Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन(mind)म्हणजे काय!!!!मनाची तुमची व्याख्या काय आहे???

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Wed, 04/19/2017 - 11:37
🗣 118 प्रतिसाद
मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे. सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे. Hard problem of consciousness.-- ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली. काय आहे हार्ड प्रॉब्लेम? एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात. mind डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही. याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level). इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे. व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे. बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल. १.मनाची तुमची व्याख्या काय आहे? २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय? ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?

प्रतिक्रिया द्या
43781 वाचन

💬 प्रतिसाद (118)
स
स्पा Sun, 04/23/2017 - 09:31 नवीन
साला काय मानसिक मैथुन सुरुये
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 04/23/2017 - 09:43 नवीन
स्पा, जबरदस्त दृष्टांत आहे. फक्त दिशा बदलली पाहिजे. म्हणजे मला म्हणायचंय की #व#वाटास शारीरिक चर्चा म्हणायला हवं. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/23/2017 - 15:52 नवीन
आला गं.. बाई आला गं , बाई आला गं .... आला... आला... आला.. आ Sssss ला! सरांचा लाडका आला.. पांडु बघा.. सरांचा लाडका .. आ.. . ला. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ब
बोलघेवडा Sun, 04/23/2017 - 16:17 नवीन
सर्वप्रथम टफी यांचे अश्या विषयावर धागा काढल्याबद्दल अभिनंदन!! संक्षी साहेब आणि गामा पैलवान यांच्या जुगलबंदीला सलाम. तुम्ही दोघेही या विषयात पोचलेले आहात. विशेष करून संक्षी साहेब ज्या आत्मविश्वास पूर्वक अगदी कमीतकमी शब्दात जे थेट उत्तर देतात त्याला तोड नाही. तुम्ही दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर आहात असे माझे मत आहे. गामाजींचा अप्रोच फिजिक्स च्या दृष्टिकोनातून बरोबर आहे तर संक्षींचा अध्यात्मातून. संपूर्ण विचार करता संक्षींचा अँप्रोच जास्त खोल आहे. कारण फिजिक्स एखादी गोष्ट आहे किंवा नाही आणि त्याच कार्यकारण भाव यावर भाष्य करते. पण अध्यात्म/ किंवा सूक्ष्म शास्त्र त्यापलीकडे जाऊन जाणिवेतून एखादी गोष्टीस सांगू शकते ते फिजिक्स नाही सांगू शकत.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 04/24/2017 - 10:00 नवीन
हा धागा अनेक कारणांनी संस्मरणीय झाला आहे ! १) टफींचा धागा म्हटल्यावर सदस्यांनी येळकोटाला सुरुवात केली. मला कंटेंट योग्य वाटला, मी धागा उचलून धरला आणि प्रतिसाद दिला. मग इतरांनाही ती जाणीव झाली. आणि अनुषंगिक प्रतिसाद यायला लागले. २) निरुत्तर झालेल्यानी ( इथल्या शिरस्त्याप्रमाणे ) विडंबन पाडलं. मला त्यात काही नवं नाही कारण इथे कोण कितपत विचार करु शकतो याचा मला पुरता अंदाज आहे. पण यावेळी दोन नव्या घटना घडल्या. एकतर जवाबदार सदस्यांनी हात धुवून घ्यायला सुरुवात केली आणि दुसरं म्हणजे इतर सदस्यांनी निषेध नोंदवला (हे विषेश) ! त्यांचं म्हणणं होतं की वाद समोरासमोर व्ह्यायला हवा. तरीही धागा चार दिवस राहीला. म्हणजे जे डॅमेज व्ह्यायचं ते होऊन गेलं. ३) मग मी प्रत्त्युत्तरादाखल विडंबन टाकलं. सदस्यांच्या निषेधामुळे की माझ्या विडंबनामुळे याची कल्पना नाही, तो धागा डिलीट झाला. हे माझ्याबाबतीत मिपाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं ! कारण असे कित्येक विडंबनाचे धागे अजून जसेच्या तसे आहेत. यात नवल असं की माझ्याविरुद्ध कुणीही काहीही ठोकलं तरी चालतं पण माझ्याबाजूनं (उत्तरादाखल जरी) कमीजास्त लिहीलं गेलं, की पार ब्लॉक करण्यापर्यंत गोष्ट जाते . मी पूर्वी रितसर तक्रार करायचो पण नंतर तो नाद सोडला. ४) हे सगळं लिहायचं कारण म्हणजे टफी काय की मी काय की इतर कुणी काय, सदस्यांनी कंटेंट पाहावा. झेपत असेल तर प्रतिसाद द्यावा आणि स्वतःकडे काही विधायक नसेल तर निदान विघ्न तरी न आणण्याची मॅच्युरिटी दाखवावी. इथे चांगल्या आणि सुसंगत चर्चा होऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Sun, 04/23/2017 - 19:36 नवीन
चर्चा उत्तम चालू आहे पण विषयापासून थोडी ढळली आहे असे नमुद करु ईच्छितो.मला वास्तविक hard problem of consciousness वर चर्चा अपेक्षीत होती.असो उपरोक्त चर्चाही चांगलीच आहे.पण मुळ विषयाकडे आल्यास आवडेल
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sun, 04/23/2017 - 23:44 नवीन
मी हा एक लेख लिहिला होता. तो एका लेखाचे भाषांतर आहे. बघा आवडतो का ते... http://www.misalpav.com/node/13118 १० भाग आहेत. हा १०व्या भागाची लिंक आहे. त्यावर इतर भागांच्या लिंक्स आहेत.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
स
संजय क्षीरसागर Mon, 04/24/2017 - 06:40 नवीन
३. हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? यात प्रॉब्लम काय आहे ? अ) निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही. तो अनुभव आपण घेतो ! त्यात ज्ञात नसण्यासारखं काय आहे ? ब) देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे. देहाला अनुभव येण्यासाठी त्यात अनुभवणारा (म्हणजे आपण) हजर पाहिजे. समजा आकाशाकडे पाहतांना व्यक्ती गतप्राण झाली तर डोळे उघडे असतील, आकाश समोर असेल पण अनुभव येणार नाही. तस्मात, देहाला अनुभव येत नाही तर देहाच्या माध्यमातून आपल्याला अनुभव येतो. २. शिवाय तुमच्या बॉडी-माइंडचा इशू पण सोडवला आहे : ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय? हा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. अ) देकार्तचं मूळ विधान `I think, therefore I am संपूर्णतः चुकीचं आहे. ते गाडी मागे घोडा जोडण्यासारखं आहे . वस्तुस्थितीशी सुसंगत विधान I am therefore I think असं हवं कारण आपण प्रथम आणि विचार नंतर आहे. आपण आहोत म्हणून विचार करु शकतो. विचार करु शकतो म्हणून आपण नाही. ब) बॉडी-माइंड असा सुद्धा प्रश्न कुठे आहे ? शरीर चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर हवं ते मेंदूत आहे. तस्मात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकावेळी चालू असेल तरच सिस्टम काम करेल. तद्वत, मेंदूचा ऐच्छिक भाग योग्यप्रकारे काम करत असेल तर ऐच्छिक क्रिया (चालणं, बोलणं, लिहीणं, आठवणं वगैरे) योग्य होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
स
सचु कुळकर्णी Sun, 04/23/2017 - 20:05 नवीन
विशुमीत साहेब स्वारी बर्रका "hard problem of constipation" वाचल्या गेल होत. विषय क्लिष्ट आहे पन तुम्हि कुठल्या आय डि णे रीप्लाय करता त्यावर डिपेंड आहे. मांजरीचे जंत बरे झाले का ?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 04/24/2017 - 17:42 नवीन
१) (कदाचित ह्याचा पश्चाताप होऊही शकतो..) जोपर्यंत तुम्ही (स्वतःच्या धारणांना किंवा तुमच्या रोल मॉडेल्सना धक्का बसल्यानं), फ्रस्ट्रेट होऊन ते माझ्यावर काढण्यासाठी, काहीबाही आणि बालीश लिहीत नाही (उदा. संक्षी सर्वज्ञ आहेत किंवा अहंकार वगैरे), तोपर्यंत काळजीचं काहीच कारण नाही. निर्धास्त राहा! आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर : १) ह्या चर्चेत काळ = टाईम (साधारणतः फिजिक्स मध्ये वापरला जाणारा पॅरॅमीटर) असे मानले, तर खरंच अन्नाचे पचन ह्या प्रक्रियेमध्ये काळ हा घटक कुठे आहे? म्हणजे ह्या प्रक्रियेचं काही समीकरण बनवलं तर त्यात "काळ" हा घटक येईल का? किंवा दुसर्‍या शब्दात, अन्नाचे पचन ही प्रक्रिया "टाईम डिपेंडंट" आहे का? मूळात काल (ज्याला व्यावहारात वेळ म्हणतात) असं अस्तित्वात काहीही नाही. काल ही प्रक्रिया मोजण्याची, मानव निर्मित कल्पना आहे. अर्थात, कल्पना ज्याम उपयोगी आहे पण ती वास्तविकात कुठेही नाही. तस्मात, अन्नपचनासाठी (किंवा कोणत्याही प्रक्रियेसाठी) कालाची आवश्यकताच नाही. कल्पना उपयोगी अश्या दृष्टीनं आहे की अन्न पचायला नक्की किती वेळ लागतो हे ठरवायचं असेल तर तिचा उपयोग जरूर आहे. पण खुद्द पचनासाठी काल हा घटक निरर्थक आहे. विज्ञान कायम प्रक्रियेत इंटरेस्टेड आहे ( हाऊ ?) त्यामुळे सर्वच्या सर्व वैज्ञानिकांचा (पार आइन्स्टाईन, न्यूटन ते स्टीफन हॉकींग्ज) एक गैरसमज आहे की प्रक्रिया कालाधारित आहे. वैज्ञानिक कालाशिवाय कामच करु शकत नाहीत कारण त्यांचा फोकस प्रक्रिया कशी घडते हे शोधण्यावर आहे. त्यामुळे वैज्ञानिक असं धरुनच चालतात की काल हा रुपांतरणासाठी आवश्यक घटक आहे. वास्तविकात मात्र तसं काहीही नाही. आणि संक्षी.. ज्या प्रक्रिया टाईम डिपेंडंट असतात त्यांचे काय? तुम्ही अनाचे पचन हे असे उदाहरण घेतले आहे ज्यात कदाचित वेळ महत्वाची नाहीये, पण जगात इतर अनेक गोष्टी आहेत ज्यात "वेळ" हा घटक प्रक्रियेला बदलु शकतो. (ह्या प्रक्रियांसाठी एक गणिती समीकरण बनवले तर त्यात काळ हा पॅरेमीटर असेल) प्रक्रियेची लय परिणामात बदल घडवेल पण तो त्या लयीचा अंगभूत गुणधर्म असेल त्याचा कालाशी वरकरणी संबंध जोडता येईल पण त्यामुळे कालाची वास्तविकता सिद्ध होत नाही. उदा. सावकाश चालणं आणि धावणं या दोन प्रक्रियात शरीरात वेगवेगळे बदल होतील पण तो प्रक्रियेच्या लयीचा परिणाम आहे, कालाचा नाही. किंवा धावणारा थांबला तर त्याच्या श्वासात फरक पडतो पण तो प्रक्रिया बदलामुळे आहे, वेळेमुळे नाही. ३) तुम्ही दोघं ह्याच अर्थाने "काळ" हा शब्द वापरत आहात ना? की तुम्हाला काही वेगळे अभिप्रेत आहे? काल नाही हे मला माहिती आहे त्यामुळे काल म्हणा की वेळ माझ्या दृष्टीनं दोन्हीही अस्तित्वात नाहीत. अरांना वाटतंय ( युनिवर्सल वैज्ञानिक गैरसमज) की काल का प्रक्रियेतच दडलेला आहे किंबहुना कालाशिवाय प्रक्रियाच असंभव आहे, तस्मात काल आणि प्रक्रिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि वेळ म्हणजे प्रक्रियेसाठी लागलेला कालावधी ! पण मी ऑलरेडी म्हटल्याप्रमाणे काल आशी गोष्टच या अस्तित्वात नाही त्यामुळे रुपांतरणासाठी अवकाशाची गरज आहे कालाची नाही. अस्तित्वातली सगळीच्या सगळी रुपांतरणं अवकाशात घडत राहातील त्यांचा कालाशी काहीही संबंध नाही कारण तशी काही चिज़च अस्तित्वात नाही.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 04/24/2017 - 17:55 नवीन
म्हणजे खुद्द आईन्स्टाईन बुवांनाच वेठीला धरलंय जे चूक आहे.
त्यामुळे सर्वच्या सर्व वैज्ञानिकांचा (पार आइन्स्टाईन, न्यूटन ते स्टीफन हॉकींग्ज)
वास्तविक आईन्स्टाईन हा पहिलाच शास्त्रज्ञ ज्याने काल हा भास आहे हे सिद्ध केलं! काल अस्तित्त्वात नाही हाच तर त्याच्या थिअरी ऑफ रिलेटिविटीचा पाया आहे. (रिलेटिव्)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 04/24/2017 - 22:24 नवीन
अशी आहे : In 1905, Albert Einstein determined that the laws of physics are the same for all non-accelerating observers, and that the speed of light in a vacuum was independent of the motion of all observers आणि त्याचा कोअर पार्ट हा आहे : As a result, he found that space and time were interwoven into a single continuum known as space-time. Events that occur at the same time for one observer could occur at different times for another. थोडक्यात, स्पेशिओ -टाईम ही आईन्स्टाईनची संकल्पना आहे (म्हणजे काल आणि अवकाश एकच आहेत) आणि ती ऑब्झर्वर रिलेटेड कन्क्लूजन्सला येते. तस्मात, आईन्सटाईन टाईम डिनाय करत नाही. त्या थोर शास्त्रज्ञांपुढे माझा काहीच पाडाव नाही. पण एकूण मुद्दा वेगळाच आहे. माझं फक्त एकच म्हणणं आहे की ज्या प्रमाणे पुजारी देव नाकारुच शकत नाही, तद्वत प्रत्येक वैज्ञानिक काल आहे हे धरुनच चालतो. आणि वास्तविकात मात्र काल नाही. फक्त अवकाश आहे आणि प्रक्रिया आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मराठी_माणूस Tue, 04/25/2017 - 06:55 नवीन
समजा आपण एखादे ताल वाद्य ऐकत आहोत , त्यात होणारे लयीतले बदल हे फक्त काला मुळेच अनुभवले जाते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 04/25/2017 - 08:24 नवीन
आपण धावतोयं (द्रुत लय ) आणि आपल्याला ते जलद चालण्यात बदलायचंय (मध्य लय) तर वेळेचा फॅक्टर कुठे येतो ? तद्वत, वादक लय बदलतो आणि तत्क्षणी आपल्याला बदल जाणवतो. सम उशीरा किंवा लवकर येईल पण त्यानं काय फरक पडतो ? सरते शेवटी ती याच क्षणात येईल ! आणि तेव्हाच ऐकू येईल. तुम्हाला असं नाही पण इतर सदस्यांना नम्र निवेदन : कालाचं नि:सरण होणं हे अध्यात्मातलं फार मोठं परिमाण मानलं जातं. ज्यानं काल संपवला तो मनापासून मुक्त झाला. तस्मात, ही चर्चा केवळ मी जिंकण्यासाठी लढवत नाहीये. ज्याला काल नाही हा बोध होईल आणि तदनुसार जो जगायला लागेल, त्याच्या मनावरचं कालाचं ओझं पूर्णपणे दूर होईल. त्याची सृजनात्मकता कमालीची वाढेल. जीवनात एक निवांतपणा येईल. याविषयी माझे विचार पाच वर्षापूर्वी काल या लेखात मांडले आहेत. काल ही उपयोगिता आहे पण वास्तविकता नाही हे ऑलरेडी सांगून झालंय. काही सदस्य इतके नंदन आहेत की `तुम्ही म्हणता काल नाही मग ३० सप्टेंबरच्या आत रिटर्नस कशाला भरता?' इतके लल्लू प्रश्न विचारतात. आज पाच वर्षांनी सदस्यांना बरीच मॅच्युरिटी आलेली दिसते ( हे मला विडंबनावर आलेल्या प्रतिसादातून जाणवलं) . असल्या विडंबनांना मी भीक घालत नाही पण सगळा रंग बदलतो. चर्चा योग्य मार्गानी गेली तर उपयोग होईल. बालीशपणा केला तर मला त्याच्याशीही दोन हात करता येतात पण एका चांगल्या विषयाचा फज्जा उडेल . तस्मात, काय ते तुम्ही ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ट
ट्रेड मार्क Tue, 04/25/2017 - 17:26 नवीन
शाळेत काळ काम वेगाच्या गणितांनी त्रास दिला होता तेव्हा शिक्षकांना हे सांगायला पाहिजे होतं. अर्थात मारच खाल्ला असता म्हणा, पण संक्षींच्या कमेंट्स दाखवून काळ कसा उपयोगी आहे हे सिद्ध करा असे च्यालेंज शिक्षकांना द्यायला मजा आली असती. कृहघ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रसाद_१९८२ Tue, 04/25/2017 - 07:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
शरभ Wed, 04/26/2017 - 12:28 नवीन
सर्व प्रतिसाद काही वाचले नाहीत. क्षमस्व. पण +१ टु अर्धवटराव. काळ आणि अवकाश एकमेकापासून अलग करता येऊ शकत नाहीत. हे दोघे एकमेकाशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाहीत. हे पटायला कसल्याही अध्यात्मवादी चर्चा करायची गरज नाही. ज्याना हे पटत नाही त्यानी वेळ काढून (आणि काळ ठरवून) आपल्या घरातील कोनाड्यात (स्पेस) भौतिकशास्त्राचा अभ्यास वाढवावा. असल्या लोकाबरोबर कुठ्लाही प्रतिवाद केला जाणार नाही, त्यानी आपला आणि आमचा वेळ वाया घालवू नये. भाषा आणि शब्दांच्या सोयीसाठी पुढील प्रतिसाद विंग्रजीत... Even if space-time are bound with each other, there is a twist of consciousness playing a large part in physics. This is evolving concept that consciousness and hence mind cannot be separated from physics. The in(famous) double slit experiment has thrown all the particle physics in uncertainty for the same reason. For those interested please do watch Youtube videos (such as Dr. Quantum) on double slit experiment and especially its delayed choice modifications. And about question in the thread, Mind in my opinion, is a logical worm- hole which opens up in the universe around us. The better one master is, better is your control on the Universe. I am more of a believer of concept that instead of me being created in the Universe, the Universe been created in me. Honestly, this all cannot be described over few lines. Again, these are my thoughts and those need not be correct/accurate. - शरभ
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 04/26/2017 - 14:52 नवीन
तुमची भाषा जशी आहे त्याच टोनमधे आता प्रतिसाद दिला जाईल : १) ज्याना हे पटत नाही त्यानी वेळ काढून (आणि काळ ठरवून) आपल्या घरातील कोनाड्यात (स्पेस) भौतिकशास्त्राचा अभ्यास वाढवावा. असल्या लोकाबरोबर कुठ्लाही प्रतिवाद केला जाणार नाही, त्यानी आपला आणि आमचा वेळ वाया घालवू नये. प्रतिवादाची इतकी भीती असेल तर प्रतिसादाचा धोकाच पत्करायचा नव्हता. आता तुम्हाला कळावा म्हणून इंग्रजीत प्रतिसाद देतो. आणि आम जनतेसाठी त्याखाली मराठीत लिहीतो. २) The in(famous) double slit experiment has thrown all the particle physics in uncertainty for the same reason. For those interested please do watch Youtube videos (such as Dr. Quantum) on double slit experiment and especially its delayed choice modifications. First of all, you do not know what is consciousness. You have based all your theory on a false assumption that mind is equal to consciousness. You don't know even logic. If mind is consciousness then who will know the mental activity ? With little intelligence & simple common sense, any one can understand that : The knower has to be separate from the known. तुम्हाला जाणीव म्हणजे काय याचा पत्ताच नाही. तुमची सर्व आधांतरी विधानं मन म्हणजे जाणीव या गृहितकावर बेतली आहेत. तुमच्याकडे तर्काचा लवलेशही नाही. जर `मन म्हणजे जाणीव' असेल तर मनात काय चालललंय हे कोण जाणतो ? थोडी फार बुद्धी आणि सामान्य ज्ञान असलेला सुद्धा ज्ञात हा ज्ञेयापेक्षा भिन्न हवा इतकी उघड गोष्ट समजू शकेल. ३) Mind in my opinion, is a logical worm- hole which opens up in the universe around us. The better one master is, better is your control on the Universe. I appreciate your guts to make such an insensible statement on a public forum ! You say that if one can control the mind, one can control the universe ! Forget about the universe, can you control your urination? or even your sneeze ? भर पब्लिकमधे तद्दन विधानं करण्याच्या तुमच्या धाडसाचं कौतुक आहे. तुम्ही म्हणता की मनावर ताबा असलेला विश्वाचं नियंत्रण करु शकतो. विश्वाचं राहूं द्या, कधी स्वतः लाच लागलेली घाईची किंवा येणारी जोरकस शिंक कंट्रोल करुन काय होतंय ते पाहा, सगळ्या विश्वाची विस्मृती होईल. 4) I am more of a believer of concept that instead of me being created in the Universe, the Universe been created in me. Honestly, this all cannot be described over few lines. My God ! You seem to have gone totally cuckoo ! When did you create the universe ? If you have created it, can you destroy it & finish with any arguments ? That will be a real proof of your audacity ! तुमचे फंडाज पुरते गंडले आहेत. तुम्ही कधी विश्व निर्माण केलं? आणि मग आता प्रतिसाद देण्याऐवजी संपूर्ण विश्वाचा संहारच घडवून का टाकत नाही ? त्यानं सर्वांनाच तुमच्या या अचाट पॉवरची सिद्धता पटेल. 5) Again, these are my thoughts and those need not be correct/accurate. They are not only utterly wrong but funny. Take care that you don't expose yourself in public again. तुमची विधानं केवळ चूकच नाहीत तर अत्यंत विनोदी आहेत. आता पुन्हा पब्लिकमधे स्वतःला जास्त उघडं करु नका. _________________________________ इथून पुढे इंग्रजी प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येतील. केवळ तुम्हाला तुमच्या अज्ञानाचा बोध व्हावा म्हणून हा द्विभाषीय प्रतिसाद दिला आहे. हे मराठी संकेतस्थळ आहे आणि इथे मराठीतूनच संवाद व्हावा अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरभ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा