ती संध्याकाळ...
Primary tabs
संध्याकाळी ८. ३० ची वेळ होती. मी असाच ऑफिस मध्ये कामाच्या गडबडित होतो. तसा इतक्यात नेहमीच ऑफिस मढ़ना घरी जायला उशीर व्हयाचा. काम भरपूर होत. ती दिवसभर माझ्या सोबतच असायची. आम्ही दोघ एकाच मॉड्यूल वर आणि एकाच कंप्यूटर वर काम करायचो. तिच लग्न नुकताच झाला होत हे मला माहीत होत पण तरीही एक अनामिक ओढ़ आमच्यात होती. ती नेहमी म्हणायची की " मी तिला जरा उशीरा भेटलो"
मी कामात गुंग असतांना ती माझ्यासाठी काफी आणायची. आम्ही रात्री बर्याच वेळ पर्यंत गप्पा मारायाचो. नंतर मी तिला रात्री तिच्या घरी ड्राप करायचो.
तीन चार महीने कसे गेलेत कळलच नाही. दिवस असेच धुंदीत चालले होते. भविष्याचा जराही विचार न करता आमचा आयुष्याचा प्रवास चालला होता. आम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायचा. ऑफिस च्या सगळ्याच पार्टयाँ मध्ये ती माझ्याच सोबत असायची. मी सुट्टी वर असलो तर ती अस्वस्थ व्हायची आणि ती सुट्टीवर असेल तर मी अस्वस्थ व्हायचो.
काळ हां फार फसवा असतो. जेव्हा काही चांगला होत असेल तेव्हा लगेच निघून जातो अणी जेव्हा काही वाईट होत असेल तेव्हा एकेक क्षण खुप लांब वाटतो. आमच ही काही असच झाल. एका दिवशी सकाळी तिनी मला सांगितल की तिला तिच्या नव्र्यसोबत हैदराबाद ला शिफ्ट व्हाव लागणार आहे. त्या दिवशी आम्ही दोघही सुन्न झालो होतो. माझा तर काळीज हदारायला लागला होत. माणुस नकळत पणे कोणाच्या तरी प्रेमात पडतो आणि नंतर सगळ गमावून बसतो. नियती माणसाला प्रेमात गाफिल करून आपला डाव साधते. मला सारखा प्रश्न पडतो जर एखाद्याला एखादी मुलगी भेटनाराच नसेल तर देव त्या दोघांना प्रेमात तरी का पाडतो?? की कदाचित देवाला विरहाच्या वेदनाच कळत नाहीत??
आज तिला जाऊंन बरोबर एक महिना झाला पण आजही ती मला तीतकीच जवळ जाणवते. त्या मॉड्यूल वर काही काम आल की अगोदर तिची आठवण येते. तिच्या आठवनिनी डोळे भरून येतात. सुरवातीला आमचे खुप मेंलस चालाय्चेत. हळउ हळउ ती तिच्या कामात बीझी झाली अणी मी माझ्या कामात, पण आमच्या लव स्टोरी चा जो अंत झाला तो इतर कोणाचा ही हूँ नए असा मनापासून वाटत. आता ती पण या जगाच्या गर्दित कुठे तरी हरवून जाईल आणि मी पण स्वताहाला कुठ तरी हरवून टाकील. पण आमच्या या छोट्याश्या लव स्टोरी च काय ??? की ती पण स्वताहाला काळाच्या पानामध्ये कुठे तरी हरवून बसेल??
आजही ऑफिस मध्ये ८. ३० वाजत आहेत. तिचl नुकताच फ़ोन येऊन गेला. आजची तिच्या आवाजात तोच आपलेपणा, तीच ओढ़, तेच प्रेम जाणवत.. म्हणुनच कदाचित मला या वेळी राजेश खन्ना च ते गाना आठवत आहे " वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब हैं, वो कल भी पास पास थी वो आज भी करीब हैं".
वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब हैं, वो कल भी पास पास थी वो आज भी करीब हैं
हे गाणं ज ह ब ह रा हा च आहे
प्रेम म्हणजे प्रेम असत पण तुमच आमच सेम नसत होत राव अस कधी कधी
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
प्रेमात सर्वान्च्या बाबतीत नकलत असेच घद्दते.........पन आथवनित मजा असते,ती घे............
जे झाल ते काही बदलु शकत नाही पण जो काही त्रास होतो तो हळु हळु होइल कमी, जरा सांभाळुन घ्या स्वताला आणी टोकाचे निर्णय टाला.... (मि तर म्हणेन कि काही न करता फक्त वेळ काढ)
टुकुल.
आजचे दु:खाचे क्षण म्हणजे उद्याची आठवणींची मदिरा असते...आमच्याकडे असा मदिरेचा भरपुर साठा आहे...आणी तो आम्ही अधुन मधुन चाखत असतो...
काही नाती हि शब्दांच्या पलिकडे असतात...त्यांना कोणत्याहि साच्यात बसवता येत नाहि...काळाच्या ओघात ती टि़कली नाहि तरि मनाच्या एखाद्या रम्य कोपर्यात ती नेहेमीच दडलेली असतात...फक्त डोकाउन बघायचे निमित्त...
असो अधिक पाल्हाळ नको...
(आठवणींच्या विश्वात रमणारा)
निशाद राव .. बाकी सगळं ठिक आहे .. पण .. आपल्या कर्माची फळ देवाच्या माथी ठोकणे चुक आहे ... कशाला देवाला दोष देताय ? देवाने कधी तुमच्या मोबाईल वर एसेमेस केला ? का इ-मेल केली तुम्हाला ? की बाबा हिच्याच प्रेमात पड !!! केला असेल तर आमचा खालिल प्रतीसाद दुर्लक्षित करा :)
मला लोकांचं एक कळत नाही .. काही गोष्टींचं देवाच्या माथी का मारतात... एकाने डझन भर पोरं पैदा केली .. आता त्यांना खाउ घालायला मौताल .. विचारलं का रे बाबा ? तर म्हणतो "देवाची इच्छा", साला म्हंटलं .. देव कोणत्या रात्री आला होता? की बाबा रे " ही एवढी कामगिरी फत्ते पाड" !!
असो .. तुमच्या लव्ह ष्टोरीला अर्थ नाही ... तिला कोणाच्या प्रेमात पडण्याचा अधिकार नव्हता आणि तुम्हालाकी विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणे योग्य नव्हते... उलट असे म्हणा .. झालं ते बरंच झालं .. चार दिवस त्रास होइल पण कोणाची लाइफ बर्बाद केली नाही (मी तिच्या नवर्याबद्दल बोलतोय) .. तिला नवर्याकडून मानसिक्/शारिरीक त्रास असेल तर वरिल मत बदलू शकते.. ह्यात चुक देवाची नसुन तिची .. नंतर तुमची... असं स्पष्ट सांगावंस वाटतय ..
अंमळ आश्चर्य वाटलं वरिल प्रतिसादात कोणी असं बोललं नाही .. सगळे आपले "हम दिल दे चुके सनम" पाहुन आलेले दिसतात ...
टिप : स्पष्ट बोलण्याचा राग मानु नये .. प्रांजळ प्रतिक्रिया दिलेली आहे.. रि ओढण्यात आम्हाला गती नाही.
(कुमारिकेच्याच प्रेमात पडलेला)
-- टारवीर
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
मला पण हेच म्हणायचे होते..टारया शी सहमत..
स्वप्निल
टार्याशी सहमत..
अशी नाती होणं कदाचित शक्य आहे, तुम्ही लिहीलेही चांगले..
पण लेखात कुठेच काही चुकीचे होतेय, असा सूर नाही दिसला.. त्याबद्द्ल आश्चर्य वाटलं.. सारासार विचार केला तर हे चुकीचे आहे हे समजतेच.. तो जर विचार तुमच्यापैकी कुणीच केला नसता, आणि ती इथेच राहीली असती तर काय? तिच्या नवर्याची यात काय चुक? वगैरे विचार आले डोक्यात..
सॉरी, पण चुकीच्या गोष्टींना ग्लोरिफाय करणं चुकीचं वाटलं म्हणून हा प्रतिसाद..
ज ह ब ह रा हा प्रतिक्रिया. सहमत आहे बॉ टा-याशी
तुमच्या पोस्टमधला चांगला भाग असा की तुमच्या बाबतीत जे घडले ते प्रांजळपणे लिहीले आहे. (असे निदान सकृद्दर्शनी तरी म्हणता येईल.)
तुम्ही तुमच्या पोस्टमधे वर्णन केलेले, सामाजिक किंवा नीतीच्या चौकटीत न बसणारे ऋणानुबंध कधीकधी निर्माण होऊ शकतात. अशा गोष्टींकडे तुम्ही तुमच्या लिखाणात वर्णिल्याप्रमाणे भावनिक होऊन पहात आहात. पण , शेवटी सारासार विवेकालाच शरण जाणे इष्ट ठरेल. योगायोगाने तुमच्या कचेरीतली सहकारी आपल्या नवर्याबरोबर दूर गेली. तशी ती गेली नसती तर , सारासार विवेक या एका गोष्टीनेच तुम्हाला तारले असते. एखाद्या संसारात काहीही वावगे नसेल तर , केवळ आकर्षणापायी त्या लग्नातील एका जोडीदाराला आपल्यामधे गुंतवणे (आणि आपण स्वतःसुद्धा त्यात गुंतणे) यात नक्कीच सॅबोटाज एलेमेंट आहे. (मराठी शब्द ?) अशा संबंधांमधे आपण एक नव्हे तर तीन आयुष्ये बरबाद करू शकतो.
माझे वरील सांगणे उपदेशपर, कंटाळवाणे वाटेल ; पण साध्या तर्काच्या आधाराने तुम्हालाही याच निष्कर्षाप्रत येता येईल. भावनांचे गुंतणे जितके अपरिहार्य ; तितकेच त्याचे विवेकाने निराकरण करणे आवश्यक आणि शक्य आहे.
आता प्रेमभंग झाला हे वाईट. भळाभळा भावना वाहात आहेत, त्यांना कवितेत भरा.
**No puppy love is so great that a couple of sonnets will not wilt.******
**(कुठल्याशा लेखकाचे अर्धवट आठवलेले वाक्य - बर्नार्ड शॉ, किंवा ऑस्कर वाइल्ड असावा.)**
यालाच कॅथार्सिस असे म्हणतात काय ?
हा मराठी (संस्कृत) शब्द. आयुर्वेदातील पंचकर्मापैकी.
**वर्णन केलेली परिस्थिती नेती, वमन, यांच्या पलीकडे गेली आहे.
विरेचन सुवर्णमध्यावर.
बस्ती ची गरज पडू नये. रक्तमोचनापर्यंत वेळ कोणावरच येऊ नये.**
तुम्ही भावना खुप प्रांजळपणे व्यक्त केल्या आहेत. तरीही...
जे काही घडत होतं ते चुक होतं. ती विवाहीत होती. (आणि ती तिच्या संसारात दु:खी आहे असंही नसावं बहुतेक). त्यामुळे तुम्ही तिच्यात गुंतायलाच नको होतं. असो, जे झालं ते चांगलंच झालं. पुढे काही वेडंवाकडं झालं असतं असं विचारात घेतलं तर ती दूर जाण्याने तीन आयुष्य बरबाद होण्यापासून वाचली आहेत. तुम्हीही काही दिवसांनी जाल ते सारं विसरून...
आता फार विचार करत बसू नका... पुन्हा नव्या उमेदीने आयुष्याला सामोरं जा...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
मीदेखील टारझन पैलवानाशी सहमत. तुम्हा दोघांचं प्रेमेबिम सगळं ठीक आहे हो, परंतु तिचा जो नवरा आहे त्याच्याबद्दलचा तुम्ही जराही विचार केलेला दिसत नाही!
तिचl नुकताच फ़ोन येऊन गेला. आजची तिच्या आवाजात तोच आपलेपणा, तीच ओढ़, तेच प्रेम जाणवत.. म्हणुनच कदाचित मला या वेळी राजेश खन्ना च ते गाना आठवत आहे " वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब हैं, वो कल भी पास पास थी वो आज भी करीब हैं".
आजही मारे दोघे उसासे टाकत फोनवर बोलताहात परंतु तुम्हा दोघांच्याही या अश्या मानसिक बाहेरख्यालीपणात त्या तिच्या नवर्याचा जराही विचार दिसत नाही! जाणवतो आहे तो फक्त आप्पलपोटेपणा..!
आणि एवढंच जर एकमेकांवर प्रेम असेल तर घ्यावा की तिने सरळ घटस्फोट आणि करावं लग्न तुमच्याशी! आहे हिम्मत..?
त्यामुळे किमान तो नवरा तरी बिचारा सुटेल....!
हे असल काही वाचलं की अविवाहीत राहून रीतसर एखाद्या बिनलग्नाच्या बाईशी संबंध ठेवणं हे कितीतरी चांगलं असं वाटतं! साला, स्वत:च्या बायकोशी प्रतारणा नको अन् कुणा विवाहीत बाईच्या नवर्याला फसवण्याचं पाप नको...!
छ्या! प्रेमं करताहेत म्हणे प्रेमं! खरं प्रेम हे त्यागात असतं आणि मुकं असतं!
आणि भले असूही शकेल एखाद्याचं एखाद्या लग्न झालेल्या स्त्रीवर प्रेम! पण ते नेहमी आणि अगदी कायमचं गाडलं गेल्यासारखं मुकच रहाव!
"एका लग्न झालेल्या बाईचं अन् माझं एकमेकांवर कित्ती कित्ती प्रेम..! असं म्हणून ते कधी चव्हाट्यावर येऊ नये...!
आपला,
(परखड) तात्या.
आजही मारे दोघे उसासे टाकत फोनवर बोलताहात परंतु तुम्हा दोघांच्याही या अश्या मानसिक बाहेरख्यालीपणात त्या तिच्या नवर्याचा जराही विचार दिसत नाही!
तात्या, मी अगदी हेच, याच शब्दात लिहीणार होते ... +१
छ्या! प्रेमं करताहेत म्हणे प्रेमं! खरं प्रेम हे त्यागात असतं आणि मुकं असतं!
लाख मोलाची बात
आणि भले असूही शकेल एखाद्याचं एखाद्या लग्न झालेल्या स्त्रीवर प्रेम! पण ते नेहमी आणि अगदी कायमचं गाडलं गेल्यासारखं मुकच रहाव!
खरे आहे
"एका लग्न झालेल्या बाईचं अन् माझं एकमेकांवर कित्ती कित्ती प्रेम..! असं म्हणून ते कधी चव्हाट्यावर येऊ नये...!
बरोबर बोललात
(सहमत) नाना