ताज्या घडामोडी - भाग १४
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकनंतर नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल करण्यात येऊन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. लष्कराच्या नियमांनुसार अशी सीमा ओलांडून जाणे हा शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे असे कोर्ट मार्शल केले गेले आहे असे दिसते.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chandu-babulal-chohan-gets-punishment-under-court-martial/articleshow/61233799.cms
बा द वे - स्वामी आणि ओवेसी यांच्या टीव्ही वरील एका चर्चे दरम्यान हे "चालू" सरकार डिसेंबर २०१६ लाच हा प्रश्न निकाली लावणार होते असे पाहिले/ऐकले होते. २०१७ चा डिसेंबर आला की आता. का २०२२ साठी राखीव ठेवला आहे??स्वामी म्हणजे सरकार नाही. ते कोणत्याही अधिकृत सरकारी पदावर नाहीत. मुळात ते किंवा ओवेसी हे या प्रश्नात स्टेकहोल्डर नाहीत. त्यांचे दावे म्हणजे सरकारची अधिकृत भूमिका नाही.मित्रो या बाबतीत अखंड ब्रह्माण्डाचे शिरोमणी असल्याचा आव जाणारे सेवकांचा महागृच काय कोणीच हात पकडू शकत नाही. चुकीच्या माणसाला हि पदवी देऊ नका.नाही हो. अगदी योग्य व्यक्तीलाच आम्ही ही पदवी देत आहोत.