तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?
मला बरेच दिवस हा धागा काढायचा होताच, पण यनावालांच्या धाग्यावर उठणारी राळ बघून प्रकर्षाने काढावासा वाटला..
तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?
माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अजून सिद्ध व्हायची आहे, पण तरीही मला वाटते की ते अस्तित्वात आहे,
मी एक उदाहरण देतो...
डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते..
त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास..
आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास..
अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो.
व्यावहारिक जीवनात पण तसेच, पण सर्वसामान्यपणे श्रद्धा ही बेसिक चिकित्सा करून ठेवली जाते, जेव्हा बेसिक चिकित्सा पण केली जात नाही तेव्हा ती होते अंधश्रद्धा ..
उदाहरणार्थ - माझ्याकडे एक माणूस येतो, तू मला 10लाख दे, मीएक वर्षात 20 लाख करून देतो असे सांगतो आणि मी विश्वास ठेवतो, याला म्हणावे अंधश्रद्धा.
अध्यात्मातील अंधश्रद्धामबद्दल बरेच बोलले गेले आहे, त्यामुळे परत बोलत नाही
तुम्हाला काय वाटते?
वरील सर्व वैज्ञानिक रीतीने तपासण्याची नाकारण्याची जी मुभा आहे सतत सत्याचा शोध घेत जाण्याची व संकल्पना थेअरी उत्क्रांत करत जाण्याची ती धार्मिक म्हटल्या जात असलेल्या ग्रंथांतील विधाना /अनुमानां / सत्य जे ते म्हणतात त्या सदर्भात असते का ?धार्मिक ग्रंथ आध्यात्मिक उन्नतीसाठी असतात आणि असायला हवे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो याबाबत भाष्य करण्याची धार्मिक ग्रथांना गरजच नाही कारण यापैकी नक्की काय होते हे समजल्याने किंवा त्याचे अज्ञान असल्याने आध्यात्मिक प्रगतीवर परीणाम होत नाही. भारतातील धार्मिक ग्रंथ कुराणप्रमाणे चिकित्सातील नाहीत. त्यातील सिद्धांतावर चर्चा करता येते, त्यावर आक्षेप घेता येतात, त्याची चिकित्सा करता येते व ते नाकारताही येतात. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन खात्री करा असेच धर्मग्रंथात सांगितले आहे. कोणतीही एखादी विशिष्ट उपासनापद्धती स्वीकारण्याची सक्ती या धर्मग्रंथातून नाही. स्वतः आपल्याला आवडेल त्या मार्गाने जाऊन, अनुभव घेऊन स्वउन्नती करा असे भारतीय धर्मग्रंथ सांगतात.१) देव आहे, देव मदत करतो, वगैरे इत्यादी. अंगात येणे वगैरेदेव आहे आणि देव मदत करतो हा व्यक्तिगत अनुभव आहे. या अनुभवाला/विश्वासाला/श्रद्धेला कोणी अंधश्रद्धा समजत असेल तरी माझी हरकत नाही.व्यवस्थीत चिकित्सा केल्यानंतर बुद्धीला पटते त्या गोष्टीवर असतो तो विश्वास आणि चिकित्सा न करता विशिष्ट गोष्ट पटणे ही म्हणजे श्रद्धा अशी व्याख्या समजली तर कोणतीही श्रद्धा अंधच होते. मग ती देवावर असो कि एखाद्या भोंदू बाबावर.कोणत्याही गोष्टीची अगदी थोड्या मर्यादेपर्यंत चिकित्सा करता येते. त्यानंतर येते ती फक्त श्रद्धा. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात चिकित्सेला अत्यल्प स्थान आहे. जगाचे बहुसंख्य व्यवहार श्रद्धेवरच चालतात. श्रद्धा ही फक्त धर्माशी किंवा देवाशी निगडीत आहे हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे. श्रद्धा कशावरही असू शकते. श्रद्धा देवावर असू शकते, माणसांवर असू शकते किंवा 'मटा'सारख्या वृत्तपत्रात फक्त सत्य बातमीच छापून येते अशीही श्रद्धा असू शकते.अर्थात निरूपद्रवी श्रद्धा आणि हानीकारक श्रद्धा यांच्यात फरक करणे सतत चालू राहिले पाहिजे. समाजात याविषयीचे चर्वीतचर्वण होणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच यनावालांना ज्या ज्या श्रद्धा हानीकारक वाटतात त्यांच्याविषयी लिहिण्याचा त्यांचा आग्रह मला पटतो.निरूपद्रवी आणि हानीकारक या सापेक्ष संज्ञा आहेत. मंदीरात जाऊन देवदर्शन करणे हे साधारणपणे निरूपद्रवी मानले जाईल, परंतु काही जणांना ते हानीकारक वाटते व असे देवदर्शन करणारे बुद्धीला गंज चढलेले, बिनडोक, स्वबुद्धी न वापरणारे इ. वाटतात.आपणही सतत ज्या ज्या श्रद्धा आपणाला समाजाला, देशाला हानीकारक वाटतात त्याच्याविषयी लिहित राहायला पाहिजे म्हणजे अधिकाधिक उहापोह होऊन खल श्रद्धांचे निर्दालन करता येईल. शेवटी आपण समाजाचे, देशाचे काही देणे लागतो अशी चांगली श्रद्धा आपणा सर्वांचीच आहे. नाही का?निश्चितच. मला स्वतःला उपासतापास, मृत्युनंतरचे विधी, सत्यनारायण पूजा, लग्नातील विधी इ. निरूपद्रवी श्रद्धा वाटतात. देवीला, अल्लाला प्राण्यांचा बळी देणे, देवीला मुले सोडणे या श्रद्धा हानीकारक वाटतात. नामस्मरण, देवदर्शन इ. श्रद्धा सकारात्मक वाटतात. मला ज्या श्रद्धा हानीकारक वाटतात, अशा श्रद्धांचा मी नेहमीच विरोध केलेला आहे. परंतु तथाकथित विज्ञानवादी स्वतः व्यवहारात अनेक गोष्टींवर डोळे झाकून चिकित्सा न करता श्रद्धापूर्वक विश्वास ठेवतात आणि इतरांच्या निरूपद्रवी श्रद्धांवर प्रहार करून आपण विज्ञानवादी असल्याचा अहंकार व टेंभा मिरवितात. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण आपले कोरडे पाषाण' असलेल्या अशा भोंदूंना मी नेहमीच विरोध करतो.बाकी जन्मदिन,नवं वर्ष शुभेच्छा दैताना त्या शतप्रतिशत खर्या ठरतीलच असे नाही हे माहीत असूनही मिपा सुधारक त्या का देतात हेच कळत नाही.झालं, केलंत ना स्वतःचं नुकसान ! आता यापुढे मिपासुधारकांची तुमच्याशी कट्टी... आतापासून नो शुभेच्छा, ओन्ली कुत्सित टिका ! ;) =)) =)) =))