Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - १२

श
श्रीगुरुजी
Mon, 09/25/2017 - 09:08
🗣 197 प्रतिसाद
चालू धाग्यात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा

प्रतिक्रिया द्या
38659 वाचन

💬 प्रतिसाद (197)
A
arunjoshi123 Fri, 10/06/2017 - 14:53 नवीन
कंपनी का बंद पडली? प्रॉडक्शन इंजिनिअरने प्रॉक्यूअरमेंट केलं नाही म्हणून! धन्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 20:29 नवीन
कोणत्याही देशात वेगवेगळ्या प्रकारची जनता असते. एखाद्या शहरातील सर्वच जण एकाच परिस्थितीत नसतात. शहरातील काही भागातील नागरिक शहरासाठी व देशासाठी कररूपाने भरपूर महसूल देतात. याउलट काही भागातून होणारे करसंकलन फारसे नसते. त्यामुळे शहरातील नगरपालिका शहरावर जो खर्च करते त्यातील बराचसा भाग हा कररूपाने भरपूर योगदान देणार्‍या भागासाठी वापरला जातो व ज्या भागातून फारसे उत्पन्न नाही त्या भागासाठी खर्च करताना हा आखडता घेतला जातो. अर्थात हे धोरण लिखित स्वरूपात नसते, परंतु तरीही ते राबविले जाते. त्यामुळेच उदाहरणार्थ न्यूयॉर्क सारख्या शहरात अगदी कमी उत्पन्न असलेल्या भागातील रस्ते, स्वच्छता इ. फारशी चांगली नसते कारण या भागातून करसंकलन फारसे होत नाही व त्यामुळे नगरपालिका या भागातील सोयीसुविधांवर पैसे खर्च करताना हात आखडता घेते. महाराष्ट्रात शेतकरी खेडोपाडी पसरले आहेत. शहरातून साधारणपणे नोकरी, व्यवसाय करणारेच जास्त प्रमाणात आहेत. शहरात राहणार्‍या सर्वसामान्य नागरिकाला वीजबिल थकविणे खूप अवघड असते. सलग २ महिन्यांचे बिल भरले नाहीत तर तिसर्‍या महिन्यात वीजजोडणी खंडित केली जाते. त्यामुळे शहरातून वीजबिल भरण्याचे प्रमाण बरेच जास्त आहे. खेड्यात बहुसंख्य शेतकरी आहेत. २-३ महिन्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार ९०% शेतकर्‍यांची वीजबिले थकीत असून एकूण थकीत आकडा १८,००० कोटी रूपयांच्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा वीजेच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी पडतो, तेव्हा भारनियमन खेड्यातून जास्त प्रमाणात केले जाते. याचे कारण म्हणजे शहरातील ग्राहकांकडूनच बर्‍याच प्रमाणात वीजबिलांची वसुली होते व त्यामुळे त्यांना कमी त्रास व्हावा हा उद्देश असतो. खेड्यातून थकबाकीचे प्रमाण खूप जास्त असल्याने भारनियमनाचा बराचसा भार त्यांच्यावरच थोपला जातो. वर लिहिल्याप्रमाणे न्यूयॉर्कसारख्या शहरात ज्या भागातून करसंकलन कमी आहे तिथे सुविधांवर फारसा खर्च केला जात नाही व जिथून मोठ्या प्रमाणात कर मिळतो त्या भागांमध्येच बहुतांशी सुविधा दिल्या जातात. हे धोरण लिखित स्वरूपात नसते, परंतु सर्वत्र ते असेच राबविले जाते. वीज महामंडळाने अधिकृत कारणे कोणतीही दिली तरी जेव्हा भारनियमनाची वेळ येते तेव्हा जास्त भारनियमन खेड्यातून केले जाते व शहरात होणारे भारनियमन तुलनेने कमी असते. याचे कारण वर दिल्याप्रमाणेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 14:25 नवीन
IT सेल बंद झाल्यापासून ते काहीबाही बरळू लागले आहेत. शेतकरी हा त्यांचा लाडका शत्रू असल्याने लाडक्या सरकारच्या अपयशाला शेतकऱ्यास जबाबदार ठरवायचे हा ह्यांचा लाडका खेळ झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 20:10 नवीन
हा आयटी सेल वगैरे नक्की काय आहे याची आम्हास कल्पना नाही. सध्याचे सरकार आमचे लाडके आहे व ते अपयशी नसून चांगलेच यशस्वी आहे. या सरकारवर भुंकणारे कोणकोण आहेत हे पाहिले की सरकार किती यशस्वी आहे हे लगेच समजते. मुळात सरकार यशस्वी असल्याने अपयशास शेतकरी किंवा इतर कोणालाही जबाबदार असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 10/10/2017 - 11:48 नवीन
या सरकारवर भुंकणारे कोणकोण आहेत हे पाहिले की सरकार किती यशस्वी आहे हे लगेच समजते. हे ही आता यशस्वी सरकारवर भुंकायला लागलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 14:09 नवीन
आमच्या लाडक्या सरकारने जर पैल्याच दिवशी मागचे सगळे कायदे कानून रद्द केले असते तर वेताच्या फो तूकासोबत तुम्ही आजून काय काय घेऊन चौकात थांबला असतात अच्छा म्हणजे कायदा - सुव्यवस्था राखण्यात 'लाडके सरकार ' अपयशी ठरले असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
व
विशुमित Fri, 10/06/2017 - 14:16 नवीन
मागो शेठ कुठे नादी लागता यांच्या, हे सगळे "फेकू" समर्थक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 14:28 नवीन
ह्यांना 'फेकून' दिल्याशिवाय समाधान मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 20:07 नवीन
प्रयत्न करून पहा. असा अनेकांनी आजवर प्रयत्न केला. पण ते स्वतःच कोठे भिरकावले गेले हे समजले सुद्धा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
A
arunjoshi123 Fri, 10/06/2017 - 14:43 नवीन
एखाद्या नीच/वाईट/कु (जे काय ते) वृत्तीचे समर्थन करण्यात भला आमचा काय फायदा असू शकतो? काय प्रेरणा असू शकते? =================== यात असं देखिल आहे का कि मोदी हे कुप्रवृत्तींत मोडतात आणि असं ज्ञान आम्हाला आहे तरी पण आम्ही असं करतो? मंजे आमच्यात वृत्ती आणि बुद्धी दोन्हींचा प्रोब्लेम आहे का फक्त बुद्धीचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 20:05 नवीन
मागो शेठ कुठे नादी लागता यांच्या, हे सगळे "फेकू" समर्थक आहेत. आयुष्यभर भ्रष्टाचार करणार्‍या व जातीय विद्वेषाच्या काड्या लावणार्‍यांचे "राजा"चे आंधळे भक्त असण्यापेक्षा कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार न करता देशाला पुढे नेण्यासाठी अहोरात्र काम करणार्‍या व्यक्तीचे समर्थक असणे कधीही अनेक पटीने चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 10/09/2017 - 08:11 नवीन
पहिले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा मग मनातला कंड शमवा..!! राहिला प्रश्न भक्तीचा,वयक्तिक आयुष्यात मी जरी पवार समर्थक (तुम्ही भक्त म्हणा, मला फरक पडत नाही) असलो तरी मिपावर मी पवार/राष्ट्रवादी समर्थक म्हणून प्रतिक्रिया देत नाही ना माझी भक्ती इतरांवर लादत असतो. मिपाचा वापर करून लोक कोण्या पक्ष्याचे मीडिया सेल चालवतात हे जगजाहीर झाले आहे. स्वतः अहोरात्र कष्ट उपसणाऱ्याचे समर्थक आहेत हे पण डिकलर केलेत. फक्त त्यांची तळी उचलण्यापूर्वी इतरांवर बेछूट आरोप करणे आणि तुमच्या अवतारी देवाचा नाकर्तेपणा इतरांवर लादू नका ही कळकळीची विनंती..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 10:35 नवीन
आमच्या मनात कंड वगैरे अजिबात नाही. असलाच तर तो तुमच्याच मनात असेल. चिक्की घोटाळा, तूर घोटाळा वगैरेंचा वर उल्लेख झाला तेव्हा मी हेच म्हणत होतो की पत्रकार परीषदेत किंवा विधानसभेत भ्रष्टाचारांचे आरोप करण्यापेक्षा न्यायालयात जा व आरोप सिद्ध करा. इथे तुम्हीही तेच म्हणत आहात. माझे म्हणणे तुम्हाला पटलेले दिसते. बाकी मी पवारांचे नाव घेतले नाही तरीसुद्धा तुम्हाला ते बरोबर समजलेले दिसते. नाव घेण्याची आवश्यकताच नसते. महाराष्ट्रातील सर्वाधिक भ्रष्टाचारी व सर्वाधिक जातीय विद्वेषाच्या काड्या टाकणारी व्यक्ती कोण हे नाव न सांगताही सर्वांच्या लक्षात येते. बादवे, "पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे. पण आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात." अशी जातीय काडी काही महिन्यांपूर्वी टाकून आग भडकाविण्याचा प्रयत्न करणारे एक थोर, "जाणते" नेते ३-४ दिवसांपूर्वीच सातारा-कराड या भागात राजकीय भूकंप करण्यासाठी गेले होते (मुंगीने उडी मारल्यावर जितकी जमीन हादरेल तितकी जमीनसुद्धा या भूकंपाने हादरली नाही हे अलाहिदा). त्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य छत्रपती करीत होते. पेशव्यांनी छत्रपतींची नेमणूक करण्याच्या तुलनेत छत्रपतींना सारथी बनविणे हे जास्त अवमानकारक नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 10/09/2017 - 11:20 नवीन
<<आमच्या मनात कंड वगैरे अजिबात नाही. >> ==>> मग चांगले आहे. <<बाकी मी पवारांचे नाव घेतले नाही तरीसुद्धा तुम्हाला ते बरोबर समजलेले दिसते. नाव घेण्याची आवश्यकताच नसते. >> ==>> मी तरी "राजा" शब्दावरून ओळखले की तुम्हाला शरद पवार म्हणायचे आहे ते. "फेकू" म्हंटल्यावर व्यक्ती कोण हे नाव न सांगताही तुमच्या लक्षात आले अगदी तसेच म्हणा. <<पेशव्यांनी छत्रपतींची नेमणूक करण्याच्या तुलनेत छत्रपतींना सारथी बनविणे हे जास्त अवमानकारक नाही का?>>> ==>> हे मला कशाला विचारता ? "राजां"ना जाऊन विचारा. बादवे "छत्रपतींना सारथी बनविणे" म्हणजे की " मी मागे बसणार आहे आणि तुम्हाला गाडी चालवावी लागणार आहे" असे काही पवार उदयनराजेंना म्हणाले का ? गाडी छत्रपतींची, जे ते सहसा स्वतः बुंगाट चालवतात. ते घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या त्यांच्या पेक्षा बुजुर्ग असणाऱ्याला चालवायला कसे देतील? त्यात एवढे समजायला कॉमन सेन्स ची सुद्धा आवश्यकता नसावी बहुदा..! गाडी कोणाची रुबाब कोणाचा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 11:34 नवीन
महाराष्ट्रात स्वयंघोषित राजे बरेच आहेत. त्यातल्या कोणाचेही नाव न घेतासुद्धा तुमच्या मनात केवळ हेच नाव कसे आले? बाकी फेकू म्हणजे कोण हे मला समजलेले नाही. छत्रपती बुंगाट चालवू देत नाही तर टुकुटुकु चालवू देत, ज्याला छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी करणे सहन झाले नाही त्याने छत्रपतींच्या पायापाशी बसून मुजरा करण्यापेक्षा छत्रपतींच्या मांडीला मांडी खेटून बसणे आणि छत्रपतींना सारथ्य करावयास लावणे हा निव्वळ छत्रपतींचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 10/09/2017 - 11:55 नवीन
बरं जाऊ द्या, तुम्हाला नाही झेपायचे !! बादवे छत्रपती तर सगळ्यांच्या बरोबर बसून भाकर तुकडा खायचे आणि खांद्याला खांदा देऊन लढायचे. 'पानिपत' सारखी अस्पृश्याच्या वेग वेगळ्या चुली नव्हते मांडत. (अजून 'बारा' पदर घेतले ना तरी उघडीच राहणार आहेत. वरून 'बारा'मतीच्या नावाने शंख करतील. चालायचे..!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 12:06 नवीन
सगळ्यांच्या बरोबर बसून भाकर तुकडा खाणारे आणि खांद्याला खांदा देऊन लढणारे ते छत्रपती वेगळे. हे छत्रपती सगळ्यांबरोबर बसून ग्लासाला ग्लास लावून काय करतात ते सांगण्याची गरज नाही. मुळात ज्या राजांना छत्रपतींची पेशव्यांनी नेमणूक केल्याचा अपमान सहन झाला नाही त्यांनी छत्रपतींच्या मांडीला मांडी लावून बसून छत्रपतींनाच सारथ्य करायला लावून निव्वळ छत्रपतींचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 10/09/2017 - 14:37 नवीन
<<<हे छत्रपती सगळ्यांबरोबर बसून ग्लासाला ग्लास लावून काय करतात ते सांगण्याची गरज नाही.>> ==>> तुम्ही कोठे पाहिले ग्लासला ग्लास लावलेले ? अशा ग्लासातल्या सर्वपक्षीय पार्ट्या चिकार होत असतात. वृत्तपत्रात येत नाहीत फक्त त्या. <<<मुळात ज्या राजांना छत्रपतींची पेशव्यांनी नेमणूक केल्याचा अपमान सहन झाला नाही त्यांनी छत्रपतींच्या मांडीला मांडी लावून बसून छत्रपतींनाच सारथ्य करायला लावून निव्वळ छत्रपतींचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे.>>> ==>> अपमान वगैरे खूपच अतिरंजित शब्द वापरून आणि तीच तीच गोष्ट हजार वेळा सांगण्याची गोबेल्स नीती तुमच्यावरच उलटू नये म्हणजे झाले. नाम साधर्म्य असल्या कारणाने ते फक्त रूपक होते हे पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलेले आहेच. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत ना म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे. बाकी काही कारण नाही. --- मला या बातमी बद्दल सविस्तर माहिती नव्हती. मला वाटले गाडी उदयनराजेंची होती, पण गाडी पवारांची होती वाटते. वृत्तपत्रीय कात्रणात (लिंक) पाहिले तर गाडी त्यांचा ड्राइवर चालवत होता, उदयनराजे पुढच्या सीट वर बसले होते आणि पवार साहेब मागे बसले होते. मग गाडीत मांडीला मांडी लावून कसे काय बसलेले दिसले गुरुजी/पत्रकारांना काय माहित? ड्राइवर गाडी चालवत होता तर वृत्तपत्रात उदयनराजे सारथ्य करत होते हे कसे काय छापले? (आणखी कोणाकडे लिंक असेल तर कृपया द्या, ज्या मध्ये उदयनराजे गाडी चालवत आहेत) वृत्तपत्रीय बातम्यावरच विश्वास ठेवणाऱ्या गुरुजींसारख्या लोकांचे त्यामुळेच गैरसमज होतो आणि पवारांना दूषणे देण्याचा कंड उफाळून येतो. आमच्यासारख्याना भक्ताची लेबल चीटकवण्यात येतात. --- http://www.loksatta.com/maharashtra-news/udayanraje-and-sharad-pawar-traveled-together-from-pune-to-satara-1564202/ http://www.hindustantimes.com/pune-news/sharad-pawar-udayanraje-s-pune-satara-trip-raises-eyebrows-in-political-circle/story-epyFBcYGasdgPD0YvDkvLM.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 20:06 नवीन
तुम्ही कोठे पाहिले ग्लासला ग्लास लावलेले ? अशा ग्लासातल्या सर्वपक्षीय पार्ट्या चिकार होत असतात. वृत्तपत्रात येत नाहीत फक्त त्या. त्यांना तर्र अवस्थेत आम्ही वाहिन्यांवर पाहिले आहे. ==>> अपमान वगैरे खूपच अतिरंजित शब्द वापरून आणि तीच तीच गोष्ट हजार वेळा सांगण्याची गोबेल्स नीती तुमच्यावरच उलटू नये म्हणजे झाले. नाम साधर्म्य असल्या कारणाने ते फक्त रूपक होते हे पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलेले आहेच. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत ना म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे. बाकी काही कारण नाही. कसले नामसाधर्म्य? आपल्या जातीय काडी टाकणार्‍या विधानाचे पवारांनी स्पष्टीकरण दिल्याचे वाचनात नाही. नेमक्या निवडणुकांच्या काळात अशी काडी लावण्याचा उद्देश लपून राहत नाही. एकदा निवडणुक संपल्यानंतर किंवा प्रकरण अंगावर आल्यानंतर स्पष्टीकरण दिल्यास त्यात अर्थ नसतो. फडणवीस मुख्यमंत्री नव्हते त्या काळात सुद्धा पवार जातीयवादी काड्या लावितच होते. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत, म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे असा समज चुकीचा आहे. मला या बातमी बद्दल सविस्तर माहिती नव्हती. मला वाटले गाडी उदयनराजेंची होती, पण गाडी पवारांची होती वाटते. वृत्तपत्रीय कात्रणात (लिंक) पाहिले तर गाडी त्यांचा ड्राइवर चालवत होता, उदयनराजे पुढच्या सीट वर बसले होते आणि पवार साहेब मागे बसले होते. मग गाडीत मांडीला मांडी लावून कसे काय बसलेले दिसले गुरुजी/पत्रकारांना काय माहित? ड्राइवर गाडी चालवत होता तर वृत्तपत्रात उदयनराजे सारथ्य करत होते हे कसे काय छापले? (आणखी कोणाकडे लिंक असेल तर कृपया द्या, ज्या मध्ये उदयनराजे गाडी चालवत आहेत) वृत्तपत्रीय बातम्यावरच विश्वास ठेवणाऱ्या गुरुजींसारख्या लोकांचे त्यामुळेच गैरसमज होतो आणि पवारांना दूषणे देण्याचा कंड उफाळून येतो. आमच्यासारख्याना भक्ताची लेबल चीटकवण्यात येतात. मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे समान पातळीवर बसणे. ज्यांना छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केल्याचे इतके तीव्र दु:ख झाले, त्यांनी छत्रपतींबरोबर एकाच गाडीत बसणे (आणि तेसुद्धा छत्रपती पुढे आणि हे मागे अशा जास्त अपमानास्पद स्थितीत) हे छत्रपतींचा अपमान करण्यासारखेच आहे. बादवे, या प्रवासाची एक चित्रफीत पाहिली. पवार आणि उदय बसलेली गाडी जवळ येताच आजूबाजूला उभ्या असलेल्या रिकामटेकड्यांपैकी २-३ जणांनी गाडी त्यांच्या जवळून जाताना गाडीकडे पाहून खाली वाकून मुजरा केला. हे दृश्य पाहून सखेद धक्का बसला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 10/10/2017 - 08:03 नवीन
<<<त्यांना तर्र अवस्थेत आम्ही वाहिन्यांवर पाहिले आहे.>>> ==>> ते तर्र आहेत हे कसे काय समजले? टीव्ही वर वास आला का ? <<< आपल्या जातीय काडी टाकणार्‍या विधानाचे पवारांनी स्पष्टीकरण दिल्याचे वाचनात नाही.>>> ==>> वाचनाबरोबर परिसर अभ्यास पण वाढवा. <<<काडी लावण्याचा उद्देश लपून राहत नाही>>> ==>> ब्राह्मण्यवादाचा उद्देश पण तुम्हाला काही केल्या लपवून ठेवता येत नाही. <<< मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे समान पातळीवर बसणे.>>> ==>> आम्ही "फडणवीस" शब्दाचं लॉजिक सांगितले ते तुम्हाला पटले नाही आणि तुमचे लॉजिक आम्ही मान्य करावे ? <<< ज्यांना छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केल्याचे इतके तीव्र दु:ख झाले, त्यांनी छत्रपतींबरोबर एकाच गाडीत बसणे (आणि तेसुद्धा छत्रपती पुढे आणि हे मागे अशा जास्त अपमानास्पद स्थितीत) हे छत्रपतींचा अपमान करण्यासारखेच आहे.>>> ==>> दोन्ही राजे बघून घेतील. ज्याला जास्त त्रास झाला असेल त्याने उदयनराजेंचे कान फुंकावे. हाय काय आणि नाय काय. (पण मुजरा करून जावे लागते बरका त्यांच्या राजवाड्यात.) <<<गाडी जवळ येताच आजूबाजूला उभ्या असलेल्या रिकामटेकड्यांपैकी २-३ जणांनी गाडी त्यांच्या जवळून जाताना गाडीकडे पाहून खाली वाकून मुजरा केला. हे दृश्य पाहून सखेद धक्का बसला.>>> ==>> असे रिकामटेकडे "अच्छे दिन" येतील म्हणून हुजरेगिरी करायला लाखांनी पडलेत. ज्याची त्याची भक्ती..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 10/10/2017 - 13:29 नवीन
ते तर्र आहेत हे कसे काय समजले? टीव्ही वर वास आला का ? ते बरोबर समजतं. रूग्णाने डॉक्टरसमोर ढोसली नाही तरी रूग्ण ढोसतो हे डॉक्टरला समजतं. त्यासाठी वास घ्यायची गरज नसते. हे सुद्धा अगदी तसंच. वाचनाबरोबर परिसर अभ्यास पण वाढवा. परिसर अभ्यास? ब्राह्मण्यवादाचा उद्देश पण तुम्हाला काही केल्या लपवून ठेवता येत नाही. पवारांच्या जातीय काड्यांबद्दल लिहिणे म्हणजे ब्राह्मण्यवादाचा उद्देश? आम्ही "फडणवीस" शब्दाचं लॉजिक सांगितले ते तुम्हाला पटले नाही आणि तुमचे लॉजिक आम्ही मान्य करावे ? काय होतं फडणवीस शब्दाचं लॉजिक? आमचं लॉजिक तुम्ही मान्य करावे असा हट्ट नाही. दोन्ही राजे बघून घेतील. ज्याला जास्त त्रास झाला असेल त्याने उदयनराजेंचे कान फुंकावे. हाय काय आणि नाय काय. (पण मुजरा करून जावे लागते बरका त्यांच्या राजवाड्यात.) बरोबर. छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केली असेल तर ते पेशवे आणि छत्रपती बघून घेतील. बारामतीकरांनी त्यांचे कान फुंकण्याची आणि काडी लावण्याची गरज नव्हती. बादवे, ज्यांना पत्त्यांच्या कॅटमधील राजाएवढी सुद्धा किंमत नाही अशा राजांना किंवा इतर कोणालाही आम्ही मुजरा करीत नाही. असे रिकामटेकडे "अच्छे दिन" येतील म्हणून हुजरेगिरी करायला लाखांनी पडलेत. ज्याची त्याची भक्ती..!! अजूनही महाराज, छत्रपती, युवराज, राजे, श्रीमंत अशातच जे रिकामटेकडे अडकून पडलेत अशांना अच्छे दिन कधीही येणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 10/10/2017 - 14:32 नवीन
<<<रूग्णाने डॉक्टरसमोर ढोसली नाही तरी रूग्ण ढोसतो हे डॉक्टरला समजतं>>> ==>> ये लॉजिक कुछ हजम नही हुआ. <<< परिसर अभ्यास?>> ==>> आय टी सेल च्या बाहेर बरीच खरी माहिती मिळते. <<<पवारांच्या जातीय काड्यांबद्दल लिहिणे म्हणजे ब्राह्मण्यवादाचा उद्देश?>> ==>> जाणून बुजून केलेला अप्रचार आहे. घीसेपीटे कॅसेट पुन्हा वाजवले जाईल. <<< काय होतं फडणवीस शब्दाचं लॉजिक?>>> ==>> पूर्वी छत्रपती 'फडणवीस' नेमायचे आता फडणवीसांनी छत्रपतीना नेमले. त्या काळी फडणवीस वेगळी संज्ञा होती आणि आता ते विशेष नाम आहे एवढाच काय तो फरक. <<<आमचं लॉजिक तुम्ही मान्य करावे असा हट्ट नाही.>>> ==>> तुमचा हट्ट पुरवायला आम्ही 'कथित' अच्छे दिन चे याचक नाहीं आहोत. <<<बादवे, ज्यांना पत्त्यांच्या कॅटमधील राजाएवढी सुद्धा किंमत नाही अशा राजांना किंवा इतर कोणालाही आम्ही मुजरा करीत नाही.>>> ==>> फक्त हुजरेगिरी जमते. <<< अजूनही महाराज, छत्रपती, युवराज, राजे, श्रीमंत अशातच जे रिकामटेकडे अडकून पडलेत अशांना अच्छे दिन कधीही येणे शक्य नाही.>>> ==>> अजून अच्छे दिन मध्ये अडकून पडलेल्या रिकामटेकड्यांची दया येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 10/11/2017 - 11:34 नवीन
ये लॉजिक कुछ हजम नही हुआ. चालायचंच. आय टी सेल च्या बाहेर बरीच खरी माहिती मिळते. आय टी सेल म्हणजे काय? जाणून बुजून केलेला अप्रचार आहे. घीसेपीटे कॅसेट पुन्हा वाजवले जाईल. पवारांनी टाकलेल्या जातीयवादी काड्या ही वस्तुस्थिती आहे, अपप्रचार नाही. तुमचा हट्ट पुरवायला आम्ही 'कथित' अच्छे दिन चे याचक नाहीं आहोत. याचकच गाडी बघायला ताटकळत उभे असतात आणि गाडी जवळून जाताना कंबरेत वाकून मुजरे करतात. फक्त हुजरेगिरी जमते. आम्ही कोणाचीच हुजरेगिरी करीत नाही. हुजरेगिरी करायला आम्ही या तथाकथित महाराजांची प्रजा नाही. म्हणून तर आम्ही यांच्यासाठी श्रीमंत, युवराज, छत्रपती, महाराज असली हुजरेगिरीची विशेषणे वापरीत नाही. अजून अच्छे दिन मध्ये अडकून पडलेल्या रिकामटेकड्यांची दया येते. चडफड समजू शकते. परंतु आता इलाज नाही. तुमचे महाराज, छत्रपती, युवराज, पोशिंदे, जाणते/नेणते राजे इ. चे दिवस संपले आहेत (खरं तर भरले आहेत हा शब्दप्रयोगे जास्त चपखल दिसेल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 10/11/2017 - 13:04 नवीन
<<<चालायचंच.>>> ==>> अजून किती दिवस फेकणार आहात. <<<आय टी सेल म्हणजे काय?>> ==>> एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते. <<< पवारांनी टाकलेल्या जातीयवादी काड्या ही वस्तुस्थिती आहे, अपप्रचार नाही.>>> ==>> चोराच्या मनात चांदणे म्हणतो ना तशी गत झाली आहे तुमची. <<<याचकच गाडी बघायला ताटकळत उभे असतात आणि गाडी जवळून जाताना कंबरेत वाकून मुजरे करतात.>>> ==>> आम्ही वामनासारखे याचक नाही आहोत. बळीराजा आहोत. (कर्जमाफी चा पदर घेतील पहा आता) <<<आम्ही कोणाचीच हुजरेगिरी करीत नाही. ==>> जोक ऑफ थे इयर <<< हुजरेगिरी करायला आम्ही या तथाकथित महाराजांची प्रजा नाही.>>> ==>> मग अवतारी पुरुषाचे भक्त ? <<<म्हणून तर आम्ही यांच्यासाठी श्रीमंत, युवराज, छत्रपती, महाराज असली हुजरेगिरीची विशेषणे वापरीत नाही.>>> ==>>व्यवहारी भाषेत वापरले असतील शब्द कुठे कुठे. पण स्वमर्जीतल्या लोकांचेच कसे उदोउदो होईल यात तुमचा हात पकडणे मुश्किल आहे. तुमचे मिस्टर क्लीन चीटर तर "आम्ही छत्रपतींचे (संभाजी) सेवक' असली विशेषणे वापरत होते. तेव्हा मुख्यमंत्री पदाची थोडी तरी आबा राखायची होती . <<< चडफड समजू शकते.>>> ==>> "शकते" ?? श्री गुरुजी तुम्ही अनाहिता तर नाही आहात ना? अजाणतेपणी उगीच काही गैर-शब्द जायचे. तसे काही असेल तर मला बऱ्याच ठिकाणी माझ्या प्रतिक्रिया एडिट कराव्या लागतील. <<<तुमचे महाराज, छत्रपती, युवराज, पोशिंदे, जाणते/नेणते राजे इ. चे दिवस संपले आहेत .>>> ==>> यापैकी आमचे कोणीच नाहीत हो. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमच्या मनाचे 'राजे' आहोत." <<<(खरं तर भरले आहेत हा शब्दप्रयोगे जास्त चपखल दिसेल)>>> ==>> तुमची तळमळ समजली. "देव तरी त्याला कोण मारी" वाचले होते कोठेतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 10/11/2017 - 14:35 नवीन
अजून किती दिवस फेकणार आहात. फेकणार??? एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते. ???? चोराच्या मनात चांदणे म्हणतो ना तशी गत झाली आहे तुमची. कमाल आहे! काड्या टाकणार पवार आणि चांदणे मात्र आमच्या मनात!! आम्ही वामनासारखे याचक नाही आहोत. बळीराजा आहोत. (कर्जमाफी चा पदर घेतील पहा आता) वाचून हसायला आलं. पोशिंदा, अन्नदाता हे शब्दसुद्धा वापरले असते तर अजून हसलो असतो. जोक ऑफ थे इयर थे?? मग अवतारी पुरुषाचे भक्त ? जसे आम्ही कोणाचेही हुजरे नाही तसेच आम्ही कोणाचेही भक्त नाही. व्यवहारी भाषेत वापरले असतील शब्द कुठे कुठे. पण स्वमर्जीतल्या लोकांचेच कसे उदोउदो होईल यात तुमचा हात पकडणे मुश्किल आहे. तुमचे मिस्टर क्लीन चीटर तर "आम्ही छत्रपतींचे (संभाजी) सेवक' असली विशेषणे वापरत होते. तेव्हा मुख्यमंत्री पदाची थोडी तरी आबा राखायची होती . व्यवहारी भाषेत सुद्धा गुलामगिरी? "शकते" ?? श्री गुरुजी तुम्ही अनाहिता तर नाही आहात ना? अजाणतेपणी उगीच काही गैर-शब्द जायचे. तसे काही असेल तर मला बऱ्याच ठिकाणी माझ्या प्रतिक्रिया एडिट कराव्या लागतील. थोडा मराठीचा अभ्यास वाढवा. तुमची तळमळ समजली. "देव तरी त्याला कोण मारी" वाचले होते कोठेतरी. एकदा शंभरी भरली की देव सुद्धा वाचवायला येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 10/12/2017 - 10:51 नवीन
<<<फेकणार???>> ==>> १.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो. २.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन. ३. शरद पवार जातीवादी ४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ <<< एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते. ???? ==>> लिंक सापडली की उत्तर देतो. <<<कमाल आहे! काड्या टाकणार पवार आणि चांदणे मात्र आमच्या मनात!!>>> ==>> नावडतीचे मीठ आळणी म्हंटल्यावर तुम्हाला काड्याच वाटणार. फडणवीस म्हंटले की ब्राह्माणच हे तुम्ही पक्के मनात घट्ट केले म्हणून तर तुमच्या मनात चांदण्या दिसल्या. यात जातीय काड्या म्हणून स्वतःचे टोकरत रहायचे. <<<जसे आम्ही कोणाचेही हुजरे नाही तसेच आम्ही कोणाचेही भक्त नाही.>>> ==>> खरे ही असेल कदाचित पण विश्वास वाटत नाही. <<< व्यवहारी भाषेत सुद्धा गुलामगिरी?>>> ==>> छत्रपती म्हणाले म्हणून गुलामगिरी कसे काय होते? "आम्ही छत्रपतींचे सेवक" हे म्हणाऱ्याना खरे गुलाम म्हणाले पाहिजे. पण तुम्ही त्यांना काही म्हणणार नाही कारण तो आपला माणूस आहे. त्यात मी कोठे ही श्रीमंत, युवराज, महाराज वगैरे विशेषणे लावली नाहीतरी "तुमचे" म्हणून मला कशाला चिटकवलीत? <<<थोडा मराठीचा अभ्यास वाढवा.>> ""चडफड समजू शकते" स्त्रीलिंगी वाक्य वाटले... हे "चडफड समजू शकतो" असे असायला पाहिजे होते असे वाटले होते. अनाहिता नाही आहात हे सरळ सांगितले असते तरी चालले असते. <<<एकदा शंभरी भरली की देव सुद्धा वाचवायला येत नाही.>> ==>> शंभरच्या वर पण जगलेली माणसे मी पाहिली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/12/2017 - 11:56 नवीन
==>> १.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो. नुसता चेहरा नसतो, त्याबरोबर बेताल बरळणेही असते आणि समर्थकांची ओशाळवाण्या चेहर्‍याने कबुलीही असते. २.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन. त्रिवार सत्य ३. शरद पवार जातीवादी महाराष्ट्रात यांच्याइतका जातीयवादी दुसरा कोणीही नाही. ४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ मिल्टनांचा धागा वाचा. ==>> नावडतीचे मीठ आळणी म्हंटल्यावर तुम्हाला काड्याच वाटणार. फडणवीस म्हंटले की ब्राह्माणच हे तुम्ही पक्के मनात घट्ट केले म्हणून तर तुमच्या मनात चांदण्या दिसल्या. यात जातीय काड्या म्हणून स्वतःचे टोकरत रहायचे. फडणवीस म्हटले की ब्राह्मण हे तुमच्या साहेबांच्या आणि समर्थकांच्याच मनात आहे आणि या कालच्या पोराने (तेसुद्धा ब्राह्मण असलेल्या) आपल्याला चारीमुंड्या चीत केले हे त्यांना सहन होत नाहीय्ये. म्हणून तर पेटविण्याचे प्रयत्न अथक सुरु आहेत. खरे ही असेल कदाचित पण विश्वास वाटत नाही. मग नका ठेवू विश्वास. छत्रपती म्हणाले म्हणून गुलामगिरी कसे काय होते? "आम्ही छत्रपतींचे सेवक" हे म्हणाऱ्याना खरे गुलाम म्हणाले पाहिजे. पण तुम्ही त्यांना काही म्हणणार नाही कारण तो आपला माणूस आहे. त्यात मी कोठे ही श्रीमंत, युवराज, महाराज वगैरे विशेषणे लावली नाहीतरी "तुमचे" म्हणून मला कशाला चिटकवलीत? राजे, राजवाडे, संस्थाने इ. केव्हाच खालसा झाली. परंतु त्यांच्या घराण्यातील लोकांचा श्रीमंत, युवराज, छत्रपती, राजे, महाराज असल्या विशेषणांनी उल्लेख करून त्यांना कंबरेत वाकून मुजरा करणे याला गुलामगिरी म्हणतात. शंभरच्या वर पण जगलेली माणसे मी पाहिली आहेत. शंभर वर्षे पूर्ण होणे आणि शंभरी भरणे यातला फरक समजेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 10/12/2017 - 12:28 नवीन
<<<१.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो. नुसता चेहरा नसतो, त्याबरोबर बेताल बरळणेही असते आणि समर्थकांची ओशाळवाण्या चेहर्‍याने कबुलीही असते. २.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन. त्रिवार सत्य ३. शरद पवार जातीवादी महाराष्ट्रात यांच्याइतका जातीयवादी दुसरा कोणीही नाही. ४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ मिल्टनांचा धागा वाचा.///////////////////////////////////////////////// ==>> याला फेकणे म्हणणार नाही तर काय म्हणणार ... <<< या कालच्या पोराने (तेसुद्धा ब्राह्मण असलेल्या) आपल्याला चारीमुंड्या चीत केले हे त्यांना सहन होत नाहीय्ये. >>> ==>> बघ कसा जातीवाद तुमच्या प्रत्येक वाक्यातून बाहेर पडतोय ते. खरी कुस्ती देवाज्ञा झालेल्या मुंडेंनी गुणांच्या आधारे (चितपट नव्हे) जिंकली होती. पण माळ ह्या गड्याच्या गळ्यात पडली. फोडाफोडी करून चिटूरफुटूर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण एखादा धोबीपछाड बसला तर आस्मान दिसेल. <<<मग नका ठेवू विश्वास.>> ==>> ओके. <<<राजे, राजवाडे, संस्थाने इ. केव्हाच खालसा झाली. परंतु त्यांच्या घराण्यातील लोकांचा श्रीमंत, युवराज, छत्रपती, राजे, महाराज असल्या विशेषणांनी उल्लेख करून त्यांना कंबरेत वाकून मुजरा करणे याला गुलामगिरी म्हणतात.>>> ==>>श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. कोणी मुजरा केला ? मी ??? "आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल सोयीस्कर फाटा दिला. म्हंटले होते ना आपला माणूस आहे ..!! <<<शंभर वर्षे पूर्ण होणे आणि शंभरी भरणे यातला फरक समजेल अशी आशा आहे.>>> ==>> फरक समजतो आणि त्यामागचा मतितार्थ सुद्धा..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गंम्बा गुरुवार, 10/12/2017 - 12:41 नवीन
आता कोणीतरी एका नी थांबा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/12/2017 - 17:23 नवीन
याला फेकणे म्हणणार नाही तर काय म्हणणार ... वरील सर्व गोष्टी सत्य आहेत. बघ कसा जातीवाद तुमच्या प्रत्येक वाक्यातून बाहेर पडतोय ते. खरी कुस्ती देवाज्ञा झालेल्या मुंडेंनी गुणांच्या आधारे (चितपट नव्हे) जिंकली होती. पण माळ ह्या गड्याच्या गळ्यात पडली. फोडाफोडी करून चिटूरफुटूर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण एखादा धोबीपछाड बसला तर आस्मान दिसेल. मराठा मोर्चा, मराठ्यांना राखीव जागा, ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्‍या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन, शेतकरी कर्जमाफी आंदोलन, वारंवार जातीय काड्या टाकून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न, सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप, शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न . . . असे अनेक डाव फडणविसांनी यशस्वीरित्या परतविले आहेत. फडणविसांना सातत्याने धोबीपछाड टाकून लोळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु फडणविसांनी प्रत्येक वेळी चाईट घालून यांना तोंडावर आपटविले आहे. यांनी टाकलेला प्रत्येक डाव फडणविसांनी जिंकून यांना अस्मान दाखविले आहे. श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. कोणी मुजरा केला ? मी ??? "आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल सोयीस्कर फाटा दिला. म्हंटले होते ना आपला माणूस आहे ..!! सुरूवात कोठून झाली ते पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 10/13/2017 - 12:27 नवीन
<<<वरील सर्व गोष्टी सत्य आहेत.>>> ==>> १, २, ३ ला काय आधार आहे ? वृत्तपत्रीय बातम्या की मणघडत फेकाफेकी? आणि ४ बद्दल खाली थॉर जी ने प्रतिसाद दिलाच आहे आणि मिल्टन सरांच्या धाग्यात थेरल यांनी भारतीय नोटबंदीचे समर्थन केले होते असे वाचनात कोठेही आढळले नाही उलट कॅशलेस बद्दल ते ८ नोव्हेंबरला नवीन धागा काढणार आहेत. (वीज थकबाकीची यादी मिळेल का?) --- <<<मराठा मोर्चा, मराठ्यांना राखीव जागा, ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्‍या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन, शेतकरी कर्जमाफी आंदोलन, वारंवार जातीय काड्या टाकून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न, सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप, शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न>>> ==>> १. मराठा मोर्चा- मोर्च्याच्या आखणीत आणि अंमलबजावणीत पवारांचा कोठे ही संबंध आणि सहभाग नव्हता. २. मराठ्यांना राखीव जागा- तरतुदीत बसत असेल तर इतरांचे पोटात दुखण्याचे काही कारण नाही. कायद्याने मिळत नसेल तर त्यावरच भले कोण अवलंबून राहत बसणार नाहीत. पहिल्यापासून माझी तरी हीच भूमिका आहे. किमान शिक्षण आणि नोकरीत फायदा व्हावा एवढाच हेतू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यात फडणवीसांचे काय योगदान आहे ? ३. ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्‍या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन- -- आला का नाही जातीवर ? मागे त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा पण सत्कार केला होता. वेगवेगळ्या विचारांचे लोक कार्यक्रमाला बोलवत असतात, त्यात कुठला आलाय जातीवाद? का फक्त ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलणाऱ्याच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे काही असते का? संभाजी आणि शिवाजी महाराजांवर ज्यांनी अत्यंत हीन पद्धतीने लिहले त्या गडकरींच्या नाटकाची हिरारीने बाजू ओढण्याचे काम आपण सुद्धा केले. कशासाठी?? स्वजातीसाठी केले असे आम्ही तुम्हाला म्हणायचे का ? ४. शेतकरी कर्जमाफी आंदोलन -- लोक या भाजप (खाजप म्हणालो असतो पण बाईल हेटाळणी करायची आमची संस्कृती नाही आहे) सरकार फेकू का म्हणते ते याचसाठी. फडणवीस पहिल्यापासून म्हणत होते ना कर्जमाफी देणार नाही म्हणून, तसा त्यांचा बाणाच होता ना. मग निकषा सह सरसकट कर्जमाफीचे एवढे नाटक करण्याची काय गरज होती. यात शरद पवारांचे काय नुकसान होणार आहे? उलट लोकच फडणवीसांना थापाडे म्हणायला लागले आहेत. खासगीत लोक 'साले' सरकार म्हणतात (ह्या गोष्टी पेप्रात येत नाहीत, त्यासाठी लोकात जाऊन फिरावे लागते) ५. सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप -- विरोधी पक्ष आहे आरोप करणारच. बिनबुडाचे का काय ते कोर्ट ठरवेल. यात फडणवीसांनी फक्त हा हू करून आखाड्यात टाईमपास केला. "अवगत केले आहे" हे लोक सहज सहजी विसरणार नाहीत. ६. शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न -- यात फडणवीसांचे कशाचे कसब? त्या शिवसेनेनी माती खाल्ली म्हणून अजून रिंगणात आहात. युतीची आंधळी कोशिंबीर नीट खेळता येईना आणि चाललेत तेल लावलेल्या पैलवानाला चाईट घालून पाडायला. --- <<<यांनी टाकलेला प्रत्येक डाव फडणविसांनी जिंकून यांना अस्मान दाखविले आहे.>>> ==>> उलट पवारांनी टाकलेल्या प्रत्येक डावामुळे पुरते गुरफटून गेले आहेत. राज्य चालवायचे सोडून अभ्यास करत बसलेत. --डिग्री मिळवणे खूप सोपे आहे पण काम करणे खूप अवघड असते. कारण डिग्री मिळवण्यापुरताच केलेला अभ्यास हा काम करताना जास्त उपयोगी पडत नाही. - इति आमचे बॉस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Fri, 10/13/2017 - 12:37 नवीन
<<<सुरूवात कोठून झाली ते पहा.>>> श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. मी कुठे मुजरा केला आणि "आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल बोला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Fri, 10/13/2017 - 20:21 नवीन
१, २, ३ ला काय आधार आहे ? वृत्तपत्रीय बातम्या की मणघडत फेकाफेकी? आणि ४ बद्दल खाली थॉर जी ने प्रतिसाद दिलाच आहे आणि मिल्टन सरांच्या धाग्यात थेरल यांनी भारतीय नोटबंदीचे समर्थन केले होते असे वाचनात कोठेही आढळले नाही उलट कॅशलेस बद्दल ते ८ नोव्हेंबरला नवीन धागा काढणार आहेत. (वीज थकबाकीची यादी मिळेल का?) वाचन वाढवा. वीज थकबाकीची यादी मराविमंकडे मिळेल. १. मराठा मोर्चा- मोर्च्याच्या आखणीत आणि अंमलबजावणीत पवारांचा कोठे ही संबंध आणि सहभाग नव्हता. हेच तर त्यांचे वैशिष्ट्य आहे.
२. मराठ्यांना राखीव जागा- तरतुदीत बसत असेल तर इतरांचे पोटात दुखण्याचे काही कारण नाही. कायद्याने मिळत नसेल तर त्यावरच भले कोण अवलंबून राहत बसणार नाहीत. पहिल्यापासून माझी तरी हीच भूमिका आहे. किमान शिक्षण आणि नोकरीत फायदा व्हावा एवढाच हेतू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यात फडणवीसांचे काय योगदान आहे ?
स्वतःकडे सर्व सत्ता, बहुतेक सर्व पदे, बहुतेक सर्व जमीन असे सर्व काही असताना स्वतःचे काहीही न सोडता दुसर्‍यांसाठी जे थोडेसे शिल्लक आहे त्यातही दांडगाई करून हात मारणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. -- आला का नाही जातीवर ? मागे त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा पण सत्कार केला होता. वेगवेगळ्या विचारांचे लोक कार्यक्रमाला बोलवत असतात, त्यात कुठला आलाय जातीवाद? का फक्त ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलणाऱ्याच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे काही असते का? संभाजी आणि शिवाजी महाराजांवर ज्यांनी अत्यंत हीन पद्धतीने लिहले त्या गडकरींच्या नाटकाची हिरारीने बाजू ओढण्याचे काम आपण सुद्धा केले. कशासाठी?? स्वजातीसाठी केले असे आम्ही तुम्हाला म्हणायचे का ? खेडेकर/कोकाट्याच्या घाणेरड्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून तिथे ब्राह्मणांविरूद्ध काडी टाकणे हा जातीयवादच आहे. गडकर्‍यांचे "राजसंन्यास" हे नाटक मी वाचले आहे. त्यात काहीही हीन लिहिलेले नाही. तुम्ही ते वाचले नसल्यास वाचा. मुद्दा फक्त गडकरींच्या नाटकाची बाजू मांडण्याचा नव्हता. त्या निमित्ताने ब्राह्मण संत, ब्राह्मण स्वातंत्र्यसैनिक, ब्राह्मण राज्यकर्ते इ. वर खोटेनाटे आरोप करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत हीन लेखन करण्याचे काम ९० च्या दशकापासून सुरू आहे. संत रामदासस्वामी, दादोजी कोंडदेव, थोरले बाजीराव, स्वातंत्र्यवीर सावरकर इ. अनेकांविरूद्ध अत्यंत गलिच्छ लेखन केले गेले आहे. दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडून कचर्‍याच्या गाडीतून नेणे याचाच पुढचा भाग म्हणजे गडकरींचा पुतळा उखडणे. खेडेकरने ब्राह्मण स्त्रियांविरूद्ध जे लिहिले आहे ते वाचताना अत्यंत शरम वाटते. अशा अत्यंत नीच व्यक्तीने लिहिलेल्या घाणेरड्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून एका घाणेरड्या पुस्तकाला व त्याच्या नीच लेखकाला महत्त्व प्राप्त करून देणे व त्याप्रसंगी जातीयवादी भाषण ठोकणे हे अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे. अर्थात असे करण्याची ही पहिली वेळ नाही. ९० च्या दशकात भाजप-सेना युतीविरूद्ध पेशवाई-शिवशाही वाद यांनीच उठविला होता. माजी गृहसचिव माधव गोडबोले यांची जात यांनीच काढली होती. राजू शेट्टींची जात यांनीच काढली होती. छत्रपती-पेशवे ही काडी यांनीच टाकली होती. -- लोक या भाजप (खाजप म्हणालो असतो पण बाईल हेटाळणी करायची आमची संस्कृती नाही आहे) सरकार फेकू का म्हणते ते याचसाठी. फडणवीस पहिल्यापासून म्हणत होते ना कर्जमाफी देणार नाही म्हणून, तसा त्यांचा बाणाच होता ना. मग निकषा सह सरसकट कर्जमाफीचे एवढे नाटक करण्याची काय गरज होती. यात शरद पवारांचे काय नुकसान होणार आहे? उलट लोकच फडणवीसांना थापाडे म्हणायला लागले आहेत. खासगीत लोक 'साले' सरकार म्हणतात (ह्या गोष्टी पेप्रात येत नाहीत, त्यासाठी लोकात जाऊन फिरावे लागते) फडणविसांचा कर्जमाफीला विरोध होता. परंतु वातावरण पेटविले गेले. शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणविसांवर नेम धरलेला होता. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यात शांतता राखण्यासाठी तडजोडी कराव्याच लागतात. सरसकट कर्जमाफीसाठी वातावरण तापवून या धनदांडग्यांना आपली पोळी भाजून घ्यायची होती. सरसकट कर्जमाफी केली तर राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाट लागून खरा फायदा या धनदांडग्यांनाच होणार आणि अजिबात कर्जमाफी केली नाही तर वातावरण पेटत जाणार यातून फडणविसांना मार्ग काढावा लागला. म्हणूनच त्यांनी निकषासहीत कर्जमाफीचा निर्णय घेतला. कर्जमाफीची सर्व माहिती कागदावर यावी यासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सांगून त्यासाठी आधारपत्र व पूर्ण माहिती मागितली आहे. त्यातूनच फुगविलेला शेतकर्‍यांचा आकडाही समोर आला आहे. फडणविसांच्या विरोधात मांडलेला हा डावसुद्धा वाया गेला आहे. -- विरोधी पक्ष आहे आरोप करणारच. बिनबुडाचे का काय ते कोर्ट ठरवेल. यात फडणवीसांनी फक्त हा हू करून आखाड्यात टाईमपास केला. "अवगत केले आहे" हे लोक सहज सहजी विसरणार नाहीत. करा की. कोर्ट त्याबद्दल ठरवेल पण ते कोणी कोर्टात गेले तर. ज्यांच्याकडे पुरावेच नाहीत त्यांची कोर्टात जायची हिंमत नाही. कालच नबाब मलिक अजून एकदा बरळला. नांदेडमध्ये म्हणे भाजपने मोपलवारांचे ३०० कोटी वाटले. या गाढवाला निकाल लागल्यानंतर हे बरं समजलं. इतके दिवस काय झोपा काढत होता का? मागच्या वर्षीही तो बरळला होता की गिरीश बापटांनी तूर डाळीत २०० कोटींचा भ्रष्टाचार केला. थोड्या दिवसांनी त्याने हा आकडा २००० कोटींवर नेला आणि नंतर काही दिवसांनी हा भ्रष्टाचार २०००० कोटींचा आहे असे बडबडायला लागला. आता विचारले तर हा घोटाळा २ खर्व रूपयांचा आहे असे तो बरळेल. असल्या फालतू आरोपांवर टाईमपासच करायचा असतो. -- यात फडणवीसांचे कशाचे कसब? त्या शिवसेनेनी माती खाल्ली म्हणून अजून रिंगणात आहात. युतीची आंधळी कोशिंबीर नीट खेळता येईना आणि चाललेत तेल लावलेल्या पैलवानाला चाईट घालून पाडायला. शिवसेनेला फारसे काही न देतासुद्धा बाहेर पडता येत नाही हेच फडणविसांचे कसब आहे. विरोधी पक्षात जाऊन बसलेली सेना एका रात्रीत सत्तेत आली. फडणविसांनी फेकलेली ३-४ फालतू मंत्रीपदे सेनेने आनंदाने स्वीकारली. त्यामुळे भाजपने न मागता पाठिंबा जाहीर केलेले तेल लावलेले पैलवान आपोआपच चित झाले व त्यांना माती खावी लागली. त्यानंतर मराठा मोर्चा, राखीव जागा, कर्जमाफी, शिवसेनेला डिवचणे, जातीयवादी वक्तव्ये या सर्व डावपेचातून फडणविस यशस्वीपणे निसटले आहेत. या तेले लावलेल्या पैलवानाने आधी अशोक चव्हाण व नंतर पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा जेरीस आणले होते. म्हणूनच लकवा अशी अभद्र भाषा त्यांना वापरावी लागली होती. अजूनही ते तेल लावून शड्डू ठोकून जोरबैठका काढायचा प्रयत्न करतात. परंतु आपली सद्दी पूर्ण संपली आहे हे त्यांना उमगतच नाही. उलट पवारांनी टाकलेल्या प्रत्येक डावामुळे पुरते गुरफटून गेले आहेत. राज्य चालवायचे सोडून अभ्यास करत बसलेत. पवारांचे सगळे डाव फडणविसांनी लीलया परतविले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
थ
थॉर माणूस गुरुवार, 10/12/2017 - 19:28 नवीन
४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ मिल्टनांचा धागा वाचा.
आँ? तुम्हाला अजुनही म्हणायचे आहे की त्यांनी "भारतात नोटबंदी ज्यापद्धतीने लागू केली गेली आणि जे निर्णय घेतले गेले त्याचा अभ्यास करून थेलर यांनी त्याचे समर्थन केले होते?" थेलर यांनी, भारताने नोटा बाद केल्या आहेत ही बातमी ऐकल्यावर १ ट्वीट केले होते फक्त, त्यानंतर कुणीतरी त्यांना २००० च्या नोटेबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी पुढचे ट्वीट केले. तेवढीच कींमत दिली आहे त्यांनी. त्यापलीकडे कणभरही महत्व दिलेले नाही या घटनेला. जेव्हा राजन भारतातून परत गेले तेव्हा थेलर यांनी देअर लॉस इस आवर गेन अशा आशयाचे ट्वीट देखील केले होते. बास करा की राव, एखाद्या मुद्यावर मत चुकले तर सोडून द्या. चुकले तरी कशाला पुढे रेटताय? बाकीचे मुद्दे घेऊन भांडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 11:26 नवीन
मी पवार/राष्ट्रवादी समर्थक म्हणून प्रतिक्रिया देत नाही
तुम्ही समर्थक आहात तर तशीच प्रतिक्रिया देणं जास्त योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 10/09/2017 - 11:37 नवीन
<<<तुम्ही समर्थक आहात तर तशीच प्रतिक्रिया देणं जास्त योग्य आहे.>>> ==>> मिपावर मी चांगल्या चर्चा वाचण्यासाठी आणि जमेल तिथे आपले मत व्यक्त करण्यासाठी येतो. ज्यातून मला त्या संबंधित विषयाबाबत नाण्याच्या दोन्ही बाजू समजतील. माझे ज्ञानार्जन होईल. पक्षीय राजकारण करायला माझे गाव, माझा परिसर आणि माझा तालुका पुरेसा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 10/06/2017 - 14:39 नवीन
ठरले असते असं म्हणायचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 14:44 नवीन
मग प्रत्यक्ष कृती करायला का घाबरते लाडके सरकारने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 14:46 नवीन
'सरकार 'असं वाचणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 20:32 नवीन
भारनियमन केल्याने थकबाकी वसूल होणार नाही कारण वसुली व भारनियमन या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु भारनियमनाचा जो काही त्रास आहे तो नियमित बिल भरणार्‍यांना कमी व्हावा हा उद्देश असल्याने थकबाकीदारांच्या भागात जास्त वेळ भारनियमन करून नियमित बिल भरणार्‍यांच्या भागात ते तुलनेने कमी वेळ केले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 20:52 नवीन
वीजबिल वसुली करा की मग खेड्यापाड्यातून, कोणी अडवले तुम्हाला? आता तर ठाण्यातही वीज जाऊ लागली. ठाणेकर वीजबील थकबाकीदार आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 05:03 नवीन
वीजबिल वसुली का अवघड आहे ते वर लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अभिजीत अवलिया Sat, 10/07/2017 - 05:52 नवीन
नक्की काय आहे विजेचे गौडबंगाल समाजात नाहीये. एकीकडे कोळशाच्या निर्धारित साठा पुरवठय़ात गेल्या तीन महिन्यांत कुठेही खंड पाडला नाही, असे सरकारी वीज निर्मिती कंपनीला कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी म्हटलेय. दिवाळीच्या तोंडावर कोळसा उपलब्धतेचे कारण सांगून भारनियमनाची घोषणा करायची, लोकांची ओरड झाल्यानंतर खासगी कंपन्यांकडून महागडय़ा दरात वीज खरेदी करायची व अशा प्रकारे खासगी कंपन्यांना फायदा व्हावा हे या कृत्रिम टंचाईमागे कारण असल्याचे बोलले जात आहे. http://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-government-creating-artificial-coal-shortage-to-buy-power-from-private-companies-1565650/ तर दुसरीकडे जलविद्युत, सौरऊर्जा आणि पवनऊर्जा प्रकल्प देखील ढेपाळले आहेत हे खालील बातमीत लिहिले आहे. नियोजनाचा अभाव हे यामागे कारण असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात आहे. http://www.loksatta.com/mumbai-news/zero-management-cause-severe-power-crisis-in-maharashtra-1565635/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे Sat, 10/07/2017 - 06:09 नवीन
मला नाही सापडले . तुमचा करसंकलन व वीजबिल वसुलीत गोंधळ होतोय. खेड्यातील वीजपुरवठा बंद का करत नाही लाडके सरकार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 12:01 नवीन
राज ठाकरेंचे भाषण कोणी टीव्हीवर पाहू नये म्हणून अख्या महाराष्ट्राची लाईट गुल केली आहे. ही पुडी राजसमर्थकांनी सोडली आहे. राजसमर्थक वगळता इतरांना त्याच्या बडबडीत फारसा रस नव्हता. आमच्याकडे पूर्णवेळ वीज असूनसुद्धा आम्ही त्याची बडबड ऐकली नाही. काही वाहिन्यांवर त्याच्या बडबडीच्या वेळी दुसरेच कार्यक्रम सुरू होते. त्याच्या बडबडीला मराठी वर्तमानपत्रांनी देखील फारच कमी कव्हरेज दिले आहे. राज म्हणजे नुसतीच फुसकी हवा हे सर्वांना माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
इ
इरसाल Fri, 10/06/2017 - 06:41 नवीन
श्री. नरेंद्र मोदींनी (भारत सरकार नव्हे हं) वर्ल्ड बँक पण मॅनेज केली अस दिसतय. https://timesofindia.indiatimes.com/india/indias-economic-slowdown-an-aberration-world-bank/articleshow/60960318.cms?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=TOIMobile
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 10/07/2017 - 06:02 नवीन
नारायण राणे यांची ३०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जानेवारी महिन्यात प्राथमिक चौकशी सुरू केली होती. पण आता राणे सत्ताधारी पक्षाबरोबर जाणार असल्याने त्यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी थांबवण्याचे आदेश सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचे खालील बातमीत म्हटले आहे. या प्रकरणी केतन तिरोडकर ह्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. http://www.loksatta.com/mumbai-news/ketan-tirodkar-file-pil-against-narayan-rane-over-financial-irregularities-1565687/
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sat, 10/07/2017 - 11:11 नवीन
वाल्याचा वाल्मीकी झाला भाजपासाठी . शिवसेनेसाठी नाऱ्याचा नारायणराव होतोय बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अमितदादा Sat, 10/07/2017 - 10:40 नवीन
२०१७ सालचे नोबेल पारितोषिके १) Physics Nobel = Rainer Weiss, Barry Barish and Kip Thorne Nobel prize in physics awarded for discovery of gravitational waves काही रोचक माहिती ------Prof Paul Hardaker, chief executive officer of the Institute of Physics, said: “For as long as we have had astronomy we have used light in some form or another to understand how our universe works. This significant result marked the beginning of another way of viewing the universe, using gravity, which is what makes it such a major step forward, and so deserving of a Nobel prize.” -----Ligo’s twin detectors, two pairs of 4km-long perpendicular pipes, one in Hanford, Washington state, the other in Livingston, Louisiana, are so sensitive that they can spot a distortion of a thousandth of the diameter of an atomic nucleus across a 4km length of laser beam. -----The notion that spacetime is malleable was first predicted by Einstein’s general theory of relativity. But Einstein himself was unsure whether this was merely a mathematical illusion, and concluded that, in any case, the signal would be so tiny that it would “never play a role in science”. २) Medicine Nobel = Jeffrey C Hall, Michael Rosbash and Michael W Young Nobel prize for medicine awarded for insights into internal biological clock काही रोचक माहिती -----They were recognised for their discoveries explaining “how plants, animals and humans adapt their biological rhythm so that it is synchronised with the Earth’s revolutions.” ------When there is a mismatch between this internal “clock” and the external surroundings, it can affect the organism’s wellbeing – for example, in humans, when we experience jet lag. ----Every living organism on this planet responds to the sun,” he said. “All plant and animal behaviour is determined by the light-dark cycle. We on this planet are slaves to the sun. The circadian clock is embedded in our mechanisms of working, our metabolism, it’s embedded everywhere, it’s a real core feature for understanding life. ३)Chemestry Nobel = Jacques Dubochet, Joachim Frank and Richard Henderson Nobel prize in chemistry awarded for method to visualise biomolecules काही रोचक माहिती ------The Nobel prize in chemistry has been awarded to three scientists for developing a technique to produce images of the molecules of life frozen in time. -----The latest versions of the technology mean scientists can record biochemical processes as they unfold in film-like sequences. -----Earlier imaging techniques, such as X-ray crystallography, required samples to be studied in a rigid state, revealing little about the dynamics of proteins and enzymes – many of which could not be successfully crystallised in any case. Another microscopic technique, the electron microscope, was only suitable for imaging dead matter, because its powerful beam destroyed delicate biological structures. ----Cryo-electron microscopy has allowed scientists to explore the architecture of everything from the proteins that cause antibiotic resistance to the surface of the Zika virus. ४) Literature Nobel = Kazuo Ishiguro Kazuo Ishiguro wins the Nobel prize in literature 2017 ५) Peace Nobel = International Campaign to Abolish Nuclear Weapons Nobel peace prize 2017: International Campaign to Abolish Nuclear Weapons wins award – as it happened
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 11:47 नवीन
are so sensitive that they can spot a distortion of a thousandth of the diameter of an atomic nucleus across a 4km length of laser beam.
लेझर बिम मधे न्यूक्लिअस असते का? आणि यानं ग्रॅविटी वेव कशी डिटेक्त केली? मधली लिंक काय? अन्य डिस्टॉर्श्न्सचा इंटर्फेरन्स कसा टाळला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा