तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?
मला बरेच दिवस हा धागा काढायचा होताच, पण यनावालांच्या धाग्यावर उठणारी राळ बघून प्रकर्षाने काढावासा वाटला..
तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?
माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अजून सिद्ध व्हायची आहे, पण तरीही मला वाटते की ते अस्तित्वात आहे,
मी एक उदाहरण देतो...
डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते..
त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास..
आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास..
अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो.
व्यावहारिक जीवनात पण तसेच, पण सर्वसामान्यपणे श्रद्धा ही बेसिक चिकित्सा करून ठेवली जाते, जेव्हा बेसिक चिकित्सा पण केली जात नाही तेव्हा ती होते अंधश्रद्धा ..
उदाहरणार्थ - माझ्याकडे एक माणूस येतो, तू मला 10लाख दे, मीएक वर्षात 20 लाख करून देतो असे सांगतो आणि मी विश्वास ठेवतो, याला म्हणावे अंधश्रद्धा.
अध्यात्मातील अंधश्रद्धामबद्दल बरेच बोलले गेले आहे, त्यामुळे परत बोलत नाही
तुम्हाला काय वाटते?
अंधश्रद्धा = एखाद्या गोष्टीची पुरेशी कारणीमीमांसा आणि योग्य सिद्धता देता येत नसताना ती गोष्ट अमुक असावी/नसावी असा विचार न करता ती गोष्ट अमुक आहेच/नाहीच असा दावा करणे.हायला, यनावाला आसंच करत आसतात ना न्हेमी ! काय भारी चप्राक लगावली तेन्ला तुमी, भाऊसायेब ! ;) =))माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. याला व्याख्येत बंदिस्त करणे अवघड आहे.श्रद्धा ही श्रद्धा असते. श्रद्धेला अंध म्हणणे किंवा डोळस म्हणणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एकाची डोळस श्रद्धा ही दुसर्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. मी आधी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रद्धापूर्वक नामस्मरण करणे हे दुसर्या एखाद्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. त्यामुळे श्रद्धेला अंध किंवा डोळस अशी परिमाणे लागू होत नाहीत.लेखक सुबोध जावडेकर अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान या प्रकरणात म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"लाखो-कोट्यावधी वर्षांपूर्वी नक्की काय झाले हे कोणालाच या क्षणी माहिती नाही. त्यामुळे काहीजण आपल्या स्वभावानुसार व कलानुसार कल्पनाशक्ती लढवून आपल्याला हवे तसे एक काल्पनिक चित्र उभे करतात.