Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?

र
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 01/02/2018 - 14:15
🗣 142 प्रतिसाद
नमस्कार मंडळी काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले. दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-blames-sambhaji-bhide-and-hindu-ekta-aaghadi-for-bhima-koregaon-violence/articleshow/62337263.cms आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे. एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
42668 वाचन

💬 प्रतिसाद (142)
ए
एस Tue, 01/02/2018 - 14:26 नवीन
'द हिंदू' मधील खालील बातमी वाचा. नक्की काय झालंय याची फारशी माहिती नाहीये. http://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-tense-a-day-after-clashes-during-bicentenary-celebrations-of-koregaon-bhima-battle/article22352367.ece?homepage=true
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 01/02/2018 - 14:43 नवीन
मूर्खपणा
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 01/04/2018 - 04:14 नवीन
+१ हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 18:04 नवीन
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-( हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 18:05 नवीन
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-( हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
महाठक Tue, 01/02/2018 - 16:13 नवीन
हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर सणसवाडी दगडफेकीप्रकरणी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Tue, 01/02/2018 - 17:02 नवीन
सगळ्या नां माईत हाये पन बॉलायला कुनीच तयार नै अशी माझी शंका हाये .
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 01/02/2018 - 18:55 नवीन
भीमराव आंबेडकरांना त्याचे शिक्षक केळुस्कर ( ब्राह्मण ) बडोद्याचे महाराज सयाजीराव ( मराठा ) यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितले की हा विद्यार्थी खूप हुशार आहे, त्याला तुम्ही उच्च शिक्षणासाठी मदत करा. सयाजीराव यांनी दिलेल्या मदतीमुळे आंबेडकर इंग्लडला उच्च शिक्षणासाठी गेले.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 01/03/2018 - 11:27 नवीन
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 01/04/2018 - 04:10 नवीन
http://www.bigul.co.in/bigul/1984/sec/8/battle%20of%20Khadki
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस गुरुवार, 01/04/2018 - 04:57 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
स
सुखीमाणूस Wed, 01/03/2018 - 11:29 नवीन
  • Log in or register to post comments
ख
खबो जाप Wed, 01/03/2018 - 12:11 नवीन
काल बातम्या पहिल्या त्याप्रमाणे चॅनेल १-- भिमा कोरेगाव ला स्मारकाचे दर्शन घेण्यास आलेल्या मागास्वर्गीयांवर हल्ला झाला पृथ्वीराज चव्हाण आणि बारामती च्या साहेबांच्या मते एव्हढी गर्दी होणार माहित असून सरकारने काही उपाय योजना केली नाही आणि सरकार अपयशी ठरले आहे. चॅनेल २ - दोन जमावामध्ये हाणामारी झाली, फडणवीस साहेबांच्या मते दरवर्षी १५ हजार लोक येतात पण ह्यावेळी ३ लाख लोक आले , हे लोक मुद्दामहुन जमा केले गेले जेणेकरून सरकार अडचणीत येयील पण पोलिसांच्या तुकड्या आधीच मागवून ठेवल्या होत्या त्यामुळे ज्यास्त इशू झाला नाही खर खोटं देव आणि दंगल करणारेच जाणोत
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Wed, 01/03/2018 - 13:33 नवीन
दर्शन दरवर्षी होते ,दरवेळी पोलीस बंदोबस्त का ठेवणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप
क
कंजूस Wed, 01/03/2018 - 13:53 नवीन
टिव्ही 9 मराठी चानेलवर जिग्नेश मेवानि सभेमध्ये काय बोलत होता ते काल दाखवत होते.त्यानंतर काही राडा झाला. नंतर प्रतीराडा. हे रेकॉर्डिंग करायला रिमोटचे बटण दाबले तर रेकॉर्डिंग सुरू होईना. परंतू चानेलवाल्यांनी ती क्लिप दाखवणे योग्य नाही समजून बंद केली ते बरे केले. परंतू लोकांनी जरा समजूतदारपणा आणि संयम बाळगायला हवा. एसटी बसेस जाळणाय्रांना गरिबांचे वाली कोण म्हणेल? सरकार कुणाचेही असले तरी जनतेला पोहोचवणारी बस तीच असते ना?
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Wed, 01/03/2018 - 15:05 नवीन
हे रेकॉर्डिंग करायला रिमोटचे बटण दाबले का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस गुरुवार, 01/04/2018 - 00:16 नवीन
चानेलवरच्या बातम्यांमुळे गैरसमज पसरतात. राड्याचे कारण नक्की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ओ
ओम शतानन्द Fri, 01/05/2018 - 04:51 नवीन
दलित आंदोलनामध्ये नेहमी st बस , बेस्ट , ट्रेन यांच्या काचा फोडणे जाळपोळ असे प्रकार होतात व खूप नुकसान होते , यावर एक उपाय सुचला आहे तो असा आहे st, बेस्ट ,रेल्वे यांनी आपल्या ताफ्यातील २५ टक्के गाड्या या फक्त दलित आंदोलकांना तोडफोड करण्यासाठी स्वखुशीने उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी वेगळ्या बजेट ची योजना करावी , तसेच या गाड्यावर तसी सुचना असलेला बोर्ड लावावा . यामुळे तोडफोड केल्याबद्दल खटला दाखल करून कोर्टाचा वेळ वाया जाणार नाही , व कुणाला तक्रार ही करता येणार नाही , तसेच आंदोलकांना निर्भयपणे मनसोक्त तोडफोड करता येईल , त्यांचा मान राखला जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 14:44 नवीन
हो का? २३ वर्षाचा पोरगा मेला ,तेव्हा सांगायच असत .ब्राम्हणासाठी वेगळी व्यवस्था करु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओम शतानन्द
म
मृत्युन्जय Sun, 01/07/2018 - 15:10 नवीन
२३ वरर्षाच्या पोराला ब्राह्मणांनी मारला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतूल २०१५
प
पुंबा Wed, 01/03/2018 - 15:13 नवीन
आपल्या वरकरणी एकसंध दिसणार्‍या समाजातल्या फॉल्टलाईन्स उघड्या पडल्या. दुसरं काय? असे प्रसंग फार दुखःद आहेत. इतिहास उगाळून नक्की कोणता फायदा आपल्या समाजाचा, देशाचा झालाय, होतोय काय माहित? निव्वळ माथेफिरू, हुल्लडांच्या हातात कोलित मिळते. आजच्या प्रश्नांना भिडण्यापेक्षा शेकडो वर्षापुर्वीच्या घटना चिवडत बसणार्‍या समाजाची प्रगती कशी होणार असा खिन्न प्रश्न समोर येतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/03/2018 - 15:47 नवीन
आंबेडकरांसंबंधी काही वादग्रस्त घडले की दलित अत्यंत संतप्त होतात असे माझे निरीक्षण आहे. किंबहुना ते संतप्त होतात हे ओळखून त्यांना जास्त भडकावले जाते. १९८७ मध्ये महाराष्ट्र सरकार आंबेडकरांनी लिहिलेल्या "रिडल्स ऑफ हिंदुइझम" हे पुस्तक प्रकाशित करणार होते. त्या पुस्तकातील "रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण" हे अत्यंत वादग्रस्त प्रकरण सरकारने वगळायचा निर्णय घेतल्यानंतर असेच वातावरण पेटविले गेले. पुस्तकातील प्रकरणांना शिवसेनेचा कट्टर विरोध होता. परंतु प्रकरणे वगळल्याचे जाहीर झाल्यानंतर दलितांना भडकावून मुंबईत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्च्याला प्रत्त्यूत्तर म्हणून त्याच वेळी शिवसेनेने तितकाच मोठा मोर्चा काढला. दोन्ही मोर्चे समोरासमोर आल्यानंतर मुंबईत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी काहीतरी घडले असे अंधुकसे आठवते. नंतर १९९७ मध्ये घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर येथील आंबेडकरांच्या पुतळ्याला रातोरात चपलांचा हार घातल्याचे आढळल्यावर त्या भागातील दलित प्रचंड संतप्त झाले होते. त्यावेळी जमावावर पोलिसांकडून गोळीबार होऊन १० जणांचा मृत्यु झाला होता. हे प्रकरण त्यावेळी इतके पेटले होते ही तत्कालीन मनोहर जोषी सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार होती. काँग्रेसने हे प्रकरण खूप पेटविले होते. या प्रकरणाची भाजप-शिवसेना युती सरकारला मोठी किंमत चुकवायला लागली होती. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीला ४८ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या. परंतु १९९८ मध्ये झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत युतीला जेमतेम १० जागा मिळाल्या. त्या निवडणुकीत प्रमोद महाजन पराभूत झाले होते. नंतर १९९९ मधील विधानसभा निवडणुकीतही युतीला १२५ जागांवर समाधान मानून सत्ता गमवाव लागली होती. २०१८ मध्ये झालेली घटना त्याच परंपरेतील आहे. आंबेडकरांनी कोरेगाव येथील स्तंभाला अभिवादन करण्याची प्रथा सुरू केली. त्या अभिवादन कार्यक्रमात दगडफेक झाल्याने पुन्हा एकदा मागचीच पुनरावृत्ती झाली. पुन्हा एकदा असंतुष्ट पुढार्‍यांनी हे प्रकरण पेटविले. एक समाज म्हणून आपण आजही खूपच अप्रगल्भ आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ३०-३१ वर्षानंतर सुद्धा आपण अजूनही प्रतिकांमध्येच अडकून पडलो आहोत. वैयक्तिक प्रगतीपेक्षा इतिहासालाच सर्वस्व मानणे, इतिहासातच अडकून पडणे आणि प्रतिकांच्या मानसन्मालाच अवाजवी महत्त्व देणे यातून अजूनही सुटका नाही. जातीयवाद कमी झाल्यासारखा वाटला, शहरात जातीयवादाची तीव्रता कमी भासली, भारत आधुनिक मार्गावर गेल्यासारखा वाटला तरीसुद्धा अशा घटना घडल्यानंतर असे दिसते की आपण अजूनही प्रतिके आणि इतिहासातच गुंतुन गेलो आहोत ज्याचा व्यावहारिक जीवनात फारसा उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर Wed, 01/03/2018 - 16:22 नवीन
Image removed. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचे नाव नाहक गोवले आहे. या प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच प्रकार घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातले नाही. कोठे सभा घेतली नाही, की आवाहन केले नाही. तरीही खोडसाळपणाने त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्यांची आणि शहानिशा न करता तो दाखल करून घेणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी आज प्रसिद्घी पत्रकाद्वारे केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत भिडे गुरूजींवर आरोप केले होते. तसेच याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हिंदुत्ववादी शक्ती या दंगलीमागे असल्याचा आरोप केला होता.पत्रकात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठानचे कार्य राज्यात जोमाने वाढत आहे. ते काही असंतुष्ट, देशविघातक शक्तींना बघवत नसल्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन जाणीवपूर्वक श्री. भिडे यांचे नाव यात गोवले आहे. कोरेगाव भीमा येथे दुर्दैवी प्रकार जेव्हा घडला तेव्हा श्री. भिडे माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनासाठी इस्लामपूर येथे गेले होते. त्यानंतर भोर येथे सभा झाली. या सर्वांचे भक्कम पुरावे आहेत. तरीही फिर्यादींनी श्री. भिडे यांनी जाळपोळ, दगडफेक केल्याची खोटी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातून जातीय तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. यापूर्वीही फुटकळ संघटनांनी त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचे काम केले होते. त्यामुळे या प्रकरणातही खोलवर जाऊन चौकशी करावी, अशी शिवप्रतिष्ठानची मागणी आहे.
  • Log in or register to post comments
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 16:26 नवीन
दगडफेक झाली तेव्हा झोपले होते का?MIT toper
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झपाटलेला फिलॉसॉफर
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 01/03/2018 - 16:29 नवीन
शिवाजी पार्क ला दरवर्षी लाखो दलित बाबासाहेबांना अभिवादन करायला जातात तसेच हे भिमा कोरेगाव. जसे तिथेही स्थनिक लोक समजुन मदत करतात किवा गर्दी टाळतात तसेच इथेही दरवर्षी होते. पण विशिष्ट राजकिय लोकांनी येणार्या निवडणुकांकडे लक्ष ठेउन हे प्रकरण घडवले आणि तापवले आहे असे बातम्यांवरुन वाटते. बाकी दगड्फेक करायला काय? पैसे देउन कितीही लोक मिळतात. त्यांचा कुठल्याही विचारसरणीशी काय संबंध नसतो. जाता जाता- या सगळ्यामुळे जे आर्थिक नुकसान झाले आणि व्यवहार ठ्प्प झाले ते कोण भरुन देणार?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/04/2018 - 03:30 नवीन
>> येणार्या निवडणुकांकडे लक्ष ठेउन नजीकच्या भविष्यकाळात (मे २०१९ पूर्वी) कोणत्या निवडणुका येऊ घातल्या आहेत हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
A
arunjoshi123 गुरुवार, 01/04/2018 - 05:54 नवीन
२००२ मध्ये गुजरातमधे होत्या त्याच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 01/04/2018 - 09:41 नवीन
२०१९ च्या निवडणुकांबद्दलच म्हणतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
श्रीगुरुजी Wed, 01/03/2018 - 16:36 नवीन
३१ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर, कोळसेपाटील, जिग्नेश मेवाणी, उमर खालिद इ.नी मुद्दाम शनिवारवाड्यावर सभा घेऊन भाषणे ठोकली होती. अर्वाच्य वक्तव्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या मेवाणीने "मोदींच्या डोक्याची सफाई करण्याची आवश्यकता आहे" अशी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. जनेवित "भारतके टुकडे करेंगे"च्या घोषणा देणारा व देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेला उमर खालिद, अत्यंत वाचाळ व सातत्याने जातीयवादी वक्तव्ये करणारे कोळसेपाटील, राजकारणातून पूर्णतः हद्दपार झालेले व भविष्यात कोणतेही राजकीय भवितव्य नसलेले आणि सातत्याने संघ-भाजप विरूद्ध गरळ ओकणारे प्रकाश आंबेडकर असे नमुने तिथे मांडीला मांडी लावून बसले होते. शनिवारवाड्यासमोर मुद्दाम सभा घेण्यामागे जातीयवादी उद्देश होता. या सर्वांनी तिथे ३१ डिसेंबरला भाषणे ठोकली व १ जानेवारीला दगडफेक झाली हा योगायोग नव्हे.
  • Log in or register to post comments
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 14:53 नवीन
राजकारणाशी संबंध असणार तर बोला , मी तुम्हाला ओळखत नाही पण . तूम्ही आंबेडकर साहेबांना असे बोलु शकत नाही . तूम्ही तूमची तीथच झ**डा निवडणूक लढा मग पाहू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Fri, 01/05/2018 - 15:25 नवीन
अहो, बाबासाहेबांना कुठं नावं ठेवलीयेत? बाबासाहेब वेगळे आणि प्रकाश आंबेडकर वेगळे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतूल २०१५
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 16:02 नवीन
माफ करा , मला गुरुजींना अस म्हणायचं नव्हतं .पण ते आमचे श्रद्धस्थान आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कपिलमुनी Wed, 01/03/2018 - 17:35 नवीन
कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून झालेल्या वादातून बेकायदा जमाव गोळा करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांसह १५ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या वाहनावर दगडफेक केल्यावरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणीही ७ जणांसह इतर २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील सर्व दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आली होती. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रमाकांत विठ्ठल शिवले (वय ४०, रा. वढू बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. २९) सकाळी अकराच्या सुमारास ग्रामपंचायत शेजारी कोणीतरी संभाजीमहाराज यांच्याविषयी लिहिलेला फ्लेक्स चिकटवला होता. हा फलक गावातील काही व्यक्तींनी वाचल्यानंतर काढून टाकला. या कारणावरून संदीप शंकर गायकवाड, सनी कांबळे, अशोक ऊर्फ पांडा बाळू गायकवाड, बळीराम गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, संदीप शंकर गायकवाड, शैलेश शंकर गायकवाड (सर्व रा. वढू बुद्रुक ता. शिरूर) व इतर १० ते १५ महिलांनी बेकायदा जमाव गोळा करून फिर्यादीसह सरपंच व इतर ग्रामस्थांना दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वरील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले करत आहेत. दरम्यान, पोलीस हवालदार पुनाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वढू बुद्रुक येथे तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २९) रात्री संभाजीमहाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेल्या मोकळ्या जागेत दौंडचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे यांची सरकारी गाडी उभी केली होती. या वेळी स्वप्निल गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, सनी कांबळे, शैलेश गायकवाड व इतर १५ ते २० जणांनी जमाव जमा करीत आरडाओरडा केला. तसेच पोलीस पथकाच्या दिशेने स्वप्निल गायकवाड याने दगड फेकला. यामध्ये उपविभागीय अधिकाºयांच्या गाडीची काच फुटली. आरोपींनी घोषणाबाजी करीत पोलिसांच्या कामात अडथळा आणला व गाडी फोडली, म्हणून पोलिसांनी वरील आरोपींच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत. शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंदगोविंद गोपाळ यांच्या समाधीवरील छत व माहितीफलक काढल्याप्रकरणी शुक्रवारी दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील ४९ पैकी ९ जणांना अटक करण्यात आली. शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, राजेंद्र कुंटे, अमर वाघमोडे यांनी केले. दरम्यान, वढू बुद्रुक येथे शिक्रापूर, शिरूर व रांजणगाव पोलिसांसह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रक पथक गावामध्ये तैनात करण्यात आले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 17:16 नवीन
गाडी फुटली माझि , करीझ्मा आणी झायलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Wed, 01/03/2018 - 17:51 नवीन
http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-koregaon-bhima-vadhu-budruk-maharashtra-riots-reportage -90459 इथे बरीच वेगळी माहिती आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/03/2018 - 17:54 नवीन
http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-koregaon-bhima-vadhu-budruk-maharashtra-riots-reportage%C2%A0-90459
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
साहना Wed, 01/03/2018 - 18:04 नवीन
अस्पृश्यता ज्या प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धेमुळे समाजात फोफावली होती अगदी त्याच प्रकारची अतिअंध श्रद्धा तथाकथित दलित लोक त्याचे तथाकथित दैवत "आंबेडकर" ह्यांच्या बद्दल दाखवत आहेत. आंबेडकर आणि तथाकथित आंबेड्करवादाचा ठाव घेणारे अरुण शौरी ह्यांचे "Worshiping False Gods" हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे आहे. ह्या पुस्तकाच्या नावानेच काही जणांना फिट्स येतात. महत्वाकांक्षा आणि परिश्रम ह्याचे ज्या समाजात स्थान असते त्यामुळे त्या समाजाची प्रगती होत असते. ज्यू लोकांना काय काय त्रास सहन करावे लागले हे सर्वानाच ठाऊक आहे पण आज सुद्धा ज्यू लोक जगातील अत्याधिक श्रीमंत समाजापैकी एक आहेत. ह्या उलट कृष्णवर्णीय लोक आणि रेड इंडियन लोक ह्यांना आयते फुकट सरकारी लोणी मिळत असल्याने त्यांची वाताहत तर झाली आहेच पण वरून आपल्या अपयशासाठी ते इतरांना आणि निरर्थक ऐतिहासिक घटनांना जबाबदार धरत आहेत. दलित लोकांनी ब्रिटिशांची गुलामी एवढी अभिमानाने सांगावी ह्या इतका मूर्खपणा दुसरा काहीही नाही. ब्रिटिश लोकांनी काय कुणालाही युद्धांत cannon fodder म्हणून वापरले असते. महारांची तलवारबाजीने अतिशय भारावून जाऊन राणीने त्यांना युद्धांत पुढे पाठवायचा निर्णय वगैरे घेतला नव्हता. ब्रिटिशांनी भारतांत सुमारे २० लक्ष ते १ कोटी लोकांना निव्वळ दुष्काळजन्य परिस्थिती करून मारले. अश्या आर्थिंक कोंडीत दलित लोकांचे सर्वाधिक बळी गेले. अश्या ब्रिटिशाना उगाच समता, दलितांचा पुळका इत्यादी शब्द लावून डोक्यावर चढवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. पेशवे काही रेड क्रॉस स्वयंसेवक नव्हते त्यामुळे त्यांनी दलितांवर अन्याय केलाच नाही असे आम्ही म्हणू शकत नाही पण एकही भारतीय राजाने दलितांचे इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि शोषण घडवून आणल्याचे एकही उदाहरण नाही. नको ते विषय काढून दलित लोकांना रस्त्यावर आणून काही लोक दलित समाजाला टोटल मूर्ख बनवत आहेत आणि दलित समाज बनत सुद्धा आहे आणि ज्या प्रकारे एकूणच दलित समाजाची वाटचाल आहे त्यावरून ते असेच मूर्ख बनत राहणार असे वाटते. मडगांव गोवा मध्ये एका सारस्वत ब्रह्माणाने, सारस्वतांना सुद्धा राखीव जागा मिळाव्या म्हणून भव्य मोर्चा काढायचे ठरवले. गावागावातून बसेस वगैरे ठेवल्या आणि मोर्चाचे स्थान लोहिया मैदान ठरवले. लोक आले सुद्धा पण मडगांवांत उतरताच त्यांनी सरळ मत्स्यमार्केटचा रास्ता धरला आणि इसवण, पापलेट वगैरे घेऊन परतीची बस घेऊन सर्वजण घरी गेले. विनोद असला तरी जो समाज राजकीय दृष्ट्या एक "ग्रुप" म्हणून विशेष मूल्य ठेवत नाही तो समाज अत्यंत वेगाने प्रगती करतो असे दिसून येते कारण सरकारने हे द्यावे आणि ते द्यावे अश्या मागण्या करण्यात त्यांचा वेळ जात नाही. अमेरिकेत राजकीय दृष्टया सर्वाधिक प्रभावी आयरिश अमेरिकन सर्वाधिक गरीब गोऱ्या व्यक्ती पैकी आहेत. अमेरिकन भारतीय आणि अमेरिकन जपानीस सर्वाधिक श्रीमंत लोकांपैकी आहेत. तेच नाही तर अगदी नायजेरियन आणि सोमालियन अमेरिकन सुद्धा स्थानिक काळ्या लोकांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. दलितांनी आंबेडकरांचे पुतळे आणि स्मारक इत्यादींचा नाद सोडून त्यांच्या प्रमाणे चांगले शिक्षण घेतले आणि उद्योग धंदे केले तरच त्यांना काही भवितव्य आहे नाही तर कोरेगाव मध्ये ब्रिटिशांनी त्यांना cannon fodder म्हणून वापरले तिथे इस्लामिक, कांग्रेसी, भाजपायी इत्यादी वापरतील.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Wed, 01/03/2018 - 23:29 नवीन
ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची शेखी मिरवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. भारतीय लोक खास करून महाराष्ट्रीयन जरा जास्तच परधार्जिणे होते आणि अजूनही आहेत. आपापसात भांडायला काही कारण लागत नाही त्यामुळे मेवानी, खालिद सारख्या लोकांचं फावतं. मेवानीने तर दलितांचा लढा लोकशाही मार्गाने न लढता रस्त्यावर लढून मिळवा असं एका सभेत जाहीर आवाहन केलं होतं. त्यावर कोणी आक्षेप घेताना दिसत नाही. असल्या भाषणांमुळे लोकांच्या भावना भडकून पुढे सगळं घडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
ए
एमी गुरुवार, 01/04/2018 - 04:09 नवीन
पेशवे काही रेड क्रॉस स्वयंसेवक नव्हते त्यामुळे त्यांनी दलितांवर अन्याय केलाच नाही असे आम्ही म्हणू शकत नाही >> याबद्दल थोडं अधिक लिहा की म्हणजे "ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची शेखी मिरवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे." असले (कदाचीत) गैरसमज होणार नाहीत! === कारण सरकारने हे द्यावे आणि ते द्यावे अश्या मागण्या करण्यात त्यांचा वेळ जात नाही. >> 'हे' देणे बंद करावे 'ते' देणे बंद करावे अशी सतत बोंब चालू असते ती कशासाठी?? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
स
साहना गुरुवार, 01/04/2018 - 15:59 नवीन
कारण द्यायला लोकां पासून आधी चोरून घ्यायला पाहिज. फुकटचंबू लोक म्हणजे समाजाचा कॅंसर आहेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Fri, 01/05/2018 - 01:25 नवीन
चोरून? कोणाच्या खिशातून, कोणत्या फॉर्ममधे किती जातं आणि त्यातलं किती, कशावर खर्च होतं ते बघा एकदा जमलं तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 18:09 नवीन
'हे' देणे बंद करावे 'ते' देणे बंद करावे अशी सतत बोंब चालू असते ती कशासाठी?? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं?? कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
प्रसाद_१९८२ Fri, 01/05/2018 - 03:12 नवीन
कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात. ---- +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
इ
इरसाल Fri, 01/05/2018 - 05:36 नवीन
ते बंद, तोड्फोड करुन तो हक्क " अर्न" करतात त्यांच्या पुढार्‍यांकडुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ट
ट्रेड मार्क Fri, 01/05/2018 - 19:22 नवीन
अॅमीजी, मराठी सेनेला हरवण्यासाठी महार लोक ब्रिटिशांना जाऊन मिळाले यात भूषण मानण्यासारखं काय आहे? बरं ते एवढेच जर शूर होते की ३०००० मावळ्यांना हरवायला ३०० महार सैनिक पुरेसे होते तर मग ब्रिटिशांची गरज कशाला पडावी? ३००० महारांनी एकत्र येऊन इतर सगळ्या राजवटी उलथून टाकायच्या आणि आपलं राज्य स्थापन करायचं होतं ना. ब्रिटिशांनी कधी कुठल्या भारतीयाला नीट वागवलं होतं का, की या महारांना वाटलं त्यांना नीट वागवतील! २०० वर्षांपूर्वी जे घडलं ते घडलं पण मग आता त्याचा सोहळा करायची गरज आहे का? त्यापेक्षाही काही शे वर्षांपूर्वी जर दलितांना नीट वागवलं गेलं नसेल तर त्याचा बदला आत्ता कशाला घ्यायचा? एकीकडे गांधीजींची आणि गौतम बुद्धांची तत्व पाळतो म्हणायचं आणि दुसरीकडे द्वेष करायचा, हिंसा आणि नासधूस करायची. याला काय म्हणावं? ब्राह्मणांचा एवढा द्वेष करता, सध्याच्या काळात कुठल्या ब्राह्मणांनी दलितांना किंवा अगदी इतर कुठल्याही जातीतील लोकांना त्रास दिलाय ते उदाहरणासहित सांगा. या उलट ब्राह्मणांच्या मुलांना अगदी शाळेत असल्यापासून बामन आणो डाळभात खाणारा म्हणून चिडवलं जातं. त्या शाळकरी मुलांमध्ये कुठून हा द्वेष येतो? कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना, नोकरी मिळवताना आरक्षण असूनही कुठल्या ब्राह्मणांच्या गटाने मोर्चे काढलेत किंवा राजकीय खेळ्या खेळल्यात? माझ्या मते तर लोकसंख्येच्या प्रमाणात सगळ्या मुख्य जातींमध्ये अल्पसंख्यांक ब्राह्मणच असतील. तरी अल्पसंख्यांक आहोत असा टाहो फोडून फायदे लाटायचा कधी प्रयत्न केलाय का? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं?? आरक्षणामुळे सरकारी नोकरी मिळवून, त्यात भरपूर वरकमाई करून गडगंज झालेले कित्येक लोक मी बघितलेले आहेत. कॉलेजची फी सहज भरू शकत असताना परत कमी मार्क मिळवलेल्या स्वतःच्या मुलासाठी आरक्षित सीट मिळवून दुसऱ्या एखाद्या हुशार पण गरीब मुलाची संधी हिरावून घेतात, त्याचं फक्त वाईट वाटतं. मुद्देसूद उत्तर देणार असाल तर द्या, उगाच व्हिक्टीम कार्ड खेळत बसू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Fri, 01/05/2018 - 23:04 नवीन
चालू द्या तुमची फाल्तु बडबड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Mon, 01/08/2018 - 01:53 नवीन
मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसला की असे प्रतिसाद येणारच. दलितांनी आपली अस्मिता सवर्णांपासून शाबूत राहावी म्हणून इंग्रजांशी हातमिळवणी केली. मग त्यातून त्यांची अस्मिता शाबूत राहिली का? इथे अस्मिता हे मुलीचं नाव नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. इथे म्हणताय "जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय" कुठली आणि कसली प्रगती झालीये? आणि झाली आहे तर चांगलंच आहे की, मग आरक्षण काढून टाकायला हरकत नसावी. हिंदू धर्मात कोणालाही कुठलाही पंथ स्वीकारायची आणि दुसऱ्या धर्मात जायची परवानगी आहे. कोणी अडवलं नाहीये. इथे "मला इतिहासात रुची नाही". म्हणजेच स्वतः काही अभ्यास केला नाही, तर कोणीतरी काहीतरी सांगितलेलं ऐकून असली विखारी मतं बनवताय. जर खरंच पात्रता असेल तर चहुबाजूने अभ्यास करून स्वतःच मत बनवा, सोशल मेडिया आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या (एकतरफी) बातम्या वाचून मतं बनवू नका. मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते आणि मग एका ८५ वर्षांच्या वृद्धावर आरोप करण्यात धन्यता मानताय? मेवानीने भडकाऊ भाषण केल्याचे पुरावे आहेत, भिडे गुरुजींनी दगडफेक केल्याचे पुरावे दाखवा. मुळात भिडे गुरुजी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार पुढे नेण्यासाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहेत. ते आडनावावरून तरी ब्राम्हण वाटतात, त्यांनी कधी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मराठा होते म्हणून त्यांच्या विचारांचा प्रसार करणार नाही असं म्हणलं नाही. असो, तुम्ही काही मुद्देसूद प्रतिवाद करू शकणार नाही त्यामुळे तुमच्या समोर मुद्दे मांडून काय उपयोग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Mon, 01/08/2018 - 11:40 नवीन
हा हा मलापण वाटलंच होतं तुम्ही फालतू बडबड चालूच ठेवणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
त
तेजस आठवले Sat, 01/06/2018 - 09:55 नवीन
चांगला प्रतिसाद. पण अजेन्डाअॅमीला पटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
सुखीमाणूस Wed, 01/03/2018 - 18:26 नवीन
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा