाऊ नये म्हणून देशहिताला तिलांजली दिली असे समजावे का?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 03/19/2017 - 16:26 नवीन
राज्यात दोन उपमुख्यमंत्री होणे हा प्रकार यापूर्वीही झाला आहे. १९९३ मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार (अनेकांसाठी अनपेक्षितपणे) आले. त्यावेळी मुख्यमंत्री झाले दिग्विजयसिंग. त्यांच्या मंत्रीमंडळात सुरवातीला सुभाष यादव आणि प्यारेलाल कंवर हे दोन उपमुख्यमंत्री होते.
२ उपमुख्यमंत्री असताना नक्की कुणाचा अधिकार मोठा हे कसे ठरते?
घटनात्मक दृष्टीने उपमुख्यमंत्री असे कुठचे पदच नसल्यामुळे हा प्रश्न उभा राहू नये. त्यामुळे इतर सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना समकक्ष असे हे दोन उपमुख्यमंत्री असतील.
पर्रीकरांनी गोव्यात परत जाण्याचा घेतलेला निर्णय अजिबात आवडलेला नाही. देशहित लक्षात घेऊन त्यांनी संरक्षण मंत्री ह्या पदावर काम करत राहणे योग्य होते असे वाटते. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून 'व्यापक देशहित' ह्या नावाखाली त्यांना दिल्लीत हलवले होते तर आता 'गोवा' हाताचे जाऊ नये म्हणून देशहिताला तिलांजली दिली असे समजावे का?
तो निर्णय आपल्यासारख्यांना आवडला नाही हे नक्कीच. पर्रीकरांनी अधिक वरीष्ठ पातळीवर काम केले असते तर ते चांगले झाले असते. पण ते दिल्लीत फार खूष नव्हते हे उघडच होते. तसेच मधूनमधून पर्रीकरांना गोव्यात परत जायचे अशा स्वरूपाच्या बातम्याही येत असत. जर स्वतः पर्रीकरांची इच्छा नसेल तर त्याला कसलाच आणि कोणाचाच इलाज नाही. कोणालाही कितीही पात्रता असली तरी स्वतःच्या इच्छेविरूध्द एखाद्या पदावर काम केलेच पाहिजे अशी सक्ती कशा करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ग
गॅरी ट्रुमन Sun, 03/19/2017 - 16:15 नवीन
आजच्या लोकसत्तात गिरीश कुबेर यांनी काँग्रेस + डावे = भाजप हा लेख लिहिला आहे. एकंदरीत लेख गिरीश कुबेर स्टाईलच आहे त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करत नाही. पण याच लेखात त्यांनी एक तपशीलातील मोठी चूक केली आहे. त्यांनी म्हटले आहे--"बहुजन समाज पक्षाच्या केशव प्रसाद मौर्य यांनाही भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले म्हटले. इतकेच नाही, तर त्यांच्या हाती उत्तर प्रदेश राज्याची धुरादेखील दिली". एका आघाडीच्या दैनिकाचा संपादक अशी तपशीलातील एवढी मोठी चूक कशी करू शकतो हेच समजत नाही. केशवप्रसाद मौर्य हे बसपामधून आयात केलेले नेते नाहीत. ते पहिल्यापासून भाजपमध्येच आहेत. २०१४ मध्ये ते फूलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. लक्ष्मीकांत वाजपेयींनंतर त्यांना मागच्या वर्षी उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष बनवले गेले. तर बसपामधून भाजपमध्ये आयात झालेले 'स्वामीप्रसाद मौर्य' आहेत (केशवप्रसाद नव्हे). हे स्वामीप्रसाद मौर्य २०१२ ते २०१६ या काळात उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. कुबेरांनी या दोन मौर्यांमध्ये गोंधळ घातला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये झारखंड विधानसभा निवडणुक झाल्यानंतर झारखंडमध्ये काँग्रेसचे जोगी हे नेते होते असे बिनदिक्कतपणे कुबेर यांनी सांगून टाकले होते. वास्तविकपणे हे जोगी (अजित जोगी) झारखंडमधील नव्हे तर छत्तिसगडमधील काँग्रेसचे नेते होते (आता ते काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे). तसेच ते छत्तिसगडचे मुख्यमंत्रीसुध्दा होते. तपशीलातले इतके मोठे घोळ लोकसत्तासारख्या दैनिकाच्या संपादकांकडून नक्कीच अपेक्षित नाहीत. एकूणच गिरीश कुबेर यांच्यामुळे लोकसत्ताविषयीचे पूर्वीचे मत होते ते खराब झाले आहे. पूर्वी त्यांचे लेख बरे वाटायचे पण गेल्या चारेक वर्षांपासून अगदीच सुमार दर्जाचे लेख त्यांनी पाडले असे वाटायला लागले. विशेषतः याकूब मेमनच्या फाशीनंतरचा त्यांचा लेख आणि मदर तेरेसांवरचा लेख लिहून 'धार्मिक भावना दुखावू नयेत' म्हणून मागे घ्यायचा पळपुटा प्रकार अजिबात आवडला नव्हता.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 03/19/2017 - 17:03 नवीन
मदर तेरेसांवरचा लेख लिहून 'धार्मिक भावना दुखावू नयेत' म्हणून मागे घ्यायचा पळपुटा प्रकार अजिबात आवडला नव्हता --- हा लेख मागे घेण्याचा प्रकार जाणीवपूर्वक केला होता असे ऐकिवात आले. तसे केल्याने लेखाची जास्त प्रसिद्धी झाली, खूप लोकांनी तो वाचला आणी आपला विचार कुबेरांना/लोकसत्ताला जास्त जनतेपर्यंत पोचवता आला. खरे खोटे फक्त गिरीश कुबेर आणी लोकसत्ता जाणो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रसाद_१९८२ Mon, 03/20/2017 - 06:38 नवीन
लोकसत्ता आणि त्याचे संपादक गिरिष कुबेर हा माणूस एक नंबरचा कॉंग्रेसी भाट आहे, परवा "‘ती’ तगायला हवी.." ह्या अग्रलेखात ह्या भाटाने भाजपाला मतदान करणार्‍या सर्व मतदारांना मोदींचे भक्त व बौद्धिक पात्रता नसलेला मतदारवर्ग असे सरसकट सर्टीफिकेट देऊन टाकले. त्या अग्रलेखात हा भाट म्हणतो-- परंतु आंधळ्या मोदीप्रेमात वाहून गेलेला मतदारांचा एक वर्ग विरोधकांच्या टीकेस भीक घालावयास तयार नाही. या आंधळ्या मतदारांच्या मते सध्या काही तरी भरीव घडवून दाखवण्याची क्षमता असलेला एकमेव नेता राजकीय रणांगणावर आहे. तो म्हणजे मोदी. अर्थात हे काही तरी भरीव म्हणजे काय हे सांगण्याची बौद्धिक पात्रता या मतदारवर्गात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
L
lakhu risbud Mon, 03/20/2017 - 09:30 नवीन
आजच्या लोकसत्ता मध्ये लालकिल्ला आणि अन्वयार्थ या दोन सदरात परस्पर विरोधी दावे केलेत. एकात म्हटलंय मोदी-शहांना आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय दबावाखाली घेण्यास भाग पाडले गेले आणि एकात म्हटलंय की मोदी-शहांनी दबावाखाली हा निर्णय नक्कीच घेतला नाही. भंजाळलाय कुबेर आणि लोकसत्ता पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
श
श्रीगुरुजी Mon, 03/20/2017 - 10:59 नवीन
'ती' अजिबात तगायला/जगायला नको. 'ती' म्हणजे भ्रष्टाचार, 'ती' म्हणजे गुन्हेगारी, 'ती' म्हणजे जातीयवाद, 'ती' म्हणजे मुस्लिमांचे लांगूलचालन, 'ती' म्हणजे देशद्रोह्यांना पाठिंंबा . . . 'ती'ने ६५ वर्षांत वाट लावली आहे. अशी 'ती' जितक्या लवकर संपेल तितके भारतासाठी चांगले होईल. निदान 'ती'च्या सध्याच्या स्वरूपात तरी 'ती' जिवंत रहायला नको. भारतात एकवेळ विरोधी पक्ष नसला तरी चालेल, परंतु 'ती' विरोधी पक्षाच्या भूमिकेत सुद्धा नको. आपण जगायचे का मरायचे हे 'ती'नेच ठरवायला हवे व त्यानुसार 'ती'ने स्वतःला बदलायला हवे. 'ती' तगेल/जगेल का याची इतरांनी काळजी करण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
पुंबा Mon, 03/20/2017 - 07:13 नवीन
योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदावरची निवड ही मोदींची अपरिहार्यता वाटते. लोक अश्या आक्रमक हिंदुत्ववादाला भुलतील का ह्याची चाचपणी करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. लोकांना विकासाचे गाजर दाखवले तर खरे मात्र प्रत्यक्षात विकासाची फळे चाखायला अधीर झालेल्या लोकांना २०१९ साली परत त्याच जुमल्यांचा मोह पडणार नाही याची शहा-मोदींना कल्पना आहे. अर्थव्यवस्थेत मुलभूत सुधारणा, मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात नोकर्‍यांची निर्मीती, शिक्षण, शेती, आरोग्य या क्षेत्रात अमुलाग्र सुधारणा, राष्ट्रिय हित केंद्रीत परराष्ट्र धोरण आदी गोष्टींची पुर्तता झाली नाही तर लोक निराश होऊन परत काँग्रेसकडे वळतील की काय याची साधार भिती भाजप व संघाला आहेच. मात्र जर आक्रमक हिंदूत्वावर मते मिळणार असतील तर तेच धोरण म्हणून अवलंबले जाईल याची शक्यता वाटते. योगींची प्रतिमा, त्यांची अत्यंत निरर्गल विधाने, त्यांच्यावरचे गुन्हे, त्यांची प्रायव्हेट आर्मी या सगळ्यांकडे मोदी अ‍ॅसेट म्हणून बघत नसतीलच याची खात्री वाटत नाहीये. तसंही, योगींकडे २०२४ सालासाठी पंप्रपदाचा उमेदवार म्हणून बघत असल्याच्या बातम्या येतच आहेत. सध्यापुरतं योगींचं अभिनंदन, उत्तरप्रदेशमे रेहना है, तो योगी योगी केहना होगा.
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Mon, 03/20/2017 - 09:33 नवीन
परत काँग्रेसकडे वळतील की काय याची साधार भिती भाजप व संघाला आहेच. त्या आघाडीवर चिंता नसावी,लोक काँग्रेस कडे वळणार नाहीत याची खबरदारी खुद्द कुमार राहुल गांधी जातीने लक्ष घालून घेत आहेत याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
संजय क्षीरसागर Mon, 03/20/2017 - 11:20 नवीन
हे खरंच डेंजर आहे. मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहे. आधीच देश लोकसंख्या, भ्रष्टाचार आणि जातीवादाच्या विळख्यात आहे. हे राममंदीर म्हणजे नवी आणि कायमची डोके दुखी होणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
न
नितिन थत्ते Mon, 03/20/2017 - 11:27 नवीन
>> मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहे. फारच पॉझिटिव्ह विचार करता बुवा तुम्ही !! त्यांची निवड त्यांनी १५ वर्षांपूर्वी सिद्ध केलेल्या क्रेडेन्शिअलमुळे झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मोदक Mon, 03/20/2017 - 11:35 नवीन
मग याच न्यायाने १९८४ सालच्या क्रेडेंशिअलमुळे १९९९ साली काँग्रेसचे सरकार सत्तेत हवे होते. =)) बाकी २०१४ चे घाव अजुन ताजे आहेत हे बघून करमणूक होत आहे. सध्याची परिस्थिती आहे तसेच राजकारण राहिले तर २०२४ पर्यंत आंतरजालीय अश्वत्थामा पदाला नक्की पोहोचाल याची खात्री आहे.. (ह घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 03/20/2017 - 11:38 नवीन
>>१९९९ साली काँग्रेसचे सरकार सत्तेत हवे होते. ८४ चे क्रेडेन्शिअलवाले ९१ मध्ये खपले म्हणतात !!! ९९ मध्ये कसं निवडून येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/20/2017 - 11:55 नवीन
चला.. म्हणजे राजीव गांधींनी शिखांचे शिरकाण केले हे तरी मान्य केलेत..!! हे ही नसे थोडके..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 03/20/2017 - 11:39 नवीन
>>२०१४ चे घाव अजुन ताजे आहेत हे बघून करमणूक होत आहे. २०१४ च्या जुमल्यांवर अजून विश्वास आहे हे बघून आमची पण करमणूक होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/20/2017 - 11:56 नवीन
२०१४ च्या जुमल्यांवर अजून विश्वास आहे डोळे उघडे ठेवून वावरले की विश्वास बसतो. तुम्ही पेडगांवची एस्टी पकडली त्याला आंम्ही काय करणार. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मोदक Mon, 03/20/2017 - 11:27 नवीन
मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहे. हे कधी झाले म्हणे..?? २०१४ च्या प्रचारा दरम्यान "गुजरात मॉडेल" वगैरे कांही कानावर आले होते का तुमच्या..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 03/20/2017 - 11:28 नवीन
मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहे
याला काही संदर्भ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 03/20/2017 - 11:53 नवीन
मी २०१४ लाच बोल्लेलो. हा माणूस लफडा करणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 03/20/2017 - 18:03 नवीन
तुम्ही काय बोलताय हे स्पष्ट कराल का? तुमचं वरचं वाक्य, तो विडिओ आणि त्याखालाची २०१४ वाली प्रतिक्रिया यांचा एकमेकांशी काहीही संबंध दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
पुंबा Mon, 03/20/2017 - 07:34 नवीन
दलित स्वाभिमानाचे सुयोग्य प्रकटन
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 03/20/2017 - 09:26 नवीन
मणीपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांच्या मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला आहे. ६० सदस्यांच्या विधानसभेत ठरावाच्या बाजूने ३२ मते आली.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Mon, 03/20/2017 - 10:06 नवीन
योगी आले तर ? वेळ द्या कि .. सगळ्यांना वेळ द्यायला हवा . जो लोकशाही प्रक्रियेत निवडून येतो त्या सगळ्यांना . बाकी गिरीश सर अति हुशार होण्याच्या कॅटेगरीत गेलेत किंवा अंदाज आहे टाइम्स चे जैन आणि गोयंका या विरुद्ध हि लढाई नेहमीच असते .
  • Log in or register to post comments
म
मोहन Mon, 03/20/2017 - 12:11 नवीन
एक समजत नाही. मोदी आणि त्यांची टीम अनेक धाडसी , सामान्यांच्या अपेक्षेपेक्षा / आकलनापेक्षा वेगळे निर्णय धडाक्यात घेतात व ते तडीसही नेतात. आपल्याला जे जाणवते आहे - यो.आ.चे प्रॉब्लेमस वगैरे ते त्यांना कळले नसतील का? स्वता:च्या पायावर कुर्हाड मारण्यातले मोदी वाटतात का? मला तरी मोदींच्या सगळ्या चाली ह्या एका मोठ्या प्लानचा भाग असल्याचे वाटत राहते जो सामान्यांच्या आकलना बाहेर आहे. विश्वास एवढाच की तो प्लान देशाच्या फायद्याचा नक्कीच असेल. ह्याला ज्या दिवशी तडा जाईल तेंव्हां मोदींना भीरकवून देण्याची क्षमता भारताच्या जनतेत नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 03/20/2017 - 12:32 नवीन
सहमत..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहन
व
विशुमित Mon, 03/20/2017 - 12:28 नवीन
ती हत्तीणीबाई, ती मुलायम पार्टी चालली इतक्या दिवस मग योगींचा पण अनुभव घेतला पाहिजे जनतेने. काही विशेष फरक पडणार नाही भारतीय राजकारणावर. सामान्य जनतेला नक्की काय हवंय याची अचूक नस मोदींना सापडली आहे. त्यामुळे अजून ७ वर्ष असेच चालेल. नंतर येणारे कदाचित मागच्या १० वर्षाला दूषणे देत बसतील आणि विरोधात बसणारे आयत्या पिटावर रेघोट्या मारत आहेत म्हणून सत्ताधाऱ्याना हिणवतील. बाकी काल शपथ विधी समारंभ पाहिला. योगीजीं खूप नर्वस वाटले. पुढील वाटचालीला त्यांना शुभेच्छा..!!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 03/20/2017 - 13:30 नवीन
योगीजीं बद्दल मीडिया प्रतिमा रंगवली जातीय तशी नसावी बहुदा. शितावरून भट कसा शिजेल ते कळेलच लवकर. http://www.loksatta.com/desh-videsh-news/yogi-adityanth-gorakhpur-constituency-what-muslim-think-about-yogi-1436292/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Mon, 03/20/2017 - 15:41 नवीन
लष्करात असताना उत्तरप्रदेशात प्रत्यक्ष राहून पाहिलेली स्थिती आणि आजही असंख्य मित्र तेथे आहेत( माझे दोन्ही रूम पार्टनर उत्तरप्रदेशातीलच होते. आग्रा आणि लखनौ) त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कात असल्याने मला जे एक चित्र डोळ्यापुढे उभे राहिलेले आहे ते असे. उत्तर प्रदेशात मुस्लिम लांगुलचालन करण्यात काँग्रेस सपा आणि बसपा यांनी कोणतीही कसर कधीही सोडलेली नव्हती. यामुळे तेथील मुल्ला मौलवींना (यात गरीब सर्वसामान्य मुसलमान येत नाहीत) एक तर्हेचा माज होता कि कोणतेही सरकार येवो आम्ही "म्हणू तसे करून दाखवू" शकतो. त्यात तीन तलाक (आणि बहुपत्नीत्वालाला) उघड विरोध करण्याची श्री मोदी आणि अमित शाह यांनी हिम्मत दाखवल्यामुळे अर्धशिक्षित मुसलमान महिलांनी थोड्या प्रमाणावर का होईना भाजपाला मतदान केले आहे. तलाक पीडित महिला आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईक महिला यांनी त्यांची वाताहत जवळून पाहिल्यामुळे त्यांनी असे मतदान केले असावे. नवरा रागाच्या भरात केंव्हाही तलाक देईल या डेमोक्लीसची तलवार डोक्यावर लटकत अर्धे आयुष्य काढणाऱ्या गरीब मुसलमान स्त्रियांना हा दिलासा वाटला असण्याची शक्यता आहे. त्यातून पूर्वी मुलायम सिंहांचे आणि आता अखिलेशचे सपाचे सरकार हे निर्लज्ज पणे यादव या जातीला सरकारी नोकऱ्या किंवा खिरापती वाटणे झुकते माप देत होते. पोलीस भरती मध्ये केवळ यादव आडनाव असल्याने नियम डावलून असंख्य यादवांना भरती केले होते इतके निर्लज्ज पणे जातीयवाद करणारे लोक हे सेक्युलर म्हणून म्हणवले जातात याची शरम वाटेल. http://www.dnaindia.com/india/report-up-government-to-appointment-35000-cops-without-written-test-2150737 http://www.amarujala.com/india-news/high-court-stays-on-up-police-constable-recruitment-process http://timesofindia.indiatimes.com/india/Yadavization-of-UP-cops-behind-anarchy/articleshow/36165826.cms येन केन प्रकारें यादव लोकांना पोलिसात भरती करण्याची हि निर्लज्ज कसरत अखिलेश यादव ना महागात पडली असेच दिसत आहे शिवाय त्यांची अंतर्गत लाथाळी मुलायम वि अखिलेश लोकांना न पटणारी होती. मायावतींच्या भ्रष्टचारातुन मिळवलेल्या संपत्तीचे उघड किळसवाणे प्रदर्शनहि लोकांच्या डोळ्यात येत होते. त्यांच्या प्रसादतुल्य राजवाड्याचे प्रदर्शन आणि त्याचे दलित स्त्रीने असे वैभव मिळवले हे लोकांच्या डोळ्यात खुपते हे निर्लज्ज समर्थन हि लोकांना न पटणारे होते. अखिलेश यादव यांची तुलना लोक बाजूच्या नितीश कुमार आणि श्री मोदी यांच्याशी करत असताना अखिलेश कुमार फिके पडताना दिसत. अशा सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून आनि श्री अमित शाह यांचे "यादव सोडून इतर मागास जाती(OBC) आणि जातव सोडून अन्य मागासवर्गीय जाती(SC) याना चुचकारून आपल्याकडे वळवून घेणे या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे एवढ्या प्रचंड मताधिक्याने भाजप निवडून येणे हे आहे. अमित शाह यांचे बेरजेचे गणित कितीदा अचूक निघेल याची त्यांना स्वतःला सुद्धा कल्पना नसावी. एकही मुसलमान उमेदवाराला तिकीट न देता भाजप प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याने तेथील मुसलमान नेते आणि मुल्ला मौलवि हे सध्या बावचळलेल्या स्थतीत आहेत. जर ११ मे च्या शेवटच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक घटनाबाह्य आहेत असा निकाल दिला तर त्याची ताबडतोब अंमलबजावणी करून भाजप ला त्याचे पूर्ण श्रेय हि घेता येईल. भाजप ला इतके मोठे बहुमत मिळाल्यामुळे आणि दहा लाख मुसलमान महिलांनी तीन तलाक विरुद्ध अर्जावर सह्या केल्याने http://www.timesnow.tv/india/article/over-1-million-muslim-women-sign-petition-to-abolish-triple-talaq/57720 आता मणिशंकर अय्यर सारखा हलकट माणूस सुद्धा तीन तलाक विरुद्ध उभा राहिला आहे. शाहबानो खटल्याविरुद्ध घटना दुरुस्ती करणारे हेच लोक आता मुस्लिम वैयक्तिक कायदा घटनेच्या आणि मूलभूत मानवी अधिकाराच्या विरुद्ध आहे अशी कोल्हेकुई करताना पाहून मौज वाटते. http://indianexpress.com/article/india/sc-should-come-out-with-positive-verdict-on-triple-talaq-says-mani-shankar-aiyar-4577700/ हे श्रेय घेऊन जर भाजप २०१९ च्या निवडणुकीत मुसलमान महिलांची ३० % मते जरी मिळवण्यात यशस्वी झाले तर आपल्याला रस्त्यावर यावे लागेल या भीतीने काँग्रेस सपा आणि बसपा सध्या भयभीत अवस्थेत आहेत. मायावतीना राज्यसभेत निवडून येण्यासाठी पुरेसे आमदार नसल्याने कुणाकडे तरी भीक मागावी लागणार आहे, पण उघड्याकडे नागडा गेला अशी स्थिती इतर पक्षांची असल्याने आपले काय होणार याची चिंता त्यांना आजच भेडसावते आहे. योगी आदित्यनाथ हे जरी कडवे हिंदूत्ववादी असले तरीही त्यांना तोंड गप्प ठेवायला सांगितले असून त्यांना दोन वर्षे दिली आहेत. २०१९ च्या लोकसभेत जर त्यांना उत्तर प्रदेशात बहुतेक सीट टिकवत्या आल्या तर त्यांना पुढचे दिवस सत्तेत राहता येईल असे सांगितले गेले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संजय क्षीरसागर Mon, 03/20/2017 - 16:34 नवीन
पण योगी आदित्यनाथ हा पार कपड्यांपासून भगवा आणि एकदम भडक माणूस आहे. मोदींची सुद्धा राममंदीर बांधाल्याशिवाय आपली कारकिर्द व्यर्थ ही भावना आहेच. या भानगडीत ते राममंदीर ही देशाला नवी डोके दुखी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Tue, 03/21/2017 - 05:49 नवीन
<<<त्यातून पूर्वी मुलायम सिंहांचे आणि आता अखिलेशचे सपाचे सरकार हे निर्लज्ज पणे यादव या जातीला सरकारी नोकऱ्या किंवा खिरापती वाटणे झुकते माप देत होते.>>> -- या कारणामुळेच सपा आवडत नव्हती. त्यांच्यापेक्षा योगीजीं परवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पुंबा Tue, 03/21/2017 - 06:06 नवीन
सुबोधजी, शेवटची दोन वाक्ये सोडून बाकीचा प्रतिसाद एकदम योग्य आहे. योगींचे उपद्रवमुल्य खूप आहे हो. ते असे अमीत शहा- मोदींना घाबरणारे नाहीत. On the contrary, through his rabble rousing and militant hindu fanaticism, he weild more power. अर्थात असे झाले नाही तर आनंदच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Mon, 03/20/2017 - 13:32 नवीन
a
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 03/20/2017 - 13:51 नवीन
सौरा,
ती असा विचार करावा लागण्याचे समर्थन करत नाहीये किंवा असा विचार करावा असं म्हणत नाहीये.
मीही उपरोधानेच लिहिलंय! :-) म्हणे गप्प बसणं बॉलीवूडला भोवतंय! च्यायला, दाऊदच्या पैशावर मजा मारणं कधी नाही भोवलं ते बॉलीवुडास? लोकभावना पायदळी तुडवल्या गेल्याचा प्रखर अनुभव आला की आपोआप अक्कल येते. लकडीशिवाय मकडी वळंत नाही हेच खरं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 03/20/2017 - 14:28 नवीन
गापै, दाऊदच्या पैशावर चालणार्‍या बॉलीवूडविरूद्ध लोकभावना होती का? मग संजय दत्त, सलमान खान वगैरे दाऊदशी थेट संबंध वगैरे ठेवणार्‍या स्टार्सचे चित्रपट असे सुपर डूपर हीट कसे व्हायचे हो? मग तेव्हा विरोध न केलेल्या जनतेच्या आता केलेल्या विरोधाला किंमत का द्यावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रसाद_१९८२ Mon, 03/20/2017 - 14:50 नवीन
आज हि बातमी पाहिली वर्तमान पत्रात. Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 03/21/2017 - 06:21 नवीन
एकूणच प्रशांत किशोर या मनुष्याला गरजेपेक्षा जास्त चढविले गेले होते हे अगदी सुरवातीपासूनच वाटत होते. अनेकांना २०१४ मध्ये मोदी जिंकले ते प्रशांत किशोरमुळेच असे वाटायला लागले होते. त्याविषयीचा साधा प्रश्न--- प्रशांत किशोर इतके पॉवरफूल असते तर त्यांनी स्वतःलाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणून स्वतःच ३०० सीट्स का आणल्या नाहीत? ती मोदींची लाट होती प्रशांत किशोरची नव्हती. प्रशांत किशोरमुळे प्रचाराला दिशा नक्कीच मिळाली पण त्याच्यामुळे सव्वातीनशे पेक्षा जास्त सीट्स एन.डी.एला आल्या हे म्हणणे कैच्याकै झाले. काही लोक चांगल्या घोडे कुठचे हे इतरांपेक्षा लवकर लक्षात घेतात आणि त्यावर पैसे लावतात. प्रशांत किशोरने २०१४ मध्ये मोदी आणि २०१५ मध्ये नितीश कुमार या चांगल्या घोड्यांवर असेच केले. पण उत्तर प्रदेशात राहुल गांधी या बद्दू घोड्याला पहिले कसे आणणार? तिथेच प्रशांत किशोरची मर्यादा उघड झाली. या निवडणुकांमध्ये अनेक फुगे फुटले त्याप्रमाणेच प्रशांत किशोर या फुग्यालाही टाचणी लागली हे चांगलेच झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ग
गामा पैलवान Mon, 03/20/2017 - 18:38 नवीन
सौरा,
दाऊदच्या पैशावर चालणार्‍या बॉलीवूडविरूद्ध लोकभावना होती का? मग संजय दत्त, सलमान खान वगैरे दाऊदशी थेट संबंध वगैरे ठेवणार्‍या स्टार्सचे चित्रपट असे सुपर डूपर हीट कसे व्हायचे हो? मग तेव्हा विरोध न केलेल्या जनतेच्या आता केलेल्या विरोधाला किंमत का द्यावी?
बरोबरे तुमचं. माफियांना वेळच्या वेळी विरोध केला असता तर २६/११ सारखी प्रकरणं घडली नसती. लोकं शहाणे झालेत. म्हणूनंच भंडसाळ्यास वेळच्यावेळी आणि प्रखर विरोध करताहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 03/21/2017 - 06:55 नवीन
गापै, भन्साळीचा सेट जाळणे वगैरे प्रकार विरोध नाही vandalism आहे. सरकार नालायकासारखे फक्त बघत आहे हे असले प्रकार घडताना हे सरकारने घेतलेल्या लोकांच्या प्रॉपर्टीचे रक्षण करण्याच्या शपथेचे उल्लंघन आहे.
माफियांना वेळच्या वेळी विरोध केला असता तर २६/११ सारखी प्रकरणं घडली नसती.
याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 03/20/2017 - 18:58 नवीन
संजय क्षीरसागर,
या भानगडीत ते राममंदीर ही देशाला नवी डोके दुखी होईल.
खरंतर राममंदिराचा मुस्लिमांशी कसलाही संबंध नाही. बाबरी मशीद नावाची कुठलीही वास्तू कधीही अस्तित्वात नव्हती. रामजन्मभूमीच्या जागी राममंदिर होतं याचे अनेक पुरावे सापडले आहेत. काफिरांच्या प्रार्थनास्थळी मशीद बांधणे हे इस्लाममध्ये महाभयंकर पाप आहे. बाबर क्रूर असेल, त्यानं राममंदिर बाटवलं असेल, पण तो तिथे मशीद बांधण्याइतका बावळट खचितंच नव्हता. त्यामुळे रामजन्मभूमीवरून हिंदू विरुद्ध मुस्लीम असं भांडण व्हायलाच नको मुळातून. उलट सच्च्या मुसलमानाने बाबरी मशीद अॅक्शन कमिटीच्या सदस्यांचे (शरियानुसार) हातपाय तोडायला पाहिजेत. इस्लामी पापाचं प्रवर्तन केलं म्हणून. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 03/21/2017 - 08:10 नवीन
मशीद काय की मंदीर काय ते नव्यानं बांधून काय फरक पडतो ? पण एकदा मतं त्या कामासाठीच घेतलीयेत म्हटल्यावर सत्ता टिकवायची तर पब्लिकची अपेक्षापूर्ती करायलाच लागणार. आणि एकदा का हे लफडं सुरु झालं की त्याला अंत नाही. एकतर जातीवादाचा विळखा हा देशाच्या मुख्य प्रॉब्लम्सपैकी एक आहे. मंदीरामुळे तो आणखी प्रखर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नितिन थत्ते Tue, 03/21/2017 - 09:03 नवीन
>>पब्लिकची अपेक्षापूर्ती करायलाच लागणार. पब्लिक आपली अपेक्षापूर्ती होते आहे असं स्वतःच मानून घेत असतं की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गामा पैलवान Mon, 03/20/2017 - 19:09 नवीन
खरे डॉक्टर, तुमचा इथला संदेश पटला. मुस्लिमांच्या पाठिंब्याशिवाय कोणीही निवडून येऊ शकंत नाही असा आपल्या प्रसारमाध्यमांचा लाडका निष्कर्ष आहे. यांस मोदींनी २०१४ त सुरुंग लावला. हिंदूही एकगठ्ठा मतदान करू शकतात. मोदी मुस्लिमांच्या विरोधात आहेत असा माध्यमांचा आजून एक सिद्धांत आहे. माध्यमांनी गुजरात दंगलींचं भांडवल करून मोदींवर दोषारोप करण्यात कसलीही कसूर ठेवली नाही. या सिद्धांतासही मोदींनी छानपैकी सुरुंग लावला आहे. सुरुवात २०१४ ला झालीच होती. गुजरातेत भाजपने २६ च्या २६ जागा जिंकल्या होत्या. अगदी विरमगाम व करजन सारख्या मुस्लीमबहुल मतदारसंघातही भाजपच जिंकले. मात्र माध्यमांनी या निकालाकडे डोळे उघडे ठेवून बघायचं नाकारलं. परिणामी मोदींनी उत्तर प्रदेशात मुस्लिमविरोधसिद्धांताच्या पेकाटात परत एकदा सणसणीत लाथ घातली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 03/21/2017 - 08:49 नवीन
संजय क्षीरसागर, १.
आणि एकदा का हे लफडं सुरु झालं की त्याला अंत नाही. एकतर जातीवादाचा विळखा हा देशाच्या मुख्य प्रॉब्लम्सपैकी एक आहे. मंदीरामुळे तो आणखी प्रखर होईल.
मला नाही वाटंत तसं. मुस्लिमांना विश्वासात घेऊन राममंदिर विनाविरोध बांधता येईल. २.
पण एकदा मतं त्या कामासाठीच घेतलीयेत म्हटल्यावर सत्ता टिकवायची तर पब्लिकची अपेक्षापूर्ती करायलाच लागणार.
मी नेमक्या याच गोष्टीच्या विरोधात आहे. राममंदिर हा मतं गोळा करायचा विषय असू शकंत नाही. रामाच्या नावावर हिंदूंची मतं मिळतात हे कळल्यावर कोण कशाला मंदिर बांधेल? २.
मशीद काय की मंदीर काय ते नव्यानं बांधून काय फरक पडतो ?
पडतो. रामामुळे हा देश अखंड राहिला आहे. राम राष्ट्रपुरुष आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा