तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?
मला बरेच दिवस हा धागा काढायचा होताच, पण यनावालांच्या धाग्यावर उठणारी राळ बघून प्रकर्षाने काढावासा वाटला..
तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?
माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अजून सिद्ध व्हायची आहे, पण तरीही मला वाटते की ते अस्तित्वात आहे,
मी एक उदाहरण देतो...
डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते..
त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास..
आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास..
अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो.
व्यावहारिक जीवनात पण तसेच, पण सर्वसामान्यपणे श्रद्धा ही बेसिक चिकित्सा करून ठेवली जाते, जेव्हा बेसिक चिकित्सा पण केली जात नाही तेव्हा ती होते अंधश्रद्धा ..
उदाहरणार्थ - माझ्याकडे एक माणूस येतो, तू मला 10लाख दे, मीएक वर्षात 20 लाख करून देतो असे सांगतो आणि मी विश्वास ठेवतो, याला म्हणावे अंधश्रद्धा.
अध्यात्मातील अंधश्रद्धामबद्दल बरेच बोलले गेले आहे, त्यामुळे परत बोलत नाही
तुम्हाला काय वाटते?
मी त्यामुळे एका शुभांगी नावाच्या मैत्रिणीला सदांगी म्हणतो. :)=)) =)) =)) थोडक्यात काय, इकडून तिकडून एकेरी "फॅड"च करायचे आणि आमचेच्च फॅड अंतिम सत्य आहे अशी दवंडी पिटत रहायचे ! :) ;)बाकी जन्मदिन,नवं वर्ष शुभेच्छा दैताना त्या शतप्रतिशत खर्या ठरतीलच असे नाही हे माहीत असूनही मिपा सुधारक त्या का देतात हेच कळत नाही.मिपासुधारक या उपहासात्मक संबोधनातुन तुम्हाला जे विज्ञानवादी विचारसरणीचे लोक असतात ते अशा शुभेच्छा का देतात असा कदाचित प्रश्न पडला असावा असे गृहीद धरुन उत्तर देतो. एखादा विज्ञानवादी व्यक्ती जेव्हा त्याच्या मित्राला शुभेच्छा देतो की "तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार " तेव्हा त्याला हे निश्च्चीत माहीत असते की / त्याने हे गृहीतच धरलेले असते की आपली इच्छा पुर्ण होऊ ही शकते किंवा होणार नाही म्हणजे त्याची त्याचा मित्र १००० वर्षे जगावा ही इच्छा १- त्याचा मित्र १००० वर्षे जगु शकत नाही. ( अनेकोनेक संभाव्य कारणांनी तो मरु शकतो ) २- त्याच मित्र १००० वर्षे जगु ही शकतो. ( फार कमी कारणे कदाचित असु शकतील तितकी शरीरशास्त्रात मेडीकल मध्ये प्रगती वगैरे होऊन दिर्घायुष्य लाभु शकते ) पण इन एनी केस तो वरील दोन ही गृहीतके वरील दोन ही पर्याय शक्य आहेत हे जाणुन वरील शुभेच्छा देत असतो. यात ही शुभ इच्छा म्हणजे डिझायर आहे हा दावा किंवा क्लेम नाही. एक दावा आणी एक इच्छा यात खुप मोठा फरक आहे. असे वाटणे असे व्हावे असे झाल्यास आनंद होईल हे तो यातुन व्यक्त करत असतो असे होइलच क्र, १ चा च पर्याय निश्चीत आहे वा क्र २ चा च निश्चीत आहे अशा ठाम निष्कर्षावर जर तो पोहोचला तर शुभ इच्छा देण्याचा प्रश्न च उरणार नाही. मग तो दावा करेल उदाहरणार्थ एखादा बाबा जेव्हा त्याच्याकडे एखाद्या गंभीर आजारी व्यक्तीला नेण्यात येते तेव्हा तो जी भाषा करतो विधान करतो त्याचे स्वरुप दाव्याचे असते. "जा बच्चा तु ठीक हो जायेगा " ( हाताची वरद हस्त पोझिशन वगैरे करुन ) यात हा दावा आहे की तु बरा होणारच. यात इच्छा नाही ( द मोमेंट इच्छा विधानात येताच अनिश्चितता येते बरा होइल किंवा होणार नाही जो पर्यंत दावा आहे तो पर्यंत इच्छेला प्रवेशच नाही ) बाबा विधानांत दावा असतो इच्छा नसते विज्ञानवादी केवळ प्रेम प्रेरीत होऊन मित्राच्या दिर्घायुष्याची इच्छा मात्र करतो दावा नाही. विज्ञानवादी ने असे करणे त्याची सत्याप्रतीची नम्रता व्यक्त करते ज्या सत्याच्या निष्कर्षा पर्यंत तो प्रयोगाने आलेला नाही त्या संदर्भात तो उद्धट दावा करत नाही मात्र त्याचे प्रेम त्याला आशा व्यक्त करण्यास जरुर प्रेरीत करते. याउलट उद्धट बाबा जा तु अच्छा हो जायेगा असे म्हणतो तेव्हा तो मला माहीतच आहे की तु चांगला होशीलच असा दावा करतो. आता बाबा ने दावा करण्यात व वैज्ञानिकाने दावा करण्यात काय फरक असतो हे आपण जाणताच. माझ्या वरील प्रतिसादातुन जे मला म्हणावयाचे आहे ते तुम्हास समजावे अशी "इच्छा" मी व्यक्त करतो. ते तुम्हाला समजणारच नाही किंवा ते तुम्हाला समजेलच असा माझा कुठल्याही प्रकारे " दावा " नाही आहे ती केवळ "इच्छा" की तुम्हाला माझे म्हणणे समजावे. असो.