Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी : भाग ५

ग
गॅरी ट्रुमन
Tue, 04/11/2017 - 07:07
🗣 300 प्रतिसाद
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे. दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील तर तामिळनाडूमधील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक निवडणुक आयोगाने रद्द केली आहे. इतर मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात ९ एप्रिलला मतदान पूर्ण झाले तर उरलेल्या मतदारसंघांमध्ये १२ एप्रिलला मतदान होईल. मतमोजणी १३ एप्रिलला होईल. श्रीनगर मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडून गेलेल्या पी.डी.पीच्या खासदाराने मागच्या वर्षी बुरहान वाणी प्रकरणानंतर उसळलेल्या असंतोषादरम्यान राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. पण या मतदारसंघात अवघे साडेसहा टक्के मतदान झाले. तसेच मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला. त्यामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील अनंतनाग या मतदारसंघातील पोटनिवडणुक सध्या रद्द केली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये पी.डी.पी च्या मेहबूबा मुफ्ती लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवून जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तामिळनाडूतील चेन्नई शहरातील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातून २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललितांचा विजय झाला होता. त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची होती. अण्णा द्रमुकच्या शशीकला नटराजन गटाने पक्षाचे ज्येष्ठ नेते टी.टी.व्ही.दिवाकरन यांना तर ओ.पन्नीरसेल्वम गटाने ई.मधुसुदनन यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर जयललितांच्या भाचीने-- जे. दीपानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. ही पोटनिवडणुक जिंकेल त्या गटाला जयललितांचा वारसा मिळेल असे म्हटले जाईल हे नक्कीच. त्यामुळे या निवडणुका दोन्ही गटांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या निवडणुकांसाठी पैशाचा महापूर वाहिला. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाचा ढापाही पडला. त्यातून निवडणुक आयोगाने ही पोटनिवडणुक रद्द केली. दिल्लीमधील राजौरी गार्डन मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे. या मतदारसंघात २०१५ मध्ये आआपचे जरनेलसिंग निवडून गेले होते. त्यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पंजाबमधील लांबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली. पण त्याच मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही निवडणुक लढवली. प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या महारथींपुढे जरनेलसिंगची डाळ शिजली नाही आणि लांबीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. हातात असलेली दिल्लीतील आमदारकी उगीचच त्यांनी सोडली. आता आआपने त्यांना उमेदवारी न देता हरजितसिंग या नव्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजप-अकाली दल युतीतर्फे अकाली दलाचे मनजिंदरसिंग सिरसा (२०१३ मधील विजयी उमेदवार) यांना तर काँग्रेसतर्फे मिनाक्षी चंदेला यांना उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे कारण हा निकाल लागल्यानंतर १० दिवसातच दिल्ली महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याची कल्पना राजौरी गार्डनमधील निकालामुळे येईल. दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या या मतदारसंघात १९४७ मध्ये पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या शीखांची (आणि त्यांच्या वंशजांची) संख्या लक्षणीय आहे. तसेच पंजाबशी या भागातील शीख मतदारांचे जवळचे संबंध आहेत. अनेकांचे नातेवाईक पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला त्याचा फायदा उठवायचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तसेच काँग्रेस नेते अजय माकन यांचा पूर्वीचा हा मतदारसंघ आहे. अजय माकन राजौरी गार्डनमधून १९९३, १९९८ आणि २००३ या ३ निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांचे घरही राजौरी गार्डनच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे काँग्रेस इथे चांगलाच जोर लावत आहे. या मतदारसंघात भाजपचा विशेष जोर नाही. आतापर्यंत एकदाच २०१३ मध्ये भाजप-अकाली दल युतीने ही जागा जिंकली होती. २०१५ मध्ये आआपने तर इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघात पराभव झाल्यास आआपच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर नक्कीच परीणाम होईल आणि १० दिवसांनंतर असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी ते पुरेशा आत्मविश्वासाने सामोरे जाणार नाहीत हे नक्कीच. त्या दृष्टीने आआप आणि केजरीवालांसाठी ही पोटनिवडणुक महत्वाची आहे. १३ एप्रिलला पोटनिवडणुकांचे निकाल आल्यावर ते इथे पोस्ट करेनच.
वर्गीकरण
राजकारण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
58962 वाचन

💬 प्रतिसाद (300)
श
श्रीगुरुजी Wed, 04/19/2017 - 16:34 नवीन
कोळसे पाटील हा अत्यंत नालायक आणि डांबरट माणूस आहे. याच माणसाने आपल्या वकिली कौशल्याने मानवत हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार उत्तम पाटील (या हत्याकांडात गुप्तधनासाठी ११ मुलांचा नरबळी देण्यात आला होता) याला निर्दोष सोडविले होते व त्या बदल्यात भरभक्कम कमाई केली होती. २६/११ चा हल्ला संघाने केला कारण त्यात त्यांना करकरेंना मारायचे होते असा जावईशोध लावणारे पुस्तक कोल्हापूरच्या मुश्रीफने लिहिले होते. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला कोळसे पाटील व पानसरे उपस्थित होते व त्यांनी संघाला शिव्या देणारी भाषणे ठोकली होती. हा माणूस सातत्याने संघाविषयी विखारी बोलत असतो. अशा हलकटांमुळेच निधर्मांध पक्षांची वाईट अवस्था झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/20/2017 - 08:36 नवीन
श्रीगुरुजी, तुमच्याशी याबाबत अक्षर-अन-अक्षर सहमत. बऱ्याच दिवसांनी असा योग आला म्हणून आवर्जून लिहितोय. मोदींना २०१९ साली निवडून येण्यात असेच विखारी आरोप मदत करणार आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पुंबा गुरुवार, 04/20/2017 - 09:00 नवीन
++११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/20/2017 - 12:05 नवीन
जे सातत्याने विखारी आरोप करीत बसतात त्यांच्याविषयी जनतेत संताप निर्माण होऊन ते जी आंदोलने, चळवळी करीत आहेत त्याविषयी जनतेची सहानुभूती कमी होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बच्चू कडू. बच्चू कडूने शेतकर्‍यांसाठी कसला तरी मोर्चा काढला आहे. परंतु मोर्चात भाषणे करताना त्याची जीभ सातत्याने घसरत आहे. आधी तो हेमा मालिनीवर घसरला आणि ती रोज टंपरभर दारू पिते असे बरळला. परवा तो सचिन तेंडुलकरवर घसरला व सचिनचा कबुतर असा उल्लेख करून त्याने सचिनवर तोंडसुख घेतले. सचिनबद्दल जनमानसात चांगली प्रतिमा आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न व सचिन यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना विनाकारण सचिनला मध्ये ओढल्याने या माणसाबद्दल व त्याच्या शेतकरी आंदोलनाबद्दल जनतेची सहानुभूती कमी होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/08/2017 - 19:43 नवीन
"आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू" असे बच्चू कडू पुन्हा एकदा बरळला आहे. माधव भंडारींनी जे वक्तव्य केलंच नव्हतं, त्यावर त्यांना झोडपून काढणारे शेतकरी नेते या जाहीररित्या केलेल्या वक्तव्यावर अजून गप्प आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित गुरुवार, 04/20/2017 - 15:23 नवीन
मानवत हत्याकांड खरंच खूप निर्घृण आणि तेवढेच रोचक हत्याकांड आहे. मोनोपॉज असलेल्या महिलेला संतती आणि गुप्तधन मिळावे म्हणून अविवाहित ब्राह्मणांच्या अतृप्त मुंजोबाला प्रसन्न करण्याच्या पायी ११ जणांचा नरबळी देण्यात आला होता. विशेष म्हणजे काही हत्या तर पोलिसांच्या आसपास झाल्या होत्या. पण उच्च न्यायालयाने निर्णयाच्या शेवटच्या परिच्छेदात खालील नमूद केले आहे आणि तीन निष्णात तरुण वकिलांचे कौतुक केले आहे. हे तीन तरुण निष्णात वकील कोण होते? कोणी प्रकाश टाकू शकेल का? ""Counsel drew our attention to a very disquieting feature in the attempt of the police to see that the accused did not get the assistance of the local Bar. The suggestion has of course been denied by the police officer. If there is any truth in this unholy move for denying proper defence to the accused, no matter how heinous the offence, it is highly obnoxious to the notions of fair play and ऑल that justice stands for. Such ideas should be banished. I hasten to add that the accused before us कोल्ड not have been better defended as has been done by the three conscientious young counsel who impressed us with their industry and ability.""" https://indiankanoon.org/doc/148506/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/19/2017 - 07:22 नवीन
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडायचा कट केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि उमा भारती यांच्याविरूध्द गुन्हेगारी स्वरूपाचा खटला चालविण्यात यावा असा निकाल दिला आहे. http://timesofindia.indiatimes.com/india/babri-case-supreme-court-restores-conspiracy-charges-against-advani-and-other-bjp-leaders/articleshow/58254208.cms प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावरून जुलै महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी किंवा मुरलीमनोहर जोशींना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले जाईल अशा बातम्या येत होत्या (त्या खर्‍या असतील असे मला तरी कधीच वाटले नव्हते). यापुढे या वावड्या उठणे बंद होईल अशी अपेक्षा. उमा भारतींना मंत्रीपद सोडावे लागेल किंबहुना राममंदिरासाठी मी फासावरही जायला तयार होईन अशी डरकाळी त्यांनी मध्यंतरी फोडली होती. त्या तुलनेत मंत्रीपद म्हणजे किस झाड की पत्ती!!
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 04/19/2017 - 07:46 नवीन
सत्ताधारी पक्षाच्या "मार्गदर्शक मंडळावर" गुन्हेगारी कटाचा खटला..... पक्षाध्यक्ष तडीपार.... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनुप ढेरे Wed, 04/19/2017 - 08:05 नवीन
सत्ताधारी पक्षाच्या "मार्गदर्शक मंडळावर" गुन्हेगारी कटाचा खटला..... पक्षाध्यक्ष तडीपार....
हॅहॅहॅ. जामिनावर बाहेर असलेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षांपेक्षा बरं आहे हे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 04/19/2017 - 08:15 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मोदक Wed, 04/19/2017 - 13:41 नवीन
ढेरेसाहेब... अशी लगेच हवा काढलीत की मिपावर असहिष्णुता वाढल्याचे आरोप होतील. स्वत:चे हात कितीही काळे असले तरी त्याच हाताने दुसर्‍याकडे सतत बोटं दाखवण्यच्या कौशल्याला कधीतरी दाद द्यावी.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पुंबा Wed, 04/19/2017 - 09:05 नवीन
सुषमांना परराष्ट्रमंत्रीपदावरून हटवून त्यांच्याजागी वसुंधरा राजेंना आणण्याचा भाजपाच्या वरिष्ठ वर्तुळात मनोदय आहे असे ऐकले. असे झाले तर सुषमांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे येईल असे वाटते. तसे झाल्यास इतर पक्षातूनदेखील सुषमांना समर्थन मिळेल. बाकी आडवानी राष्ट्रपती होतील असे कधीही वाटले नव्हते. त्यांचं नशीब कायमचं फुटलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/19/2017 - 09:16 नवीन
त्यांचं नशीब कायमचं फुटलेलं आहे.
असल्या माणसाचं नशीब कायमचं फुटलेलं आहे ते चांगलंच आहे. सुधींद्र कुलकर्णी या मुळातल्या कम्युनिस्ट माणसाच्या भजनी लागले आणि अडवाणी बियॉन्ड रिडेम्पशन कामातून गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/20/2017 - 11:59 नवीन
अडवाणी, मुरली मनोहर जोशी व इतरांविरूद्ध न्यायालयाने खटला चालविण्याचा निर्णय दिल्यामुळे उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयामुळे अडवाणींची राष्ट्रपतीपदाची संधी हुकली, यामागे मोदींचा हात आहे अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या आहेत. मुळात अडवाणींची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी हा माध्यमांचा शोध आहे. स्वतः अडवाणींनी याबद्दल आजतगायत एक अवाक्षरही काढलेले नाही. भाजपकडून देखील याबाबत आजतगायत काहीही अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. अनधिकृतरित्या सुद्धा भाजपच्या गोटात अशा हालचाली सुरू नव्हत्या. सध्या अडवाणींचे वय ८९ वर्षे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी म्हणजे जुलै २०१७ मध्ये त्यांचे वय ८९ वर्षे ८ महिने इतके असेल. ते शारिरिकदृष्ट्या तंदुरूस्त असले तरी इतक्या वृद्धापकाळात भाजप त्यांना राष्ट्रपतीपदासाठी निवडण्याचा विचार करीत असेल असे वाटत नाही. ते स्वतःदेखील या पदासाठी इच्छुक असतील असे वाटत नाही. त्यामुळे न्यायालयात हा खटला पुन्हा सुरू होण्यामागे मोदी असतील असे वाटत नाही कारण अडवाणींचे आव्हान २०१३ लाच संपलेले आहे. श्रीराम जन्मभूमी प्रकरण १९९२ मध्ये घडले. आता तब्बल २४ वर्षे उलटून गेल्यानंतर हे प्रकरण सुरू करून न्यायालयाला नक्की काय साध्य करायचे आहे ते समजत नाही. यातील अनेकजण केव्हाच स्वर्गवासी झाले आहेत. अडवाणी, मुरली मनोहर जोशी इ. नेते ९० च्या घरात आहेत. खरं तर हा खटला सुरू झाला तर भाजपचा त्यात फायदाच आहे कारण त्यानिमित्ताने पुन्हा एकदा श्रीरामजन्मभूमी, श्रीराम मंदीर इ. मुद्द्यांची चर्चा सुरू होईल व या मुद्द्यांवर नक्की कोणती भूमिका घ्यायची याविषयी बहुसंख्य पक्षांची अडचण होईल. जर खरोखरच हा खटला दोन वर्षात निकालात काढायचा असेल तर अंदाजे मे २०१९ मध्ये या खटल्याचा निकाल लागेल व त्याचा काळात लोकसभेची पुढील निवडणुक होईल. या खटल्यात अडवाणी, जोशी, उमा भारती इ. दोषी ठरले तरी भाजपला फायदा आणि निर्दोष सुटले तरी भाजपला फायदाच. अडवाणी दोषी ठरले असे जाहीर झाले तरी त्यांचे वय लक्षात घेता ते तेव्हा असतील का याविषयी शंका आहे आणि समजा असले तरी त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना कोणतीही शिक्षा मिळणार नाही (शिबू सोरेन भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरूनसुद्धा त्याचे वय ७० च्या आसपास आहे या कारणामुळे न्यायालयाने त्याला शिक्षा दिली नव्हती). तसेच या न्यायालयात शिक्षा झाली तरी नंतर उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान देता येईल व त्यासाठी किमान २ दशकांचा काळ जाईल. त्यामुळे या खटल्याला तसा काहीही अर्थ नाही. त्यांचं नशीब कायमचं फुटलेलं आहे का हे माहिती नाही, परंतु भाजपमध्ये ते सर्वाधिक उंचीचे नेते आहेत याविषयी तिळमात्र शंका नाही. १९८५ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचे देशभरातून फक्त २ खासदार निवडून आले होते. प्रत्यक्ष वाजपेयी व स्वतः अडवाणींचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत त्यांना भाजपच्या अध्यक्षपदावर नेमण्याचा अचूक निर्णय भाजप पक्षाने घेतला. त्याकाळात नुकताच उदयाला आलेला श्रीरामजन्मभूमीचा मुद्दा त्यांनी चटकन उचलला व देशभर रथयात्रा काढून भाजपला त्या मुद्द्याशी जोडून पक्षविस्तार केला. त्याचबरोबर समविचारी प्रादेशिक पक्षांशी युती करून पक्ष वाढविण्याची यशस्वी योजना त्यांनीच राबविली. शहाबानो प्रकरणात राजीव गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धुडकावून संसदेतील पाशवी बहुमताच्या जोरावर नवीन कायदा आणून मुस्लिम महिलांना कायमस्वरूपी अंधारात ढकलून दिले. या प्रकरणावरून देशात काँग्रेसविरोधी वातावरण निर्माण करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याच्याबरोबरीने बोफोर्स तोफांच्या खरेदीत दिली गेलेली लाच, जर्मन पाणबुड्यांच्या खरेदीत दिली गेलेली लाच याविरूद्ध वि. प्र. सिंग यांच्याप्रमाणे भाजपनेही देशभर जोरदार प्रचार केला होता. महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा जास्त बळ असताना कमीपणा पत्करून शिवसेनेशी युती करण्याचा त्यांचा निर्णय भाजपच्या विस्ताराला चांगलाच फायदा देऊन गेला. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या जनता दलाशी थेट युती न करता राजस्थान व गुजरात मध्ये त्यांनी जागावाटप समझोता करून दोघांनाही फायदा करून दिला. गुजरातेत भाजपने १४ जागा लढवून १२ जागा जिंकल्या तर जनता दलाने उर्वरीत १२ जागा लढवून ११ जागा जिंकल्या होत्या. राजस्थानमध्ये भाजपने १४ व जनता दलाने ११ लढविल्या होत्या व दोघांनी सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्याच दूरदर्शी नेतृत्वामुळे भाजपची लोकसभेतील संख्या २ वरून ९० वर पोहोचली व उत्तरोत्तर ती वाढतच गेली. १९९१ च्या निवडणुकीत भाजपने आपली संख्या ९० वरून १२० वर नेली तेव्हाही अडवाणीच पक्षाध्यक्ष होते. भाजपचा विस्तार होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आपल्यापेक्षा वाजपेयींची सार्वजनिक मान्यता जास्त आहे हे ओळखून १९९५ मध्ये झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी चतुराईने वाजपेयी हेच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे जाहीर करून स्वतः माघार घेतली. मोदींचा उदय होईपर्यंत वाजपेयी मध्यममार्गी व अडवाणी जहाल अशी प्रतिमा माध्यमांनी निर्माण केली होती. त्यामुळे अडवाणींवर माध्यमांचा कायम रोष असायचा. मोदींच्या उदयानंतर अडवाणी मध्यममार्गी व मोदी जहाल अशी प्रतिमा निर्माण झाली. कालांतराने मोदी मध्यममार्गी व त्यांच्याजागी नवीन आलेला जहाल (कदाचित योगी आदित्यनाथ) अशी प्रतिमा निर्माण होईल. त्यांचे राजकीय जीवन पूर्ण निष्कलंक होते. त्यांनी राजकारणात घराणेशाही आणली नाही व स्वतःच्या पत्नीला व मुलानातवंडांना राजकारणापासून कटाक्षाने दूर ठेवले. स्वतःच्या पदाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केल्याचे ऐकिवात नाही. १९९६ मध्ये नरसिंह रावांनी अत्यंत धूर्तपणे विरोधी पक्षातील काही विरोधकांना व आपल्याच पक्षातील विरोधकांना बदनाम करण्यासाठी जैन हवाला डायर्‍या प्रकरणाचे निमित्त करून अडवाणी, शरद यादव, मदनलाल खुराना, माधवराव सिंदिया, कमलनाथ इ. ना या प्रकरणात अडकविले. मे १९९६ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी १९९६ मध्ये हे प्रकरण बाहेर आणून नरसिंहरावांनी एक जबरदस्त राजकीय खेळी खेळली. परंतु ही खेळी त्यांच्यावरच उलटली. संतापलेल्या माधवराव सिंदियांनी नवीन प्रादेशिक पक्ष काढून खासदारकीची निवडणुक जिंकली. आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेल्याने अत्यंत दुखावलेल्या अडवाणींनी खासदारकीचा राजीनामा देऊन या प्रकरणातून निर्दोष सुटेपर्यंत आपण निवडणुक लढविणार नाही असे जाहीर करून उच्च नैतिक भूमिका घेतली. यथावकाश निवडणुक झाल्यावर भाजपने १६० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष हे स्थान मिळविले व कॉंग्रेसला १४० जागा मिळून काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर फेकली गेली. कॉग्रेसच्या अपयशाचा नरसिंहरावांना फटका बसला व त्यांना पक्षाध्यक्षपद गमवावे लागले. एकंदरीत हवाला प्रकरण नरसिंहरावांवरच उलटले. हे प्रकरण अत्यंत फुसके होते. त्यात काहीच पुरावे नव्हते. त्यामुळे १९९८ मध्ये या प्रकरणाचा निकाल लागून त्यातील सर्वजण निर्दोष सुटले व अडवाणींवर आलेला कलंक दूर झाला. परंतु काँग्रेसला, विशेषत: नरसिंहरावांना, या प्रकरणाचा जोरदार फटका बसला. नंतर १९९८ ते २००४ या काळात गृहमंत्री या नात्याने अडवाणींनी चांगले काम केले होते. त्यांची या काळातील उल्लेखनीय कामे म्हणजे बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याला सुरूवात, अतिरेक्यांविरूद्ध पोटा या नवीन कायद्याची निर्मिती, अनेक देशांबरोबर गुन्हेगार हस्तांतरण करार, २००१ मध्ये भारतभेटीवर आलेल्या मुशर्रफच्या दबावाला खंबीर उत्तर, केंद्र व राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या संख्येवर १५ टक्क्यांची मर्यादा (या नवीन कायद्यामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या ६९ वरून ४३ वर आली), पक्षांतरबंदी कायद्यातील काही पळवाटा काढून तो अधिक कडक करणे इ. त्यांनी अजून एक महत्त्वाचे काम केले. २००२ मध्ये गोध्रा येथे मुस्लिमांनी रेल्वेचा डबा पेटवून ६० नागरिकांना जिवंत जाळल्यानंतर जी दंगल झाली त्यासाठी मोदींना जबाबदार धरण्यात येत होते. मोदींवर व केंद्र सरकारवर प्रचंड टीकेचा भडीमार होत होता व मोदींना हटवावे यासाठी वाजपेयींवर सर्व बाजूने दबाव येत होता. वाजपेयींनी त्या दबावाखाली झुकून मोदींना हटविण्याचा निर्णय जवळपास नक्की केला होता. परंतु त्यावेळी अडवाणी खंबीरपणे मोदींच्या बाजूने उभे राहिले व मोदींना हटविण्यापासून त्यांनी वाजपेयींना परावृत्त केले. परंतु २००४ मधील त्यांची भारत उदय यात्रा फसली. २००४ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामागे अनेक कारणे होती. नंतर २००५ मध्ये ते पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेले असताना माध्यमांनी त्यांचे उद्गार ट्विस्ट करून त्यांना फाडून खाल्ले व त्यांची देशभर बदनामी केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये जिनाच्या थडग्याला भेट दिली असताना ते म्हणाले होते की "पाकिस्तानच्या स्थापनेनंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात जिनाने केलेले भाषण हा धर्मनिरपेक्ष भाषणाचा उत्कृष्ट नमुना होता. जर पाकिस्तान त्या भाषणात सांगितलेल्या मार्गाने चालला असता तर आज पाकिस्तानात इतक्या समस्या निर्माण झाल्या नसत्या.". त्यांची ही वाक्ये माध्यमांनी ट्विस्ट करून सांगताना अडवाणींनी जिनाला धर्मनिरपेक्ष म्हणून त्याची स्तुती केली अशा बातम्या दिल्या. त्यामुळे देशभर अडवाणींवर टीका झाली. ते नक्की काय म्हणाले होते ते समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न न करता त्यांना यथेच्छ झोडपून काढले गेले. २००४ मधील अपयशाचे खापरही बहुतांशी त्यांच्या भारत उदय यात्रेवर फोडले गेले होते. त्या प्रकरणानंतर अडवाणींच्या राजकीय जीवनाला उतरती कळा लागली. २००९ ची निवडणुक आजारपणामुळे वाजपेयींनी लढविली नाही. त्यामुळे रालोआचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून अडवाणींचे नाव जाहीर झाले. परंतु २००९ च्या निवडणुकीत भाजपची संख्या अजून घसरली. त्यामागेही अनेक वेगवेगळी कारणे होती. त्यानंतर अडवाणी निष्प्रभ होत गेले. त्यामुळे २०१३ मध्ये मोदींचे नाव पुढे आले. त्यावेळी अडवाणींनी जाहीर विरोध केला होता व पुन्हा एकदा ते भाजप मतदारांचे खलनायक ठरले होते. वास्तविकरित्या मोदींना त्यांनी केलेला विरोध हा आंधळा विरोध नव्हता. स्वतःला पंतप्रधानपद मिळावे ही आकांक्षा त्यामागे नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार देशात २०१३ मध्ये जबरदस्त काँग्रेसविरोधी वातावरण होते. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने आहेत ते मित्र टिकवून नवीन मित्र मिळवून एकत्रित निवडणुक लढली तर १९९९ प्रमाणे मोठे यश मिळू शकते. परंतु मोदी भाजपचे उमेदवार असतील तर मोदींच्या प्रतिमेमुळे भाजपशी युती करण्यासाठी इतर पक्ष बिचकतील व त्यामुळे भाजपला फारसे मित्र मिळणार नाहीत व अनुकूल परिस्थितीचा फायदा घेता येणार नाही. परंतु मोदींना विरोध करताना त्यांनी दोन चुका केल्या. त्यांना मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेचा व मोदींच्या निवडणुक प्रचाराच्या कौशल्याचा फारसा अंदाज आला नाही व दुसरं म्हणजे त्यांनी आपले मत पक्षांतर्गत व्यासपीठावर न मांडता थेट माध्यमांकडे मांडले व सर्व पदांचे राजीनामे देऊन आपली सर्व हुकुमाची पाने खेळून टाकली (हीच चूक नितीशकुमारांनी सुद्धा केली होती). खरं तर अडवाणींनी २०१४ ची निवडणुक न लढविता पक्षाचा मेंटॉर अशा भूमिकेत काम करायला हवे होते. आता अडवाणींकडे आव्हान देण्यासारखे काहीही राहिले नाही हे लक्षात आल्यावर मोदींना अडविणारे कोणीच राहिले नाही. मोदींनी २०१४ ची निवडणुक एकहाती जिंकून आपल्यावरील विश्वास सार्थ करून दाखविला. काहीही असलं तरी अडवाणींना आयुष्याच्या संधीकाळात अशा खटल्याला तोंड द्यावे लागणार आहे याचे वाईट वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 04/20/2017 - 19:17 नवीन
अडवाणी हे १९८०-९० च्या दशकात भाजपमधील सर्वाधिक उंचीचे नेते होते यात काहीच वाद नाही. पण आता तशी परिस्थिती नक्कीच नाही. त्यांनी (आणि जसवंतसिंगांनी) स्वतःच्या कृत्यांनी आपल्याविषयीचा आदर कमी केला आहे. २००४ मध्ये सत्ता गेल्यानंतर भाजपची अवस्था पूर्ण सैरभैर झाली होती. एकामागोमाग एक हास्यास्पद आणि बेजबाबदार वक्तव्ये द्यायचा सपाटा भाजप नेत्यांनी लावला होता. त्यातलेच एक अडवाणींचे विधान म्हणजे कंदाहार विमान अपहरणप्रकरणी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग कंदाहारला जाणार हे त्यांना माहित नव्हते. २००४-०९ मध्ये अडवाणी विरोधीपक्षनेते होते. पण १९९० च्या दशकातील आक्रमक विरोधी पक्षनेता मात्र पूर्ण मावळला होता.बाकी पाकिस्तानात जाऊन जीनांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षपणाचे गोडवे गाणे आणि पाकिस्तान जर त्या मार्गावर चालला असता तर परिस्थिती वेगळी असती हे म्हणणे अत्यंत बेजबाबदार होते. जीना खरोखरच धर्मनिरपेक्ष असतील तर १९४७ मध्ये लाखो लोक धार्मिक उन्मादात मृत्युमुखी पडल्यावर तो मनुष्य किमान त्याविरूध्द काहीतरी बोलेल. तेवढे तरी जीनांनी केले का? आणि जीनांनी इतिहास घडवला असे काहीसे जीनांच्या कबरीच्या ठिकाणी जाऊन व्हिजिटर्स डायरीमध्ये अडवाणींनी लिहिले होते. जीनांनी इतिहास घडवला हे खरेच आहे पण तो इतिहास लाखो लोकांच्या रक्तावर घडवला होता त्याचे काय? आणि इतिहास घडविणे हा मापदंड असेल तर तसाच इतिहास गझनीच्या महंमदाने आणि औरंगजेबानेही घडवला होताच की. जीनांच्या 'धर्मनिरपेक्ष मार्गावर पाकिस्तान चालायला हवा होता' हे म्हणणे आणि परवेझ मुशर्रफने कुठेतरी (उदाहरणार्थ यु.एन मध्ये) दहशतवादाविरोधी तोंडदेखल्या एखादे वक्तव्य केले असेल त्याचा हवाला देत 'मुशर्रफने सांगितलेल्या दहशतवादविरोधी मार्गावर पाकिस्तानने चालायला हवे होते' असे कोणी म्हटले तर त्यात नक्की काय फरक आहे? अडवाणींनी याच पाकिस्तान दौर्‍यात ६ डिसेंबर १९९२ हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता असे म्हटले होते. हा तर ढोंगीपणाचा कळस झाला. बरं तो जर यांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस असेल तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून यांनी नक्की काय केले? भाजप अयोध्या आंदोलनामुळेच १९९८ मध्ये सत्तेत गेला हे कोणीही अगदी शेंबडं पोरही सांगू शकेल. आणि त्याच सर्वात वाईट दिवशी झालेल्या घटनेवर आधारीत मिळालेल्या सत्तेत हे चांगले उपपंतप्रधान म्हणून वावरले आणि तसे करताना त्यांना कसले वैषम्य वाटल्याचे ऐकिवात नाही. या बाबतीत बाळासाहेब ठाकर्‍यांना मानले. जे काही झाले त्याचा कसलाही आडपडदा न ठेवता कोणत्याही बुरख्याआड लपायची गरज त्यांना वाटली नाही आणि जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असे जाहिर वक्तव्य त्यांनी निदान १९९२-९३ मध्ये तरी दिले होते. (१९९७ मध्ये अयोध्येत मंगल पांडेचे स्मारक बांधा असे म्हणत त्यांनीही टोपी फिरवली ही गोष्ट वेगळी). मोदींना विरोध म्हणून राजीनामा द्यायचे नाटक केल्यावर भाजप कार्यकर्त्यांची त्यांच्या घरापुढे निदर्शने झाल्यावर त्यांनी भिंतीवरील लिखाण समजून घ्यायला हवे होते. अब जमाना बदल गया है आणि अडवाणींचे नेतृत्व भाजप कार्यकर्त्यांनाही आता मान्य नाही आणि नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. १९९० च्या दशकात अडवाणींच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने होऊ शकली असती का? तरीही हे त्यावरच अडून राहिले. इतकेच नाही तर सप्टेंबर २०१३ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहिर करायच्या वेळीही अडवाणींनी नाटके करून झाली. त्यांना फारसे कोणी विचारले नाही तरीही २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मोदी गांधीनगरमधून आपला पराभव घडवून आणतील म्हणून भोपाळला स्थलांतरीत व्हायचा विचार करून झाला. १६ मे २०१४ रोजी भाजपचा लोकसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व विजय झाल्यानंतर "हा सामुहिक नेतृत्वाचा विजय आहे" अशी क्षीण प्रतिक्रिया देऊन आपल्याला द्येय नसलेले श्रेय घ्यायचा प्रयत्नही करून झाला. दिल्लीमध्ये केजरीवाल जिंकल्यावर केजरीवालांनाही अडवाणी भेटणार अशा बातम्या आल्या होत्या. खरेखोटे तो भगवंत, अडवाणी आणि केजरीवाल जाणोत. मग मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना देशात आणीबाणीसदृश परिस्थिती आहे अशी पिंक टाकून झाली. म्हणजे प्रत्यक्ष आणीबाणी होती त्यावेळी हे बंगलोरला तुरूंगात होते पण २०१५ मध्ये आपल्या दिल्लीतील निवासस्थानी राहून भरल्या पोटी असली मखलाशी मात्र त्यांनी केली आणि त्यात त्यांना काहीही विसंगत वाटले नाही. एकूणच अडवाणींचा रूसवाफुगवा म्हणजे टिपीकल भारतीय कुटुंबांमधील खाष्ट सासूची आठवण करून देतो. मी माझ्या मुलाला पहिल्या दिवसापासून वाढवले आहे म्हणून मी सांगेन तसेच व्हायला हवे अशी म्हणणारी सासू आणि मी माझ्या पक्षासाठी पहिल्या दिवसापासून काम केले आहे म्हणून मी सांगेन तसेच व्हायला हवे असे म्हणणारे अडवाणी यात नक्की फरक काय? अडवाणींनी पक्षासाठी खूप काम केले आणि अत्यंत तळमळीने काम केले हे कोणीच नाकारत नाही. पण म्हणून मी सांगेन तसे आणि तसेच व्हायला पाहिजे हे म्हणणे म्हणजे पराकोटीचा दुराग्रह झाला. बाकी अडवाणींनी जनसंघातून बलराज मधोकांचा काटा कसा काढला हे अनेकांना माहित नसते. १९७३ मध्ये अडवाणी जनसंघाचे अध्यक्ष पहिल्यांदा झाले आणि त्यानंतर बलराज मधोकांना पक्षातून काढायचा त्यांनी पहिला निर्णय घेतला. त्यामागे कारण असे दिले होते की बलराज मधोकांनी जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष यांच्यात युती व्हावी अशी मागणी केली आणि स्वतंत्र पक्षासारख्या उजव्या पक्षाबरोबर युती करणे वाजपेयी आणि अडवाणींना मान्य नव्हते. त्याबद्दल बलराज मधोकांना पक्षातून काढणे हाच उपाय होता का? समजा तसे मान्य केले तरी मग १९९० च्या दशकात भाजपने नरसिंह राव सरकारच्या नव्या आर्थिक धोरणांना बर्‍यापैकी पाठिंबा दिला आणि नंतर स्वतः सत्तेत आल्यावर खाजगीकरणाचा कार्यक्रम मोठ्या जोमात चालवला. अशावेळी जी मागणी बलराज मधोक १९७३ मध्ये करत होते त्याच वाटेवरून आपण आता बर्‍याच प्रमाणावर जात आहोत तेव्हा आता मतभेदाचे कारण नाही म्हणून त्यांना सन्मानाने परत पक्षात घेण्यासाठी भाजप अध्यक्ष असलेल्या अडवाणींनी नक्की कोणते प्रयत्न केले होते? यावरून असे वाटते की आपल्या नेतेपदाच्या मार्गात आव्हान नको म्हणून अडवाणी (आणि वाजपेयींनी सुध्दा) बलराज मधोकांना पक्षाबाहेर काढून परस्पर काटा काढला. बलराज मधोकही वाजपेयींसारखेच कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आणि तसेच तळमळीचे नेते होते. बलराज मधोकांचे मात्र वाईट वाटते. ते आपल्या तत्वापासून शेवटपर्यंत ढळले नाहीत. मागच्या वर्षी त्यांचे जम्मूमध्ये वयाच्या ९५-९६ व्या वर्षी निधन झाले. तोपर्यंत ते स्वतःचा भारतीय जनसंघ हा पक्ष चालवत होते. त्या पक्षाचे दहा सदस्य तरी होते की नाही कुणास ठाऊक. पण तरीही त्यांनी जी तत्वे प्रमाण मानली होती त्या तत्वांशी ते शेवटपर्यंत निष्ठा ठेऊन राहिले. अडवाणींप्रमाणे कोलांट्या उड्या मात्र त्यांनी मारल्या नाहीत. जर अडवाणींनी १९७३ मध्ये बलराज मधोकांना पक्षाबाहेर काढले तर त्यांनाही दुसरे कोणीतरी येऊन तीच दवा खिलवणार हा निसर्गाचा न्याय झाला. नशीब इतकेच की मोदींनी अडवाणींना पक्षाबाहेर काढले नाही. २००२ मध्ये मोदींची पाठराखण अडवाणींनी केली होती त्याची जाण मोदींनी ठेवली!! या सगळ्या प्रकारांमुळे अडवाणींविषयीचा एकेकाळी असलेला आदर मात्र नक्कीच कमी झाला आणि आता नसल्यात जमा आहे. मी २०१४ मध्ये भाजपला मत दिले ते केवळ मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते म्हणून. जर अडवाणी त्याजागी असते तर मी भाजपला नक्कीच मत दिले नसते. माझ्यासारखे अनेक मतदार होते/आहेतच. आपल्याला १९९० च्या दशकात होता तसा जनाधार आता शिल्लक नाही हे समजून घेऊन अडवाणींनी गप्प बसणे श्रेयस्कर ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 04/21/2017 - 11:22 नवीन
इथे अडवाणींचे ते संपूर्ण भाषण आहे. संपूर्ण भाषणात 'जिना निधर्मी होता' असे कोठेही त्यांनी म्हटल्याचे दिसत नाही. या लेखात या भाषणाचे विश्लेषण आहे. माध्यमे त्या काळात सोनिया गांधी, मनमोहन सिंग व काँग्रेसच्या प्रेमात बुडलेली होती व त्यांच्या दृष्टीने अडवाणी, मोदी व महाजन हे खलनायक झाले होते. त्यामुळे अडवाणींचे भाषण ट्विस्ट करून त्यांना झोडपण्यात माध्यमांनी अजिबात हयगय केली नाही. २००५ मध्ये अडवाणी कराचीत जे बोलले तेच ते पूर्वी फेब्रुवारी २००४ मध्ये भारतात सुद्धा बोलले होते. परंतु त्या काळात त्या भाषणाची दखलच घेतली गेली नव्हती कारण त्यावेळी त्यागमूर्ती सोनिया गांधींच्या त्यागाचा उदय झालेला नव्हता व भाजप सत्तेवर असल्याने अडवाणी व महाजन २००५ मध्ये जितके खलनायक होते, तितके खलनायक ते त्या काळात नव्हते. परंतु २००५ मध्ये भाजप सत्तेवर नव्हता व माध्यमे सोनिया गांधींच्या त्यागाने भारावून गेली होती. पराभवाचे खापर अडवाणी व महाजन यांच्या डोक्यावर फुटले होते. त्यामुळे अडवाणींचे कराचीतील भाषण हे त्यांना झोडपून काढण्यासाठी ट्विस्ट करून वापरले गेले. जिनाने इतिहास घडविला हे अडवाणींचे मत चूक नव्हते. इतिहास गौरवशाली किंवा दैदिप्यमानच असायला हवा असा काही नियम नाही. इतिहास हा काळाकुट्ट, लाजिरवाणा आणि वेदनादायी सुद्धा असू शकतो. हिटलर किंवा अगदी ओसामा बिन लादेनने सुद्धा, काळाकुट्ट असला तरी, इतिहासच घडविला होता. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात एखाद्या व्यक्तीने एका राष्ट्राचा संस्थापक व प्रमुख बनणे हे त्या व्यक्तीने इतिहास घडविणेच आहे. जरी हिंसाचार, रक्तपात अशा अतिशय वाईट मार्गाने ते राष्ट्र स्थापन झाले असले तरी तसे घडविणे हे इतिहास घडविणेच आहे. जगाच्या इतिहासात स्वतंत्र राष्ट्र स्थापन करून त्याचे प्रमुख बनणे हे फार थोड्या लोकांना जमले आहे. जिनाने त्यासाठी अतिशय वाईट मार्गाचा वापर केला होता, तरी त्याने आपल्याला हवे ते साध्य करून दाखविले होते. बलराज मधोकांचा इतिहास माहित नसल्याने त्या विषयावर पास. मी आधी लिहिल्याप्रमाणे २००४ नंतर अडवाणींचा उतरता काळ सुरू झाला. माध्यमांनी त्यांना खलनायक बनविले. माध्यमांनी तसेही १९९० पासून त्यांना खलनायक बनविलेच होते. जुन्या धोपटमार्गानेच प्रादेशिक पक्षांपुढे नमते घेऊन युतीचे राजकारण करून व काँग्रेसविरोधी मतांची फाटाफूट टाळून सत्ता मिळवावी असे त्यांचे मत होते. नंतरच्या काळात मोदींची वाढती लोकप्रियता त्यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ते २०१३ मध्ये पुन्हा एकदा खलनायक ठरले. २०१४ मध्ये निवडणुकीला उभे न राहता भाजपचा त्यांनी Patron किंवा Mentor अशा स्वरूपाच्या भूमिकेत काम करायला हवे होते. परंतु २०१३ मध्ये मोदींना विरोध करताना त्यांनी आपली सर्व हुकुमाची पाने खेळून टाकल्यामुळे नंतर डाव जिंकण्यासाठी त्यांच्याकडे काहीही शिल्लक नव्हते. २०१४ मध्ये मोदीच पंतप्रधान पदाचे उमेदवार हवेत असे माझे मत होते. परंतु मोदींऐवजी अडवाणी पंतप्रधानपदाचे उमेदवार असते तरी मी भाजपलाच मत दिले असते कारण दुसरा योग्य पर्यायच नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गामा पैलवान Wed, 04/19/2017 - 10:12 नवीन
गॅरी ट्रुमन, सर्वोच्च न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि उमा भारती यांच्याविरूध्द गुन्हेगारी स्वरूपाचा खटला चालविण्यात यावा असा निकाल दिला आहे. या निकालाद्वारे मोदींनी एका दगडात किमान तीन पक्षी मारले आहेत. पहिला पक्षी म्हणजे उपरोक्त तिघे राष्ट्रपतीपदासाठी उभे राहू शकंत नाहीत. मोदींच्या पसंतीचाच उमेदवार पुढे येणार. दुसरा पक्षी म्हणजे बाबरी नामक कोणतीही मशीद तिथे नव्हती, याची न्यायालयाकरवी खातरजमा होणार. उपरोक्त तिघे असाच दावा करणार आणि तो खराही आहे. काफिरांच्या मूर्तीपुजेच्या जागी मशीद बांधायला बाबर काय धर्मद्रोही होता का, असा प्रश्न आहे. तिसरा पक्षी म्हणजे मुस्लिमांवर प्रभाव राखून असलेले मुल्लामौलवी. बाबरी मशिदीस उत्तेजना देणे हा इस्लामचा घोर अपमान असल्याचे सिद्ध झाल्याने बाबरीप्रेमी मुल्लामौलवींचा प्रभाव निश्चितच मर्यादित होईल. मोदी, आय लव्ह यू! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/19/2017 - 10:18 नवीन
या निकालाद्वारे मोदींनी एका दगडात किमान तीन पक्षी मारले आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात आहे. आजचा निकालही कोर्टानेच दिला आहे. मग मोदींनी कसे काय पक्षी मारले म्हणायचे? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोदी या निकालाचा तिहेरी फायदा घेतील. पण हे तीन पक्षी मोदींनी कसे मारले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अनुप ढेरे Wed, 04/19/2017 - 10:22 नवीन
कटाचे आरोप काढू नका अशी विनंती CBIने सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यावरचा हा निकाल आहे. इथे म्हटल्याप्रमाणे. सो मोदींवर संशय घ्यायला वाव आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/19/2017 - 10:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/19/2017 - 10:35 नवीन
ज्यांचा १९८४ च्या दंगलींमध्ये आणि आणीबाणीत हात होता त्यांना माझा राजीनामा मागायचा अधिकार नाही अशी मुक्ताफळे उमा भारतींनी उधळली आहेत. ( https://www.thequint.com/india/2017/04/19/ram-mandir-babri-masjid-demolition-advani) पण ज्यांचा १९८४ च्या दंगलींशी आणि आणीबाणीतील अत्याचारांशी दुरान्वयानेही संबंध नाही अशा माझ्यासारख्या सामान्यांना मात्र त्यांचा राजीनामा मागायचा अधिकार आहे का? उमा भारतींचे हे विधान म्हणजे शुध्द मखलाशी झाली. असले प्रकार करण्यात उमा भारती तरबेज आहेतच.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 04/19/2017 - 13:46 नवीन
सहमत. उमा भारतींनी असे विधान करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे आरोपाची कबुली दिल्यासारखे आहे. कोर्टाने लवकरात लवकर या खटल्याचा निकाल लावावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Wed, 04/19/2017 - 11:31 नवीन
मोदी राष्ट्रपती पदासाठी (किमान उपराष्ट्रपती पदासाठी तरी) केशुभाई पटेलांचे नाव पुढे आणून एका दगडात अनेक पक्षी मारतील असा माझा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 04/19/2017 - 11:45 नवीन
मोदी कोणाला तरी उच्चविद्याविभूषित व्यक्तीचे नाव पुढे करणार . कि ज्यांना विरोध होताच कामा नये . आणि प्रतिमा हि उंचावणार . अर्थात एक अंदाज . बाकी उमा भरती आज रात्री राम मंदिराच्या जागेवर जाणारेत. तिरंगा , मंदिर , ह्यासाठी प्राण द्यायची तयारी त्यांची लहानपणापासून आहे :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Wed, 04/19/2017 - 13:36 नवीन
मोदी कोणाला तरी उच्चविद्याविभूषित व्यक्तीचे नाव पुढे करणार . कि ज्यांना विरोध होताच कामा नये . आणि प्रतिमा हि उंचावणार . असेच होईल. तसेही मोदी-शहा नेहमी धक्का द्यायच्या तयारीत असतात. त्यामुळे नारायण मूर्ती किंवा रतन टाटांचीही वर्णी लागू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ग
गामा पैलवान Wed, 04/19/2017 - 15:37 नवीन
माहिती आयुक्त श्री. रत्नाकर गायकवाडांना यांना काल संभाजीनगरात मारहाण झाली. नुकताच प्रा. रवींद्र गायकवाडांच्या नावाने प्रसारमाध्यमांनी जितका शंख केला होता त्याच्या शतांशानेही या विषयावर मतप्रदर्शन झालं नाही. सगळे जण तत्त्वत: समान आहेत, पण काही लोकं अधिक समान असतात! मूळ बातमी इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/ratnakar-gaikwad-beaten-up-by-prakash-ambedkars-worker-in-aurangabad/articleshow/58223151.cms -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/20/2017 - 08:38 नवीन
गॅरी ट्रुमन,
गेल्या कित्येक वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात आहे. आजचा निकालही कोर्टानेच दिला आहे. मग मोदींनी कसे काय पक्षी मारले म्हणायचे?
मला म्हणायचं होतं की मोदी पंतप्रधान असल्यामुळेच ही प्रकरणं पुढे रेटली जाताहेत. इतर कोणाचं सरकार असतं तर हे शक्यं झालं नसतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 04/20/2017 - 10:56 नवीन
एक बातमी http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/why-this-startup-wont-give-bais-to-bollywood-stars/articleshow/58247918.cms सगळ्यांचे पाय मातीचेच असतात असे म्हणले जाते , इथे तर ह्यांचे पाय शेणाचे आहेत. दुसरी बातमी. http://www.loksatta.com/trending-news/indian-american-businesswoman-fined-heavily-for-mistreating-domestic-help-1455850/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/20/2017 - 16:26 नवीन
दिल्लीतील ३ महापालिकांची निवडणुक २३ एप्रिल या दिवशी आहे. एबीपी न्यूज या वृत्तसंस्थेने आपल्या अंतिम मतदाता सर्वेक्षणाचे निष्कर्ष आज जाहीर केले. त्याचा सारांश - - तीनही महापालिकात भाजपला सर्वाधिक म्हणजे सरासरी ४२.५% मते मिळण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल आआपला सरासरी २६% व काँग्रेसला सरासरी २०% मते मिळण्याची शक्यता आहे. भाजपला दक्षिण दिल्ली महापालिकेत सर्वात कमी म्हणजे ३९% मते मिळण्याची शक्यता असून उत्तर दिल्ली महापालिकेत सर्वात जास्त म्हणजे ४४% मते मिळण्याची शक्यता आहे. - भाजपला तीनही महापालिकेत बहुमत मिळण्याची शक्यता असून दक्षिण दिल्लीत १०४ पैकी ६०, उत्तर दिल्लीत १०४ पैकी ७६ व पूर्व दिल्लीत ६४ पैकी ४३ जागा मिळण्याची शक्यता आहे. - तीन महापालिकेतील एकूण २७२ जागांपैकी भाजपला एकत्रित १७९, आआपला एकत्रित ४५ व काँग्रेसला एकत्रित २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. __________________________________________________________________________________________ - आआपने आपले अंतर्गत सर्वेक्षण केले असून त्यांच्या सर्वेक्षणानुसार आआपला एकूण २७२ जागांपैकी २१८ जागा व भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 04/20/2017 - 17:11 नवीन
पंजाब व गोवा विधानसभा निवडणुकीत असेच अंतर्गत सर्वेक्षण आम आदमी पार्टीने केले होते व या सर्वेक्षणात पंजाब मधील ११७ जागां पैकी, किमान १०० जागा आआपला मिळतील असा दावा केला होता व गोव्यात ४० पैकी किमान ३५ जागा निवडुन येतील असे त्यांचे सर्वेक्षण सांगत होते. मात्र निकालानंतर पंजाब मध्ये १०० जागा मिळतील अश्या बाता मारणार्‍या केजरीवाल यांना अवघ्या २० जागा मिळाल्या व गोव्यातून तर केजरिवाल यांना बदकावर बसून दिल्लीला परत यावे लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Fri, 04/21/2017 - 11:21 नवीन
आयकर विवरणपत्रे भरताना आधार कार्ड क्रमांक देणे सक्तीचे केल्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे विचारणा केली आहे. एक गोष्ट समजत नाही. कोर्टाला कोणी जाब विचारू शकत नाही का? हा निर्णय पूर्णपणे एक्झिक्युटिव्ह डोमेनमध्ये येतो. कोर्टाने यात हस्तक्षेप का करावा? उद्या कोर्ट सरकारच्या प्रत्येक निर्णयात नाक खुपसायला लागेल आणि सरकारला निर्णय घेणेच मुश्किल बनून टाकेल. सरकारला निदान पाच वर्षांनी निवडणुकांना तरी सामोरे जायला लागते. सरकारचे निदान तेवढे तरी उत्तरदायित्व लोकांप्रती आहे. या न्यायाधीश मंडळींचे नक्की कोणाप्रती उत्तरदायित्व आहे? मग लोकांशी उत्तरदायी नसलेल्या ढुढ्ढाचार्यांनी सरकारच्या निर्णयप्रक्रीयेत हस्तक्षेप करणे हा लोकशाहीचा विपर्यास नाही का? न्यायालयाने सरकारचा एखादा निर्णय घटनाविरोधी किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारा असल्यासच त्यात नाक खुपसायला जावे. अन्यथा नाही. पण होते कसे की अशा अनेक संस्था स्वतःच्या कार्यकक्षेच्या मर्यादा ओलांडून इतर गोष्टींमध्ये नाक खुपसायला जातात. मग कॅग म्हणते की सरकारने नैसर्गिक स्त्रोतांचा लिलावच करायला हवा आणि सामाजिक इंडिकेटर्समध्ये गुजरात मागे आहे आणि गुजरातमध्ये शिक्षणाचा हक्क कायद्याची अंमलबजावणी समाधानकारक झालेली नाही. त्यातही वाईट गोष्ट ही की बरेचसे लोक या गोष्टीकडे कार्यकारी संस्था आणि न्यायव्यवस्था/कॅग यांच्यातील मतभेद या दृष्टीने न बघता पक्षाच्या राजकारणाच्या दृष्टीने बघतात. म्हणून कॅगने नैसर्गिक स्त्रोतांचा लिलावच करायला पाहिजे असे मनमोहन सरकारच्या कार्यकाळात बोलल्यानंतर भाजप समर्थक आनंदित झाले होते आणि सामाजिक इंडिकेटर्समध्ये गुजरात मागे आहे असे कॅगने म्हटल्यावर मोदी विरोधक आनंदित झाले होते!!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/21/2017 - 13:30 नवीन
गॅरी ट्रुमन, माझ्या मते आधारपत्राची सक्ती करणे हा मूलभूत हक्कांचा भंग असू शकतो. संविधानाच्या मूलभूत रचनेविषयी प्रश्न उपस्थित झाल्याचं दाखवून सर्वोच्च न्यायालय आपणहून (स्युओ मोटो) विचारणा करू शकते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Fri, 04/21/2017 - 16:38 नवीन
दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी प्रचार करताना काही दिवसांपूर्वी आआपने दिल्लीत लावलेल्या फलकांवर असे लिहिले होते की महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप विजयी झाल्यास ते दिल्लीत वीज व पाण्याच्या दरात वाढ करतील. दिल्लीत पाणी व वीजेचे दर दिल्ली राज्य सरकारच्या अधिकारात आहेत. याच अधिकारात केजरीवालांनी २ वर्षांपूर्वी दिल्लीवासियांसाठी पाणी व वीजेचे दर कमी केले होते. आआपच्या वरील जाहिरातीवरून असे दिसते की वीज व पाण्याचे दर कमी करण्याआ अधिकार राज्य सरकारला असून ते दर वाढविण्याचा अधिकार महापालिकेला आहे. आआपवाले लोकांना किती मूर्ख समजतात याचे हे उत्तम उदाहरण आहे (अर्थात २०१५ मध्ये दिल्लीकरांनी आआपला ७० पैकी ६७ जागी जिंकून दिल्यामुळे दिल्लीकर अत्यंत महामूर्ख आहेत हा आआपचा विश्वास अनाठायी नाही). समजा आआपच्या म्हणण्यानुसार भाजपने महापालिका निवडणुक जिंकल्यानंतर वीज व पाण्याचे दर वाढविले तर आआपचे दिल्लीतील सरकार आपल्या अधिकारात ते कमी करू शकतेच ना. इथे तर केजरीवालांनी अजून खालची पातळी गाठली आहे. या वृत्तातील खालील वाक्ये बघा. Holding the BJP responsible for the widespread dengue and chikungunya in the national capital, Kejriwal told voters, “if your children get dengue or chikungunya, then you yourself will be responsible for it, because you voted for a party that spreads mosquitoes that breed dengue or chikungunya.” “If someone in your home falls ill then you are responsible because you voted for the party which is synonymous to chikhungunya, malaria, dengue and garbage,” he added. Kejriwal also alleged that with just two days left for the MCD polls, the BJP and the Congress are resorting to the “cheap politics” by engineering the water and power shortages. “The BJP and the Congress are stealing oil from the power transformers and ensuring that there is power shortage. They are doing it deliberately and resorting to cheap politics by disrupting water and power supply,” he alleged.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 04/21/2017 - 17:50 नवीन
“if your children get dengue or chikungunya, then you yourself will be responsible for it, because you voted for a party that spreads mosquitoes that breed dengue or chikungunya.”
एकूणच केजरीवालांना आआपचा धुव्वा उडणार अशी चिन्हे दिसायला लागलेली दिसतात.अन्यथा अशी डेस्परेट भाषा त्यांनी वापरली नसती. दिल्लीमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डेंग्यु आणि चिकनगुनियाची साथ आली होती तेव्हा स्वतः केजरीवाल ऑपरेशनसाठी बंगलोरला होते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी आरोग्यमंत्र्यांबरोबर दिल्लीत राहून परिस्थिती सांभाळायला हवी होती. किंबहुना तशी त्यांची जबाबदारी होती. पण हे त्यावेळी होते फिनलंडमध्ये. तिथल्या शाळांचा 'अभ्यास' करायला. इतर सगळे मंत्री पंजाब किंवा गोव्यामध्ये प्रचार करत होते. दिल्लीचे सगळेच्या सगळे मंत्री एकाच वेळी शहराबाहेर असायची ही पहिलीच वेळ असावी. त्यावेळी नायब राज्यपालांनी मनीष सिसोदियांना फिनलंडमधून ताबडतोब परत यायचा अभूतपूर्व आदेश दिला होता. म्हणजे जेव्हा खरोखर डेंग्यु आणि चिकनगुनियाची साथ आलेली असताना हे आपली जबाबदारी झटकून पळून जाणार आणि इतरांना त्याच डेंग्यू आणि चिकनगुनियाची भिती घालणार. कमालच आहे. असो. दिल्ली महापालिकांसाठी मतदान २३ तारखेला रविवारी होईल आणि मतमोजणी बुधवारी २६ एप्रिलला होईल. घोडामैदान जवळच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 04/21/2017 - 20:21 नवीन
MCD Election: Congress to get 208 seats
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Fri, 04/21/2017 - 22:41 नवीन
काल / परवा S.S.P. सहारनपुर ह्यांच्या घरावर to be specific, कँप ऑफिसवर हल्ला झाला. कारण विचित्र आहे आणि हल्लेखोरांचि मानसिकता दाखवणार आहे. हे असले थर्डक्लास नमुने जे खासदार आहेत त्याना मोदिंनी कंट्रोलच नव्हे तर चांगला चाप लावायला हवा. पोलिस एक IPS ज्याच्या घरावर तिन पैसड्लाचे लिडर अन त्याचे समर्थक हल्ला करतात त्यांना बाजिराव* काय असते हे एकदा कळाले तर पुन्हा असला प्रकार करायची हिम्मत नाहि करणार. बाजिराव : चक्कि चा पट्टा असतो एक फुट, पकडायला एक लाकडि हँडल असत, चांगले चांगले मुके मल्हार गायला लागतात. बाजिराव चे रट्टे अश्या जागी पडतात की हे असले शेरखान चाहते हुये भि मँजिस्ट्रेट को नहि दिखा सकते कि पडी कहा है. Cowards.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Sat, 04/22/2017 - 04:59 नवीन
इंडियन एक्स्प्रेस वाचून असं वाटतं, भारतात एकच ग्रेटम ग्रेट कॉलेज हाये, 'जे एन यू'. आठवड्यातून निदान ४ तरी लेख पाडलेले असतात 'जे एन यू' कसं भारी आहे, तिथले विद्यार्थी कशे आंदोलनं करत असतात, तिथले शिक्षक विद्यार्थी कशे क्रिटिकल थिंकिंग करणारे आहेत आणि शेवटी सरकार कसं या कॉलेजला हळू हळू मारून टाकतंय. नाही, सरकारी निर्णयांवर टिका टिपण्णी असावी की पण जे एन यू महात्म्य काय लावलंय. पुणे विद्यापिठ किंवा शिवाजी विद्यापिठ हे काय् विद्यार्थ्यांसाठी युटोपिया नाहीयेत, एक से बढकर एक घाणेरडे निर्णय लादून विद्यार्थ्यांवर सतत अन्याय इथेही होत असतो. पण ह्या विद्यापीठांच्या समस्या कधी संपादकिय पानातल्या लेखात आलेलं वाचलं नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 04/22/2017 - 06:33 नवीन
इंडियन एक्स्प्रेस वाचून असं वाटतं...
कोणाकडून अपेक्षा ठेवत आहात सौरा? "And they handed Yakub" विसरलात का? आणि त्या एक्सप्रेस ग्रुपमधला त्या कुबेरांचा लोकसत्ताही तसलाच. Image removed. बाकी तो डाव्यांचा आणि शहरी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या जे.एन.यु वर मोदी सरकार फारच मिळमिळीत कारवाई करत आहे अशी माझी तरी तक्रार आहे. मोदी सरकार सध्या करत आहे त्यापेक्षा बरीच जास्त कडक कारवाई व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Sat, 04/22/2017 - 07:18 नवीन
पुणे विद्यापिठ किंवा शिवाजी विद्यापिठ हे काय् विद्यार्थ्यांसाठी युटोपिया नाहीयेत, एक से बढकर एक घाणेरडे निर्णय लादून विद्यार्थ्यांवर सतत अन्याय इथेही होत असतो. पण ह्या विद्यापीठांच्या समस्या कधी संपादकिय पानातल्या लेखात आलेलं वाचलं नाही.
अर्थात या विषयावर मराठी वृत्तपत्रे पण काही लिहीत नाहीतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
श
श्रीगुरुजी Sat, 04/22/2017 - 10:41 नवीन
हा काय मूर्खपणा चाललाय? दिल्लीत येऊन असला मूर्खपणा करण्यापेक्षा आपल्या मागण्या राज्य सरकारकडे का मांडत नाही? या लोकांनी आयुष्यभर अम्मा, चिन्नम्मा, कलैग्नार, जालिकट्टू इं. च्या पलिकडे पाहिलं नाही आणि आता दिल्लीत येऊन तमाशा करताहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/22/2017 - 17:46 नवीन
३-४ महिन्यांपूर्वी जालिकट्टूसारखा क्रूर प्रकार पुन्हा सुरू व्हावा यासाठी तामिळींचा जीव चालला होता. जालिकट्टूसाठी तामिळ विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मरीना बीचवर रात्रभर आंदोलन केलं. रहमान, विश्वनाथन् आनंद, कमल हासन इ. प्रसिद्ध कलाकारांनी जालिकट्टूला जोरदार पाठिंबा दिला होता. जालिकट्टू हा तामिळींनी जीवनमरणाचा प्रश्न केला होता. आता तामिळ शेतकरी मद्रासला आंदोलन करायचं सोडून दिल्लीत महिनाभर आंदोलन करताहेत आणि तामिळ विद्यार्थी, कलाकार यांच्यासारखे जालिकट्टूचे समर्थक तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प आहेत. साहजिकच आहे. मुक्या प्राण्यांचे हाल होताना बघताना जी मजा येते तशी मजा शेतकर्‍यांच्या आंदोलनातून अजिबात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Mon, 04/24/2017 - 06:45 नवीन
एक गोष्ट समजत नाही. नीती आयोगाच्या बेठकीसाठी दिल्लीला आलेल्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांनी या शेतकर्‍यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांवर काहीतरी निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आणि त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांचे आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित केले आहे. म्हणजे शेतकर्‍यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या तामिळनाडू राज्य सरकारच्या अधिकारकक्षेत निर्णय करता येण्याजोग्या होत्या. असे असेल तर मग तामिळनाडूत आंदोलन करण्याऐवजी हे शेतकरी थेट दिल्लीत कसे काय धडकले? अर्थात भारताचे नागरिक म्हणून त्यांना दिल्लीत येऊन आपले आंदोलन करायचा अधिकार आहेच. पण हा प्रकार थोडा विचित्र वाटला. स्थानिक पातळीवरच्या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवरच व्हावे ही अपेक्षा असेल तर मग ती आंदोलनेही स्थानिक पातळीवरच व्हायला हवीत. दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत उत्तर भारतातील राज्यांमधील (विशेषतः उत्तर प्रदेश आणि हरियाणा) शेतकरी दिल्लीत येऊन आंदोलन करून गेले असे कित्येक वेळा झाले आहे. वर म्हटल्याप्रमाणे जर त्यांच्या मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या असतील तर संबंधित राज्यात आंदोलन करणे अधिक योग्य ठरेल. पण अनेकदा अंतरामुळे या शेतकर्‍यांना त्या राज्यांच्या राजधानीपेक्षा दिल्ली अधिक जवळ पडते. उदाहरणार्थ मेरठमधील शेतकर्‍यांना लखनौपेक्षा दिल्ली अधिक जवळ आहे. तसेच रोहतक किंवा जिंदमधील शेतकर्‍यांना चंदिगडपेक्षा दिल्ली अधिक जवळ आहे. या कारणासाठी त्यांनी दिल्लीत येऊन आंदोलन करणेही समजू शकतो. पण तामिळनाडूतल्या शेतकर्‍यांना ही गोष्टही लागू पडणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ट्विटरवर असे म्हटले जात आहे की शेतकर्‍यांच्या नावावर एन.जी.ओनी वेगळेच लोक आंदोलनात घुसडले आहेत. हे लोक तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्यावर विमानाने चेन्नईला परतले. गरीब शेतकरी विमानाने चेन्नईला परततात ही गोष्टही थोडी विचित्रच वाटते. ट्विटवर कुणा अनिल कुमार आचार्य ने पुढील टिवटिवाट केला आहे. हे आचार्य कोण हे मला माहित नाही पण त्यांनी जो मुद्दा मांडला आहे त्यात तथ्य आहे का?

Fake farmers of TN agitating led by Ayyakannu returned to TN by 9 PM flight. Can any prestitute who all highlighted them tell who paid 4 it?

— Anil kumar Acharya (@AniilkumarAnil) April 24, 2017
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Tue, 04/25/2017 - 17:23 नवीन
अशा नालायक मंत्रांनी राजीनामा देऊन दुसऱ्या लायक आमदाराला आपले खाते सुपूर्द करावे. नाही तर मुख्यमंत्री आहेतच जवाबदारी घ्यायला. त्यांना गाईचे दूध ही काढता येते म्हणे..!! http://www.loksatta.com/aurangabad-news/toor-dal-purchase-planning-girish-bapat-1459599/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभिजीत अवलिया Sat, 04/22/2017 - 10:57 नवीन
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदीकरणासाठी केंद्र सरकारने ११७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा एक अत्यंत महत्वाचा महामार्ग गेली १५-२० वर्षे रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत होता. काही ठिकाणी हा रस्ता धड दोन पदरी देखील न्हवता. उदा - बरेचसे नदीवरचे पूल इतके अरुंद आहेत की एका वेळी एकाच वाहन नीट जाऊ शकेल. अरुंद रस्ता, अवघड वळणे आणी बेशिस्त चालक ह्यामुळे अपघातांचे प्रमाण इतके प्रचंड वाढले होते की मुंबई गोवा महामार्गाला मृत्यूचा महामार्ग म्हटले जाई. ह्या रस्त्याच्या चौपदीकरणाला मंजुरी देऊन सरकारने एक खूप वर्षांची मागणी पूर्ण केलीय.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 04/22/2017 - 11:26 नवीन
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदीकरणासाठी केंद्र सरकारने ११७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
ही अतिशय आनंदाची बातमी आहे. "मोस्ट डेंजरस हायवे इन इंडीया" या उपाधीने बदनाम झालेल्या या महामार्ग खरंच सुधारायला हवा. (महामार्ग नुसता नावाला, खेडेगावातून एसटी जावी म्हणून बनवलेले डांबरी रस्तेही या रस्त्यापेक्षा चांगले असतात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अमितदादा Sat, 04/22/2017 - 11:06 नवीन
देशामध्ये गो रक्षकांनी अक्षरशः उछाद मांडला आहे, एका मागून एक घटना घडत असताना आज सुधा जम्मू काश्मीर मध्ये गो रक्षकांनी पशुपालन व्यवसायावर जगणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबीयावर हल्ला केला यात एका लहान मुलीला हि दुखापत केली. खर्या अर्थाने हे कुटुंबीय गाई ची पालन पोषण करणारे होते, ह्या हल्ला करणाऱ्या गो रक्षकांच्या बाप झाद्यानी कधी गाई पाळल्या च नसतील असं मला वाटत. 5 Including 9-Year-Old Girl Attacked By Cow Vigilantes In Jammu And Kashmir खरतर कॉंग्रेस च्या काळात एका बाजूला गेलला लंबक (pendulam) हा मध्यभागी (equilibrium) आणण्यासाठी लोकांनी भाजपला आणि मोदींना निवडून दिल (त्यात मी हि होतो), परंतु लंबक मध्यभागी ठेवण्य ऐवजी परत दुसर्या विरुद्ध टोकाला नेण्याचा यांचा प्रयत्न पाहून माझ्यासारख्या पूर्वाश्रमीचा मोदी समर्थकाला खूप दुख होत आहे. ह्या देशाला पाकिस्तानच्या धर्तीवर एक पद्धती, एक संस्कृती, एक भाषिक, एक विचारिक बनवण्याचा कुटील डाव हाणून पाडला पाहिजे. सहिष्णू आणि सतत प्रवाही असणार्या माझ्या धर्माला (अनेक दोष असून तो मान्य करणारा धर्म) एका rigid चौकोटीत बसवण्याचा प्रयत्न करणार्यांना विरोध केला पाहिजेच. ज्यांना गाई ची सेवा किंवा रक्षा म्हणजे काय हे कळल नाही त्यांना धर्म काय घंटा कळणार. ह्या fanatic लोकांना सरकारच्या अप्रत्यक्ष पाठींब्या मूळच मस्ती आलेली आहे जशी मुस्लीम fanatic लोकांना कॉंग्रेस च्या जमान्यात आली होती (किंवा पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल च्या जमान्यात येतीय). आज हा छोटा भस्मासुर पाळणाऱ्या संघाला आणि भाजपला, हा भविष्यात आपल्या डोक्यावर हात ठेवणार नाही ना याचा विचार केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 04/22/2017 - 11:40 नवीन
जे काही चालू आहे आपल्या देशात ते डेंजर आहे एवढे नक्की! रिमेंबर रिमेंबर 5th ऑफ नोव्हेंबर अशी आपली व्ही फॉर वेंडेटा होऊ नये म्हणजे मिळवले! शहा तर म्हणतच आहेत की गल्ली ते दिल्ली एकच सत्ता! किती वाईट परिणाम होतील याची काळजी लागली आहे. हिटलर असाच तयार झाला होता व आजकाल ट्रम्प देखील! विरोधी पक्षच नसला तर ? विचार करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ग
गॅरी ट्रुमन Sat, 04/22/2017 - 13:35 नवीन
जे काही चालू आहे आपल्या देशात ते डेंजर आहे एवढे नक्की!
Image removed. देशात फार डेंजर चालू आहे हे चित्र ल्युटिन्स दिल्लीमधल्या मिडियावाल्यांनी आणि हलकटातल्या हलकट पुरोगाम्यांनी उभे केले आहे. या सगळ्यांना मोदी सरकारने रस्त्यावर आणले आहे त्याचा राग आहे तो. या पुरोगाम्यांची स्वयंसेवी संस्था नामक दुकाने, त्या नावावर परदेशातून येणारे पैसे, त्यावर यांची चालणारा मजा, एकमेकांना वेगवेगळे पुरस्कार देणे, वर्षानुवर्षे सरकारी बंगल्यांमध्ये बिनभाड्याचे, बिना लाईट-पाण्याचे बिल देता राहात सरकारी पैशावर फुकटे पुख्खे झोडणे इत्यादी गोष्टींवर चाप आला हा राग आहे बाकी काही नाही. तो इंग्लिश मिडिया बघणे, वाचणे बंद करा म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात कुठलेही नवे डेंजर आलेले नाही हे समजेल.
शहा तर म्हणतच आहेत की गल्ली ते दिल्ली एकच सत्ता! किती वाईट परिणाम होतील याची काळजी लागली आहे.
काय सांगता राव? उगीच लांडगा आला रे आला करू नका. काय वाईट परिणाम होणार आहेत? नेहरूंच्या काळात नव्हती गल्ली ते दिल्ली एकाच पक्षाची सत्ता? निवडणुका होऊन मतदारांना सत्तांतर घडविण्याची पॉवर आहे तोपर्यंत घंटा काही वाईट परिणाम होणार नाहीत. आणि ती पॉवर काढायची हिंमत आणीबाणी लादणार्‍या इंदिरा गांधींचीही नव्हती. आणि असली फालतूची काळजी करत राहायची असेल तर करत रहा. कधीकधी वाटते की अशिक्षित लोक बरे. ते ल्युटिन्स दिल्लीमधील मिडिया वाचायला आणि बघायला जात नाहीत आणि त्यामुळे पुढच्या क्षणी आपल्याला कोणीतरी येऊन ठार मारणार आहे असल्या लांडगा आला रे आला असल्या फालतूच्या भित्या बाळगत नाहीत.
हिटलर असाच तयार झाला होता व आजकाल ट्रम्प देखील!
चुकीची माहिती एवढेच सांगतो. हिटलरने लोकशाही, निवडणुका वगैरे प्रकार बंदच करून टाकले, विरोधकांच्या कत्तली केल्या म्हणून सगळे काही झाले. तसे भारतात होत आहे का ते बोला. उगीच काल्पनिक भित्या नकोत.
विरोधी पक्षच नसला तर ? विचार करून पहा.
अत्यंत हास्यास्पद प्रश्न. लोकशाही मार्गातून लोक विरोधी पक्षांना घंटा धूप घालत नसतील पण कोणालाही निवडणुक लढवायची परवानगी आहे तोपर्यंत शष्प काहीही फरक पडणार नाही. पण सद्दाम हुसेनने केले त्याप्रमाणे बाथ पक्ष सोडून इतर पक्षांच्या अस्तित्वावरच बंदी असले प्रकार झाले तर प्रॉब्लेम निर्माण होईल. यापैकी काय भारतात चालू आहे? आणि विरोधी पक्षांना लोक घंटा धूप घालत नसतील तर ते पूर्ण समजू शकतो. देशाच्या संसदभवनावर हल्ला करून, सगळे मंत्रीमंडळ ठार मारणे किंवा फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे ओलिस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे असले प्लॅन असलेल्यांचा उदोउदो करणार्‍यांना हे विरोधी पक्ष 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या' गोंडस नावाखाली समर्थन करत आहेत. जोपर्यंत कन्हैय्याकुमार सारख्या हरामजाद्यांना* विरोधी पक्ष समर्थन देत आहेत तोपर्यंत हे असले विरोधी पक्ष नकोत असे देशातल्या सामान्य लोकांना वाटले तर त्यात काय चुकले? मोदी सरकारविषयी माझेही काही आक्षेप आहेत आणि वेळोवेळी मी ते मांडतही असतो. पण मोदी एक वाईट करत आहेत हे आवडले नाही म्हणून शंभर वाईट करणार्‍यांना मते द्यायचा विचारही करू शकत नाही. मला वाटते की असल्या लहान कारणांवरून कित्येक पटींनी मोठ्या राक्षसांना मते द्यायचा काही सुशिक्षित लोक विचार करत आहेत पण अशिक्षित लोक मात्र ल्युटिन्स दिल्लीमधील मिडिया आणि पुरोगामी विचारवंत यांच्या कृष्णछायेपासून दूर आहेत म्हणून ते मात्र मोदींना समर्थन देत आहेत. कधीकधी वाटते की या असल्या सुशिक्षित लोकांमुळे इंदिरा गांधींच्या काळात होते तसे परत होणार आहे. इंदिरांनाही सुशिक्षितांचा बर्‍याच प्रमाणावर विरोध असायचा पण अशिक्षित लोक मात्र जोरदार समर्थन करायचे. त्यातूनच इंदिरा गांधी सुशिक्षितांच्या आशाआकांक्षांना आणि मतांना हिंग लावून विचारत नसत. काही वर्षांनी मोदीही बहुतेक तेच करणार आहेत. आणि तसे मोदींनी केले तर हे जगाच्या टोकावर बसलेले (टॉप ऑफ द वर्ल्ड) सुशिक्षित लोकच जबाबदार असतील. *: मिपावरील चर्चेत हा शब्द नको असे संपादकांचे मत असल्यास तो शब्द जरूर काढावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अमितदादा Sat, 04/22/2017 - 14:14 नवीन
मूळ प्रतिसादातील घंटा आणि बापझादे हे शब्द भावनेचा भरात लिहिलेले आहेत ते नको होते मान्य, त्यामुळे ते शब्द उडवले किंवा प्रतिसाद उडवला तरी चालेल. आता मूळ मुद्याकडे येतो. तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे मोदी सरकार ने भरपूर लोकांचे दुकान बंद केले, भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम चालू केली, तसेच governance च्या बाबतीती माझा मोदी न पाठींबा च आहे त्यासाठीच तर त्यांना लोक मत देतायत. मग अश्या मुद्यांची भाजपला गरज च काय आहे, कारण हि fanatic लोक उद्या भाजपला किंवा संघाला सुधा ऐकणार नाहीत. ह्या होणार्या गोष्टी एक देश म्हणून आपल्या मूळ ढाच्याला धक्का लावतायत आणि सरकार अश्या गुंडांचे direct किंवा indirect समर्थन करते (राजस्थान गृह मंत्री) हि एक लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्याच भुमिके (किंवा यासारख्या अनेक भुमिके मुळे) मुळे उद्या काही समाजात मध्ये परत फुटीरवाद रुजू नये म्हणजे झाले. आज विरोधी पक्षांचा कारभाराला कंटाळून लोकांनी मोदींना मते दिलेत (संघ किंवा भाजप ला नाही), भाजप सुधा विरोधी पक्षाचा वाटेवरून जावू नये हि इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 04/22/2017 - 14:35 नवीन
भाजपमधील असल्या प्रवृत्तींना सगळ्यांचाच विरोध आहे. माझा तर नक्कीच आहे. प्रश्न कधी उभा राहतो? भाजपमध्ये असल्या प्रवृत्ती आहेत हे पटले नाही म्हणून त्यापेक्षा कित्येक पटींनी वाईट प्रवृत्ती असलेल्या पक्षांकडे लोक आकर्षित होतात तेव्हा. समाजवादी पार्टी, आर.जे.डी , तृणमूल वगैरे पक्षांनी नक्की काय प्रकार केले आहेत? गोरक्षक धुमाकूळ घालत आहेत हे वाईट आहेच. वादच नाही. पण गोरक्षकांचे पटले नाही म्हणून कैराना, मालदा या गोष्टींकडे डोळेझाक करणार्‍या किंवा समर्थन देणारे पक्षही अनेक सुशिक्षितांना आपले वाटायला लागतात!! मिपावरच बिहार निवडणुकांच्या वेळी लालूला किती समर्थन मिळाले होते हे जुने धागे उघडून बघाच. आणि ते समर्थन कुणा अंगठाछाप लोकांकडून नाही तर चांगल्या चांगल्या अभ्यासू लोकांकडून मिळाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा