Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?

आ
आनन्दा
Fri, 01/19/2018 - 15:37
🗣 108 प्रतिसाद
मला बरेच दिवस हा धागा काढायचा होताच, पण यनावालांच्या धाग्यावर उठणारी राळ बघून प्रकर्षाने काढावासा वाटला.. तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय? माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अजून सिद्ध व्हायची आहे, पण तरीही मला वाटते की ते अस्तित्वात आहे, मी एक उदाहरण देतो... डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते.. त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास.. आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास.. अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो. व्यावहारिक जीवनात पण तसेच, पण सर्वसामान्यपणे श्रद्धा ही बेसिक चिकित्सा करून ठेवली जाते, जेव्हा बेसिक चिकित्सा पण केली जात नाही तेव्हा ती होते अंधश्रद्धा .. उदाहरणार्थ - माझ्याकडे एक माणूस येतो, तू मला 10लाख दे, मीएक वर्षात 20 लाख करून देतो असे सांगतो आणि मी विश्वास ठेवतो, याला म्हणावे अंधश्रद्धा. अध्यात्मातील अंधश्रद्धामबद्दल बरेच बोलले गेले आहे, त्यामुळे परत बोलत नाही तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
चर्चा:-देव-धर्म-कर्मकांडे

प्रतिक्रिया द्या
56624 वाचन

💬 प्रतिसाद (108)
इ
इरसाल Fri, 01/19/2018 - 16:09 नवीन
आमची ती श्रद्धा आणी तुमची ती अंधश्रद्धा. सारासार विचार करुन एखादा दाखवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा, ज्यात निरखुन पारखुन घेतलेले असते आणी समजा त्याबद्दल काही वेगळे माहित पडले तर बदलाची तयारी असते ती श्रद्धा. याच्या नेमके उलट म्हणजेच अंधश्रद्धा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/20/2018 - 08:31 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/19/2018 - 16:11 नवीन
शिंपल. आपला तो शास्त्रीय दृष्टीकोन आणि इतरांची ती अंधश्रध्दा.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/19/2018 - 16:39 नवीन
आपण फार मोठा शास्त्रीय दृष्टीकोन ठेऊन असतो असा दावा असणार्‍या अनेकांना मी एक प्रश्न विचारला होता. त्यापैकी कोणीही त्याचे उत्तर देऊ शकलेले नाही. त्यांच्या मते जी गोष्ट समोर दिसते किंवा सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवायचा आणि असे करणे म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोन आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा. ठिक आहे. पण एक गोष्ट समजत नाही. राईट बंधूंनी विमानाचे उड्डाण केले १९०३ साली. पण आधुनिक विमानशास्त्र ज्यावर आधारीत आहे ती संकल्पना बाऊंडरी लेअर आणि ड्रॅग-लिफ्ट ची मांडणी लुडविग प्रॅन्डलने केली १९०४ मध्ये. सामान्यतः हवेपेक्षा जड असलेली वस्तू उडू शकत नाही पण पंखांचा आकार एरोफॉईल ठेवला आणि विमान वेगाने जमिनीवरून नेले तर पंखांच्या विशिष्ट आकारामुळे पंखाच्या वर हवेचा दाब कमी होतो आणि पंखाच्या खाली जास्त होतो आणि त्यातूनच लिफ्ट मिळते आणि हवेपेक्षा जड असले तरी विमान जमिनीवरून उचलले जाते. ही सगळी शास्त्रीय बैठक उपलब्ध झाली १९०४ मध्ये-- राईट बंधूंचे विमानाचे उड्डाण झाल्यानंतर. तेव्हा १९०३ मध्ये राईट बंधू जी गोष्ट समोर दिसत नाही किंवा (त्यावेळी उपलब्ध असलेल्या) शास्त्रीय तत्वांनुसार सिध्द करता येत नाही अशा गोष्टीवर विश्वास ठेवत होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? तीच गोष्ट एडिसनची. त्याला इलेक्ट्रिक बल्ब बनवायच्या प्रयत्नात हजारेक वेळा अपयश आले असे वाचले आहे. तरीही समोर दिसत नसलेला इलेक्ट्रिक बल्ब प्रत्यक्षात उतरू शकेल अशी पक्की खात्री असल्याशिवाय एडिसन हजार वेळा अपयश येऊनही परत एक हजार एकाव्यांदा प्रयत्न करायला गेला असेल असे वाटत नाही. म्हणजे एडिसननेही समोर न दिसणार्‍या आणि त्यावेळी सिध्द न करता येण्याजोग्या गोष्टीवर विश्वास ठेवलाच की नाही? मग राईट बंधू आणि एडिसनलाही अंधश्रध्दाळू का म्हणू नये? समोर दिसणार्‍या आणि सिध्द करता येण्याजोग्याच गोष्टीवर विश्वास ठेवणारी माणसे कधीही काहीही भव्यदिव्य करूच शकणार नाहीत. १९५४ मध्ये रॉजर बॅनिस्टरने सगळ्यात पहिल्यांदा १ मैल अंतर ४ मिनिटांच्या आत पळून दाखवले. त्यापूर्वी माणसाला असे करता येणे अशक्यच आहे असे मानले जात होते. पण रॉजर बॅनिस्टरने ते करून दाखवले. राईट बंधूंच्या विमान उड्डाणाच्या काही दिवस आधी न्यू यॉर्क टाईम्समध्ये 'हवेपेक्षा जड वस्तू उडू शकेल असे वाटणे हा मूर्खपणा आहे' अशा स्वरूपाचे लिहिले गेले होते असे शिव खेरांच्या पुस्तकात वाचले आहे. काय अशक्य आहे हे म्हटले जात होते त्याकडे राईट बंधू, रॉजर बॅनिस्टर यांनी दुर्लक्ष केले. त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 'अमुक एक गोष्ट अशक्य आहे' असे म्हणणे चुकीचे आहे असेही नाही. फक्त जे लोक काहीतरी भव्यदिव्य करतात ते या अशक्य मानल्या जाण्यालाच फाट्यावर मारतात. यावर मला वाटते: Circle of rationality is often enlarged by irrational people. १९०३ मध्ये राईट बंधू, १९५४ मध्ये रॉजर बॅनिस्टर हे त्यावेळी माहित असलेल्या बैठकीनुसार सुरवातीला irrational गणले गेले. पण शेवटी त्यांनीच तसे करणे शक्य आहे हे दाखवून देऊन Circle of rationality वाढविले. एकूणच जे समोर दिसते आणि जे सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवणे म्हणजे अगदी sure-shot road to mediocrity. या मुद्द्याला स्वतःला फार मोठे विज्ञाननिष्ठ समजणार्‍या कोणीही अजूनपर्यंत उत्तर दिलेले नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 01/19/2018 - 18:41 नवीन
Circle of rationality is often enlarged by irrational people
खूप आवडलं हे वाक्य. बाकी गोष्टींशी सहमत आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
र
रामपुरी Sat, 01/20/2018 - 01:02 नवीन
मग राईट बंधू आणि एडिसनलाही अंधश्रध्दाळू का म्हणू नये? कारण यनावालानी त्यांना तसे सर्टीफिकेट दिले नव्हते म्हणून. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
थ
थॉर माणूस Sat, 01/20/2018 - 02:20 नवीन
तुमचे हे श्रद्धा वि. अंधश्रद्धा वगैरे चालूद्या पण कृपया राईट बंधू, एडीसन किंवा इतर वैज्ञानिक वगैरेंना मधे आणू नका. राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. तसे असते तर उंच मनोर्‍यावरून हाताला पंख लावून उड्या मारलेल्या लोकांमधे कुठेतरी त्यांचे नाव असते. उलट ते स्वतः त्यांच्या डिजाईन्सचे मोठे क्रिटीक्स होते. त्यांनी त्यांच्या आधी केलेल्या अनेक प्रयोग आणि थेअरीजचा सुयोग्य वापर करत मॉडेल्स बनवले (पडताळणीसाठी विंड टनेल सुद्धा वापरले). इतके केल्यावरही आधी अनेक वेगवेगळी डिजाईन्स बनवून ग्लायडर्सवर चाचण्या घेतल्या, इतक्या की प्रत्यक्ष विमानाच्या चाचणीची वेळ आली तेव्हा ते ग्लायडर उडवण्याचा सर्वाधीक अनुभव असलेले पायलटस होते. बरं ग्लायडर्स का? कारण त्याआधी ग्लायडर्सचे काही प्रयोग यशस्वी झाले होते आणि टनेलमधे तपासलेली डिजाईन थेट तपासण्यापेक्षा आधी ग्लायडर मोड मधे तपासणे सोयीचे होते. थोडक्यात काय? तर राईट बंधूंनी प्रयोग करेपर्यंत वैज्ञानिक लोक हवेपेक्षा जड असलेली वस्तू उडू शकत नाहीच वगैरे म्हणत नव्हते, पण सिद्धता मांडल्याशिवाय एखादी गोष्ट मान्य करायची नाही असा होरा असल्याने ते छातीठोकपणे हो सुद्धा म्हणत नव्हते इतकंच. तीच गोष्ट एडीसनची, एडीसनच्या पहील्या पेटंटचे नावच "Improvement In Electric Lights" होते. इलेक्ट्रीसीटी वापरून प्रकाश निर्माण करता येऊ शकतो ही थेअरी मांडली गेली होती, काही प्रयोग देखील झाले होते (कार्बन ते प्लॅटीनमपर्यंत पदार्थ वापरले गेले होते) पण ते लोकोपयोगी प्रॉडक्ट बनण्यायोग्य नव्हते. एडीसनने मेहनत घेऊन १२०० तास चालू शकणारा बल्ब (खरेतर फिलामेंट) विकसीत केला त्याबद्दल श्रेय दिले जाते. अर्थात हाच तो बल्ब असे म्हणून लोकांनी त्या एकाच फिलामेंटवर श्रद्धा न ठेवता त्याहून उत्तम डिजाईन्स कशी बनवता येतील त्याकडे लक्ष दिले म्हणुन पुढे टंगस्टन, क्वार्ट्ज, हॅलोजन आणि आता सीएफएल, एलईडी वगैरे प्रवास सुरू आहे. >>>त्यांच्या मते जी गोष्ट समोर दिसते किंवा सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवायचा आणि असे करणे म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोन आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा. माझ्या दृष्टीने हे चुकिचे आहे. कारण वैज्ञानिकाला एखादी गोष्ट दिसली तर तो त्याची सिद्धता शोधण्याचा प्रयत्न करेल किंवा एखाद्या गोष्टीला सैद्धांतीक पद्धतीने सिद्ध करून दाखवण्यात आले, ते खोडणे शक्य नाही हे कळाले, किमान करोलरी उपलब्ध असण्याची शक्यता दिसली कि ती गोष्ट दिसायलाच हवी असा हट्ट करणार नाही. त्यापलीकडचे सगळे तो त्याच्यापुरते अज्ञात आहे असे समजेल. (अज्ञात म्हणजे माहिती नसणे या अर्थाने नव्हे, अनकन्क्लुजीव्ह म्हणा हवे तर) माझ्या मते अंधश्रद्धा = एखाद्या गोष्टीची पुरेशी कारणीमीमांसा आणि योग्य सिद्धता देता येत नसताना ती गोष्ट अमुक असावी/नसावी असा विचार न करता ती गोष्ट अमुक आहेच/नाहीच असा दावा करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डाम्बिस बोका Sat, 01/20/2018 - 06:40 नवीन
तुमचे हे श्रद्धा वि. अंधश्रद्धा वगैरे चालूद्या पण कृपया राईट बंधू, एडीसन किंवा इतर वैज्ञानिक वगैरेंना मधे आणू नका. ..... १०० टक्के पटले उगीच वैद्यानिक उदाहरणे देऊन विषय भलतीकडे जातो. राईट बंधू, एडीसन किंवा इतर वैज्ञानिक यांनी शास्त्रीय प्रयोग केले त्याची गृहीतके मांडली आणी त्याप्रमाणे आपल्या प्रयोगावर विश्वास ठेवला. यात श्रद्धा वि. अंधश्रद्धा काहीपण नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
र
राही Sat, 01/20/2018 - 10:38 नवीन
स्पष्ट, सडेतोड, मुद्देसूद प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
आ
आनन्दा Sat, 01/20/2018 - 11:04 नवीन
थोडीशी गल्लत होतेय, विमानाच्या बाबतीत तुम्ही जे वर्णन केले आहे या प्रयोगाच्या पायऱ्या आहेत.. मूळ ही वैज्ञानिक धारणा की हवेपेक्षा अधिक जड वस्तू हवेत उडू शकत नाही, त्याला काही थिअरी पण होती. पण ती खोटी आहे असे राईट बंधू काही कारणाने मानत होते.. म्हणून त्यांनी प्रयत्न केले. याला समांतर उदाहरण आता देता येईल का माहीत नाही.. कदाचित मेंदू प्रत्यारोपण होऊ शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस Mon, 01/22/2018 - 19:54 नवीन
>>>पण ती खोटी आहे असे राईट बंधू काही कारणाने मानत होते नाही, हवेपेक्षा जड वस्तू हवेत उडू (की तरंगू? मराठीकरण नीट जमंत नाहीये शब्दाचं) शकत नाही ही प्रूव्हन थिअरी आहे. राईट बंधू किंवा त्यांच्याही आधी ज्यांनी ग्लायडर्स बनवले ते सर्व लोक या थिअरीला खोटे म्हणत नव्हते तर नवी थिअरी मांडत होते की पुरेशा मदतीने हवेपेक्षा जड वस्तू हवेत उडू शकते. अर्थात हा त्यांचा हायपोथेसिस होता (मारवाजींचा प्रतिसाद हे छान सांगतो) आणि तो सिद्ध करण्यासाठी ते धडपडत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 01/23/2018 - 04:54 नवीन
त्या हायपोथीसिसवर त्यांची श्रद्धा होती असे म्हटले तर? गॅरी भाऊ आणि मी एव्हढेच सांगतोय की प्रचलित समजुती झुगारून स्वतःच्या अनुभव/हायपोथीसिस वर श्रद्धा ठेवून काम करणार्यांनीच विज्ञानाचा परीघ विस्ताराला आहे.. असे होते हे प्रथम सिद्ध झाले, का होते हे मागाहून आले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
आ
आनन्दा Tue, 01/23/2018 - 04:55 नवीन
बाकी तुमच्या अन्य प्रतिक्रियांशी सहमत आहे, खाली लिहिलेल्या.. (परत लिहायला जात नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ग
गॅरी ट्रुमन Tue, 01/23/2018 - 05:01 नवीन
जाऊ द्या हो आनन्दा. त्यांना समजायचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 11:08 नवीन
उलट ते स्वतः त्यांच्या डिजाईन्सचे मोठे क्रिटीक्स होते.
मंजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 11:17 नवीन
राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती.
राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच नाही अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच वा उडणारच नाही अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. ------------- हे तिन्ही सत्य, शेवटी काहीही असो कसलीच श्रद्धा नव्हती? ========================= प्रतिसाद तुमच्या विधानाच्या अनुषंगानं असला तरी जनरल आहे. तुम्हालाच असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
आ
आनन्दा Sat, 01/20/2018 - 13:16 नवीन
बाकी माहीत नाही, पण माणूस उडू शकतो, यावर राईट बंधूंची ठाम श्रद्धा होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 14:43 नवीन
नि या आधारे यनावालांचे मते त्यांचा मेंदू काम न करू शकणारा होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 14:41 नवीन
राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती.
मग काय होतं? ज्ञान, माहीती, विश्वास, खात्री, आशा? अगोदर काही भूतकालीन दाखला नसल्यामुळे, कशाच्या बळावर/आधारावर? -------------- यांच्यापैकी काहीच नसताना ते प्रयोग करत होते का? आपण सगळे सर्व गोष्टि अशाच करतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 15:34 नवीन
गॅरी
१९०३ मध्ये राईट बंधू, १९५४ मध्ये रॉजर बॅनिस्टर हे त्यावेळी माहित असलेल्या बैठकीनुसार सुरवातीला irrational गणले गेले. पण शेवटी त्यांनीच तसे करणे शक्य आहे हे दाखवून देऊन Circle of rationality वाढविले.
थॉर
माझ्या दृष्टीने हे चुकिचे आहे. कारण वैज्ञानिकाला एखादी गोष्ट दिसली तर तो त्याची सिद्धता शोधण्याचा प्रयत्न करेल किंवा एखाद्या गोष्टीला सैद्धांतीक पद्धतीने सिद्ध करून दाखवण्यात आले, ते खोडणे शक्य नाही हे कळाले, किमान करोलरी उपलब्ध असण्याची शक्यता दिसली कि ती गोष्ट दिसायलाच हवी असा हट्ट करणार नाही. त्यापलीकडचे सगळे तो त्याच्यापुरते अज्ञात आहे असे समजेल. (अज्ञात म्हणजे माहिती नसणे या अर्थाने नव्हे, अनकन्क्लुजीव्ह म्हणा हवे तर)
================ आपण सगळे शून्य वापरतो. बाकी सगळ्या पूर्ण संख्यांनी भागणे शक्य आहे नि शून्यने भागणे अशक्यच नव्हे तर अव्याख्यित आहे. आपणच काय सगळेच शास्त्रज्ञ हे करतात. भागाकाराला फक्त शून्यचा अपवाद असायचं कारणच नाही. आणि खरं तर ज्या आकड्याने वा संकल्पनेने भागाकार हि संकल्पना अर्थहिन ठरते तोच आकडा वा संकल्पना वापरत गणीत पुढे दामटत ठेवायचे किति मोठे सर्कल ऑफ इरॅशनॅलिटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
अ
अमितदादा Sat, 01/20/2018 - 16:09 नवीन
प्रतिसाद पटला... उत्तम उत्तर दिलेत.
तुमचे हे श्रद्धा वि. अंधश्रद्धा वगैरे चालूद्या पण कृपया राईट बंधू, एडीसन किंवा इतर वैज्ञानिक वगैरेंना मधे आणू नका.
+11
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
ग
गब्रिएल Sat, 01/20/2018 - 16:26 नवीन
अंधश्रद्धा = एखाद्या गोष्टीची पुरेशी कारणीमीमांसा आणि योग्य सिद्धता देता येत नसताना ती गोष्ट अमुक असावी/नसावी असा विचार न करता ती गोष्ट अमुक आहेच/नाहीच असा दावा करणे. हायला, यनावाला आसंच करत आसतात ना न्हेमी ! काय भारी चप्राक लगावली तेन्ला तुमी, भाऊसायेब ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
उ
उपाशी बोका Sat, 01/20/2018 - 06:02 नवीन
>>> त्यांच्या मते जी गोष्ट समोर दिसते किंवा सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवायचा आणि असे करणे म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोन आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा. >>> मुळात तुम्ही हे जे विधान करताय तेच बरोबर नाही. शास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे काय यासाठी कृपया पुढील व्हिडिओ बघावा. शास्त्रीय दृष्टीकोनात एखादी गोष्ट सिध्द करता आली तरीही ती थियरी अंतिम सत्य मानली जात नाही. Is the theory right? No, it is simply not proved wrong. थोडक्यात काय तर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि ताप कमी होण्यासाठी पेनिसिलीन देतो असे तो म्हणाला तर ती झाली श्रध्दा आणि कुणी म्हणाला की एका बोटात पाचूची अंगठी घातलीस की तुझा ताप बरा होईल, तर ती झाली अंधश्रध्दा. आता यात फरक काय? तर फरक इतकाच की दुसर्‍या कुठल्याही डॉक्टरने तुम्हाला पेनिसिलीन दिले तरी ताप कमी होतो किंवा डॉक्टरने दुसर्‍या कुणाला पेनिसिलीन दिले तर त्याचा पण ताप कमी होतो आणि हे आपल्याला वारंवार प्रयोग करून consistently सिद्ध करता येते. हे स्वतः तपासून बघितले नाही तरी याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता म्हणून ती झाली श्रध्दा. याउलट अंगठी घालून तुमचा ताप कमी होईलच याची काही खात्री नाही, अंगठी घालून दुसर्‍या कुणाचा तापही कमी होईल याची पण काही खात्री नाही आणि हे आपल्याला वारंवार प्रयोग करूनपण consistently सिद्ध करता येणार नाही, म्हणून ही झाली अंधश्रद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
र
राही Sat, 01/20/2018 - 10:42 नवीन
मलासुद्धा 'त्यांच्या मते....आणि बाकी सगळ्या अंधश्रद्धा' या गृहीतकातच त्रुटी जाणवली. आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
ग
गॅरी ट्रुमन Sun, 01/21/2018 - 17:34 नवीन
मलासुद्धा 'त्यांच्या मते....आणि बाकी सगळ्या अंधश्रद्धा' या गृहीतकातच त्रुटी जाणवली.
मिपावरील एक आघाडीचे विज्ञाननिष्ठ यनावालांनी या प्रतिसादात श्रध्दा कशाला म्हणावे याची एक पाच कलमी यादी दिली आहे.आणि डोळस श्रध्दा असे काही नसतेच आणि सगळ्या श्रध्दा या अंधश्रध्दाच असतात नाही का? म्हणजे हीच पाचकलमी यादी अंधश्रध्देलाही लागू पडेल. वर काही अती विज्ञानवादी लोकांचे मत दिले आहे: "जी गोष्ट दिसते किंवा सिध्द करता येते तीच सत्य मानायची. बाकी सगळ्या अंधश्रध्दा". या मताचाच यनावालांनी एका अर्थी विस्तार केला आहे. म्हणजे "त्यांच्या मते....आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा" या गृहितकातच त्रुटी असेल तर ती त्रुटी यनावालांच्या पाचकलमी यादीतही नाही का? तरीही माझ्यासारख्यांनी जे मत मांडले आहे त्याच्याशी असहमती आणि यनावालासारख्यांनी जे मत मांडले आहे त्याच्याशी इन जनरल सहमती..आहे की नाही मज्जा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ग
गॅरी ट्रुमन Sat, 01/20/2018 - 12:20 नवीन
त्यांच्या मते जी गोष्ट समोर दिसते किंवा सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवायचा आणि असे करणे म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोन आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा. >>> मुळात तुम्ही हे जे विधान करताय तेच बरोबर नाही.
नक्की काय लिहिले आहे ते वाचले आहेत का? मी कोणतेच विधान करत नाहीये. स्वतःला फार मोठा शास्त्रीय दृष्टीकोन आहे असे म्हणणार्‍यांचे मत काय आहे हे लिहिले आहे. I am accountable for what I said, not for what others interpreted.
शास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे काय यासाठी कृपया पुढील व्हिडिओ बघावा.
व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद. पण असले व्हिडिओ बघण्यापेक्षा माझ्या आवडीचे अनेक विषय आहेत त्यातले व्हिडिओ बघण्यात मला अधिक रस आहे.
फरक इतकाच की दुसर्‍या कुठल्याही डॉक्टरने तुम्हाला पेनिसिलीन दिले तरी ताप कमी होतो किंवा डॉक्टरने दुसर्‍या कुणाला पेनिसिलीन दिले तर त्याचा पण ताप कमी होतो आणि हे आपल्याला वारंवार प्रयोग करून consistently सिद्ध करता येते. हे स्वतः तपासून बघितले नाही तरी याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता म्हणून ती झाली श्रध्दा.
नक्की? पेनिसिलीन देऊन सगळ्यांचा ताप कमी होतो (किंवा अन्य कुठल्या रोगावरचे दुसरे कुठले औषध देऊन तो रोग) याची खात्री आहे तुम्हाला? मनाची उभारी, काही झाले तरी मी या आजारातून बाहेर पडणारच वगैरे वाटणे या गोष्टींचा काहीच वाटा नसतो आजारी माणूस बरा होण्यात? एकूणच अती विज्ञानवादी लोक हा दुसरा अ‍ॅस्पेक्ट पूर्णपणे दुर्लक्षित करतात. नुसत्या अंगठीमुळे (पक्षी मनाच्या उभारीमुळे--- ती कोणत्याही कारणाने येत असू दे-- अगदी अंगठी घालून आली तरी) माणूस बरा होतो असे कोणी म्हणायला लागले तर ते चुकीचेच आहे. पण मनाच्या उभारीला कोणतेही स्थान न देणे हे पण तितकेच चुकीचे आहे. अती विज्ञानवादी लोक याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. अती विज्ञानवादी लोकांशी फार पटत नाही त्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे. अशा अती विज्ञानवादी लोकांचा 'इतर लोक कसे मूर्ख' असा हेटाळणीचा सूर असतो तो पण जाम डोक्यात जातो. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 14:52 नवीन
शास्त्रीय दृष्टीकोनात एखादी गोष्ट सिध्द करता आली तरीही ती थियरी अंतिम सत्य मानली जात नाही.
सत्याचे इंटेरिम नि फायनल असे दोन प्रकारे कधीपासून झाले म्हणे? दिलेल्या संदर्भात, दिलेल्या गृहितकांखाली दिलेल्या हायपोथेसिस बद्दल कायतरी एकच सत्य असेल ना? आज माझं नाव अरुण आहे, उद्या बदलेल, इ इ पण "आज माझं अरुण आहे हे एक तात्पुरतं सत्य आहे." २० जानेवारीला सव्वासात माझं नाव काय होतं ही भूमिका तुम्ही कधिही बदलू शकता, वर ती तुम्ही कधीच फायनल म्हणणार नाही, आताच्या ज्ञानाप्रमाणे नाव तरूण! संदर्भ तोच, गृहितके तीच, बाब तीच आणि वेगवेगळ्या वेळी तुम्ही म्हणाल ती सत्ये (पुढे बदलेपर्यंत अंतिम) मानायची? काय डिक्टेटर्शीप आहे का? ================== जे त्याच्या अंतिम स्वरुपात मांडलेलं नसतं ते सत्य नसतंच म्हणून विज्ञानाचा नि सत्याचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 01/25/2018 - 09:35 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ज
जानु Fri, 01/19/2018 - 17:18 नवीन
आदिमानवाने टोळी बनवितांना हाच आधार धरला होता की, आपण एकमेकांना मदत करु आणि त्यात आपला फायदा होईल. त्यात काहीही सिध्द करण्यासारखे अथवा विश्वास ठेवण्यासारखे नव्हते. मानवाने स्वतःत केलेला हा बदल आज त्याला या पृथ्वीवरील सर्वोत्तम प्राण्यात बदलवुन गेलाय. ईतर कोणत्याही प्राण्याला हे करणे शक्य झाले नाही. याला आशा, विश्वास, श्रध्दा काय नाव देणार? सत्य आणि असत्य यामध्ये बरेच काही असते. आपल्याला आज ज्या भावना स्पर्श करतात त्यांचा अनुभव करुन आपण ना सत्यात जगु शकत आणि ना असत्यात. हे मिथ्या जगच सत्य मानावे ही मायाच नाही का?
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 01/20/2018 - 04:32 नवीन
सायंटीफीक थिंकींग चा शास्त्रीय दृष्ट्या एखादा शोध समस्या हाताळण्याचा हा मार्ग एकदमच बेसीक असला तरी तो पुन्हा चर्चेत आणणे अगत्याचे वाटते. दुसर म्हणजे श्रद्धा विचाराची सायकल शास्त्रीय विचाराच्या सायकल शेजारी ठेवणे ही फार उपयोगाचे ठरेल असे वाटते. तुर्तास ही दोन चित्रे शास्त्रीय विचाराची सायकल कशी चालते हे समजण्यास उपयुक्त असावीत. Image removed. Image removed. आता या शास्त्रीय रीती मध्ये हायपोथेसीस टेस्ट करणे हायपोथेसीस रीजेक्ट करणे हायपोथेसीस क्रीटीसीजम साठी ओपन ठेवणे जुन्या हायपोथेसीस ना नव्याने आव्हान देणे हे सर्व शास्त्रीय रीती चा मुलभुत भाग आहे याच्या तुलनेत जेव्हा अ-शास्त्रीय श्रद्धेय मंडळी आदेश देतात तथ्ये मांडतात त्यांची एक सायकल नीट बनवुन मांडणे गरजेचे आहे असे वाटते. म्हणजे वरील प्रत्येक स्टेप ला उलट करणे ते करण्याचा तुर्तास कंटाळा ( बाकी त्या हायपोथेसीस ना कोणी श्रद्धा समजत असेल तर ............... असो
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 01/20/2018 - 04:53 नवीन
थोडासा वेगळा विचार करायचा झाला तर आपल्या हे लक्षात येईल की पूर्वीच्या काळी जो काही मतामतांचा प्रसार वगैरे झाला तो याच कारणामुळे झाला.. फक्त एकच फरक आहे, की या मार्गाने गेल्यावर येणारे अनुभव अन्य कोणाला दाखवता येत नाहीत, त्यामुळे त्यावर टीका होते, पण तेव्हढा भाग सोडला तर अध्यात्ममताचा ज्याला हल्ली सरसकटपणे अंधश्रद्धा म्हटले जाते, त्याचा ही प्रसार वादचर्चा, प्रयोग (वैयक्तिक) या मार्गानेच झाला आहे. विवेकानंद हे त्याचे सांप्रतकालीन उदाहरण मानण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
र
राही Sat, 01/20/2018 - 10:44 नवीन
तर्कसुसंगति आहे आणि ती आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 11:37 नवीन
https://science.howstuffworks.com/innovation/scientific-experiments/scientific-method10.htm ========== यनावालासारख्या विज्ञानखोरांनी विज्ञानाच्या नावानं अपप्रचार करण्यापूर्वि या मेथडच्या मर्यादा जाणाव्यात. देव मानणारे लोक निर्बुद्ध असतात, त्यांचे मेंदू काम करत नाहीत इ इ विज्ञानही म्हणत नाही. या पेजवर काय लिहिलं आहे पहा.
Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity.
ही या फ्रेमवर्कची मर्यादा आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या अधिकृत फ्रेमवर्क दाखवलेला प्रांजळपणा (आणि सत्यनिष्ठा) स्वतःस वैज्ञानिक दृष्टीकोणाचे म्हणवणारांनी देखील दाखवावा. इथे या फ्रेमवर्कचं विस्त्रूत वर्णन आहे. गरजूंनी ते वाचून घ्यावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
थ
थॉर माणूस Mon, 01/22/2018 - 20:12 नवीन
>>>शास्त्रज्ञांनी त्यांच्या अधिकृत फ्रेमवर्क दाखवलेला प्रांजळपणा (आणि सत्यनिष्ठा) nailed it मुळात अनेक लोकांना असे वाटते की अश्रद्ध/नास्तिक म्हणजे विज्ञानवादी असणारच. पण तसे नाही, जर एखादी व्यक्ती स्वतःला वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली म्हणवत असेल पण अनप्रूव्हन गोष्टींवर बोलताना आहे'च'/नाही'च' वर अडून बसला तर माझ्या दृष्टीने तरी त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. आस्तिक वि. नास्तिक वाद देखील देव आहे'च' विरूद्ध नाही'च' मधे अडकत असल्याने ते या दृष्टीकोनाची दोन टोके ठरतात (रादर ते एकाच टोकावर आहेत फक्त विरूद्ध दिशांना तोंड करून :) ). या उलट वैज्ञानिक हे या रेषेच्या मध्याजवळ असतात, त्यांचा प्रवास हा दिलेल्या सिद्धांतांच्या सिद्धतेवर ठरतो. म्हणूनच उद्या कुणी देवाचे अस्तित्व सप्रमाण सिद्ध केले तर ते मान्य करणे वैज्ञानिकांना जड जाणार नाही (नास्तिकांना जाईल), तर देव नाही हे सिद्ध झाले तर ते देखील मान्य करणे तितकेच सोपे असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रकाश घाटपांडे Sat, 01/20/2018 - 05:08 नवीन
माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. याला व्याख्येत बंदिस्त करणे अवघड आहे. आपण त्याला मनाच्या धारणा म्हणु यात. पण ती टिकून असण्याचे कारण त्याची माणसाच्या सर्वायवल साठी असलेली उपयुक्तता. केवळ अगतिकता संस्कार अज्ञान ही कारणे अंनिसत आम्ही द्यायचो पण मला ती पुरेशी वाटत नाहीत. त्याचे जैविक कारण देखील आहे.मेंदुच्या मनात या पुस्तकात लेखक सुबोध जावडेकर अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान या प्रकरणात म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!" दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 01/20/2018 - 05:14 नवीन
संपूर्ण प्रकरण ज्यांना वाचायचे आहे त्यांनी इथे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
आ
आनन्दा Sat, 01/20/2018 - 11:20 नवीन
श्रद्धा अंध असते हे वादासाठी मान्य केले तरी काही प्रश्न शिल्लक राहतात.. उदा.. एखाद्याने पैशाचा पाऊस पडतो असे मान्य करण्यापूर्वी हे पैसे नेमके कुठून येतात, पाऊस पाडणारा छापतो, टाकसळीतून येणार की कोणाच्या तिजोरीतून येणार, आणि येणार तर त्याला कळणार नाही का, त्याला कळले तर तो परत नेणार नाही का? असे प्रश्न तरी किमान विचारणे आवश्यक आहे.. यातले काहीच विचारले नसेल तर ती अंध झाली, या प्रश्नांची समाधानकारक उत्तर घेऊन ठेवली तर मग ती श्रद्धा म्हणता येईल, असे माझे मत.. रच्याकने मला एक प्रश्न दीर्घकाळ पडला आहे.. समजा साताऱ्याहून कोल्हापूरला जायला तुम्ही बस स्टॉप वर उभे आहात, खूप काळ झाला पण गाडीच येत नाहीये, अखेरीस तुम्ही महालक्ष्मीला नवस बोलत की मला आता गाडी मिळाली तर मी तुझ्या दर्शनाला येईन. 5 मिनिटात तुम्हाला पुणे कोल्हापूर गाडी मिळते.. आता मला सांगा ही गाडी तुम्हाला नवसाने मिळाली की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 11:41 नवीन
एखाद्याने पैशाचा पाऊस पडतो असे मान्य करण्यापूर्वी
विज्ञानाच्याच म्हणण्याप्रमाणे पृथ्वीवर सोन्याचा, हिर्‍यांचा आणि अत्यंत किचकट अशा सजीवांचा पाऊस पडला आहे तर पैसे झाड कि पत्ती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
पिलीयन रायडर Sat, 01/20/2018 - 16:33 नवीन
सोने, हिरे, सजीव निसर्गतः बनतात. पैशाचा नैसर्गिक कारखाना काही अजून पहाण्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sun, 01/21/2018 - 08:04 नवीन
पण त्याच्यामुळं भविष्यात पडण्याची शक्यता शून्य होत नाही. =============== आपल्याच विश्वात पैशाच्या पावसापेक्षा गुगोल पटींनी असंभव अशा गुगोलप्लेक्स घटना होत असतात. आणि अशी अनंत विश्वे आहेत. कदाचित आरबीआयच्या नोटांचे आणि नाण्यांचे पाउस आत्ताच कुठे चालू असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 11:46 नवीन
आता मला सांगा ही गाडी तुम्हाला नवसाने मिळाली की नाही?
शास्त्रज्ञ आणि सामान्य लोक यांना एकसमान वागणूक मिळायला हवी. व्हायरसपेक्षा ट्रीलियनपट किचकट बॅक्टेरिया बिनानवसाचे अगोदर बनू शकतात तर बस नवसाने का येऊ शकत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sat, 01/20/2018 - 12:11 नवीन
मी नवस बोलून 5 मिनिटेच झालीत, आणि बस पुण्याहून निघून 2 तास. अश्या परिस्थितीत ते बस त्या वेळेला तिथे येणे हा माझ्या नवसाचा परिणाम मानावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 12:24 नवीन
तुम्ही कशालाही नवसाचा परिणाम माना. तुमचं असं मानणं अन्य लोकांच्या अन्य मानण्यांपेक्षा दर्जात्मक दृष्ट्या फार काही खालचं नसेल. ================ नवस म्हणजे तुमच्या मनातला विचार. विचार मेंदूत उत्पन्न होतात. ते विद्युतप्रवाहाच्या रुपात आहेत. असं मानलं तर मेंदूच्या बाहेर जे सारे विद्युतप्रवाह वाहतात ते देखील कोण्या एका प्रकारचे विचारच झाले. ते विचार कोण करतंय हे सोडा. आणि विद्युअतप्रभारित पार्टिकल्सची जगात उमदा रेलचेल आहे. तेव्हा झालं असेल काहीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
र
राही Sat, 01/20/2018 - 12:22 नवीन
पण कित्येकदा आत्यंतिक श्रद्धेने साद घालूनही काम होत नाही, तेव्हा काय म्हणावे? श्रद्धा कमी पडली की मुळात ती एक बोलाफुलाला गाठ होती? यावरून मला काही वर्षांपूर्वी काही ठिकाणी पसरलेला एक समज आठवतो. त्या दोन चार वर्षांच्या काळात शिरडीच्या रस्त्यावर बरेच जीवघेणे अपघात झाले. त्यातले बहुतेक अपघात नवस फेडायला निघालेल्यांच्या वाहनांना झाले. म्हणजे कुणी नवी गाडी घेतली तर शिरडीला गाडीचा पहिला प्रवास होऊ दे, म्हणून निघाले होते, कोणी लग्न ठरले म्हणून अथवा लग्न झाल्यावर जोडप्याने निघाले होते, कुणाला 'नवसासायासाने' मूल झाले होते त्याला साईंच्या चरणांवर घालायचे होते तर वाटेतच अपघात झाला आणि ते शिरडीला पोचू शकले नाहीत. तेव्हा असे म्हटले गेले की या लोकांची पापेच जबरदस्त होती. साईं तरी कितीवेळा आणि किती जणांना वाचवणार? पापाचा पैसा असाच ताप देतो वगैरे. (ही सांगोवांगीची गोष्ट नाही.) याला काय म्हणावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 15:27 नवीन
माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे.
माझ्यामते विज्ञान हे मूळातच अंधविज्ञान असते. पुढचं स्पष्तीकरण तेच मानलं तरी चालेल. पण फॅशनची इतकी चलती आहे कि अंधविज्ञान हा शब्द कॉइनच झालेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
श
श्रीगुरुजी Sun, 01/21/2018 - 16:12 नवीन
माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. याला व्याख्येत बंदिस्त करणे अवघड आहे. श्रद्धा ही श्रद्धा असते. श्रद्धेला अंध म्हणणे किंवा डोळस म्हणणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एकाची डोळस श्रद्धा ही दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. मी आधी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रद्धापूर्वक नामस्मरण करणे हे दुसर्‍या एखाद्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. त्यामुळे श्रद्धेला अंध किंवा डोळस अशी परिमाणे लागू होत नाहीत. लेखक सुबोध जावडेकर अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान या प्रकरणात म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!" लाखो-कोट्यावधी वर्षांपूर्वी नक्की काय झाले हे कोणालाच या क्षणी माहिती नाही. त्यामुळे काहीजण आपल्या स्वभावानुसार व कलानुसार कल्पनाशक्ती लढवून आपल्याला हवे तसे एक काल्पनिक चित्र उभे करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
N
NiluMP Tue, 01/23/2018 - 14:04 नवीन
लाखो-कोट्यावधी वर्षांपूर्वी डायनासोर होते तेव्हा माणुस होता का? की देवला डायनासोर -डायनासोर खेळुन कंटाळा आला मग त्याने माणसे बनवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
राघव Sat, 01/20/2018 - 06:58 नवीन
गंभीर विचार करायचा झाल्यास, हे एक न संपणारं वर्तूळ आहे. अंधश्रद्धा हा शब्दच खरंतर चूक आहे. श्रद्धा ही मुळातच अंध असते, त्या शब्दाच्या अर्थात हे अंतर्भूत आहे. ती डोळस तेव्हा होते, जेव्हा ती सिद्ध होते. जे ती श्रद्धा बरोबर होती हे सिद्ध करतात, त्यांच्या बोलण्यावर/अभ्यासावर/लिहिण्यावर किंवा त्यांच्या बद्दल कुणी दुसर्‍यानं लिहिलेल्या/सांगीतलेल्या गोष्टींवर, आपण विश्वास ठेवतो. [आणि त्यांनी ती खरोखरच सिद्ध केल्याची श्रद्धा ठेवतो.] जसं - . पाण्याचा रेणू असतो हे कुणीतरी प्रयोग करून सिद्ध केलं. . त्या थिअरीवर आपला विश्वास [आणि त्यांनी खरोखरच हे केलं असेल ही श्रद्धा.] . पुढेमागे कुणाला त्यात काही पटलं नाही, तर त्या व्यक्तीला स्वतःला ते प्रयोग करावे लागतील आणि बरोबर्/चूक सिद्ध करावं लागेल. . मग लोक त्याच्यावरसुद्धा विश्वास ठेवतील [आणि त्यानं ते खरोखरच सिद्ध केलं होते अशी श्रद्धा ठेवतील.] . यानंतर परत तेच वर्तूळ पुढे सुरू राहणार. . . खरंतर सरळ आहे समजून घ्यायला. पण मग एवढी आदळाआपट का होते? कारण - - ज्याला पटत नाही त्यानं प्रयोग करून स्वतः ती श्रद्धा बरोबर/चूक सिद्ध करण्याचा मार्ग निवडला नाही. - फक्त टिका करत राहण्यानं ती श्रद्धा बरोबर/चूक हे कसं सिद्ध होणार? - जो सांगतो त्याचा अधिकार सिद्ध झाल्याशिवाय कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार? जसं - एखाद्या व्यक्तीला विषमज्वर आहे हे मी म्हटलं तर वेगळं होईल आणि एखाद्या डॉक्टरनं म्हटलं तर वेगळं होईल. - आता हा अधिकार प्रत्येक क्षेत्रामधे वेगवेगळ्या पद्धतीनं प्राप्त होणार, त्यासाठी वेगवेगळा अभ्यास लागणार. सगळ्यांना एकच प्रमाण लावून चालणं योग्य नाही. - त्या प्रमाणावर सिद्ध झालेल्या माणसाच्या सांगण्यावर/मांडण्यावर, लोक तो अधिकारी म्हणून विश्वास ठेवतील [आणि त्यानं ते खरोखरंच सिद्ध केलेलं आहे ही श्रद्धा ठेवतील.] राघव
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 01/20/2018 - 08:03 नवीन
यनांच्या धागा लेख चर्चेच्या वेळी श्रद्धा हि संकल्पना हाताळताना 'निष्ठा' शब्दा बद्दलही असाच स्वतंत्र धागा काढून उहापोह करणे गरजेचे असावे (तुर्तास तरी वेळे अभावी असा धागा काढणे शक्य होणार नाही पण नंतर विचार नक्कीच आहे) . श्रद्धे बद्दल विचार विमर्श करताना श्रद्धेचे प्रयोजन हा ही मुद्दा असवा असे वाटते, तिसरे नरेटीव्हज (कथा सुत्रे आणि मिथकां ) च्या प्रभावाकडे दुर्लक्ष होत रहाते. एक उदाहरण द्यायचे झाले तर कोकिळा व्रताची मिपा कर थट्टा करु शकले कारण ततसंबंधी कथासूत्र /मिथकाचा नरेटीव्हचा मनावर प्रभाव नसणे. पण प्रभाव असेल तर भावना दुखावल्याची तक्रार झाली असती. बाकी माझे त्या धाग्यावरील लेखन अपडेटे मांडावे लागेल पण तुर्तास अधीचे सोईसाठी
तांत्रिक दृष्ट्या विश्वास आणि श्रद्धा यात अंशतः फरक आहे, सहसा विश्वास ही श्रद्धेची पहिली पायरी असावी, एखाद्या गोष्टीवर / व्यक्तीवर मी विश्वास ठेवतो म्हणजे श्रद्धे पर्यंत पोहोचलो आहे असे निश्चित सांगता येत नाही. श्रद्धेच्या पायरीला पोहोचलो नसेन तर परिस्थितीनुरुप विश्वास बदलू शकतात, श्रद्धा परिस्थितीनुरूप बदलणे अशक्य नाही पण अवघड असते. विश्वास शब्दाचे श्रद्धेत परिवर्तन होणासाठी निष्ष्ठा, कर्तव्य , भक्तीभाव या तीन पैकी एखादा तरी अ‍ॅट्रीब्यूट कमी अधीक प्रमाणात जरूर असावी. कर्तव्य भाव निष्ठा अथवा श्रद्धा न बदलताही बदलता येऊ शकत असावा. पण मला वाटते निष्ठा सुद्धा परिस्थिती आणि स्वभावानुरुप बदलू शकतात, पण निष्ठा बदलल्या शिवाय श्रद्धा बदलणे कठीण असावे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 01/20/2018 - 08:12 नवीन
अलिकडे संजय सोनवणींनी त्यांच्या या ब्लॉगपोस्ट मधून आणि https://youtu.be/YGplNFWnKeQ आणि https://youtu.be/3VhVbzT4 या दोन युट्यूब मधून कोरेगाव भीमा असो वा वढू बुद्रुक देव धर्माचा प्रत्यक्ष संबध नसताना ही मिथके आणि श्रद्धा कशा आकारास येतत आणि मिथकांचे श्रद्धेत परिवर्तन होऊन होणार्‍य गोंधळावरचे भाष्य उल्लेखनीय असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा