Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - १२

श
श्रीगुरुजी
Mon, 09/25/2017 - 09:08
🗣 197 प्रतिसाद
चालू धाग्यात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा

प्रतिक्रिया द्या
38659 वाचन

💬 प्रतिसाद (197)
ज
जेम्स वांड Wed, 09/27/2017 - 17:22 नवीन
अच्छा, असं असतं होय, थँक्यू श्रीगुरुजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चिनार Fri, 09/29/2017 - 10:37 नवीन
जेम्स भाऊ.. उपकुलगुरू हे पद प्र-कुलगुरू (Pro Vice Chanslar) या नावाने ओळखले जाते. सांगायला अभिमान वाटतो,माझे मामा श्री राजेश जयपूरकर हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त प्र-कुलगुरू आहेत. त्यांची निवड राज्य सरकारने केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
अ
अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 08:51 नवीन
भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करणारे अनेक लेख सध्या वाचनात आले बहुतांश लेख हे निराशाजनक चित्र मांडतात, अर्थव्यवस्था वर नोटबंदी आणि gst ची घाईत केलेली अमलबजावणी याचा झालेला परिणाम अनेक लेखकांनी दाखवून दिलेला आहे. कोणताही वृत्तपत्र घ्या उजवीकडे झुकणारे असो वा डावीकडे सगळेजण सरकार ने अर्थ व्यवस्थेचं केलेलं ढिसाळ नियोजन आणि काही मूर्ख निर्णय यावर बोट ठेवतात. स्वराज ह्या उजवीकडे झुकलेल्या माध्यमात ही सरकार विरोधी सूर उठू लागले आहेत, काल the hindu मध्ये अशी बातमी वाचली की भारतीय मजदूर संघाने सरकार च्या सल्लागार यांना दोषी धरलं. सुब्रम्हणयं स्वामी आणि यशवंत सिन्हा यांनी तर घरचा आहेर दिलाय. अर्थ व्यवस्थेतील दोष दाखवून देणाऱ्या तज्ज्ञना सरकार फाट्यावर मारत होते, विरोधी लोक म्हणून हिणावत होते. आता यांचीच लोक तोंड उगडाय लागल्याने सरकार ची अवस्था वाईट झाली आहे. Gdp नंबर एक वेळ बाजूला ठेवू पण रोजगार। निर्मिती ही ठप्प झालीय, the hindu मध्ये बातमी वाचली होती की रोजगार निर्मितीचा दर 2010 पासून मोठ्या प्रमाणात घसरत आहे, वर्षाला 1 कोटी रोजगार देवू च्या घोषणा करणाऱ्या मोदींना यावर कोणतीही उपाययोजना करता आली नाही ही शरमेची बाब आहे. खरेतर अनेक लोकांना भ्रष्टयाचार, काळा पैसा, पाकिस्तान या मुद्यापेक्षा ही रोजगार निर्मितीचा मुद्दा महत्वचा वाटतो, कारण लोकांना काम हवं. मनरेगा हा काँग्रेस चे अपयश आहे अशी गर्जना करणाऱ्या मोदींना ही योजना चालू ठेवावी लागली एवढच नव्हे त्यावरील खर्च वाढवावा लागला कारण जर याद्वारे होणारी रोजगार निर्मिती थंडावली तर ग्रामीण भागात असंतोष पसरेल. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञना फाट्यावर मारणाऱ्या आणि काहीही वक्तव्य करणाऱ्या मोदींना ही एक सणसणीत चपराक आहे. Livmint ह्या स्थळावर बातमी वाचली ज्यामध्ये हिंदुस्तान unilever कंपनीच्या प्रमुखांनी ग्रामीण भागात नोटबंदी मूळे मागणी घटली असे स्पष्ट म्हंटले आहे, आता नोटबंदी मुले लोक अंघोळ करायची बंद झाली का असे हास्यास्पद प्रश्न विचारू नयेत. तेलाच्या किमतीतुन काही लाखो कोटींचा घबाड मिळवून सुद्धा जेटली ची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे वित्तीय तूट ही वाढत चाली आहे, जेटली याना वन्य आश्रमात पाठवून द्यावे. Upa2 च्या सुमार कामगिरी नंतर मनमोहन सिंग यांना लोकांनी परत त्यांच्या मूळ व्यवसायात परत पाठवले (पंजाब विद्यापीठात प्रोफसर), मोदींनी ताबडतोब योग्य पाऊले टाकावीत चुकीचे निर्णय न घेता रोजगार निर्मिती करावी आणि अर्थ व्यवस्था सक्षम करावी, अन्यथा मूळ व्यवसायात परत जावे लागेल. फक्त प्रामाणिक असणे गरजेचे नाही लोकांना हाताला काम हवे अन्यथा सामाजिक असंतोष वाढत जाईल। मोदींनी एवडी सुद्धा सुमार कामगिरी करू नये की लोकांना राहुल गांधीच आसरा वाटेल।
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 11:32 नवीन
Gdp नंबर एक वेळ बाजूला ठेवू पण रोजगार। निर्मिती ही ठप्प झालीय, the hindu मध्ये बातमी वाचली होती की रोजगार निर्मितीचा दर 2010 पासून मोठ्या प्रमाणात घसरत आहे, वर्षाला 1 कोटी रोजगार देवू च्या घोषणा करणाऱ्या मोदींना यावर कोणतीही उपाययोजना करता आली नाही ही शरमेची बाब आहे. खरेतर अनेक लोकांना भ्रष्टयाचार, काळा पैसा, पाकिस्तान या मुद्यापेक्षा ही रोजगार निर्मितीचा मुद्दा महत्वचा वाटतो, कारण लोकांना काम हवं. रोजगार निर्मितीची काही वस्तुनिष्ठ आकडेवारी आहे का? म्हणजे नोटाबंदीमुळे १५ लाख नोकर्‍या गेल्या, ४ कोटी नोकर्‍या गेल्या असे आकडे बरेच पुढारी कोणत्याही वस्तुनिष्ठ आकडेवारीशिवाय फेकत होते. तसेच रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे अशा आरोपांना काही वस्तुनिष्ठ आधार आहे का? Livmint ह्या स्थळावर बातमी वाचली ज्यामध्ये हिंदुस्तान unilever कंपनीच्या प्रमुखांनी ग्रामीण भागात नोटबंदी मूळे मागणी घटली असे स्पष्ट म्हंटले आहे, आता नोटबंदी मुले लोक अंघोळ करायची बंद झाली का असे हास्यास्पद प्रश्न विचारू नयेत. हा प्रश्न हास्यास्पद नाही. एफएमसीजी गुड्स ची मागणी घटली असे जेव्हा एखादी कंपनी सांगते तेव्हा दोनच शक्यता असतात. एक तर लोकांनी ही उत्पादने वापरणे कमी केलेले असते किंवा या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा खप वाढलेला असतो. पतंजली उत्पादनांमुळे युनिलिव्हरसारख्या अनेक कंपन्यांच्या विक्रीवर परीणाम झाला आहे असे वाचनात येते. युनिलिव्हरचा खप कमी झाला याचा अर्थ जनतेतूनच मागणी घटली असा काढण्यापेक्षा त्या क्षेत्रातील पतंजली, गोदरेज इ. कंपन्यांची विक्री वाढली असा सुद्धा अर्थ होऊ शकतो. तेलाच्या किमतीतुन काही लाखो कोटींचा घबाड मिळवून सुद्धा जेटली ची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे वित्तीय तूट ही वाढत चाली आहे, जेटली याना वन्य आश्रमात पाठवून द्यावे. https://currentaffairs.gktoday.in/rbi-indias-current-account-deficit-narrowed-2016-17-06201745630.html वरील वृत्तांतानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट आधीच्या वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 12:02 नवीन
रोजगार निर्मितीची काही वस्तुनिष्ठ आकडेवारी आहे का? म्हणजे नोटाबंदीमुळे १५ लाख नोकर्‍या गेल्या, ४ कोटी नोकर्‍या गेल्या असे आकडे बरेच पुढारी कोणत्याही वस्तुनिष्ठ आकडेवारीशिवाय फेकत होते. तसेच रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे अशा आरोपांना काही वस्तुनिष्ठ आधार आहे का?
वरील प्रतिक्रिये मध्ये मी फक्त नोटबंदी मुळे नव्हे तर एकूण जॉबलेस ग्रोथ बद्दल बोलतोय जे २०१० साली सुरु होऊन अजून चालूच आहे. खालील लिंक पहा http://www.thehindu.com/business/Industry/Joblessness-rises-to-5-year-high/article15002364.ece हे पहा मोदी सरकारच्या मंत्रालयाची आकडेवारी The annual survey also showed that 47.8 percent of the surveyed population was reported to be employed in 2015-16 compared with 49.9 percent (also known as worker population ratio) two years earlier when the previous survey was conducted by the Labour Bureau, under the Ministry of Labour and Employment. खालील unemployment rate २००९-२०१०= ९.३% २०११-२०१२=३% २०१२-२०१३=४.७% २०१३-२०१४=४.९% २०१४-२०१५=५%
हा प्रश्न हास्यास्पद नाही. एफएमसीजी गुड्स ची मागणी घटली असे जेव्हा एखादी कंपनी सांगते तेव्हा दोनच शक्यता असतात. एक तर लोकांनी ही उत्पादने वापरणे कमी केलेले असते किंवा या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा खप वाढलेला असतो. पतंजली उत्पादनांमुळे युनिलिव्हरसारख्या अनेक कंपन्यांच्या विक्रीवर परीणाम झाला आहे असे वाचनात येते. युनिलिव्हरचा खप कमी झाला याचा अर्थ जनतेतूनच मागणी घटली असा काढण्यापेक्षा त्या क्षेत्रातील पतंजली, गोदरेज इ. कंपन्यांची विक्री वाढली असा सुद्धा अर्थ होऊ शकतो.
खालील लेख पहा How deep is India’s economic mess? The heads of two companies that are considered yardsticks of the broader economy have recently spoken out about the problems they are facing. Hindustan Unilever chief executive Sanjiv Mehta said in a presentation to investors that rural demand for its products has been weak because of the lingering effects of demonetization as well as the farm crisis. आता हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचा प्रमुख आपले उत्पादन कशाने घटले याबाबत प्रोफेशनल असावा असे मला वाटते तो काँग्रेस चा हस्तक नसावा नोटबंदीवर जबाबदारी झटकायला, तुम्ही दिलेलं कारण हे long टर्म आहे इथे ते शॉर्ट टर्म इफेक्ट बद्दल बोलतायत. आता मोदी साठी तुम्ही ह्याला खोटं पाडणार असाल तर माझी काही हरकत नाही.
वरील वृत्तांतानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट आधीच्या वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे.
आता तुटीबद्दल इथे अद्यावत माहिती आहे, तुमची माहिती पाठीमागच्या वर्षाची आहे http://www.hindustantimes.com/business-news/current-account-deficit-increases-to-2-4-of-gdp-in-q1-on-widening-trade-gap/story-fV92b6Sed5cwQ0aPTOKpnJ.html India’s current account deficit (CAD) soared to a four-year high of $14.3 billion, or 2.4% of gross domestic product (GDP), in the June quarter as gold imports picked up ahead of implementation of the goods and services tax (GST) starting July 1. In the March quarter of 2016-17, CAD was 0.6% of GDP at $3.4 billion, according to Reserve Bank of India data. म्हणजे ०.६% वरून २. ४ % झेप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 16:43 नवीन
वरील प्रतिक्रिये मध्ये मी फक्त नोटबंदी मुळे नव्हे तर एकूण जॉबलेस ग्रोथ बद्दल बोलतोय जे २०१० साली सुरु होऊन अजून चालूच आहे. खालील लिंक पहा नोटाबंदीमुळे १५ लाख/४ कोटी नोकर्‍या गेल्यात, काम नसलेल्यांच्या संख्येचे आकडे इ. विषयी आपण एका धाग्यात सविस्तर बोललो आहोत. या आकड्यांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नाही हे त्यावेळी मी लिहिले होते. परत तेच तेच लिहायचा उत्साह नाही. Hindustan Unilever chief executive Sanjiv Mehta said in a presentation to investors that rural demand for its products has been weak because of the lingering effects of demonetization as well as the farm crisis. युनिलिव्हरच्या उत्पादनांची विक्री/मागणी घटली याचा अर्थ निश्चलीकरणाने सर्वत्र मंदी झाली असा होत नाही. युनिलिव्हरच्या उत्पादनांची मागणी कमी असली तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची विक्री वाढलेली असू शकते. पंतजलीची उत्पादने जोरदार खपत आहेत. याचा संबंध युनिलिव्हरच्या विक्रीत घट झाली याच्याशी नसेल का? नुकतीच बातमी वाचली. टाटा डोकोमो कंपनी बंद होणार आहे कारण त्यांना फारसे ग्राहक मिळत नाहीत. याचा अर्थ संपूर्ण मोबाईल क्षेत्रात मागणी कमी झाली असा होत नाही कारण त्यांचे इतर प्रतिस्पर्धी जोरदार व्यवसाय करीत आहेत. आता तुटीबद्दल इथे अद्यावत माहिती आहे, तुमची माहिती पाठीमागच्या वर्षाची आहे माझे आकडे हे २०१६-१७ या वर्षातीलच आहेत. हे आकडे हवे तसे वापरता येतात. प्रत्यक्ष तूट कमी झाली तरी जीडीपीबरोबरील रेशोच्या तुलनेत ती वाढली असेही सांगता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 16:55 नवीन
युनिलिव्हरच्या उत्पादनांची विक्री/मागणी घटली याचा अर्थ निश्चलीकरणाने सर्वत्र मंदी झाली असा होत नाही. युनिलिव्हरच्या उत्पादनांची मागणी कमी असली तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची विक्री वाढलेली असू शकते. पंतजलीची उत्पादने जोरदार खपत आहेत. याचा संबंध युनिलिव्हरच्या विक्रीत घट झाली याच्याशी नसेल का? नुकतीच बातमी वाचली. टाटा डोकोमो कंपनी बंद होणार आहे कारण त्यांना फारसे ग्राहक मिळत नाहीत. याचा अर्थ संपूर्ण मोबाईल क्षेत्रात मागणी कमी झाली असा होत नाही कारण त्यांचे इतर प्रतिस्पर्धी जोरदार व्यवसाय करीत आहेत.
खूपच जनरल प्रतिसाद, टाटा डोकोमो चा काय संबंध. असो प्रतिवाद करत नाही, सहमत नाही एवढाच सांगतो.
माझे आकडे हे २०१६-१७ या वर्षातीलच आहेत.
अहो २०१६-२०१७ हे अर्थ वर्ष मार्च २०१७ ला संपत असं मला वाटत, मी माझा डेटा जून २०१७ चा म्हणजे २०१७-२०१८ ह्या अर्थ वर्षात येणार आहे.
हे आकडे हवे तसे वापरता येतात. प्रत्यक्ष तूट कमी झाली तरी जीडीपीबरोबरील रेशोच्या तुलनेत ती वाढली असेही सांगता येते.
काहीही, फक्त parcentage दिले नाहीत आकडे दिलेत ना मी, ३ बिलियन डॉलर वरून तूट १२ बिलियन डॉलर वर गेलीय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 17:00 नवीन
एका तिमाहीवरून ठाम निष्कर्ष काढता येत नाही. वृत्तांतात स्पष्टपणे लिहिले आहे की जूनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढली व त्यामुळे तूट जास्त दिसते. सोन्याची आयात वाढली कारण व्यापार्‍यांना १ जुलैला वस्तू व सेवा कर लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त सोने आयात करायचे होते. म्हणजे या तिमाहीसाठी तूट वाढण्याचे ते तात्कालिक कारण होते. आता वसेक लागू झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आयात होणे अवघड आहे व त्यामुळे आयात आपोआपच कमी होईल. निष्कर्ष काढण्यापूर्वी अशीही कारणे विचारात घ्यावी लागतात. तसे केले नाही तर एकांगी निष्कर्ष निघतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 16:35 नवीन
अजून एक लेख ज्यामध्ये सरकारी आकडेवारी गृहीत धरली आहे . सरकारच्या लेबर ब्युरो ने आकडेवारी प्रसिद्द केली आहे http://www.firstpost.com/business/where-are-the-jobs-mr-modi-2731002.html फोटो क्रॉप करून चिटकवता येत नाही म्हणून आकडेवारी देतो. आकडे २००९= १२. ५६ लाख २०१० = ८. ५६ लाख २०११ = ९. ३० लाख २०१२=३. २२ लाख २०१३ = ४. १९ लाख २०१४ = ४. १३ लाख २०१५ = १. ३५ लाख असे अनेक लेख देता येतील तेही वेगवेगळ्या सूत्रांकडून. अजून आकडेवारी साठी खालील लेख यात हि सरकारी आकडेवारी दिली https://thewire.in/136618/whatever-happened-to-modis-development/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 16:55 नवीन
अजून एक लेख ज्यामध्ये सरकारी आकडेवारी गृहीत धरली आहे . सरकारच्या लेबर ब्युरो ने आकडेवारी प्रसिद्द केली आहे या लेखात डिसेंबर २०१५ मध्ये संपलेल्या तिमाहीची आकडेवारी आहे. त्यामुळे याच्याशी निश्चलीकरणाचा अजिबात संबंध नाही. मी आधी लिहिल्याप्रमाणे असे अनेक वेगवेगळे परस्परविरोधी वृत्तांत असतात व बर्‍याचश्या वृत्तांतात स्पेक्युलेशन असते. फारच क्वचित वस्तुनिष्ठ वृत्तांत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 17:02 नवीन
या लेखात डिसेंबर २०१५ मध्ये संपलेल्या तिमाहीची आकडेवारी आहे. त्यामुळे याच्याशी निश्चलीकरणाचा अजिबात संबंध नाही. मी आधी लिहिल्याप्रमाणे असे अनेक वेगवेगळे परस्परविरोधी वृत्तांत असतात व बर्‍याचश्या वृत्तांतात स्पेक्युलेशन असते. फारच क्वचित वस्तुनिष्ठ वृत्तांत असतो.
नोटबंदीच्या काळात जॉब गेले का नाही यावर आपले मतभेद आहेत मी मात्र माझ्या मतावर ठाम आहे, आता जरा नोटबंदी बाजूला ठेवू आणि longterm चा विचार करू. अहो मोदी सरकारच्या कालावधीत जॉब घटत चालत हे तरी मान्य कराल कि नाही. तुम्हाला सरकार विरोधी कोणताही वृत्तांत खरा वाटत नाही, मग आता असा तुम्हाला मान्य असणारा वस्तुनिष्ठ वृत्तांत कुटून आणणारा कि देव देणार का मोदी छाती बडवून जे बोलतात तेच वस्तुनिष्ठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 17:37 नवीन
अहो मोदी सरकारच्या कालावधीत जॉब घटत चालत हे तरी मान्य कराल कि नाही. नाही तुम्हाला सरकार विरोधी कोणताही वृत्तांत खरा वाटत नाही, मग आता असा तुम्हाला मान्य असणारा वस्तुनिष्ठ वृत्तांत कुटून आणणारा कि देव देणार का मोदी छाती बडवून जे बोलतात तेच वस्तुनिष्ठ वृत्तांत कोणीही द्यावा. परंतु तो स्पेक्युलेशन, पक्षीय भूमिका, दुराग्रह, व्यक्तिगत अंदाज इ. वर आधारलेला नसून वस्तुनिष्ठ आकडेवारीवर आधारीत असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 17:48 नवीन
मी वरती दिलेला डेटा हा त्या लेखकांनी लेबर बयूरो ह्या कामगार मंत्रालयाच्या संस्थेकडून (सरकारकडून) घेतला आहे त्यात कसल्या आल्या स्पेक्युलेशन, पक्षीय भूमिका, दुराग्रह, व्यक्तिगत अंदाज इ. ह्या गोष्टी. असो थांबतो इथेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 09/29/2017 - 10:31 नवीन
भारत या १३०+ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात कोणाकडे रोजगार आहे व कोणाकडे नाही याची अचूक माहिती कोणत्याही यंत्रणेकडे नाही. त्यामुळे जे व्यक्त केले जात आहेत ते केवळ अंदाज आहेत. हे अंदाज कितपत खरे आहेत हे तपासण्याची यंत्रणा सुद्धा भारतात नाही. निश्चलीकरण व त्यानंतरचा काळ या काळात १५ लाख नोकर्‍या गेल्या, ४ कोटी नोकर्‍या गेल्या असे अनेक अंदाज व्यक्त केले जात होते. कोणाकडेही अचूक माहिती नव्हती. या मुद्द्यावर आलेले अनेक वृत्तांत हे परस्परविरोधी आकड्यांनी व दाव्यांनी भरलेले होते हे मी एका पूर्वीच्या धाग्यात दाखवून दिले आहे. एक तिमाही किंवा थोड्या कालावधीतील आकडेवारीवरून ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. १ जुलैपासून वसेक अंमलात येण्याच्या आधीच्या महिन्यात सोने व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीत खूप वाढ झाली व त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली हा योगायोग किंवा अर्थव्यवस्थेतील मंदीचे लक्षण नव्हते. त्याचा संबंद १ जुलैपासून अंमलबजावणी होणार्‍या वसेकशी होता. २०१५ मध्ये नवरात्र व दसरा हे सण ऑक्टोबरमध्ये तर दिवाळी नोव्हेंबरमध्ये होती. साहजिकच सणाच्या काळातील खरेदी २ महिन्यात विभागली गेली. परंतु २०१६ मध्ये सर्व सण ऑक्टोबरमध्येच आल्याने सणाची खरेदी फक्त ऑक्टोबरमध्ये होऊन नोव्हेंबर २०१६ मध्ये नोव्हेंबर २०१५ च्या तुलनेत कमी खरेदी झाली. काही जणांनी लगेच याचा संबंध निश्चलनीकरणाशी लावला. आता २०१७ मध्ये नवरात्र व दसरा सप्टेंबरमध्ये तर दिवाळी ऑक्टोबरमध्ये आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१६ मधील विक्री व ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मधील विक्री यांची तुलना करता येणार नाही कारण २०१७ चे आकडे कमीच असणार आहेत. परंतु काही जण याचा संबंध निश्चलनीकरणाशी लावतील हे नक्की. ८ नोव्हेंबरला निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर काही दिवसांनी भारतात रोखीची चणचण आहे, लोकांनी खर्चाचा हात आखडता घेतला आहे अशा बातम्या दिल्या जात होत्या. नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ या काळात चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते. लोकांकडे रोख पैसे नसते किंवा लोकांनी खर्च कमी केला असता तर चित्रपट पडले असते. त्याच काळात डिसेंबरमध्ये सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलुन गेल्याच्या बातम्या होत्या. निश्चचलनीकरणामुळे मागणी घटली, मंदी आली इ. गोष्टी स्पेक्युलेशनच होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
स
सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 10:05 नवीन
दहा लाख बोगस कर्जाची खाती आढळून आली आहेत. http://www.livemint.com/Politics/ObL8ytHgISSnbEgIrEN9BM/One-million-bank-accounts-of-Maharashtra-farmers-fake-wont.html "After the 2008-09 loan waiver scheme, NABARD had recovered Rs 117 crore from banks and credit societies in Kolhapur district that were proved misappropriated. In fact, one fraudster had got Rs 82 lakh loan waiver." http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/over-10-lakh-bank-a/cs-for-farm-loan-waiver-fake-says-minister/articleshow/60487224.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 09/29/2017 - 11:39 नवीन
दहा लाख बोगस कर्जाची खाती आढळून आली आहेत. शेतकऱ्यांचा बोगस असा उल्लेख करून तुम्ही त्यांचा अपमान केला आहे. पाहिजे तर त्यांना अपात्र म्हणा, पण बोगस म्हणून अपमान करू नका. - इति दादात दादा अजितदादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनन्त अवधुत Fri, 09/29/2017 - 22:52 नवीन
मी ६ नाही ३६ खून केलेत. या केस चा काही विकी दुवा आहे का?
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 10/02/2017 - 13:13 नवीन
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 10/04/2017 - 08:20 नवीन
यवतमाळमध्ये कापसाच्या पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन किमान १८ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. मराठी पेपरं थंड आहेत. कदाचित यवतमाळला टिआरपी नसावा.
Farmers are forced to spray pesticides such as Profenofos as the crop is vulnerable to pests such as bollworm in the current weather, he said.
तर माझे प्रश्न खालीलप्रमाणे: १. बिटी बियाणे आले तेच मुळी किडीचा प्रादुर्भाव कमी होईल या आशेने? त्याचे काय झाले? २. किटकनाशके वापरण्यासंबंधीच्या सुचना देण्याचे काम कोणाचे असते? ते केले गेले का? ३. माणूस मरावा इतकी ही किटकनाशके विषारी असतील तर सरकीचे तेल, पेंड यामध्ये त्याचा अंश उतरत असेलच. जनावरांच्या दुधात त्याचे biomagnification होत असेलच. कि नाही? आणखीही माहिती असेल तर अवश्य द्यावी.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Wed, 10/04/2017 - 08:39 नवीन
संधीसाधू दुटप्पीपणा आणि सोयीची हिंदुविरोधी सहिष्णूता! लेख बऱयाच अंशी पटलेला आहे. अवांतर:बहुदा काँग्रेस ला याची जाणीव झालेली दिसतेय, म्हणूनच कधीमधी मंदिराच्या पायऱ्या चढणारे काँग्रेस चे सर्वोच्च नेते आता सारख्या मंदिर प्रदक्षिणा घालू लागलेत. अति सौम्य हिंदुत्व चा पुरस्कार करणारी किंवा पूर्णपणे निधर्मी काँग्रेस पाह्यला आवडेल।
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 10/04/2017 - 08:46 नवीन
लेख पटला..
पण इतर धर्मांच्या, विशेषतः इस्लामच्या विरोधात काहीही लिहिले तर त्याचे परिणाम हिंसेत होतात आणि तरीही त्याविरुद्ध पारंपारिक माध्यमे ब्र काढत नाहीत. केरळमध्ये प्राध्यापक टी.जे.जोसेफ यांच्या हाताचा पंजा काही मुसलमान धर्माधांनी छाटून टाकला. एका प्रश्नपत्रिकेत प्रेषितांविषयी वादग्रस्त प्रश्न विचारल्याबद्दल इस्लामी धर्माधांनी जोसेफ यांच्यावर हा हल्ला केला. पी एफ आय ह्या इस्लामी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. या संघटनेची दहशत केरळमध्ये इतकी आहे की टी.जे.जोसेफ ह्यांच्या पाठीशी ना सरकार उभे राहिले, ना चर्च. या प्रकारानंतर निराश होऊन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. एका संपूर्ण कुटुंबाची अशी वाताहत होऊनदेखील देशातला लिबरल मीडिया जोसेफ यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. मागे महाराष्ट्रात एका वृत्तपत्राने आयसिसला पैसे कुठून येतात, हे दाखवण्यासाठी नुसतं "पिगी बॅंक' हे रेखाचित्र वापरलं होतं तर इस्लामी कट्टर संघटनांनी या वृत्तपत्राच्या औरंगाबाद कार्यालयावर मोर्चा आणला आणि संपादकांनी सपशेल शरणागती पत्करून माफी मागितली. तेव्हा या वृत्तपत्राने माफी मागणं चूक आहे, असं म्हणण्याचं धाडस स्वतःला "पुरोगामी विचारवंत' म्हणवणाऱ्या किती लोकांनी दाखवलं? कोलकत्त्याच्या टेरेसांना मिळालेल्या तथाकथित संतपदाच्या विरोधात अग्रलेख लिहीण्याचे धाडस दाखवणाऱ्या मराठी वृत्तपत्रावर छापलेला अग्रेलख "मागे घेण्याची' नामुष्की ओढवली. त्या वृत्तपत्राच्या संपादकांनाही माफी मागावी लागली. पण त्यांच्या बाजूने त्यांच्याच व्यवसायातले किती लोक बोलले?
:((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ग
गामा पैलवान Wed, 10/04/2017 - 09:15 नवीन
अमितदादा, खरंतर जुनी काँग्रेस अतिसौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी होतीच. सरदार पटेलांनी स्वातंत्र्योत्तर काळात सोमनाथाचं मंदिर जीर्णोद्धार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९७१ साली पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा काँग्रेसला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श प्रस्थापित करायची सुवर्णसंधी होती. इंदिरा गांधी यांचं खरं नाव मैमुना बेगम खान. तर एक मुस्लीम महिला भारताच्या ५००० वर्षांच्या विजयाचा इतिहास सांगते आणि मुस्लीम राष्ट्राचे दोन तुकडे करते हा हिंदू अस्मितेचा विजय आहे. या विजयाच्या भक्कम पायावर पाकिस्तानचा वैचारिक पराभव करणं सहज शक्य होतं. मात्र काँग्रेसकडून ते झालं नाही. शीखांना दुखावल्यावरून इंदिरा गांधींची हत्या झाली. पुढे राजीव गांधींना प्रचंड बहुमत मिळूनही शाहबानो प्रकरणात मुल्लामौलवींसमोर सपशेल लोटांगण घातलं. अशा प्रकारे हिंदू सदिच्छांची विल्हेवाट लावण्यात आली. भारतातल्या बुद्धीजीवी वर्गाचा एक लाडका सिद्धांत आहे. तो म्हणजे मुस्लीम नेहमी एकगठ्ठा मतदन करतात. आणि दुसरा लाडका सिद्धांत म्हणजे हिंदू मतदार नेहमी विखुरलेला असतो. या दोन सिद्धांतांवर विसंबून मुस्लिमांची अधिकाधिक मते मिळवण्याच्या हव्यासातून काँग्रेस आणि सेक्युलर पक्षांकडून हिंदूंना दुखावणं सुरू झालं. १९८९ ते २००९ या वीस पंचवीस वर्षांच्या कालावधीत हे चित्रं जरी सर्वसामान्य असलं तरी या दोन्ही सिद्धांतांना पुरून उरेल असा प्रचार करता येऊ शकतो. तसा मोदींनी केला. हिंदूसुद्धा एकगठ्ठा मतदान करू शकतात हे काँग्रेसच्या हळूहळू ध्यानी येऊ घातलंय. हे सुचिन्ह आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अनन्त अवधुत Wed, 10/04/2017 - 09:26 नवीन
काहीही हा आ. न. गा. पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
I
II श्रीमंत पेशवे II Wed, 10/04/2017 - 12:29 नवीन
मी एक पुस्तक डाऊनलोड केले होते त्याची लिंक पाठवतो आहे http://www.savehinduism.in/stories/article/635.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
व
विशुमित Wed, 10/04/2017 - 12:40 नवीन
पेशवे , गा पै टणाटण प्रभात वाचतात आणि तुम्ही असली खतरनाक पुस्तके वाचता..! त्याखाल्लाच्या कंमेंट्स तर लाजवाब,,,, ... चरणामृत द्या, आमच्या मस्तकावर शिंपडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II श्रीमंत पेशवे II
ग
गामा पैलवान Wed, 10/04/2017 - 14:05 नवीन
विशुमित, गरजूंसाठी खालील श्लोक म्हणतो आहे : सर्वेऽपि सुखिन: सन्तु सर्वे: सन्तु निरामया: सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खमाप्नुयात (वरील श्लोकात कृपया चूक भूल देणे घेणे.) कोणाला कसली गरज पडेल ते सांगता येत नाही. पहाटे पहाटे काय टणाटण होतं ते सगळ्यांना ठाऊक आहे. पण मिपावरील काही लोकांचं ते होताहोता होत नाही. म्हणून हे लोकं 'टणाटण प्रभात' असा टाहो फोडीत हिंडत असतात. तुम्ही त्यांच्यातले होऊ नका. अशा वंचितांसाठी वरील श्लोक म्हंटला आहे. कृपया वैयक्तिक रीत्या घेऊ नये. धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 10/04/2017 - 15:04 नवीन
ओके.. आम्ही कोणाच्याच बाजूचे नाही. जे स्वतःला नाही पटत त्यावर बोलणारच भले दुसऱ्याला पटो अगर न पटो... बिलकुल वैयिक्तक घेणार नाही. बाकी तुमच्या आवडीनिवडीचा आदर आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अनन्त अवधुत Wed, 10/04/2017 - 21:43 नवीन
फिरोझ गांधी बाबत सुरुवात चुकीची आहे, मी पुढे काही वाचले नाही. फिरोझ गांधी हे गांधी म्हणूनच जन्माला आले होते. खान नाही. ते जन्माने पारशी होते, त्यांचे आई आणि वडील दोघे पण पारशी होते. विकी दुआ मी विकी वर अशा गोष्टींबाबत जास्त विश्वास ठेवतो कारण मला त्या पुस्तकाच्या सत्यतेची खात्री नाही. तिकडे कोणतेही विश्वासार्ह संदर्भ नाहीत. विकी वर संदर्भ दिले आहेत. तिथे लोक सतत बघत/ संपादित करत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II श्रीमंत पेशवे II
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/05/2017 - 10:40 नवीन
मी थोडीशी वेगळी हकीकत वाचली आहे. फिरोज गांधींचे मूळचे आडनाव घँडी असे होते. फिरोज मुस्लिम असल्याने इंदिराजींनी त्यांच्याबरोबर लग्न करण्यास नेहरूंचा विरोध होता. गांधीजींना धर्माच्या कारणावरून केलेला विरोध मान्य नव्हता. शेवटी गांधीजींनी फिरोजना स्वतःच्या मांडीवर बसवून दत्तक घेतले व त्यामुळे त्यांना स्वतःचे गांधी आडनाव दिले. त्यानंतर ते लग्न झाले. खरेखोटे खुदा जाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 10/05/2017 - 22:17 नवीन
त्यामुळे फिरोज यांनी गांधी आडनाव वापरायला सुरुवात केली असे मी पण वाचले आहे. पण त्याला कसलाही विश्वास ठेवण्याजोगा पुरावा/ संदर्भ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सही रे सई Wed, 10/04/2017 - 19:34 नवीन
लेखात लिहिलेली परिस्थिती खूप विचार करायला लावणारी आहे. पण हा लेख चक्क सकाळ सारख्या कॉंग्रेस धार्जिण्या वर्तमानपत्रात पाहून जरा धक्का बसला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
स
सुबोध खरे Wed, 10/04/2017 - 14:48 नवीन
मुस्लीम नेहमी एकगठ्ठा मतदन करतात. या गैरभाजप पक्षीयांच्या आवडत्या गृहीतकाला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सुरुंग लागला आहे. जवळ जवळ २० टक्के मुसलमान मतदार असलेल्या उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देता भाजप ला एक हाती विजय मिळाल्यामुळे इतर सर्व पक्ष बावचळल्यासारखे झाले आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Wed, 10/04/2017 - 16:26 नवीन
बरोबर यामुळे मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात या गृहीतकाला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सुरुंग लागला, तसेच उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देता आणखी एका गृहीतकाला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सुरुंग लागला तो म्हणजे सबका साथ सबका विकास.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 10/04/2017 - 19:33 नवीन
कसा काय बुवा? उलट तिहेरी तलाकच्या विरुद्ध जागृती घडवून विवाहित मुस्लिम स्त्रियांना दिलासा दिला आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
म
मार्मिक गोडसे Wed, 10/04/2017 - 17:34 नवीन
उत्तर प्रदेशच्या 'सरकारने' ताजमहल 'गायब' करून दाखवला.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 10/05/2017 - 08:25 नवीन
परदेशी पर्यटक असोत वा देशातले. उप्र मध्ये जातातच ते मुळी ताजमहाल पहायला. पर्यटनविषयक बुकलेटमधून ताजमहाल हटवणे म्हणजे फार मोठा हिंदुत्ववादी निर्णय आहे असं योगीला वाटत आहे. ताजमहाल भारतीय संस्कृतीचा भाग नाही असेदेखील तो म्हणाला होता. पण ह्या असल्या करंटेपणामुळे ना ताजमहालच्या सौंदर्यावर काही फरक पडेल ना लोकांच्या ताजमहालवरच्या प्रेमावर. ताजमहाल बांधला हिंदू(बहुतांश) कारागिरांनी, हिंदूंच्या(बहुतांश) कराच्या पैशातून. ताजमहाल हिंदू आणि मुस्लिम स्थापत्यकलेच्या संगमातून निर्माण झाला. असे असताना निव्वळ वेडगळ द्वेशातून असली चिंधीगिरी करणं टिपीकल योगीइश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/05/2017 - 08:38 नवीन
सौरा, ताजमहाल शहाजहानने बांधला असा प्रवाद प्रचलित आहे. तो हिंदू प्रासाद आहे हे मान्य करणं अवघड. म्हणून त्याला विस्मृतीत ढकलायची योजना दिसते आहे. एकदा का लोकं विसरले की हळूच हिंदू मुळं शोधून प्रस्थापित करायची अशी व्यूहरचना दिसते आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
व
विशुमित गुरुवार, 10/05/2017 - 08:44 नवीन
+1 "योगीइश" शब्द आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
मराठी_माणूस Fri, 10/06/2017 - 06:15 नवीन
http://www.loksatta.com/mumbai-news/electricity-shortage-in-maharashtra-part-2-1565012/ वरील बातमित एका ठीकाणी असे म्हटले आहे की "मात्र, मुंबईत वीजकपात होणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. " असे का ? http://epaper.loksatta.com/1383575/indian-express/06-10-2017#page/11/2 वरील बातमित एका ठीकाणी असे म्हटले आहे की मुलुंड , भांडुप मधे दोन तीन तासाहुन अधिक भार नियमन करावे लागले . हीच दोन ठीकाणे का निवडली ? एकंदरीत भार नियमनाचे निकष काय आहेत ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 10/06/2017 - 11:15 नवीन
चेपुवर रात्री धिंगाणा चालला होता की राज ठाकरेंचे भाषण कोणी टीव्हीवर पाहू नये म्हणून अख्या महाराष्ट्राची लाईट गुल केली आहे. प्रत्येक्षात हे भानियमन आहे हे आज समजले. --- आमच्या कडे काल १६ तास वीज नव्हती. आज सकाळी ८ वाजता गेलेली वीज दुपारी २ वाजता आली आहे आणि पुन्हा ४.३० वाजता जाऊन रात्री १०.३० वाजता येईल असा सांगावा धाडला आहे वीज मंडळाने (व्हाट्सअप ग्रुप वर). ऑक्टोबर हिट ने लहान मुले बेजार झाली आहेत. मोठ्या लोकांना कट काढता येईना ते लहान मुले काय सहन करणार! --- पण लहान थोरांनी हा त्रास सहन केलाच पाहिजे. देशासाठी एवढे सोसू शकत नाही म्हणजे काय ? ६० वर्ष सोसले मग आता सोसले म्हणून काय झाले? ---- राज्यात कृत्रिम वीज तुटवडा कसा निर्माण केला जातो आणि महागडी वीज विकत घेऊन कसे कंपन्यांचा फायदा करून दिला जातो, याचं विश्लेषण सध्याचे मिस्टर क्लीन चिटर अगोदर घसा फाटेपर्यंत करत असायचे. पण त्यांच्या दृष्टीने आता हा प्रश्न फालतूच! दखलपात्र सुद्धा नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 11:47 नवीन
शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची थकबाकी आता १८००० कोटींच्या पलिकडे गेली आहे. भारनियमन अटळ आहे. शेतकऱ्यांच्या थकबाकीचे परिणाम इतरांना सुद्धा सहन करावे लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 10/06/2017 - 12:35 नवीन
मुख्यमंत्र्यानी तर वेगळेच कारण सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 13:07 नवीन
शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची थकबाकी आता १८००० कोटींच्या पलिकडे गेली आहे. भारनियमन अटळ आहे. भारनियमन केल्याने थकबाकी कशी वसूल होणार आहे? मुळात ही थकबाकी झालीच कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Fri, 10/06/2017 - 13:29 नवीन
<<<भारनियमन केल्याने थकबाकी कशी वसूल होणार आहे?>> ==>> त्यांच्या कडे सुपीक डोके आहे. <<मुळात ही थकबाकी झालीच कशी?>> ==>> गांजा पिउन काम करत असतील या खात्यातील लोक. त्यात त्यांची तळी उचलायला YZ लोक आहेतच शेतकऱ्यांवर बिल फाडायला. ह्यांच्या कडे लाईट आहे ना, यांच्या बुडाला गार लागले ना मग मरु देत बाकी जनता. चाटूगिरी काय सोडणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 20:37 नवीन
शेतकर्‍यांना पेटवायला बरेच 'जाणते', 'नेणते' राजे आणि बच्चे आहेत. बिल थकविणार्‍यांच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याने महामंडळ फारशी कारवाई करू शकत नाही. महामंडळाने कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर अधिकार्‍यांना मारहाण करून पळवून लावणे, कार्यालयात कोंडून ठेवणे अशी गुंडगिरी चालते. आमच्याकडे वीज आहे कारण आम्ही बिले वेळेवर भरतो. आपण वीज वापरली तरी बिल भरायचे नाही व आपल्या थकलेल्या बिलाची रक्कम इतर करदात्यांच्या करातून/शुल्कातून वसूल करायची असले प्रकार आम्ही करीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Fri, 10/06/2017 - 13:43 नवीन
भारनियमन केल्याने थकबाकी कशी वसूल होणार आहे?
१० पोळ्या खाल्ल्याने अतिसेवन झाल्याने जेवण थांबवले असं ते विधान आहे. जेवण थांबल्याने अतिसेवन कसं जाणार हा प्रश्न असयुक्तिक आहे.
मुळात ही थकबाकी झालीच कशी?
त्यावेळेस आपण वेताचे फोक घेऊन चौकात नव्हतात. तेव्हा आपल्या लाडक्या मनमोहन सिंग यांच्या प्रणित सरकारांनी कितीही थकबाकी झाली तरी शेतकर्‍यांची वीज कापायची नाही असा नियम केला. आता तुम्हाला म्हणायला आवडेल कि आता तर तुमचे (आमचे आवडते) सरकार आहे, त्यांनी लाड का चालू ठेवले? तर त्याचं कायय, आमच्या लाडक्या सरकारने जर पैल्याच दिवशी मागचे सगळे कायदे कानून रद्द केले असते तर वेताच्या फोकासोबत तुम्ही आजून काय काय घेऊन चौकात थांबला असतात. =============================== अजाण लोकांनी वेताचे फोक काय प्रकरण आहे हे जाणण्यासाठी "ये अच्छी बात नहीं है" ही पोस्ट वाचावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 13:57 नवीन
धन्यवाद आमची जाहिरात केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
व
विशुमित Fri, 10/06/2017 - 14:08 नवीन
12 तास भार नियमन?? ... याला फक्त शेतकऱ्यांची थकबाकीच कारणीभूत आहे हे कोणत्या आधारावर ठरवले प्रतिसाद कर्त्याने ? --- आम्ही इथल्या वीज कर्मचाऱ्यांना विचारले तर कमी वीज निर्मिती कारण आहे हे उत्तर मिळाले. --- मागच्या सरकारची सारंगी वाजवणे बंद करा. --- लाईट नसल्यामुळे होणारे नुकसानाने प्रतिसाद कर्त्याच्या पितरांचे काय जाणार आहे ? --- किती ही पदर घेतले तरी मकेच्या कंसासारखी उघडी राहणारच आहेत. ते काय तुम्ही झाकू शकत नाही. तुमची गोलगोल चर्चा चालू द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 14:24 नवीन
उत्पन्न कमी झाले की आपोआप उत्पादन कमी होते. आपण भरपूर वीज वापरून सुद्धा वापरलेल्या विजेची किंमत दिली नाही तर निदान आपल्या पितरांचे तरी काहीही जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 10/06/2017 - 14:42 नवीन
काय बंडल मारताय! ही घ्या लोड शेडींग ची कारणे. त्यात कुठे ही शेतकरी थकबाकीचा उल्लेख नाही आहे. तुमची उघडली पडली आहेत. ती झाकण्यासाठी तुम्ही अजून १० पदर ओढणार यात तिळमात्र शंका नाही. --- http://www.mahadiscom.in/interpole_upload/DAS_and_LS.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा