Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एवढ्यात काय खरेदी केलत - २

र
रेवती
Sun, 03/19/2017 - 03:35
🗣 153 प्रतिसाद
नमस्कार, गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अ‍ॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्‍याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
33306 वाचन

💬 प्रतिसाद (153)
ग
गवि गुरुवार, 03/23/2017 - 08:41 नवीन
कधीकधी कुत्रं लैच डाळ नासायला लागलं की त्याला आत टाकण्यासाठी कुत्रापिंजरा घेतला ४२ इंची मोठ्ठा. अमेझॉनवरुन. पॉज फॉर अ कॉज ब्रँड. अतिशय उपयोगी पडतो. Image removed. शिवाय एक टिप म्हणजे जेरहाय ग्रेव्हीज अमेझॉनवर लोकल दुकानापेक्षा फारच कमी किंमतीत मिळतात. पेडिग्री जेरहाय इतकं हाय क्वालिटी नाही असं पेटशॉपवाल्यांकडून ऐकलं. तरीही पेडिग्री उत्पादनं हवी असल्यास तीही आणखीच स्वस्त पडतात.
  • Log in or register to post comments
स
संपत गुरुवार, 03/23/2017 - 09:57 नवीन
गूगल क्रोमकास्ट घेतले मागच्या महिन्यात. ३३०० रुपयात साधा टीवी स्मार्ट झाला. youtube वगैरे क्रोमकास्ट करू शकणारी आप्स छानच चालतात. मोबाईल वरून प्राईम विडीयो ला थोडा प्रोब्लेम येतो पण laptop वरून छान चालतो.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 04/01/2017 - 11:42 नवीन
हे बेणं तुम्हाला कुठे मिळालं? मी अ‍ॅमेझॉनवर शोधून दमलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
म
मोदक गुरुवार, 03/23/2017 - 10:32 नवीन
एक ६४ जीबी मेमरी कार्ड घ्यायचे आहे. क्लास १० वाले कार्ड हवे, यापेक्षा आणखी काय बघावे..?
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले गुरुवार, 03/23/2017 - 12:12 नवीन
ऑफिस मध्ये संगणकावर बसताना कामाच्या रगाड्यात ताठ बसले जात नाही, पोक काढून बसले जाते. ताठ बसण्यासाठी काही चेअर अटॅचमेंट्स अथवा काही टूल्स आहेत का? कोणी वापरते का, काही अनुभव ?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 03/23/2017 - 13:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
त
तेजस आठवले गुरुवार, 03/23/2017 - 14:57 नवीन
धन्यवाद. ट्राय करून बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
म
मी-सौरभ गुरुवार, 03/23/2017 - 13:46 नवीन
कोल इंडिया घेतले १५ आणि ३० गुडलक स्तील
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 03/30/2017 - 09:33 नवीन
इक्विटास होल्डिंग - १०० मन्नपुरम चे घ्यायचे होते , पण भाव एकदम वाढलाय म्हणुन थोडे थांबावे लागेल.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
ह
हेमंत८२ गुरुवार, 03/30/2017 - 10:06 नवीन
RCF घेणार होतो पण बघू.. Equitos कसा आहे. कुठे पर्यंत जाईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
क
कुंदन गुरुवार, 03/30/2017 - 10:11 नवीन
कुठे पर्यंत जाईल , काही कल्पना नाहि ..... मी म नी कंट्रोल वर , शेअर होल्डिंग पाहिले तर म्युच्युअल फंड यात गुंतवणुक करत असलेले दिसले. शिवाय त्यांनी तमिलनाडुत बँकही सुरु केली आहे स्प्टंबर मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत८२
म
मी-सौरभ गुरुवार, 03/30/2017 - 13:58 नवीन
मी तसा आय डी एफ सी बँक घेत आहे. दर महिन्याला थोडे थोडे विकत घेणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 10:38 नवीन
सध्याच्या काळात भांडवल बाजारात गुंतवणूक करताना व समभाग विकत घेताना जरा सावध रहा. मुंबई व राष्ट्रीय भांडवली बाजाराचा निर्देशांक ऐतिहासिक सर्वोच्च पातळीला पोहोचला आहे. अनेक ब्लू चिप कंपन्यांच्या समभागांची किंमत ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीला पोहोचली आहे. यात आता फारशी वाढ संभवत नाही. ही गुंतवणूक करण्याची वेळ नसून गुंतवणूक मोकळी करून नफा कमविण्याची वेळ आहे. संख्याशास्त्राच्या व बाजाराच्या नियमानुसार बाजारात करेक्शन येऊ शकते. When the whole world is buying, I sell and when the whole world is selling, I buy हे वॉरन बुफेचे जगप्रसिद्ध वाक्य आहे. सर्वोच्च पातळीला विकायचे व सर्वात कमी किंमतीच्या जवळपास विकत घ्यायचे हे बॉरन बुफेचे सूत्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
अ
अभिजीत अवलिया Sat, 04/01/2017 - 10:47 नवीन
सर्वोच्च पातळीला विकायचे व सर्वात कमी किंमतीच्या जवळपास विकत घ्यायचे हे बॉरन बुफेचे सूत्र आहे. --- हे कितीही म्हटले तरी अमलात आणणे तसे शक्य नाही. कारण सर्वोच्च पातळी व सर्वात खालची पातळी कोणती असू शकते ह्याचा अचूक किंवा जवळपासचा अंदाज येणे देखील तितकेसे शक्य नाही. खुद्द बॉरन बुफेने शेअर मार्केट मध्ये अगणित चुका करून पैसे गमावलेले देखील आहेत. मी रोज cnbc aawaj बघतो. त्यातले एक्सपर्ट सांगतात त्यांचे पण ७०% अंदाज चुकतच असतात. त्यामुळे गुंतवणूक करताना स्टॉप लॉस ह्या तंत्राचा वापर करून करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 11:40 नवीन
बरोबर आहे. मी त्यासाठी २-३ सूत्रे पाळतो. पहिले सूत्र म्हणजे माझी बहुतेक सर्व गुंतवणूक ब्लू चिप कंपन्यांमध्येच आहे. इतर काही कंपन्या असल्या तरी बहुतेकवेळा ब्लू चिप कंपनीतच मी गुंतवणूक करतो. दुसरं म्हणजे कोणत्याही कंपनीच्या समभागाची मागील आठवड्यातील सर्वोच्च व सर्वात कमी किंमत पहायची व जर आजचा भाव त्या भावाच्या जवळपास असेल तर समभाग विकायचे किंवा खरेदी करायचे. जर आपल्याला हव्या असलेल्या कंपनीच्या समभागांची आजची किंमत ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीच्या खूप जवळ असेल तर विकत न घेता भाव कमी होण्याची वाट पहायची व जेव्हा किंमत बर्‍यापैकी कमी होईल त्या प्रत्येक वेळी थोडे थोडे समभाग विकत घेऊन पोर्टफोलिओ वाढवत न्यायचा आणि जेव्हा किंमत पुन्हा वाढून सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचेल तेव्हा जास्त मोहात न पडता विकून टाकायचे. सध्या टाटा स्टील व स्टेट बँकेचे समभाग चांगलेच वाढले आहेत. ज्यांच्याकडे या दोन कंपन्यांचे समभाग आहेत त्यांनी ते विकून नफा खिशात घालावा. एल अ‍ॅण्ड टी सुद्धा चांगलाच वाढला आहे. गरज नसल्यास तो सुद्धा विकून टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
र
रेवती गुरुवार, 03/23/2017 - 17:01 नवीन
आतापर्यंत तीनवेळा असं झालं की अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर केल्यावर आपोआप क्यान्सल झाली. बरं, सगळ्या वस्तू नाही तर एखादीच वस्तू आपोआप क्यान्सल होते. आणि त्याचे पैसे चार्ज अर्थातच केले जात नाहीत (दुसर्‍या बाजूने असतं तर तोट्याचं होतं, मग स्वस्थ बसले नसते). एकदा विंटर कोट, मग ग्लव्हज, आणि आता लेनोवोचा सेलफोन यांच्या ऑर्डरी वेगवेगळ्या वेळांना करून आता येईल म्हणून वाट बघतिये तर क्यान्सल झालेल्या. स्टॉकमध्ये असतात तरी असे का होत असावे?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/23/2017 - 19:18 नवीन
हायला हे सेटिंग कस केल रंगाकाकाला विचारले पाहेजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 03/23/2017 - 20:20 नवीन
विचार बाबा विचार! हितं विंटर संपला तरी कोट आला नाही अन काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
स्रुजा गुरुवार, 03/23/2017 - 21:22 नवीन
हीहीही . कशाला त्यांना अडचणीत आणतोयेस? मी पहिल्यांदाच अमेझॉन वरुन पर्स घेतली. भारतात आले होते तेंव्हापासून पर्स शोधत होते - आख्खा एफ सी रोड, दादर मार्केट फिरुन ऑफिसला जाण्याजोगी पर्स मिळेना . म्हणजे होत्या पण मला फार महाग वाटत होत्या. त्या फिरण्यात मी २ ऑफिसला जाताना काही उपयोगाच्या नाही अशा छोट्या पर्सेस घेतल्या हा त्यातला त्यात एक फायदा. पण अमेझॉन वर एक ३ पर्सेस चं छान डील होतं - एक मोठी पर्स - लॅपटॉप आणि डबा मावेल अशी - म्हणजे छोट्या मोठ्या ट्रॅव्हल साठी पण वापरता येईल. आणि त्याच डिझाईनच्या आत दोन पर्सेस - त्यातली एक क्रॉस ओव्हर आणि एक छोटी - नाणी वगैरे ठेवायला होईल अशी. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यावरचं डिझाईन. हल्ली वेगवेगळ्या जागांचे एम्बॉसिंग केलेले डिझाईन असतात त्यातली आहे. तशीच एक मी छोटी बॅगपॅक पण भारतातुन घेतली होती - वेगवेगळे ट्रॅव्हल स्टँप्स आहेत त्यावर आणि ती स्वस्त होती. तशी पर्स अमेझॉन वर दिसल्या दिसल्या उचलली - डिलीव्हरी एका आठवड्यात आली - पॅकिंग चांगलं होतं आणि मुख्य म्हणजे चित्रातल्या सारखीच दिसते आहे. त्याचीच जरा भीती होती पण आता धीर चेपल्याने २ टॉप्स आणि एक भारतीय शॉर्ट कुर्ता ऑर्डर केलेत लगोलग :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सही रे सई Mon, 03/27/2017 - 21:23 नवीन
लिन्क द्या नं मॅडम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
सही रे सई Mon, 03/27/2017 - 21:42 नवीन
ह्या काही आवडलेल्या पर्सेसः पहिली - ६ पीस ची दुसरी - हि तू म्हणत्येस ती असावी स्रुजा तिसरी - छान आहे पण पांढरी आहे त्यामुळे मळायची भीती अजुन कुठल्या वेगळ्या छानश्या पर्स तुम्हाला आवडल्या तर इथे सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
स
स्रुजा Mon, 03/27/2017 - 21:48 नवीन
हो हो हीच (म्हणजे दुसरी तुझ्या लिंक मधली) मला पण पहिली खुप आवडली होती पण दुसरी जास्त आवडली आणि दोन्ही न घेण्याचा संयम ठेवला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
र
रेवती Mon, 03/27/2017 - 23:58 नवीन
सगळ्या पर्सा पाहिल्या. पहिली व तिसती आवडली. दुसरीही आवडली असती पण तुळशीबागेत अशा खूप होत्या. ते पाहूनच पुरेसं झालं. पांढरी पर्स मळणार नाही फारशी. लेदर आहे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
अ
अत्रे Tue, 03/28/2017 - 02:32 नवीन
स्टॉकमध्ये असतात तरी असे का होत असावे?
माझं पण असं एकदा झालं आहे. मला वाटतं या विक्रेत्यांचे फिझिकल स्टोर्स असतील आणि ऑनलाइन ऑर्डर देतानाच तीच गोष्ट कोणीतरी त्यांच्या दुकानातून विकत घेतली असेल (आणि म्हणून स्टॉक संपला असेल). किंवा काही वेळेस विक्रेते किंमत वाढवून तोच आयटम ठेवतात (आधीची ऑर्डर कॅन्सल करून)l
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 03/28/2017 - 11:50 नवीन
वाचतिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
ह
हेमंत८२ Fri, 03/24/2017 - 10:31 नवीन
कालच अमेझॉन वर सेल चालू होते म्हणून ऑर्डर केला आहे एक्सपेक्टड डिलिव्हरी ३०-६ एप्रिल आहे बघू आल्यानंतर review टाकीन.
  • Log in or register to post comments
R
rain6100 Fri, 03/24/2017 - 11:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत८२ गुरुवार, 03/30/2017 - 11:19 नवीन
आज मोबाईल आला. चांगला आहे एवढेच.. कॅमेरा Quality :-- ओके इंटर्नल मेमरी :- ८.५०गब शिल्लक./१६ गब ओरिजिनल..( किंडल/ फबी/फ्लिपकार्ट इंस्टॉलेड सिम:- १+१/मेमरी कार्ड इअरफोन यात येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: rain6100
क
कंजूस Fri, 03/31/2017 - 17:10 नवीन
यापेक्षा 3 S घ्या असा रिव्ह्यु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत८२
र
रेवती Fri, 03/24/2017 - 20:44 नवीन
.....और ये मारी शेंचुरी! धन्यवादस. ;)
  • Log in or register to post comments
क
कुंदन Fri, 03/24/2017 - 20:51 नवीन
नोटबंधीच्या काळात लोक्स महागडे शोपिंग कर्ताना पाहुन डोले पानावले हो
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 03/24/2017 - 21:01 नवीन
अच्छे दिन.. अच्छे दिन.. म्हणतात ते हेच...! =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
प्रसन्न३००१ Mon, 03/27/2017 - 06:44 नवीन
Go Noise या वेबसाईट वरून, मोटो झेड प्ले आणि मोटो एक्स प्ले या २ फोनसाठी बॅकपॅनल कव्हर्स घेतले. २ दिवसात डिलिव्हरी मिळाली, उत्तम पॅकिंग...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 03/27/2017 - 13:41 नवीन
अरे, किती खरेद्या करता! =))
  • Log in or register to post comments
क
कुंदन Mon, 03/27/2017 - 19:46 नवीन
सौ लेन्सेस खरिद के , मैया चली हिमालयाज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 03/28/2017 - 11:52 नवीन
बोल्ला जळकूट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
पद्मावति Mon, 03/27/2017 - 21:35 नवीन
आमच्या एका लोकल ऑनलाइन शॉप मधून एक कुर्ती घेतली चिकन वर्क्स केलेली. आणि फॅब इंडिया(ऑनलाइन) मधून दोन सूती सलवार कमीज, दोन इयररिंग्स आणि एक नोज पीन. सगळ्याची क्वालिटी आणि फिटिंग उत्तम. मुख्य म्हणजे डेलिवरी अगदी जलद. इयरिंग्स दिसायला खूप हेवी दिसतात पण कानाला झेपतील असे आहेत त्यामुळे आवडले. मागच्या वेळी मी आमच्या इथल्या दुकानातून घेतले होते त्यानी कान तुटतो का काय अशी भीती वाटू लागली होती.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 03/27/2017 - 21:41 नवीन
हाईला, फॅब इंडिया चं ऑनलाईन स्टोअर भारताबाहेर डिलीव्हर करतं? बघायला हवं ( मिनिमलिझमच्या इराद्यांना सुरुंग लावतो हा धागा) सई, ही लिंक - तुझा प्रतिसाद वर गेलाय बराच पण इथे बघ - उजवीकडुन दुसरीवाली मी ऑर्डर केली: https://www.amazon.ca/gp/product/B01CZE62C8/ref=oh_aui_detailpage_o02_s00?ie=UTF8&psc=1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
य
यशोधरा Tue, 03/28/2017 - 11:54 नवीन
हल्ली अशा पर्सेस खूपच लोकप्रिय झाल्यात नं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
र
रेवती Tue, 03/28/2017 - 11:58 नवीन
होय. तेच माझ्या वरील प्रतिसादात म्हटले आहे. तुळशीबाग ब्रँडच्या आहेत पण त्या. स्रुजाने ऑर्डर केलेली साधी नाहीये पण पुण्यात या पर्सा दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पद्मावति Mon, 03/27/2017 - 21:45 नवीन
स्रुजा, भारताबाहेर करतात पण शिपिंग फार घेतात. त्यापेक्षा तू इंडियाच्या वेबसाइट वरुन ऑर्डर कर. अड्रेस भारताचा दे आणि मग कोणी येत असेल तर त्यांच्याबरोबर येऊ दे. किंवा भारतातून घरच्यांना सांगून कुरियर करव.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 03/27/2017 - 21:49 नवीन
हो तसंच करेन. काही नाही तर वस्तु घेऊन येण्यासाठी बहिणीला ये म्हणुन भरीस घालेन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ग
गवि Fri, 03/31/2017 - 11:12 नवीन
आता कोणीतरी नवीन धागा काढा. भाग ३ .
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 03/31/2017 - 21:44 नवीन
गविंसारखचं म्हंटे. शंभरावर प्रतिसादांची माझी हौस फिटली. आता खरेदीचा धागा क्र. ३ काढा रे कोणीतरी. इथे उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. आपणा सर्वान्ला चांगल्या खरेदीचे योग येवोत, प्रॉडक्ट चांगले लागो, वाजवी किमतीला मिळो, फसवणूक न होवो या सदिच्छांसह बाय म्हणते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 17:35 नवीन
चांगला रूम एसी कोणी घेतला आहे का? असल्यास किंमत व कंपनीचे नाव व इतर माहिती सांगावी.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न३००१ Sun, 04/02/2017 - 17:23 नवीन
माझ्याकडे ब्लुस्टार चा १ टन स्प्लिट AC आहे.. मी साधारण दसऱ्याच्या आसपास घेतला होता २४९९९/- ला विथ झिरो कॉस्ट ईएमआय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 17:45 नवीन
ब्लु स्टारचा परफॉर्मन्स कसा आहे? काही समस्या, कमतरता आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न३००१
म
मदनबाण Sun, 04/02/2017 - 11:05 नवीन
गविंसारखचं म्हंटे. शंभरावर प्रतिसादांची माझी हौस फिटली. चला,एकादाच झालं समाधान तर ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बिन तरे सनम... मर मिटेंग हम... आ मेरी जिंदगी ! :- [ Yaara Dildara ]
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 04/02/2017 - 15:47 नवीन
आता थोड्या दिवसांची निश्चिंती म्हणायची अन काय..................पुन्हा उबळ येईलच, तेंव्हा बघू. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रसन्न३००१ Sun, 04/02/2017 - 17:29 नवीन
क्विकहिल चं अँटी-व्हायरस सब्स्क्रिप्शन रिन्यू केलं
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा