Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन(mind)म्हणजे काय!!!!मनाची तुमची व्याख्या काय आहे???

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Wed, 04/19/2017 - 11:37
🗣 118 प्रतिसाद
मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे. सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे. Hard problem of consciousness.-- ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली. काय आहे हार्ड प्रॉब्लेम? एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात. mind डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही. याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level). इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे. व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे. बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल. १.मनाची तुमची व्याख्या काय आहे? २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय? ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?

प्रतिक्रिया द्या
43781 वाचन

💬 प्रतिसाद (118)
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/19/2017 - 16:02 नवीन
१.मनाची तुमची व्याख्या काय आहे? ››› मिपावर मन१ असा आयडी आहे. तीच मना"ची व्याख्या (ख्या ख्या ख्या ख्या! Image removed. ) २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय? ›› Image removed. मीच मला अयोग्य कसा वाटेण??? ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? ››› दिसातून दहावेळा दिसेल त्याला ल्लूल्लूल्लूल्लूल्लू Image removed. करा. सगळे प्रॉब्लेम संपतील. ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय ››› बॉडि ताब्यात तर माइंड ताब्यात! अशे आमच्या नवीपेठ तालमीचे वस्ताद न्हेमी म्हनायचे! त्ये दटावलं, म्हून सांगितलं!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 04/19/2017 - 16:12 नवीन
दुनिया करे ल्लूल्लूल्लूल्लूल्लू तो हम क्या जवाब दे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सचु कुळकर्णी Wed, 04/19/2017 - 17:12 नवीन
आत्मुस कैसन बा. हे ""बॉडि ताब्यात तर माइंड तांब्यात!"" असे वाचल्या गेलय ;) स्वारी बर का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/19/2017 - 17:48 नवीन
@""बॉडि ताब्यात तर माइंड तांब्यात!""››› Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
स
सचु कुळकर्णी Wed, 04/19/2017 - 17:50 नवीन
ट.फि. भौ झपाटल्यागत जबरदस्त अभ्यास आहे राव तुमचा. काय तो एक एक अभ्यासपुर्ण लेख असतो तुमचा, अमेरीकन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन तत्ववेत्तयां विषयी चा काय तो अभ्यास, आम्हा पामरांना घर बसल्या बोधिसत्वाचि मेजवानि असते आपला एक एक लेख. रच्याकने, एक विचारू का ? नाहि म्हणजे प्रश्नांचि सरबत्ती असणारे आपले अभ्यासपुर्ण लेख आम्हि वाचतो, सुचेल अशा प्रतिक्रियाहि देतो पण तुम्हि नंतर काय बि कलवत नाहि, असे का ब्रे. कदाचित मिपा सशुल्क नसल्याने असे होत असावे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 04/19/2017 - 21:56 नवीन
मन म्हणजे काय? सर्वांत सोप्पे उत्तर इथे बघावयास मिळेल. या व्याख्येत कोणताच वाद संभवत नाही, मग अगदी संक्षींसारखे डॉन लोक्स असले तरीही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 04/19/2017 - 22:17 नवीन
संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. त्याच्याशी बहुतांश सहमत आहे. फक्त तुम्ही केलेल्या मनाच्या व्याख्येत थोडी दुरुस्ती सुचवू इच्छितो. तुम्ही म्हणता की मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट. यावरून ग्रह होतो की मन आणि मेंदू एकंच आहेत. तो बऱ्याच अंशी उचित असला तरी काही अपवादात्मक परिस्थितींत मन हे मेंदूच्या बाहेरही कार्यरत असल्याचा अनुभव येतो. अवयव प्रत्यारोपणाच्या घटनांमध्ये ग्राहकास दात्याच्या आवडीनिवडी चिकटतात असं आढळून आलं आहे. इथे एक इंग्रजी लेख सापडला : http://www.telegraph.co.uk/news/health/news/11393771/The-life-saving-operations-that-change-personalities.html त्यामुळे मनाची व्याख्या केवळ मेंदूच्या संदर्भात करू नये, असं माझं मत पडतं. मात्र करायची झालीच तर पूर्ण शरीराच्या संदर्भात करावी म्हणून सुचवेन. नेमक्या याच कारणासाठी माझ्या मते मनाची व्याख्या 'आत्मा आणि निसर्ग यांना जोडणारा दुवा' अशी करावी. सांख्यांच्या भाषेत पुरुष आणि प्रकृती यांना सांधणारा दुवा म्हणजे मन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 04/20/2017 - 02:17 नवीन
हा प्रश्न जिथे उत्पन्न झाला, त्याच्या उत्तरार्थ जिथे एव्हढा सगळा उहापोह झाला ते ठिकाण म्हणजे मन.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/20/2017 - 07:42 नवीन
टफिंचे काही धागे एकदम बकवास असतात तर काही टिपटॉप! कळतच नाही खरे टफि कोण आणि किती आहेत!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/20/2017 - 14:41 नवीन
संजय क्षीरसागर,
थोडक्यात काल हा भासमान आहे कारण पृथ्वी कायमच फिरते आहे त्यामुळे एकाबाजूला दिवस आणि दुसरीकडे रात्र भासते. जर मापनाचा हव्यास सोडला तर कालाला अर्थ उरत नाही.
मापनाचा हव्यास सोडला तरी आपण म्हातारे होतंच असतो. या काळाचा मापनाशी संबंध नाही. तसंच काळ आभासी नाही, कारण की त्याचा प्रत्यय येतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/20/2017 - 14:52 नवीन
वय शरीराला आहे जाणीवेला ( म्हणजे आपल्याला ) नाही ! कालाचा प्रत्यय कधीही येणं शक्य नाही कारण तो अस्तित्वातच नाही. प्रक्रियेचा प्रत्यय येतो . उदा. उजेड कमी झाला किंवा वाढला ( रात्र -दिवस), अमुकतमुक शरीरिक बदल झाले ( वय झाले), इथून तिथे पोहोचलो (हालचाल) वगैरे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अनुप ढेरे गुरुवार, 04/20/2017 - 15:53 नवीन
कालाचा प्रत्यय कधीही येणं शक्य नाही
तुमचे अनेक प्रतिसाद वाचताना येतो कि कालाचा प्रत्यय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 04/20/2017 - 16:08 नवीन
मला संक्षींचे "काळ" ह्या संकल्पने विषयीचे प्रतिसाद चक्क कळत आहेत ह्या धाग्यावरचे.. आणि धागाही टफिंचा आहे.. क्या बात है! फक्त... संक्षी केवळ संकल्पना मांडत असते आणि आपण स्वतः किंवा समोरचा ह्यांच्या आकलन किंवा इतर कोणत्याही "क्षमतां"बद्दल अवाक्षरही बोलत नसते तर...
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या गुरुवार, 04/20/2017 - 16:22 नवीन
प्रतिसाद चक्क कळत आहेत ह्या धाग्यावरचे.. आणि धागाही टफिंचा आहे.. क्या बात है!
तुम्ही नक्की स्वप्नात नाहीत ना ? एका खात्री करा .. काही उपाय पुढील प्रमाणे १) समोर कॉफी / चहा तत्सम एखाद वाफाळतं पेय असेल.. तर एकदा त्यात बोट घालून बघा.. २) एखादा गाणं इथे टाईप करून बघा.. त्याला उत्तर गाण्यातच मिळालं कि तुम्ही सुटलेत . ३) एकदा मिपा रिफ्रेश करून बघा.. तिसऱ्या सेकंदाला जर पेज ओपन झालं .. तर तुम्ही स्वप्नात आहेत.. जर एखादा एरर आला आणि १५-३० सेकंदास पुन्हा रिफ्रेश केल्यानंतर मिपा उघडलं.. तर तुम्ही जाग्या आहेत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/20/2017 - 17:19 नवीन
फक्त... संक्षी केवळ संकल्पना मांडत असते आणि आपण स्वतः किंवा समोरचा ह्यांच्या आकलन किंवा इतर कोणत्याही "क्षमतां"बद्दल अवाक्षरही बोलत नसते तर... जसा प्रश्नाचा रोख तसं उत्तर ! जर मला कुणी कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, तर मला तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे ! असंच म्हणावं लागतं नाही का ? याउलट इथलेच (किंवा कुठलेही) गामाजींचे प्रश्न आणि माझी उत्तरं वाचलीत तर डेकोरम सांभाळणं म्हणजे काय याची तुम्हालाही यथार्थ कल्पना येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 04/20/2017 - 16:26 नवीन
वर अर्धवटरावांचे म्हणने पटतेय.अ वस्तु ब मध्ये रुपांतरीत होतेय तर तिचे मापण स्पेस टाईम मध्येच होईल.त्यामुळे स्पेस टाईम कॉन्टिनम विश्वाचे मूलभूत कणा आहे हे स्पष्ट होते. पण काळाचे सर्वात छोटे मापक कीती? १ सेकंदाचे कीती भाग करता येतील? मला वाटते अनंत भाग करता येतील.जर एका सेकंदाचे अनंत भाग होत असतील तर तो सेकंद कधीच संपणार नाही.here quantum mechanics kicks in.पुंजभौतिकीत planks scale नावाचा मापक आहे.त्यानुसार प्लांक टाईम हा सर्वात छोटा काळाचा मापक आहे.यापेक्षा कमी कालावधी अस्तित्वात नाही.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 04/28/2017 - 15:45 नवीन
पण काळाचे सर्वात छोटे मापक कीती? १ सेकंदाचे कीती भाग करता येतील? मला वाटते अनंत भाग करता येतील.जर एका सेकंदाचे अनंत भाग होत असतील तर तो सेकंद कधीच संपणार नाही :-) इंटरेस्टींग! हे म्हणजे १ किमी अंतर मोजण्याचं दुसरं एखादं परिमाण अत्यंत सूक्ष्म असल्यानं, १ किमी अंतर कधीच संपणार नाही असं म्हणणं झालं. कदाचित अतिसूक्ष्म, नॉर्मल आणि अतिविराट अशा स्टेट्स मधले भौतिकीचे नियम म्हणूनच वेगवेगळे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 04/20/2017 - 16:31 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Zeno's_paradoxes
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 04/20/2017 - 16:31 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Zeno's_paradoxes
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/20/2017 - 16:54 नवीन
निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही. रा भि जोशी यांच्या नर्मदा परिक्रमावरील लेखातील एका अनुभवाची आठवण झाली. ते परिक्रमा करीत असताना एका डोंगरामध्ये असणाऱ्या गुहेच्या बाहेर लिहिलेले होते १० पैशात ब्रम्हदर्शन ( १९५६ सालची गोष्ट). ते १० पैशात ब्रम्हदर्शन कसे होते ते पाहण्यासाठी आत गेले तेथे एक साधू महाराज बसले होते. त्यांनी १० पैसे त्यांच्या समोर ठेवले. साधू नि त्यांना एक खडीसाखरेचा खडा दिला आणि खा म्हणाले. खडीसाखर खाल्ल्यावर विचारले कसा लागला? जोशी म्हणाले गोड लागला. गोड म्हणजे कसा? जोशी म्हणाले गोड म्हणजे कसा ते कसे सांगणार? ते स्वतः अनुभव घेऊन पाहायला लागेल. यावर साधू महाराज म्हणाले ब्रम्हदर्शनही असेच आहे. स्वतः अनुभूती झाल्याशिवाय काही नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले गुरुवार, 04/20/2017 - 16:59 नवीन
छान लेख. प्रश्न ही विचार करायला लावणारे. आधी या बाबतीत काही खोलवर विचार केला नव्हता. हे प्रश्न पाहून जे मनात विचार आले ते इथे मांडत आहे. १.मनाची तुमची व्याख्या काय आहे? मन हे उत्क्रांती मध्ये सजीवांना आणि त्यातही मानवाला प्राप्त झाले आहे असे वाटते. आजूबाजूच्या वातावरणाचा पृथ्वीवर जगण्याच्या दृष्टीने शरीराला उपयुक्त असा अर्थ लावण्याची मेंदूची प्रक्रिया म्हणजे मन असे म्हणता येईल. उदा. काळ ही मानवी संकल्पना आहे आणि मनाला होणारा तो एक भास आहे असे विज्ञान मानते. [या संदर्भात खाली ता. क. पहावा] त्यामुळेच मानवी जाणीव ही पृथ्वीतलावर जाणवणाऱ्या जीवनोपयोगी प्रेराणापुरती मर्यादित आहे. विश्र्वाची जटील रचना समजण्यासाठी ही जाणीव अतिशय तोकडी पडते. ज्यांना विश्र्वरचनेविषयी विज्ञानाच्या ज्या सध्याच्या संकल्पना आहेत आणि ती रचना किती जटील आहे हे थोडक्यात पहायचे असल्यास माझ्या ब्लॉग वर लिहिलेली संगणकविश्र्व ही कविता वाचावी.* ही मेंदूची प्रक्रिया काही अंशी जनुकीय आणि त्यानंतर अनुभवातून घडत जात असावी. २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय? सर्वसामान्य पणे आत्मा ही संज्ञा ज्या अर्थाने वापरली जाते, त्या अर्थाने योग्य वाटत नाही. याचे कारण इथे देण्यापेक्षा मी मिपा वर लिहिलेली जीवात्मा ही कविता वाचावी. आत्मा या भारतीय संकल्पने मध्ये तर्कसंगती कशी नाही या विषयी त्यात मुद्दे मांडले आहेत.* आत्मा या संकल्पनेचा नवा काही अर्थ लावून त्याचा विचार करणे इथे अप्रस्तुत आहे. ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? 'अनुभुती का देतात' याचे उत्तर वर प्र.. १ मध्ये आले आहे. अनुभूती कशी होते हे कोडे विज्ञान सोडवू शकेल असे वाटते. ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय? वर म्हणल्याप्रमाणे हा प्रश्न विज्ञान सोडवू शकेल असे वाटते. ता. क. १. *माझी कविता वाचावी म्हणुन हे इथे लिहिले नसून त्यातले मुद्दे इथे लागू होतात म्हणुन लिहिले आहे. २. काळ हा मानवाला प्रतीत होणारा भास आहे हे पटणे कठीण आहे. ज्यांना याविषयी खरेच जाणून घ्यायचे असेल त्यांना Quantum Theory आणि Relativity समजून घ्यावी लागेल. त्यासाठी सोप्या इंग्रजीत लिहिलेली अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय PBS Space Time ही मालिका पहावी.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 04/20/2017 - 17:08 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले
व
विशुमित गुरुवार, 04/20/2017 - 18:07 नवीन
टफी तुमचा हा धागा खरंच यशस्वी होत आहे. विषय थोडा क्लीष्ट आहे पण सन्मानीय सदस्यांकडून काही गोष्टी उलगडणे हे ही नसे थोडके. ( टीप: प्रतिसाद खडखडीत जागेपणी, नशा-पाणी न करता दिला आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/20/2017 - 22:56 नवीन
तुमचा आयडी मजेशिर असल्यानं (आणि कविता तर त्याहूनही मजेशिर असल्यानं), तुम्ही इतका सुयोग्य विचार करु शकता याचा आनंद आहे. १) आजूबाजूच्या वातावरणाचा पृथ्वीवर जगण्याच्या दृष्टीने शरीराला उपयुक्त असा अर्थ लावण्याची मेंदूची प्रक्रिया म्हणजे मन असे म्हणता येईल. सहमत आहे. एका अर्थानं मेंदूही जगण्यासाठी लागणारे निसर्गाकडून येणारे सर्व सिग्नल्स डिकोड करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे व्यक्ती निसर्गानुरुप जगू शकते. पण सदर लेख हा मेंदूच्या सायकॉलॉजिकल भागावर फोकस करतो. काळ ही मानवी संकल्पना आहे आणि मनाला होणारा तो एक भास आहे असे विज्ञान मानते. १०० % सहमत ! कारण हेच मी वर म्हटलंय पण याचा वैज्ञानिक पुरावा तुमच्याकडे असेल तर कृपया द्यावा. २) आत्मा या भारतीय संकल्पने मध्ये तर्कसंगती कशी नाही या विषयी त्यात मुद्दे मांडले आहे आत्मा म्हणजे आपण ! यात काहीही विसंगती नाही. तुमचा अध्यात्माचा अभ्यास पुरेसा नसावा त्यामुळे `संकल्पना' `तर्कसंगती नाही' असे शब्द आले आहेत. (३) आणि (४) या विषयी वर लिहीलं आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले
स
संदीप-लेले Fri, 04/21/2017 - 00:37 नवीन
Illusion of Time या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल. Relativityआणि Quantum Theory ची तोंडओळख किंवा अधिक माहिती असल्यास हे समजण्यास मदत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 04/21/2017 - 07:25 नवीन
नक्की बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/20/2017 - 21:20 नवीन
संजय क्षीरसागर,
प्रक्रियेचा प्रत्यय येतो .
शरीर जिवंत राहणे ही एक प्रक्रिया आहे. तिचा प्रत्यय सतत येतंच असतो. काळ अस्तित्वात नसता तर हा प्रत्यय आला नसता. तुम्ही म्हणता ती कालातीत जाणीव देहातीतही आहे. एकदा का दैहिक जीवन प्राप्त झालं की कालातीत 'मी'चं काळाशी लग्नं लागतं. मग काळाच्या इशाऱ्यावर नाचणं आलंच. यालाच निसर्गाचे नियम पाळणं म्हणतात. वस्तुत: ते काळाचे नियम आहेत. 'मी'ला काळाचे नियम धुडकावून जगण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र त्या नियमांना नाकारण्याचं स्वातंत्र्य नाही. काळ अस्तित्वात असल्याचा आजून एक पुरावा म्हणजे सृष्टीचं अस्तित्व. सृष्टी परस्परविरोधी तत्त्वांवर चालते. विरोधविकासवाद हे सृष्टीचं मूलभूत अंग आहे. जर काळाचं अस्तित्व नसतं तर हा विरोध मुळातून निर्माण झालाच नसता. सर्वांना सगळीकडे एकात्मतेचा प्रत्यय आला असता (जो अन्यथा केवळ काही लोकांनाच येतो). काळ म्हणजे बदल. काळाखेरीज बदल संभवत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/20/2017 - 22:25 नवीन
१) शरीर जिवंत राहणे ही एक प्रक्रिया आहे. तिचा प्रत्यय सतत येतंच असतो. काळ अस्तित्वात नसता तर हा प्रत्यय आला नसता. कालाचा आणि जाणीवेचा काहीएक संबंध नाही. शरीर जीवंत आहे हे आपल्याला कळतं, त्यात कालाचा संबंध कुठे येतो? २) एकदा का दैहिक जीवन प्राप्त झालं की कालातीत 'मी'चं काळाशी लग्नं लागतं. मग काळाच्या इशाऱ्यावर नाचणं आलंच. हे थर्मामिटरला ताप चढला म्हणण्यासारखं आहे ! गामाजी, जाणीवेला काहीही होत नाही. काल अस्तित्वातच नाही म्हटल्यावर जाणीवेचं (म्हणजे आपलं) त्याच्याशी लग्न लागेलच कसं ? ३) यालाच निसर्गाचे नियम पाळणं म्हणतात. वस्तुत: ते काळाचे नियम आहेत. 'मी'ला काळाचे नियम धुडकावून जगण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र त्या नियमांना नाकारण्याचं स्वातंत्र्य नाही. प्रक्रियेला अनुसरुन जगणं हे सूज्ञाचं लक्षण आहे. उदा. गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू खाली पडत असेल तर वरच्या मजल्यावरुन उडी घेण्यात अर्थ नाही किंवा भूक लागल्यावर जेवणं श्रेयस आहे तर भूकेशी मुकाबला करण्यात हाशिल नाही. यात कालाचा कुठेही संबंध येत नाही. ४) काळ अस्तित्वात असल्याचा आजून एक पुरावा म्हणजे सृष्टीचं अस्तित्व. सृष्टी परस्परविरोधी तत्त्वांवर चालते. विरोधविकासवाद हे सृष्टीचं मूलभूत अंग आहे. जर काळाचं अस्तित्व नसतं तर हा विरोध मुळातून निर्माण झालाच नसता. यासाठी अवकाश आणि उत्पत्ती, स्थिती आणि लयीचे नियम पुरेसे आहेत. कालाची आवश्यकता नाही. ५) काळ म्हणजे बदल. काळाखेरीज बदल संभवत नाही. आपण पुन्हा तिथेच आलो ! बदल ही प्रक्रिया आहे ती स्वयेच किंवा कुणी घडवल्यानं घडू शकते त्यासाठी कालाची आवश्यकता नाही. काल ही त्या प्रक्रियेच्या मापनासाठी योजलेली मानवी कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
द
दशानन Fri, 04/21/2017 - 09:58 नवीन
यातील काही कामी येतं का बघा वाईच! https://youtu.be/K49rmobsPcY
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गामा पैलवान Fri, 04/21/2017 - 09:08 नवीन
संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
शरीर जीवंत आहे हे आपल्याला कळतं, त्यात कालाचा संबंध कुठे येतो?
स्वप्नविरहित झोपेत शरीराचा विसर पडलेला असतो. तेंव्हा काळाची जाणीवही लोपलेली असते. शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेचा काळाशी संबंध नाही. मात्र शारीरिक जाणीव काळाशीच बांधली गेलेली आहे. २.
हे थर्मामिटरला ताप चढला म्हणण्यासारखं आहे !
नेमकं बोललात पहा. तापमापकास जर तापंच चढला नाही, तर तो काय मापणार? त्याच्यात आणि कसलासा द्रव भरलेली कुठलीतरी नळी यांच्यात काहीच फरक उरणार नाही. ३.
गामाजी, जाणीवेला काहीही होत नाही.
ही जी कशानेही बाधित न होणारी जाणीव आहे तिला शुद्ध अस्तित्व म्हणतात. प्रस्तुत चर्चा दैहिक जाणीवेविषयी आहे, जी कालप्रभावित आहे. एकाच वेळेस दोन जाणीवा नांदत असणं नैसर्गिक आहे. उदा. : आंब्याच्या गोडपणाची जाणीव आणि त्याच्या केशरी रंगाची जाणीव. त्यामुळे शुद्ध जाणीव आणि दैहिक जाणीव दोन्ही एकाच वेळेस नांदू शकतात. ४.
गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू खाली पडत असेल तर वरच्या मजल्यावरुन उडी घेण्यात अर्थ नाही किंवा भूक लागल्यावर जेवणं श्रेयस आहे तर भूकेशी मुकाबला करण्यात हाशिल नाही. यात कालाचा कुठेही संबंध येत नाही.
काळ अस्तित्वात नसता तर गुरुत्वाकर्षणही अस्तित्वात आलं नसतं. देहही अस्तित्वात आला नसता. ५.
आपण पुन्हा तिथेच आलो !
नेमकं हेच काळाच्या अस्तित्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. 'आपण' = शुद्ध अस्तित्व. 'परत' = जागृत होणारी पूर्वस्मृती. 'तिथेच' = कालातीतपणे. 'आलो' ही प्रक्रिया. ज्याअर्थी प्रक्रियेचं आवर्तन होतंय त्याअर्थी काळ अस्तित्वात आहे. रोचक गोष्ट अशी की एखाद्या आवर्तनाच्या सहाय्यानेच तो मापता येतो. अन्यथा नाही. ६.
यासाठी अवकाश आणि उत्पत्ती, स्थिती आणि लयीचे नियम पुरेसे आहेत. कालाची आवश्यकता नाही.
उस्थिल या स्थिती काळामुळे वेगवेगळ्या भासतात. वस्तुत: अस्तित्व एकंच आहे आणि ते या स्थितींपेक्षा वेगळं आहे. (हा मुद्दा तुमच्या लेखनात क्रमांक ५ च्या आधी आलेला आहे. मात्र माझा युक्तिवाद पुढे रेटावा व्हावा म्हणून क्रम बदलला आहे.) असो. माझा युक्तिवाद तुमच्या विधानांस पूरक म्हणून पाहावा. प्रतिवाद म्हणून पाहू नये (अशी विनंती). आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 04/21/2017 - 11:20 नवीन
१) शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेचा काळाशी संबंध नाही. मात्र शारीरिक जाणीव काळाशीच बांधली गेलेली आहे. २) तापमापकास जर तापंच चढला नाही, तर तो काय मापणार? ३) शुद्ध जाणीव आणि दैहिक जाणीव दोन्ही एकाच वेळेस नांदू शकतात. ४) काळ अस्तित्वात नसता तर गुरुत्वाकर्षणही अस्तित्वात आलं नसतं. देहही अस्तित्वात आला नसता. ५) ज्याअर्थी प्रक्रियेचं आवर्तन होतंय त्याअर्थी काळ अस्तित्वात आहे. रोचक गोष्ट अशी की एखाद्या आवर्तनाच्या सहाय्यानेच तो मापता येतो. अन्यथा नाही. ६) उस्थिल या स्थिती काळामुळे वेगवेगळ्या भासतात. वस्तुत: अस्तित्व एकच आहे आणि ते या स्थितींपेक्षा वेगळं आहे. ________________________________ मुळात जाणीव एकच आहे तिचं कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ शकत नाही बोध सिद्धत्वाकडे नेतो. पण वस्तुस्थिती कायम राहाते ती म्हणजे जाणीव आकाशासारखी अविभाज्य आहे. तस्मात शारीरिक जाणीव, कालाची जाणीव, बायकोची जाणीव, कुत्रं भुंकल्याची जाणीव... हे मेंदूनं जाणीवेचं केलेलं डिकोडींग आहे. प्रक्रियांसाठी कालाची आवश्यकता नसून अवकाशाची आवश्यकता आहे. उदा. आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी त्या दोन ठिकाणात आवकाश आवश्यक आहे. काल अनावश्यक आहे. पण तो मनात इतका मुरला आहे की प्रक्रियेसाठी कालाची आवश्यकता आहे अशी आपली समजूत झाली आहे. जी गोष्ट प्रक्रियेची तीच तिच्या आवर्तनाची. उलस्थि कालामुळे वेगवेगळ्या भासतात हे योग्य आहे कारण काल हे प्रक्रिया मापनाचं साधन आहे.. काल ही प्रक्रियेसाठी अनिवार्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चित्रगुप्त Fri, 04/21/2017 - 11:00 नवीन
'जे आहे' त्याचा बोध होणे 'जे नाही' तेही 'आहे' असे वाटणे नाना तर्‍हेच्या कल्पना करणे, समजुती बाळगणे जागरूकता हरपणे, निद्रावस्थेत स्वप्न 'बघणे' 'देहभान' हरपणे, देहाच्या रक्षणासाठी झटणे लाखो वर्षांत हळू हळू उत्क्रांत होत गेलेल्या मानवी चेतनेची स्मृति, या देहाच्या जन्मापासून घडलेल्या प्रत्येक घटनेची स्मृति, भविष्याचा वेध घेणे इच्छा-आकांक्षा, विचार, भावना, क्रोध, मोह, हव्यास, अहंकार, मत्सर, आळस, वैफल्य, निराशा प्रेम, करूणा, आनंद, उत्साह, मैत्री, समाधान, संतोष, भक्ति, निश्चयीपणा....
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/21/2017 - 14:36 नवीन
संजय क्षीरसागर,
मुळात जाणीव एकच आहे तिचं कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ शकत नाही बोध सिद्धत्वाकडे नेतो. पण वस्तुस्थिती कायम राहाते ती म्हणजे जाणीव आकाशासारखी अविभाज्य आहे. तस्मात शारीरिक जाणीव, कालाची जाणीव, बायकोची जाणीव, कुत्रं भुंकल्याची जाणीव... हे मेंदूनं जाणीवेचं केलेलं डिकोडींग आहे.
मांडुक्योपानिषदात जाणीवेचं त्रिभाजन कसं प्रत्ययास येतं त्याविषयी श्लोक आहेत. अगदी छोटं म्हणजे अवघ्या १२ श्लोकांचं उपनिषद आहे. जमल्यास वाचा म्हणून सुचवेन. (http://www.hinduwebsite.com/mandukya.asp) शारीरिक जाणीव, बायकोची जाणीव वगैरे एकाच मूळ जाणीवेची कालप्रवाहात पडलेली प्रतिबिंबे का समजू नयेत? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 04/22/2017 - 00:49 नवीन
शारीरिक जाणीव, बायकोची जाणीव वगैरे एकाच मूळ जाणीवेची कालप्रवाहात पडलेली प्रतिबिंबे का समजू नयेत?
ति एकाच जाणिवेची प्रतिबिंबे आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर Sat, 04/22/2017 - 11:07 नवीन
१) मांडुक्योपानिषदात जाणीवेचं त्रिभाजन कसं प्रत्ययास येतं त्याविषयी श्लोक आहेत. त्याला उपनिषदाची गरज नाही. तो स्टँड असा आहे : समोर एक स्त्री आल्याची जाणीव झाली, मग मेंदूनं ती डिकोड केली आणि तुम्हाला कळलं `अरे, ही तर आपली पत्नी ! यात ट्रायो असा आहे : तुम्ही ज्ञाते, पत्नी हे ज्ञात आणि दोहोतला संबंध (नातं) हे ज्ञान. पण हा शरीरबद्ध जाणीवेमुळे झालेला भ्रम आहे. कारण कुणाला ती स्वतःची मुलगी वाटेल (तुमचे सासू-सासरे), कुणाला बहिण (तिचा भाऊ), तर कुणाला फक्त स्त्री (त्रयस्थ). व्यावहारिक दृष्ट्या हे डिकोडींग आवश्यक आहे पण अध्यात्मिक दृष्ट्या ते अविभाज्य जाणीवेचा थांग लागू देत नाही. थोडक्यात, हे जाणीवेचं विभाजन नाही तर ते शरीरबद्ध जाणीवेतून झालेलं डिकोडींग आहे. म्हणून मी वर म्हटल्याप्रमाणे : मुळात जाणीव एकच आहे तिचं कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ शकत नाही २) पुढे तुम्ही म्हटलंय : शारीरिक जाणीव, बायकोची जाणीव वगैरे एकाच मूळ जाणीवेची कालप्रवाहात पडलेली प्रतिबिंबे का समजू नयेत? आरश्यात प्रतिबींब पडायला कालाची गरज नाही. आरसा आणि व्यक्ति समोर असले की झालं! ३) अरांना मधे पडायला हरकत नाही पण मग निरुत्तर झाल्यावर ते माफीनामा सादर करतात. त्यांनी आपला गैरसमज पुन्हा उघड केला आहे : ति एकाच जाणिवेची प्रतिबिंबे आहेतच. जाणीवेत प्रतिबींब पडेल पण जाणीवेचं प्रतिबींब पडणं असंभव आहे. थोडक्यात, आरश्यात प्रतिबींब पडेल पण आरश्याचं आरश्यात प्रतिबींब पडणं अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे Tue, 04/25/2017 - 07:57 नवीन
जाणीव म्हणजे काय तर येणाऱ्या संदेशांचे पृथक्करण.पण मेंदू असे पृथक्करण करण्याकडे दुर्लक्ष करेल तर जाणीव हि राहणारच नाही. उदा मेंदूच्या काही भागांना इजा झाली तर त्यांच्या कडे शरीराच्या दुसऱ्या भागाकडून(कॉन्ट्र लॅटरल) येणाऱ्या संदेशांकडे तो मेंदू दुर्लक्ष करतो. म्हणजे शरीराला जाणीव होते आणि ती मेंदूकडे पोहोचते सुद्धा पण मेंदू त्याचे काहीच करीत नाही. पहा https://en.wikipedia.org/wiki/Hemispatial_neglect
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Tue, 04/25/2017 - 08:00 नवीन
हे पण पहा https://en.wikipedia.org/wiki/Monothematic_delusion
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 04/25/2017 - 08:03 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Philosophy_of_mind
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव Tue, 04/25/2017 - 22:17 नवीन
मेंदुने डिकोडींग वगैरे केल्यावर 'आपल्या'पर्यंत'बोध' आपोआप पोचतो. तिथे काहि यंत्रणा वगैरे लागत नाहि. नर्व्हससिस्टीमचं ते काम नाहि. कारण डिकिडींग मेंदुत आणि 'बोध' मेंदु बाहेरच्या 'आपल्याला'. त्याला जाणिव वगैरे म्हटलं कि झालं. सगळं कसं अ‍ॅबस्ट्रॅक्ट व्हायला हवं. आता हसा जोरजोरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर Wed, 04/26/2017 - 07:32 नवीन
१) मेंदुने डिकोडींग वगैरे केल्यावर 'आपल्या'पर्यंत'बोध' आपोआप पोचतो. तिथे काहि यंत्रणा वगैरे लागत नाहि. नर्व्हससिस्टीमचं ते काम नाहि. कारण डिकिडींग मेंदुत आणि 'बोध' मेंदु बाहेरच्या 'आपल्याला'. त्याला जाणिव वगैरे म्हटलं कि झालं. सगळं कसं अ‍ॅबस्ट्रॅक्ट व्हायला हवं. मेंदूनं भूक लागल्याची जाणीव दिल्यानंतर तुम्ही काय कुणाला फोनबिन लावता का ? मेंदूनं `पत्नी' असा संदेश दिल्यावर तुम्ही गुगल सर्च मारता का ? तुमचा मेंदू आणि नर्वस सिस्टम वेगवेगळी आहेत का ? नर्वस सिस्टमची तुमची कल्पना काय आहे ? मेंदू तुम्ही नर्वस सिस्टमचाच भाग मानत नाही का ? तुमच्या माहितीसाठी ही नर्वस सिस्टमची व्याख्या : The nervous system consists of the brain, spinal cord, sensory organs, and all of the nerves that connect these organs with the rest of the body. Together, these organs are responsible for the control of the body and communication among its parts. २) आपण कायम विदेह आहोत पण तुम्हाला मनापलिकडे जगच माहिती नाही. तुमची तर इतकी हद्द आहे की `आपण' (किंवा स्व) ही तुम्हाला मनाचीच कल्पना वाटते ! स्वचा शोधच तर अध्यात्म आहे. पण तुमच्या धारणांचा चक्का इतका जाम आहे की उलगडा असंभव ! `मानतल्या मनात' मधे तुम्ही जे काय हृदगत खोललंय ते तुमच्या सर्व सायकॉलॉजिकल आणि अध्यात्मिक आकलनाचं सार आहे. तिथे तुम्ही `मन शट डाऊन करणं' वगैरेचा उपरोध करुन मला इनवाइट केलंत आणि तो गुंता सोडवता न आल्यानं आता इथेतिथे सरकास्टिक कमेंटस करतायं ! यू आर ट्राइंग इंपॉसिबल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 04/26/2017 - 08:48 नवीन
तुम्ही म्हणताय ना कि मेंदु केवळ डिकोडींग करतो आणि 'आपल्याला' बोध होतो म्हणुन... मग हा 'बोध' 'आपल्या'पर्यंत पोचतो कसा याचा शोध नको घ्यायला ? नर्व्हससिस्टीमचं जाळं तर शरीररभर पसरलय आणि त्याचं काम मेंदु ते उर्वरीत शरीर यांच्या निरोपांची देवाण-घेवाण करणं एव्हढीच मर्यादीत आहे. मग मेंदुपासुन पुढे 'आपल्या'पर्यंत बोध पोचवायला काय मेकॅनीझम आहे हे नको बघायला ? शरीरशास्त्रात तर या नवीन सिस्टीमचा काहि उल्लेख नाहि. मग 'ते एक रहस्य आहे. ते आपोआप होतं' असाच समज करुन घेतला मी. मला वाटलं तुम्ही काहि लॉजीकल एक्स्प्लेशन द्याल या नवीन यंत्रणेबद्दल...
आपण कायम विदेह आहोत पण तुम्हाला मनापलिकडे जगच माहिती नाही. तुमची तर इतकी हद्द आहे की `आपण' (किंवा स्व) ही तुम्हाला मनाचीच कल्पना वाटते !
तुमचं 'आपल्या'संबंधी सर्व विवेचन मनाशीच येऊन संपतं त्याला मी तरी काय करणार. मानवी प्रॉब्लेम्सला तुम्ही अध्यात्माच्या नावाने जे उतारे सुचवता ते सर्व मानसशास्त्रात मोडतं.
`मानतल्या मनात' मधे तुम्ही जे काय हृदगत खोललंय ते तुमच्या सर्व सायकॉलॉजिकल आणि अध्यात्मिक आकलनाचं सार आहे. तिथे तुम्ही `मन शट डाऊन करणं' वगैरेचा उपरोध करुन मला इनवाइट केलंत आणि तो गुंता सोडवता न आल्यानं आता इथेतिथे सरकास्टिक कमेंटस करतायं ! यू आर ट्राइंग इंपॉसिबल.
तुम्ही आध्यात्माबद्दल जे काहि टंकता ते मला सर्व मान्य आहे... फक्त एक मतभेद आहे. तुम्ही सांगता ते अध्यात्म नसुन सायकोलॉजी आहे, हा तो मतभेद. आणि तेच मी माझ्या प्रतिसादांत मांडत असतो. माझी प्रमेये सांगतो. १) एक मूळतत्व, त्याला जाणीव म्हणा, आत्मा म्हणा, 'स्व' म्हणा... नाव काहिही द्या. त्या तत्वापासुनच सर्व चराचर व्याप्त आहे. शरीर, मन, बुद्धी, जाणीव, ऊर्जेची सर्व रुपं, ऊर्जेची सर्व रुपांतरणं, ज्ञात-अज्ञात सर्व काहि... हे त्या एकाच मूळ तत्वाची रुपं आहेत. त्या तत्वाची अनुभूती म्हणजे अध्यात्म. या अनुभूतीत सर्व एकाकार होतं. तिथे शरीर, मन, बुद्धी, जीव, जगत असा काहि भेदच उरत नाहि. म्हणजेच 'आपण' आणि 'मन' असा भेद उरायचा स्कोपच नाहि. २) मेंदुचे इंप्लीसीट आणि एक्स्प्लीसीट असे दोन मोड ऑफ ऑपरण्डीज आहेत. या मोड ऑफ ऑपरण्डीजच्या अनुषंगाने मानवी विचार, भावना, वर्तन यांचा अभ्यास म्हणजे सायकोलॉजी. हे दोन्ही मोड्स मनाच्या बाहेर एक्झीक्युट व्हायचा स्कोप नाहि. ३) अध्यात्मात मन आणि आपण भिन्न असण्यची शक्यता उरत नाहि. साकोलॉजीत मनाबाहेर 'आपण' अशी शक्यता उरत नाहि. जोपर्यंत 'मनाला कह्यात ठेवणारे, शरीराचा बोध घेणारे, स्वच्छंद, मन घंटा काहि बिघडवु न शकणारे आपण' हा कन्सेप्ट उरतो तोपर्यंत ते आध्यात्म नसुन सायकोलॉजी बनतं. मग तुम्ही कितीही म्हणा कि 'आपण' स्थिती आहोत, निराकार आहोत, कालजयी आहोत... ति केवळ थेअरी म्हणुन उरते. असो. तुम्हाला खिजवायला म्हणुन मी हे उपद्व्याप केले असं वाटत असेल तर ते मनातुन काढुन टाका. खिजवणं हाच उद्देश असता तर मी तसं स्पष्ट सांगितलं असतं. तुम्हाला कधि काहि त्रास होत नाहि हे ठाऊक आहे. पण तरिही माझ्या प्रतिसादांमुळे तुम्ही जरा देखील दुखावले गेले असाल तर त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. आय अ‍ॅम सॉरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव Tue, 04/25/2017 - 18:01 नवीन
देहाचा/मेंदुचा 'अनुभव' घेणारे 'आपण' ठरवतो मेंदुच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर Tue, 04/25/2017 - 20:40 नवीन
१) जाणीव म्हणजे काय तर येणाऱ्या संदेशांचे पृथक्करण.पण मेंदू असे पृथक्करण करण्याकडे दुर्लक्ष करेल तर जाणीव हि राहणारच नाही. उदा मेंदूच्या काही भागांना इजा झाली तर त्यांच्या कडे शरीराच्या दुसऱ्या भागाकडून(कॉन्ट्र लॅटरल) येणाऱ्या संदेशांकडे तो मेंदू दुर्लक्ष करतो. म्हणजे शरीराला जाणीव होते आणि ती मेंदूकडे पोहोचते सुद्धा पण मेंदू त्याचे काहीच करीत नाही. मेंदू हा प्रोसेसर आहे. त्यानं प्रोसेस केल्याशिवाय कोणताही स्टिम्युलस डिकोड होणार नाही. आणि तो डिकोड झाल्याशिवाय आपल्याला वस्तुस्थितीचा बोध होणार नाही. उदा. एक व्यक्ती समोर आली आणि मेंदूतली स्मृती तो सिग्नल व्यवस्थित प्रोसेस करु शकली नाही (व्यक्तीची चेहेरा ओळख आणि नांव) तर ती व्यक्ती आपली पत्नी असेल तरी आपल्या लक्षात येणार नाही ! त्यामुळे जाणीव म्हणजे येणाऱ्या संदेशांचे पृथक्करण नाही, तर त्या पृथक्करणानंतर आपल्याला होणारा बोध ! याचा अर्थ मेंदू डिसफंक्शनल झाला तर योग्य बोध होणार नाही. पण बोध मेंदूत होत नाही, फक्त प्रोसेसिंग होतं आणि बोध आपल्याला होतो. त्याला जाणीव म्हटलंय. २) अरांनी सरकॅस्टीक कमेंट मारुन पुन्हा स्वतःचच हसू करुन घेतलं आहे : देहाचा/मेंदुचा 'अनुभव' घेणारे 'आपण' ठरवतो मेंदुच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते. मेंदूनं कसं प्रोसेस करायचं ते आपण ठरवू शकत नाही. ती बायॉलॉजी आहे. तसं असतं तर अल्झायमर झालाच नसता. तद्वत, अन्न काय खायचं ते आपण ठरवू शकतो पण कसं पचवायचं ते शरीर ठरवतं. त्यामुळे अध्यात्म मेंदूच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते ठरवत नाही तर मेंदूला नक्की काय प्रोसेस करायला द्यायचं आणि मिळालेल्या संदेशाचा काय अर्थ काढायचा याचं शास्त्र आहे. अध्यात्म कोणत्याही विज्ञानाच्या विरोधात नाही तर ती उपलब्ध विज्ञानाच्या आधारे (मग ते शरीरशास्त्र असो, फिजिक्स असो, सध्या उपलब्ध असलेल्या डिजिटल किंवा प्रिंट मधलं लेखन असो, योग शास्त्र असो की प्राणायाम......) स्वतःप्रत येण्याची प्रक्रिया आहे. डॉक्टर एक रिक्वेस्टे, मी दुवे देतही नाही आणि वाचत नाही. तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव इथे सरळ मांडला तर प्रतिसाद देणं सुलभ होईल. तुमच्या सचोटीबद्दल खात्री आहे त्यामुळे लिंकची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 04/26/2017 - 07:14 नवीन
हा "आपण" म्हणजे नक्की कोण? आणि तो मेंदूपासून वेगळा कसा काढणार? जीवशास्त्र खूप तोकडं आहे हे मान्य. पण अध्यात्म "ज्ञानाच्या शिखरावर" पोहोचले आहे हे तरी कसं मान्य करायचं? म्हणजे अध्यात्मिक लोक तास आव आणताना सर्वत्र दिसतात म्हणून म्हटले आहे. अध्यात्म मेंदूच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते ठरवत नाही तर मेंदूला नक्की काय प्रोसेस करायला द्यायचं आणि मिळालेल्या संदेशाचा काय अर्थ काढायचा याचं शास्त्र आहे. हे गृहीतक आहे आणि याला पुरावा काहीच देता येत नाही. ते 'आम्ही म्हणतो म्हणून" असं कसं मान्य करायचं? अध्यात्म हे सर्व शास्त्रांच्या "वरचं" आहे असा एक अहंभाव घेऊन असतं आणि याचा प्रतिवाद करणे कठीण असतं. बऱ्याच वेळेस भौतिक शास्त्र जाणणारे अध्यात्मिक किंवा पारलौकिक शास्त्राशी वाद नको म्हणून गप्प बसतात म्हणजे मुद्दा मान्य झाला असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 04/26/2017 - 11:08 नवीन
१) हा "आपण" म्हणजे नक्की कोण? तुम्ही आहात याबद्दल तुम्हाला संशय आहे का ? २) आणि तो मेंदूपासून वेगळा कसा काढणार? मेंदूला जाणणारा मेंदूपेक्षा वेगळा नाही का ? ३) पण अध्यात्म "ज्ञानाच्या शिखरावर" पोहोचले आहे हे तरी कसं मान्य करायचं? म्हणजे अध्यात्मिक लोक तास आव आणताना सर्वत्र दिसतात म्हणून म्हटले आहे. अध्यात्म करुनच त्याची शहानिशा होऊ शकते. सो, ते जाऊं द्या. ४) अध्यात्म मेंदूच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते ठरवत नाही तर मेंदूला नक्की काय प्रोसेस करायला द्यायचं आणि मिळालेल्या संदेशाचा काय अर्थ काढायचा याचं शास्त्र आहे. हे गृहीतक आहे आणि याला पुरावा काहीच देता येत नाही. ते 'आम्ही म्हणतो म्हणून" असं कसं मान्य करायचं? अध्यात्मिक वाटेवर जायचं नाही हे तुम्ही ठरवलंय की आणखी कुणी ? एखाद्या सदस्याचं लेखन किंवा प्रतिसाद वाचायचे किंवा नाही हे कोण ठरवतं? ५) अध्यात्म हे सर्व शास्त्रांच्या "वरचं" आहे असा एक अहंभाव घेऊन असतं आणि याचा प्रतिवाद करणे कठीण असतं. जर प्रतिवाद लॉजिकल असेल तर अहंकार त्यापुढे टिकणार नाही. कारण नुसतं `मी ग्रेट' म्हणून कोण ऐकून घेईल ? ते निर्विवाद सिद्ध झालं पाहिजे. ६) बऱ्याच वेळेस भौतिक शास्त्र जाणणारे अध्यात्मिक किंवा पारलौकिक शास्त्राशी वाद नको म्हणून गप्प बसतात म्हणजे मुद्दा मान्य झाला असे नाही. इथे जगभरातले आपापल्या क्षेत्रातले माहिर लोक सदस्य आहेत. उगीच वाद नको म्हणून माघार घेतली का प्रतिवाद होऊ शकत नाही म्हणून विषय संपला याची शहानिशा लेखी, तारीख-वार आणि इतरांच्या उपस्थितीत होते. अजून काय हवं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
उ
उदय Fri, 04/21/2017 - 21:22 नवीन
नोबेलविजेते रॉजर पेनरोज रॉजर पेनरोज यांना नोबेल पुरस्कार अजून मिळालेला नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Fri, 04/21/2017 - 23:05 नवीन
गणित ही सुद्धा मानवानं स्वतःच्या सोयीसाठी केलेली संकल्पनाच आहे बावा! क्या बावा सहि समय पे मिलते तो बहुत तकलिफ से छुटकारा मिल जाता ना. टिचर को ये आपका संकल्पना वाला मुहावरा मुह पे मारते थे ना बावा, वैसे भि साला ये Hyperbola, Parabola, २D, 3D ने भोत दिमाख हटायले था. बाकि आपका enlightenment सर आंखो पर. सब माया है
  • Log in or register to post comments
प
पुंबा Sat, 04/22/2017 - 05:04 नवीन
हे मिथ्या काय भानगड असते म्हणे? काळ मिथ्या, मन मिथ्या, आणखी काय मिथ्या. हे मिथ्या असतं म्हणजे माणसाच्या मनावर(अरेच्चा! हे मिथ्याय नै का!) असतं की काय सिद्ध बिद्ध करता येतं??
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 04/22/2017 - 07:05 नवीन
असल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची म्हटले तर एक तर माणूस सर्वज्ञ असला पाहिजे किंवा अतिमंद. आमच्या सारख्या अधल्या मधल्यांचे काम नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 04/22/2017 - 22:36 नवीन
संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
थोडक्यात, हे जाणीवेचं विभाजन नाही तर ते शरीरबद्ध जाणीवेतून झालेलं डिकोडींग आहे.
तुम्ही ज्याला डीकोडिंग म्हणता त्याचा पूर्वस्मृतींशी घनिष्ट संबंध आहे. पूर्वस्मृती म्हंटल्या की त्यांना काळाची चौकट असायला हवीच. तुम्ही म्हणता तसा काळ अस्तित्वात नसेल, तर स्मृती कुठून उत्पन्न होतात? २.
त्याला उपनिषदाची गरज नाही. तो स्टँड असा आहे : समोर एक स्त्री आल्याची जाणीव झाली, ......
हा पवित्रा (=स्टँड) कुठला ते कळलं नाही. जाणीवेच्या विभाजनाचा का? ३.
आरश्यात प्रतिबींब पडायला कालाची गरज नाही. आरसा आणि व्यक्ति समोर असले की झालं!
काळ हाच मुळी आरसा आहे. शुद्ध अस्तित्व हे बिंब आहे. विभाजित जाणीवा ही असंख्य प्रतिबिंबे आहेत. ४.
मुळात जाणीव एकच आहे तिचं कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ शकत नाही बोध सिद्धत्वाकडे नेतो. पण वस्तुस्थिती कायम राहाते ती म्हणजे जाणीव आकाशासारखी अविभाज्य आहे.
दुसऱ्या वाक्याशी सहमत. मात्र पहिल्याशी अंशत: सहमत. जाणीव जरी एकंच असली तरी तिचं वैदिक सूत्रानुसार त्रिभाजन होतं. म्हणून अंशत: सहमत. सांगायचा मुद्दा असा की आकाश जरी एकंच असलं तरी घटाकाश आणि मठाकाश वेगवेगळे आहेत. घट फोडून टाकल्यावर मगंच घटाकाश आणि मठाकाश दोन्ही एक होतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा