Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणेशोत्सव हायजॅक ?

प
पगला गजोधर यांनी
Sat, 08/12/2017 - 08:14  ·  लेख
लेख
"शिवजयंती सार्वजनिक उत्सव", याचे जनक महात्मा फुले असून, तो उत्सव हायजॅक होऊन, दुसऱ्या कोणाच्या नावे प्रोपागेंडा केला जात असू शकतो काय ?, याबाबत मागे मिपावर मी एक धागा काढला होता. (रेफ: शिवजयंती हायजॅक ) असो आता "सार्वजनिक गणेशोत्सवाचे" जनक कोण ? यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ…लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले गेले. पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केला आहे. गेल्यावर्षी सुध्दा या मंडळाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकारने त्याकडे कानाडोळा केल्यानेच अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली. 1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. 1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली. 1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली. 1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली तर लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ? तुम्हाला काय वाटते ? (जाता जाता अवांतर : नामांकित न्यूज ब्युरो च्या संदर्भाने ... "राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे." या बातमी मागच्या बातमीचा वर वरील उल्लेखलेल्या हायजॅकिंगच्या घटनांमागील एम. ओ. मधे काही साम्यस्थळे आढळतात काय ?)

प्रतिक्रिया द्या
28919 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/12/2017 - 08:55 नवीन
मुघलांचा इतिहास वगळला. ह्यात धक्कादायक काय?? ते तर लूटारू होते. ऊलट मराठ्यांचा इतिहास वाढवला. हे आनंददायक. सकारात्मक विचार करा.
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 09:17 नवीन
तुम्हास आमच्याकडून कोपरापसुन हात जोडून नमस्कार _/\_
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/12/2017 - 21:31 नवीन
दंडवत घाला हो. कोपरापासून हात जोडून काही होत नाही.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 15:35 नवीन
मुघलांचा इतिहास वगळला, हे वाईट झाले का?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अभ्या.. Sat, 08/12/2017 - 09:10 नवीन
कैच्याकै, आमच्या सोलापूरचा आजोबा गणपती 1882 ला 81 ला स्थापन झालाय. 135 वे वर्ष झाले त्यांचे. तो बघून तर लोकमान्य इंस्पायरर्ड झाले असा इतिहास आहे. हा भाऊ रंगारी कोण मधेच?
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 09:15 नवीन
तेच महंतोय, मग तुम्हीपन, खरा इतिहास पुढे आना । म्हणजे असे इतिहास बदलू लोक , लोकांच्या लक्षात येतील.
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 08/12/2017 - 09:26 नवीन
अडलंय की नडलंय? ते न्यायाधीश बघून घेतील खरा इतिहास वाचून काय सांगायचे ते. . अस्सल वाघ असल्या याचिका बिचिका नसतात वापरत ;)
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 09:44 नवीन
अस्सल आता कोण उरलय महाराजा ? कोल्हा आता सिंहाच कातड ओढून वावरतोय, कातड सुद्धा चायना मेड. याचिकाबिचिकेच्या ऐवजी इतिहास / पुरावे बदलन्याकड़े कल....
↩ प्रतिसाद: अभ्या..
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 10:28 नवीन
मीत्राण्णो आपन आता थंड राहुया. पानी पीयु आनी गानी गाउ.
श
श्रीगुरुजी Sat, 08/12/2017 - 11:45 नवीन
लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ? सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लो. टिळक असोत वा भाऊ रंगारी वा शरद पवार, जे कोण असतील त्याने आज शष्प फरक पडत नाही. नक्की कोण होते हे समजून घेण्याची उत्सुकता नाही आणि गरजही नाही. राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात काय धक्कादायक आहे? मुघलांचा इतिहास काढल्याने काय फरक पडतो? तो इतिहास शिकण्याची गरजच काय?
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 12:49 नवीन
इतिहास शिकण्याची शस्प गरज जर नाही ? कोणी त्यावेळी कोणती भूमिका घेतली, आज काय बोलत आहेत, हे जाणून घेत नाहीत, तर शालेय इतिहासाची मोडतोड़ कशाला ? बाबरी मस्जिद चा इतिहास न जाणून घेता का ती फोडली ? महान परंपरा, अनेक स्मृत्या का उगाळल्या जातात मग ? नेताजिंच्या मृत्युविशयक कुजबूजी अजूनही का करतात काही लोक ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मैत्र Mon, 08/14/2017 - 09:51 नवीन
http://www.misalpav.com/comment/953575#comment-953575 याच न्यायाने बाबरी मशीद आणि गणेशोत्सव याचा संबंध नाही. तुम्ही मुद्दाम संबंध नसलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत का? मुघल इतिहास वगळण्यात आला आहे हे नक्की काय? तसे असेल तर त्या पुस्तकांची माहिती देऊन वेगळा धागा काढून चर्चा करा. पाठ्यपुस्तकात मुघल इतिहास आणि गणेशोत्सव भाऊ रंगारी याचा संबंध नाही बाबरी मशीदीचा इतिहास तुम्ही वाचून माहिती करून मांडा. मोठा विषय आहे. खटल्यामुळे बरीच माहिती लोकांपर्यंत आली आहे. त्यावर स्वतंत्र पुराव्यानिशी चर्चा करा. त्याचा गणेशोत्सवाशी कसलाही संबंध नाही.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 10:37 नवीन
धागा हा गणेशोत्सवा बद्दल नाहीये, तर काही ऐतीहासिक फॅक्ट आणि सदय स्थितितिल पब्लिक परसेप्शन बद्दल आहे, आणि आपल्याकडे पब्लिक परसेप्शन फेक इन्फो / न्यूज द्वारे इतिहास म्हणून ठसवन्याची कार्यपद्धत चांगलीच फोफावलिये, पब्लिक परसेप्शन 2 प्रकारे प्रभावित केल जात आहे, पहिली कुजबूजी यंत्रने मार्फत, जस की टिळकानी गणेशोत्सवा ची सुरुवात केली, शिवजन्मोत्सव सुरु केला, वै आणि दूसरी शैक्षणिक इतिहासात फेरफार करुन. इतिहासात फेरफार करुन बाबरी मस्जिद ही राम जन्म भूमि होती, हे काही फार अवघड राहिले नाही, भलेही रामायण हे साहित्य आहे, इतिहास नाही. उद्या काय तर हल्दी घाटतील लढाई अकबर हरला, अस पिल्लू सुद्धा सोडून देण्यात येईल, काय भरावसा ? पुढे तसाच इतिहास ही शिकवाला जाईल. आय होप आता तरी धाग्याचा मुद्दा लक्षात आला असेल.
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Mon, 08/14/2017 - 11:29 नवीन
"चुकीचा इतिहास लिहिला आहे किंवा प्रसार केला आहे" अशी मुद्दाम खोटी बोंब करून सामान्य जनतेची दिशाभूल करणे, मुद्दाम वादंग निर्माण करणे, वातावरण कलूषित करणे, जातीय कॉमेंट करणे, sweeping statements करून, वैयक्तिक मते तथ्य म्हणून ठोकून देणे. ही ब्रिगेड ने तयार केलेली proven modus operandi आहे. ब्रिगेड एक मुद्दा plan करून कुजबूज मोहीम सुरु करते. मग वर्तुळात विरोध निर्माण करते. नंतर वाद उभा करते. याचा पुरावे देऊनही उपयोग होत नाही कारण मूळ समाज विघटन, दुहीचा हेतू साध्य झालेला असतो आणि त्यांना पुरावे सोयीचे आणि खोटे हवे असतात. राजकारणासाठी समाजातील शांतता आणि सौहार्द बिघडवणे हे केवळ मानसिक नीचपणाचे आहे. महाराष्ट्रात असे लोक आहेत हे भयानक दुर्दैवी आहे
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 12:05 नवीन
मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आजचे बी ग्रेडी त्यावेळच्या खंडोजी खोपडे आनी सुर्याजी पिसाळांणा मागे टाकनार. काल आणखी कुठल्यातरी बी ग्रेडी ला देवगिरी च्या वैभवात आनखी काहितरी दिसल होत :)) अर पावन्या देवगिरी चे साम्राज्य कवा व्हुत... देवगिरी चा भुई कोट किल्ला कुठ हाय..खिलजी चे आक्रमन कवा झालते... दे ठोकुन काय बी कदिबी वाचलेल नसतांना. तुम्हि जे वाचता तेच तुमच्या लीखानात दिसते... तुम्हि वाचलेला ईतिहास पवारां पासुन सुरु होउन ...मुंबै च्या मोर्चात संपतो. मा.म. केकाटे
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 12:52 नवीन
मास्तर, मुद्दा तुमच्या नीट लक्षात आलेला नाहीये ! तुम्ही बहुतेक मनुस्मृतिचे मास्तर असाल बहुतेक.
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
ग
गामा पैलवान Sat, 08/12/2017 - 13:46 नवीन
पगला गजोधर, तुम्हाला टिळकांनी गणेशोत्सव वाढवला हे मान्य का होत नाहीये? जरी सार्वजनिक असला तरी असे कितीसे लोकं साजरा करंत होते? उत्सव वाढवणे हे काम टिळकांचंच ना? भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दल नीईईईईईईईईताद्र बाळगूनही एक प्रश्न करावासा वाटतो. तो म्हणजे रंगारी लोकनेते होते का? तुम्ही लावता त्या न्यायाने आधुनिक काळातला गणेशोत्सवाचे जनक रामदासस्वामी म्हणायला पाहिजेत. सुखकर्ता दु:खहर्ता आरती त्यांनीच लिहिलीये. तुमचा तर्क आजून एका ठिकाणी लावतो. लोकमान्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणायचे (इति व्हयालेंटाईन शिरोल). तर हा असंतोष काय टिळकांनी थोडाच उत्पन्न केला होता? तो तर इंग्रज सरकारच्या मनमानी कारभारामुळे उत्पन्न झाला होता. मग टिळकांना भा.अ.ज. म्हणावेच कशापायी? आ.न., -गा.पै.
ग
गामा पैलवान Sat, 08/12/2017 - 13:54 नवीन
कृपया नीईईईईईईईईताद्र म्हणजे नितांत आदर असे वाचावे. धन्यवाद! -गा.पै.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 14:14 नवीन
"इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. त्यामुळे टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक नसून, फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे" या मंडलाच्या दाव्याला तुमचा पाठिम्बा आहे, असे दिसते.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 13:50 नवीन
मास्तर, मुद्दा तुमच्या नीट लक्षात आलेला नाहीये ! अरे नहि रे पगलैट ;) मुद्दा काहि नाहिच आहे त्याच्यात. तुम्हि तोच केर काढताय जो गेले ३ वर्षे अनेक लेख पाडुन काढताय. Keep It Up. 2024 ला खुप टैम है अभी. तुम्ही बहुतेक मनुस्मृतिचे मास्तर असाल बहुतेक. नाय बा, हा मन्या कोन म्हनायचा. पन आमास्नि पगलैट तुम्हि मा.म.स्मृतिचे कर्मठ अभ्यासक दिसता. केकाटायन चा अभ्यास भी जबरीच म्हनायचा कि तुमचा.
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 15:16 नवीन
कोपरापासुन
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
ग
गामा पैलवान Sat, 08/12/2017 - 13:53 नवीन
पगला गजोधर, विकिवर टिळकांनी गणेशोत्सवाचं पुनरुज्जीवन केलं असंच लिहिलं आहे. हा उत्सव आधीपासूनच चालू होता. तर मग टिळकांचं नाव हटवून कोणाला नक्की काय हेतू साध्य करायचा आहे, असा प्रश्न पडतो.
याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले.
आ.न., -गा.पै.
च
चौथा कोनाडा Sat, 08/12/2017 - 14:29 नवीन
+१११११
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 15:14 नवीन
भाऊ रंगारीनीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचे अनेक दाखले आहेत. याशिवाय राज्यसरकारनेही ते मान्य करुन त्या विषयिचा अहवाल दिला आहे, असे असताना सार्वजनिक गणेशोत्सवाला मागील वर्षिच १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा १२५ वे वर्ष साजरे करण्याचे काहीच कारण नसताना, सध्याच्या महापौरानींच हा वाद उकरुन काढल्याचा आरोप रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी केला
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 15:34 नवीन
अर्र आडनाव बोल्ड करण्यावरुनच लक्षात येतोय किती पराकोटिचा मत्सर आहे ते , लिहिता वाचणार्यांचा म्हणजेच शिकलेल्यांचा ब्रेनवॉश जर असा असेल तर ....... घ्या तुमच्या नावावर गणेशोत्सवाचि सुरुवात केल्याच श्रेय.
A
arunjoshi123 Sat, 08/12/2017 - 15:42 नवीन
बोल्ड करणं मंजे मत्सर कसा? दोन ब्राह्मणांतील विशुद्ध असा इतिहास संशोधनातील रस कशा स्वरुपाचा असतो हे मांडलं आहे.
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 15:54 नवीन
पुढील पिढीला विशुद्ध संशोधन करता येईल का ? जर बदलेला इतिहास पुढे आला तर ?
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 08/12/2017 - 15:40 नवीन
अगोदर महात्मा फुले असं ऐकलं होतं. आता फुल्यांना बामनी देवाचा विटाळ झाल्याचं पुरोगाम्यांना चालणार नाही म्हणून रंगारी? उजव्या चळवळीला आज करोडो समर्थक आहेत, तरी यांची प्रत्येक चाल परिणामकारक ठरते. ज्यावेळी या चळवळीत जीवच नव्हता त्यावेळेस काय काय कारस्थाने झाली असतील?
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 15:49 नवीन
अगोदर महात्मा फुले असं ऐकलं होतं. तुम्हि जोशी, तुम्हिच सगळा चुकिचा ईतिहास लिवला बि अन भोळ्या भाबड्या जंतेस शीकवला बी. तुम्हि म्हंतायसा त्यावर बी सरां नी आपले नौईतिहासकारी ईचार मांडलेयत. http://www.misalpav.com/node/32487
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 16:05 नवीन
अगोदर महात्मा फुले असं ऐकलं होतं
महात्मा फुले यांनी सार्वजनिक शिवजयंती, तर या धाग्यात भाऊ रंगारीनीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला, अस लिहिलेले आहे. घाईत प्रतिक्रिया देण्याच्या नादात तुमची नजर चूक झाली असावी.
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 08/12/2017 - 16:38 नवीन
घाईत प्रतिक्रिया देण्याच्या नादात तुमची नजर चूक झाली असावी.
हूं. शिवजंयती नि गणेशोत्सव मधे गल्लत झाली खरी.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 16:43 नवीन
असु देत, गल्लत ही सर्व मानवाकडूनच होते. नो प्रोब्लेम..
↩ प्रतिसाद: arunjoshi123
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 15:59 नवीन
जसा राम गणेश गडकरींचा पुतळा काहि चिंधी चोरांनी रात्रीतुन फोडला मग ज्या भुरट्यांनी फोडला त्यांचे नवधर्म संस्थापक आले न्युज चँनल वर बाजु मांडायला, पहिलाच बॉंब अँकर ने टाकला कि गडकरी तुम्हि समजता तसे ब्राम्हण नव्हतेच. तेज्यायला आलेल्या गुंठामंत्र्याचा चेहरा असा काहि झाला होता बास.
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 16:08 नवीन
तुमच्या प्रतिक्रियेत सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात काहीच आढळत नाहीये ? कदाचित तुमची गल्ली चुकाली असावी ....
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
म
मैत्र Mon, 08/14/2017 - 11:33 नवीन
तुमचा प्रतिसाद तुम्ही या गल्लीतून त्या गल्लीत उड्या मारत राहताय का?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 16:13 नवीन
गल्ली बरुबर हाय मर्दा आज लय येळ हाय गड्या खर्चायल माह्याकड... नेहमि असल्या हागणदर्या टाळतो, आज म्हनल आज आपुन बि जरा सुवासीक साहित्याचा वास घ्यावा.
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 16:34 नवीन
नै मास्तर हम्हारा चुकयाच् ... तुमच्या सर्व प्रतिक्रिया या, धाग्या च्या विषयला धरुनच हैत, शिवाय कुठेही तुमची जातीयवादी मानसिकता दिसत नाही, उलट दिसते ते विशुद्ध प्रेम इतर समाजघटकाबद्दल ... फक्त आम्ही व्यक्त झालो, की आम्ही मनुग्रेडि, वै वै
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 16:40 नवीन
मनु ने त्याच्या स्मृति ला घेवुन महाड च्या चवदार तळ्यात तुमचे ईतिहासकार स्वारी नवसंशोधक जन्मण्या अगोदरच आत्महत्या केली.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 16:51 नवीन
आत्महत्या केली तरीही, त्याच्या आत्म्याला शांती लाभो, अशीच विश्वचरणी प्रार्थना. नै, उगाच परत 21 व्या शतकात काहीजनांच्या, आंगात परत त्याच्या आत्मयाने संचारुन, धुडगुस नको घालायला, म्हणून काळजी..
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
A
arunjoshi123 Sat, 08/12/2017 - 17:02 नवीन
21 व्या शतकात काहीजनांच्या, आंगात परत त्याच्या आत्मयाने संचारुन, धुडगुस नको घालायला, म्हणून काळजी..
अत्यंत सयंत, सन्मानपूर्वक एक प्रश्न आहे. आणि वरच्या विधानाच्या अनुषंगानेच आहे - बंदिस्त करणे ही पुरेशी सजा आहे का? आणि अन्य सजांची प्रावधान करणारे हे पापी का?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 17:19 नवीन
सजा किंवा सूड़ नको, प्रबोधन हवे.
↩ प्रतिसाद: arunjoshi123
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 17:33 नवीन
एकट्या मनु ने नाहि तर त्याच्या स्मृति ने पण आत्महत्या केलिय त्यामुळे तुमचे वाक्य असे पायजेल. ""त्याच्या व तिच्या आत्म्याला शांती लाभो, अशीच विश्वचरणी प्रार्थना."" उगाच परत 21 व्या शतकात काहीजनांच्या, आंगात परत त्याच्या आत्मयाने संचारुन, धुडगुस नको घालायला, म्हणून काळजी. आता मनु त्याच्या स्मृति ला घेउन अजुनहि कित्येक लोकांच्या स्वप्नात येतो मग लोग आपापल्या उपद्रव शक्ति प्रमाणे धुडगुस घालतात, काहि पुतळे फोडतात, काहि भांडारकर सारख्या संस्थांवर हल्ले करतात, काहि पिवळि पुस्तके लिहिल्या प्रमाणे संशोधन करुन ईतिहास लिहितात...वग्रे वग्रे. आन नाहिच काहि जमल तर मिपा आहेच एक नविन हायजॅक धागा काढायला. गजोधर भौ हा तुमचा शिवजयंति हायजॅक वरिलधागा आणि त्यावरिल डॉ. खरे साहेंबाचि एक प्रतिक्रिया, आणि त्यावरील आपले उत्तर :) http://www.misalpav.com/comment/732386#comment-732386 खरे साहेब :- जाता जाता हे पण सांगून टाका कि गणेशोत्सव कुणी चालू केला आणी गणपती हा देव आहे हा शोध कुणी लावला? गजोधर भौ :- "शिवजयंती कोणी सुरु केली ?" असा प्रश्न होता सर. "सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला ?" असा नव्हता. मग नेक्ष्ट धागा हा का ? गणपती हा देव आहे हा शोध कुणी लावला? त्याच्या अंगात जान्हवे का घालतात ? चालु द्या. तेव्हढिच आमचि हि हि करमणुक.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Sat, 08/12/2017 - 16:20 नवीन
टिळकांनी सार्वजनिक गणेशौत्सव सुरु केला याला कसलाही पुरावा नाही.ज्याच्यकडे आहे त्याने सादर करावा. सार्वजनिक शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी व सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केले आहेत. (लिहून ठेवतो ,कारण उद्या इतिहास बदलायची खुमखुमी असलेले नागपुरी बोरुबहाद्दर काहीही ठोकून देतील)
A
arunjoshi123 Sat, 08/12/2017 - 16:45 नवीन
टिळकांनी या दोन्ही अनिष्ट प्रथांना जोरकस विरोध केला असं देखिल लिहा. आणी नागपूरचे सगळेच बोरू कापायचं कंत्राट नागपूर इंप्रूवमेंट ट्रस्टला काढायला सांगू.
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अ
अभ्या.. Sat, 08/12/2017 - 17:22 नवीन
ओ नाई नाई. अर्धा भाग बरोबर आहे. भाऊसाहेब रंगारींची सुरुवात व्हायच्या आधी आजोबा गणपती होता. आमचे ग्याझेट पण तेच म्हणतेय आणि रंगारीचे म्हणाल तर त्यांना १२५ वर्षे झालीत, आजोबा गणपतीला १३५ वर्षे. Ganapati Festival is carried out with great pomp and gaiety. Ajoba Ganpati is 100 years old Ganpati. Even before Tilakji started the Ganesh festival, it is said that Tilakji got inspired by the Ajoba Ganpati celebrations from Solapur and later Ganesh festival now is national Festival.
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 07:29 नवीन
आजोबा गणपति मंड़ळ / कार्यकर्ते, यानी काही, याबाबत दावा केला आहे का ? तुमच्या वरच्या प्रतिक्रियेचा संदर्भ देता का प्लीज ? आजोबा गणपतिने सार्वजनिक उत्सव सुरु करण्या मागे कशाची प्रेरणा होती ? कोण होते या गणपतिचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर करण्यात, पुढाकार घेणारे ? कोण होते या मंडळ मागचे प्रणेते, की ज्यांच्यापासून टिळकांनी ही प्रेरणा घेतली... संधर्भ दया वाचायला आवडेल .
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मोदक Mon, 08/14/2017 - 14:32 नवीन
इथे पण आडनांवं बघून भूमीका ठरवणार का..?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 15:48 नवीन
पूर्वेतिहास तरी हेच सांगतो.
↩ प्रतिसाद: मोदक
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 16:50 नवीन
नागपूर इंप्रूवमेंट ट्रस्ट हागवण थांबवण्यासाठी खास एरंडेल हि बनवते. पत्ता द्या पाठवतो.
A
arunjoshi123 Sat, 08/12/2017 - 16:58 नवीन
कोण सचिन?
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा