ताज्या घडामोडी: भाग ७
राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे.
मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत.
पुढच्या फेर्यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.
तुम्ही म्हणताय अशा लोकांना किंमत उरली नाही पण चित्र वेगळंच पाहायला मिळतंय. "आया है राजा " ने दणाणून सोडलं सातारला. http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-udayanraje-bhosale...जरा त्या बातमीखालील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचा. 'महाराजां'ची किंमत कळेल.१९९० मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि जनता दलाने १८२ पैकी सुमारे १५० जागांवर युती करून निवडणुक लढवली. आणि उरलेल्या जागांवर दोन पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. निवडणुकांमध्ये जनता दलाला ७० तर भाजपला ६७ जागा मिळाल्या. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत वि. प्र. सिंग यांचा जनता दल व भाजपची गुजरात व राजस्थान मध्ये युती होती. गुजरात मध्ये भाजपने १४ पैकी १२ व जनता दलाने १२ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. राजस्थान मध्ये भाजपने १३ पैकी १३ व जनता दलाने १२ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या.