ताज्या घडामोडी : भाग ५
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.
दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील तर तामिळनाडूमधील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक निवडणुक आयोगाने रद्द केली आहे. इतर मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात ९ एप्रिलला मतदान पूर्ण झाले तर उरलेल्या मतदारसंघांमध्ये १२ एप्रिलला मतदान होईल. मतमोजणी १३ एप्रिलला होईल.
श्रीनगर मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडून गेलेल्या पी.डी.पीच्या खासदाराने मागच्या वर्षी बुरहान वाणी प्रकरणानंतर उसळलेल्या असंतोषादरम्यान राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. पण या मतदारसंघात अवघे साडेसहा टक्के मतदान झाले. तसेच मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला. त्यामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील अनंतनाग या मतदारसंघातील पोटनिवडणुक सध्या रद्द केली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये पी.डी.पी च्या मेहबूबा मुफ्ती लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवून जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
तामिळनाडूतील चेन्नई शहरातील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातून २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललितांचा विजय झाला होता. त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची होती. अण्णा द्रमुकच्या शशीकला नटराजन गटाने पक्षाचे ज्येष्ठ नेते टी.टी.व्ही.दिवाकरन यांना तर ओ.पन्नीरसेल्वम गटाने ई.मधुसुदनन यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर जयललितांच्या भाचीने-- जे. दीपानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. ही पोटनिवडणुक जिंकेल त्या गटाला जयललितांचा वारसा मिळेल असे म्हटले जाईल हे नक्कीच. त्यामुळे या निवडणुका दोन्ही गटांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या निवडणुकांसाठी पैशाचा महापूर वाहिला. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाचा ढापाही पडला. त्यातून निवडणुक आयोगाने ही पोटनिवडणुक रद्द केली.
दिल्लीमधील राजौरी गार्डन मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे. या मतदारसंघात २०१५ मध्ये आआपचे जरनेलसिंग निवडून गेले होते. त्यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पंजाबमधील लांबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली. पण त्याच मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही निवडणुक लढवली. प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या महारथींपुढे जरनेलसिंगची डाळ शिजली नाही आणि लांबीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. हातात असलेली दिल्लीतील आमदारकी उगीचच त्यांनी सोडली. आता आआपने त्यांना उमेदवारी न देता हरजितसिंग या नव्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजप-अकाली दल युतीतर्फे अकाली दलाचे मनजिंदरसिंग सिरसा (२०१३ मधील विजयी उमेदवार) यांना तर काँग्रेसतर्फे मिनाक्षी चंदेला यांना उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे कारण हा निकाल लागल्यानंतर १० दिवसातच दिल्ली महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याची कल्पना राजौरी गार्डनमधील निकालामुळे येईल. दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या या मतदारसंघात १९४७ मध्ये पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या शीखांची (आणि त्यांच्या वंशजांची) संख्या लक्षणीय आहे. तसेच पंजाबशी या भागातील शीख मतदारांचे जवळचे संबंध आहेत. अनेकांचे नातेवाईक पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला त्याचा फायदा उठवायचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तसेच काँग्रेस नेते अजय माकन यांचा पूर्वीचा हा मतदारसंघ आहे. अजय माकन राजौरी गार्डनमधून १९९३, १९९८ आणि २००३ या ३ निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांचे घरही राजौरी गार्डनच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे काँग्रेस इथे चांगलाच जोर लावत आहे. या मतदारसंघात भाजपचा विशेष जोर नाही. आतापर्यंत एकदाच २०१३ मध्ये भाजप-अकाली दल युतीने ही जागा जिंकली होती. २०१५ मध्ये आआपने तर इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघात पराभव झाल्यास आआपच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर नक्कीच परीणाम होईल आणि १० दिवसांनंतर असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी ते पुरेशा आत्मविश्वासाने सामोरे जाणार नाहीत हे नक्कीच. त्या दृष्टीने आआप आणि केजरीवालांसाठी ही पोटनिवडणुक महत्वाची आहे.
१३ एप्रिलला पोटनिवडणुकांचे निकाल आल्यावर ते इथे पोस्ट करेनच.
💬 प्रतिसाद
(300)
श
श्रीगुरुजी
Tue, 06/06/2017 - 18:09
नवीन
घटनाक्रम -
१) मागील आठवड्यात राज्य सरकारने लवासाचा विशेष दर्जा रद्द केला.
२) त्याच दिवशी काही वेळाने "शेतकऱ्यांच्या संपाबद्दल चर्चा" करण्यासाठी पवार फडणविसांना भेटले.
वरील २ घटना लागोपाठ घडल्या हा योगायोग आहे.
३) अंमलबजावणी संचनालयाने सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे मागविल्याची बातमी काल प्रसिद्ध झाली.
४) आज पवारांनी दिल्लीत मोदींची भेट घेऊन "शेतकऱ्यांच्या संपाविषयी" चर्चा केली.
या २ घटना लागोपाठ घडल्या हा सुद्धा योगायोगच आहे.
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 06/06/2017 - 18:26
नवीन
शेतकर्यांचा संप १ जुन ला चालू होणार हे बरेच पूर्वीपासून माहिती होते. इथे मिपावर पण विशुमीतसाहेब चिमणरावांच्या धोतरात हात घालायला निघाले होते त्यावेळीपण हा रेफरन्स आला होता.
वरचे योगायोग नसावेत.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 06/09/2017 - 14:06
नवीन
चुकलेल्या शब्दाचा/म्हणीचा (धोतरास हात घालणे) लगेच प्रतिसाद देऊन खुलासा करून सुद्धा मोदक नामक मिपा सदस्य व्यक्तिगत पातळीवर उतरून वेळोवेळी हीन दर्जाची टिपणी करत आहेत.
रेफेरेंस देऊ शकले असते, त्यांच्यासाठी अवघड नव्हते ते.
कृपया आपण लक्ष्य घालावे आणि त्यांना योग्य ती समज द्यावी.
http://www.misalpav.com/comment/929940#comment-929940
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 06/09/2017 - 16:30
नवीन
स्वतःबद्दल इतके संवेदनशील असाल तर माझ्यावरही व्यक्तीगत पातळीवर उतरून कमेंट्स करताना (उदा. ट्रोल) असाच विचार केला असता तरी चालले असते.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 06/07/2017 - 13:56
नवीन
राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक १७ जुलै रोजी होणार असून मतमोजणी २० जुलै रोजी होणार आहे असे निवडणुक आयोगाने जाहिर केले आहे. नव्या राष्ट्रपतींचा कार्यकाल २५ जुलै पासून सुरू होईल.
२०१२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी लिहिलेल्या माझ्याच ३ धाग्यांची जाहिरात या निमित्ताने करतो:
१. http://www.misalpav.com/node/22057
२. http://www.misalpav.com/node/22215
३. http://www.misalpav.com/node/22275
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 06/07/2017 - 14:29
नवीन
राष्ट्रपतीपदाचा विरोधी पक्षांचा उमेदवार निवडण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एक समिती नेमण्यात आली असून त्या समितीच्या अध्यक्षपदी पवारांना बसविले आहे. त्या समितीत गुलाम नबी आझाद, शरद यादव, ममता, येचुरी असे तगडे नेते सुद्धा आहेत. आता येचुरी आणि ममता हे अहिनकुल समितीच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसतील का हा प्रश्नच आहे.
असो. २०१४ पासून केंद्रातील, राज्यातील, सर्व महापालिकातील सत्ता गमावल्याने व नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळातून सुद्धा पायउतार व्हावे लागल्याने पवारांनी सर्व पदे व सत्ता गमाविली. त्यामुळे ते खूपच अस्वस्थ झाले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने "राष्ट्रपतीपदाचा विरोधी पक्षांचा उमेदवार निवडण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षपद" हे अत्यंत महत्त्वाचे पद मिळाल्याने पवार पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले असून किंगमेकरच्या भूमिकेत शिरले आहेत. एक मराठी माणूस देशाचा राष्ट्रपती कोण होणार हे ठरविणार ही सर्व मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पवार शेवटी या पदासाठी स्वतःचेच नाव समितीतील इतरांकडून जाहीर करायला लावतील का?
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 06/07/2017 - 14:35
नवीन
आज राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला अन आजच हे अध्यक्ष मोदींना भेटले हाही योगायोगच!
तिथे बसून ते इतरांच्या उमेदवारीत खो घालतील हे नक्की. गेलाबाजार उपराष्ट्रपती तरी होता येईल का? वगैरे..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 06/07/2017 - 14:47
नवीन
काहीही काय बोलताय? त्यांना शेतकर्यांच्या सर्व समस्यांची खडानखडा माहिती आहे. ते जरी कधीही अर्थमंत्री नव्हते तरी देशातील सर्व शेतकर्यांच्या कर्जमाफीचा निर्णय, शेतकर्यांना ४% इतक्या कमी व्याजाने कर्ज इ. आर्थिक निर्णय चिदंबरम/प्रणव मुखर्जी यांच्याऐवजी तेच घेत होते. ते राष्ट्रपतीपद, लवासा, सिंचन घोटाळ्याची चौकशी इ. साठी मोदींना भेटले नसून ते फक्त शेतकर्यांच्या प्रश्नाविषयीच मोदींना भेटले होते.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 06/07/2017 - 22:44
नवीन
लोकहो,
उद्या इथे ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. ब्रेक्झिटसाठी ठोसपणे काम करता येत नाही म्हणून तेरेसा मे यांनी निवडणुका जाहीर केल्या. मात्र नागरिकांत तितकासा उत्साह दिसंत नाही. ब्रेक्झिट ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग निवडणुका कशासाठी, असा काहीसा सूर आहे. शिवाय अवघ्या दोनच वर्षांत परत निवडणुका होत असल्याने नेमिची येतो पावसाळा अशी परिस्थिती आहे.
काही निरीक्षणे :
१. मजूर पक्षाचा प्रमुख जेरेमी कॉर्बिन राणीचा लाडका आहे.
२. मागील निवडणुकीच्या वेळेस स्वातंत्र्यपक्षास (युके इंडीपेंडंट पार्टी) १२% मतं मिळालेली होती. मात्र ही मतं देशभर सर्वत्र विखुरलेली असल्याने केवळ १ जागा मिळालेली होती. या खेपेस त्याचा फारसा बोलबाला नाही. या मतगठ्ठ्यावर हुजूर व मजूर हे दोन प्रमुख पक्ष टपून बसले आहेत.
३. या घटकेस हुजूर पक्षाची बाजू बळकट दिसते आहे.
असो.
बघूया उद्या काय होतं ते.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
पुंबा
गुरुवार, 06/08/2017 - 08:33
नवीन
गापै, कॉर्बीन तर मॉनार्की हटवावी असे म्हणतो ना? की उपरोधाने म्हणताय?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 06/08/2017 - 08:41
नवीन
जनमतचाचण्या थेरेसा मेंच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला जेरेमी कॉर्बिन यांच्या लेबर पक्षापेक्षा पुढे दाखवत आहेत. २०१५ मध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला मिळाले होते त्यापेक्षा जास्त मोठे बहुमत यावेळी मिळेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जेरेमी कॉर्बिन या पुरोगामी उदारमतवाद्याचा पराभव होणार असेल तर ती नक्कीच चांगली गोष्ट होईल. सध्याच्या जगात पुरोगामी उदारमतवादीपणा सगळ्यांनाच कधीनाकधी गोत्यात आणणार आहे.
या निवडणुका जिंकून थेरेसा मे दुसर्या मार्गारेट थॅचर बनाव्यात हीच इच्छा. १९८० च्या दशकात ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचर आणि अमेरिकेत रॉनाल्ड रेगन हे उजवे सत्तेत होते आणि दोघांचे चांगले जमायचेही. कदाचित थेरेसा मे दुसर्या थॅचर बनू शकल्या तरी बट अलास... ट्रम्प दुसरे रेगन बनणे अजिबात शक्य वाटत नाही आणि सध्या ज्या पध्दतीने घडामोडी चालल्या आहेत तशाच चालू राहिल्या तर २०२० मध्ये ट्रम्प परत जिंकणेही कठिणच आहे.
असो मतमोजणी सुरू व्हायची आतुरतेने वाट बघत आहे.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Fri, 06/09/2017 - 06:15
नवीन
ब्रितनमधील इस्लामी मुलतत्ववादाचा पराभव करण्यासाठी मेबाई योग्य ठरतील का? सध्या जी दहशत सामान्य ब्रिटिश माणसाच्या मनात आहे(?), ती दुर करणे त्यांना जमेल असे वाटते का तुम्हाला?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 06/09/2017 - 06:30
नवीन
त्यासाठीच जेरेमी कॉर्बिन या उदारमतवादी पुरोगाम्यापेक्षा थेरेसा मे अधिक योग्य ठरतील असे वाटत आहे* . अर्थातच युरोपमधील भळभळत्या हृदयांपैकी कोणीही पाहिजे तितका कडकपणा दाखवू शकेल असे वाटत नाही. पण उदारमतवादी लोक आहेत त्या परिस्थितीचा आणखी आणि जास्त लवकर विचका करतील त्यामुळे उदारमतवादी लोक नकोतच.
*: आपल्या डॉनल्डतात्या ट्रम्पविषयीही सुरवातीला असेच वाटत होते. पण सौदी परराष्ट्रमंत्र्याबरोबरच्या भेटीनंतर ट्रम्पतात्यांनी सिरियातील आयसिसवर हल्ला करण्याऐवजी आयसिसवर हल्ला करायच्या लॉन्चपॅडवरच हल्ला केला. जगदंब जगदंब. तेव्हा या थेरेसा मे खरोखरच कॉर्बिनपेक्षा कडक आहेत की नुसता दिखावा आहे हे पण माहित नाही. अर्थात या सगळ्या गोष्टी आता बोलूनही फार उपयोग होईल असे वाटत नाही. कारण टोरीजना बहुमत मिळवायला अपयश आले तर टेरेसा मेंच्या जागी दुसरा कोणी (बोरीस जॉन्सन इत्यादी) पंतप्रधान व्हायची शक्यता आहेच. काय होते ते बघूच.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
गुरुवार, 06/08/2017 - 03:00
नवीन
http://www.loksatta.com/pune-news/opposition-in-maharashtra-pankaja-munde-1488352/
काय बावळट विधान आहे!
- Log in or register to post comments
प
पुंबा
गुरुवार, 06/08/2017 - 08:31
नवीन
हा माज आहे. पण राष्ट्रप्रेमी माज. त्यांना सगळं माफ असतंय.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 06/08/2017 - 15:11
नवीन
सौरा,
गापै, कॉर्बीन तर मॉनार्की हटवावी असे म्हणतो ना? की उपरोधाने म्हणताय?
अर्थात कॉर्बिन हा राणीचा आवडता आहे असं म्हणण्यापेक्षा तिला मान्य आहे असं म्हणेन. अगोदर मिलीब्यांड होता तो आजूनंच भयानक होता. त्यापेक्षा कॉर्बिन खूपंच बरा आहे.
राणी हटाव मोहीम अधूनमधून चाललेली असतेच. कोणी लक्ष देत नाही. कॉर्बिन राणीस मान्य आहे कारण तो स्वतंत्र मताचा नाही. तो मजूरपक्षाचा इयन डंकन-स्मिथ आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Fri, 06/09/2017 - 06:13
नवीन
धन्यवाद गापै..
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 06/09/2017 - 04:06
नवीन
http://abpmajha.abplive.in/blog/bhakti-bisure-blog-on-tukaram-mundhe
"नोकरी जाणे" आणि "सस्पेन्शन" मधे काय फरक असतो? माझ्या मते सस्पेन्शन म्हणजे काही महिन्यांसाठी बिनपगारी घरी बसने आणि नंतर परत रुजू होणे.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Fri, 06/09/2017 - 05:48
नवीन
स्वप्नात येणाऱ्या शिवलिंगाच्या शोधार्थ तेलंगणा मध्ये एका मुर्खाने हैदराबाद वारंगल राष्ट्रीय महामार्ग १५ फूट खोल खणला. मूर्खपणाचा कळस आहे हा अक्षरश:
http://www.hindustantimes.com/india-news/telangana-scavenger-held-for-digging-well-on-national-highway-in-search-of-shiva-lingam/story-6bskroiFcWvOfCHu1z2yEL.html
- Log in or register to post comments
प
पुंबा
Fri, 06/09/2017 - 06:12
नवीन
रस्ता दुरुस्त करण्याची पै न पै या सगळ्या गावकर्यांकडून, त्याला मदत करणार्या सरपंच वगैरे लोकांकडून आणि ह्या ये***कडून वसूल केली पाहिजे. असलं काही करण्याची हिंमत यानंतर होता कामा नये.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 06/09/2017 - 11:39
नवीन
हा मूर्खपणा भारतात नवीन नाही. २०१३ मध्ये उ. प्र. मध्ये शोभन सरकार नावाच्या एका साधूने जाहीर केले की उ. प्र. मधील उन्नाओ नावाच्या किल्यात जमिनीत हजारो टन सोने पुरून ठेवले आहे असे त्याला स्वप्नात दिसले. त्याच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवून भारतीय पुरातत्व खात्याने तिथे तब्बल महिनाभर खोदकाम केले. परंतु त्यांना तिथे १ रूपया सुद्धा सापडला नाही. खोदकामाची मजुरी, कष्ट, वेळ इ. सर्व वाया जाऊन जगभर भारताचे हसे झाले ते वेगळेच.
ASI hits dead end, stops excavation for gold in Unnao
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 06/09/2017 - 07:08
नवीन
ब्रिटनमधील निवडणुकांचे निकाल जवळपास आले आहेत. ६५० पैकी ६३६ जागांवर मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यात पंतप्रधान थेरेसा मे यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ३१० तर जेरेमी कॉर्बिन यांच्या लेबर पक्षाला २५८ जागा मिळाल्या आहेत. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमतापेक्षा थोड्या जागा कमी पडतील असे दिसत आहे.
मागच्या वर्षी लोकांनी सार्वमतात युरोपिअन युनियनमधून बाहेर पडायचा कौल दिला. असा कौल लोकांनी देऊ नये असे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन यांनी जाहिर आव्हान केले होते. पण प्रत्यक्षात तसा कौल आल्यामुळे लोकांनी पंतप्रधानांच्या भूमिकेला नाकारले असा सरळसरळ अर्थ झाला त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि थेरेसा मे पंतप्रधान झाल्या. अन्यथा कॅमेरनचा व्यवस्थित कारभार चालू होता पण या कारणामुळे त्यांना जावे लागले.आताही हाऊस ऑफ कॉमन्सची मुदत २०२० पर्यंत होती त्यामुळे २०१७ मध्ये निवडणुका घेतल्याच पाहिजेत असे काही बंधन नव्हते. पण थेरेसा मे यांनी निवडणुका जाहिर केल्या. वास्तविकपणे मुदतीपूर्वी निवडणुका घेतल्या तर पूर्वी होते त्यापेक्षा जास्त बहुमत मिळावे ही अपेक्षा पंतप्रधानांची असणारच. पण तसे होताना दिसत नाही. थेरेसा मे यांचा लवकर निवडणुका घ्यायचा जुगार फसला असे म्हणायचे. लेबर पक्षाला मागच्या वेळेपेक्षा जास्त यश मिळताना दिसत आहे. बी.बी.सी वर बघितले की कॅन्टरबरीसारख्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने कित्येक दशकात न गमावलेल्या जागा यावेळी गमावलेल्या आहेत. अनेक जागांवर लेबर पक्षाने मागच्या वेळेपेक्षा बरीच जास्त मते मिळवली आहेत.
इतर पक्षांच्या पाठिंब्यावर कदाचित कॉन्हर्व्हेटिव्ह पक्ष सरकार स्थापन करेल. पण त्या सरकारच्या पंतप्रधानपदावर थेरेसा मे असतीलच असे नाही. कदाचित दुसर्या नेत्याच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होईल. फेब्रुवारी १९७४ मध्ये लेबर पक्षाला ३०१ आणि कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला २९७ जागा होत्या आणि लेबर पक्षाचे हॅरॉल्ड विल्सन अल्पमतातल्या सरकारचे पंतप्रधान झाले. पण त्यांना बहुमताअभावी मनाप्रमाणे कारभार करता येईना म्हणून त्यांनी ऑक्टोबर १९७४ मध्ये परत निवडणुका घेतल्या. या निवडणुकांमध्ये लेबर पक्षाला १८ जागा जास्त मिळाल्या आणि निसटते बहुमत मिळाले (६३५ पैकी ३१९) तर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने २० जागा गमावल्या. आतापर्यंत एकाच वर्षात दोन निवडणुका झालेले १९७४ हे एकच वर्ष असे आहे. अगदी तशी परिस्थिती यावी इतका कमी फरक यावेळी दोन पक्षांमध्ये नाही.पण थेरेसा मे यांना जे स्थैर्य अपेक्षित होते ते काही मिळेल (किंबहुना परत पंतप्रधानपदच मिळेल) असे काही दिसत नाही.
डेव्हिड कॅमेरन आणि थेरेसा मे हे दोघेही आपल्या कर्माने पंतप्रधानपदावरून दूर झाले/होणार असे दिसते.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 06/09/2017 - 07:11
नवीन
आव्हान नाही आवाहन.
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 06/09/2017 - 09:50
नवीन
एक बातमी नजरेतून सुटली होती -
http://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/electric-vehicle-policy-by-december-nitin-gadkari/articleshow/58685330.cms
या अनुषंगानेच आणखी एक बातमी वाचलेली आठवते की DRDO ने ईलेक्ट्रीक बस साठी इंजिन बनवले होते/ बनवणार होते आणि त्याचा खर्च बराच कमी होणार होता. पण आता कुठे ती लिंक सापडत नाहीये.
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 06/09/2017 - 10:11
नवीन
ही घडामोड ताजी नाही त्यामुळे येथून हा प्रतिसाद उडवला तरीही चालेल. पण येथे टाकावीशी वाटली.
आपल्या देशातील थोरीयम रिजर्व्स वर हे दोन लेख आहेत.
हा आपल्या जवळील अमूल्य साठ्याबद्दल सांगतो -
http://www.firstpost.com/world/the-story-of-thorium-a-50000000000000000-50-quadrillion-discovery-untapped-2817010.html
आणि हा लेख आपल्या देशाच्या दुर्भाग्याबद्दल बोलतो -
http://www.thestatesman.com/opinion/rape-of-thorium-i-49070.html
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 06/09/2017 - 11:20
नवीन
आधार कार्ड पॅनकार्डाशी संलग्न करायच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत हा निर्णय अंमलात आणू नये असा आदेश दिला आहे.
एकूणच 'ज्युडिशिअल अॅक्टिव्हिझम' चा हा एक भाग दिसत आहे. कार्यकारी निर्णय घ्यायचा अधिकार सरकारचाच. तिथे न्यायालयाने का नाक खुपसावे? राजकारण्यांना निदान दर पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरे जायचे असते आणि त्या कारणाने तरी त्यांना लोकांप्रति उत्तरदायी असायलाच लागते. या न्यायाधीशांना असे नक्की कसले उत्तरदायित्व असते? अनेक लोकांनी (बिझनेस क्लासवाल्या) चार-पाच पॅनकार्ड घेतली आहेत आणि थोडे उत्पन्न या पॅनकार्डवर, थोडे त्या पॅनकार्डवर असे करून करचुकवेगिरी केली आहे अशा बातम्या वाचल्याचे आठवते. त्या प्रकाराला चाप लागावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलले होते. हा निर्णय अंमलात आला नाही तर त्यामुळे जे करसंकलनाचे नुकसान होईल ते सुप्रीम कोर्ट भरून देणार का?
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 06/09/2017 - 11:32
नवीन
जे लोक डुप्लिकेट पॅनकार्ड बनवू शकतात ते डुप्लिकेट आधार कार्ड कशावरून नाही बनवू शकणार?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 06/09/2017 - 12:06
नवीन
हो ना कुठलेही कायदे केले तरी त्यातून पळवाटा निघतातच. म्हणून कुठचेच कायदे करू नका. काय म्हणता?
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 06/09/2017 - 12:35
नवीन
आहे ती व्यवस्था (पॅन कार्ड) सुधारता येईल का ते सरकारने बघावे.
- Log in or register to post comments
न
नया है वह
Fri, 06/09/2017 - 14:06
नवीन
आधार कार्ड पॅनकार्डाशी संलग्न कर्णे सुधार नाही का?
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 06/09/2017 - 15:03
नवीन
नाही, पॅन कार्डप्रमाणेच आधार कार्ड सुद्धा डुप्लिकेट बनवता येत असतील तर काहीच फायदा होणार नाही असे वाटते.
जर आधार कार्ड बाकी सर्व आयडी पेक्षा सुपिरिअर असेल तर सरकारने बाकी सर्व आयडी प्रुफ रद्द करून आधार कार्ड कम्पलसरी करावे. पण सरकारचे म्हणणे आहे कि आधार कार्ड कम्पलसरी नाही. यात काँट्रॅडिक्शन नाही का?
- Log in or register to post comments
न
नया है वह
Fri, 06/09/2017 - 15:24
नवीन
काँट्रॅडिक्शन नाही ,
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 06/12/2017 - 12:54
नवीन
सरकारला, बायोमेट्रीकमुळे आधार कार्ड डुप्लिकेशनची अडचण येईल असे वाटत नाही. डेटा सिक्यूरिटी वर देखील सरकारने सुप्रीम कोर्टात खात्री दिलेली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे सरकारला आधार कम्पल्सरी करायचे आहे, पण सुप्रीम कोर्ट त्यास नाही म्हणते. याचे मुख्य कारण अजून सर्व लोक आधार खाली आलेले नाहीत.
पॅनकार्ड व आधार कार्ड जोडणी कम्पल्सरी करू शकत नाही याचे कारण देखील हेच आहे की सुप्रीम कोर्ट म्हणते ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्यांना देखील टॅक्स व टॅक्सरिटर्न भरता यायला हवा.
इतके असून देखील सरकार आधारकार्ड सगळीकडे कम्पल्सरी करण्यासाठी आपले म्हणणे पुढे दामटतेच आहे कारण, त्याने सरळ सरळ आर्थिक नुकसान टाळणे शक्य आहे.
खालील लिंक वर कुठे आधार कम्पल्सरी आहे ते सांगितले आहे. त्यातच एके ठिकाणी हे लिहिलेले दिसते -
On March 27, the Supreme Court ordered that the government cannot be stopped from using Aadhaar identification for its non-welfare schemes like opening of bank accounts, filing of tax returns, verification of new and existing mobile phone numbers and user credentials etc. However, it did maintain that the government cannot make Aadhaar mandatory for welfare schemes and it has allowed the government to use it in some schemes, not permitted to be used as a mandatory requirement.
लिंकः http://indianexpress.com/article/what-is/what-is-aadhaar-card-and-where-is-it-mandatory-4587547/
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Fri, 06/09/2017 - 14:02
नवीन
जे लोक डुप्लिकेट पॅनकार्ड बनवू शकतात ते डुप्लिकेट आधार कार्ड कशावरून नाही बनवू शकणार?
biometric मुळे डुप्लिकेट आधार कार्ड बनवणे शक्य नाही.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 06/09/2017 - 14:59
नवीन
एक शक्यता - तुम्ही दुसऱ्या कोणा गरीब माणसाचे (ज्याच्याकडे पॅन कार्ड नाही) बायोमेट्रिक वापरून, आधार केंद्र वाल्या माणसाला पैसे देऊन डुप्लिकेट आधार कार्ड बनवू नाही शकणार का?
अजून एक - ही बातमी पहा
http://m.gadgets.ndtv.com/internet/news/aadhaar-applications-with-the-same-biometrics-spotted-uidai-files-fir-1674786
- Log in or register to post comments
न
नया है वह
Fri, 06/09/2017 - 15:30
नवीन
The case has been registered under relevant sections of the Aadhaar Act and cheating by impersonation
डुप्लिकेट आधार कार्ड बनवल्यास काय होते.
बायोमेट्रिक डुप्लिकेट आधार कार्ड आहे हे सिध्द करता येते.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 06/09/2017 - 15:50
नवीन
पहिली शक्यता वाचा माझ्या प्रतिसादातली..
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Fri, 06/09/2017 - 16:28
नवीन
एक शक्यता - तुम्ही दुसऱ्या कोणा गरीब माणसाचे (ज्याच्याकडे पॅन कार्ड नाही) बायोमेट्रिक वापरून, आधार केंद्र वाल्या माणसाला पैसे देऊन डुप्लिकेट आधार कार्ड बनवू नाही शकणार का?
आधार कार्डावर फोटो कोणाचा ठेवणार? उद्या त्या गरीब माणसाने स्वतःचे आधार कार्ड काढले तर ?
जमीन/ फ्लॅट खरेदीविक्रीच्या वेळी त्या गरीब माणसाला बरोबर घेउन जावे लागेल.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Sat, 06/10/2017 - 03:54
नवीन
डुप्लिकेट पॅन कार्ड वर पण फोटो डुप्लिकेट असतील ना. सेम स्ट्रॅटेजी वापरता येईल.
किंवा थोडा ब्लर असलेला, वेगळा दिसणारा फोटो काढता येईल. पॅन आणि आधार वरचा फोटो एकच असायला हवा अशी सक्ती नाहीए.
हा मुद्दा पटला. त्या गरीब माणसाला आधार कार्डाची गरज वाटल्यास प्रॉब्लेम होईल. पण आधार कार्ड काढणे कम्पल्सरी नाही असे सरकारने म्हटले आहे, म्हणून तो गरीब माणूस दुसरे कोणते आयडी प्रुफ वापरू शकेल.
जमिनीच्या खरेदीच्या वेळी गरीब माणसाला न्यायचे कारण कळले नाही. फोटो आपलाच (पण थोडा वेगळा, ब्लर असलेला) वापरायचा. फक्त बायोमेट्रिक त्याचे वापरायचे.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 06/10/2017 - 09:03
नवीन
जी गोष्ट सरकार फुकट करत आहे ती सुद्धा कंपल्सरी करता येत नाही ?
आधार कार्ड काढणे कम्पल्सरी नाही असे ह्या अगोदरच्या सरकारचे धोरण असावे !
पण डुप्लिकेट आधार कार्ड काढणे बायोमेट्रीक मुळे कठीण होत असेल तर सर्व पॅन कार्ड रद्द करुन सरळ आधार कार्डलाच कायदेशीर बनवायला पाहीजे !!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 06/10/2017 - 09:07
नवीन
जमिनीच्या तसेच महत्वाच्या व्यवहारात आधार कार्ड कंपलसरी करावेच, त्या बरोबर त्या ठीकाणी बायो मेट्रीक / आय स्कॅन सारख्या टेस्ट लावुन आधार कार्ड
वरील बा यो मेट्रीक डेटा क्रॉस चेक करावा म्हणजे कोणी डुप्लिकेट आधार कार्ड वापरुन फायदा घेऊ शकणार नाही.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 06/10/2017 - 15:02
नवीन
टाटा मोटर्सने कंपनीतील सर्व पदे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्युनियर इंजिनियर पासून ते प्लांट मॅनेजर पर्यंत सर्व जण फक्त कर्मचारी असतील. कोणीही बॉस नसेल, असे चित्र दिसत आहे. पण मग रिपोर्टिंग कोणी कोणाला करायचे, उत्तरदायित्व कसे असेल, हे अजून स्पष्ट नाही. मात्र प्रत्येक विभागाचा, शाखेचा, प्लांटचा एक 'हेड' असू शकतो, ज्याच्याकडे त्या विभागाची जबाबदारी असेल. व्हिजिटिंग कार्डवर पदाऐवजी विभागाची माहिती असेल. उदा ‘Sales – Medium and Heavy Commercial Vehicles’.
याचे टाटा मोटर्स च्या कारभारावर, तसेच जर टाटापासून प्रेरणा घेऊन इतरांनी असं केल्यास एकूणच औद्योगिक जगावर काय परिणाम होतो, ते पाहणं रोचक असेल.
जगात असे निर्णय घेतले गेल्याची उदाहरणे असली, तरी भारतात बहुधा हे पहिल्यांदाच झाले असावे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 06/13/2017 - 10:53
नवीन
गोव्यातील पंचायत निवडणुकांचे निकाल आले आहेत. गोव्यातील पंचायत निवडणुका पक्षपातळीवर लढविल्या जात नाहीत तर विविध अपक्ष/स्थानिक आघाड्यांना विविध पक्ष स्थानिक पातळीवर पाठिंबा देतात. त्यामुळे हे निकाल आले असले तरी त्यातून नक्की काय परिणाम होईल हे समजायला मार्ग नाही.
एकूणच गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन झाल्यानंतर मनोहर पर्रीकर 'स्टिकी विकेट' वर आहेत अशा बातम्या आहेत. एक तर पर्रीकरांचे सरकार म्हणजे भाजप, म.गो.पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांचे कडबोळे आहे. त्यातही स्वतः पर्रीकरांबरोबर फ्रान्सिस डिसूझा आणि पांडुरंग मडकईकर हे दोनच मंत्री भाजपचे आहेत. तर इतर ७ मंत्री एकतर म.गो.पक्ष किंवा गोवा फॉरवर्ड पक्षाचे आहेत नाहीतर अपक्ष आहेत. त्यामुळे पर्रीकरांना मनाप्रमाणे काम करता येत नाहीये अशा बातम्या आहेत. तसेच गोव्यातील खाणकामात राजकारण्यांचे गुंतलेले हितसंबंध लक्षात घेता त्या अवैध खाणकामाविरूध्द त्यांना फार काही करता येत नाहीये. खाणीतून काढलेली लोखंडाची भुकटी (ओर) वाहून नेण्यासाठी गोव्यातील मुरगाव बंदरात जेटी बांधण्यात येत आहे. त्या जेटीचा उपयोग जिंदल स्टीलसारख्या कंपन्या करणार आहेत. त्याला स्थानिकांचा विरोध आहे कारण वार्याबरोबर उडून हे धातूचे कण इकडेतिकडे उडून डोकेदुखी होत आहे. पण मुरगाव बंदराचा औद्योगिक कामांसाठी विकास करण्यात नितीन गडकरींनी पुढाकार घेतला आहे. ४० पैकी १२ जागाच मिळूनही पर्रीकरांचे सरकार गोव्यात स्थापन करण्यात नितीन गडकरींची मोठी भूमिका होती. त्यामुळे पर्रीकरांचा स्वतः त्या जेटीला विरोध असला तरी त्यांना गप्प राहावे लागत आहे. एकूणच इंदिरा गांधी त्यांच्या दुसर्या टर्ममध्ये १९८० ते १९८४) मध्ये शेवटचे काही महिने सोडता बर्यापैकी निष्प्रभ झाल्या होत्या आणि त्यांना पूर्वीच्या जोमाने काम करता येत नव्हते तसे काहीसे पर्रीकरांचे झाले आहे अशा बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर या पंचायत निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपसमर्थक उमेदवारांचा किती ठिकाणी विजय झाला आहे हे समजायला मार्ग नाही. पण पर्रीकरांची परीक्षा नक्कीच या निवडणुकांनी बघितलेली असणार.
विश्वजीत राणेंना भाजपात घेतले आहे. ते स्वतःची वाळपोई ही विधानसभेतील जागा पर्रीकरांसाठी सोडणार की अन्य कुठल्या भाजप आमदाराला राजीनामा द्यायला सांगून तिथे पर्रीकर पोटनिवडणुक लढविणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. की राष्ट्रपतीपदाची निवडणुक झाल्यानंतर परत एकदा पर्रीकर दिल्लीला जाणार? एकूणच सगळ्याचा विचका होताना दिसत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 06/13/2017 - 11:07
नवीन
माझे पूर्वीचेच मत आजही कायम आहे. ४० पैकी फक्त १३ जागा मिळून दुसर्या क्रमांकावर असलेल्या भाजपने कडबोळे स्थापन करून सत्ता स्थापन न करता विरोधातच बसायला हवे होते. सत्तेसाठी केंद्रातून पर्रिकरांना परत राज्यात आणणे हा चुकीचा निर्णय होता. बहुमत नसताना सत्ता स्थापन करणे व पर्रिकरांना परत गोव्यात आणणे या दोन चुका भाजपने केल्या आहेत.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Tue, 06/13/2017 - 11:19
नवीन
आणि ह्यापेक्षा गोव्याच्या सत्तेपायी झालेली मोठी आणि अक्षम्य चूक म्हणजे संरक्षण खात्याला पूर्ण वेळ मंत्री नसणे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 06/14/2017 - 06:58
नवीन
लंडनमधील ग्रेनेफेल टॉवर या २७ मजली इमारतीला आग लागली आहे. आग रात्रीच्या वेळी रहिवासी झोपलेले असताना लागलेली असल्यामुळे नुकसान वाढायची शक्यता आहे. या दुर्घटनेचे फोटो पाहता हा बराच मोठा भयंकर प्रकार झालेला दिसतो.
परवाच दिल्लीतील उपहार थिएटरमध्ये झालेल्या दुर्घटनेला २० वर्षे पूर्ण झाली त्यावेळी टिव्हीवरील कार्यक्रम बघताना अशी आग लागल्यास त्या आगीला काबूत करता येईल अशी व्यवस्था आपल्याकडे टॉवर्समध्ये आहे का हा प्रश्न मनात आला होता. गेल्या २० वर्षात अशा टॉवर्सची संख्या कितीतरी वाढली आहे. त्यातच आज ही लंडनमधील टॉवरला लागलेल्या आगीची बातमी आली आहे!!
असो. आग लवकरात लवकर काबूत यावी, जिवीतहानी कमितकमी व्हावी आणि जखमींना कमितकमी त्रास होऊन लवकर प्रकृतीस आराम पडावा ही इच्छा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/15/2017 - 10:46
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/15/2017 - 10:49
नवीन
उद्धव ठाकरेंचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा; नितेश राणेंचा अर्ज
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 06/15/2017 - 14:12
नवीन
काही दिवसांपूर्वी सौदी अरेबिया आणि इतर काही गल्फमधील देशांनी कतारबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून टाकले. त्यामागे कारण दिले होते--- "कतार हा दहशतवादाला मदत करणारा देश आहे". वास्तविकपणे सौदीने इतर कोणत्याही देशावर "दहशतवादाला मदत करायचा आरोप करणे" म्हणजे विजय मल्ल्याने गावात भट्टीच्या दारूचा धंदा चालविणार्याला "तू लोकांना व्यसनी करायच्या धंद्यात आहेस" असे म्हटल्यासारखे झाले.
त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी कतारवरचे निर्बंध उठवा असे आवाहन सौदी आणि इतर देशांना केले तर त्यानंतर काही तासातच अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांनी कतार 'सर्वोच्च पातळीवरून' दहशतवादाचे समर्थन करत आहे असा आरोप .
या गोष्टीला आठवडा उलटतो आहे तोच आज अमेरिकेने कतारबरोबर १२ बिलिअन डॉलरचा लढाऊ विमाने विकायचा करार केला आहे अशी आज बातमी आली आहे.
काय चालले आहे हे समजत नाही. यापूर्वीच्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी इतक्या कमी कालावधीत इतक्या उघडपणे इतक्या प्रमाणावर कोलांट्या उड्या मारल्या नव्हत्या.
एकूणच डॉनल्डतात्या ट्रम्पकडून फार अपेक्षा ठेवलेल्या सगळ्यांचाच जबरदस्त मुखभंग आणि अपेक्षाभंग झाला आहे हे नक्कीच.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 06/15/2017 - 14:16
नवीन
हा या धाग्यावरील ३०० वा प्रतिसाद आहे. तेव्हा या धाग्यावर यापूर्वी आलेल्या मुद्द्यांवर काही प्रतिसाद द्यायचा असेल तरच तो लिहावा. नवा मुद्दा लिहायचा असेल तर तो नव्या धाग्यात लिहावा ही विनंती.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6