Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आर्किटेक्चर आणि मी !

स
स्वतन्त्र
Mon, 02/27/2017 - 21:08
🗣 119 प्रतिसाद
थोड माझ्या विषयी सांगतो. माझे वडील मी दहावीत असतानाच वारले.त्या नंतर अर्थातच घरातला मोठा असल्याने घराची जवाबदारी माझ्यावर पडली. त्यानंतर बारावी Science मधून केली.आधीपासूनच माझ drawing चांगला असल्यामुळे आणि आर्किटेक्चर ची ओढ असल्यामुळे ठरवलं होता कि architecture करायचे. पण त्यावेळीस माझ्या आईचा ऍक्सीडेन्ट झाला आणि जवळपास दीड लाख खर्च झाला.त्यावेळीस नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती आणी ऍडमीशन्स ची गडबड सुरु होती.त्यावेळेस पाच हजाराची रक्कम सुद्धा खूप वाटणारा मी,त्या फीज,डोनेशन्स पाहून चक्रावलो. त्यावेळी काय झाला होता मला,एकदाचं ठरवलं,इतकी फी भरायची आपली ऐपत नाही.आपण तिकडे ना गेलेलाच बरं.आणि सांगायला पण कोणी नाही.त्यामुळे काय चूक काय बरोबर समजत नव्हते.घरात आई आजारी,बेड वर असताना तिला मी कसा सांगू ,मला काय करायच आहे हे समजतच नव्हत. मग ठरवलं,आपल्याला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहिल पाहिजे ,science मधून ग्रॅडज्यूएट हाच पर्याय दिसला ,मग तीन वर्षाचे ग्रॅडज्यूएशन (B.Sc ) करता करता छोटी मोठी कामं करून शिक्षण केल.पुढे जे मिळतंय जशी वाट दिसतेय तसं शिकत गेलो. ग्रॅडज्यूएशन झाल्यावर एका सॉफ्टवेअर कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून जॉब मिळाला.तो करता करता आणखी कस शिकता येईल,पप्रोफाइल कसा चांगला करता येईल या हेतूने MCA केल.दिवसा कॉलेज करून Night Shift ला जॉब करू लागलो.MCAसुद्धा फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. त्यानंतर MCA च्या बेसिस वर त्याच कंपनीत प्रोमोशन होऊन सॉफ्टवेअर इंजिनियर झालो. आता मला जवळपास ८-९ वर्षाचा अनुभव असून,सध्या टीम लीडर आहे. But MCA was not the choice I wanted to be ! ह्या सगळ्या वर्षात मला architecture करायचा राहूनच गेल.पण अजूनही मन स्वस्थ बसू देत नाही.मला अजूनही त्या क्षेत्राची ओढ वाटते. आत्ताही मी निवांत वेळेस डिजाईन करतो ,फ्लोर प्लॅन्स आखतो.ती ओढ मला स्वस्थ बसू देत नाही,मानसिक रित्या सुद्धा. मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे. माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .

प्रतिक्रिया द्या
40711 वाचन

💬 प्रतिसाद (119)
स
संदीप डांगे Fri, 03/03/2017 - 14:10 नवीन
सौ सुनार की, एक लोहार की.... अतिशय उत्तम व थेट व्यावसायिकांकडून आलेला अतीव मोलाचा प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्लु
च
चौकटराजा Fri, 03/03/2017 - 15:33 नवीन
दुसरा भाग म्हणजे हा ५ वर्षांचा कोर्स प्रचंड workload असणारा आणि खर्चिक आहे. त्यामुळे architecture हि खरच passion असेल आणि तो ताण (आर्थिक आणि शारीरिक) झेपणार असेल तर नक्की चांगल्या महाविद्यालयात दाखल व्हावे. कारण architecture चा, निर्मितीचा आणि त्या मागच्या तत्वज्ञानाचा आनंद खूप वेगळा आहे. नेमके हेच माझ्या बाबतीत घडले . कागद, पेन्सीली,मॉडेलिंग खर्च पेन्स ई ई खर्चाच्या बाजू तर सगळे जग विसरून रात्र रात्र सबमिशन करीत बसा हा उद्योग.५० ट्क्क्यास पासिंग , ए टी केटी चा अभाव व लेक्चरना उपस्थीतीचा बडगा अशी सर्व परिस्थिती त्यावेळी होती. पण दोन वर्षात चांगले डिझाईन म्हणजे काय असते ते मला कळले. म्हणूनच आजही मी नव्या नव्या ईमारती " त्या" कोनातून पहातो. व तथाकथित यशस्वी वास्तुविदांवर टीकाही करतो. माझ्या घराचे इंटेरिअर मीच केले आहे. प्रत्येक क्षेत्रात काही अभिक्षमता अपेक्षित असतात त्याचे नक्की भान असणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्लु
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 17:19 नवीन
सुंदर आणि खर्‍या दृष्टीने उपयुक्त प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्लु
स
स्वतन्त्र Sun, 03/19/2017 - 10:51 नवीन
माननीय उल्लु साहेब , प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ! तुम्ही जाणकार असून माझ्या धाग्यावर प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. तुमचे विचारांशी १०० % सहमत. मला फक्त चित्रकलेची आवड नसून.इमारतींच्या design आणि planning आकर्षण वाटते,आणि त्या उत्सुक्ते आणि आवडी मुळेच मला हि शाखा आधी पासून खुणावत होती. पण मी धाग्यात लिहिल्याप्रमाणे मला ते आत्ता पर्यंत जमलं नाही.ह्यापुढे मला हे शिक्षण घ्यावे असे मनापासून वाटते. प्रतिसाद वाचून मला AMIE,इग्नोऊ अथवा असे कॉलेज जिथे Attendance अड्जस्ट होऊ शकेल. ह्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे ? AMIE फायदेशीर आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्लु
स
सुबोध खरे Fri, 03/03/2017 - 14:29 नवीन
त्यामुळे architecture हि खरच passion असेल आणि तो ताण (आर्थिक आणि शारीरिक) झेपणार असेल तर नक्की चांगल्या महाविद्यालयात दाखल व्हावे. कारण architecture चा, निर्मितीचा आणि त्या मागच्या तत्वज्ञानाचा आनंद खूप वेगळा आहे. +१०० ज्जे बात
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 03/05/2017 - 04:12 नवीन
इतक्या पॅशनेटली धागा काढून मदत मागणाऱ्या खुद्द लेखकाचा मात्र संपूर्ण लेखावर एक सुध्दा प्रतिसाद नाही !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 03/05/2017 - 10:08 नवीन
संजय क्षीरसागर, याचं कारण म्हणजे लेखकाला मदत होईल अशी एकही गोष्ट त्याला मिळाली नाही. लेखकाच्या मनात काय आहे हे ताडून त्यानुसार मार्गदर्शन करण्याचा मनकवडेपणा अपेक्षित आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 03/05/2017 - 10:31 नवीन
जी व्यक्ती इतका सुस्पष्ट धागा काढू शकते तिला प्रतिसाद द्यायला काहीच हरकत नाही. एनी वेज, बहुसंख्य मदतीच्या धाग्यांवर हीच परिस्थिती असते. इट इज सॅड.... बट ट्रू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चौकटराजा Mon, 03/06/2017 - 09:41 नवीन
धागाकर्ता मुळात वास्तविद्या या तील करीयर विषयी फारसा माहीत गार नसावा. मी जर असा धागा " खरे तर मला मिलिटरीत जायचे होते" असा काढला तर त्यावर समजा डॉ सुबोध खरे , शशिकांत ओक साहेब यानी त्या करीयरला कशी " पॅशन" च आवश्यक असते असे पटविले तर चौ रा काय लिहिणार कप्पाळ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Mon, 03/06/2017 - 15:25 नवीन
चौ रा साहेब मिलिटरीसाठी पॅशन लागते कि नाही ते माहित नाही पण डॉक्टर होण्यासाठी मात्र नक्की तुम्हाला त्याविषयाबद्दल आकर्षण असलं पाहिजे. रक्त मांस पाहून तुम्हाला चक्कर येत असेल तर तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. वेळी अवेळी बोलावणं येतं, तिथे सुद्धा तुम्हाला हसतमुख राहावं लागतं. छातीत दुखतं म्हणून रात्री दोन वाजता आलेल्या रुग्णाचा इ सी जि नॉर्मल येईपर्यंत वाट पाहावी लागते आणि तो नॉर्मल आल्यावर त्यानंतर काल पाच प्लेट पाणीपुरी खाल्ल्याने बहुधा गॅस झाला असेल असे म्हणून हॅ हॅ हॅ करणारा पुरोगामी पोटाचा रुग्ण (कितीही संताप आला तरीही) हसून साजरा करावा लागतो. हे सगळं गृहीत धरून पुढे जायची तयारी असेल तर डॉक्टर व्हा उगाच ते सिनेमा मध्ये स्वच्छ परीट घडीची पांढरी कापडं घालणाऱ्या डॉक्टरचे ग्लॅमर पाहून नाही असाच सल्ला मी तरुणांना देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Mon, 03/06/2017 - 17:39 नवीन
मी डॉ. विल्यम नोलेन यानी लिहिलेले " मेकीन्ग ऑफ अ सर्जन " हे पुस्तक सुमारे ३५ वर्षापूर्ची वाचले होते. त्यात त्यानी " मेडिकलचा घाबरट विद्यार्थी ते परिपूर्ण सर्जन याची गाथा विशद केली होती. त्यातले माय फर्स्ट इन्सीजन - अपेन्डोक्टमी हे तर फार भारी लिहिले होते. आजही आठवतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
स्वतन्त्र Sun, 03/12/2017 - 09:04 नवीन
तुम्ही म्हणालात ते बरॊबर आहे.निरनिराळे प्रतिसाद वाचून गोंधळायला होतंय हे खर आहे.तरीही मला architecture चे फॉर्मल शिक्षण घ्यायचेच आहे.आलेल्या प्रतिसादांवरून मला असा वाटतंय कि इथे AMIE चा पर्याय मला सध्या बरा वाटत आहे.तो करून बी.Arch जरी होता नाही आले तरी M.आर्च ला प्रवेश मिळू शकतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
स्वतन्त्र Mon, 03/13/2017 - 15:12 नवीन
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे ! सर्वांनीं सुचवलेला पर्याय संक्षिप्त स्वरूपात :- १.मी हा नाद सोडून द्यावा २.मी practical वर भर देऊन,पदवी चा नाद सोडावा. ३.AMIE किंवा IGNOU या पर्यायांचा विचार करावा. ४.असे एखादे कॉलेज पाहावे जिथे Attendance ला महत्व नसेल. त्यातला पर्याय १. महाल मान्य नाही कारण मला ह्या विचायतला शास्त्रोक्त शिक्षण घायचाच आहे.(त्यात रीतसर डिग्री हवी,खासगी पदविका नको) पर्याय २:तुम्ही उद्या गॅरेज वाल्याला mechanical इंजिनीयर म्हणाल का ? पर्याय ३ : या दोन पर्यायांचा विचार करत आहे.शक्यतो अमीर. पर्याय ४:कोणाच्या माहितीत पुण्यात असे कॉलेज किंवा ओळख आहे का ? मला काहीही करून त्या विषयातली पदवी घायचीच आहे.पण आहे तो जॉब करून हे सध्या साध्य होणं थोड challenging असून,ते अशक्य नाहीये हे सुद्धा मला पूर्वानुभावाने माहीत आहे.नाहीतर आयुष्यभर खंत राहणार हे नक्की.आणि मला जे करता नाही आल ते दुसर्याने करून त्यात समाधान मानणारा मी नाही. धन्यवाद ! स्वतंत्र
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 03/13/2017 - 16:36 नवीन
त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकली नाही आणि आता धाग्याचा ताव गेला आहे. पर्याय २:तुम्ही उद्या गॅरेज वाल्याला mechanical इंजिनीयर म्हणाल का ? तुम्हाला आर्किटेक्टच्या ऑफिसमधे नक्की काय आणि कसं काम चालतं, याची कल्पना पदवी घेण्यापूर्वी यावी असा त्याचा उद्देश आहे. स्वतःचा व्यावसाय करायला डिग्री लागेल पण ती घेण्यापूर्वी, सध्या जे चालू आहे ते सोडण्याचा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण झाल्याविना ते साहस शक्य नाही. हा आत्मविश्वास निर्माण व्हायला हँडस ऑन अनुभव असेल तरच आशेचा किरण आहे. त्यामुळे इंजीनिअर आणि मेकॅनिक ही तुलना व्यर्थ आहे. अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभवानं आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वासातून कृती घडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वतन्त्र
प
पिलीयन रायडर Mon, 03/13/2017 - 16:44 नवीन
संक्षी.. आधी थोडा हॅण्डस ऑन अनुभव घ्यावा हा काही वाईट सल्ला नाही, पण त्याशिवाय आत्मविश्वास निर्माण होऊच शकत नाही हे जरा जास्त नाही का झालं? त्यांना डिग्री घ्यायची आहे हे स्पष्ट आहे. आवश्यक तेवढा आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे हे दिसतंय की त्यातुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 03/13/2017 - 16:58 नवीन
इच्छा आणि आत्मविश्वास यात फरक आहे. ज्याला डिग्री घ्यायचीच आहे आणि फुल आत्मविश्वास आहे ती व्यक्ती पहिल्यांदा अ‍ॅडमिशन घेईल आणि फावल्या वेळात चरितार्थ पाहील. अशा व्यक्तीला धागा काढायची आणि इतरांच्या सल्ल्याची गरजच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 03/13/2017 - 17:10 नवीन
अहो धागा बघा ना.. ते मी करु की नको करु? काय करु? असं विचारतंच नाहीयेत. कसं करु हाच प्रश्न आहे. जॉब करुन ही डिग्री घेण्याचे वेगवेगळे पर्याय काय हेच तर त्यांना विचारायचंय. अ‍ॅडमिशन घ्यायचीच आहे त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 03/14/2017 - 05:38 नवीन
डिग्री मिळेपर्यंत चरितार्थ पार्ट टाइम नोकरीवर चालवायला लागेल. ते जीवनाची दिशा बदलण्याचं काम आहे. तिथे काठावर उभं राहून पोहता येणार नाही. या कामाला साहस हवं, ते आत्मविश्वासाशिवाय शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मुक्त विहारि Tue, 01/12/2021 - 20:00 नवीन
एक सांगतो... 1. पुढे जायचे असेल तर, योग्य ते शिक्षण हवेच आणि ते पण अहोरात्र कष्ट करायची तयारी असेल तरच... 2. तुम्ही जे शिक्षण घेणार आहात, त्याचा एक फायदा म्हणजे, तुम्ही मनांत असे पर्यंत काम करू शकता... वकील, डाॅक्टर, सीए, गुरू, ह्या सारख्या ज्ञानी मंडळींना, निवृत्तीसाठी वयाची अट नाही. कधीही व्यवसाय उत्तमच असतो.. त्यामुळे, तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे... दुर्दैवाने, B. Arch. साठी उत्तम काॅलेज कोणते? हे माहीत नाही. तुमची धडपड पाहता, आज नाही तरी उद्या, नक्कीच यशस्वी व्हाल, याची खात्री आहे...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा