नीरव मोदी व पी.एन.बी. घोटाळा
गेल्या २५-३० वर्षात बँकांचे बर्याच प्रमाणात संगणकीकरण झाले. त्याने अनेक फायदे झाले. मात्र आर्थिक घोटाळ्याना काही आळा बसतोय असे दिसत नाही. नुकताच उघडकीस आलेला नीरव मोदी-पी.एन.बी. घोटाळा. हिरे/हार दागिने बनवून विकणार्या नीरव मोदी व त्याच्या कंपनीने २०११ पासून एकूण ११,००० कोटी काढले. ह्या बँकेच्या अधिकार्यानी अनेक 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'(LoU) नि.मो. कंपनीला दिली. त्यानुसार नि.मो.कंपनीने पी.एन.बी. व ईतर काही बँकातून तो पैसा काढला. परतफेड होत नाही हे दिसल्यावर घोटाळा उघडकीस आला. काही पडलेले प्रश्नः
१) LoU चा रेकॉर्ड बँकेच्या सेंट्रल डेटाबेसमध्ये नाही असे बँकेने म्हंटले आहे. हे कसे शक्य झाले ?
२)swift मेसेजिंग सिस्टिम व नॉस्ट्रो खाते हा काय प्रकार आहे ?
सध्यातरी काही अधिकार्याना अटक झाली आहे. पी.एन.बी. चे संचालक सुनिल मेहता ह्यांनी आमची बँक चोख व्य्वहार ठेवते..आम्ही ह्या प्रकरणातून बाहे येवू असे सांगितले आहे. वरकरणी ते म्हणत असले तरी शेकडो कोटींचे कर्ज काढले जाते पण बँकेच्या सर्वोच्च अधिकार्याना ह्याची कल्पना नसते ह्यावर कसा विश्वास ठेवायचा?
ED(सक्तवसूली सण्चलनालय) व सी.बी.आय. वगैरे वरातीमागून घोडे असा प्रकार असतो. विजय मल्ल्यासारखाच नीरव आधी पळाला(म्हणजे पळायला लावले) व यथावकाश सी.बी.आय. ने एफ.आय.आर. नोंदवला. आता अपेक्षेप्रमाणे धाडसत्र चालू आहे व 'आम्हाला नाय बुवा माहीत हा नीरव मोदी' असे सांगण्याचा भाजपा व कॉंग्रेसचा प्रयत्न चालू आहे.
राहता राहिला शेवटचा प्रश्न- अतिधनाढ्यांच्या यादीत नाव पटकावणार्या नीरव मोदीला एवढे कर्ज काढायची( व तेही अशा मार्गाने) गरज काय?(https://retail.franchiseindia.com/interview/retail-people/profiles/Over-the-next-5-years-we-are-looking-at-over-20-new-boutiques-across-the-globe--Nirav-Modi.i1333/ ) ह्या दोन महिन्यापुवीच्या मुलाखतीत तो जगातील विविध शहरात शाखा उघडण्याबद्दल बोलतोय. मग असे दोन महिन्यात काय झाले ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- Jawaanनिरवने ते पैसे दरवेळी परत केले.नाही. त्याने आपली कर्जे एकतर ... (अ)"रोल ओव्हर" केली : म्हणजे "जुने कर्ज + त्यावरचे व्याज" इतके किंवा त्यापेक्षा जास्त नवीन कर्जाचे एलओयु घेतले, आणि/किंवा (आ) जुनी कर्जे "रिस्ट्रक्चर केली" : म्हणजे कर्जे व त्यावरचे व्याज प्रत करण्याच्या अटी बदलून त्याला सोईच्या करून घेतल्या. या कारवायांचा परिणाम, कर्जे परत करण्यात झाला नसून, "निरव मोदी व नेहूल चोकशीच्या कंपन्यांचे आजचे मरण उद्यावर ढकलण्यात आणि तसे करताना दर कृतीने कर्जाची रक्कम फुगत जाण्यात" झाला आहे. हे सगळे करण्यातही फार मोठी समस्या नाही. पण, मुख्य दोन समस्या अश्या आहेत की : (अ) मूळ कर्जे, देताना, रोल ओव्हर करताना आणि रिस्ट्रक्चरिंग करताना बँकेने निरवकडून कायद्याने आवश्यक तेवढे (दर वेळेच्या एकूण कर्जाच्या ११०% किंवा जादा) तारण घेतले नाही. त्यामुळे निरवने हात वर केल्यास (जे होणे जवळ जवळ नक्की दिसत आहे) बँकेला कर्ज वसूल करण्याचा कोणताच कायदेशीर मार्ग उरणार नाही. (आ) निरवने सर्व कर्जे (सद्या जवळ जवळ शून्य किंमत असलेल्या) खोका कंपन्यांच्या नावावर घेतली आहेत, स्वतःच्या वैयक्तीक नावावर/तारणावर नाही. त्यातल्या बर्याच कंपन्यांत त्याचे १% इतके क्षुल्लक समभाग आहेत. कायद्याने कर्जे परत करायची जबाबदारी कंपन्यांवर आहे, निरव मोदी या व्यक्तीवर नाही. निरवची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून, त्यांच्याद्वारे बँकेचे पैसे परत घेण्याला, हा मुद्दा अडसर ठरेल. (इ) एका बॅकेतून दुसर्या बँकेत आंतरराष्ट्रिय स्तरावर पैसे/क्रेडिट हस्तांतरण करताना (एलोयु देताना) वापरल्या जाणार्या "स्विफ्ट" या संगणकिय प्रणालीचा पासवर्ड निरवच्या गोटातल्या कोण्या अनधिकृत माणसाला दिला होता, असेही बोलले जात आहे. बँकेच्या अधिकृत स्विफ्ट प्रणालीवरून झालेले व्यवहार बँक नाकारू शकत नाही, ते तिला पुरे करावेच लागतील. कारण... "परदेशी बँकेने निरवला दिलेली रक्कम, पंनॅबॅकेच्या एलोयुच्या (कर्जाची रक्कम पंनॅबँक परत करेल या वचनावर) हमीवर दिलेली रक्कम म्हणजेच, तत्वतः व वस्तूतः पंनॅबॅकेला दिलेले कर्ज आहे; ते कर्ज निरवकडून वसूल करायची जबाबदारी पंनॅबँकेची आहे"... असा एलोयुचा साधासोपा अर्थ असतो. (ई) अलाहाबाद बँकेवरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये युपिए सरकारने नियुक्त केलेल्या एका एक्टर्नल डायरेक्टरने निरवमोदी आणि/किंवा गितांजली ब्रँड्जना दिल्या जाणार्या कर्जांबद्दल, "चुकीच्या पद्धतीने दिलेली आणि एनपीए ठरतील अशी कर्जे" असे आक्षेप अनेकदा घेतले होते. त्यासंबधी कंपन्यांची चौकशी होण्याऐवजी त्या डायरेक्टरला दिल्लीत वित्त मंत्रालयात बोलवून त्याची कानउघाडणी केली गेली आणि त्याला राजिनामादेण्याची सक्ती केली गेली. हा दावा त्या डायरेक्टरने रष्टीय टीव्ही वाहिनीवर केला आहे. (उ) गंभीर अवैध कृती केल्यामुळे निरव मोदी आणि गितांजली ब्रँडच्या कंपन्यांवर/अधिकार्यांवर सेबीने मार्केट्मध्ये खरेदी-विक्री करण्यास बंदी घातली होती. या कंपन्याच्या अनेक फ्रँचाइजनी फसवणूकीचे अनेक दावे कोर्टात दाखल केले होते/आहेत. तरीही, त्यांची दखल न घेता, अनेक बँका त्या कंपन्यांना निर्वेधपणे सतत सातएक वर्षे कर्जे, रोलओव्हर, रिस्ट्रक्चर आणि एलओयुज देत राहिल्या. वरच्या सर्व गोष्टींत बँकांच्याच्या अक्षम्य चूका झालेल्या आहेत, यात संशय नाही. अश्या व इतक्या चुका उपनिरिक्षक स्तराचा कनिष्ठ अधिकारी करू शकेल असे समजणे कठीण आहे. त्याच बरोबर, पंनॅबँकेचे अंतर्गत ऑडीट, वरिष्ठ अधिकारी, त्रयस्थ ऑडीट आणि आरबीआयचे ऑडीट यामधून या चुका अनेक वर्षे निर्वेधपणे दुर्लक्षित राहिल्या. या सगळ्या गोष्टींमुळे, या प्रकरणात फार वरिष्ठ (कदाचित् अत्युच्च) स्तरापर्यंतचा हस्तक्षेप झाला असावा असे म्हणायला फार मोठा वाव आहे.