एवढ्यात काय खरेदी केलत - २
नमस्कार,
गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा.
धन्यवाद.
मिपा सोडून बरीच कामे आहेत. त्यामुळे "शेवटचा प्रतिसाद माझा " टाईप लिहिणे जमत नाही."शेवटचा प्रतिसाद माझा" टाईप लिहिणे जमत नसले तरी केजरीवाल टाईप प्रतिसाद लिहिण्यात मात्र आपण प्रचंड कौशल्य कमावले आहे याविषयी दुमत नसावे.आणि मूळ प्रश्नाला सोडून इतर गोष्टी मधे आणल्यात तेव्हाच उत्तर कळाले . अर्थात तो तुमचा वैयक्तीक चॉईस आणि निर्णयस्वातंत्र्य आहे.धागा खरेदीवर आहे. "गॅसवरील सबसिडी सोडणे" हे विषयांतर तुम्ही करून धागा भरकटविण्याचा प्रयत्न केलात. मी फक्त प्रत्युत्तर दिले. अर्थात केजरीवालांच्या पित्त्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती.फक्त भाजपाचे धोरणाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते असूनदेखील तुम्ही मा.पंप्रंच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे वाचून अंमळ मौज वाटली इतकेच ! बाकी चालू द्या ! (गायब) मुनीकोणताही विषय असला तरी केजरीवाल छाप प्रतिसाद देण्याचे आपले व्यसन बघून कायमच मौज वाटत आली आहे.