Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आर्किटेक्चर आणि मी !

स
स्वतन्त्र
Mon, 02/27/2017 - 21:08
🗣 119 प्रतिसाद
थोड माझ्या विषयी सांगतो. माझे वडील मी दहावीत असतानाच वारले.त्या नंतर अर्थातच घरातला मोठा असल्याने घराची जवाबदारी माझ्यावर पडली. त्यानंतर बारावी Science मधून केली.आधीपासूनच माझ drawing चांगला असल्यामुळे आणि आर्किटेक्चर ची ओढ असल्यामुळे ठरवलं होता कि architecture करायचे. पण त्यावेळीस माझ्या आईचा ऍक्सीडेन्ट झाला आणि जवळपास दीड लाख खर्च झाला.त्यावेळीस नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती आणी ऍडमीशन्स ची गडबड सुरु होती.त्यावेळेस पाच हजाराची रक्कम सुद्धा खूप वाटणारा मी,त्या फीज,डोनेशन्स पाहून चक्रावलो. त्यावेळी काय झाला होता मला,एकदाचं ठरवलं,इतकी फी भरायची आपली ऐपत नाही.आपण तिकडे ना गेलेलाच बरं.आणि सांगायला पण कोणी नाही.त्यामुळे काय चूक काय बरोबर समजत नव्हते.घरात आई आजारी,बेड वर असताना तिला मी कसा सांगू ,मला काय करायच आहे हे समजतच नव्हत. मग ठरवलं,आपल्याला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहिल पाहिजे ,science मधून ग्रॅडज्यूएट हाच पर्याय दिसला ,मग तीन वर्षाचे ग्रॅडज्यूएशन (B.Sc ) करता करता छोटी मोठी कामं करून शिक्षण केल.पुढे जे मिळतंय जशी वाट दिसतेय तसं शिकत गेलो. ग्रॅडज्यूएशन झाल्यावर एका सॉफ्टवेअर कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून जॉब मिळाला.तो करता करता आणखी कस शिकता येईल,पप्रोफाइल कसा चांगला करता येईल या हेतूने MCA केल.दिवसा कॉलेज करून Night Shift ला जॉब करू लागलो.MCAसुद्धा फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. त्यानंतर MCA च्या बेसिस वर त्याच कंपनीत प्रोमोशन होऊन सॉफ्टवेअर इंजिनियर झालो. आता मला जवळपास ८-९ वर्षाचा अनुभव असून,सध्या टीम लीडर आहे. But MCA was not the choice I wanted to be ! ह्या सगळ्या वर्षात मला architecture करायचा राहूनच गेल.पण अजूनही मन स्वस्थ बसू देत नाही.मला अजूनही त्या क्षेत्राची ओढ वाटते. आत्ताही मी निवांत वेळेस डिजाईन करतो ,फ्लोर प्लॅन्स आखतो.ती ओढ मला स्वस्थ बसू देत नाही,मानसिक रित्या सुद्धा. मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे. माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .

प्रतिक्रिया द्या
40711 वाचन

💬 प्रतिसाद (119)
च
चौकटराजा Tue, 02/28/2017 - 15:20 नवीन
अगदी अपवाद असे असतात की एखादे प्रोजेक्ट फार प्रतिष्ठेचे , पैशाची काळजी करू नका असे असेल तर मग वास्तुविदाला असे काम मिळाल्याने सर्जनाचा आनंद मिळतो. असे एक जरी काम आख्या आयुष्यात मिळाले तर त्याला धन्योहं असे वाटते. अशी ज्याना संधि मिळाली त्याना आपला मुजरा ! अच्युत कानविंदे हे असेच एक नाव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Tue, 02/28/2017 - 18:42 नवीन
बिल्डरच्या लेखी स्थापत्य अभियंत्याचीच(BE CIVIL) काय स्ट्रक्चरल इंजिनियर(M TECH STRUCTURE) ची पण किंमत सुद्धा शून्य असते अन्यथा एवढ्या इमारती आणि पूल पडले नसते. आपले म्हणणे खरे करण्यासाठी दुसऱ्याची री ओढणे ओडून द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Tue, 02/28/2017 - 18:44 नवीन
हा संक्षी साठी प्रतिसाद आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 02/28/2017 - 18:53 नवीन
थ्री इडियट्स सिनेमात मूळ रणछोडदास चांचडचा बाप म्हणतो कि समोर सगळे सलाम करतात पण पाठीमागे अंगुठा छाप म्हणतात. ते दुःख काय असते ते त्या माणसालाच समजेल. एक वर्ष मेडिकल चा प्रवेश हुकला तेंव्हा काय वाटते ते मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. डॉक्टर व्हायचे असेल तर डॉक्टरची पदवीच पाहिजे. बाकी कामातील अनुभव इ आपल्या जागी आहेत त्याचे महत्त्व कमी होत नाही तरीही . सी ए च्या कार्यालयात काम करणारी पण सी ए न झालेली (आर्टिकल करून परीक्षेच्या वाऱ्या करणारी) मुले पहा. ३०००-४००० रुपये महिना वर्षानुवर्षे राबवून घेतली जातात. शेवटी काय होते. पदवी हातात पडली तर ठीक अन्यथा वेठबिगारी आहेच
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Wed, 03/01/2017 - 05:30 नवीन
सहमत.. +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
फ
फेदरवेट साहेब Wed, 03/01/2017 - 03:27 नवीन
सौजन्यपूर्ण भाषेत वार्तालाप करणे नसते का? असा सहज एक प्रश्न पडला, का संक्षीचे नावही कानफाट्या पडलंय ? (गोंधळलेला) फेदूदा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/01/2017 - 04:41 नवीन
लष्करी पठडीत सुरुवातीची भाषा नेहेमी आणि सौजन्यपूर्णच असते. प्रतिसाद पहिल्यापासून नीट वाचा. पण थापा मारणे, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, लोकांची दिशाभूल करणे अशा वागण्याला ज् रा कडक भाषाच वापरावी लागते.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 03/01/2017 - 15:32 नवीन
इतकंच नशीब समजा . एकदा तो सुरू झाला की इतक्या फालतू प्रतिसादांचा यथोचित समचार घ्यायला फारसा वेळ लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 03/01/2017 - 17:33 नवीन
ब्वॉर्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 03/02/2017 - 18:13 नवीन
प्रथम डिजाइन काय चिज़ आहे ते पाहू सी ए च्या कार्यालयात कारकून आणि आर्टिकल करणारी मुलेच सगळी कामं करत असतात आर्किटेक्टच्या कार्यालयात काय वेगळे असते का? उगाच आम्हीच हुशार कशाला?यानंतर आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतं हरेक आर्किटेक्ट शिकवल्या बरहुकूम तंतोतंत काम करेल पण प्रत्येक आर्किटेक्ट हा उत्तम डिजायनर असेलच असं नाही. इतका बारकावा आपल्याला झेपेल का ? तरीही प्रयत्न करतो. आर्किटेक्टचं काम हा त्याचा वैयक्तिक लँडमार्क असतो. म्हणजे एखादी इमारत हाफ़िज काँट्रॅक्टरनी डिझाइन केली तर ती इतरांपेक्षा वेगळी असते म्हणून त्याचं नांव आहे. त्या अर्थानं आर्किटेक्चरमधे `डिझाईन' महत्त्वाचंय. या उलट कोणत्याही सीएनं सही केली तरी फायनल अकाऊंटस `एकसारखेच दिसतात'. तस्मात, आर्किटेक्चरला `डिजाइन' महत्त्वाचंय. इतक्या वास्तू घडतात पण त्यात एखादाच ताजमहाल निर्माण होतो. त्याला डिजाइन म्हणतात. सीए आणि आर्किटेक्चर या व्यावसायात हा फरक आहे. म्हणून सीएच्या `सहीला' महत्त्व आहे आणि वास्तुविशारदाच्या `डिजाइनला' महत्त्व आहे. अर्थात सीएच्या सहीला महत्त्व आहे यात कुणाचा न्यूनगंड उफाळून येण्याचं काहीच कारण नाही. पाहिल्यान्दा लेखकाने काय विचारले आहे ते न पाहता अनाहूत सल्ले देणे. मग आपलीच लाल करणे आणि शेवटी थापा मारल्यावर उघडे पडल्यावर टेक्निकल मिस्टेक म्हणून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहात. बिल्डरच्या लेखी स्थापत्य अभियंत्याचीच(BE CIVIL) काय स्ट्रक्चरल इंजिनियर(M TECH STRUCTURE) ची पण किंमत सुद्धा शून्य असते अन्यथा एवढ्या इमारती आणि पूल पडले नसते. कॉर्पोरेशनमधे प्लान सबमीट करायला आर्किटेक्टची फॉर्मल डिग्री लागते ती बीआर्च ऐवजी एमार्च लिहीली गेली ही टेक्निकल मिस्टेक आहे. इतकी साधी गोष्ट आपल्याला कळत नसेल असं नाही. तरीही यावरनं मी लेखकाला नाऊमेद करतो हा निष्कर्ष कसा निघतो ? याचं एकदा शांतचित्तानं आत्मपरिक्षण केल्यास गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. चौरा म्हणतायंत की बिल्डरच्या लेखी आर्किटेक्टच्या डिझाइनला किंमत नसते (त्याला फक्त कमाल एफएसाय मिळवून देणारा आणि महापालिकेत काँटॅक्टस असलेला आर्किटेक्ट लागतो) त्यामुळे एखादाच अच्युत कानविंदे आपल्या मनाजोगं आणि स्वतःच्या शर्तींवर काम करु शकतो. अर्थात अच्युत कानविंदे किंवा हाफ़िज काँट्रॅक्टर वगैरे समजण्या इतका व्यासंग नसावा त्यामुळे तो प्रतिसादच समजला नाही आणि परिणामी ` स्ट्रक्चरल इंजीनीयरची इमारत आणि पूल पडणे' इतका विसंगत प्रतिसाद दिला आहे. बाकी प्रतिसादात किरकोळ गोष्टी आहेत पण तरी ही क्लिअर करतो. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल. मग हि सारवासारव ?त्यानंतर आर्किटेक्टला फक्त प्लान टाकायला सही लागते हा सल्ला सद्य काळात प्रॅक्टीसींग आर्किटेक्टची सही लागणारं ते सर्वात महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर आपलीच लाल करायला सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे .... भाषेतून न्यूनगंडाची पुरेपूर प्रचिती येते. आधीच्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे सही कुठे लागते (म्हणजे फॉर्मल डिग्री कुठे लागते याविषयी तो प्रतिसाद आहे.) पण पूर्वग्रहच दूषित त्यामुळे गैरसमज तसाच राहाणार त्याला इलाज नाही. उगाच पिसारा घेऊन नाचायला लागले तर पार्श्वभाग उघडा पडतो. आता स्वतःचा कितपत झाकायला जमतोयं ते पाहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
फ
फेदरवेट साहेब Fri, 03/03/2017 - 03:33 नवीन
सो मच फॉर बीइंग स्नॉब विथ संक्षी, तुम्हाला एक नंबर मंदी ब्रिटिश सिटीझनशिप भेटणार दिकरा!! इफ यु कम अक्रोस अ स्नॉब रुईन हिम लाईक एनिथिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 05:21 नवीन
परत सारवासारवच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
पिलीयन रायडर Fri, 03/03/2017 - 15:16 नवीन
अर्थानं आर्किटेक्चरमधे `डिझाईन' महत्त्वाचंय. या उलट कोणत्याही सीएनं सही केली तरी फायनल अकाऊंटस `एकसारखेच दिसतात'. तस्मात, आर्किटेक्चरला `डिजाइन' महत्त्वाचंय. इतक्या वास्तू घडतात पण त्यात एखादाच ताजमहाल निर्माण होतो. त्याला डिजाइन म्हणतात.
माझी ह्याला किंचित असहमती आहे. तुम्हाला बहुदा जे समोर दिसतंय त्याला डीझाईन म्हणायचं आहे. एखाद्या गोष्टीला किती सुंदर आणि कलात्मकतेने बनवले आहे किंवा व्हिज्युअली ती कशी दिसतेय.. ह्याला तुम्ही डिझाईन म्हणत आहात. आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टरचा उल्लेख करताय म्हणजे "हटके कल्पना" असल्याने तो वेगळाय असं तुम्हाला वाटत असावं. तर डिझाईन फक्त तेवढंच नसतं. मी मेकॅनिकलची आहे, पण आर्किटेक्चर साधारण त्याच तत्वावर आधारित आहे. उत्तम डिझाईन करायला तुम्हाला त्यामागचे विज्ञान समजुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक्ष अनुभव महत्वाचा आहे, वादच नाही. पण शिक्षण तेवढेच महत्वाचे आहे. हे म्हणजे थोडं असं झालं की गॅरेजमधल्या मेकॅनिकला माझ्याहुन जास्तच माहिती असेल इंजिनची. पण म्हणुन इंजिन डिझाइन करणे त्याला जमेलच असं नाहीये. त्यामागे करोडो गोष्टी असतात. आणि शिकाव्याच लागतात. लेखकाने नीट विचार करुन निर्णय घ्यावा कारण त्यांचे वय २९ आहे. ह्या वयात नोकरी सोडून फुल्ल टाईम शिकणे अवघडच आहे थोडे. आवड म्हणुन संक्षींचा सल्ला प्रॅक्टिकल वाटतो. पण शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
च
चष्मेबद्दूर गुरुवार, 03/02/2017 - 07:49 नवीन
सर्व प्रथम तुमच्या जिद्दी ला अनेक सलाम आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. या धाग्यावरची चर्चा वाचली. काही अनुभवाचे ..बोल सांगावेसे वाटले. मी गेले १५ वर्षे पुणे इथे अंतर्गत रचना कार ...सजावट कार नव्हे..म्हणून काम करत आहे. माझा एक खांबी तंबू आहे. वास्तू विषारदाचं आणि माझं काम यात खूप फरक आहे. मला एखाद्या घराचा किंवा कार्यालयाचा इंच इंच लक्षात घ्यायला लागतो. वा.वि. मोठ्या स्केल वर काम करतात. पण दोघे ही क्लायंट ची गरज, पैसे आणि raw मटेरियल ची उपलब्ध ता यांचा मेळ बसवत आपली रचना सुंदर आणि सर्वांत वेगळी कशी असेल याचा प्रयत्न करत असतात. हे काम शिक्षण (formal education) घेतल्या शिवाय शक्य नाही. चांगली रचना/डिझाईन हे फक्त अनुभव किंवा आवडीतून तयार होत नाही. तुम्हाला वा.वि. चे formal education घेणं शक्य असेल तर नक्कीच घ्या. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_कुलकर्णी गुरुवार, 03/02/2017 - 08:04 नवीन
तुमची 'आर्किटेक्चर' हि खरेच पॅशन असेल, आणि पुढे जाऊन तुम्हाला जर याच क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुम्हाला 'डिग्री'ला ऍडमिशन घ्यावेच लागेल. B Arch हि पूर्णवेळ 'पदवी' असून, त्यासाठी तुम्हाला 'प्रवेश' परीक्षेपासून सुरुवात करावी लागेल... तुमचे सध्याचे काम सांभाळत हि पदवी मिळवण्यासाठी तुमच्याकडे पुढील पर्याय आहेत... १. काही मुक्त विद्यापीठे पण हा कोर्स देऊ करतात असे मी ऐकले आहे, तुम्ही त्याची चौकशी करू शकता. २. अशा कॉलेज मध्ये प्रवेश घ्या कि जिथे तुम्हाला पूर्ण वेळ कॉलेज करावे लागणार नाही. शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/02/2017 - 13:00 नवीन
स्वतन्त्र, चर्चा वाचल्या. माझं मत देतो. मी वास्तुविशारदशास्त्राशी (=आर्किटेक्चरशी) आजीबात संबंधित नाही. तुम्हाला हे शास्त्र स्वान्तसुखाय शिकायचं असेल तर खुशाल संजय क्षीरसागर म्हणतात ते अंमलात आणा. ते जगातल्या बहुतेक गोष्टींचा स्वान्तसुखाय पद्धतीने अर्थ लावू पाहतात. वर प्रसाद_कुलकर्णी यांनी बी.आर्च. या पदवीची महती विशद केली आहे. अशा वेळेस संजय क्षीरसागर म्हणतील की पदवीच्या मागे लागू नका. सरळ पुस्तकं वाचून, सहअध्यायींचा व्हॉट्सप गट स्थापून त्यात चर्चा करून, विशारदाकडे काम करून त्यातून शिका. आणि हे शिकंत असतांना प्रक्रियेचा आनंद घ्या. पुढे प्रक्रियेत निपुणता आली की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम हाती घेऊ शकाल. या आगमात (=अप्रोचमध्ये) चुकीचं काही नाही. पण तो बहुतांश लोकांच्या पचनी पडंत नाही. कारण की या सर्व घडामोडींत संजय क्षीरसागर केवळ स्वत:लाच जबाबदार आहेत. याउलट तुम्हाला जर करियर करायचं असेल तर तुम्ही इतरांना जबाबदार असाल. निदान सुरुवातीला तरी. अशा वेळेस पाठीवर पदवीचा छाप असलेला बरा पडावा. स्वयंपाकाची आवड असलेला उत्तम आचारी असेलंच असं नाही. मोजक्या आप्तेष्टांसाठी जेवण बनवणे आणि त्रयस्थ शंभर लोकांसाठी जेवण बनवणे या दोन सर्वस्वी विभिन्न प्रक्रिया आहेत. तसेच उपाहारगृह (=हॉटेल) चालवणे हे या दोहोंहून पार वेगळं आहे. असाच प्रकार वास्तुविशारदशास्त्रांतही होत असावा. तुमची वास्तूसंकल्पनाची (=बिल्डींग डिझाईनची) ओढ निवांत वेळेतली आहे (असं तुम्ही लिहिलंय). भविष्यात तुम्हाला यांतून धंदा चालवायचा आहे. कुठला धंदा ते लेखातून स्पष्ट होत नाही. अशा वेळेस गणितं साफ म्हणजे साफंच बदलू शकतात. आपल्याला या क्षेत्रातलं नक्की काय आवडतं ते चाचपून पाहण्यासाठी माझ्या मते पदवीचा उपयोग व्हावा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/02/2017 - 15:19 नवीन
अत्यंत उत्तम प्रतिसाद! हेच म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 03/02/2017 - 18:37 नवीन
तुम्ही समजू शकाल म्हणून प्रतिसाद देतो. मी लगेच कामाला सुरुवात करा म्हणतोयं डिग्री नाही म्हणून खंत करु नका, ती यथावकाश घेता येईल. कारण एकदा कामला सुरुवात केल्यावरच त्यातले बारकावे कळतात. कारण की या सर्व घडामोडींत संजय क्षीरसागर केवळ स्वत:लाच जबाबदार आहेत. मी स्वतः व्यावसायिक आहे हो ! आणि प्रत्येक व्यावसायिक हा क्लायंटलाच जवाबदार असतो. स्वच्छंदानं केलेलं काम सुद्धा चोख आणि वेळेवरच होतं आणि करायला पाहिजे. मोजक्या आप्तेष्टांसाठी जेवण बनवणे आणि त्रयस्थ शंभर लोकांसाठी जेवण बनवणे या दोन सर्वस्वी विभिन्न प्रक्रिया आहेत. उपाहारगृह (=हॉटेल) चालवणे हे या दोहोंहून पार वेगळं आहे. बरोबर पण त्यासाठी हाताला चव पाहिजेच, मग तुम्ही आप्तेष्ठांसाठी जेवण बनवा की लग्नसमारंभासाठी की हॉटेल चालवा. तद्वत आर्किटेक्चरला निर्मितीच्या आनंदासाठी डिजाइनचं अंग हवं. त्यात बिल्डरशी किती आणि स्ट्रक्चरल डिजायनरशी किती तडजोड करायची याचा सही अंदाज हवा. तो हँडस ऑन काम केल्याशिवाय शक्य नाही. माझा मित्र पुण्यातला प्रख्यात आर्किटेक्ट आहे. त्याच्या आग्रहाखातर मी स्वतः त्याच्याबरोबर तीन दिवस रात्रंदिवस राहून तो व्यावसाय जवळून बघितला आहे. आपल्याला या क्षेत्रातलं नक्की काय आवडतं ते चाचपून पाहण्यासाठी माझ्या मते पदवीचा उपयोग व्हावा. माझ्या मते आधी त्या क्षेत्रात नक्की काय चालतं हे पाहून (अ‍ॅक्च्युअल काम करुन) नंतर डिग्री घेणं श्रेयस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 03/02/2017 - 20:55 नवीन
जे तीन दिवस त्या आर्किटेक्ट मित्राबरोबर होतो त्यात त्याच्या ऑफिसच्या स्टाफ मिटींग्ज, त्याच्या असिस्टंट आर्किटेक्टसनी केलेली कामं, त्यातल्या कामांची सिलेक्शन प्रोसेस, बिल्डर्स बरोबरच्या मिटींग्ज, बिल्डर्सचा कामाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन, बिल्डींग एलीवेशन्स, कॉस्ट कंस्ट्रेंटस, कॉर्पोरेशनमधलं काम, अ‍ॅक्च्युअल साइट विजीट, कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांशी ऑन-साइट झालेली बोलणी हे सर्व होतं. थोडक्यात, डिजाइनची आवड असणं, डीग्री घेणं आणि नंतर मनाजोगतं काम करायला मिळणं यात महद अंतर आहे. एकूण व्यावसाय काय आहे याची पूर्ण माहिती असल्याखेरीज, आधी डीग्री घेण्याचा सल्ला देणं निर्बुद्धपणाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 05:27 नवीन
मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे. एवढे लेखकाने स्पष्ट लिहूनही आधी डीग्री घेण्याचा सल्ला देणं निर्बुद्धपणाचं आहे. बिस्मिलाहरहिमनुर्रहीम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 03/03/2017 - 06:37 नवीन
मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे. लेखावरचे सर्व प्रतिसाद वाचले तर किमान थोडा तरी व्यासंग वाढायला मदत होईल. आता परत तेच लिहीण्यात अर्थ नाही कारण तुम्हाला दिलेल्या उत्तराचा प्रतिवाद करता येणं तुम्हाला शक्य नाही. थोडक्यात आता पिसारा पूर्णपणे उघडा पडला आहे. तस्मात, इथून पुढे माझ्यासमोर तरी पिसारा फुलवू नका. बीआर्च लगेच करावं की त्या व्यावसायाचं डिग्रीपश्चात स्वरुप काय आहे, याची (स्वानुभवानं) पूर्णकल्पना घेऊन करावं हा मुद्दा आहे. मी जे म्हणतोयं त्यामागची पूर्ण कारणमिमांसा गामांना दिलेल्या प्रतिसाद आहे आणि ते गामांना सुद्धा मान्य आहे. वाचा : व्यवसायाचा एकंदरीत आवाका ध्यानी येण्यासाठी पदवीचा उपयोग पडेल असा अंदाज मी बांधला होता. तर पदवीऐवजी प्रत्यक्ष काम करून तो अनुभवून घ्यावा असं तुमचं म्हणणं पडलंय. हाही एक सुयोग्य मार्ग आहे. मला वास्तुविशारदशास्त्रातलं फारसं काही ठाऊक नसल्याने तुमचा सल्ला शिरसावंद्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर Fri, 03/03/2017 - 06:55 नवीन
लेखकानी धागा कशासाठी काढला आहे त्याचं विस्मरण होऊन तुम्ही स्वतःवर अनावस्था प्रसंग ओढवून घेतला आहे ! आता तरी वाचा म्हणजे स्वतःची आणखी बिकट परिस्थिती होणार नाही : माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 08:04 नवीन
एवढा जळफळाट बरा नव्हे. उगी उगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 08:06 नवीन
आं अच्च झालं तल उगी उगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 03/03/2017 - 08:16 नवीन
याचा अर्थ तुमच्याकडे आता प्रतिवाद नाही आणि पुरती गोची झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 08:18 नवीन
तुमच्या भंपक युक्तिवादाला आणि थापेबाजीला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे रिकामा वेळ नाही जन गण मन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 03/03/2017 - 08:26 नवीन
माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा . यानं तर पुरती पाचर बसली आहे तरीही इकडून तिकडून वाट काढण्याची खटपट चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 08:54 नवीन
ब्वॉर्र तुमचीच लाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 03/03/2017 - 09:12 नवीन
तुमच्याकडून अपेक्षाच नाही. पण पुन्हा सांगतो भाषा सांभाळा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 09:44 नवीन
ब्वॉर्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/02/2017 - 22:59 नवीन
संजय क्षीरसागर,
एकूण व्यावसाय काय आहे याची पूर्ण माहिती असल्याखेरीज, आधी डीग्री घेण्याचा सल्ला देणं निर्बुद्धपणाचं आहे.
व्यवसायाचा एकंदरीत आवाका ध्यानी येण्यासाठी पदवीचा उपयोग पडेल असा अंदाज मी बांधला होता. तर पदवीऐवजी प्रत्यक्ष काम करून तो अनुभवून घ्यावा असं तुमचं म्हणणं पडलंय. हाही एक सुयोग्य मार्ग आहे. मला वास्तुविशारदशास्त्रातलं फारसं काही ठाऊक नसल्याने तुमचा सल्ला शिरसावंद्य. मात्र हे करतांना काही दिवस (दोनेक वर्षे?) काम करावं लागेल आणि नंतरच पदवीचा विचार करता येईल. हातात प्रमाणपत्र यायला उशीर होईल. तितका वेळ आर्थिक नियोजन ताणलं जाईल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 03/03/2017 - 06:40 नवीन
मात्र हे करतांना काही दिवस (दोनेक वर्षे?) काम करावं लागेल आणि नंतरच पदवीचा विचार करता येईल. हातात प्रमाणपत्र यायला उशीर होईल. तितका वेळ आर्थिक नियोजन ताणलं जाईल. यासाठी पहिल्याच प्रतिसादात उपाय सुचवला आहे. पहिल्यांदा एखाद्या आर्किटेक्टकडे पार्ट-टाईम जॉब बघा. तिथं कामं कशी केली जातात ते पाहा. तुम्हाला कंप्युटरची माहिती आहे तर डिजाईन सॉफ्टवेअर वापरुन काम सोपं होईल का पाहा. जिथे प्लान सँक्शन लागतं तिथे आर्किटेक्ट लागतो पण डिजाईन स्टेजला कुणीही काम करु शकतं. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चौकटराजा Fri, 03/03/2017 - 06:00 नवीन
तोच उशीरा नाव मिळालेला मित्र म्हणाला " माझा मुलगा न नापास होता सलग पाच वर्षे पास झाला .... हे काही विशेष नाही ..हल्ली नापास होणे वा करणे ही बाब तंत्र शिक्ष्णात राहिलेलीच नाही." पण १९७० ते १९८० या काळात एम डी होण्यापेक्षाही आर्किटक्ट होणे अवघड होते ही बाब सत्य आहे. तोच माझा मित्र कसाबसा ५ वर्षे सलग पास होऊन जी डी आर्क झाला पण त्याला एम ई होणे सोपे गेले. यात बी ई सिव्हील पेक्षा त्याकाळी अर्किटेक्ट होणे कठीण होते असे दिसून येईल. फार पूर्वी सीए होणे ही असेच कठीण होते. दुसरे अर्किटेक्चर ह्या करियरचे असे आहे की याचे क्लासेस नसतात त्यामुळे दुय्यम दर्जाच्या शिक्षकांची भर बाहेर होत नाही. मेडीकल मधे पॅथलॅब डॉ चे जसे वेगवेगळे स्तर असतात तसेच आर्किटेक्चरल प्रॅक्टीस मधेही. म्हणजे बंगले स्पेशालिस्ट यात डिझाईन ला भरपूर वाव कारण थेट मालकाशी संपर्क. मग १ बीच के टू बी एच के च्या पाट्या टाकणारे- बिल्डरच्या कृपेखाली काम करणारे..... तिसरे फक्त प्लान पास करून आणणारे.. काही व व्हॅल्यूअर पण सर्वात उच्च कोटी म्हणजे अगदी मोठी सुंदर प्रमाणबद्ध , फिनिशेशवर तुफान खर्च केलेली प्रोजेक्ट करणारे. आर्किटेक्ट होऊन हे इन्टेरिअर चेच काम करतात त्यांच्या करीयरला माझा सलाम नाही. मलाही आर्किटेक्चर चे आजही आकर्षण आहे पण मी या करीयरला सुटेबल नव्हतोच असा माझा दावा आजही आहे. आवड व अभिक्षमता दोन गोष्टी भिन्न आहेत. एखाद्याला सी ए व्हायचे आहे पण आकडेमोडीचा कंटाळा आहे. एखाद्याला वकील व्हायचे आहे पण फारसे बोलायला आवडत नाही . अशी आपली केस आहे का हे पडताळून पहावे. नुसत्या सौंदर्याने उत्तम नटी होता येत नाही त्यासाठी अभिनयाची एक नैसर्गिक अदा आपल्यात असायला लागते. काहीही होण्यासाठी नैसर्गिक अभिक्षमता, मेहनत व नशीब या तिन्ही गोष्टी लागतात या सर्व एकत्र येतात त्यावेळी यश चालत येते.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 03/03/2017 - 06:25 नवीन
फार पूर्वी सीए होणे ही असेच कठीण होते.
अजूनही कठीणच आहे हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 08:04 नवीन
म्हणूनच हे विचारतो कि सी ए च्या प्रवेश परीक्षेला बसण्या अगोदर तुम्ही मुलांना दोन वर्षे सी ए कडे पाट्या टाका असा सल्ला द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 03/03/2017 - 08:16 नवीन
सल्ला देईन की नाही माहीत नाही, पण मी स्वतः हे केलं आहे. काय आहे - चित्रकार, डॉक्टर ही नैसर्गिक आवडींमुळे निवडली जाणारी प्रोफेशन्स आहेत. उदा० अभ्याला लहानपणापासून चित्रकलेत गती होती. रुग्णांना बरं करावं असं तुम्हाला कदाचित लहानपणापासून वाटत असेल. पण "एखाद्याचं बॅलन्सशीट बनवावं" किंवा "एका कं०चे इंटरनल कंट्रोल तपासावेत" अशी आवड कशी असेल? तर आपल्याला हे आवडतं / जमतं आहे का हे तपासण्यासाठी मी आधी एका सीएच्या हापिसात काम करून पाहिलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 08:19 नवीन
दोन वर्ष? आमचा दंडवत घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 03/03/2017 - 09:12 नवीन
फुलटाईम नाही हो, पार्टटाईम. सुट्टीत किंवा 'सीझन'मध्ये. तरबेज व्हावं असा हेतू नव्हता, जमतंय/आवडतंय का पाहणं हा होता. त्यातही याच्या-त्याच्याशी गप्पा झोड, रिटर्न फायलिंगच्या नावाखाली ऑफिस-स्वारगेट-प्रभातरोड-आकुर्डी असं पुणे दर्शन कर, वगैरे टाईमपास असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभ्या.. Fri, 03/03/2017 - 08:38 नवीन
सहमत आहे. माझ्या शेजारी एका सीएचे हपिस आहे. बरीचशी बीकॉम करणारी मुले तेथे नाममात्र पगारावर पार्टटाईम काम करतात. सीए चा एन्ट्रन्स वगैरे कसा असतो कै म्हैत नै पण त्यातल्या एक दोघांना सीए करायचे आहे असे कळले. रुग्णाला बरे करावे असे लहानपणापासून वाटणे हे माझ्या अल्पबुध्दीच्या बाहेरचे आहे. शरीराच्या, क्रियांचा, अवयवांच्या, जीवजंतूच्या वगैरे अभ्यासात गती असणे, कुतुहल असणे मी समजू शकतो. पण डायरेक्ट बरेच करावे असे वाटत नसावे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ग
गणामास्तर Fri, 03/03/2017 - 10:03 नवीन
मला लहानपणापासून काही लोकांना 'सरळ' करावे असे वाटते, अजून जमत नाहीये :( ता.क. मी लहानपणापासून मिपावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अप्पा जोगळेकर Fri, 03/03/2017 - 10:23 नवीन
रुग्णाला बरे करावे असे लहानपणापासून वाटणे हे माझ्या अल्पबुध्दीच्या बाहेरचे आहे. शरीराच्या, क्रियांचा, अवयवांच्या, जीवजंतूच्या वगैरे अभ्यासात गती असणे, कुतुहल असणे मी समजू शकतो. पण डायरेक्ट बरेच करावे असे वाटत नसावे. ते तसे नसते. एखादा माणूस प्रथितयश बनला की मग त्याची मुलाखत घेतली जाते. तेव्हा आपल्याला कशी लहानपणापासून अमुक अमुक क्षेत्राची आवड होती वगैरे सांगतो. मग सचिनसारखा माणूस आपण कसा सतत क्रिकेटचा विचार करायचो ते सांगतो. पादुकोण, करिना कपूर किंवा पिळगावकर सारखे दुय्यम् नट/ नटी मला लहानपणापासनच कशी ढमक्या क्षेत्राची आवड होती वगैरे सांगतात. फार कशाला बर्याचदा आपले आई वडील किंवा इतर परिचीत सुद्धा लहानपणापासून आपण कसे कष्ट काढले किंवा फलाण्या क्षेत्रात संधी मिळाली असती तर आपण अमक्या जागी पोचलो असतो वगैरे गप्पा सांगतात. लहानपणापासूनच एखाद्याला डॉक्टर व्हावे किंवा चित्रकार व्हावे असे एखाद्याला कसे वाटू शकते हे 'आपण रिक्षावाला व्हावे' असे वाटणार्‍या माझ्यासारख्या माणसाला कळण्यापलीकडचे आहे. कदाचित माझीच बुद्धी तोकडी असावी. त्यामुळे 'धोंडो भिकाजी जोशींसारखे' आपले पाट्या टाकणारे आयुष्यच बरे असे नेहमी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आदूबाळ Fri, 03/03/2017 - 10:44 नवीन
अहो असंच असतं असं नाही. माझ्या भाच्याचं उदाहरण डोळ्यांसमोर आहे. लहानपणी त्याच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. म्हणजे खाऊनपिऊन सुखी होते, पण महागडी खेळणी वगैरे आणून देऊ शकत नव्हते. एके दिवशी एका तुलनेने श्रीमंत नातेवाईकाने आपल्या मुलासाठी जपानहून एक रोबो-खेळणं आणलं. त्याला ते आवडलं नाही, का मोडलं ते आता आठवत नाही, पण काहीतरी कारणाने ते (तेव्हा तिसरी-चौथीत असलेल्या) भाच्याकडे आलं. तेव्हापासून "रोबो" या विषयाने त्याच्या डोक्याचा कबजा जो जो घेतला तो घेतलाच. आता भाचा बावीस वर्षांचा आहे, आणि अंतराळातल्या रोबॉटिक्सच्या उच्चशिक्षणासाठी परदेशी जायच्या विचारात आहे. ओळखीतलं हे दुसरं कॅरेक्टर:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
सिरुसेरि Fri, 03/03/2017 - 08:38 नवीन
खुप चांगली माहितीपुर्ण चर्चा आणी प्रतिसाद . "आयुष्यात काहि दोर हे कापावेच लागतात ." असे एका महान लेखकाचे वाक्य आहे . अर्थात तरिही शक्य तेवढे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे .
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 03/03/2017 - 10:01 नवीन
गळक्या इमारती बांधल्या म्हणून हफीज कॉन्ट्राक्टरला पुण्यातल्या एका मोठ्या संस्थापनाने हाकलले हे खरे आहे का ? वर कुठेतरी हा उल्लेख आला आहे म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 03/03/2017 - 10:33 नवीन
ह्या सगळ्या वर्षात मला architecture करायचा राहूनच गेल.पण अजूनही मन स्वस्थ बसू देत नाही.मला अजूनही त्या क्षेत्राची ओढ वाटते. आत्ताही मी निवांत वेळेस डिजाईन करतो ,फ्लोर प्लॅन्स आखतो.ती ओढ मला स्वस्थ बसू देत नाही,मानसिक रित्या सुद्धा. साहेब, आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. तुम्ही कष्ट करुन एमसीए केले आहे आणि कित्येक वर्षे कामाचा अनुभव आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर चे टीम लीड झालात. ते कष्ट आणि तो अनुभव वाया जाउ देउ नका. या क्षेत्रात तुम्ही नक्कीच खूप पुढे जाल. इतक्या वर्षांनंतर आर्किटेक्चर पूर्ण जरी केले तरी आत्ता मिळवता तशी सॅलरी मिळायला किती वर्षे जातील हा व्यवहार्य विचार नक्कीच करा. एकदम ५०-६० % सॅलरी डेप्रिसिएशन खूप मानसिक त्रास देते. 'थ्री इडियट्स' चित्रपट एक करमणूक म्हणून पाहणे वेगळे आणि रोजचे जगणे वेगळे. चित्रकला छंद वगैरे साठी जोपासणे नक्कीच शक्य आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 03/03/2017 - 10:46 नवीन
भंपक वास्तुविद्या म्हणजे दिशा, मालकाचा व्यवसाय ई. अतर्क्य गोष्टी चा पाया धरून केलेली रचना. मग त्यात पूर्वाभिमुख व्हरांडा ई आचरट पणा असतो. खरी वास्तुविद्या म्हणजे ,भूगोलावरील योजित वास्तूचे स्थान, स्थानिक मालाची उपलब्धता, प्लॉटचा आकार व उंचसखल पणा, जमीनीचे काठिण्य, वर्षभरातील वायुची दिशा व आवेग, हवामान दमट की कोरडे ? वास्तुचा उद्देश खाजगी की सर्वजनिक ? वर्षभराततील सूर्यभ्रमणाचा तपशीलवार अभ्यास, ई ई घटक तर असतातच पण ग्राहकाची धार्मिक पार्श्वभूमी, ग्राहकाची रंगाची आवड निवड, त्याचे घरातील इतर सदस्यांशी असलेले नातेसंबंध यांचाही डिझाईनवर परिणाम होतो. ग्राहकाचे स्वतःचे व्यक्तिमत्व या सर्वाचा विचार प्राथमिक बैठकीत करावा लागतो. आता आहे की नाही माहीत नाही पण त्याकाळी टाईम सेव्हर स्टॅन्डर्ड नावाची एक ज्ञानेश्वरी, शुक्ला ग्रेवाल किंवा ग्रेज अनॉटोमी या धर्तीवर मिळत असे. त्यात चमच्या पासून लिमोसिन पर्यन्त सर्व गोष्टीची मापे दिलेली असत. मानवी शरीर , त्यातील डोके धड व मांडी इ, च्या मधील प्रमाणाला वास्तूशास्त्रातच काय सर्व प्रकारचा वस्तूंच्या डिझाईन मधे फार महत्व आहे .त्या अर्थाने त्या पुस्तकाचा उपयोग होत असे. कारण खर्‍या वास्तुविद्यत असे तत्व आहे की गरज- आकार -अंतर्गत भाग- बाह्य भाग असा प्रवास डिझाईनचा झाला पाहिजे. आधी रूम १० बाय १० असे ( अर्थात दहा बाय दहा या आकराला ही तर्क आहे ) ठरवायची मग इनटेरिअर वाल्याला त्यात डिझाईन कोम्बायला भाग पाडायचे हा उलटा प्रवास झाला. मला वाटते मानवी शरीरात अवयव पहिले तयार झाले मग डोके धड दोन हात दोन पाय असे झाले.व आता दिसते तशी मानवी ठेवण तयार झाली. यातून मग पुढे स्टक्चरल डिझाएनर चा रोल सुरू होतो. आमचे एक सर म्हणत बीमचा स्पॅन काय पुणे ते लोणावला असाही करता येईल तिची उंची किती होईल याचा विचार केला का ? म्हण्जेच समजा वास्तूविदाने ठरविले की मला ४० फूट स्पॅन हवाच तर इंजिनिअर तो करून देइलही पण मालक म्हणेल 'एवढे पैसे मला स्टील व कॉन्क्रीट मधे हे घालायचे नाहीत डिझाईन मधे तडजोड झाली तर चालेल. एकेक खाम्ब वीस फुटावर आला तरी चालेल. सध्या मी ज्या सोसायटीत रहात आहे त्या आर्किटक्टची २०० एक प्रोजेक्टस चालू आहेत तरी आमच्या येथील दोन बिल्डिंगचे डिझाईन भंगार आहे असे माझे मत आहे. त्याच्याशी बोललो असता त्याने एकच शब्द उच्चरला " जसे पैसे तसे डिझाइन" अर्थात तडजोड.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 03/03/2017 - 11:00 नवीन
काका, समोरा समोर किंवा एल शेप ला तरी खिडक्या असणे आणि उंच छत हे तूर्तास हद्दपार का झाले आहे ? तुम्ही आर्किटेक्ट आहात असे वाटते याकरता विचारत आहे. वायुविजन हे आर्किटेक्टसाठी तितके महत्वाचे नाही का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Fri, 03/03/2017 - 12:06 नवीन
वास्तूचे डिझाईन ठरविण्यात वायूची वर्षभरातील दिशा व आवेग हे आले आहेच. त्यात वायुविजन तर आलेच पण बाजूने येणार दाब lateral stress ही आलाच की ! उंच छताचे म्हणाल तर सार्वजनिक की खाजगी या बाबीत त्याचा विचार होतो. उदा. म्युसीयम ,रेलेवे स्टेशनचा फॉयर ,ऑडेटोरियम यात छत उंच असते आजही. समोरासमोर खिडकी ठेवायची की नाही यात वायु , प्रकाश व आतील फर्निचर ची आगामी रचना यांचा विचार केला जातो. बर्याच वेळा मधे असणारी खिडकी सलग असे वॉल युनिट करायला फार अडचणीची ठरते. पण आगामी अंतर्गत रचनेचा विचार न करता अर्किटेक्ट दडपून मधे खिडक्या पेरत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
उ
उल्लु Fri, 03/03/2017 - 13:34 नवीन
स्वतन्त्र यांचा धागा आणि त्यावरच्या खूप रंजक प्रतिक्रिया वाचून प्रतिसाद दिल्या वाचून राहवत नाहीय. गेली १० वर्ष architecture ह्या क्षेत्रात काम करत आहे आणि काही नामवंत महाविद्यालयात त्या विषयाचे अध्यापन (visiting faculty) देखील करत आहे म्हणून हा प्रतिसाद द्यायच धाडस दाखवतो. धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवर बोलण्या आधी धाग्याच्या गाभ्यावर प्रतिक्रिया देतो. @ स्वतंत्र : आधी तुम्हाला architecture ची का आवड आहे ह्याचा विचार करा. बर्याच वेळेला मला drawing ची आवड आहे/होती किंवा माझ drawing चांगला आहे म्हणून लोक architecture ची निवड करतात. पण architecture हे फक्त drawings किंवा प्लान्स एवढाच सीमित नाही आहे. architecture हि वास्तु / बिल्डींग्स (वास्तूशास्त्र वाला वास्तू नव्हे) निर्माण करण्याची कला (art) आणि विज्ञान (science) आहे. त्यामुळे एकच वेळी आर्किटेक्टला ती कला आणि त्यामागचे शास्त्र अवगत करावे लागते. फक्त चांगली चित्रे / drawings काढता आली म्हणून बिल्डींग्स उभ्या राहू शकत नाहीत आणि फक्त शास्त्र आले म्हणून बिल्डींग्स सुंदर दिसू शकत नाहीत. आर्किटेक्ट हा त्या बिल्डींग्स बनवण्याच्या तंत्राचा वापर करून एका कलाकृतीचा निर्माण करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला खरच शास्त्र आणि कला दोन्ही शिकायच्या असतील तर औपचारिक शिक्षणाला पर्याय नाही. आता औपचारिक शिक्षणाची कल्पना देतो. architecture चे औपचारिक शिक्षण ५ वर्षांचे पूर्णवेळ आहे. ह्यात जवळपास दरवर्षी १० -१२ असे एकूण ४०-४५ विषय शिकवले जातात. ह्या विषयात अगदी visual आर्ट्स पासून applied mechanics, बिल्डिंग constructions, हवामान शास्त्र, काही social sciences चे भाग ते अगदि history ऑफ architecture पर्यंतचे अनेक विषय शिकवले जातात. बऱ्याच वेळेला फक्त drawings ची आवड आहे म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांना हे बाकीचे इंगीनीरिंग शी निगडीत किन्व इतर विषय खूप अवघड जातात. परविशाय्स्।सर्व विषय शिकल्याशिवाय चांगला architect designकरू शकत नाही कुणाही architect च्या office मध्ये part time काम करून हे सगळे विषय शिकणे अशक्य आहे. एक चांगला architect उपलब्ध तंत्रद्यानाचा वापर करून, त्या ठिकाणच्या हवामानाचा, समाज जीवनाचा, आर्थिक निकषांचा, तेथील संस्कुतीचा मेळ घालून एक सुंदर वास्तु निर्माण करेल. अर्थात पुन्हा हि एक कला असल्यामुळे ती व्यक्तीसापेक्ष आहे. एखादी वास्तू मला आवडली म्हणून ती सगळ्यांनाच आवडेल असे नाही. architects चा आणखी एक प्रकार म्हणजे बिल्डर्स साठी फक्त FSI ची गणिते जमवून ती सरकार दरबारी सम्मत करून आणणारा त्या वर्गाबद्दल मी काहीच बोलत नाही. दुसरा भाग म्हणजे हा ५ वर्षांचा कोर्स प्रचंड workload असणारा आणि खर्चिक आहे. त्यामुळे architecture हि खरच passion असेल आणि तो ताण (आर्थिक आणि शारीरिक) झेपणार असेल तर नक्की चांगल्या महाविद्यालयात दाखल व्हावे. कारण architecture चा, निर्मितीचा आणि त्या मागच्या तत्वज्ञानाचा आनंद खूप वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 03/03/2017 - 14:03 नवीन
Atishay aavadalaa haa pratisaad.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्लु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा