Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा

अ
अंतरा आनंद
Sat, 01/06/2018 - 06:53
🗣 327 प्रतिसाद
"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय" अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे. (१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो. (१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं? ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्‍या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का? (२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं. जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्‍या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते. (३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती? बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना? (४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात. (५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? ) (६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही. प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?) (७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का? [२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला (२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला (३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं इतके किमान पर्याय संभवतात तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती (२) नव्ह्ती इतके किमान पर्याय संभवतात मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ] एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का? हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं. ’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत? अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे (१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते. सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय. आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्‍यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

प्रतिक्रिया द्या
122881 वाचन

💬 प्रतिसाद (327)
प
पगला गजोधर Sat, 01/06/2018 - 16:39 नवीन
कंसय नं, जेंव्हा अटकेपार झेंडा लावला जातो, तेव्हा रघुनाथ'पंत' लावतात.... जेव्हा कोरेगाव-भीमाला शिकस्त मिळते, तेव्हा ती 'मराठा' सैन्याला शिकस्त मिळते.....
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sat, 01/06/2018 - 17:25 नवीन
साडे तीन की पाच टक्के वाले बोलतात तिकडे कुठे लक्ष देता? तरी बर बिचारा शेवटचा बाजीराव हरला आणि त्याच्या पराभवाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. किंवा पेशव्यांचे वन्शज साधे आयुष्य जगत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मृत्युन्जय Mon, 01/08/2018 - 06:54 नवीन
आणि पानिपत हारले तेव्हा ते पेशवे हारले / सदाशिवरावभाऊ हारले. सेनापती जर बलाढ्य असेल तर हारजीतीचे श्रेय त्यालाच मिळते. इथे जातीचा संबंध नाही. दिल्लीचे तख्त हलवणारे म्हणुन महादजी शिंदे लक्षात राहतात. वडगाव च्या लढाईचे शिलेदार म्हणुन शिंदे / होळकर लक्शात राहतात. तसेच भीमा कोरेगाव मध्ये इंग्रज जिंकले म्हणुन लक्षात राहतात आणि हारणारे मराठे असतात. याऊप्पर जातीवाचक उल्लेखानेच लढवय्यांची अवहेलना करायची असल्यास काय बोलु शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
त
तेजस आठवले Tue, 01/09/2018 - 11:45 नवीन
मराठा सैन्यात अठरापगड जातीची माणसे होती. कुठल्याही सैन्याचा जो सेनापती असतो, त्यालाच हार अथवा जीत ह्यांचे श्रेय मिळते हे तुम्हाला माहित नसणे शक्यच नाही.काड्या लावण्यात तुमचा मिपावर सद्यस्थितीला कोणीही हात धरू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 01/09/2018 - 12:07 नवीन
शिवाजीराजे यांच्या काळात अठरापगड जातीची माणसे होती.... परंतु उत्तरं पेंशवाईंतं तसें नव्हतें....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
ट
ट्रेड मार्क Tue, 01/09/2018 - 14:14 नवीन
इतकं ठामपणे म्हणताय तर या प्रतिसादाच्या सारखंच तुम्ही पण शिवाजी महाराजांच्या सैनिकांचा आणि पेशवाईतील सैनिकांचा "जातीनिहाय व धर्मनिहाय", माहिती/डेटा/संदर्भ आपल्याला देता येईल काय इथे ? म्हणजे ती माहिती अभ्यासून आपल्याला उत्तर देता येईल, मिपावरील सभासदांपैकी कोणालाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 01/09/2018 - 14:52 नवीन
सर, एखाद्याने संदर्भ मागितला, तर मागितलेला संदर्भ न देता, उलट त्यालाच प्रतिप्रश्न विचारण्याची, आपली भूमिका मला अनाकलनीय वाटते. असो मी माझ्या वाचनात आलेली माहिती खाली देत आहे की ज्या द्वारे मी वरील प्रतिक्रिया दिली. निदान ती वाचून झाल्यावर, आपणही मी मागत असलेली संदर्भ माहिती, देण्याचं सौजन्य दाखवाल अशी अपेक्षा बाळगतो. . . शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील लक्षणीय उपस्थिती बाबत: प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार ने अपनी पुस्तक “Shivaji and his Times” के पेज 363 पर उल्लेख किया है कि शिवाजी की सेना में बड़ी संख्या में महार भी थे | इतना ही नहीं तो शिवन्नक महार को तो उनके जीवट और बहाद्दुरी के लिए पुरष्कृत करते हुए शिवाजी के पुत्र राजाराम ने कलमबी गांव भेंट किया था। ========= पेशवाईत महार सैनिकांबाबत दुजाभाव होण्याचा उल्लेख : केव्ही कोटवाले ने अपनी पुस्तक “politics of the Dalits – 1974” के पेज 142-145 में उल्लेख किया है कि कुछ लोगों ने जाति के आधार पर महारोकी मराठा शिविर में उपस्थितिपर पेशवा के ब्राह्मण सलाहकारके पास तीव्र आपत्ति जताई |  ====≠================= उत्तरपेशवाईत त्या दुजाभावात वाढ झाली असण्याची शक्यता चा रेफ: ' मराठ्यांविरुद्धची नव्हे तर ब्राह्मणांविरुद्धची लढाई ' साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषीकेश कांबळे लढाईची दुसरी बाजू मांडतात. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीनं मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना नमवलं होतं. "
ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता.
ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजानं ब्राह्मणांना सांगितलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. या कारणामुळेच महार समाजानं ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला," असं कांबळे सांगतात. ते पुढे म्हणाले, "ब्रिटिश सैन्यानं महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशव्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती, त्याविरुद्धची ही लढाई होती. महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं. ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती." "महार आणि मराठा यांच्यादरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. इतिहासात अशा वादावादाची उदाहरणंही नाहीत. ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झालीच नसती," असं कांबळे आवर्जून नमूद करतात. "मराठ्यांचं नाव घेतलं जातं कारण मराठ्यांचं राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं. ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती. ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं. म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणली." (बीबीसी मराठी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 01/09/2018 - 19:23 नवीन
तुम्ही संदर्भ मला मागितला नव्हता, त्यामुळे मी त्याचं उत्तर आधी दिलं नाही. पण जर एखाद्याने केलेल्या विधानावर जर तुम्ही संदर्भ मागताय तर त्याच आधारे मी पण तुम्ही केलेल्या विधानावर संदर्भ (खरं तर आकडेवारी) मागितली. तर... तुम्ही दिलेलं सगळं बहुतांशी २-३ लेखकांनी त्यांच्या इतिहासाच्या आकलनाप्रमाणे लिहिलेल्या पुस्तकातले उतारे आहेत. यात कुठलीही आकडेवारी वा इतर पुरावे उपलब्ध नाहीत. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबाबत - प्रत्यक्षदर्शींकडून मिळवलेल्या माहितीवरून तिथे जमलेले बहुतांशी लोक कामधंदा नसलेले आणि डोक्यात चुकीच्या कल्पना भरलेले होते. गेले काही दशके राजकारण्यांनी त्यांना मतांसाठी वापरून घेतलं आणि आता सुद्धा काही राजकारण्यांनी त्यांना फूस लावली आणि ते तिथे गोळा झाले. दगडफेक ई. करणारे (मग ते कुठल्याही गटाचे असोत) हे समाजकंटक होते/ आहेत. त्यांनी पैसे घेऊन हे काम घडवून आणले. संजय सोनवणींनी लिहिलेला हा लेख वाचा. साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषीकेश कांबळे यांनी मांडलेली बाजू म्हणजे तर कहर आहे. अस्पृश्यता काय फक्त पेशवाई आल्यावर आली होती का? पेशवे हा हुद्दा तर स्वतः शिवाजी महाराज असताना पण होता. पेशवा म्हणजे अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख आणि तुमच्याच म्हणण्याप्रमाणे शिवाजी महाराज असताना मराठा सैन्यात सर्व जातीच्या लोकांचा समावेश होता.अष्टप्रधान मंडळाने दलितांवर अन्याय होईल अश्या काही गोष्टी केल्या होत्या का? स्वराज्याचे पहिले पेशवे म्हणून शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांची नेमणूक सन १६७४ मध्ये केली. पुढे बाजीराव पेशवांच्या काळात फक्त पेशवे प्रबळ होते पण तरी ते छत्रपतींना बांधील होते. मग प्रा. कांबळे यांच्या मते समस्त मराठ्यांनी काय ब्राम्हण असलेल्या पेशवांकडे सगळं राज्यकारभार देऊन सन्यास घेतला होता काय? अस्पृश्यता ही काय फक्त ब्राम्हण आणि इतर जातीचे यांच्यात नव्हती, तर मराठा समाजात पण होती आणि अगदी दलित समाजात जी उतरंड होती त्यांच्यातही आपापसात होती. मग कोणी कोणाशी भांडायचं आणि किती काळ? काही शे वर्षांपूर्वी झालेल्या अन्यायाबद्दल आता द्वेष बाळगून काय साध्य होणार आहे? सध्याच्या काळात अस्पृश्यता आहे का? ब्राह्मणांकडून दलितांवर कोणते अत्याचार होत आहेत? ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता हे एकीकडे म्हणताय आणि फक्त ३०० का ५०० महार सैनिकांनी मिळून २५०००-३०००० "ब्राह्मण" सैन्याचा पराभव केला हे पण म्हणताय. तर साधा प्रश्न आहे की मग एवढे अत्याचार महारांनी का सोसले? सरळ सत्ता उलथून टाकून स्वतःच राज्य स्थापन का केलं नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गामा पैलवान Sat, 01/06/2018 - 16:58 नवीन
अर्धवटराव,
पिढीजात दु:ख भोगल्यामुळे दलीत समाजाचा दंगल सदृश उद्रेक एकवेळ स्वाभावीक म्हणता येईल, पण तो जस्टीफाय होत नाहि.
तुमच्या मतांचा आदर आहे. मात्र प्रस्तुत प्रसंग उत्स्फूर्त व स्वाभाविक नसून मुद्दाम पेटवलेला आहे. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी हे लोकं पूज्य संभाजी भिड्यांच्या मागे लागलेले आहेत. या दोन गणंगांचा दलितांच्या हिताशी फुटक्या कवडीइतुकाही संबंध नाही. त्यांना फक्त भिडे व एकबोटे यांना अटक झालेली बघायचीय. सगळे सलोख्याच्या गप्पा मारताहेत. मारू द्या. काही हरकत नाही. पण प्रकाश आंबेडकरांचा कोणी निषेध करतांना दिसतो का? भिडे गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तीवर अट्रोसिटीचा गुन्हा कशाच्या आधारे प्रविष्ट केला? प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यानेच ना? सांगायचा मुद्दा काये की दंगलीमागचा हेतू स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:कडे बघायला हवं ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Sat, 01/06/2018 - 17:02 नवीन
तुम्ही वरतीच म्हणालात ना कि असे खडे फेकणारे रोजच दिसतात, इकडे मिपावर पण पगला गजोधर नियमितपणे खडे फेकण्याचे आणि काड्या घालण्याचे काम करतच असतात.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sat, 01/06/2018 - 17:49 नवीन
पग तर केवढ मोठ समाज कार्य करत आहेत. ते अतिशय आधुनिक असल्यामुळे सगळ्या प्रोब्लेम ना एकच उत्तर आहे त्यान्च्याकडे की ब्राम्हण हटाव. मग तेव्हा त्यान्ची ठाम खात्री असते की अख्खा पाकिस्तान मानवतावादी होईल पण ब्राम्हण राज्यावर आले की आलेच मनुस्म्रुतीचे राज्य. बाकी सगळ्यांना समान न्याय आणि संधी पण ब्राम्हण आले राज्यावर की आगपाखड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
प
पगला गजोधर Sun, 01/07/2018 - 02:56 नवीन
शेणाचे पो मारणार्या तुमच्यासारख्यापेक्षा, माझे खडे बरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
त
तेजस आठवले Sat, 01/06/2018 - 18:14 नवीन
आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.
+१
महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय?
महारांना त्या प्रतीकांचा अभिमान असला तर त्यात वावगे काहीच नाही.प्रश्न हा आहे कि आत्ताच का दंगल झाली? ज्यांनी कोणी त्यांच्यावर दगडफेक केली त्यांना शोधून शिक्षा झालीच पाहिजे. कोरेगाव-भीमा गावातल्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन हिंसाचार करणारे, दगडफेक करणारे लोक बाहेरून आले होते अशी माहिती सांगितली आहे.त्या अनुषंगाने पोलीस आणि शासकीय, न्यायालयीन यंत्रणा यांनी तपास करून दोषींना शोधून काढणे अपेक्षित आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bhima-koregaon-violence-koregaon-bhima-villagers-press-conferance/articleshow/62377163.cms तपास यंत्रणांनी काम सुरु करण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी भिडे गुरुजी आणि एकबोटे यांच्यावर आरोप केला. त्यासाठी त्यांनी काहीही पुरावे दिले नाहीत. वरती ह्या दोघांना अटक झाल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही असे सुद्धा सांगितले.याकूब मेमनवर ज्या प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले, तसेच गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल करा, अशी मागणी केली. हे तर काही च्या काही होतं. याकूब ला शिक्षा न्यायालयाने सगळे साक्षीपुरावे बघितल्यानंतर कायद्याच्या चौकटीत दिलेली होती. तेव्हापण लोकसत्तासकट अनेक पुरोगाम्यांनी अश्रू ढाळले होते. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-blames-sambhaji-bhide-and-hindu-ekta-aaghadi-for-bhima-koregaon-violence/articleshow/62337263.सिम्स https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-demand-action-against-sambhaji-bhide/articleshow/62349160.cms
अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं?
हे तर सरळ सरळ घडवून आणलेलं आहे.मागील साधारण वर्षभरातल्या घटना बघितल्या तर नितीन आगे प्रकरण, कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणाची मागणी आणि त्याच्या समर्थनार्थ निघालेले लाखोंचे मोर्चे आणि त्या निमित्ताने झालेले शक्तिप्रदर्शन हे सगळे विचारात घेऊ. मराठा समाज एका झेंड्याखाली एकत्र आला आणि ह्या निमित्ताने झालेले शक्तिप्रदर्शन आणि एकजूट काहीजणांच्या छातीत धडकी भरवणारी ठरली असू शकते.त्यातच कोपर्डीचा निकाल लागला आणि नितीन आगे प्रकरणात साक्षीदार फिरल्याने न्याय झाला नाही त्यामुळे पण काही प्रमाणात असंतोषाची बीजे पेरली गेली असावीत. ह्या घटनेनंतर रामदास आठवले यांनी सरळसरळ मराठा लोकांनी हा हल्ला केल्याचे सांगितले होते. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-feel-that-those-who-targeted-our-activists-are-possibly-marathas-says-rpi-leader-ramdas-athawale/articleshow/62378726.cms
राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं.
ह्या पूर्ण पॅराग्राफशी सहमत. जर आपल्याच जातीचा उदो उदो करत आहेत असं म्हणावं तर संभाजी भिडे गुरुजी हे ब्राह्मण असावेत आणि ते तर शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या वैचारिक प्रभावाखाली आपले काम करतायत.शिवाजी महाराज तर काही ब्राह्मण नव्हते, ते तर मराठा होते.आपल्या पैकी किती जणांना शिवाजी महाराज आणि त्यांची कुणबी/ मराठा जात ह्याबद्दल बरेच वर्षांपूर्वी(२० वर्षांपूर्वी वगैरे.) वाद झडलेले आठवतायत ?संभाजी ब्रिगेडला जे बाबासाहेब पुरंदरे जळी स्थळी दिसतात ते तर ब्राह्मण आहेत आणि त्यांनी आयुष्य शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे.त्यांच्या लेखनाविषयी मतमतांतरे असतील, पण ब्रिगेड त्यांचा दुस्वास करते हे कोणीही नाकारू शकणार नाही.
अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.
हे फक्त दलितांच्याच बाबतीत होतं असं नाही, सर्वच जातींच्या बाबतीत होतं.प्रत्येक समूहाचं, जातीचं, धर्माचं स्टिरीओटायपिंग करणं ह्याला आपण इतके अधीन झालो आहोत की ह्यातून कोणीच सुटत नाही.दलितांच्या / मराठ्यांच्या / ब्राह्मणांच्या /दुसऱ्या जातींतल्या पुढील पिढीत अशी विषपेरणी केलीच जात नाही असे काही आहे का ? दलितांना हीन वागणूक दिली जात होती, त्यांना अस्पृश्य मानून त्यांचा स्पर्श टाळला जात होता हे कोणीही अमान्य करणार नाही. पण हे करणारे काय फक्त ब्राह्मणच होते ? सगळेच सवर्ण त्यांना अशी वागणूक देत असणार.तसेच दलितांमधला ज्या काही जाती असतील, त्यांच्या पण एकमेकांत काही उतरंड असणारच की,का सगळे दलित एकमेकांना समान समजत होते आणि समानतेने सगळे व्यवहार करत होते ?मग दोष कोणाकोणाला द्यायचा ?
वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का?
कोण उधळतो ही मुक्ताफळे ? आणि अशी मुक्ताफळे दलित, मराठे आणि ब्राह्मण एकमेकांबद्दल उगाळतात का फक्त सवर्ण दलितांबद्दल उधळतात ?
आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो.
पिढयानपिढया शिक्षण कोणी नाकारलं होतं हो ?शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण असे तुम्ही गृहीत धरताय. प्रत्येक जाती त्यांचे त्यांचे व्यवसाय करत होती. न्हावी, चांभार, सुतार, लोहार, वाणी, सोनार, मूर्तिकार, शिल्पकार हे सगळे त्यांचे पिढयानपिढया चालत आलेले व्यवसाय सांभाळत होती. पुस्तकी शिक्षण हे इंग्रजांच्या काळात चालू झाले. पूर्वीच्या काळी ब्राह्मणांना सोडून इतरांना अध्यायन करण्याचा अधिकार नव्हता, पण मग इतर जाती पण आपापल्या व्यवसायाचे ज्ञान इतरांना सहज देत होती ?ज्यांच्या जमिनी होत्या ते लोक त्या कसायला माणसे ठेवत, त्यांना कुळे म्हणत, ह्याच कुळकायद्यात ब्राह्मणांकडच्या जमीनी गेल्या. तुम्ही आम्ही जसे एखाद्या कंपनीत नोकरी करतो तसे.डोंगरावरचे आदिवासी पण प्रवाहाबाहेरचे पण त्यांना दारात नागली वारी उगवून खायला कुणाची ना नव्हती.जमीनी नव्हत्या तर मग महार वतन दिल्याचे उल्लेख आहेतच की. म्हणजे महारांकडे शौर्य होते, ताकद होती आणि त्यांच्या पराक्रमाचे कौतुकही होत होते. बरं पूर्वीचे सगळे सरदार, जमीनदार, वतनदार, अंमलदार, मामलेदार, जमादार, तसेच गावाची व्यवस्था पाहण्यासाठी असलेले देशमुख, चौगुला, खोत, इनामदार हे झाडून सगळे ब्राह्मण होते ? एक पेशवाई सोडली तर ब्राह्मणांकडे कधीही सरदारकी नव्हती.प्रचंड गरिबी आणि अंतर्गत प्रश्न ब्राह्मणांना पण होतेच की.
आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.
ब्राह्मणांच्या पूर्वजांनी त्या काळी केलेल्या वाईट वर्तणुकीची जर आजच्या काळातील ब्राह्मणांना लाज वाटायला हवी तर मग पूर्वीच्या दलितांना दिलेल्या वागणुकीचा प्रभाव आत्ताच्या दलितांवर पडला पाहिजे हा दांभिकपणा नाही का ? ब्राह्मण जर पूर्वजांचा अभिमान मिरवत असतील तर मग आत्ता तुम्ही दलित पूर्वजांवरील अत्याचारांचे भांडवल करून त्याचा वापर करून घेत घेता हा दांभिकपणा नाही ?
दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच.
हे १००% खरे आहे.फक्त दलितांच्या आंदोलनात नासधूस होते असे कोणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचे आहे.
प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं:
ह्याबद्दल खरं खोटं माहित नाही, पण ज्याप्रकारे ते अचानक प्रकाशझोतात आले त्यावरून अशी शंका घेतली जाऊ शकते.
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ]
रामाच्या जन्माबद्दल माहित नाही, पण सर्वोच न्यायालयाने व्यवस्थित आढावा घेऊन आणि सगळे पुरावे नीट तपासून त्या जागेवर पूर्वी राम मंदिरच होतं असं स्पष्टपणे म्हटलंय.
थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का?
हा निष्कर्ष कसा काढलात ?कोणाला त्या गोष्टीचे प्रेम आहे ? पूर्वी आर्थिक नुकसान झाले असेल म्हणून आत्ता झाले तर काहीच बोलायचे नाही ?
अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच.
हे होत असणार हे मला मान्य आहे आणि त्याची जाणीव पण आहे.
त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते.
सोशल मीडिया वरच्या ह्या बातम्या मध्यमवर्गीयांनी आणि ब्राह्मणी विचारधारा असल्यानी दिल्या आहेत ह्याचा काय पुरावा ? कोणीही आपली ओळख लपवून प्रतिक्रिया देऊ शकतो. इकडे मिपावर पण काही लोक पगलेपण घेऊन काड्यासारु प्रतिक्रिया देत असतातच की.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sat, 01/06/2018 - 18:35 नवीन
मूळ लेख काही अंशी पटला. तेजसजी छान समीक्षा केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
प
पगला गजोधर Sun, 01/07/2018 - 03:09 नवीन
तेजससी/गामाजी, तुमचंच बरोबर हो, तुमच्या मता प्रमाणे कोरेगावच्या लढाईत पेशवाई विजयी झाली, पुढची शे दोनशे वर्षे , अखंड हिंदुस्तानवर त्यांनी एकछत्री अंमल केला, राज्य करूकरू ते शेवटी कंटाळले, शेवटी जवाहलाल नेहरूंच्या हाती भारताच्या चाव्या ठेवून ते परत आपल्या कोकेशस पर्वतराजीत आपल्या बरखट्सगार्डन या स्वगृही परतले.... पेशवाई विजयी झाल्यामुळे त्यानंतर 2 वर्षांनी विजयस्तंभ कोरेगाव येथे उभारला जाऊच शकत नाही... तो नक्कीच २०१४ नंतर गुपचूप एका रात्रीत उभारला गेला असणार.... आसेतुहिमाचल पेशवाईचा एक छत्री अंमल असल्याने, १८५७ चा उठाव हा नक्की कोणाविरुद्ध?, त्यामुळे १८५७ चा उठाव ही फेक-इतिहास असणारच तुमच्या मते , कारण पेशवाईचा एकछत्री राज्य होते नं....
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sun, 01/07/2018 - 03:37 नवीन
ब्रिगेडी नवा इतिहास वाचला होताच. पण तुमच हे व्हर्जन त्याहुन भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
N
nanaba Sun, 01/07/2018 - 05:07 नवीन
अस्लेला इतिहास नाकारून ,मोड् तोड करू नका प्लीज - इतक झाल तरी बरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Sun, 01/07/2018 - 09:52 नवीन
ब्राह्मण द्वेषाचे मूळ : (आभार :श्री धम्मदीप कसबे ) एका ब्राह्मणेतराचे मत ................ भटाळलेले व्हा… माझ्या अनुभवानुसार मी हे लिहितोय. कदाचित इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो. पण ब्राह्मणेतर समाजाच्या मनात ब्राह्मणांबद्दल न्यूनगंडInferiority complex आहे. हे मी बर्‍याचदा पाहिलेलं आहे. आम्ही थिएटर करायचो त्या ग्रूपमध्ये असे अनेक नट होते जे ब्राह्मणांना पाहून बोटे मोडायचे. त्यांचं म्हणणं असं की ब्राह्मणांचे उच्चार चांगले असतात. मराठी शुद्ध बोलतात, म्हणून अनेक लोक स्टेजवर अभिनय करतात. पण केवळ उच्चार आणि शुद्ध मराठी म्हणजे अभिनय नव्हे. हे काही अंशी खरं सुद्धा आहे. मी अनेक असे नट (व्यावसायिक नव्हे, हौशी नट) पाहिलेत जे उच्चार चांगले आहेत म्हणून नट झालेत. पण अभिनयाच्या नावाने बोंब. पण ब्राह्मणांविषयी या गोष्टी ब्राह्मणेत्तर समाजाकडून द्वेष म्हणून बोलल्या जातात. द्वेष हा बर्‍याचदा न्यूनगंडातून निर्माण होतो. या न्यूनगंडाला सुद्धा भली मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातच हा द्वेष निर्माण करण्यात आला होता. आज भारताला स्वतंत्र होऊन ७० वर्षे होऊन गेली आहेत. तरीही आज सुद्धा जाणीवपूर्वक ब्राह्मणद्वेष पोसला जात आहे. ब्राह्मणद्वेष हा व्रत म्हणून जोपासला जात आहे. मी स्वतः ब्राह्मणेतर समाजातला आहे. मला कुणी ब्राह्मणांविरोधात बोलताना दिसलं तर मी त्याला भटाळलेले व्हायला सांगतो. जसं लोक म्हणतात की ब्राह्मणांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार होतात. त्यांना स्तोत्र वगैरे माहित असतात, त्यांचं मराठी चांगलं असतं. पण ते संस्कार आम्हाला मिळत नाही. आमच्या आई-वडीलांवर असे संस्कार कधी झाले नव्हते तर ते आमच्यावर कुठून करणार? अशी तक्रार लोक करतात. म्हणून मी त्यांना म्हणतो, अरे लहानपणी तसे संस्कार झाले नाहीत हे मान्य. पण मग आता तुम्हाला कोणी थांबवलंय? आता तुम्ही तुमच्यावर संस्कार करुन घ्या आणि आपल्या मुलांवरही करा. आपल्याला जर शुद्ध बोलता येत नसेल तर आपण आता शिकू शकतो. आता संस्कार वर्ग वगैरेंच्या माध्यमातून या गोष्टी शिकता येतात. पण मला वाटतं की ब्राह्मणेतर समाजातील मुले, जे कला-क्षेत्रात येऊ पाहत आहेत, त्यांनी शुद्ध मराठीपेक्षा स्पष्ट मराठीवर अधिक लक्ष दिलं पाहिजे. उदा.अनेक लोक असतात, त्यांना कसली घाई असते कळत नाही. ते काय बोलतात हे ब्रह्मदेवालाही कळत नाही. इतकं वेगात आणि अस्पष्ट बोलतात. आम्हाला थिएटरमध्ये शिकवलं गेलंय की संवाद म्हणताना आपले शेवटची अक्षरं सुद्धा ऐकू आली पाहिजे. म्हणजे समजा असं वाक्य असेल, “मी आता बाजारात जाऊन फुलं आणणार”. तर बरेच नट शेवटचा “र” तोंडातल्या तोंडात उच्चारतात. म्हणजे “मी आता बाजारात जाऊन फुलं अण्णा” असं काहीतरी ऐकू येतं. मग या वाक्याचा अर्थच बदलतो. ही समस्या आहे अनेक हौशी ब्राह्मणेत्तर नटांची. या समस्येतून पळवाट शोधण्यासाठी ते ब्राह्मण समाजावर आसूड ओढताना मी पाहिलंय. हे एक उदाहरण. एखादा ब्राह्मण समाजातील उत्तम नट असेल तरी सुद्धा त्याच्याकडे पाहून नाक मुरडतात. हे केवळ कलेच्या क्षेत्रातच होतं असं नाही. तर सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातही होतं. आपण द्वेषाची परिसीमा इतकी गाठली आहे की आपल्याला ब्राह्मण मुख्यमंत्री सुद्धा आवडत नाही. प्रत्येक गोष्टीत आपण जात पाहायला लागतो. ते याच Inferiority complex मुळे. म्हणूनच मी माझ्या मित्रांना सांगत असतो, भटाळलेले व्हा. म्हणजे काय तर त्यांच्यासारखे हुशार व्हा. ब्राह्मण समाजाचा द्वेष करु नका. तर त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतील. मला पूर्वी “ष” हा उच्चार करता येत नव्हता. माझ्या एका ब्राह्मण मित्राने मला तो उच्चार शिकवला. आपणही आपल्या मुलांना श्लोक, स्तोत्र पठण करायला बसवलं पाहिजे ज्यामुळे त्यांचे उच्चार आणि भाषा स्पष्ट होईल.. मग इथे काही लोक इतका अतिरेक करताना म्हणतात, संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे. हा पराकोटीचा द्वेष आहे. म्हणजे आपल्या नाकर्तेपणात सुद्धा समाधान मानून जे कर्ते आहेत त्यांनाच नाकर्ते म्हणायचे. आजही काही लोक मनुस्मृती जाळतात. म्हणे मनुस्मृती हे ब्राह्मणांचं कारस्थान आहे. मनु हा स्वतः क्षत्रीय होता. मला मनुस्मृतीत काय लिहिलंय यात मुळीच रुची नाही. आज हिंदूंनी संविधान स्वीकारले आहे. म्हणून मनुस्मृती चांगली की वाईट याचे सोयर-सुतक आम्हाला नाही. पण मनुस्मृतीतल्या एखाद्या श्लोकामुळे माझे उच्चार सुधारणार असतील तर मी नक्कीच त्याचे पठण करीन. उच्चारासाठी संस्कृत श्लोक हा उत्तम उपाय आहे. ब्राम्हणांच्यात अनेक प्रगतिशील लोक कलाकार व्यावसायिक आहेत.ते केवळ ब्राह्मण आहेत म्हणूण त्यांचा इतका द्वेष करणे म्हणजे अक्षरशः मूर्खपणा आह ब्राह्मण समाज कोणतेही आरक्षण नसताना स्व-बळावर आज जगत आहे. लोक त्यांचा द्वेष करतात. पण ते प्रतिकार न करता कर्तृत्व गाजवत आहेत. या समाजाला मी बुद्धीचा समाज मानतो आणि बौद्धिक पातळीवर मलाही ब्राह्मण व्हायला आवडेल. त्यासाठी मला माझे आडनाव बदलायचे नाही, मला माझी जात, वर्ण बदलायचा नाही. आता कुणी म्हणेल की मी अजूनही जातीला चिकटून आहे. पण ज्या दिवशी आपण अरक्षण वगैरेंच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू तेव्हा खर्‍या अर्थाने आपल्याला भारतीय समाज म्हणून जगता येणार आहे. नाहीतर हिंदू, मुस्लिम, दलित, बौद्ध असले भेद राहणारच. त्यामुळे आता ७० वर्षे झाल्यानंतर एक भारतीय समाज म्हणून आपल्याला ७० वर्षे मागे जायचे आहे की अद्ययावत व्हायचे आहे? हे आपल्यालाच ठरवले पाहिजे. त्याची सुरुवात साहित्याला दलित किंवा मुस्लिम न म्हणता करता येईल. साहित्य हे साहित्यच असावे. ते मराठीत लिहिले गेले असेल तर ते मराठी साहित्य, हिंदीत लिहिले गेले असेल तर ते हिंदी साहित्य. एवढीच काय ती वर्गवारी असावी. जाती, पंथाच्या आधारावर साहित्याची वर्गवारी ठरु नये. जे Inferiority complex मुळे ब्राह्मणांचा द्वेष करतात. त्यांनी ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कसे होता येईल याचा विचार करायला पाहिजे. ब्राह्मणांची मुले कोणत्या कोणत्या कलेत पारंगत असातत. कुणी गाणे म्हणतो, कुणी तबला वाजवतो तर कुणी चांगले लेखन करतो. ही सवय तुम्ही स्वतः आणि तुमच्या मुलांना लावा. ब्राह्मणेत्तर उच्चभ्रू समाज सोडला तर इतर लोक आपल्या मुलांना या सवयी लावत नाहीत. ब्राम्हण समाजाचे पुढारी नाहीत किंवा त्यांचा असा कोणताही नेता नाही ज्याच्या एका हाकेवर समाज रस्त्यावर उतरेल. कारण प्रत्येक ब्राम्हण हा स्वतंत्रपणे विचार करू शकतो. मराठा काय इतर मागासवर्गीय काय किंवा दलित काय नेत्याच्या हाकेला मेंढरांसारखे मागे जातात. ७० वर्षे झाली पण मराठा समाजातील 60-65 घराणी सोडली तर बाकी मराठा समाज मागासलेलाच राहिला आहे. सगळे पुढारी मंत्री इ याच काही घरण्यातून येतात आणि त्यांसाजे आपापसातच रोटी बेटी व्यवहार होतात. बाकी मराठा समाजाला कोणीही शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नावावर चिथावू शकतो. हीच स्थिती आमच्या दलित समाजाची आहे. पूज्य डॉ. बाबासाहेबांच्या नावाने आमच्या नेत्यांनी आमच्या समाजाचा वापर करून घेतला आणि स्वतः सरकारी जावई झाले आहेत. आमचा समाज मात्र आज आहे तिथेच आहे. 1 जानेवारीला ज्या तरुणांनी बंद मध्ये भाग घेऊन हिंसाचार केला त्यांना आता सरकारी संघटना "वेचून वेचून" आत टाकतील. त्यांना जामीन द्यायला किंवा सोडवायला आमचे नेते काही येणार नाहीत. नेत्यांच्या चिथावणीने चार दगड फेकताना आपण विद्रोही म्हणून यशस्वी झाल्याचे वाटते पण "आत टाकल्यावर बाहेर" येण्यासाठी पदरमोड करावी लागली की भ्रमनिरास होतो. नंतर खटला भरला की या तरुणांना सरकारी नोकरीतून बाद केले जाईल. याची ना आमच्या नेत्यांना ना खंत ना खेद. आपण नेत्यांच्या चिथावणीला बळी न पडता किंवा मेंढरांसारखे त्यांच्या मागे विचार न करता जाण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीचा विचार करायला शिकू या. अन्यथा अजून 70 वर्षांनी पण आपण आहोत तेथेच राहू. ब्राह्मणांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्यासारखेच व्हा लेखक: धम्मदीप कसबे. व्हॉटस अँप वरून साभार
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/07/2018 - 11:58 नवीन
खरे डॉक्टर, धम्मदीप कसबे यांचा संदेश उद्धृत केल्याबद्दल आभार. दलित नेत्यांविषयी केलेलं हे विधान विशेषकरून पटलं :
नेत्यांच्या चिथावणीने चार दगड फेकताना आपण विद्रोही म्हणून यशस्वी झाल्याचे वाटते पण "आत टाकल्यावर बाहेर" येण्यासाठी पदरमोड करावी लागली की भ्रमनिरास होतो. नंतर खटला भरला की या तरुणांना सरकारी नोकरीतून बाद केले जाईल. याची ना आमच्या नेत्यांना ना खंत ना खेद.
मलाही हेच सांगायचं होतं पण नीट शब्द सापडंत नव्हते. प्रकाश आंबेडकर नक्षलवादी आहे. या माणसाचा दलितांच्या हिताशी काडीमात्र संबंध नाही. काही संबंध असलाच तर तो हितशत्रू म्हणून आहे. प्रकाश आंबेडकरांपासून सावध राहायला हवं. मराठा समाजातही थोडीफार अशीच परिस्थिती असल्याचं लेखकाचं निरीक्षण आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Sun, 01/07/2018 - 16:02 नवीन
दुसर्‍याची रेष छोटी करून आपली मोठी होत नाही एवढंच समजलं तरी पुष्कळ आहे. असो चालू द्या...
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 01/07/2018 - 16:31 नवीन
टिपिकल मोडस ऑपरेनडी .... ट्रोजन हॉर्स... पाठशाला प्रशिक्षित ब्लॉगर्स आता गॅब्रिअल, सलीम, बुद्धभूषण, धम्मदीप, फिलॉसॉफर अश्या विविध नावाने आपल्याला हवं ते पोस्ट करतात.... . . प्रतिपक्षात आपलेच उंट सोडण्याची रणनिती आम्हाला परिचित आहे.... छत्रपती शिवाजीराजे यांनी आम्हाला शत्रूच्या चाली ओळखायला शिकवलं आहे.... त्यामुळे धम्मदीप किंवा अजून काही नावांनी काहीही पोस्ट करा, प्रशिक्षित ट्रोजन हे ट्रोजनच....
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/07/2018 - 17:03 नवीन
प.ग., ट्रोजन म्हणजे काय रे भाऊ? तो प्रकाश आंबेडकर बघा कसा नक्षल्यांनी सोडलेला ट्रोजन आहे. तुमच्या कुठे लक्षात आला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अभ्या.. Sun, 01/07/2018 - 17:11 नवीन
पाठशाला प्रशिक्षित ब्लॉगर्स आता गॅब्रिअल, सलीम, बुद्धभूषण, धम्मदीप, फिलॉसॉफर अश्या विविध नावाने आपल्याला हवं ते पोस्ट करतात....
परफेक्ट. शेवटाच्या दोन चार ओळी वाचल्या की लगेच अजेंडा लक्षात येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ए
एमी Sun, 01/07/2018 - 21:28 नवीन
अगदी अगदी! कसली भोंदू पोस्ट आहे ती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Mon, 01/08/2018 - 05:03 नवीन
1 जानेवारीला ज्या तरुणांनी बंद मध्ये भाग घेऊन हिंसाचार केला त्यांना आता सरकारी संघटना "वेचून वेचून" आत टाकतील. त्यांना जामीन द्यायला किंवा सोडवायला आमचे नेते काही येणार नाहीत. नेत्यांच्या चिथावणीने चार दगड फेकताना आपण विद्रोही म्हणून यशस्वी झाल्याचे वाटते पण "आत टाकल्यावर बाहेर" येण्यासाठी पदरमोड करावी लागली की भ्रमनिरास होतो. नंतर खटला भरला की या तरुणांना सरकारी नोकरीतून बाद केले जाईल. याची ना आमच्या नेत्यांना ना खंत ना खेद. ज्या कुणी हि पोस्ट टाकली असेल ट्रॉल असेल किंवा भोंदू असेल. (धम्मदीप कसबे किंवा जो कोणी). त्यातील वरील वस्तुस्थिती बदलत नाही ना? या तरुणांचा उद्रेक बाहेर पडला हे मान्य पण यात श्री प्रकाश आंबेडकर यांनि शक्तिप्रदर्शन करून आपली पोळी भाजून घेतली(आपले गाळात जाणारी राजकीय कारकीर्द वर खेचण्याचा प्रयत्न समजा) हि वस्तुस्थिती तर बदलत नाही. दलितांना खरी गरज आहे ती चांगल्या सक्षम नेतृत्वाची. पण त्यांना मिळाले कोण तर मायावती किंवा चार पाच सवतासुभा उभे करणारे रिपब्लिकन पक्षाचे गट. काँग्रेसने तर त्यांना दशकानुदशके व्यवस्थित "वापरून" घेतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
मराठी कथालेखक Sun, 01/07/2018 - 20:19 नवीन
संपुर्णपणे पटला नाही .. पण लेखनातला एकूण आशय आवडला त्यामुळे एकेका मुद्द्याची वेगळी चिकित्सा करण्याची गरज वाटत नाही. ह्या सगळ्या मंथनातून आता काही निर्णायक आणि विधायक वळण समाजाला मिळावं ,समाजातील जाती/धर्मभेदाची दरी कायमची कमी होण्यास सुरुवात व्हावी ही अपेक्षा. आ पार्श्वभूमीवर एक नमूद करावेसे वाटते मुंबईत १९९२ की ९३ साली जीवघेण्या दंगली झाल्या होत्या (हिंदू मुस्लिम), मी बारा-तेरा वर्षांचा होतो, पण त्या वयातही पेपरमधल्या दंगलीच्या बातम्या सुन्न करणार्‍या होत्या. सगळं वातावरण ढवळून निघालं. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यानंतर पुन्हा अशा भयंकर (हिंदू मुस्लिम) दंगली मुंबईत घडल्या नाहीत (काही वेळा, नाजूक परिस्थिती निर्माण झाली पण लगेच आटोक्यातही आली) निदान मुंबईतील समाजतरी याबाबत अधिक समंजस झाला असं मानता येईल. तसंच आता या घटनेनंतरही महाराष्ट्रातील समाज विचार करायला प्रवृत्त होईल आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी आशा करुयात.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 01/08/2018 - 02:14 नवीन
९२-९३ च्या दंगलीत राजाच्या राजकीय नेतृत्वाने प्रगल्भता दाखवत, मुस्लिम भागात ही बॉम्बस्फोट झालाय अश्या बातम्या पसरवल्या, व त्यामुळे फक्त हिंदूंवर हल्ला ही हिंदुवाद्यांची जहरी खेळी आधीच प्री एम्प्ट केली... याउलट 2002 मध्ये गुजरातमधे कारसेवकांना काही समाज कंटकानी जाळलं, 2 दिवस ... लक्षात घ्या पूर्ण ४८ तास अहमदाबाद शांत होतं, तत्कालीन राज्याच्या नेतृत्वाखाली टाळूवरच लोणी खाण्यासाठी, मृतदेहांची ओपन कास्केट ट्रक मधून गावभर मिरवणूक व अभाविप च्या कार्यालय दर्शनासाठी ठेवून, जाणून बुजून हिंदूंच्या भावना एका धर्माविरुद्ध चेतावल्या, आणि ऍनाकोंडासारखं मानभावी पणे व्हर्बल ऑर्डर्स दिल्या गेल्या, की हिंदुओ की भावना व्यक्त हो रही है, उसे होने दो.... (*शेखर कपूर चा "पंतप्रधान" सीरिअल- अटलबिहारी कार्यकाळ 2002)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
भ
भंकस बाबा Sat, 01/13/2018 - 17:49 नवीन
म्हणे मुस्लिम भागात बोम्बस्फोट झाल्याच्या बातम्या पसरवल्या, बाबरी मशिद आणि मुंबई स्फोटाचि बातमी एकाच काळात आणली तुम्ही! त्या दंगलीत देखील राधाबाई चाळ प्रकरण झाले आणि हिंदुनि ताकत दाखवली ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 01/08/2018 - 03:44 नवीन
ढोराचं कातडं कमावून उदरनिर्वाह करणाऱ्या दलितांवर अमानुष मारहाण व हिंसेचे अत्याचार करणारे "अनचेक्ड गौरक्षक" , यांच्याविरुद्ध च्या अहिंसक लोकमोहिमेतून कायदापदवीधर-जिग्नेश चे नेतृत्व पुढे आलं.... या अश्या युवामुळे आता देशाचे तुकडे पडणार, असं मनुवादी, काहीही बरळतील.... पण अनौरस "अनचेक्ड गौरक्षक" बाबत शेपूट घालतील .... "पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत.... .. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष शहा, उ प्र मुख्यमंत्री आदित्यनाथ, देशातील इ अनेक बीजेपी मुख्यमंत्री खासदार प्रचारात खुद्द येऊनही, जिग्नेश निवडून आला... मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच.... कारण "Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/08/2018 - 05:15 नवीन
पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत.... आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच. जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते? निवडणूका अजून जाहीरही झाल्या नाहीत. म्हणजे तीन महिने कुठेच गेले नाहीत. बाकी १ जानेवारीचे रणकंदन आणि जिग्नेशजींची भेट या "योगायोग" असू शकेल. द्वेषाने आपण इतके आंधळे झाले असाल असे वाटले नव्हते. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 01/08/2018 - 07:59 नवीन
दलित संघटना समितीने आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणाला आमंत्रण द्यावे व कोणास देऊ नये, याबाबतीत काय नागपूरच्या रेशीमबागेतून आदेश घ्यावे काय ?? असो भारतभरातील दलित ज्यात मेवानी सुद्धा येतात, जर परिषदेसाठी जमले असेल तर त्यात काय वावगे ? बाकी जाताजाता, गुजरातच्या जनेतला त्यांच्या राज्यात काय विकास झालाय हे सांगायला, दुसऱ्या राज्यातील (उत्तरप्रदेशातील) मुख्यमंत्री येतो .. हे पाहून करमणूक झाली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 01/08/2018 - 08:08 नवीन
ब्वॉर्र आता तुम्ही चष्माच घातलाय म्हटल्यावर काय बोलावे? जाऊ द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रसाद_१९८२ Mon, 01/08/2018 - 09:09 नवीन
बाकी जाताजाता, गुजरातच्या जनेतला त्यांच्या राज्यात काय विकास झालाय हे सांगायला, दुसऱ्या राज्यातील (उत्तरप्रदेशातील) मुख्यमंत्री येतो .. हे पाहून करमणूक झाली... << << कॉंग्रेसी पप्पूचा कोणत्याच राज्याशी काहिच संबध नसताना देखिल तो सगळीकडे जातोच ना.(आता पप्पू ज्या-ज्या राज्यात जातो तिथे कॉंग्रेसचा दारुण पराभव होतो तो भाग वेगळा) मग योगी आदित्यनाथ गुजरातमध्ये गेले तर काय फरक पडतो. तसेही महाराष्ट्र व इतर राज्यात कॉंग्रेसचे दिल्लीतील ज्यांचा महाराष्ट्र व इतर राज्यांशी कसलाही संबध नाही ते निवडणुक प्रचाराला जातातच ना त्यांच्या बद्दल कोणी बोलल्याचे आजवर ऐकले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 01/08/2018 - 09:16 नवीन
तुम्हाला मुळ मुद्दा लक्षांत नाही आलाय... "जिग्नेश चे पुण्यात काय काम ? " ह्या आक्षेपविरुद्ध दिलेलं उदाहरण आहे ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
पगला गजोधर Mon, 01/08/2018 - 05:14 नवीन
दलितांच्यामधून सुशिक्षित-कायदा पदवीधर, अहिंसक चळवळ उभी करणारे, जिग्नेश सारखे नव व युवा नेतृत्व अजून मोठ्या प्रमाणात पुढे येणे, हे भारतीय लोकशाहीला आवश्यक आहे.. ... त्याला आताच दाबून टाकायला पाहणारे राजकीय संघी, हे दलितांना काय न्याय देणार ???
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/08/2018 - 05:20 नवीन
द्वेषाने आंधळा झालेला माणूस काय करू शकतो ते हि पाहून घ्या. हा दलितांचा पुढारी होणार असेल तर झालंच "चांगभलं" http://www.firstpost.com/politics/gujarat-assembly-elections-jignesh-mevani-admits-to-accepting-rs-51000-as-donation-from-pfi-4267829.html The Popular Front of India is an extremist and militant Islamic fundamentalist organisation in India https://en.wikipedia.org/wiki/Popular_Front_of_India
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/08/2018 - 05:23 नवीन
केवळ "मोदी द्वेषा" साठी इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटनेकडून देणगी घेणारा हा माणूस आहे एवढेच नमूद करू इच्छितो. जाता जाता-- पंचतंत्रातील एक गोष्ट. एका सापाच्या डोक्यावर गांधील माशी बसली आणि त्याला चावली. साप द्वेषाने आंधळा झाला आणि त्याने माशीला शिक्षा म्हणून एका चालणाऱ्या बैलगाडीच्या खाली आपले डोके घातले. माशी मात्र उडून गेली अनिसपच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. याचा वरील राजकारणाशी संबंध नाही.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 01/08/2018 - 08:12 नवीन
साहेब, आपण कसला डोंबलाच्या इस्लामीमूलतत्त्ववाद विषयी बोलत आहोत, अहो अफजल गुरूला शाहिद मानणाऱ्या व विधान सभेत तसा ठराव पास करणाऱ्या बरोबर बीजेपी वाले मांडीलामांडी लावून सत्ता उपभोगत आहेत.... आणि याला जस्टीफाय करण्यासाठी जो तर्क दिला जातो, (त्यांना नियंत्रणात ठेवणे वैगरे)... तीच तर्काची उदात्तता इथं दाखवा बरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पुंबा Mon, 01/08/2018 - 08:30 नवीन
अंतराजी, लेख आवडला. काही मुद्दे पटले नाहीत परंतू बर्‍याचशा मुद्द्यांशी सहमत आहे. दलितांवर कसलाही अत्याचार होत नव्हता असे म्हणणार्‍या लोकांची संख्या मला वाटते वाढली आहे. होलोकॉस्ट डिनाय करणारेही लोक आहेत. मात्र गावगाड्यात दलितांचे स्थान किती अपमानाचे होते आणि जगताना त्यांना कोणत्या अमानुष व्यवहाराला तोंड द्यावे लागे हे कोणत्याही वयस्कर खेडेगावात राहिलेल्या व्यक्तिस विचारून पहावे. त्रिंबक आत्रे यांचे 'गावगाडा' हे पुस्तक देखिल बर्‍याच प्रमाणात अन्याय्य जातीव्यवस्थेचे यथास्थीत वर्णन करते. आताची काही दलितांची सुधारलेली परिस्थीती बघून गेलेल्या काळाचे आकलन करणे सर्वथा गैर आहे. आजदेखिल भटके विमुक्त, महादलित यांची परिस्थिती दलितांमधील पुढारलेल्या पोटजातींपेक्षा वाईटच आहे. जाती, धर्म निहाय अस्मिता वरचेवर टोकदारच होत चालल्या आहेत. आर्थिक प्रगती होऊनदेखिल सामाजिक एकोपा आलेलाच नाही. देश, संविधान या आपल्याला एका सूत्रात बांधून ठेऊ शकणार्‍या गोष्टींपेक्षा आपल्याला अजूनही भेदाभेदांच्या भिंती भक्कम करण्यातच रस आहे. खरेतर जातींचे पुर्वी असणारे फायदे आता मुळीच नाहीत तरीही जाती हव्याच वाटतात आपल्याला. हे चित्र भविष्याच्या दृष्टीने भयावह आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 01/08/2018 - 10:37 नवीन
शांत गदाधारी भीम शांत. ============================== शेवटी इथे चर्चा करणारे आपण तरी एकमेकांशी प्रेमाने नि आदराने (वाटल्यास थोड्या खवचटपणे) वागू शकत नाही का? समाजासाठी वा देशासाठी काय इष्ट आहे याबद्दल मतांतर आहे मंजे चर्चेचा टोन चढवावाच असं जरूरी नाही. शेवटी आपण आपल्या सर्वांसाठीच काय भलं आहे हेच शोधायला भांडत (किंवा जे काय ते) आहोत ना? =========================== वादग्रस्त विषयावर समूहाने लिखित चर्चा कशी करावी यावर कोणी मार्गदर्शनपर लिहिल काय? मंजे प्रमेय (किंवा जे काय ते) कसे मांडावे, पुरावे कसे द्यावे, किती अवांतर करावे. कोणता तर्क व्हॅलिड मानावा, इ इ इ. संसदेत बहुमत नावाच्या शक्तीने उचित नि अग्राह्य काय हे ठरते. ============================ मला असं वाटतं कि श्रीमान आमदार मेवानी, वा प्रकाश आंबेडकर वा (काही लोकांचे पूज्य) भिडे गुरुजी, वा अन्य कोणी जर कोणताही दखलपात्र गुन्हा केलेला आहे आणि त्याचा कोणताही पुरावा सरकारकडे आहे तर त्यांच्यावर सरकार योग्य ती कारवाई करेलच. ती सरकारला करावीच लागते. ज्याअर्थी असं काही होत नाहिये, त्याअर्थी त्यांच्यात केवळ वैचारिक, तात्विक इ मतभेद आहेत. त्यांच्या अनुयायांनी देखील ते त्याच पातळीवर मर्यादित ठेवायला हवेत.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 01/08/2018 - 10:46 नवीन
ते जिग्नेश आणि उमर गेले आग लावून त्यावर पवार - आंबेडकर आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत बाकी दलितांवर पूर्वी अन्याय झाला ... खरी गोष्ट आहे ... फक्त हे अजून किती वर्षे उगाळणार हे पण सांगा
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 01/08/2018 - 11:06 नवीन
व्वा साहेब... मटा ची बातमी आहे, एका ख्रिस्ताव कलाकारांचा स्टुडिओ (की जिथे बाबासाहेबांची अनेक भित्तिचित्रे म्युरल होते), ते कोरेगाव भीमा दंगलीत जाळून खाक केले गेले.... त्या आगी लावण्यामागे तुमच्या प्रातस्मरणीय ऋषितुल्य गुर्जी व बाराबोटेच्या सारख्या विचारसरणी चा लोकांचा उल्लेख वगळून, तुम्हाला पवार मेवाणी आंबेडकरच बरे दिसले.... बाबासाहेबांची अनेक भित्तिचित्रे म्युरल घडलेल्या/ असलेल्या स्टुडिओला जाळून हे बाराबोट्याचें काय बोडक्याची हिंदूएकता घडवून आणणार होते ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Mon, 01/08/2018 - 11:23 नवीन
ज्यांनी आपला राजकीय स्वार्थ साधला त्यांचा उल्लेख करणे गैर नाही ... तो स्टुडिओ कोणी जाळला ते चौकशीत समोर येईलच ... त्याचा गुरुजींशी काहीही संबंध नाही त्याचबरोबर बंद मध्ये कोणी काय नुकसान केले तेही सांगून टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रसाद_१९८२ Mon, 01/08/2018 - 10:50 नवीन
बाकी दलितांवर पूर्वी अन्याय झाला ... खरी गोष्ट आहे ... फक्त हे अजून किती वर्षे उगाळणार हे पण सांगा == == देवेंद्र फडणविसांची मुख्यमंत्रीपदावरुन जोपर्यंत उचलबांगडी होत नाही, तोपर्यंत. तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात एक ब्राम्हण मुख्यमंत्री होऊच कसा काय शकतो ?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 01/08/2018 - 10:59 नवीन
तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात एक ब्राम्हण मुख्यमंत्री होऊच कसा काय शकतो ?
असं कोणी म्हटलं? एन सी पी (यांना ब्रिगेडी लोकांचे मित्र मानतात) ने पाठिंबा देऊ केला होता. आठवले गटाचा आहेच. मग हा आरोप किमान पवारांवर करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या जातीचा (साधा) उल्लेख करणं त्यात इतकं गैर काय? तथाकथित पुरोगामी लोक ब्राह्मण चालेल, ब्राह्मण्य नको; हिंदू ओके, हिंदुत्ववाद नको असलं कायतरी ऑफिशियली म्हणत असतात. तुमचं विधान ऑफिशियल वर्जनच्या विरुद्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
अ
अमर विश्वास Mon, 01/08/2018 - 10:56 नवीन
खरं आहे .. रमाबाई नगर मध्ये दंगल उसळली होती तेंव्हा मनोहर जोशी मुखमंत्री होते
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 01/08/2018 - 11:01 नवीन
नामांतराची दंगल उसळली होती तेव्हा ना जोशी ना फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा कोणाला कोणत्या जातीचा मुख्यमंत्री होऊच कसा शकतो असे वाटत होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
आ
आनन्दा Mon, 01/08/2018 - 11:07 नवीन
ते दोन वेगळे विषय आहेत. एखाद्या विद्यापीठाला अंबेडकरांचे नाव देणे आणि एखाद्या पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार घालणे याची तुलना होऊ शकत नाही. पण बाकी आशयाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रकाश घाटपांडे Mon, 01/08/2018 - 15:24 नवीन
जात ही अंधश्रद्धा आहे ही अंनिसची अधिकृत भूमिका आहे.तिचे निर्मूलन व्हायचे असेल तर प्रथम ती किमान शासकीय कागदपत्रावरुन तरी हटवली पाहिजे. बघा जमतय का?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 01/08/2018 - 17:19 नवीन
ज्यांनी कोणी भीमा कोरेगाव दंगल पेटवून महाराष्ट्राची राख रांगोळी करण्याचा कट आखला होता त्यांचे मनसुबे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी निषेद व्यक्त करून उधळून लावले आहेत. काही प्रातिनिधिक उदाहरणे: https://www.loksatta.com/maharashtra-news/sadbhavna-rally-of-dalit-and-maratha-brothers-in-aurangabad-1613201/ ... मला सर्वात महत्वाचा पडलेला प्रश्न: अशा नाजूक प्रसंगी मुख्यमंत्र्यानी घटनास्थळी लगेच धाव का घेतली नाही ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढे घाबरायचे काही कारण नसावे. ----
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा