Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोनू निगम, अभिजित आणि ट्विटरवरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य

स
सच्चिदानंद
Wed, 05/24/2017 - 19:47
🗣 135 प्रतिसाद
तर सोनू निगम ने भलं मोठ्ठं पत्र लिहून ट्विटर सोडण्याची घोषणा केली आणि आधीच सुरु असलेल्या गोंधळात अजून नवी भर पडली. पण यातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. पार्श्वभूमी अशी की, भाजपाच्या काही लोकल नेत्यांचा एका सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या किती खर्‍या-खोट्या की नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरचे आरोप ते सिद्ध व्हायचे तेव्हा होइल. पण ही बातमी जेएनयु (हे कायम बातमीत) च्या एका विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा असलेल्या 'शेह्ला रशीद' नावाच्या एका मुलीने ट्विटरवर टाकली. यावर आधी नियमित असा गदारोळ सुरु होता पण अभिजित भट्टाचार्य या गायकाने यावर एक कमेंट टाकली आणि आगीत तेल ओतले गेले. - abhijit tweet - हे अर्थातच आक्षेपर्ह असे ट्विट होते आणि यावर दोन्ही बाजूंनी गोंधळ झाला आणि अभिजितरावांचे ट्विटर अकाउंट धारातीर्थी पडले. यावर शेह्ला रशीदची तिची बाजू मांडणारी ही पोस्ट, https://www.facebook.com/ShehlaRashidOfficial/posts/129243290974403 यालाच समांतर दुसरी घटना म्हणजे त्यातच परेश रावल यांनी 'दगडफेकीसमोर काश्मिरी तरुणाऐवजी च यांनाच बांधून न्यायला हवे होते' अशा अर्थाचे ट्विट टाकले (याला अरुंधती रॉय यांचे आधीचे विधान कारणीभूत होते). - paresh raval tweet - या ट्विटवर देखील गदारोळ सुरु होता आणि ते ट्विट डिलिट करावे अशी ट्विटर कडून परेश रावल यांना सूचना आली होती. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर आधीच अजानसंबंधित ट्विटवेळी 'असहिष्णुता' सहन करावी लागलेल्या सोनू निगमने निषेध म्हणून ट्विटर अकाउंट बंद करत असल्याची घोषणा केली पण त्याच वेळी त्याने होत असलेल्या दुजाभावाबद्दल सविस्तर लिहिले. - sonu tweet1 sonu tweet 2 sonu tweet3 - एरवी याकडे दुर्लक्ष केले असते पण सोनूने काही रोचक मुद्दे मांडले आहेत जे नक्कीच चर्चा करण्याजोगे, विचार करण्याजोगे आहेत असं वाटलं. १९ वा मुद्दा नक्कीच पटला, तो म्हणे ' मी डावा अथवा उजवा नाही. इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करतो पण इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'. आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय? नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय? दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत. याच बरोबर अधिक महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठवर आणि कशाच्या परिमाणावर आखायच्या. तर मग अभिजितची कमेंट ही कितीही घृणास्पद वाटली तरी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून स्वीकारायची का? नसेल तर 'इंडिया मुर्दाबाद' ही घोषणा अथवा एखाद्या अभिनेत्रीबद्दलची बातमी एखाद्या व्यक्तीस हिडिस/घृणास्पद वाटली त्याचे काय करायचे ? एक महिला गौतम गंभीरला जीपला बांधण्याची (त्या काश्मीरच्या घटनेच्या रेफरन्सने) कमेंट करु शकतो पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते? एखाद्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीच्या(पब्लिक फिगर) बद्दल जेव्हा कमेंटस येतात तेव्हा त्यांनी त्या 'व्यक्तिगत हल्ला' म्हणत तक्रार करणे कितपत योग्य आहे जेव्हा याच व्यक्ती इतर पब्लिक फिगर्स बद्दल टिका करताना (उ.दा. मोदींचे वैवाहिक जीवन, दिग्विजय सिंह यांचा पुनर्विवाह) याचा किती विचार करतात? या संदर्भात सोनू निगम काही विचार करण्याजोगे मुद्दे मांडेल असे कधी वाटले नव्हते पण झाले आहे खरे.
वर्गीकरण
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
राजकारण

प्रतिक्रिया द्या
34379 वाचन

💬 प्रतिसाद (135)
म
मंदार कात्रे Wed, 05/24/2017 - 19:57 नवीन
ट्विटर अमेरिकेपासून दिल्लीपर्यन्त (व्हाया लंडन - सीरिया -इराक ) पक्के मुस्लिमधार्जिणे आहे , हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे , त्याबद्दल फारसा आक्षेप नाही , परंतु ते आता दहशतवाद्याना देखील सपोर्ट करू लागलेले आहे. यापूर्वीदेखील आयसिस शी संबंधित अकाउण्ट्स आणि मजकूर काढायला ट्विटरने नकार दिलेला होता... याबाबतीत फेसबुक वाला झुक्याही मागे नाही ... मुस्लिम पॉप्युलेशन दुखावून आपली अकाउण्ट्स कमी होवू नये याची पुरेपूर दक्षता हे दोन्ही "लिबरल"सोशल मीडिया जायन्ट्स घेत असतात थोडक्यात हुजरेगिरी जोरात ...त्यात ट्विटरचा इण्डिया हेड शान्तताप्रिय धर्मी आहे ... यास्तव त्यांच्याकडून फारशी अपेक्षा ठेवणेच गैर आहे ...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/24/2017 - 21:02 नवीन
सच्चिदानंद, मी सोनू निगमचं प्रकरण उडतउडत वाचलं. नंतर शांतपणे वाचेन. तुमच्या लेखातली ही दोन विधानं रोचक वाटली. १.
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
मी सुरुवातीपासूनंच टोकदार हिंदूहितैषी भूमिका घेत आलेलो आहे. बाकीच्यांचं माहीत नाही. २.
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
नाही. मी टोकदार हिंदूहितैषी भूमिका घेऊनही नेमस्त व तटस्थ आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सच्चिदानंद गुरुवार, 05/25/2017 - 12:32 नवीन
मी टोकदार हिंदूहितैषी भूमिका घेऊनही नेमस्त व तटस्थ आहे.
अशी भुमिका घेऊनही 'नेमस्त व तटस्थ' आहे असे सांगावे लागते, यातच बरेच काही आले, नाही का ? (अशी टोकदार भुमिका घेणारे, त्याच वेळेस तटस्थ असल्याचा दावा कसा काय करु शकतात ? नेमस्तपणाचा आणि कोण्या एका बाजूंचा संबंध आहे असे गृहित नव्हते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
र
रामपुरी Wed, 05/24/2017 - 23:33 नवीन
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी शेवटी त्याच्या मर्यादा या बहुमताच्या जोरावरंच ठरतात. उदा. ईंडीया मुर्दाबाद हि घोषणा भारतात देशद्रोह ठरते तर पाकिस्तानात देशप्रेम "दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का" होय, खूपच. अगदी इथेही असे महाभाग तुम्ही पाहीले असतील. आणि त्यामुळे ते जास्त हास्यास्पद ठरतात हेही त्यांच्या लक्षात येत नाही. :)
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या गुरुवार, 05/25/2017 - 07:20 नवीन
मग तुमच्या मते ती घोषणा देशद्रोहाची ठरू नये कारण घोषणा देणारे आणि त्याच्या मागे उभे राहणारे अल्पसंख्यांक आहेत ? जे चूक आहे ते चूक आहे हे मान्य करायला काय जातंय ? ( हे तुम्हाला नाही. एकुणातच .. स्वतःला सेक्युलर / लिबरल / intellectual वैगेरे म्हणवून घेणाऱ्यांसाठी आहे ) बाष्कळ विधाने दोन्ही बाजूचे लोक करत हा मान्य आहेच . पण तरीही .. जे चूक आहे ते चूक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
म
मोदक गुरुवार, 05/25/2017 - 07:26 नवीन
जे चूक आहे ते चूक आहे हे मान्य करायला काय जातंय ? +११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
र
रामपुरी गुरुवार, 05/25/2017 - 16:38 नवीन
मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की "बरोबर" आणि "चूक " याच्या व्याख्या संदर्भानुसार/काळानुसार बदलतात आणि ते संदर्भ बहुसंख्यांकांच्या मतेच ठरतात. एखादी गोष्ट मला जरी अगदी प्रामाणीकपणे बरोबर वाटत असेल तरी जर ती बहुसंख्यांकांच्या मते चूक ठरत असेल तर ती चूकच मानली जाते. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर " पृथ्वी सूर्याभोवती फिरते" हे विधान एकेकाळी कदाचित देशद्रोहापेक्षाही भयंकर मानलं जात असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
स
स्पा गुरुवार, 05/25/2017 - 04:02 नवीन
एकूणच ट्विटर हा हुच्चभ्रु लोकांचा प्रकार वाटल्याने जास्त वाट्याला जात नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे गुरुवार, 05/25/2017 - 04:34 नवीन
बरोबर-चूक काय ते माहित नाही पण ट्विटर अमेरिकन कम्पनी आहे. त्यांच्या स्वतः च्या गाइडलाईन्स आहेत
We’ve all seen something on the Internet we disagree with or have received unwanted communication. Such behavior does not necessarily constitute online abuse
If you continue receiving unwanted, targeted and continuous replies on Twitter, and feel it constitutes online abuse, consider reporting the behavior to Twitter.
https://support.twitter.com/articles/१५७९४ अभिजित, रावल लोकांचे ट्विट लोकांना abusive वाटले म्हणून त्यांनी ट्विटर वर रिपोर्ट केले. ट्विटर ने अभिजितला बॅन केले आणि रावल ला ट्विट डिलिट करायला लावली. या सगळ्या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरणे योग्य होणार नाही कारण प्रायव्हेट कम्पनी ठरवू शकते आपल्या सायटीवर काय ठेवायचं - काय नाही. अवांतर: ट्विटर अमेरिकन कम्पनी असल्याने त्यांना भारतीय कायदे पालन करणे अनिवार्य असते का? समजा भारतीय कोर्टाने सांगितले कि अमुक एक अकाउंट बॅन करा, तर ट्विटर ला तो निर्णय बंधनकारक असेल का?
  • Log in or register to post comments
अ
अत्रे गुरुवार, 05/25/2017 - 04:35 नवीन
वरती लिंक चुकली https://support.twitter.com/articles/15794
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
स
सच्चिदानंद गुरुवार, 05/25/2017 - 12:49 नवीन
या सगळ्या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरणे योग्य होणार नाही कारण प्रायव्हेट कम्पनी ठरवू शकते आपल्या सायटीवर काय ठेवायचं - काय नाही.
हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असले तरी हा सोईस्कर युक्तिवाद झाला. मग त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गफ्फा हाणू नयेत. कोणी विचारले की फक्त 'मेरी मर्जी' असं सांगावं सरळ.
लोकांनी मुक्तपणे आली मतं मांडावी आणि भावना व्यक्त कराव्यात. पण धमक्या देणं, गैरवर्तन करणं, कुणाचाही आवाज दाबवण्याचा आणि छळाचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर निर्बंध घालण्यात येतील', असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे.
हे ट्विटरने परेश रावल यांचे अकाउंट बंद करताना सांगितले आहे. आता मला 'अभिनेता' परेश रावल बद्दल आदर असला तरी 'खासदार' परेश रावल आणि त्यांची मते याबद्दल काहीही आपुलकी नाही (अजूनतरी). पण ज्या पद्धतीने त्यांचे अकाउंट बंद झाले आहे ते नक्कीच तेवढे सहज पटत नाही, खासकरुन सोशल मिडियावर (ट्विटरसहित) यापेक्षा नमुनेदार अशी गैरवर्तने आणि कमेंटस आढळत असताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 05/25/2017 - 14:48 नवीन
रावलचे अकाऊंट (अजून तरी) बॅन झालेले नाही. https://mobile.twitter.com/SirPareshRawal मटा मधली बातमी खोटी आहे असे वाटते. ट्विटरची बॅन पॉलिसी काय आहे हे त्यांनाच विचारावे लागेल. पण अकाउंटला बऱ्याच जणांनी रिपोर्ट केल्यावर बॅन करत असावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सच्चिदानंद
प
पैसा गुरुवार, 05/25/2017 - 04:51 नवीन
सगळ्या ऑनलाइन social सायटींवर हेच चालू असते. परेश रावळ वर हल्ला करताना स्वरा भास्करने woman card सुद्धा वापरले, जे कोणत्याही विचार करू शकणाऱ्या व्यक्तीला अजिबात आवडणारे नाही. विशेषतः मानवाधिकार वाले आणि पुरस्कार वापसी ब्रिगेड असल्या घटनात अग्रभागी असतात. तेव्हा जे घडले त्यात खरे तर आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. दुर्लक्ष अनुल्लेखाने अशा लोकांना मारा म्हटले तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो हे ट्विटर काय मिपावर पण दिसतेच. सोसेल तेवढाच वावर सोशल मीडियावर ठेवावा हे आपल्या डोक्याच्या शांततेसाठी आवश्यक असते.
  • Log in or register to post comments
स
सच्चिदानंद गुरुवार, 05/25/2017 - 12:53 नवीन
एकंद प्रतिसाद पटला.
सगळ्या ऑनलाइन social सायटींवर हेच चालू असते. परेश रावळ वर हल्ला करताना स्वरा भास्करने woman card सुद्धा वापरले, जे कोणत्याही विचार करू शकणाऱ्या व्यक्तीला अजिबात आवडणारे नाही.
अर्थात.! मी याबद्दल लिहिणार होतो पण इथे वेगळे वळण लागेल म्हणून ते टाळले. पण तो ही एक ढोंगीपणाचा महत्त्वाचा मुद्दा आहेच.
दुर्लक्ष अनुल्लेखाने अशा लोकांना मारा म्हटले तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो हे ट्विटर काय मिपावर पण दिसतेच. सोसेल तेवढाच वावर सोशल मीडियावर ठेवावा हे आपल्या डोक्याच्या शांततेसाठी आवश्यक असते.
हे आहेच. पण कोणत्याही प्रशासनाने एकावर कारवाई करावी आणि दुसर्‍याला क्लीन चीट हे पण जरा न पटणारे आहे. या माध्यमांना जर मुक्त अभिव्यक्तीची साधने म्हणावे तर त्यावरच प्रश्न उपस्थित होतो मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मंदार कात्रे गुरुवार, 05/25/2017 - 06:22 नवीन
मला जर कुणी पिस्तुल दिली तर सर्वात पहिल्यांदा नरेंद्र मोदींवर वापरेन - विजय तेंडुलकर What a courageous man! अभिव्यक्ती स्वातंत्र्य ! त्या दंगलखोरा ऐवजी अरूंधती रोयला जीपपुढे बांधायला पाहिजे होते. - परेश रावल हाय तोबा हाय तोबा Shame Shame!!! जातीयवादी जातीयवादी..... ************************
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/25/2017 - 06:23 नवीन
एकूणच अभिव्यक्तीस्वातंत्र्य केवळ बुबुडाविपुमाधविंना असते असे दिसते. व्हॉट्सअ‍ॅपवर एक पोस्ट फिरत आहे. काही क्वचित व्हॉट्सअ‍ॅप पोस्टमध्ये काही तथ्य असते त्यातील ही एक पोस्ट आहे. "मला जर कुणी पिस्तुल दिली तर सर्वात पहिल्यांदा नरेंद्र मोदींवर वापरेन - विजय तेंडुलकर What a courageous man! अभिव्यक्ती स्वातंत्र्य ! त्या दंगलखोरा ऐवजी अरूंधती रोयला जीपपुढे बांधायला पाहिजे होते. - परेश रावल हाय तोबा हाय तोबा Shame Shame!!! जातीयवादी जातीयवादी....." आणि परेश रावळने जे काही म्हटले आहे ते जे.एन.यु मध्ये एम.फील करणार्‍या शेहला रशीदच्या पोस्टला उत्तर होते हे सगळे बुबुडाविपुमाधवि अगदी सोयीस्करपणे विसरत आहेत. हा सगळा टिवटिवाट आता डिलीट झाला आहे. त्यामुळे टिवटिवाट इथे एम्बेड करता येणार नाही. कोणीतरी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता. तेव्हा तोच इथे चिकटवत आहे. Image removed. आणि परेश रावळने जे काही म्हटले आहे त्यात मला तरी काहीही चुकीचे वाटलेले नाही. अरूंधती रॉय सारख्या खाल्या ताटात **णार्‍या लोकांना नुसते असे जीपला बांधले नाही तर गितमोमध्ये पाठवून शंभर वेळा वॉटरबोर्डिंग केले तर मी माझ्या ओळखीतल्या प्रत्येकाला पेढे वाटून तो दिवस साजरा करेन. भारतात जन्माला आलेल्या (भारतीय मुद्दामून म्हणत नाही) ज्या लोकांविषयी मला अगदी कमालीचा दुस्वास आहे त्यात अरूंधती रॉय या हडळीचा* नंबर बराच वरचा आहे. *: उगीच पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी गुळमुळीत लिहिणे, बोलणे मला जमत नाही. माझ्यासाठी तरी जे काही आहे ते रोखठोक आणि कसलाही आडपडदा न ठेवता. तरीही मिपावर हडळ हा शब्द योग्य नाही असे संपादकांचे मत असल्यास तो शब्द जरूर संपादित करावा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे गुरुवार, 05/25/2017 - 06:50 नवीन
असहमत.
जीपला बांधले नाही तर गितमोमध्ये पाठवून शंभर वेळा वॉटरबोर्डिंग केले तर
अशे फतवे आचरणात आणण्याची जबाबदारी कोणाची? उद्या कोणी असे खरोखर केले आणि त्यांना पोलिसांनी जेल मध्ये टाकल्यास फतवे जाहीर करणाऱ्यावर त्याची जबाबदारी येते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
द
दाह गुरुवार, 05/25/2017 - 06:48 नवीन
पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते? गौतमचं काय प्रकरण आहे माहिती नाही. पण परेश रावळ साफ म्हणजे साफ चूक. कारण त्यानं हे विधान केवळ अफवेचा आधार घेऊन केलं होतं. प्रत्यक्षात अरुंधती असं काही बोलल्या नव्हत्या.ती एक फेक बातमी होती की अरुंधती रॉय यांनी "७० लाख भारतीय जवान काश्मीरमधील स्वातंत्र्यसैनिकांना पराभूत करू शकत नाहीत." असं विधान पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं म्हणून. परेश रावळ हे खासदार आहेत भाजपचे. त्यांनी कोणताही ट्विट करण्याआधी निदान जे झालंय ते खरंच झालंय का हे पडताळून पाहायला हवं. पण सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण किती देशभक्त आहोत हे सिद्ध करण्याची नवीन स्पर्धा सुरु असल्याने त्यांनी गडबडीत हे ट्विट केलेलं असाव.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे गुरुवार, 05/25/2017 - 06:53 नवीन
कारण त्यानं हे विधान केवळ अफवेचा आधार घेऊन केलं होतं
तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की ती बातमी अफवा नसली असती तर असे फतवे जाहीर करणे योग्य ठरले असते? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दाह
स
सच्चिदानंद गुरुवार, 05/25/2017 - 13:02 नवीन
तुम्ही दोन वेळा फतव्यांच्याबद्दल तेही ठळक करुन बोलला आहात म्हणून आपले विचारतोय, 'कोणतेही फतवे जाहीर करणे तुम्हाला पटते का ? की काही विशिष्ट लोकांनाच त्याचे अधिकार असावेत ? तसेच, कोणती विधाने 'फतवा' ठरावीत? म्हणजे असे की तुमच्या मते गॅरी ट्रुमन यांनी या प्रतिसादात फतवा जारी केला आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का (तुमच्या प्रतिसादावरुन तसे ध्वनित होते आहे म्हणून प्रश्न) ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 05/25/2017 - 14:53 नवीन
माझ्या मते फतवा म्हणजे कोणालाही जाहीर केलेली (बेकायदेशीर) शिक्षा आणि (ऑप्शनल) त्यासाठी जाहीर केलेले बक्षिस/सुपारी/Bounty जसे कि सोनू निगम चे मुंडन करण्यासाठी एक फतवा निघाला होता. माझ्या मते असे फतवे जाहीर करायला कायदेशीर बंदी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सच्चिदानंद
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 05/25/2017 - 21:30 नवीन
फतवा हे फक्त मत आहे असं कोणी तरी मुस्लिम क्लेरिक सोनू निगमच्या फतव्यानंतर म्हणाला. थोडक्यात काय, हे शांतीप्रिय लोक त्यांना सोयीस्कर असेल तसे शब्दांचे/ घटनांचे अर्थ बदलतात व भूमिकाही बदलतात. मुस्लिम कायद्याप्रमाणे गुन्हेगारांना शिक्षा द्यायला लागले तर त्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल. म्हणून त्यावेळी भादंवि प्रमाणे न्याय करा म्हणतात. पण लग्नाच्या बाबतीत मात्र मुस्लिम कायदा पाहिजे. फतवे जाहीर करायला नाही पण तो पाळण्याची जबरदस्ती करायला कायद्याने बंदी आहे. म्हणून तर फतव्याविरुद्ध बोललं की ते नुसतं मत आहे म्हणायचं. म्हणजे कोणी पाळलाच तर ते त्याचं कृत्य म्हणून मौलवी सुटेल आणि मग फतवा पाळणं बंधनकारक आहे असं आमच्या पुस्तकात लिहिलंय असं म्हणून कृती करणाराही सुटेल. त्यांना साथ द्यायला उदारमतवादी आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
म
मोदक गुरुवार, 05/25/2017 - 07:14 नवीन
तुम्ही एकाच धाग्यात अनेक कंगोर्‍यांचे प्रश्न विचारले आहेत त्यामुळे प्रतिसाद मोठा झाला आहे. सहिष्णुपणे समजावून घ्याल अशी अपेक्षा आहे. ;) इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'. ही सध्याच्या सोशल मिडीयाची चिंताजनक बाजू आहे. याला अनेक कारणे आहेत. माझ्या मते मुख्य कारण म्हणजे विशिष्ट लोकांचे सोयीस्कर मतप्रदर्शन आणि सोयीस्कर विरोध लोकांच्या ध्यानात येऊ लागले आहे. सोशल मिडीया हा मतप्रदर्शनाचा सोयीचा प्लॅटफॉर्म असला तरी मोठमोठे मंत्री, नेते आणि विचारवंतही एका कमेंटच्या अंतरावर आहेत (माझ्या गल्लीतल्या एखाद्या मित्रासारखे) आणि "त्यांच्या विचारांना मी लॉजिकल उत्तर देत असेन तर मला पुन्हा उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे" ही सोय यापूर्वी नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे, विचारातील / भूमीकेतील समानता. आपण सर्वजण सदासर्वकाळ बरोबर असू शकत नाही. सोशल मिडीयावर तर मुळीच नाही कारण "आपले पूर्वानुभव आणि एखाद्या गोष्टीबद्दल असलेला दृष्टीकोन" या गोष्टींचा आपल्या भूमीका ठरण्यात मोठा वाटा असतो. अशा वेळी आपले अनुभव त्यावर व्यक्त होणार्‍या प्रत्येकाला समजतीलच असे नाही. दुसर्‍या बाजूने विचार केला तर माझ्या विचारांच्या विरोधी विचारांचा कोणी अस्तित्वात असेल आणि मला "आज आत्ता ताबडतोब" निर्णय हवा असेल किंवा त्याला खोटे पाडायचेच असेल तर मोघम आरोप करून त्याला खोटे पाडणे जास्ती सोपे असते. मग लाँग रन मध्ये तो माणूस बरोबर ठरला तरी नवीन आरोप शोधले जातात आणि पूर्वीचे बरोबर असलेले मुद्दे सोयीस्कररीत्या विसरून नवीन नवीन खोटेपणा केला जातो. आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय? नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय? आयडेंटिटी क्रायसीस म्हणा किंवा आणखी एखादी गोष्ट असेल.. पण मी एखाद्याला निरूत्तर केले म्हणजे माझा विजय किंवा मला कोणी निरूत्तर केले म्हणजे माझा पराजय ही भावना टोकाच्या भूमीका घ्यायला भाग पाडते कारण मी सज्जनपणे नवीन विचार स्वीकारून त्यावर विचार करण्याची तयारी दाखवली तरी अनोळखी प्रश्नकर्ता ती भूमीका समजून घेईलच असे नाही. मग तो मार्ग संपूर्णपणे बंद करून आहे त्या परिस्थितीत टोकाच्या भूमीकांमध्ये राहणे जास्ती सोपे आहे. एखाद्याचा तटस्थपणा किंवा नेमस्तपणा जर एकाच विचारधारेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून विशिष्ट विचारधारेची भलामण करत असेल तर त्याला सध्याच्या घडीला उघडपणे विरोध होतो आहे. अशावेळी मुद्द्यांच्या आधारे केलेला विरोध म्हणजे "असहिष्णुता" किंवा "हमको चाहिये आजादी" अशा अजेंड्याखाली ढकलला जात असेल तर कोणताही सामान्य माणूस "असहिष्णुता तर असहिष्णुता पण आधी या सोयीस्कर विचारवंतांचे बुरखे टरकावूया" असा विचार करेल हे अत्यंत साहजिक आहे. (मी स्वत: याच विचाराने मिपावर राजकारणी चर्चांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली) दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत. याला दुराग्रही / सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग जबाबदार आहेत हे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारच याला सध्याच्या घडीला इलाज नाही. भूमीका हातोहात बदलणे, खोटे बोलणे, आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले पण स्वत:ला सोयीचे नसलेले निष्कर्ष नाकारणे, मोघम आरोप करणे, नसलेल्या शक्यता ध्वनीत करणे वगैरे प्रकार या लोकांकडून नेहमी केले जातात. मिपावरच्या अशा किमान ३ वेगवेगळ्या लोकांच्या (डुआयडींच्या नव्हे!) मी लिंका देऊ शकतो. मग अशावेळी समोर दिसत असलेला पक्षपातीपणा उघड पाडण्यासाठी मैदानात उतरणे भाग पडते आणि एकदा मैदानात उतरलात की तुम्हाला विरोधकांकडून लेबले लावली जाणारच. तुमच्यावर आरोप करताना कितीही पातळी सोडली तरी प्रतिकार करताना तुम्ही पातळी सोडू नये अशी एक अजब अपेक्षा या लोकांची असते. अशा अनेक दांभीक भूमीकांचा परिणाम म्हणजे सध्या सुरू असलेले समर्थकांचे पोटतिडकीचे भांडण. ..मी समोरच्याला फक्त चिमटा काढला तर त्याने माझ्या कानाखाली आवाज का काढला..? अशी वागळे/सरदेसाई छाप भूमीका असेल तर मर्यादेची रेषा कोण आखणार हा रोचक मुद्दा उरतोच.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे गुरुवार, 05/25/2017 - 07:40 नवीन
बराचसा प्रतिसाद आवडला.
एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारच
यातले वागळे प्रकरण काय आहे? लिंक मिळेल का एखादी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित गुरुवार, 05/25/2017 - 08:20 नवीन
तुमचे पहिले २ मुद्दे १००% पटले. फक्त ३ ऱ्या मुद्द्यांमध्ये काही शंका आहेत. १) सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग हे कोण आहेत हे समजले पण दुराग्रही मध्ये कोणाचा समावेश होतो कृपया हे जरा विस्कटून सांगता का? २) एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा फक्त वागळे किंवा राजदीप सरदेसाईच होणार का ? साध्वी, स्वामी, रावसाहेब, परिचारक, अभिजीत होऊ शकतात का? ३) भूमीका हातोहात बदलणे, खोटे बोलणे, आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले पण स्वत:ला सोयीचे नसलेले निष्कर्ष नाकारणे, मोघम आरोप करणे, नसलेल्या शक्यता ध्वनीत करणे वगैरे प्रकार या लोकांकडून नेहमी केले जातात. या लोकांमध्ये सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग बरोबर टंटनी, संघाचे काही लोक येतील का? तुमच्यावर आरोप करताना कितीही पातळी सोडली तरी प्रतिकार करताना तुम्ही पातळी सोडू नये अशी एक अजब अपेक्षा या लोकांची असते. अशा अनेक दांभीक भूमीकांचा परिणाम म्हणजे सध्या सुरू असलेले समर्थकांचे पोटतिडकीचे भांडण.===>> १००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित गुरुवार, 05/25/2017 - 12:56 नवीन
दुराग्रहीं च्या कप्प्यामध्ये महाजन बसतील का ? कारण ते श्री श्री दाऊद च्या नातेवाईकाच्या लग्नात बिर्याणी हादडत होते. http://www.loksatta.com/pune-news/minister-girish-mahajan-who-attended-wedding-of-gangster-dawoods-relative-should-resign-says-ncp-leader-ajit-pawar-1479572/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक गुरुवार, 05/25/2017 - 13:25 नवीन
मी प्रतिसादामध्ये पुरेसे विस्तृत आणि स्पष्ट लिहिले आहे. (तुम्ही आणखी १० नांवे आणलीत तरी माझे उत्तर हेच असेल. प्रतिसादामध्ये नोंदवलेले विचार वाचून (तुमच्या सोयीने) फुटपट्टी लावून तुम्हाला वाटतील ते निष्कर्ष काढू शकता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 05/26/2017 - 06:54 नवीन
४.५५ PM ला शंका निरसन केल्याबद्दल आभार मानले आहेत. नेमका त्याच वेळेस तुमचा हा प्रतिसाद आला आहे. असो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग/ सरदेसाई/ यांची नावे घेतलीत म्हणून तुमचे विचार सगळ्या प्रकारच्या दुराग्रहींसाठी आहे का नाही ही शंका निरसन करण्यासाठी हा लेख प्रपंच. मी पुढच्याचे विचार पटले तर त्या नुसार निष्कर्ष काढत असतो सोयीनुसार नाही. फुटपट्टी घेऊन तर बिलकुल नाही कारण प्रत्येकाचे विचार १९-२० इकडे तिकडे सरकलेले असतात याची मला पूर्ण जाण आहे. कृपया गैसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 05/27/2017 - 22:13 नवीन
ओके.. हा लेखनप्रपंच करण्यापूर्वी "बादरायण संबंध" या दोन शब्दांची माहिती काढावी ही एक सहज जाताजाता सुचवणूक. कसे आहे.. इथे विषय सुरू आहे वैचारीक विरोधाचा. दुराग्रही म्हणजे दुसर्‍याच्या विचारांचा विरोध लक्षात न घेता आपलेच विचार रेमटवणे. मात्र तुम्ही जाणीवपूर्वक विषय भरकटवण्यासाठी "एका भाजप नेत्याने एका लग्नाला लावलेली हजेरी" इथे आणून त्याला तुमच्या चष्म्याने दुराग्रही नांव दिले. आपण असे समजू की महाजन दोषी आहेत तरी त्यांना दुराग्रही म्हणणे हा निष्कर्ष नक्की कोणत्या चष्म्याने काढलात ते सांगता का..? वागळे / सरदेसाई नांवे उचलताना "एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर.." हा माझ्या प्रतिसादातला अत्यावश्यक भाग सोयीस्कररीत्या वगळला. बर्र.. ही सगळी दिशाभूल करताना तुम्ही मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेत आणि त्या अनुषंगाने प्रतिसाद देणे किंवा मला प्रश्न विचारणे सहज शक्य असताना इतक्या कोलांट्याउड्या का माराव्यात तर भाजपा नेत्याने लग्नाला लावलेली हजेरी हायलाईट करायला.. त्यापेक्षा वेगळा धागा काढा की. कारण असे बादरायण संबंध जोडून भुजबळ प्रकरण, तेलगी प्रकरण किंवा आणखी प्रकरणे काढून तुमच्या उदो उदो वाल्या श्रद्धास्थानांवर हल्ले झाले तर तुम्ही लगेच धोतरात हात घालायला निघाल. (बादवे-तुम्ही हे जे जाणीवपूर्वक विषयांतर केले आहे यालाच ट्रोलिंग असे म्हणतात) आणखी एक.. तुम्ही वर लिहिले आहे ना; "सरकलेले विचार" हा ही (धोतरात हात घालण्यासारखा) चुकीचा शब्दप्रयोग आहे. तुमचे विचार सरकलेले असतील कदाचित, पण माझे नक्कीच नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 05/31/2017 - 14:32 नवीन
<<<हा लेखनप्रपंच करण्यापूर्वी "बादरायण संबंध" या दोन शब्दांची माहिती काढावी ही एक सहज जाताजाता सुचवणूक.>>> ==>मी दिलेल्या प्रतिसादांचे टाईमिंग बघितलं तर बादरायण संबंध कसे आहेत ते तुम्हाला समजून येईल. <<<दुराग्रही म्हणजे दुसर्‍याच्या विचारांचा विरोध लक्षात न घेता आपलेच विचार रेमटवणे.>>> ==>> मानवाधिकारवाले/ पुरस्कार वापसी गॅंग/ वागळे/ सरदेसाई/ यांची नावे पुढे केल्यामुळे तुमच्या चष्म्याचा नंबर समजला होता. विचार रेमटवण्यात आताचे सरकार, त्याचे अंध समर्थक, त्या सरकारची मातृ संस्था हे सुद्धा अग्रेसर आहेत. याला सोयीस्कर बगल देऊन मिपावरील ३-४ आयडी वर तुम्ही बिल फाडून मोकळे झालात(३-४ आयडी मध्ये मला मी ओढून घेत नाही आहे ). <<<कारण असे बादरायण संबंध जोडून भुजबळ प्रकरण, तेलगी प्रकरण किंवा आणखी प्रकरणे काढून तुमच्या उदो उदो वाल्या श्रद्धास्थानांवर हल्ले झाले तर>>> ==>> वर दिलेली कोणती ही प्रकरणे अजून सिद्ध झाली नाहीत. तरी तुम्ही आमच्या धोतरात हात घालायला निघालात. शॉक बसेल. <<<बादवे-तुम्ही हे जे जाणीवपूर्वक विषयांतर केले आहे यालाच ट्रोलिंग असे म्हणतात>>> ==>>तुमचा संपूर्ण प्रतिसाद मागचे हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न वाटला. तो ट्रक का काय सारखा फिरत असतो जिथे तिथे. असो चालू द्यात. <<<तुमचे विचार सरकलेले असतील कदाचित, पण माझे नक्कीच नाहीत.>>> ==> दुराग्रही व्याख्येत बसेल का हे विधान?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 05/31/2017 - 15:27 नवीन
दुराग्रहीपणा आणि तुम्ही दिलेली महाजनांची लिंक याचा संबंध उलगडून सांगा बघू. तुमचा प्रतिसाद. दुराग्रहीं च्या कप्प्यामध्ये महाजन बसतील का ? कारण ते श्री श्री दाऊद च्या नातेवाईकाच्या लग्नात बिर्याणी हादडत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक गुरुवार, 05/25/2017 - 13:18 नवीन
१) त्याच मुद्द्यातील बाकी भाग वाचावा. २) "पब्लीककडून सार्वजनिक अपमान होणे" अशा अर्थाने मी ही दोन नांवे वापरली. या वृत्तीला (तुमच्या सोयीने) हवी ती नावे देऊ शकता. सलमान खानच्या बचावार्थ ट्वीट केल्यानंतर अभिजीतची काय अवस्था झाली होती हे आठवत असेलच. ३) ज्या कोणी व्यक्तीने अशी सोयीस्कर दांभीक भूमीका घेतली असेल तर त्या लोकांबाबतही माझे हेच मत असेल. पक्ष किंवा नेत्याच्या झेंड्याचा रंग न बघता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 05/25/2017 - 13:25 नवीन
तिन्हीही शंका निरसन केल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सच्चिदानंद गुरुवार, 05/25/2017 - 12:25 नवीन
मोदक, प्रतिसाद आवडला..
याला दुराग्रही / सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग जबाबदार आहेत हे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारच याला सध्याच्या घडीला इलाज नाही. भूमीका हातोहात बदलणे, खोटे बोलणे, आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले पण स्वत:ला सोयीचे नसलेले निष्कर्ष नाकारणे, मोघम आरोप करणे, नसलेल्या शक्यता ध्वनीत करणे वगैरे प्रकार या लोकांकडून नेहमी केले जातात.
या संदर्भात इतकेच म्हणेन की हे बहुतेक पक्ष अथवा विचारधारेच्या समर्थकांकडून होतेच होते. यात पुरस्कार वापसी गँग इ. आणून इतर स्वतःला 'बाईज्जत बरी' करु शकत नाहीत.
तुमच्यावर आरोप करताना कितीही पातळी सोडली तरी प्रतिकार करताना तुम्ही पातळी सोडू नये अशी एक अजब अपेक्षा या लोकांची असते.
इथे तुम्ही अभिजितच्या कमेंटची भलामण करताय का? म्हणजे मी जरी त्या मुलीच्या कुठल्याही विचारांशी सहमत नसेन तरी तिला प्रतिवाद म्हणून कोणी 'पुरेसे पैसे मिळाले नाही म्हणून तक्रार करणारी वेश्या' म्हणत असेल तर ते नक्की कुठल्या पातळीवर येते? तिने अशी कोणती पातळी सोडली होती म्हणून ही प्रतिक्रिया समर्थनीय ठरते ? जर ती भाजपासमर्थक असती (आणि तथाकथित सेक्स रॅकेट्ची बातमी काँग्रेसची असती) तर अभिजीतच्या या कमेंटवरच्या प्रतिक्रिया अशाच असत्या का ? यात महत्त्वाचा एक बेसिक मुद्दा म्हणजे आपली पातळी आपण का सोडावी ? आपला तटस्थपणा स्वयंभू असावा, इतरांच्या ढोंगीपणामुळे, कोलांटउड्यांमुळे त्यात बदल होऊ नये. एखाद्याचे एखादे मत पटले तर ते स्वीकारायला इतर संदर्भ (तो कोणत्या पक्षाचा समर्थक/विरोधक इ.इ.) मध्ये येऊ नयेत.
..मी समोरच्याला फक्त चिमटा काढला तर त्याने माझ्या कानाखाली आवाज का काढला..? अशी वागळे/सरदेसाई छाप भूमीका असेल तर मर्यादेची रेषा कोण आखणार हा रोचक मुद्दा उरतोच.
हे मान्यच. आणि हा एक प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 05/25/2017 - 13:38 नवीन
या संदर्भात इतकेच म्हणेन की हे बहुतेक पक्ष अथवा विचारधारेच्या समर्थकांकडून होतेच होते. यात पुरस्कार वापसी गँग इ. आणून इतर स्वतःला 'बाईज्जत बरी' करु शकत नाहीत. सर्वच जण असे करत असतील असे तुमचे मत असेल तर "सुरूवात कोण करत आहे आणि प्रत्युत्तर कोण देत आहे" हे बघावे लागेल. सुरूवात = चिमटा काढणे आणि प्रत्युत्तर = कानाखाली आवाज काढणे असे असेल तर "मोठी हिंसा" म्हणून प्रत्युत्तर देणार्‍याला संपूर्ण दोष देता येणार नाही. इथे तुम्ही अभिजितच्या कमेंटची भलामण करताय का? अभिजीतच्या कमेंटची भलामण नाही. सर्वसाधारण विधान आहे. यात महत्त्वाचा एक बेसिक मुद्दा म्हणजे आपली पातळी आपण का सोडावी ? आपला तटस्थपणा स्वयंभू असावा, इतरांच्या ढोंगीपणामुळे, कोलांटउड्यांमुळे त्यात बदल होऊ नये. एखाद्याचे एखादे मत पटले तर ते स्वीकारायला इतर संदर्भ (तो कोणत्या पक्षाचा समर्थक/विरोधक इ.इ.) मध्ये येऊ नयेत. समजा एखादा बेवडा मुद्दामहून माझ्या रस्त्यात येत असेल तर मी कितीवेळा रस्ता बदलणार..? स्वयंभू तटस्थपणा आजच्या काळात आणि अंतर्जालावरच्या फॉरमॅटमध्ये कितपत लागू ठरेल हे शंकास्पद आहे. (हे फक्त पातळी सोडण्यासंदर्भात आहे, मत स्वीकारण्यासंदर्भात नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सच्चिदानंद
स
सच्चिदानंद गुरुवार, 05/25/2017 - 16:25 नवीन
काही मुद्दे पटले नाहीत. उ.दा.
. सुरूवात = चिमटा काढणे आणि प्रत्युत्तर = कानाखाली आवाज काढणे असे असेल तर "मोठी हिंसा" म्हणून प्रत्युत्तर देणार्‍याला संपूर्ण दोष देता येणार नाही.
मग याच न्यायाने नक्षलवादाचे समर्थन करणारे करतात आणि ते अक्षरशः करतात. प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक जण त्याने आधी चिमटा काढला हेच म्हणत बसतो आणि मग कानठळ्या, बुक्क्या, लाथाळ्या सुरु होतात. तुमच्या बेवड्याच्या प्रतिक्रियेस प्रमाण मानून अशा वेळेस दोन्ही बाजू लाथाळ्यांचे समर्थन करु लागेल तर ते कसे बरोबर ठरेल ?
समजा एखादा बेवडा मुद्दामहून माझ्या रस्त्यात येत असेल तर मी कितीवेळा रस्ता बदलणार..? स्वयंभू तटस्थपणा आजच्या काळात आणि अंतर्जालावरच्या फॉरमॅटमध्ये कितपत लागू ठरेल हे शंकास्पद आहे. (हे फक्त पातळी सोडण्यासंदर्भात आहे, मत स्वीकारण्यासंदर्भात नाही.)
ही बेवड्याची तुलना तेवढी पटली नाही (थोड अ‍ॅपल/ऑरेन्ज झाले). तरीही बेवडा समोर आला तर त्याच्या पातळीवर उतरणे काही मान्य नाही. तटस्थता स्वयंभू असावी हे या फॉरमॅटमध्येही शक्य आहे नक्कीच आणि इथे सुहास म्हात्रेंसारखे नक्कीच चांगले उदाहरण आहेत त्याचे (माझ्यामते).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 05/25/2017 - 16:38 नवीन
मी डॉक्टरसाहेबांइतका अनुभव, विस्तृत विचार करण्याची पातळी गाठली तर माझे वरील विचार कदाचित मला स्वत:लाच गैरलागू वाटू शकतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सच्चिदानंद
स
सच्चिदानंद Sat, 05/27/2017 - 13:21 नवीन
अर्थात, मग कोणाचा आदर्श घ्यायचा ते आपल्यावर आहे ना ..!,आपली पातळी कुठे असावी हे आपण ठरवणार. माझ्यामते तरी डॉ. म्हात्रे यांची पातळी गाठण्यात रस असेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 05/27/2017 - 21:43 नवीन
अरे व्वा.. या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सच्चिदानंद
प
पुंबा गुरुवार, 05/25/2017 - 07:19 नवीन
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय? नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
होय. शांतपणे चर्चा, वाद, संवाद यांच्या माध्यमातून मुद्दे समजावून देण्याला प्रतिष्ठा उरलेली नाही. सुमार बुद्धीमतेच्या, सवंग(trite) मते असणार्‍या पण कुठल्याही विचारसरणीचा अतिरेकी पाईक असणार्‍यांना लाईमलाईट मिळू लागलेला आहे. बाकी 'अभिजीत' जे जे करत आलेला आहे त्याला ट्विटर अकाऊंट बंद करणे ही शिक्षा म्हणजे करूणा झाली.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/25/2017 - 08:30 नवीन
गॅरी ट्रुमन,
उगीच पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी गुळमुळीत लिहिणे, बोलणे मला जमत नाही. माझ्यासाठी तरी जे काही आहे ते रोखठोक आणि कसलाही आडपडदा न ठेवता. तरीही मिपावर हडळ हा शब्द योग्य नाही असे संपादकांचे मत असल्यास तो शब्द जरूर संपादित करावा.
या विधानाद्वारे हडळींचा अपमान केल्याबद्दल समस्त हडळ-खवीस-पिशाच्च-मुंजा-बायंगी-संघातर्फे तुमचा तीव्र निषेध ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 05/25/2017 - 10:30 नवीन
एकदम सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मारवा गुरुवार, 05/25/2017 - 10:00 नवीन
करण्याची कुवत असती तर परेश रावल यांनी खालच्या पातळीवर जाउन हे विधान करण्याची गरजच भासली नसती. परेश यांच्याकडुन याहुन जास्त अपेकशा बाळगणेच आता चुक आहे. अरुंधतींनी मैौन बाळगुन बरे केले. इराणी यांनी परेश यांचा दीर्घ टीकात्मक १४० पानांचा निबंध वाचलेला नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/25/2017 - 11:33 नवीन
सुशिक्षित, बुद्धीवादी, पुरोगामी इत्यादी लोकांविषयी कल्पना नाही पण ही मंडळी सोडून आपल्या देशावर प्रेम असलेल्या सामान्य भारतीयाला या अरूंधती रॉय या बयेचे तथाकथित 'विचार' हे 'विचारांचा मुकाबला विचारांनी करावा' अशाप्रकारचे कोणतेही सौजन्य दाखवायच्या लायकीचे नाहीत असेच वाटते अशी बर्‍यापैकी खात्री आहे. तरीही अरूंधती रॉय ही स्वतः आणि तिच्या 'विचारांचा' मुकाबला विचारांनीच केला पाहिजे असा विचार करणारे लोक अशांवर इतके संतापणे बंद करायला हवे असे वाटते. कारण मोदींच्या मिशन-२०१९ चे हे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर्स आहेत. मोदींना विरोध करायच्या निमित्ताने जो कोणी मोदींच्या विरोधात असतील त्या सगळ्यांना, अगदी देशद्रोह्यांना पाठिंबा द्यायला मागेपुढे बघत नाहियेत. यातूनच ही हलकटातील हलकट जमात स्वतः होऊनच आपला खरा चेहरा जगापुढे आणत आहे आणि अन्यथा मोदींना मते दिली नसती अशा अधिकाधिक लोकांना मोदींच्याच कॅम्पमध्ये ढकलत आहेत. अरूंधती रॉय, निखिल वागळे पासून मुग्धा कर्णिकपर्यंत शेकडो ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर्स आहेत मोदींचे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
पुंबा गुरुवार, 05/25/2017 - 10:08 नवीन
विक्रम गोखले, तेंडूलकर आणि परेश रावल यांच्यात कुणाला खालील फरक वाटला का? ~ परेश रावल हे खासदार आहेत तेदेखिल सत्तापक्षाचे, म्हणजे अरूंधती रॉय यांना जीपला बांधावे हे त्यांचे मत कृतीत बदलण्याची पात्रता त्यांच्यात येणे संभवनीय आहे.(त्यांना संरक्षण मंत्री वगैरे बनवले गेले तर). विक्रम गोखले आणि तेंडूलकर मात्र कुणीही नाहीत किंवा नव्हते, त्यांचे मत कृतीत आणणे त्यांना शक्य नव्हते/नाही. त्यांच्या बोलण्याला घरातल्या पेन्शनराची बडबडीएवढेच मुल्य आहे. परेश रावल यांचे वक्तव्य मात्र भयावह ठरते.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 05/25/2017 - 10:32 नवीन
रावल यांनी याही पेक्षा भयावह मत तिच्याबद्दल द्यावे या लायकिची ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
मारवा गुरुवार, 05/25/2017 - 11:34 नवीन
कुठल्या विचारावर आक्शेप व त्याना यासाठी शिक्शा व्हावी अस म्हणण कुठल्या कायद्याच्या आधारे . की नुसताच .....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पुंबा गुरुवार, 05/25/2017 - 11:08 नवीन
ट्विटांत..
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 05/25/2017 - 13:44 नवीन
एकच इलाज . दांभिक लोक एकही विचार न मांडता नुसताच चिखल उडवण्यात धन्यता मानतात. १- Sometimes I think the world is divided into those who have a comfortable relationship with power and those who have a naturally adversarial relationship with power. २- The mullahs of the Islamic world and the mullahs of the Hindu world and the mullahs of the Christian world are all on the same side. And we are against them all. ३-
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 05/25/2017 - 13:44 नवीन
एकच इलाज . दांभिक लोक एकही विचार न मांडता नुसताच चिखल उडवण्यात धन्यता मानतात. १- Sometimes I think the world is divided into those who have a comfortable relationship with power and those who have a naturally adversarial relationship with power. २- The mullahs of the Islamic world and the mullahs of the Hindu world and the mullahs of the Christian world are all on the same side. And we are against them all. ३-
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा