Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

ग
गॅरी ट्रुमन
Fri, 12/01/2017 - 07:04
🗣 310 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे. खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत. Gujarat (संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg) खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः Regions खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल. 1 २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच. या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः १. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्‍यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्‍याच जागा जास्त जिंकल्या होत्या. २. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्‍यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते. ३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत. गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्‍यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे. 1 यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल. गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो. २०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्‍यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः १. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते. २०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही. २. नोटबंदी आणि जी.एस.टी नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः २अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते. २बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे. ३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्‍या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच. सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्‍या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्‍या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते. भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त. ४. काँग्रेसमधील लाथाळ्या गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही. काँग्रेस बर्‍यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्‍यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल. राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger” १४ डिसेंबरला दुसर्‍या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
83433 वाचन

💬 प्रतिसाद (310)
व
विशुमित Mon, 12/11/2017 - 13:50 नवीन
तुमचा आधीचा प्रतिसाद आवडला आणि पटला देखील. संबंधित धाग्यावर मी माझी भूमिका मांडण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. धन्यवाद...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
M
mayu4u Fri, 12/08/2017 - 18:20 नवीन
मी ज्याविषयी बोलतोय, तो धागा वाचनमात्र झालाय. आणि केवळ त्याकरता जुना धागा वर आणण्यापेक्षा, इथं तुम्ही सक्रिय आहातच, तस्मात इथं बोलू. कसंय, विषयाला धरून चर्चा वगैरे मान्य असल्यानं शेतीविषयक धाग्यावर अवांतर टाळलेलं. पण तुमच्याकडनं एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा आहे, हे तुमच्यापर्यन्त पोचवायचं पण असतं ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 12/09/2017 - 08:19 नवीन
<<<केवळ त्याकरता जुना धागा वर आणण्यापेक्षा>>> ==>> त्याने काय फरक पडतो? मार्गदर्शक तत्व वाचा आधी. <<<इथं तुम्ही सक्रिय आहातच, तस्मात इथं बोलू.>>> ==>> तुम्हीच तर लोकांना सांगताय इथे इथे हागणदारी करू नका? <<< कसंय, विषयाला धरून चर्चा वगैरे मान्य असल्यानं शेतीविषयक धाग्यावर अवांतर टाळलेलं.>> ==>>> "" विशुमित यांचे मुद्देसूद प्रतिसाद वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला"" हा शहाणपणा तुम्ही केलात. पुढे चर्चा थांबलीच. <<< पण तुमच्याकडनं एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा आहे, हे तुमच्यापर्यन्त पोचवायचं पण असतं ना!>>> ==>> मिपा ने नवीन टपाल खाते चालू केले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Sat, 12/09/2017 - 14:38 नवीन
मार्गदर्शक तत्व वाचा आधी.
वाचनमात्र झालेल्या धाग्यांविषयी काही दिसलं नाही. अशा धाग्यांविषयी काही मार्गदर्शक तत्व असल्यास वाचायला आवडेल.
इथे हागणदारी करू नका?
हो, हाXXदारी नकोच. स्पष्ट मुद्देच मांडा. हे मी आधीही बोललोय.
हा शहाणपणा तुम्ही केलात.
वैयक्तिक. त्यामुळे पास.
पुढे चर्चा थांबलीच.
त्याविषयी मी काय करणार? असंबद्ध.
मिपा ने नवीन टपाल खाते चालू केले आहे का?
हे असे फाटे फोडण्यापेक्षा तुम्ही केलेल्या विधानाचे पुरावे द्या. किंवा विधान मागे घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ए
एमी Sat, 12/09/2017 - 01:20 नवीन
मिपावरचे सगळे धागे मी वाचत नाही त्यामुळे कोण कुठे काय बोललं माहित नाही, माहित करून घ्यायचीइच्छादेखील नाही पण मोदक आणि mayu4u ला खरंच आवरा. त्या डांगेना पण असच ट्रोल करून करून जेरीस आणलं होतं मोदकने! संपादकांच्या आणि मालकांच्या ओळखीचे म्हणून फेवर चालुय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पगला गजोधर Sat, 12/09/2017 - 03:00 नवीन
विशुमित /अँमिजी, सोडून द्या ! इग्नोर देम... कंपू आहे तो एक.... मागे मी लिहिलंय... बोवा, झारीबहाद्दर, महालोलखान, अजून बरेच...आहे या कंपूमध्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Sat, 12/09/2017 - 03:18 नवीन
सोडून द्यायला इग्नोर करायला काही हरकत नाही हो पण ते डांगेअण्णा शेतीबद्दल चांगले प्रतिसाद होते! आता गेले कि ते निघून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 12/09/2017 - 04:21 नवीन
बरोबर आहे, केवळ शेतीविषयक नाही, तर प्रचारकी प्रतिसाद/लेखा च्या पेक्षा वेगळा पेरस्पेक्टिव्ह त्यांच्या मुळे कळायचा... जाऊ द्या, मिपा चा लॉस आहे हा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
पगला गजोधर Sat, 12/09/2017 - 05:37 नवीन
अँमिजी, कसय न, कुठे काय चाललंय, याची इत्यंभूत माहिती व ज्ञान, इथे फक्त काही जनांनाच आहे, ....तुम्ही मी विशुमित वै लोकं यांना ते नाही... दुसरी बाजू समजून घेण्याचं औदार्य सुद्धा ह्यांच लोकांना, आपल्या सारख्या कडे नाही.... समोईच्याला देशद्रोही धर्मद्वेषी खांग्रेसी आप्तांर्ड ब्रिगेडी वैगरे हे लोकं कधीच ठरवत नाही, पण आपल्या प्रतिक्रियेतून लगेचच ह्यांना भक्त ठरवलेच असा दुर्बोध यांचा लगेचच.... त्यामुळे म्हटलं, इग्नोर देम....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
mayu4u Sun, 12/10/2017 - 03:59 नवीन
प्रत्येकजण समविचारी आयडींना समर्थन देतो. पण त्याला कम्पूबाजीचं नाव देऊन काही ठराविक आयडी रडत असतात. मी तुमच्या आणि विशुमितच्या काही विचारांशी सहमती दर्शवलीये. असो.
डांगेअण्णा शेतीबद्दल चांगले प्रतिसाद होते! आता गेले कि ते निघून...
बोकाशेठ आणि गवि यांनी गेल्या काही महिन्यात मिपा वर लिहिलं नाहीये. त्यांना कुणी जेरीस आणलेलं का? एखादा आयडी लिहीत नसेल तर उगा त्याचा बादरायण संबंध इतर गोष्टींशी जोडू नका. डांगेंच्या काही विधानांचे पुरावे त्यांच्याकडे मागितले होते. जर ती विधानं खरी असती, तर पुरावे देऊन प्रश्नकर्त्यांना गप्प करता आलं असतं. पण मुळात हवेतल्या बाता मारल्याने काही पुरावे नव्हते म्हणून डांगे गायबलेत. उगा मिपा चा लॉस म्हणून गळे काढू नका. एवढंच वाटतंय तर सांगा त्यांना परत मिपा वर यायला. हेच विशुमित ना पण सांगतोय. त्यांनी केलेल्या विधानांचे सबळ पुरावे/विश्वसनीय स्रोत देऊन मला गप्प करावं. किंवा ते विधान मागं घ्यावं. पण ते यापैकी काहीही करणार नाहीत, असं म्हणतायत. हे तुम्हाला आणि अॅमी ताईंना मेनी असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
mayu4u Sun, 12/10/2017 - 04:01 नवीन
"हे तुम्हाला आणि अॅमी ताईंना मान्य असावं." असं वाचावं. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
म
मोदक Sat, 12/09/2017 - 04:20 नवीन
मोदक आणि mayu4u ला खरंच आवरा. त्या डांगेना पण असच ट्रोल करून करून जेरीस आणलं होतं मोदकने! संपादकांच्या आणि मालकांच्या ओळखीचे म्हणून फेवर चालुय का? मी संदर्भासहित बोलतो. मालकांच्या ओळखीचा काय प्रश्न आहे..? विशुमीत आणि डांगे खोटे बोलत आहेत / होते याकडे सोयीस्करपणे का दुर्लक्ष करत आहात..? तसेच, जे काय आपले म्हणणे आहे ते संदर्भासहित असावे आणि त्यामध्ये खोटेपणा नसावा ही साधी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का..? अ‍ॅमीजी - तुमच्या सोयीचे आयडी खोटे बोलतात ते बाकीच्यांनी चालवून घ्यावे मात्र त्यांना आजिबात त्रास दिला जाऊ नये ही अजब सोयीस्कर अपेक्षा आहे. २०१४ पासून सातत्याने गरळ ओकणार्‍या आयडींकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले होतेच. नंतर त्यांचा खोटेपणा उघडा पडू लागल्याने तुमची तडफड होत असेल तर मूळ खोटेपणा जिथे होत आहे तिथे उपदेशाचे डोस पाजा. रिअ‍ॅक्टिव्ह अर्ग्युमेंट्सना थांबवण्याऐवजी सुरूवात कुठे होत आहे ते थांबवणे (कितीही गैरसोयीचे असले तरी) आवश्यक असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/09/2017 - 05:05 नवीन
कुठे काय चाललंय हे माहित नसताना आणि माहित करून घ्यायची इच्छा नसताना देखील तुम्ही एका बाजूवर आरोप/टीका करत आहात. कदाचित तुमच्या नकळत तुम्ही दुसऱ्या कंपू मध्ये सहभागी तर होत नाही आहात हे तपासून पहा असा सल्ला देतो. नाही दुसऱ्यांच्या मतांना सरसकट भक्त प्रकारात टाकणाऱ्यांची बाजू घेऊन हे असे मत मांडताय म्हणून म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
M
mayu4u Sat, 12/09/2017 - 07:19 नवीन
अॅमी ताई, मिपा चे संपादक आणि मालक कोण आहेत, याची मला स्पष्ट कल्पना नाही. आणि त्यांना मी (किंवा मला ते) ओळखत देखील नाही. उगा फेवर चालूये वगैरे बिनबुडाचे आरोप करू नका.
मिपावरचे सगळे धागे मी वाचत नाही त्यामुळे कोण कुठे काय बोललं माहित नाही, माहित करून घ्यायचीइच्छादेखील नाही
नाही, जुने धागे वाचाच तुम्ही. "समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर होते" असं विधान विशुमित यांनी केलेलं. त्याचा पुरावा मागणं चुकीचं आहे का? अभ्यास वाढवा, एवढंच सुचवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 11:07 नवीन
"समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर होते"
मी उगीचच नोकरीचं टेशन्स घेत होतो. मुस्लिम सत्तांकडून ब्राह्मण हेरांची इतकी मागणी असताना टेन्शन कायकू लेने का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
श
शब्दबम्बाळ Tue, 12/12/2017 - 04:34 नवीन
त्यांच्याकडे जगातले सगळे ज्ञान आहे! ४-५ च लोक आहेत ज्ञानी मिपावर, त्यांना सर्टिफिकेट वाटणे, लायकी काढणे, पगार काढणे अशी अत्यंत महत्वाची काम करावी लागतात. हि सगळी काम सुसंस्कृत लोकच करू शकतात त्यामुळे इतर लोक फालतू असतात. हल्लीच गोडसेंना ट्रोलिंग करू लागले होते पण चुकून जरा विरोध झाला कि "त्यांना सांगा, आम्ही तर आधीपासूनच शहाणे आहोत" टाईप चा शहाजोगपणा करणे पण यांनाच जमते. आम्ही जातीभेद करत नाही म्हणायचं आणि ब्राह्मणेतर आयडी ने चुकून "कुठल्याही" ब्राम्हण व्यक्तीला(मुख्यमंत्री असले तरी) नाव ठेवली कि लगेच त्याला बिग्रेडी वगैरे विशेषण बहाल करायची. इथे जात बघत नाहीत बर का हे लोक! जणू कुठल्या व्यक्तीला तिचे स्वतःचे असे विचारच नसतात, सगळे विचार फक्त जात आणि संघटनांचेच असतात... पार वाट लावलीये मिपाची त्यामुळे यावंसं वाटत नाही आता, पण काही लोकांचे लेखन वाचनीय असते अजूनही... माफ करा ट्रुमन भाऊ, अजून एक बिन कामाचा प्रतिसाद आला धाग्यावर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
थ
थॉर माणूस Tue, 12/12/2017 - 19:47 नवीन
हा गाळ उपसत बसायचा कंटाळा येतो म्हणूनच मग इकडे फिरकणं कमी होतं. तरीपण ब्राऊजर मधे कायम टॅबमधे असतो म्हणून कधीतरी चक्कर मारून काही वाचण्यासारखं आहे का ते पहातो आता. एकूणच आपण सर्वज्ञानी आणि समविचारी नसाल तर यांच्यावर वेळ न घालवलेला बरा अशी एकंदरीत मानसिकता माझीही झालेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
मोदक Fri, 12/08/2017 - 09:53 नवीन
हे तुम्ही दिलेल्या लिंकमधले वाक्य.. "भाजपमध्ये कोणाला तिकीट दिले जावे किंवा नाही याबद्दल राहुल गांधींनी आक्षेप घेतला का ? " आणि हा दिग्गीराजाचा आक्षेप. आता दिग्गीराजाचा आणि राहुल गांधीचा संबंध नाही अशा पळवाटा असल्या तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 12/08/2017 - 13:23 नवीन
<<आता दिग्गीराजाचा आणि राहुल गांधीचा संबंध नाही अशा पळवाटा असल्या तर सांगा.>>> ==>> मी कशाला सांगू? मी पार्टी विद डिफरेन्स बद्दल बोलत आहे. काँग्रेसबद्दल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/08/2017 - 13:44 नवीन
तुम्ही लिंक दिली आहे म्हणजे त्यातल्या विचारांशी सहमत आहात. वर तुम्ही पार्टी विथ डिफरन्स अशी मखलाशीही केली आहे. मी फक्त त्या लिंकमधली विसंगती दाखवली आहे. "संदर्भ आणि पुराव्यांसह" काँग्रेसबद्दलही बोला कधीतरी. सोयीस्कर लिंका चिकटवून एकाच पार्टीची काळी बाजू काळी बाजू असा कांगावा करण्याऐवजी निष्पक्षपणाने दोन्ही बाजू मान्य करणे फार अवघड नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 12/08/2017 - 14:07 नवीन
<<<काँग्रेसबद्दलही बोला कधीतरी.>>> ==>> अच्छा हा प्रॉब्लेम आहे तर. ओके नोटेड. पण वारे (सरकार) भाजपचे वाहत आहे ना ! असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मार्मिक गोडसे Fri, 12/08/2017 - 15:44 नवीन
फक्त तेवढं नोटाबंदी आणि जीएसटीचं वारं अंगावरुन गेल्यामुळे लुळे पडले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 12/08/2017 - 16:25 नवीन
कृपया लकवा वगैरे शब्द वापरू नका, वाईट वाटेल उगाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मोदक Fri, 12/08/2017 - 18:19 नवीन
मी दाखवलेली विसंगती दिसली ना..? का लॉजिक धरणात बुडवून प्रतिसाद देत आहात..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 11:50 नवीन
पावनं कुंकडलं मनायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
B
babu b Fri, 12/08/2017 - 09:56 नवीन
अग्गोबै , भाजपाने जाहिरनामाच काढला नाही म्हणे
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Fri, 12/08/2017 - 20:37 नवीन
हितेस भाय केम छो. अबि हितेस बोलो कि दादा दरेकर बात तो एक हि है नो. वो मांजर के जंत बैठ गये क्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
श
श्रिपाद पणशिकर Fri, 12/08/2017 - 21:03 नवीन
बाबुस मियॉं ईधर कु कायकु अपनि पंचर कि दुकान फिरसे खोलरा रे बावा, वो क्या एड्स के लेबॉरेटरी मे कंपाउडरा था ना रे तु, उधर भि जुते चप्पला, सँडला जम के पडि लगता. ऐक टंगडि पैलेच तोडके बैठा था. अबि तु एक्किच काम कर वो तेरा खलेरा भाई चाउस हा हा वैच्च रे हाफिज वो अगले साल पॉटिस्ताना मे ईंतेखाबा मे शरीक होरेला है. तु अपना सब टिन टप्पर, जंत वाला मांजर लेकर बस निकल्लै चाऊस के पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिपाद पणशिकर
B
babu b Sat, 12/09/2017 - 14:29 नवीन
मेरा नाम डुप्लिकेट ? तेरा भी डुप्लिक्ट लग रहा है ! श्री पाद पण शी कर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिपाद पणशिकर
म
मराठी कथालेखक Fri, 12/08/2017 - 09:56 नवीन
लोकसत्ता मधील योगेंद्र यादवांचा लेख
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 12/08/2017 - 10:18 नवीन
काँग्रेस समर्थकांची काँग्रेस सारखीच केविलवाणी परिस्थीती झालेली आहे. बुडत्यालाही आता कोणत्याही काडीचा आधार वाटायला लागलेला आहे !!
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 12/09/2017 - 13:05 नवीन
गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील ८९ जागांसाठी मतदान पार पडले. एकूण ६९% मतदान झाले अशा बातम्या आल्या आहेत. चार वाजेपर्यंत ६०% मतदान झाले होते. ते पुढीलप्रमाणे: Image removed. वरकरणी हा आकडा २०१२ मध्ये झालेल्या मतदानापेक्षा थोडा कमी वाटत आहे.
  • Log in or register to post comments
स
सिंथेटिक जिनियस Sat, 12/09/2017 - 14:42 नवीन
७०% मतदान झाले याचा अर्थ ॲन्टीइन्कंम्बसी फॅक्टर असावा,गुजरातमध्ये मोदी/भाजप पडले तर मला व्यक्तीशः फार आनंद होईल. सातारी कंदी पेढे वाटेन म्हणतो!
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sat, 12/09/2017 - 16:21 नवीन
नरेंद्र मोदींविषयी म्हणत असाल तर ते तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, कारण ते निवडणूक लढवत नाहीयेत. भाजप चा पराभव हा मात्र नरेंद्र मोदींसाठी प्रचंड मोठा धक्का ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिंथेटिक जिनियस
ग
गामा पैलवान Sat, 12/09/2017 - 18:33 नवीन
सिंजि, गुजरातेत नेमकं उलटं चित्रं आहे. मोदीशहां उदासीन मतदाराला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाताहेत. त्यामुळे जी मतांची टक्केवारी वाढते ती सगळी भाजपच्या घशात जाते. त्यामुळे जास्त मतदान भाजपच्या पथ्यावर पडणारं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिंथेटिक जिनियस
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 11:54 नवीन
व्यक्तिशः? तो कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिंथेटिक जिनियस
ड
डँबिस००७ Sat, 12/09/2017 - 20:19 नवीन
गा पै तुमच म्हणण सिं जि ला पचणार नाही ! ते सातारी कंदी पेढ्याची मोठी आॅर्डर देऊन बसलेत ! भाजप जर निवडणुक जिंकली तर मोठी गोची होईल! पंजाब मध्ये निवडणुक जिंकण्याची खात्री बाळगुन केजरीवाल साहेबानीं विजय साजरा करण्याची जय्यद तयारी ठेवली होती त्याची आठवण ह्या निमित्त्याने झाली !!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 12/10/2017 - 00:41 नवीन
विरोध आहे पण शेवटी आपरो माणसनेज वोट ए लोगो आपशे एम लागे छे। केम?
  • Log in or register to post comments
ए
एमी Sun, 12/10/2017 - 04:20 नवीन
संपादक, आवरा खरंच लोकांना! धाग्याचा विषय काय आणि काहीही असंबंध प्रतिसाद काय देत सुटलेत! अवांतर करायचंच असेल तर काही उपयोगी, माहितीपूर्ण असलेलं तरी करा.... त्या दुसऱ्या एका धाग्यावरपण असंच गेल्या आठवड्यापासून फालतुगिरी करत सुटलेत....
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 12/10/2017 - 04:35 नवीन
तुम्हाला खरेच मुद्दे समजत नाहीयेत की सोयीचे नाहीयेत म्हणून समजून घ्यायचे नाहीयेत..? डाव्या लोकांचे अनेक गैरसोयीच्या गोष्टींबद्दल सोयीस्कर आक्षेप असतात, हे पूर्वी तुमच्याबाबतच बघितले होते. तुमचा बाएस आणि कंपुगिरी पुन्हापुन्हा कशाला दाखवून देत आहात..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
M
mayu4u Sun, 12/10/2017 - 04:54 नवीन
असत्य विधानाचा पुरावा मागणं, हे सत्यशोधन उपयोगी नाहीये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
मोदक Sun, 12/10/2017 - 10:10 नवीन
त्यांच्या सोयीचे नसल्याने ते सत्यशोधन उपयोगी नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
B
babu b Sun, 12/10/2017 - 04:55 नवीन
इंदिराजी जब मोरबी आयी थी तब उनके नाक पे रुमाल था. ( सांगणारे हे सांगायचे विसरले की तेंव्हा तिथे प्रेते हलवायचे काम सुरु होते, त्यामुळे तिथे उपस्थीत असलेल्या सर्वच लोकानी नाकावर रुमाल , मास्क लावले होते. ) http://indiatoday.intoday.in/story/yes-indira-gandhi-covered-her-nose-in-morbi-but-she-had-a-reason-a-tragedy/1/1099560.html त्याच मोरबी जिल्ह्यात एका गावात भाषणबाजीचा काहीही उपयोग झाला नाही. पाणीप्रश्न न सोडवल्याबद्दल मोरबी मतदारसंघातील एका गावात एकाही व्यक्तीने मतदान केले नाही. अधिकार्यांच्या मनधरणीलाही लोकानी भीक घातली नाही. https://www.prabhatkhabar.com/news/other-state/gujarat-a-village-zero-polling-1000-voters-election-boycott/1095978.html
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sun, 12/10/2017 - 05:20 नवीन
अशा परिस्थितीत काय करतात?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 12/10/2017 - 05:58 नवीन
विशुमित / अँमिजी, तुम्हाला विनंती, तुमचे काही लेख/प्रतिक्रिया, खूप छान वाटल्या, आवडल्या, म्हणून तुमच्या बाद्दल एक प्रकारचा आदर व मैत्रभाव वाटतो, आणि त्या आत्मीयतेतून, तुम्हाला विनंती करतो... या अश्या ट्रोलिंग्ज च्याबाबतीत, "इग्नोरम सर्वार्थ साधनम", हीच पॉलिसी ठेवा. माझ्याही प्रतिक्रियेवर काहीबाही लिहून, मला प्रतिक्रिया देण्यासाठी उकसवत आहे, असे वाटल्यास, मी हेच धोरण ठेवतो... मोडस ऑपरेंडी ऑफ टिपिकल भक्त व्हाईल इंटरअँकटिंग ऑन सोशल मीडिया या संदर्भातील एक लिंक व्यनि करेन, सध्या नेमकी सापडत नाहीये...
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 11:57 नवीन
तुम्हाला विनंती, तुमचे काही लेख/प्रतिक्रिया, खूप छान वाटल्या, आवडल्या, म्हणून तुमच्या बाद्दल एक प्रकारचा आदर व मैत्रभाव वाटतो, आणि त्या आत्मीयतेतून, तुम्हाला विनंती करतो...
वाईट दिस सरेपातूर असे हात हातात घिउन एकत्र राहायचेच दिस हैत हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
mayu4u Sun, 12/10/2017 - 06:22 नवीन
आधी धादांत खोटं लिहायचं, आणि पुरावे मागितले की दुर्लक्ष करून नव्या जोमानं नवं खोटं बोलायचं... कधी सुधारणार हे लोक कोण जाणे!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 12/10/2017 - 06:59 नवीन
भक्त आणि द्वेष्टे दोघांनाही गटारात उतरून कुस्त्या खेळताना पाहून मौज वाटली. :)
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 12/10/2017 - 10:05 नवीन
फालतू खोटेपणा वाढत जातो रे, दुर्लक्ष करणे हा उपाय नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
समाधान राऊत Sun, 12/10/2017 - 07:25 नवीन
अशीच जर घाण या धाग्यात आणखी होणार असेल तर हा धागा शिफारस मधुन काढुन टाका. इज्जत घालवली त्या शिफारसची अन धाग्याची...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा