सोनू निगम, अभिजित आणि ट्विटरवरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य
तर सोनू निगम ने भलं मोठ्ठं पत्र लिहून ट्विटर सोडण्याची घोषणा केली आणि आधीच सुरु असलेल्या गोंधळात अजून नवी भर पडली. पण यातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत.
पार्श्वभूमी अशी की, भाजपाच्या काही लोकल नेत्यांचा एका सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या किती खर्या-खोट्या की नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरचे आरोप ते सिद्ध व्हायचे तेव्हा होइल. पण ही बातमी जेएनयु (हे कायम बातमीत) च्या एका विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा असलेल्या 'शेह्ला रशीद' नावाच्या एका मुलीने ट्विटरवर टाकली.
यावर आधी नियमित असा गदारोळ सुरु होता पण अभिजित भट्टाचार्य या गायकाने यावर एक कमेंट टाकली आणि आगीत तेल ओतले गेले.
-
-
हे अर्थातच आक्षेपर्ह असे ट्विट होते आणि यावर दोन्ही बाजूंनी गोंधळ झाला आणि अभिजितरावांचे ट्विटर अकाउंट धारातीर्थी पडले.
यावर शेह्ला रशीदची तिची बाजू मांडणारी ही पोस्ट,
https://www.facebook.com/ShehlaRashidOfficial/posts/129243290974403
यालाच समांतर दुसरी घटना म्हणजे त्यातच परेश रावल यांनी 'दगडफेकीसमोर काश्मिरी तरुणाऐवजी च यांनाच बांधून न्यायला हवे होते' अशा अर्थाचे ट्विट टाकले (याला अरुंधती रॉय यांचे आधीचे विधान कारणीभूत होते).
-
-
या ट्विटवर देखील गदारोळ सुरु होता आणि ते ट्विट डिलिट करावे अशी ट्विटर कडून परेश रावल यांना सूचना आली होती.
या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर आधीच अजानसंबंधित ट्विटवेळी 'असहिष्णुता' सहन करावी लागलेल्या सोनू निगमने निषेध म्हणून ट्विटर अकाउंट बंद करत असल्याची घोषणा केली पण त्याच वेळी त्याने होत असलेल्या दुजाभावाबद्दल सविस्तर लिहिले.
-
-
एरवी याकडे दुर्लक्ष केले असते पण सोनूने काही रोचक मुद्दे मांडले आहेत जे नक्कीच चर्चा करण्याजोगे, विचार करण्याजोगे आहेत असं वाटलं.
१९ वा मुद्दा नक्कीच पटला, तो म्हणे ' मी डावा अथवा उजवा नाही. इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करतो पण इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.
याच बरोबर अधिक महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठवर आणि कशाच्या परिमाणावर आखायच्या. तर मग अभिजितची कमेंट ही कितीही घृणास्पद वाटली तरी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून स्वीकारायची का? नसेल तर 'इंडिया मुर्दाबाद' ही घोषणा अथवा एखाद्या अभिनेत्रीबद्दलची बातमी एखाद्या व्यक्तीस हिडिस/घृणास्पद वाटली त्याचे काय करायचे ?
एक महिला गौतम गंभीरला जीपला बांधण्याची (त्या काश्मीरच्या घटनेच्या रेफरन्सने) कमेंट करु शकतो पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते?
एखाद्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीच्या(पब्लिक फिगर) बद्दल जेव्हा कमेंटस येतात तेव्हा त्यांनी त्या 'व्यक्तिगत हल्ला' म्हणत तक्रार करणे कितपत योग्य आहे जेव्हा याच व्यक्ती इतर पब्लिक फिगर्स बद्दल टिका करताना (उ.दा. मोदींचे वैवाहिक जीवन, दिग्विजय सिंह यांचा पुनर्विवाह) याचा किती विचार करतात?
या संदर्भात सोनू निगम काही विचार करण्याजोगे मुद्दे मांडेल असे कधी वाटले नव्हते पण झाले आहे खरे.
-
एरवी याकडे दुर्लक्ष केले असते पण सोनूने काही रोचक मुद्दे मांडले आहेत जे नक्कीच चर्चा करण्याजोगे, विचार करण्याजोगे आहेत असं वाटलं.
१९ वा मुद्दा नक्कीच पटला, तो म्हणे ' मी डावा अथवा उजवा नाही. इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करतो पण इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.
याच बरोबर अधिक महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठवर आणि कशाच्या परिमाणावर आखायच्या. तर मग अभिजितची कमेंट ही कितीही घृणास्पद वाटली तरी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून स्वीकारायची का? नसेल तर 'इंडिया मुर्दाबाद' ही घोषणा अथवा एखाद्या अभिनेत्रीबद्दलची बातमी एखाद्या व्यक्तीस हिडिस/घृणास्पद वाटली त्याचे काय करायचे ?
एक महिला गौतम गंभीरला जीपला बांधण्याची (त्या काश्मीरच्या घटनेच्या रेफरन्सने) कमेंट करु शकतो पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते?
एखाद्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीच्या(पब्लिक फिगर) बद्दल जेव्हा कमेंटस येतात तेव्हा त्यांनी त्या 'व्यक्तिगत हल्ला' म्हणत तक्रार करणे कितपत योग्य आहे जेव्हा याच व्यक्ती इतर पब्लिक फिगर्स बद्दल टिका करताना (उ.दा. मोदींचे वैवाहिक जीवन, दिग्विजय सिंह यांचा पुनर्विवाह) याचा किती विचार करतात?
या संदर्भात सोनू निगम काही विचार करण्याजोगे मुद्दे मांडेल असे कधी वाटले नव्हते पण झाले आहे खरे.
💬 प्रतिसाद
(135)
ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 05/25/2017 - 14:07
नवीन
ट्वीटरवर अकाऊंट डिलीट झाले / बॅन झाले तर काय झाले ? अनेक जन्म घेणारे डु आयडी घेऊन अजेंडा पुढे लोटत रहावा की. अॅडमीनला देखील काही मर्यादा असतात त्याचा काही लाभ घ्यावा ना !
नसेल जमत तर एकदा मिपावर येऊन अभ्यास करा म्हणावं !
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/25/2017 - 14:36
नवीन
गेल्या काही वर्षात अरूंधती रॉय काय काय बरळली आहे हे बघा--
१. Kashmir needs freedom from India
२. Kashmir should get Azadi from bhookhe-nange Hindustan हे "आझादी द ओन्ली वे" या सेमीनारमध्ये बोलली होती.
३. संसदेवर हल्ला करायच्या भयंकर प्रकाराबद्दल तीन स्तरीय न्यायालयीन प्रक्रीया आणि राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज यानंतर भविष्यात फासावर गेलेल्या अफजल गुरूविषयी ती हे म्हणत आहे. या लेखातील काहीकाही वक्तव्ये बघून तळपायाची आग मस्तकातच जाते. "Not surprisingly, PM A.B. Vajpayee seized the opportunity to compare the assault to the September 11 attacks in the US that had happened only three months previously." यात 'Not surprisingly' लिहायचे कारण काय? म्हणजे वाजपेयी असे काहीतरी होऊ दे आणि मग आपल्याला शेजारच्या देशातील शांतीप्रिय धर्माच्या कनवाळू अनुयायांवर त्याचे खापर फोडता येईल याची वाटच बघत होते तर.
४. इथे म्हटले आहे की सलमान रश्दी आणि इतरांनी २६/११ च्या हल्ल्यांचा काश्मीर प्रश्न, गुजरात दंगली आणि बाबरीप्रकरणाशी संबंध जोडायच्या अरूंधती रॉयच्या प्रयत्नांवर टिका केली. अरूंधतीने असे काही म्हटले होते याची डायरेक्ट लिंक अजून मिळालेली नाही पण तिचा पूर्वेतिहास लक्षात घेता ती असे काहीतरी बरळली असेल याविषयी तीळमात्र शंका नाही.
हे असले काहीतरी वाचले की वाटते की सर्जिकल स्ट्राईक्स पाकिस्तानात नाही तर अरूंधती रॉयच्या आणि इतर दिडशहाण्या बुबुडाविपुमाधविंच्या घरी आणि जे.एन.यु मध्ये करायला हवेत. ही असली अंतर्गत किड नष्ट व्हायला हवी.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 05/25/2017 - 15:30
नवीन
सच्चिदानंद,
तुमचा प्रश्न समर्पक आहे. उदाहरण देऊन सांगतो.
आज सौदी अरेबियाकडून येमेनमधल्या निरपराध मुस्लिमांची कत्तल चालू आहे. भारतातल्या मुस्लिम नेत्यांनी याविरुद्ध तोंडातून ब्र तरी काढलेला ऐकलाय का कोणी? मी हिंदुत्ववादी असूनदेखील या निरपराध्यांच्या संहाराचा निषेध करतो. यावरून हिंदूहितैषी भूमिका सर्वसमावेशक आहे हेच सिद्ध होत नाही काय?
उत्तर प्रदेशांतल्या निवडणुकींत मुस्लिमांनी याच कारणासाठी भरभरून मोदींना मतं दिली. मुस्लिम नेत्यांच्या मागे गेलं तर इथल्या मुस्लिमांची गत येमेनप्रमाणेच होणार हे सगळ्यांना कळतं.
भारतातल्या मुस्लिमांचे नेते म्हणवणारे लोकं सौदीचा पैसा खायला चटावलेत. म्हणूनंच टोकदार हिंदूहितैषी भूमिकेतंच बिगर हिंदूंचंही सौख्य सामावलेलं आहे.
आ.न.,
-गा.पै.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/25/2017 - 17:56
नवीन
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Fri, 05/26/2017 - 07:50
नवीन
जेएनयूला अजून किती प्रसिद्धी देत राहणार? जेएनयूमधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल जी काही कौतुकसुमने उधळली जातात, त्यांच्यात फार काही तथ्य असल्याचे तिथले विद्यार्थ्यांचे निबंध-प्रबंध(किमान माझ्या विषयातले) बघता वाटत नाही. अफाट प्रमाणात मिळणारे फंड्स, हे तिथल्या रिसर्च प्रोजेक्ट्सचे रहस्य आहे. हल्लीच पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर योग्य ती मर्यादा घालून तिथल्या मनमानीला थोडासा आळा घालायला सुरुवात झालेली आहे. विरोधी मत प्रवाहात असणं योग्य, पण त्याला अनुसरून बौद्धिक मक्तेदारीबद्दल तिथे जो काही उद्धटपणा चालतो, त्याला अजिबात भाव न देणं, हाच उपाय योग्य आहे, असं वाटतं.
आणि अगदी हेच जेएनयूच्या विचारधारेच्या थेट विरुद्ध विचार असणाऱ्या, पण तेवढ्याच उद्धटपणे त्याचं टोकाचं समर्थन करणाऱ्या लोकांबद्दलही वाटतं.
बाकी विचारांनी प्रतिवाद करणं वगैरेला तर मिपावरही अर्थ राहिलेला नाही. जमाना चिखलफेकीचा आहे. पांढरे कपडे घातलेत, तर खराब होणारच. एक तर ते सहन करा, नाहीतर चिखल दिसणार नाही अशा रंगांचे कपडे घाला..
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 05/26/2017 - 08:13
नवीन
विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा हे मान्य. पण जर ते तथाकथित विचार 'भारत तेरे तुकडेतुकडे होंगे, तबतक हम चैन से नही बैठेंगे, इन्शाल्ला' वगैरे असतील तर असल्या विचारांना ते सौजन्य अजिबात नाही. बाकी मुद्द्यांवर चर्चा करायला काहीही हरकत नाही. काहीही झाले तरी भारत देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता इत्यादी गोष्टींविषयी कोणतीही तडजोड नाही. त्या फ्रेमवर्कमध्ये राहूनच कोणतेही मुद्दे मांडावेत. काहीही हरकत नाही. पण गेल्या तीनेक वर्षात अनेक लोक ही गोष्ट सोयीस्करपणे विसरले आहेत आणि असेच लोक असहिष्णुता वाढली अशी उलटी कोल्हेकुईही करत आहेत. तेव्हा विचारांचा मुकाबला विचारांनीच करायला हवा यातील हा एक फरक नक्कीच लक्षात घ्यायला हवा. असो.
It is better to be alive and hated than be dead and loved.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 05/26/2017 - 08:47
नवीन
गॅरी ट्रुमन,
तुमच्या या कथनाशी शंभर टक्के सहमत आहे. सुझान अरुंधती रॉय या बाईकडे वैचारिक भूमिका आहे असा काहीसा आभास उत्पन्न केला जात आहे. प्रत्यक्षात ही बाई भारताच्या वाईटावर तपोन बसलेली आहे. हिच्यासमवेत चर्चा होऊच शकंत नाही. सभ्य माणसांचे नियम हिला लावता येत नाहीत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 05/26/2017 - 09:33
नवीन
अरूंधती रॉयच्या विचारांचा मुकाबला विचारांनी करणे असे म्हणणे आणि हातात चाकू ठेऊन आपल्या गळ्यावरून तो चाकू कधीनाकधी फिरवायची इच्छा बाळगून असलेल्या कोणाबरोबर सौजन्याने वागावे आणि त्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनी करावा असे म्हणण्यासारखे झाले. १३ डिसेंबर २००१ च्या त्या महाभयानक प्रकारातून आपला देश कसा काय वाचला याचेच आश्चर्य वाटते. खरे तर खासदार , मंत्री, कदाचित पंतप्रधानांनाही ओलीस ठेवणे असले काहीतरी घडायचे त्या दिवशी. आणि त्या प्रकारात सहभागी असल्याबद्दल कायद्याच्या प्रक्रीयेतून फासावर गेलेल्या कोणाविषयीही सहानुभूती ठेवणे म्हणजे आपल्या गळ्यावरून चाकू फिरवायची इच्छा असल्यासारखेच झाले.
अरूंधती रॉय सारख्यांविषयी कोणतीही सहानुभूती मला तरी नाही. इतरांचे माहित नाही.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 05/26/2017 - 10:26
नवीन
ट्रुमनसाहेब,
तुम्ही म्हटलंय कि एका ठराविक लिमिटमध्येच विचारांचा विचाराने मुकाबला करता येतो. या लिमिट्स कोणत्या असल्या पाहिजेत?
माझ्या दृष्टीने जोपर्यंत शांततेच्या मार्गाने एखादी व्यक्ती विचार व्यक्त करत आहे, कोणत्याही हिंसेला प्रोत्साहन देत नाही आहे - तो पर्यंत विचारांचा मुकाबला विचाराने करता येतो.
समजा सगळे काश्मीरी लोक म्हणाले कि आम्ही अहिंसक असहकार आंदोलन करतो - आमची मागणी आहे कि भारतातून आम्हाला वेगळे व्हायचे आहे, स्वतः चे सरकार स्थापन करायचे आहे. तर भारत सरकारने काय करायला हवे असे तुम्हाला वाटते? (अश्याच मागण्या करून आपल्याला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले नाही का?)
एक कल्पना सुचली. असा एखादा काल्पनिक संवाद लिहिता येईल का - काश्मीर आझादी वाला एखादा तरुण/तरुणी आपले आझादीचे मुद्दे मांडत आहे आणि अखंड भारतवाला त्याला समजावून सांगत आहे?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 05/26/2017 - 10:32
नवीन
काश्मीरात गांधीजी आणि गौतम बुद्ध यांना लाजवेल अशा पध्दतीने अगदी अहिंसात्मक आंदोलनच चालू आहे ना? अफजल गुरू दिल्लीत संसदभवनावर पदयात्रा करत गेला होता की नाही? काय बोलता राव?
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 05/26/2017 - 10:48
नवीन
तुम्हाला मी हायपोथेटिकल प्रश्न विचारला आहे. "समजा" हा शब्द कृपया लक्षात घ्या.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 05/26/2017 - 10:52
नवीन
संसदेवर बॉम्ब टाकणे वगैरे गोष्टी अहिंसेत बसत नाहीत, म्हणून त्याचा सम्बन्ध माझ्या प्रतिसादाशी कृपया लावू नये.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 05/27/2017 - 05:13
नवीन
हायपोथेटिकल प्रश्न जरूर विचारावेत पण त्या हायपोथेटिकल परिस्थितीचा वास्तविकतेशी दुरूनदुरूनपर्यंत संबंध लागत नाही अशी परिस्थिती नको.उद्या कोणी हायपोथेटिकल प्रश्न विचारला---"समजा माणूस गुहेतून बाहेर पडलाच नसता तर" आणि यातील "समजा" हा शब्द कृपया लक्षात घ्या तर त्याला काय कप्पाळ उत्तर देणार? तद्वतच काश्मीरात जे काही चालू आहे त्याच्याशी "समजा" अहिंसक पध्दतीने असते तर काय अशाप्रकारचे प्रश्न विचारले तर त्याला काय डोंबल उत्तर देणार?
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Sat, 05/27/2017 - 07:41
नवीन
तुम्ही वरती म्हटले होते कि भारताच्या अखण्डतेच्या विरोधात जे बोलतील त्यांच्या विचारांचा विचाराने मुकाबला करता येणार नाही.
मी त्याला एक्सेप्शन दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. समजा काश्मिरी सेपरेटिस्ट लोकांनी गांधीजीचा मार्ग अवलंबला तर ..
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 05/26/2017 - 12:12
नवीन
बाकी चालू द्या. फक्त
याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे. हे एव्हढेच कारण पुरेसे नव्हते याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही. किंबहुना या गोष्टीची स्वातंत्र्य मिळवून द्यायची क्षमता २०% पण नव्हती असे वाटते. अर्थात त्याचे इतरत्र काही अत्यंत महत्वाचे चांगले परिणाम झालेत, त्यामुळे ही गोष्ट कुचकामी नव्हती याबद्दलही माझ्या मनात मुळीच शंका नाही. तरी पण.
असो. अवांतर नको. चालू द्या.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Sat, 05/27/2017 - 09:18
नवीन
जेएनयूला एकूणच अवास्तव महत्व दिलं जातं एवढंच माझं म्हणणं आहे. जेएनयू महत्वाची संस्था आहे, पण म्हणून तिथे कुणीही उठून काहीही बोलला की त्याला प्रसिद्धी मिळावी, त्यावर खासदारांसकट लोकांनी प्रतिक्रिया द्यावी, एवढी महत्वाची आहे का? तिकडे नक्की काय चालतं, हे सरकारला खरंच माहीत नसेल? आणि सरकार त्यावर काहीच कारवाई करत नसेल? तिथली काही आचरट टाळकी येऊन सोशल मीडियावर हैदोस घालतात, तशीच आरडाओरडा करून सरकारने कारवाई करावी का?
माझा आक्षेप दुसर्या बाजूच्या आक्रस्ताळ्या प्रतिक्रियेला आहे.
इतकी दशके ज्यांनी सरकारसकट अनेक गोष्टींची ढाल करून बौद्धिक मक्तेदारी मिरवली, त्यांना जमिनीवर आणणं इतक्या कमी काळात व्हावं अशी अपेक्षा का? 'भारत तेरे टुकडे होगे' सारख्या घोषणा काय फक्त या तीन वर्षात जन्माला आल्या? संशोधनासाठी घेतल्या जाणार्या विद्यार्थीसंख्येवर नियम कडक करून मर्यादा आणणे, इतक्या सटल पातळीवरून तिथे काही ना काही होत आहे. होतील गोष्टी..हळूहळू.
तुम्ही ज्या पद्धतीने रॉय वगैरे लोकांना मोदींचे ब्रँड अँबासिडर म्हणता, त्याप्रमाणे या जेएनयू विरोधात सोशल मीडियावर पेटलेल्या लोकांनीच जेएन्यू मधील या टाळक्यांचा भाव वधारून ठेवला आहे.
आणि हो, विचारांचा विचारांनी विरोध हा याच काय, कुठल्याही संदर्भात होणं बंद झालेलं आहे, हे मिपावरसुद्धा दिसतं हे मी माझ्या प्रतिसादात लिहिलेलं होतं. त्याला डावे-उजवेपणाच्या किंवा कुठच्याही विचारसरणीच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. त्यामुळे जमाना चिखलफेकीचा आहे एवढंच खरं.. प्रतिवाद महत्वाचा, प्रतिसाद नाही, ही प्रवृत्ती आजच्या काळाचीच आहे, हे दुर्दैवी सत्य आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/27/2017 - 14:36
नवीन
अबोली ताई
एकदा वेगळ्या तर्हेने विचार करून पहा.
पूर्वी सामाजिक माध्यमे म्हणजे काय होतं तर पत्रकार जे तुम्हाला सांगतील तेच सत्य होतं आणि त्याचा प्रतिवाद करणे म्हणजे वाचकांनी लिहिलेलीपात्रके यापैकी स्वतःला सोयीस्कर असणारी पत्रकेच फक्त प्रसिद्ध होती. म्हणजेच काय तर सर्व सामान्य माणसाला आवाजच नव्हता. पत्रकार लिहितील तोच सामान्य माणसाचा आवाज होता पेक्षा समजला जात होता.
आता फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अँप सरकय्या माध्यमांमुळे सामान्य माणसालाही बोलता येऊ लागले आहे. आणि त्याचा आवाज हा पत्रकाराच्या गाळणीतून गळेल तसा आणि तेवढाच न राहता यथातथ्य रूपाने इतरांपर्यंत पोहोचू लागला आहे. यामुळेच पत्रकारितेची विश्वासार्हता आता पणाला लागली आहे. आणि यामुळेच हे सर्व डावे लोक ( ज्यांच्याकडे प्रचार माध्यमांचा मक्ता होता) ते उघडे पडले आहेत. त्यातून त्यांचा पाश्चात्य देशातून होणार पैशाचा ओघ आटला आहे शिवाय मोदी सरकारने त्यांचा रमणा बंद केला आहे.
अर्थात सामाजिक माध्यमे यात बऱ्याच लोकांनी आवाज उठवला आहे म्हणून आवाज (आणि त्याबरोबर गोंगाटही) जास्त झाला आहे. आणि याचा चिखलफेक करणारे लोकहि फायदा उठवतात हे गृहीत धरले तरीही एकांगी पत्रकारिता बंद झाली आणि सत्य जास्त प्रमाणावर उघड होऊ लागले आहे हि वस्तुस्थिती लक्षात घ्यावीच लागेल.
यामुळेच राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सुमार केतकर सारखे एकांगी विचारसरणीचे पत्रकार यांची चलती बंद झाली हि हि वस्तुस्थिती आहे.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Mon, 05/29/2017 - 11:55
नवीन
हे पटलं.
- Log in or register to post comments
उ
उपेक्षित
Fri, 05/26/2017 - 09:12
नवीन
लाख वेळा सहमत पिशी ताई, अरुंधती रॉय काहीही बडबड करो पण सत्ताधारी पक्षाचा एक जबाबदार (?) खासदार या नात्याने परेश रावळने असली विधाने टाळली पाहिजे.
बाकी विजय तेंडूलकर यांच्या विधानाची तुलना परेश भौंशी केलेली पाहून लयीच करमणूक वगेरे झालेली आहे. साला लोक कुठला विदा कधी कुठ वापरून समर्थन करत बसतील काय भरोसा नाय राहिला.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 05/26/2017 - 12:18
नवीन
वा वा. तुम्हाला हळूहळू लोकसत्तामध्ये नोकरी बघायला हरकत नाही.
परवाच जेम्स बाँडला मोठे ठरवताना त्याने रजनीकांतबद्दल तारे तोडलेत. कदाचित रजनीकांत भाजपाच्या जवळ जात आहे म्हणून देखील त्याला त्रस होत असेल. तशीच तुलना तुम्ही देखील करत आहात म्हणून म्हटले.
व्यक्तिशः मला विजय तेंडुलकरांची जबाबदारी जास्त वाटते, कारण त्यांना समाज (पुरोगामी) किमान गांभीर्याने घ्यायचे, पण तेव्हा त्यांना हेच ज्ञान शिकवायला कोणीही आले नव्हते. कारण हे त्यांच्या मनातले बोलत होते. आणि आता त्याअंच्यावर बाजू उलटत चाललीय म्हणून असे चालू आहे. असो.
तुम्ही कोणत्या पदावर आअहात त्यापेक्षा तुम्हाला समाजात किती मान आहे यावर तुमची जबाबदारी ठरते असे मला वाटते.
- Log in or register to post comments
उ
उपेक्षित
Fri, 05/26/2017 - 17:46
नवीन
आनंदा माझ्या नोकरीची उठाठेव तू नको करूस, आणि मुद्दा पटला नसेल तर शांतपणे प्रतिवाद कर उगाच फालतू सल्ले देऊ नकोस परत दिलेस तर तुला आणि तुझ्या सल्ल्याला फाट्यावर मारण्यात येईल.
मला जे वाटते ते मी स्पष्टपणे कुणालाही टार्गेट न करता बोललो आहे बाकी चालू दे तुझे.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 05/26/2017 - 08:50
नवीन
का बरे ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 05/26/2017 - 11:22
नवीन
याला भारताच्या वाईटावर टपून बसणे म्हणतात :
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 05/26/2017 - 12:19
नवीन
फोटो वरुन काही समजले नाही.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 05/26/2017 - 13:46
नवीन
मराठी_माणूस,
मी खुलासा करायला हवा होता. राहून गेल्याबद्दल क्षमस्व. वरील चित्रात सुझन अरुंधती रॉय ही महिला यासीन मलिक नामे फुटीरतावाद्यास हात धरून पुढे नेत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया हा लेख वाचा म्हणून सुचवेन : https://tribune.com.pk/story/68010/author-arundhati-roy-defends-kashmir-statements/
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 05/26/2017 - 18:03
नवीन
बरेचसे मिपाकर रॉयविरुद्ध आगपाखड करत आहेत म्हणजे त्या काहीतरी चुकीचं करत आहेत यात शंका नाही. पण मग त्यांच्याविरोधात सरकारकडून कायदेशीर कारवाई का होत नाही?
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Fri, 05/26/2017 - 19:00
नवीन
हा प्रश्न नेमका आहे. याचे उत्तर जाणून घ्यायला आवडेल.
- Log in or register to post comments
म
मारवा
Sat, 05/27/2017 - 03:32
नवीन
मिपाकर आगपाखड ............
म्हणजे अभुक अमुक असेलच .......यात शंकाच नाही..... ???
इतकी निरागसता
इतका प्रांजलपणा
हा सुर्य. प्रुथ्वी भोवतीच फिरतो वाले, नंतर इतक्या शुध्द स्वरुपात आसारामारहीमांदी च्या
च्या.
शिष्यामध्ये आढळतो.
पण एखाद्या संस्थळाप्रती इतकी निष्ठा
वॅाव वाॅव
मजा आ गया
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 05/27/2017 - 04:58
नवीन
ते लहान मुलांसाठी नव्हतं लिहीलं =))
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/27/2017 - 08:39
नवीन
कसं सुचतं हे असं ?! =))
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 05/27/2017 - 05:19
नवीन
या असल्या लोकांच्या बाबतीत मोदी पाहिजे तितका कणखरपणा दाखवू शकलेले नाहीत हे नक्कीच.
कदाचित अजूनही विचारवंतांची मिडिया, शिक्षणसंस्था इत्यादी ठिकाणची पकड मोडून काढायच्या स्थितीत ते नाहीत. आणि असल्या विचारवंतांना कायमचे देशोधडीस लावायची ताकद मोदींना मिळावी यासाठी मी माझा खारीचा वाटा २०१९ मध्ये उचलणार आहेच.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/27/2017 - 06:03
नवीन
श्री मोदींना माहित आहे कि अरुंधती रॉय सारख्या देशद्रोहींना सामान्य माणूस ओळखत सुद्धा नाही( जो मोदींचा मतदार आहे). हे पुरस्कार वापसी मेणबत्ती मोर्चा सारख्या स्टण्ट मध्ये सामान्य माणसाला मुळीच रस नसतो. त्याच्या रोजच्या जीवनात अशा गोष्टींनी काहीच फरक पडत नाही.
मोदींनी तर "खूनी" म्हणणाऱ्या पत्रकारांनापण खेटराने "ही" विचारले नाही
चार डावे पत्रकार, विकाऊ पाश्चात्य मीडिया आणि साडेतीन पुरोगामी त्यांचा उदो उदो करतात ज्याने मोदींचे शष्प बिघडत नाही. उगाच डोंगर पोखरून उंदीर काढण्यात त्यांना रस नाही.
श्री अरुण जेटलींनीं श्री अरविंद केजरीवालांची न्यायालयात खटला दाखल करून गोची करून ठेवली आहे वर आगाऊ वक्तव्य केल्याबद्दल बदनामीच्या खटल्यात अतिरिक्त १० कोटींची रक्कम जेटलींनी जोडली आहे म्हणून आता केजरीवालांनी राम जेठमलानींकडून आपले वकीलपत्र काढून घेतले आहे. त्यामुळे जेठमलानींना पण तोंडघशी पडल्याची भावना अली आहे.
कोणाची उपद्रव क्षमता किती आहे, अरुंधती रॉय शोभा डे सारख्या बायकांची लायकी काय आहे हे त्यांना माहित आहे. त्यामुळे असल्या फडतूस लोकांच्या मागे लागून आपला अमूल्य वेळ वाया घालवण्यात शहाणपणा नाही हे हि ते चांगले जाणून आहेत.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 05/27/2017 - 06:12
नवीन
उत्तर काहीसं असंच असेल असे वाटले होते. मात्र हाच कित्ता इतरांनीही गिरवावा असे वाटते.
वर मारवा यांच्या प्रतिसादाची मला मौज वाटली. त्यांनी अरुंधती रॉय यांच्या उतार्यांची झापडे लावल्याने त्यांना माझा उपहासात्मक तटस्थ प्रश्नही कळला नाही.
- Log in or register to post comments
स
सचिन७३८
Fri, 05/26/2017 - 14:04
नवीन
याच, अगदी याच कारणांमुळे २०१४ साली ‘मोदी का येऊ नये?’ येथपासून आता येणाऱ्या २०१९ साली ‘मोदी या कारणांमुळे यावेत’ अशा काहीशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 05/26/2017 - 17:21
नवीन
मोदींचे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्स प्रभावी आहेतच तितके.
यांचा विरोध मोदी सरकारला आहे की भारत देशालाच आहे असा प्रश्न पडावा यांची अशी वर्तणूक आहे. मोदी सरकारला विरोध असला तर तसा विरोध करायचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरीकाला आहे. पण मोदी सरकारला विरोध म्हणून संसदेवर हल्ला करण्यासारख्या महाभयानक प्रकारात हात असलेल्याचे समर्थन करायचे आणि असे समर्थन करणार्यांची तळी उचलून धरायचे कारण काय? यातूनच होत असे आहे की अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे मोठेमोठे उच्चभ्रू विचारवंत सोडले तर देशावर प्रेम असलेल्या सामान्य भारतीयापुढे असे चित्र उभे राहात आहे की हे विरोधक मोदींना विरोध करायच्या नावावर देशालाच विरोध करत आहेत. यातूनच देशाच्या हिताची केवळ मोदींना पडलेली आहे आणि सगळ्या विरोधकांना देशद्रोह्यांचा कळवळा आहे असे चित्र आपसुकच उभे राहात आहे. मोदी हे बघून मनातल्या मनात किती समाधानी असतील!! म्हणूनच मी असल्या लोकांना मोदींचे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्स म्हणत आहे. जसे मणीशंकर अय्यर, केजरीवाल असे मोठेमोठे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्स आहेत तसेच फेसबुक, मिसळपाव इत्यादी ठिकाणी छोटेछोटे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्सही आहेतच. या चर्चेतही ते आलेच आहेत.
एकूणच काय की गेल्या तीन वर्षात मोदी सरकारच्या कामगिरीवर तारतम्याने भाष्य करणे आणि सरकारच्या कमतरता काय आहेत हे व्यवस्थित पध्दतीने लोकांसमोर मांडण्यात विरोधी पक्ष अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण अपयशी ठरले आहेत. जर मोदी २०१९ मध्ये परत निवडून आले तर ते सरकारची कामगिरी दृष्ट लागण्यासारखी वगैरे आहे म्हणून नक्कीच नाही तर या असल्या विरोधी पक्षांमुळे आणि या ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्समुळे निवडून येतील.
- Log in or register to post comments
म
मारवा
Fri, 05/26/2017 - 18:24
नवीन
तिबेट हॅंगकाॅंग --चायना चा भुभाग
पण भारताला असे बांगलादेश संदर्भात वाटले नव्हते
सध्या तिबेट संदर्भात वाटत नाही.
भारताचा भुभाग अरुणालल प्रदेश
पण चायनाला ते मान्य नाही.
ढीगभर या जमीनीच्या वादाची उदाहरणे पाचही
खंडात आहेत.
यातला कुठलाही स्टेक होल्डर बाजु लढवणारा केवळ
अमुक एक बाजुचा या केवळ एकाच निकषावर
निर्वीवाद गुन्हेगार ठरतो की
त्याची मागणी व त्या मागील मांडणी यावर त्याची केस वरचढ दखलपात्र ठरते
असे आहे म्हणुनच तिबेट व बांगलादेश ही भुमिका घेण्याची योग्य केस आहे.
फाळणी च्या वेळी ही केवळ बाजु वेगळी मागणी म्हणुन चुकच असे नव्हतेच
इट इज डीबेटेबल
- Log in or register to post comments
म
मारवा
Fri, 05/26/2017 - 18:39
नवीन
३
What's a country? It's just an administrative unit, a glorified municipality. Why do we imbue it with esoteric meaning and protect it with nuclear bombs? I can't bow down to a municipality... it's just not intelligent. The bastards will do what they have to do, and we'll do what we have to do. Even if they annihilate us, we'll go down on the other sid
४
Every people, every society, needs a culture of resistance, a culture of being difficult and disobedient, that is the only way they will ever be able to stand up to the inevitable abuse of power by whoever runs the state apparatus, the capitalists, the communists, the socialists, the Gandhians, whoever.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Fri, 05/26/2017 - 23:05
नवीन
नका हो असे अवघड विचार मांडू इथे ;) काही लोकांना घाबरायला होतं.
बाय द वे, या विधानांचा स्रोत काय?
चा अर्थ काय अपेक्षित आहे?
- Log in or register to post comments
म
मारवा
Fri, 05/26/2017 - 18:45
नवीन
५
Nationalism of one kind or another was the cause of most of the genocide of the twentieth century. Flags are bits of colored cloth that governments use first to shrink-wrap people's minds and then as ceremonial shrouds to bury the dead.
६
To love. To be loved. To never forget your own insignificance. To never get used to the unspeakable violence and the vulgar disparity of life around you. To seek joy in the saddest places. To pursue beauty to its lair. To never simplify what is complicated or complicate what is simple. To respect strength, never power. Above all, to watch. To try and understand. To never look away. And never, never to forget.
- Log in or register to post comments
म
मारवा
Sat, 05/27/2017 - 04:19
नवीन
यातीलच हा एक तुकडा त्यांच्यातील संवेदनशीलता दर्शवणारा
At times there's something so precise and mathematically chilling about nationalism.
Standing at the exact spot where his house once stood, on land acquired for the canal.
Build a dam to take water away from 40 million people. Build a dam to pretend to bring water to 40 million people.
Who are these gods that govern us? Is there no limit to their powers?
The last person I met in the valley was Bhaiji Bhai. He is a Tadvi tribal from Undava, one of the first villages where the government began to acquire land for the Wonder Canal and its 75,000 kilometre network. Bhaiji Bhai lost seventeen of his nineteen acres to the Wonder Canal. It crashes through his land, 700 feet wide including its walkways and steep, sloping embankments, like a velodrome for giant bicyclists.
The Canal network affects more than two hundred thousand families. People have lost wells and trees, people have had their houses separated from their farms by the canal, forcing them to walk two or three kilometres to the nearest bridge and then two or three kilometres back along the other side. Twenty-three thousand families, let's say a hundred thousand people, will be, like Bhaiji Bhai, seriously affected. They don't count as 'Project-affected' and are not entitled to rehabilitation.
Like his neighbours in Kevadia Colony, Bhaiji Bhai became a pauper overnight.
Bhaiji Bhai and his people, forced to smile for photographs on government calendars. Bhaiji Bhai and his people, denied the grace of rage. Bhaiji Bhai and his people, squashed like bugs by this country they're supposed to call their own.
It was late evening when I arrived at his house. We sat down on the floor and drank over-sweet tea in the dying light. As he spoke, a memory stirred in me, a sense of deja vu. I couldn't imagine why. I knew I hadn't met him before. Then I realised what it was. I didn't recognise him, but I remembered his story. I'd seen him in an old documentary film, shot more than ten years ago, in the valley. He was frailer now, his beard softened with age. But his story hadn't aged. It was still young and full of passion. It broke my heart, the patience with which he told it. I could tell he had told it over and over and over again, hoping, praying, that one day, one of the strangers passing through Undava would turn out to be Good Luck. Or God.
Bhaiji Bhai, Bhaiji Bhai, when will you get angry? When will you stop waiting? When will you say `That's enough!' and reach for your weapons, whatever they may be> When will you show us the whole of your resonant, terrifying, invincible strength?
When will you break the faith? Will you break the faith? Or will you let it break you?
लेखांचा दुवा
http://www.narmada.org/gcg/gcg.html
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 05/27/2017 - 04:35
नवीन
सरकारच्या विरोधात शस्त्रे उचला सांगणे म्हणजे संवेदनाशीलता? मग त्या स्वतः नक्षली किंवा माओवाद्यांना जॉईन का होत नाहीत?
- Log in or register to post comments
म
मोदक
Sat, 05/27/2017 - 04:56
नवीन
Who knows...
- Log in or register to post comments
म
मारवा
Sat, 05/27/2017 - 06:02
नवीन
तुम्ही
वरचा
पॅरा तील प्रसंग वाचण्याची तसदी तरी घेतलीत का हो '
मी संवेदनशील का म्हणालो ते ...
असो
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 05/27/2017 - 06:14
नवीन
वाचलं म्हणूनच लिहिलंय. कोणीही संवेदनाशील आणि डोके ठिकाणावर असलेला माणूस शस्त्र उचला म्हणून सांगणार नाही. इथे मिपावरच चिगो नावाच्या एका आयडीने एका सरकारी अधिकार्यावर जीवघेणा हल्ला दोन वेळा कसा झाला ते लिहिले होते ते शोधून वाचायची तसदी तुम्हीसुद्धा घ्या. आणि मग असल्या चिथावणीखोर लोकांना संवेदनाशील वगैरे म्हणणे थांबवा. तिने जर शस्त्र उचलण्याची भाषा केली नसती तर ती ती संवेदनाशील आहे हे मी एकवेळ कबूल केले असते. पण सरकारविरोधात शस्त्र उचला सांगणे हा सरळ बुद्धिभेद करणे आहे. धर्माच्या नावावर जिहाद करा सांगण्यात आणि या सुझानताईंच्या बोलण्यात मला तत्त्वतः काही फरक दिसत नाही. कारण त्यांची संवेदनाशीलता सिलेक्टिव्ह आहे.
- Log in or register to post comments
स
सच्चिदानंद
Sat, 05/27/2017 - 15:20
नवीन
बास बास.. थोडक्यात विरोधाभास स्पष्ट केलात तुम्ही. आवडलं.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 05/27/2017 - 05:06
नवीन
हे टिपीकल डावे विचार आहेत आणि डावे लोक अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले की पळून जातात हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे मारवा केवळ अरूंधती काय बोलली आहे तेच कॉपी-पेस्ट करणार आणि विचारलेल्या प्रश्नांना मात्र उत्तरे देणार नाहीत याची खात्री आहे. माझा हा प्रतिसाद इतर मिपाकरांसाठी आहे.
बाकीचा फापटपसारा राहू दे. काही प्रश्नः
१. Why do we defend the nation using nuclear bombs हा प्रश्न कोण विचारत आहेत तर डावे. खो खो खो खो. डावे विचार मुळापासून फांद्यांपर्यंत पूर्ण गंडलेले असल्यामुळे आणि ते मनुष्य स्वभावाविरूध्द असल्यामुळे बाह्य सक्तीशिवाय ही व्यवस्था टिकणे अशक्य आहे. जगात कुठेही डाव्या राजवटी लष्करी दडपशाही, गुंडगिरी याच्याच जोरावर टिकून राहतात. ती पकड जरा ढिली पडली की या राजवटी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट होतात. हा अनुभव रशियात आला आहे, पूर्व युरोपात आला आहे. तेव्हा अरूंधती रॉयला उलटा प्रश्नः Why do you have to defend leftist polity using brute military force?
२. देश म्हणजे 'ग्लोरिफाईड म्युनिसिपालटी' वगैरे बोलणे कधी ठिक आहे? जेव्हा सगळे लोक तसाच विचार करतात तेव्हा. पाकिस्तानची स्थापना आणि अस्तित्व या दोन्ही गोष्टी केवळ हिंदूद्वेष आणि भारतद्वेष या पायावर आधारीत आहेत याकडे डावे लोक शहामृगाप्रमाणे वाळूत मान खुपसून दुर्लक्ष करत असतील. पण माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला मात्र तसे करता येणे शक्य नाही. अर्थात अरूंधतीचेही बरोबरच आहे म्हणा. तिला कसली आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांची भिती? तिला तर पाकिस्तानातील विधानसभेत सन्मानाने भारताविरूध्द बोलायला आमंत्रण येते.
पाकिस्तानातील बर्याच मोठ्या वर्गाला भारताविषयी आणि हिंदूंविषयी द्वेष वाटतो हे सत्य अरूंधतीसारखेच रेमेडोके नजरेआड करू शकतील.जोपर्यंत असे लोक आपल्या शेजारच्या देशात आहेत तोपर्यंत मला भारतीय आणि हिंदू म्हणवून घ्यावेच लागेल. कारण मी लाख स्वतःची ओळख 'माणूस' हिच सांगेन पण ते मला (एक सामान्य भारतीय या अर्थी) भारतीय आणि हिंदू म्हणूनच समजतात आणि त्यामुळे सगळ्या भारतीय आणि हिंदूंप्रमाणे मी पण त्यांच्या 'गळा कापायच्या' लीस्टवर आहेच.
बाकी पाकिस्तानविरूध्द माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला अत्यंत प्रखरपणे वाटते. पण तसे भूतान किंवा म्यानमारविषयी वाटत नाही हे का असले प्रश्न त्या अरूंधती रॉयसारख्यांना पडायचा नाहीच.
३. Why do we defend the nation using nuclear bombs हा प्रश्न अरूंधतीने कधी पाकिस्तान आणि चीनला विचारल्याचे ऐकिवात नाही. की त्यांचे देश हे अस्तित्व तिला मान्य आहे पण भारताचे मात्र नाही? डावे लोक नेमका हाच हलकटपणा कायम करत असतात.
४. देश ही संकल्पना मान्य नसेल तर मग पाकिस्तान या 'देशाचे' पित्ते असलेल्या हुरियतच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालताना तिला कसे काही वाटत नाही?
५. काश्मीर आणि उत्तर-पूर्व भारतातील लोकांना भारत या 'देशातून' बाहेर पडायचा अधिकार आहे असे तिचे म्हणणे असेल तर मग तसाच पाकिस्तानातून बाहेर पडायचा अधिकार बलुचिस्तान आणि सिंधमधल्या लोकांनाही आहे याविषयी ती काय बोलली आहे? बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कर काय करत आहे हे जगजाहिर आहे आणि तिथे पाकिस्तानातून बाहेर पडायला चळवळही चालू आहे. त्याविषयी अरूंधती कधी काही बोलल्याचे ऐकिवात नाही. पी.ओ.के मध्येही पाकिस्तानविरोधी निदर्शने होत असतात. मग त्या लोकांना पाकिस्तान या 'देशातून' बाहेर पडायचा अधिकार नाही वाटते? त्याविषयी ती कधी काय बोलली आहे? म्हणे भारत नागालॅन्डमध्ये 'अॅग्रेसर' आहे. मग पाकिस्तानने बलुचिस्तान अगदी प्रेमाचाच संदेश देत व्यापले होते की नाही? म्हणजे या लोकांचे सगळे तत्वज्ञान केवळ भारत या देशाविरूध्द. भारताविरूध्द चुरूचुरू बोलणार्या जीभेला असे काही प्रश्न विचारले की अगदी पक्षाघाताचा लकवा येतो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/27/2017 - 06:17
नवीन
ट्रुमन साहेब
कशाला डाव्यांच्या नादी लागताय.
There is nothing right about them.
त्यांनी चालवलेल्या राज्यांची परिस्थिती पहिली तर ते लक्षात येतेच.
मॉस्कोत पाऊस पडला कि इकडे छत्री उघडणारे लोक ते.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला विरोध करणारी मंडळी हि
भिकार** नुसते
अरुंधती रॉय याना एक बुकर पारितोषिक काय मिळाले त्यांनी जगातल्या सर्वच प्रश्नांवर तारे तोडायला सुरुवात केली.
आपण "लेखक" असलो म्हणजे आपल्याला सर्वच गोष्टीत सर्वच कळतं अशी धारणा असणारे हे लोक.
कुठे यांच्या नादाला लागता?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 05/27/2017 - 06:33
नवीन
असल्या लोकांच्या नादी लागण्यात शहाणपणा नाही हे नेहमीच कळते पण वळत नाही :( अरूंधती रॉय सारखे उपटसुंभ काहीतरी बरळणार आणि त्याची भलामण आपल्या मिपावर होताना दिसली तर खरच ते सहन होण्यापलीकडे जाते. तरीही असल्या लोकांपासून दूर राहावे हे कळलेले 'वळवायचा' प्रयत्न मात्र नक्कीच आहे.
- Log in or register to post comments
म
मारवा
Sat, 05/27/2017 - 04:28
नवीन
https://www.countercurrents.org/archive-roy.htm
http://www.weroy.org/arundhati_writings.shtml
- Log in or register to post comments
म
मारवा
Sat, 05/27/2017 - 04:28
नवीन
https://www.countercurrents.org/archive-roy.htm
http://www.weroy.org/arundhati_writings.shtml
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »