PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली.
त्यानंतर हा उठलेला गदारोळ !!
PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ?
ह्या राम सुब्रमण्यंम चे काम :
While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory.
Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party.
गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.
बुबुडाविपुमाधवि
सारखी स्वतः सोडून इतर कोणीही वापरत नसलेली टर्मिनॉलॉजी सतत चमकवण्याचे विशेष प्रयोजन काय हे ही कळले नाही विशेषतः. ट्रुमन साहेब, तुम्ही जावेद अख्तरांचे विधान वाचले तरी होते की नाही अशी शंका ह्या नव्या प्रतिसादामुळे (दुर्दैवाने) घ्यायला वाव उघड झालाय असे हताशपणे म्हणावे लागेल, आजचा धडा हाच की सदस्य कितीही ज्ञानी मानी असो त्याचे बोलणे चिमूटभर मिठासोबतच घ्यायला हवे. असो.माझ्यामते जावेद अख्तर यांनी दुसऱ्याची "अक्कल" काढायची तसूभरही आवश्यकता नव्हती.याला +१०० हे तर सर्वसामान्य माणसाने केले तरी अयोग्य आहे. आश्चर्य हेच की इथे एक जानामाना पूर्वराज्यसभा सभासद आहे. सिद्धहस्त लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अख्तरसाहेबांना आपल्या लेखनाचे काय अर्थ/अनर्थ होतील याचे भान नव्हते, असे म्हणण्याची चूक मी करू शकत नाही. तर मग... १. घटनेने दिलेल्या अधिकारात, "हार्डली लिटरेट" असलेले अनेकजण, लोक-राज्य-सभेत अख्तर यांच्या पूर्वी व बरोबर बसलेले आहेत आणि भविष्यातही बसतील. याला अख्तर यांचा विरोध आहे काय ? अश्या लोकांबद्दल, अख्तरसाहेब, ट्वीटरवर तोच शेरा मारतील काय ? २. हार्डली लिटरेट याचे शुद्ध मराठी भाषांतर "अशिक्षित अथवा अडाणी" असे होते. समाज, संस्कृती, इत्यादीसाठी त्यांनी केलेल्या योगदानासाठी जाणकारांनी पारखून निवड केलेले वरिष्ठ लोक राज्यसभेचे सभासद होतात. लोकसभेसारखे "निवडणूकीला उभे रहा आणि लोकांची मते मिळवून निवडून या" या तत्वातर तेथे जाता येत नाही. म्हणूनच लोकशाही व्यवस्थेत राज्यसभेला अप्पर हाऊस (आणि लोकसभेला लोअर हाऊस) म्हणतात आणि राज्यसभा सभासदांना जुनेजाणते (एल्डर्स) असेही समजतात. अख्तर यांच्यासारखा एक "शिक्षित" पूर्वराज्यसभासभासद केवळ शिक्षणाचा मानदंड लावून अशिक्षितांच्या मताला किंमत नाही असा निर्देश करतो, तेव्हा आश्चर्य वाटायलाच हवे. ३. आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धांत देशाला पदके मिळवून देणारे (लिटरेट व हार्डली लिटरेट असलेले) लोक देशाची पत जगभरात वाढवायला मदत करतात. त्यांनी ते काम स्वतःच्या घोर मेहतनीने आणि बहुतेक वेळेस सरकारी उपेक्षा सहन करत केलेले असते, हे माध्यमांतून समजते आहेच. त्याविरुद्ध, "भारतात भरपूर प्रसिद्धी आणि पैसा मिळवलेल्या चलतचित्रव्यवसायातल्या "शिक्षित" लोकांपैकी किती जणांनी देशाची मान उंचावेल अशी आंतरराष्ट्रीय पदके जिंकून आणली आहेत ?", या प्रश्नाचे सर्वांना माहीत असलेले सोपे उत्तर, डोळे उघडायला मदत करेल, असे वाटते.टाळ्या घ्यायला काहीही ठोकून द्याल का?ही भाषा तुमच्या नेहमीच्या नाक वर करून इतरांना उपदेश करणार्या अवताराच्या लिखाणाला शोभून दिसत असली तर काहीच म्हणणे नाही... चालूद्या. गेस व्हॉट, आय टेक इट इन स्ट्राईड ! =))only just or almost not:
अख्तरांना 'अलमोस्ट नॉट(च)' म्हणायचे होते हा निष्कर्ष कशावरून काढलाय? सगळा पिंगा हार्डली भोवती घालताना यु हॅव हार्डली नोटिस्ड 'लिट्रेट' , असो तुमचा अजेंडा असला झोडपायचाच तर त्याला नाईलाज आहे, अन तसंही साठी नंतर माणसाची चुका कबुल करायची इच्छा कमी होते, उगाच साठी बुद्धी नाठी म्हण तयार झाली नसावी. तर कसंय तुम्ही माझा पूर्वअवतार कुठला काय, ह्या फंदात पडल्यामुळे तर्काला तुम्ही लुळे पडून पर्सनल व्हायला लागलाय असा सहज निष्कर्ष निघतोच आहे. तुम्ही मला कोणाचा अवतार समजताय हे मी तुमची विचारशक्ती किती खाली पडू शकते त्यावर सोडतो. फॉर नाऊ, यु कंटीन्यु, तुम्ही स्वतःला बृहस्पतीचे अवतार समजणे चालू ठेवा अन चुकीही दामटत राहा.हारवर्ड डिक्शनरी :
No or not (suggesting surprise at or disagreement with a statement)
हे (सोईस्कररित्या) नजरेआड झालेच (की, केलेच) की ! =)) मला माझेच घोडे दामटायचे असते तर, मी फक्त हारवर्ड डिक्शनरीमधला, हा माझ्या सोईचा एकुलता एक अर्थ, उर्धृत करू शकत होतो; हे राग न धरता वाचले असते, तर सहज ध्यानात आले असते ! २. शब्दांच्या पुढे त्यांचे स्पष्ट अर्थ दिले असले तरीसुद्धा त्याबद्दल गैरसमज होऊ शकतो असा डिक्शनरी लिहिणार्या तज्ज्ञांचा अनुभव आहे. त्याकरिताच, शब्दांचा उपयोग केलेली वाक्ये सुद्धा ते देतात. सोईसाठी दोन्हीही डिक्डिक्शनरीतली ती वाक्ये मी उद्धृत केलेली आहेत. ती खूप उपयोगी आहेत. शब्दांचा अर्थांच्या छटा (नुआंस) त्यांच्या वाक्यातील उपयोगाप्रमाणे बदलतात. त्यामुळे, शब्दांचा अर्थ, त्यांच्या वाक्यातल्या इतर शब्दांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या वाक्यातील स्थानावर ठरतो. किंबहुना, ते शब्द कोणत्या परिस्थितीत वापरले यावरही त्याची अर्थछटा अवलंबून ठरतो, हे सांगायला नकोच.* असो. हा इंग्लिशचा तास नसल्याने. इथेच थांबूया. मुख्य मुद्द्यांबद्दल पुढे काही नवी माहिती आली आणि चर्चा करण्यास काही जागा असेल तर भविष्यात चर्चेचा विचार करता येईल. ===================================================== * : बोलतानाचा एखाद्या शब्दाचा उच्चार कसा केला जातो त्यावरही त्या शब्दामागचा खरा अर्थ दडलेला असतो. हे सुद्धा खूप महत्वाचे आहे, पण लिखाणात तो मुद्दा गैरलागून असल्याने, केवळ मुद्दा पूर्ण होण्यासाठी फूटनोटमध्ये त्याचा उल्लेख करून, त्याबाबत अधिक काही न लिहिणे योग्य समजतो आहे.या Hardly च्या लडाईत
@फेदरवेट साहेबांची दांडी गुल झाली असे वाटते.
आणि @ डॉ सुहास म्हात्रे जिंकले