कॅनव्हास
Primary tabs
मानसीचा चित्रकार तो,
तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो.
हृदयनाथांच्या आवाजात अशी सुंदर पदं ऐकतांना हलकेच डोळा लागावा अन कानावर पडणारे अमुर्त शब्द मुर्त व्हायला लागावेत. मानसीचा चित्रकार खरोखरीच अवतरावा अन त्याने स्वच्छ निरभ्र आकाशालाच त्याचा कॅनव्हास बनवावा. कल्पनेच्या कुंचल्याने सरासर त्याने हात चालवायला सुरुवात करावी अन कल्पनाचित्रांची जादुगरी त्या कॅनव्हासवर उतरु लागावी. साधी साधीशी रानफुले कुंचल्याच्या फराट्यातुन साकारु लागावीत, कधी नितळ वहाणारे पाणी दिसावे तर कधी उमटावे जाळीदार झालेले एखादे पिंपळाचे पान.
झराझरा ती चित्रं मागे पडावीत अन कुंचला गुंतावा एक अगम्य चेहरा रेखाटण्यात. तो चेहरा रंगवण्यात कुंचला पार गुंगुन जावा अन आपण मनाशी तो चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करत रहावा. जसाजसा चेहरा अधिकाधिक उतरावा तसा तसा मी आणिकच प्रश्नांकित होत जावा ! खुद्द चित्रकाराला अव्हेरुन त्या चेहर्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करावा. मला पुसटशी ओळख लागावी असे वाटताच त्या आसंमतात एक अस्वस्थता भरुन यावी. अचानक चित्रकाराच्या हातुन कुंचला निसटावा अन खोल खोल गर्तेत अदृश्य व्हावा . त्या अर्धवट अनोळखी चेहर्यावर जणु हलकेसे स्मित उमटलेय असे वाटावे अन क्षणात सगळे पुसले जावे, तो चित्रकारही दिसेनासा व्हावा. आता मात्र आकाश मगासारखे नितळ निरभ्र नसावे, काळे कभिन्न आभाळ भरुन आलेले असावे अन सुरु व्हावा चेहर्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.
श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!

अरे काय लिहिलंएस तू..............
शब्द नाहीत....... अफलातून!
मनस्वी
आंद्या,
किती सुंदर लिहीले आहेस!
आता मात्र आकाश मगासारखे नितळ निरभ्र नसावे, काळे कभिन्न आभाळ भरुन आलेले असावे अन सुरु व्हावा चेहर्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.
आहाहा! सुंदर..
पण खाली डकविलेले चित्र उगाच रणरणत्या उन्हाची आठवण करून देते. त्या ऐवजी मारव्यासारखे संध्याकाळच्या गूढतेचं आकाश मला भावले असते चित्रात. :)
(साला काही म्हणा पण "मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो" असे म्हणणारा चित्रकार कायम संध्याकाळीच उन्हं कलल्यावर सुंदरशा पण खिन्न युवतीचे चित्र काढत आहे असे कायम वाटते.)
पुण्याचे पेशवे
>>>श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
आनंदयात्री,
सह्ही लिहिले आहेस. :)
चेहर्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.
श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
आता नक्की कविता आठवत नाही पण एकच ओळ आठवते ती लिहीतो
जीवाच्या अशा सांजराती कळेना
मी मला शोधतो की तुला शोधतो
(बहुतेक ग्रेस)
श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
कॅनव्हासवर शब्दचित्र मस्त उमटले आहेत.
लगे रहो !!!
-दिलीप बिरुटे
शब्दचित्र मस्त... आवडले.
नाना
शब्दसामर्थ्याला सलाम !!!
एकदम झकास लिहले आहेस, लगे रहो ...
आई आई गं !!!!
काय जबरा पॅराग्राफ आहे, नुसते वाचत रहावेसे वाटते ...
प्रतिभा प्रतिभ अम्हणतात ती हिच ....
पुलेशु ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
>काय जबरा पॅराग्राफ आहे, नुसते वाचत रहावेसे वाटते ...
+१
मनस्वी
+१
...बाबा
+१ लिखाण!!
खूप आवडले...
आपणही समहत ...
आंद्याच्या लेखणाचे फॅन
टा.र. देशपांडे
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
आम्हीपण हेच म्हणतो !
आवडले मनापासून !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
सहमत आहे, सुरेख लेखन.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
हा आंद्या तो तोच का? जो आमच्यासारख्यांबरोबर इतका टारगटपणा करतो?
इतकं हळवं लेखन वाचवत नाही रे भावा!
पण डान्या म्हणतो तसंच, सलाम!!!
काय बोलु????
तुच सांग आंद्या, आता काय बोलु ह्यावर?
गावावरुन ओवाळुन टाकलेल्या तुझ्या ह्या टारगट दोस्ताला इतका हळवेपणा सोसवतच नाही रे.....च्छ्या!! उगाचंच खिन्नपणाची भावना आलीये मनात. :(
लिही आंद्या, लिही...अजुन लिही...
मी देखील सहमत रे. ................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
जे काही लिहिलं आहेस ते अफलातून आहे पण तितकचं त्या खालच्या चित्राशी विसंगत आहे..
ते चित्र बदल..
अभिनंदन!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
वा..
सुंदर लिहिले आहेस.. प्राजु म्हणते तसे चित्र बदल,
स्वाती
आनंदयात्री,
>>जसाजसा चेहरा अधिकाधिक उतरावा तसा तसा मी आणिकच प्रश्नांकित होत जावा ! खुद्द चित्रकाराला अव्हेरुन त्या चेहर्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करावा. <<
छान आहे प्रकटन...आवडले.
--लिखाळ.
लेख अतिशय छान आहे. सुंदर लिहिले आहे पण वर इतरांनी म्हण्टल्याप्रमाणे चित्राशी थोडसं विसंगत वाटतं.
हे चित्र 'ओमेगा नेब्युला' (एम-१७) किंवा 'स्वान नेब्युला' चे आहे. हबल टेलिस्कोपने घेतलेले चित्र अतिशय सुंदर आहे यात काही शंकाच नाही. सुमारे ५५०० प्रकाशवर्षे दूर असलेली ही नेब्युला "हॉर्स्-शू" नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.
आईग, काय सुंदर लिहीलंय!! मस्तच...
आंद्या, तू (खरडवही भरवण्याऐवजी पुन्हा खरीखुरी) लेखणी उचललीस आणि झकास लिहिलं आहेस रे! आणि हो ते चित्र जरा विचित्र वाटतंय तिथे!
(तो काय मी लिहिलेला बेकंबे प्रकारचा रटाळ लेख आहे का, हबल स्पेस टेलिस्कोपनी घेतलेला फोटो त्याबरोबर डकवायला! बरं डकवला तर तो वाकडा का केलास बे?)
अदिती
आवडले. एकंदर हा लेखनप्रकार तुम्हाला (आणि आम्हा सगळ्यांनाही) फार आवडलेला आणि जमलेला दिसतो आहे. सोबतच्या पूरक चित्राने आणखी मजा आली, छान आहे.
(चित्रकार)बेसनलाडू
एकंदर हा लेखनप्रकार तुम्हाला (आणि आम्हा सगळ्यांनाही) फार आवडलेला आणि जमलेला दिसतो आहे.
असेच म्हणतो.
मानसीचा चित्रकार...हे गाणे बाबुजींनी गायलेले नसून हृदयनाथ मंगेशकरांनी गायलंय.
आणि इतक्या सुंदर लेखानंतर त्याबरोबर डकवलेलं चित्र लेखातल्या सहजसुंदर भाषेला अजिबात शोभत नाही.
पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा काहीतरी खटकले (आधी मनात अरुण दाते असे नाव आले होते पण तेही फिट्ट बसेना..).
(संगीत - वसंत प्रभू आणि गीत - पी.सावळाराम)
आनंदयात्री लेखन छान झाले आहे. तुला अशा स्फुटांमधे चांगली गती आहे आणी वाचायला सुद्धा छान वाटतेच.
लिहिता रहा!
चतुरंग
+१
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
आणि शब्दचित्र दोन्ही सुंदर...
आंद्या,
मार डाला रे! लेख आणि चित्र, दोन्हीही सुंदर...
तात्या.
छान लिहिलं आहेस..
चित्र जरा विसंगत वाटल मला...
मस्त लिहिल आहेस :)
१+
(चित्र बदल खालचं)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
आंद्या अरे काय मस्त लिहीलं आहेस रे...............
अहाहा....शब्दच नाहीयेत माझ्याकडे....सुरेख....:)
अजुन असंच सुंदर सुंदर लिहित जा.....
आंद्या मस्तच लिहीलं आहेस रे !
नीलकांत
लिहीलय रे आंद्या....
बाकी लेखाच्या मानाने चित्र जरा रखरखीत वाटतय का असा प्रश्न उगाचच मनात आला बॉ.
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
ग्रेस ची त्या ओळी आठवतात
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच मज जाग आली
दु:खांच्या मंद सुराने
वा वा! अत्यंत सुरेख शब्दांकन केल आहे. :)
आनंदा ,
जबराट ..........पार चोरा मोरा करुन टाकलेस ........ खरेच शब्द नाहित इतके अप्रतिम लिहिले आहेस :)
सर्वांनी दिलेल्या दादेबद्दल केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे, ऋणी आहे.
बहुतांशी लोकांनी केलेल्या सुचनेनुसार चित्र बदलले आहे, काही चुका दुरुस्त केल्या आहेत. आभारी आहे.