ताज्या घडामोडी - भाग १४
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकनंतर नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल करण्यात येऊन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. लष्कराच्या नियमांनुसार अशी सीमा ओलांडून जाणे हा शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे असे कोर्ट मार्शल केले गेले आहे असे दिसते.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chandu-babulal-chohan-gets-punishment-under-court-martial/articleshow/61233799.cms
गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने राहुल यांच्यावर स्तुतीसुमनं उधळून भाजपची कोंडी केली आहे.खिक्क खिक्क . . . फिदी फिदी . . . ख्यँ ख्यँ . . . मटा सामनाचा बटीक झाला आहे.कुठलीही अभेद्य गोष्ट आतूनच भुईसपाट करता येतेभाजपा / मोदी किंवा कोणाताही पक्ष / कोणतेही संगठन अभेद्य वगैरे नसते. बहुतांश वेळा निर्णय घेणार्यांमुळे किंवा उच्चपदावर विराजमान असलेल्यांच्या निष्क्रियतेमुळे पक्ष / संगठन उतरणीला लागते. या सिद्धांताला अपवाद ठरायचे असेल तर कमालीच्या ताकतीची वैचारीक बैठक + तितकेच भक्कम अनुयायी असणे गरजेचे आहे. त्यामुळे अभेद्य वगैरे खूप मोठे शब्द आहेत. अवांतर - २०१२ साली वाटले होते का मोदी पंतप्रधानपदी येतील म्हणून..? मला तरी नक्कीच वाटले नव्हते. २०१९ ला पर्याय नांही म्हणून मोदी येतील पण बहुदा सीटा कमी होतील. आज विचार केला तर.. मोदींनी जसा २०१२ ते २०१४ या दोन वर्षांचा वापर करून घेतला तसा २०१७ ते २०१९ या दोन वर्षांचा वापर करून घेणे विरोधकांना जमेल का..?