Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एवढ्यात काय खरेदी केलत - २

र
रेवती
Sun, 03/19/2017 - 03:35
🗣 153 प्रतिसाद
नमस्कार, गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अ‍ॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्‍याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
33306 वाचन

💬 प्रतिसाद (153)
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 17:44 नवीन
क्विकहील चांगले आहे. ७ वर्षांहून अधिक काळ ते वापरत आहे. एकदा ३ वर्षांसाठी नूतनीकरण केले की ते ३९ महिन्यांसाठी होते. त्यांची सेवासुद्धा चांगली आहे. ऑनलाईन अ‍ॅटोमॅटिक अपडेट्स हा त्याचा मोठा फायदा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न३००१
म
मदनबाण Fri, 04/21/2017 - 06:17 नवीन
क्विकहील मी बर्‍याच वर्षा पूर्वी वापरले होते, डिटेक्शन रेट चांगला नाही... म्हणजे त्यावेळी तरी नव्हता सध्याच काही ठावूक नाही. या पेक्षा चकटफु Avira उत्तम !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सपनों में इंडिया है जाना है मुझको... :- Arash - Bombay Dreams (feat. Aneela & Rebecca)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनुप ढेरे Fri, 04/21/2017 - 06:27 नवीन
ऑनलाईन अ‍ॅटोमॅटिक अपडेट्स हा त्याचा मोठा फायदा आहे.
सगळेच देतात ती सोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा