ताज्या घडामोडी - भाग २१
आज राजस्थानातील अल्वर, अजमेर आणि पश्चिम बंगालमधील उलुबेरीया या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आणि राजस्थानातील मंडलगड या विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आहे.
अपेक्षेप्रमाणे राजस्थानातील तीनही मतदारसंघांमधून काँग्रेस आघाडीवर आहे. राजस्थानात बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षाला परत निवडणुक जिंकणे शक्य झाले नव्हते. अपवाद १९८५ आणि १९९३ चा. इंदिरा हत्येनंतर काँग्रेस लाटेत १९८५ मध्ये काँग्रेसला परत निवडणुक जिंकता आली होती. तर १९९३ मध्ये बाबरी प्रकरणानंतर भैरोसिंग शेखावतांनी भाजपला निसटता विजय मिळवून दिला होता. वसुंधरा राजे यांचा कारभार फार लोकप्रिय आहे असे अजिबात नाही. ताज्या घडामोडींमध्ये याविषयी मागे कधीतरी लिहिले होते. डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसला विजय मिळाला (कदाचित भरपूर मोठा) तर आश्चर्य वाटू नये.
२०१४ पासून आतापर्यंत झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये गुजरात या एकाच राज्यात भाजप सत्ताधारी होता. पण इतर राज्यात विरोधात होता. त्यामुळे मोदी फॅक्टर बरोबरच राज्य सरकारविरूध्दच्या अॅन्टी इन्कबन्सीचाही फायदा भाजपला झाला होता. आता एप्रिल-मे मध्ये होणारी कर्नाटक विधानसभा निवडणुक त्यातील शेवटची असेल. डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या तीन राज्यांमध्ये भाजप सत्ताधारी आहे. राजस्थानात पक्ष नक्कीच बॅकफूटवर असेल. बहुतेक छत्तिसगडमध्येही पक्ष एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर पक्ष बॅकफूटवर असेल. मध्य प्रदेशात पक्षाचा पराभव होईल असे वाटत नाही. पण काँग्रेस भाजपच्या नाकात दम आणेल हे नक्कीच. या पार्श्वभूमीवर त्यानंतर चारच महिन्यात होणार्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला नवा उत्साह संचारेल.
तेव्हा मोदींनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लोकसभा बरखास्त करून डिसेंबरमध्ये या राज्यांबरोबरच लोकसभा निवडणुक घेतली तरी आश्चर्य वाटू नये. त्याबरोबरच कदाचित महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्येही विधानसभा निवडणुक होऊ शकेल. कारण लोकसभा-विधानसभा निवडणुक एकत्र घ्यायचा पक्षाचा आग्रह असेल तर त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन असायला हवे.
💬 प्रतिसाद
(183)
श
श्रिपाद पणशिकर
Tue, 02/06/2018 - 07:25
नवीन
मिंया चाउस एक बात कि दाद देनी पडेगि. तुमचा ऐक आय डि ब्लॉक झाला कि लगेच दुसरा तयार असतो. काल परवा नायर हॉस्पिटल मध्ये MRI मशिन रीलेटेड जो घातपात झाला त्यात ऐक मुर्ख कंपाउंडर सामिल होता म्हणे. ईतक्या लवकर कसा सुटलास गजानन कागलकर ?
(संपादित)
ROFL
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Wed, 02/07/2018 - 13:22
नवीन
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे. नाशिक महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यापुढे कार्यरत असतील.
संदर्भ ही बातमी
राज्यकर्त्यांना ते कोठेच नको असणार. आता पुढील बदली कधी होणार एवढे बघणेच हाती आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/08/2018 - 09:58
नवीन
https://youtu.be/JY9n-DrWAkg?t=36
मोदींचा जबरदस्त हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धी!
Hats off!!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 02/08/2018 - 18:50
नवीन
श्रीकाका
अजून एक....
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/09/2018 - 18:02
नवीन
ओ गुरुजी , तिकडे मिपावाले भांडत बसलेत .. ते हसणे मोदीना नेमके कुणासारखे वाटले ?
सीतामैय्या
शुर्पणखा
अशोकवनातील राक्षशीण
मिपावर एक कौल घ्या.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 02/10/2018 - 15:25
नवीन
तुम्हाला कुणासारखे वाटले ?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/09/2018 - 02:51
नवीन
म्हशीचे मांस असल्याचे भासवून तशी बनावट कागदपत्रे तयार करून पावणे एमआयडीसीतील अॅग्रो फ्रेश कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात गाय आणि बैलाचे मांस साठवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी हे मांस साठवून ठेवणाऱ्या व्हट्रेक्स अॅग्री प्रोडक्ट्स लि. या कंपनीचे संचालक हेमंत कुमार यांच्यावर फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी गाय व बैलाचे सुमारे २२ लाख ८५ हजार रुपये किमतीचे मांस जप्त केले असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
https://m.maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/a-large-number-of-beef-seized-in-navi-mumbai/articleshow/62839908.cms
लाखोंचे गोमांस मिळूनही कट्टरपंथियानी कुणाच्या नखालाही धक्का लावला नाही. हिंसा टाळल्याबद्दल अभिनंदन.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 02/09/2018 - 08:58
नवीन
गोहत्या इतरत्र झालेली दिसतेय.
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/09/2018 - 09:15
नवीन
अखलाखच्या प्रकर्णातही मांसच मिळाले होते ना ? की उपयुक्त पशू कापताना कुणी पाहिले होते ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 02/09/2018 - 18:42
नवीन
अखलकला कापला तो त्याने राहुल यादववर खुनी हल्ला केला म्हणून. गोमांसाचा संबंध नाही.
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/09/2018 - 19:42
नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/2015_Dadri_mob_lynching
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 02/09/2018 - 22:40
नवीन
अखलकच्या मृत्यूचा गोमंसाशी संबंध नाही : http://www.misalpav.com/comment/864978#comment-864978
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/09/2018 - 23:32
नवीन
हो का ? मग यासंदर्भात पोलिस केसेस् आहेत का ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Fri, 02/09/2018 - 09:26
नवीन
अखलाख प्रकरण आणि हे वरील प्रकरण यात साम्य दिसतंय तर तुम्हाला! पोलिसांनी आधी कारवाई केली तरीही नंतर कुणीतरी येईन ठोकून काढलं असतं असं आपल्याला का बरं वाटत असेल?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/09/2018 - 18:08
नवीन
बाकी प्रकर्णात , आधी ठोकाठोकी , मग पोलिस असा sequence असायचा.
इथे ठोकाठोकी न होता direct पोलिस आले.
असो. अहिंसात्मक मार्गाला लागल्याबद्दल पुनश्च अभिनंदन.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 02/09/2018 - 13:03
नवीन
‘Hira’
H stands for highway,
I stands for I-way (digital connectivity),
R stands for roadway
A stands for airway.
साभार
मा. पं. प्र.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sat, 02/10/2018 - 08:03
नवीन
अलीकडच्या काळात निवडणुकांमध्ये पैशाचा अतिरेकी वापर होत असून ही चिंतेची बाब आहे. बऱ्याचदा निवडणुकानंतर काही उमेदवारांकडून प्रत्येक मतदानासाठी अमुक इतके पैसे देण्यात आल्याची भाषा कानावर पडते. त्यावेळेस चिंतेत अधिक भर पडते. पैशांचा हा वापर थांबविला पाहिजे, अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/excessive-use-of-money-in-elections-says-cm-devendra-fadnavis/articleshow/62857051.cms
अलीकडच्या म्हणजे नेमक्या कोणत्या ? सगळ्या निवडणुका हेच तर जिंकत आहेत.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 02/10/2018 - 08:13
नवीन
भाजप 100% वि. विरोधी पक्ष 0% असंच समीकरण आहे जणू आता!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 02/10/2018 - 15:26
नवीन
सगळ्या निवडणुका हेच तर जिंकत आहेत.
अच्छा
हि पोटदुखी आहे तर
चालू द्या
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 02/11/2018 - 06:33
नवीन
तामिळनाडूच्या राजकारणात एन्ट्री करणारे अभिनेते कमल हसन यांनी रजनीकांत यांच्यासोबतच्या आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी रजनीकांत यांचा मित्र आहे. आमचा उद्देश आणि लक्ष्य एकच आहे, मात्र दोघे एकत्र काम करू, असे मला वाटत नाही. त्यांच्या राजकारणाचा रंग भगवा नसेल, अशी अपेक्षा आहे. माझ्याही राजकारणाचा रंग भगवा नसेल,' असे हसन म्हणाले.
https://m.maharashtratimes.com/india-news/kamal-haasan-speech-in-harvard-university-on-rajinikanth-politics/articleshow/62869341.cms
भक्तलोक आता कमल हसन व रजनीकांतवर तुटून पडतील.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sun, 02/11/2018 - 06:39
नवीन
जसे अंधभक्त/अंधविरोधक लोक आता त्यांच्या समर्थनार्थ तुटून पडले आहेत!! आज खिलजी असता आणि त्याने जरी मोदींना विरोध केला असता तरी अंधभक्त/अंधविरोधकांनी त्याच्या समर्थनार्थ उड्या मारल्या असत्या यात तिळमात्र शंका नाही! चालायचंच...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/11/2018 - 08:10
नवीन
+ साडेचार लाख कोटी
जर मोदींविरूद्ध हफीज सईद, दाऊद असे कोणी उभे राहिले तर जमात-ए-पुरोगामी त्या लोकांना एकगठ्ठा मत देतील.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 02/11/2018 - 08:31
नवीन
मोदीजी तीरथयात्रेतून आले का ? परदेशात गेले होते म्हणे.
उगाचच हज यात्रेचे अनुदान बंद केलेत ...
तुम्हीसुद्धा त्या सौदीच्या देवळात जायला भज यात्रा काढायची आणि अनुदान घेऊन जाऊन यायचे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 02/12/2018 - 04:56
नवीन
http://www.business-standard.com/article/economy-policy/modi-s-uae-visit-in-a-first-india-buys-10-stake-in-abu-dhabi-oil-fields-118021100599_1.html
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 02/11/2018 - 08:21
नवीन
मोदीना विरोध केला की भक्ताना बाबर , औरंगजेब , अफझल्खान आणि खिल्जी आठवतात.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sun, 02/11/2018 - 09:13
नवीन
बरं, मी भक्त आहे. मग तुम्ही कोण आहात??
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/11/2018 - 07:38
नवीन
Senior cleric says long robes not necessary for Saudi women
गेले काही महिने सौदी अरेबियात चाललेल्या घडामोडी पाहता, तेथिल मुस्लिम विचारसरणी, उदार विचारांच्या संबंधात, दिवसेदिवस आश्चर्यकारकरित्या भारतिय मुस्लिम विचारसरणीच्या, दशकांनी पुढे जात चालली आहे असेच दिसते !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/11/2018 - 07:59
नवीन
चार एक वर्षांपूर्वी सौदी अरेबियातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला,
नंतर गेल्या दोनएक वर्षांपूर्वी त्यांना निवडणूकीत उभे राहण्यास परवानगी मिळाली,
चारचाकी चालवण्याचा परवाना देण्याच्या दिशेन त्यांची वाटचाल चाललेली आहे,
घरचा मोठा माणुस (शॅपरोन) बरोबर न घेता घराबाहेर जाण्याची मुभा... नंतर घरच्या मोठ्या माणसाच्या लेखी परवानगीशिवाय एकटे परदेशी जाण्याची मुभा मिळाली,
पुरुषांबरोबर उघड्या मैदानात बसून फूटबॉलसारखे खेळ बघण्याची मुभा मिळाली,
...आणि आता चक्क काळा बुरखा (अबाया) न घालता घराबाहेर जाण्यावरची बंदी उठवण्याच्या दृष्टीने त्या देशाच्या अधिकृत Council of Senior Scholars मधिल एका वरिष्ठ धार्मिक नेत्याने केलेले हे वक्तव्य !
हे वरचे सगळे बदल इतर जगासाठी अजिबात क्रांतिकारक वाटणार नाहीत. पण, अगदी चारपाच वर्षांपर्यंत सौदी अरेबियात, डोक्यासकट संपूर्ण अंग झाकणारा केवळ काळ्या रंगाचा (त्यावर इतर रंगाची वेलबुट्टी किंवा किनारही चालत नव्हती) अबाया घातल्याशिवाय आणि घरचा मोठा माणूस बरोबर असल्याशिवाय सौदी स्त्रियांना घराबाहेर पडण्यास बंदी होती. या पार्श्वभूमीवर गेल्या केवळ चारएक वर्षांत होत असलेले हे बदल, आताआतापर्यंत मध्यकाळात रुतून बसलेल्या एका कर्मठ देशाचे आधुनिकतेकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 02/11/2018 - 10:30
नवीन
जैसे तिथले तेल आटले, तैसे अकलेस धुमारे फुटले.
-गा.पै.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/11/2018 - 17:59
नवीन
:)
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Tue, 02/13/2018 - 16:45
नवीन
असेच बदल होउदेत. सगळ्याना जगण्याच्या समान संधी मिळू देत....
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/11/2018 - 08:46
नवीन
PM Modi officially launches foundation stone-laying ceremony for first Hindu temple in Abu Dhabi
मुख्य म्हणजे, हे मंदीर अबू धाबीच्या युवराजांनी {जे सद्या व्यावहारीकरित्या (इप्सो फॅक्टो) सत्ता सांभाळत आहेत} भेट दिलेल्या ५५,००० चौ मीटर जमिनीवर उभे राहणार आहे.
२०१७-१८ मध्ये (दुबईत नाही) अबू धाबीत हिंदू मंदीराची उभारणी होईल, असे २०१४ मध्ये (ज्यावेळी मी खाडी देशांतील वास्तव्याची अनेक वर्षे पुरी केलेली होती) सांगितले असते तर, मी त्यावर मी अजिबात विश्वास ठेवला नसता !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/11/2018 - 10:32
नवीन
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sun, 02/11/2018 - 17:36
नवीन
कमीत कमी या चार फोटोंसाठी माझ्या कडुन कॉग्रेसला एक मत २०१९ ला ;)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 02/12/2018 - 05:01
नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/deoband-fatwa-says-avoid-families-that-earn-haram-money/articleshow/62364310.cms
बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मुलींशी लग्न करू नका.कारण अशा हरामाच्या पैशातून पालन पोषण झालेल्या मुलिची नैतिकता संशयास्पद असते.
असा फतवा काढला आहे दारुल उलूम देवबंद ने
मोगा खान
या बद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/12/2018 - 11:00
नवीन
कंजारभाट समाजात आजही कौमार्यचाचणी केल्या जाते. त्याबद्दल सुभोद खरे तुमचे काय म्हणणे आहे?
तसेच खाप पंचायतच्या पवित्र्याबद्दल काय म्हणायचं आहे सुभोद खरे तुम्हाला?
https://www.jagran.com/uttar-pradesh/bagpat-khap-panchayat-17502233.html
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 02/12/2018 - 11:02
नवीन
पहिल्यांदा नाव नीट लिहायचं बघा मग प्रश्न विचारा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 02/13/2018 - 07:15
नवीन
शेंबुड आपल्या नाकाला, आपण सांगे लोकाला....
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 02/12/2018 - 09:40
नवीन
'भारतीय लष्कराला सैन्य तयार करण्यासाठी सहा ते सात महिने लागतील. पण देशाला गरज पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सीमेवर शत्रूशी लढेल आणि त्यासाठी केवळ तीन दिवसांत सैन्याची उभारणी करण्याची क्षमता संघाकडे आहे,'
बातमीचा दुवा
सरसंघचालकांनी सैनिकाची आणि स्वयंसेवकाची तुलना करणे चुकीचे आहे.
संघाची आणि भारतीय लष्कराच्या तुलनेतून हे काय सांगू इच्छितात ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 02/12/2018 - 09:44
नवीन
सरसंघचालक अशी अतिशयोक्तीची विधाने न करतील तर बरे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/12/2018 - 10:10
नवीन
ठीक आहे. बादवे, लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा उल्लेख खांग्रेसी संदीप दिक्शितने "सडकछाप गुंड" असा केला होता हे आठवत असलेच.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 02/12/2018 - 10:12
नवीन
दुव्या मधील सुनील सस्ते नामक वाचकाची एक कंमेंट भारी रोचक आहे...
""देशाला गरज भासली आणि राज्यघटनेने परवानगी दिली तर !!!!! तुम्हाला परवानगी मागायला आणि राज्यघटनेने परवानगी द्यायला किती वर्षे लागणार ते नाही सांगितले. मागे एकदा तुमच्या बरोबर शिवसैनिकही काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी गेले होते, पोलिसांनी अटक करण्याची वाट बघतच सगळे उधमपुरला तीन दिवस थांबले होते. बाकी काही असुध्या तुम लढो हम कपडे संभळते है या भूमिकेत भारी शोभून दिसतात."""
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Mon, 02/12/2018 - 14:43
नवीन
संघवाले नुस्ती काठी घेऊन लढू शकत असतील तर देश बोफोर्स अन राफेलवर का खर्च करत आहे ?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Mon, 02/12/2018 - 15:55
नवीन
संघवाले ३ दिवसात सैन्यबळ उभे करु शकतात.
हं ... मग १९२५ ला संघ स्थापन झाल्यावर देश स्वतंत्र व्हायला ३२ वर्षे का लागली ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 02/12/2018 - 16:34
नवीन
आधी २५ अधिक ३२ करा आणि किती येतंय ते बघा, संघाचं बघू निवांत!
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Mon, 02/12/2018 - 18:23
नवीन
२२ पाहिजे नै का ?
२२ वर्षे !!
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 02/12/2018 - 16:39
नवीन
अतिशय अवास्तव आणि अकारण ठोकलेलं वाक्य असंच म्हणावं लागेल. कशाला बरं कायच्या काय डोकं लावावं?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 02/12/2018 - 09:46
नवीन
Hindustan Times: Shopian firing: SC stays proceedings against Indian Army Major named in FIR over... http://google.com/newsstand/s/CBIw6Mfh1zc
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 02/12/2018 - 10:12
नवीन
>>नागालँड ख्रिश्चनबहुल राज्य आहे. येथे हिंदुत्ववादी शक्तींच्या घुसखोरीला आम्ही तीव्र विरोध करू', असे NBCC चे महासचिव रिव झेलहोऊ केयहो यांनी सांगितले आहे.
असल्या जातीय आवाहने करणार्या संघटनांवर बंदी आणली पाहिजे. नागालँड ख्रिश्चनबहुल झालाय यातच चर्चची घुसखोरी दिसून येते .
अशी धर्मांतरे चिंतेचा विषय आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 02/13/2018 - 17:31
नवीन
manguu@mail.com,
तुमचा गांधी १९१६ साली उगवल्यावर भारताला स्वातंत्र्य मिळायला ३१ वर्षं का जावी लागली? त्याच कारणासाठी संघाची निर्मिती झाल्यावर २२ वर्षं लागली म्हणून समजा.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »