Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २३

श
श्रीगुरुजी
Mon, 02/19/2018 - 10:29
🗣 201 प्रतिसाद
'जिओ' मुळे अजून एक दूरभाष कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याआधी टाटा टेलिकॉम व रिलायन्स कम्युनिकेशन्स (अनिल अंबानी) या दोन कंपन्या बंद पडलेल्या आहेत. आता एअरसेल ही कंपनी दिवाळखोरीसाठी अर्ज करीत आहे. एअरसेलने संचालक मंडळ बरखास्त करत दिवाळखोर जाहीर करावे यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका कंपनीच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत. https://www.loksatta.com/arthasatta-news/telecom-company-aircel-national-company-law-tribunal-bankruptcy-rs-15500-crore-debt-sbi-1633902/

प्रतिक्रिया द्या
75484 वाचन

💬 प्रतिसाद (201)
M
manguu@mail.com Mon, 02/19/2018 - 10:47 नवीन
अगदी स्वस्त आहे. २०० च्यावर बिल जात नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 02/19/2018 - 10:53 नवीन
काही 'अनफेयर ट्रेड प्रॅक्टिस' केल्यात का? आपली उत्पादने, सेवा विकायला?
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 02/19/2018 - 16:02 नवीन
टेलेफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटीची भूमिका संशयाद्स्पद आहे. रेलिअन्स च्या कोणत्याही मसुद्याला मम् म्हणण्याची त्यांची भूमिका आहे. सर्व देशाला काही तरी दुःस्वप्न पडलय अशी अवस्था आहे. न्याय व्यवस्था दावणीला बांधलीय. प्रधान सेवक अधिकच उन्मादात फ़ेकतायत. लोक भावना नावाची गोष्टच जणू अस्तित्वात नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
श
श्रीगुरुजी Mon, 02/19/2018 - 16:34 नवीन
>>> न्याय व्यवस्था दावणीला बांधलीय. कोणाच्या दावणीला ते सोदाहरण सांगा. >>> प्रधान सेवक अधिकच उन्मादात फ़ेकतायत. सोदाहरण स्पष्ट करा. >>> लोक भावना नावाची गोष्टच जणू अस्तित्वात नाहीये. म्हणजे काय बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सर टोबी Mon, 02/19/2018 - 17:15 नवीन
न्याय व्यवस्था सरकारच्या दावणीला बांधलीये या बद्दल तुमच्या मनात शंका आहे का? बिर्ला सहारा घोटाळ्याच्या डायऱ्या हा पुरावा होऊ शकत नाही असा निर्णय देणे, सरकारी पक्षातील उच्च पदस्थांवरील खटले कनिष्ठ न्यायाधीशांकडे सोपविणे याला तुम्ही काय म्हणता? प्रधान सेवकांचे फेकणे: राज्य सभेतील भाषणात नेहरूंपेक्षा सरदार पटेल हे चांगले पंतप्रधान झाले असते असे प्रचारकी थाटात म्हणण्याचे प्रयोजन काय? नवी मुंबईच्या विमान तळाच्या भूमिपूजन प्रसंगी पूर्वीच्या सरकारची 'अटकना, लटकना और गटकना' अशी संभावना करण्याचे कारण काय? तो प्रकल्प रद्द करून काँग्रेसने जमीन गिळंकृत केली का? काँग्रेस ने कधीही भ्रष्टाचाराचे निर्लज्ज समर्थन केले नाही. या पाश्र्वभूमीवर सध्याचे सरकार जनता आपल्याबद्दल काय विचार करतेय असे तुम्हाला जाणवतेय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com Mon, 02/19/2018 - 17:36 नवीन
अटकना , लटकना .. हे सर्व प्रोजेक्टना होतेच. जमीनसंपादन सोपे नसते. त्यात वर्षानुवर्षे जातात. पण विरोध करणार्याला कोर्टात जाण्याची संधी दिली जाते. भाजपानेच जमीनसंपादनासाठी जनतेची गळचेपी करणारा कायदा आणण्याचे ठरवले होते. पण तो प्रयत्न बारगळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
न
नाखु Mon, 02/19/2018 - 18:28 नवीन
सांगताय? आम्ही मूढ पुण्याची मेट्रो फाइल दिल्लीत एका विभागातून दुसर्‍या विभागांत परवानगीसाठी ८-९ वर्षे उगाच स्वेच्छेने फिरत असावी असं समजत होतो. (केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनही) अडाणी नाखु वाचकांचीही पत्रेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 02/19/2018 - 19:37 नवीन
मा. प्रधानसेवकांच्या राज्यात गुजरात मेट्रो २००३ पासून येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 09:55 नवीन
भाजपानेच जमीनसंपादनासाठी जनतेची गळचेपी करणारा कायदा आणण्याचे ठरवले होते. पण तो प्रयत्न बारगळला.
आणि म्हणून अख्ख्या बँकिंग सिस्टिमची वाट लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 10:19 नवीन
जमीनसंपादन सोपे नसते. त्यात वर्षानुवर्षे जातात.
ऐकावे ते नवलच. ----------------------------- आम्ही ऐकलं होतं कि करारापासून ६ महिन्यांत सरकारला हायवेसाठी ८०% जमीन आणि अन्य प्रकल्पांसाठी १००% जमीन देणे भाग असते. नैतर दर दिवशी करोडो रुपये पेनाल्टी (लिक्विडेटेड डॅमेजेस) असते. वर्षानुवर्षे लागत असतील करार करायचेच नाहीत. उगाच बँकांची वाट लावून तमाशा का बघायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 11:03 नवीन
भाजपानेच जमीनसंपादनासाठी जनतेची गळचेपी करणारा कायदा आणण्याचे ठरवले होते.
जगात कुठेही मिळते त्यापेक्षा ५-१० पट किंमत भारतात मिळते. क्रयशक्तीची अ‍ॅडजेस्टमेंट न करता!!! कायदा काँग्रेसनी आणला नि त्यात जे भलतेच लाड होते ते भाजपने हटवले. उदगीर भालकी हा रस्ता पिंपळगावातून जावा कि नाही हे सरकार ठरवणार कि पिंपळगावकर कि फोर्ड फाउंडेशन? ८०% लोकांनी हो नाही म्हटलं तर जमिन मिळणार नाही. (८०% लोकांनी नको नाही म्हटलं तर देणार असंही नाही). इतकं पाशवी बहुमत दरवेळी कुठून आणायचं? नरेंद्रभाईला प्रगतीचा हिशेब मागता नि नुसता "सामाजिक परिणाम अहवाल द्यायला" १२ महिने? त्यानंतर प्रक्रिया चालू? तेही १२ महिन्यात दिला तर नशीब!!! ========================== आणि तुमचं दुकान विकत घेतलं तर त्याचे पैसे तुमच्या नोकराला कोण्या न्यायानं द्यायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Mon, 02/19/2018 - 18:57 नवीन
>>> न्याय व्यवस्था सरकारच्या दावणीला बांधलीये या बद्दल तुमच्या मनात शंका आहे का? बिर्ला सहारा घोटाळ्याच्या डायऱ्या हा पुरावा होऊ शकत नाही असा निर्णय देणे, सरकारी पक्षातील उच्च पदस्थांवरील खटले कनिष्ठ न्यायाधीशांकडे सोपविणे याला तुम्ही काय म्हणता? तसं असतं तर राजा, कनिमोळी, चव्हाण, कृपाशंकर इ. निर्दोष सुटले नसते. फक्त कोणीतरी लिहिलेली डायरी हा पुरावा नसतो हा १९९७ मध्ये जैन हवाला डायरी प्रकरणात न्यायालयानेच दिलेला निकाल आहे. बिर्ला डायरी वरील निकाल तसाच आहे व तो मोदी पंतप्रधान नसताना दिलेला आहे. >>> राज्य सभेतील भाषणात नेहरूंपेक्षा सरदार पटेल हे चांगले पंतप्रधान झाले असते असे प्रचारकी थाटात म्हणण्याचे प्रयोजन काय? नवी मुंबईच्या विमान तळाच्या भूमिपूजन प्रसंगी पूर्वीच्या सरकारची 'अटकना, लटकना और गटकना' अशी संभावना करण्याचे कारण काय? तो प्रकल्प रद्द करून काँग्रेसने जमीन गिळंकृत केली का? मोदींनी सत्य तेच सांगितले आहे. ते कटु सत्य असल्याने ते तुमच्या पचनी पडत नाहीय्ये. >>> काँग्रेस ने कधीही भ्रष्टाचाराचे निर्लज्ज समर्थन केले नाही. या पाश्र्वभूमीवर सध्याचे सरकार जनता आपल्याबद्दल काय विचार करतेय असे तुम्हाला जाणवतेय का? हे वाचून रेणुका चौधरींसारखा हसलो. जरा इंदिरा गांधींपासून खांग्रेसचा इतिहास वाचा. "भ्रष्टाचार झाला म्हणून काय झाले? भ्रष्टाचार जगात सर्वत्र आहे" असे सांगून भ्रष्टाचाराचे समर्थन कोणी केले होते हे शोधा. सर्वाधिक भ्रष्टाचार कोणाच्या संमतीने व कोणाच्या कारकीर्दीत झाला ते शोधा. कोणते पंतप्रधान न्यायालयात फे-या मारत होते व कोणत्या पंतप्रधानांनी आपल्या वरील खटल्याला तात्पुरती स्थगिती मिळविली आहे हे माहिती असलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 11:06 नवीन
हे गळचेपी वैगेरे शब्द वापरणारे लोक इंद्रामायनं जवा संपत्ती हा एक मूलभूत संवैधानिक अधिकार म्हणून नष्ट केला तवा कुटं व्हते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 09:54 नवीन
माझ्या डायरीत पण अडवाणींचं नाव आहे. सर्व राजकीय नेत्यांची नावं लिहित असतो मी डायरीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 10:10 नवीन
सरकारी पक्षातील उच्च पदस्थांवरील खटले कनिष्ठ न्यायाधीशांकडे सोपविणे
अशी सोपीवणारी सोडून उरलेली न्यायव्यवस्था दावणीपासून दूर असलीच पाहिजे. दुसरीकडच्या गोठ्याच्या दावणीपर्यंत दूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 10:13 नवीन
राज्य सभेतील भाषणात नेहरूंपेक्षा सरदार पटेल हे चांगले पंतप्रधान झाले असते असे प्रचारकी थाटात म्हणण्याचे प्रयोजन काय?
सत्यकथन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 10:15 नवीन
काँग्रेस ने कधीही भ्रष्टाचाराचे निर्लज्ज समर्थन केले नाही.
सलज्ज भष्ट्राचार केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
ब
बिटाकाका Fri, 02/23/2018 - 10:16 नवीन
प्रधान सेवकांचे फेकणे: राज्य सभेतील भाषणात नेहरूंपेक्षा सरदार पटेल हे चांगले पंतप्रधान झाले असते असे प्रचारकी थाटात म्हणण्याचे प्रयोजन काय?
स्वतःच्याच वाक्यातील विरोधाभास - प्रधानसेवकांचे फेकणे म्हणून जे तुम्ही वर वाक्य दिलं आहेत तेच मुळी तुमचं फेकणं आहे असे नाही वाटत का? १. ते जे काही बोलले ते राज्यसभेत नाही तर लोकसभेत बोलले २. पंतप्रधानांचं वाक्य - सरदार पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर आज पाकव्याप्त काश्मीर अस्तित्वात नसता - असे आहे. --------------------------------------------------------- स्वतः पुरेशी माहिती न घेता पूर्वग्रहदोषीत राग तावातावाने व्यक्त करण्यात काय प्रयोजन असते काय माहीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
M
manguu@mail.com Fri, 02/23/2018 - 14:34 नवीन
सरदार पटेलाना श्वसनविकार होता व अगदी टर्मिनल स्टेजला होता. ते ५ वर्षाची एक टर्मही पुरी करु शकले नसते. अन अखेर तसेच झाले. स्वातंत्र्यानंतर अगदी २ वर्ष्तच , १९५० सालीत ते वारले. त्यामुळे ते अमूक झाले असते तर अन ते तमूक झाले असते तर या गृहीतकाला अर्थ उरत नाही. नेहरु गांधी हिंदुंची अन देशाची वाट लावणार आहेत, हे जर हिंदु सभावाले, संघवाले ह्याना दिसत होते तर ते का निवडणुका लढून पंतप्रधान झाले नाहीत ? ते तर सगळे धडधाकट होते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Fri, 02/23/2018 - 14:43 नवीन
काँग्रेसच्या दमेकरी , गुप्तरोगी , कुपोषित - अर्धनग्न अशा लोकानी देश संभाळला. अन धडधाकट कट्टर लोक नुसते पोकळ बांबू फिरवत बसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Fri, 02/23/2018 - 16:06 नवीन
अत्यंत अशोभनीय आणि आपली विचारसरणी खरी ठरवण्यासाठी केलेल्या या विचित्र वक्तव्याचा तिव्र निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 02/24/2018 - 06:12 नवीन
काँग्रेसने ह्याना हे का केले नाही , त्याना ते का केले नाही , असे वर्षानुवर्षे विचारले तर चालते. हिंदुत्ववाद्यानी निवडणुका लढून सत्ता चालवून का दाखवली नाही , हे विचारले की निषेध !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/24/2018 - 07:39 नवीन
परत वाचा स्वतःचे वाक्य. कांग्रेसच्या कामावर टिका करणे वेगळे आणि तुम्ही वर जे काही म्हणत आहेत ते वेगळे. **************************** हिंदुत्ववाद्यांनी का नाही लढवल्या निवडणुका? कारण त्यांचा सगळ्या काँग्रेसवर अविश्वास नव्हता. जेव्हा डोक्यावरून पाणी जातेय असे वाटले तेव्हा त्यांनी काढला पक्ष आणि लढवल्या निवडणुका, अर्थात हे माझे मत! **************************** एक निरीक्षण : ती काँग्रेस आणि आताची काँग्रेस एकच आहे मानणे, हिंदुत्ववाद्यांचं स्वातंत्र्यलढ्यात काय बलिदान आहे विचारणे वगैरे अत्यंत अज्ञ प्रकार एका विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीला अनुसरून चालणाऱ्या डोक्यांमध्येच येतात! मग नंतर स्वतः स्वतःचे ज्ञान वाढवण्यापेक्षा मग सांगा बघू कसे विचारणे, मग काही माहिती पुरवली की मुख्य माहिती सोडून छिद्रान्वेष करणे आणि समोर आलेल्या माहितीला फाट्यावर मारणे हि मोड्स ऑपरेंडी! काय साध्य होते देव जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 02/24/2018 - 07:48 नवीन
म्हणजे डोक्यावरुन पाणी ६ एप्रिल १९८० ला गेले ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 02/24/2018 - 09:04 नवीन
हो मला असे वाटते. १९७५ च्या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आणीबाणीच्या वेळेस पाणी डोक्यावरून जायला सुरुवात झाली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Fri, 02/23/2018 - 16:09 नवीन
छान हो छान! त्यांना बरे नव्हते म्हणून पंतप्रधान केले नाही! मग उपपंतप्रधान आणि गृहमंत्री का केले म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
अ
अनुप ढेरे Fri, 02/23/2018 - 10:20 नवीन
बिर्ला सहारा घोटाळ्याच्या डायऱ्या हा पुरावा होऊ शकत नाही असा निर्णय देणे,
अगदी बरोबर निर्णय होता. डायर्‍या काय कोणीही लिहिल. त्याशिवाय इतर सब्ळ पुरावा असलाच पाहिजे. वरिलकेसमध्ये डायरी सोडून काहीही नव्हतं. डायरी ऑथेंटिक कशावरून अनेक प्रश्न पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 09:59 नवीन
टेलेफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटीची भूमिका संशयाद्स्पद आहे.
कोणती भूमिका? ---------------------------- अ ब क यांनी सेवादर १ रु ठेवला. प म्हणाला माझा दर ०.१. ऑथॉरिटीने त्याला अलाऊ केलं. हे संशयास्पद? ठीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
N
Nitin Palkar Mon, 02/19/2018 - 10:55 नवीन
मोठे मासे लहान माशांना गिळतात या नियमानुसारच. सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी चपला, बूट चांभाराकडून बनवून घेत असू, आता चांभार फक्त शिलाई मारण्याकरता अथवा पॉलिश करण्यापुरता राहिला आहे. शिंपी अजून दिसतायत पण पुरुषांचे कपडे शिवणाऱ्या शिम्प्यांचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत आज कितीतरी घटलेले दिसते. महिलांचे कपडे शिवणाऱ्या शिम्प्यांची दुकाने मात्र वाढलेली दिसतायत. बदललेल्या जीवनशैलीचे हे काही परिणाम असावेत.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 02/19/2018 - 11:02 नवीन
कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता त्यांच्या विमान कारखान्यासाठी राज्य सरकारने जागाही दिली आहे. पालघरमध्ये एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी जागा देण्यात येणार आहे. यासाठी अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटींचा करार झाला. अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/19/2018 - 11:18 नवीन
अमोल यादव यांना यशस्वी प्रकल्पासाठी अनेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
प
पुंबा Mon, 02/19/2018 - 11:27 नवीन
+११ सहर्ष अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बिटाकाका Mon, 02/19/2018 - 12:27 नवीन
मार्केट च्या मागणीनुसार बदलू शकत नाहीत ते बुडणारच! त्यासाठी प्रतिस्पर्ध्याला बोल लावण्यात काय पॉईंट?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/19/2018 - 13:28 नवीन
गुजरात विधानसभा निवडणुकीत 'काठावर' उत्तीर्ण झालेल्या भाजपनं पालिका निवडणुकीत समाधानकारक कामगिरी केली आहे. राज्यातील ७५ पैकी ४४ पालिकांमध्ये विजयाचं 'कमळ' फुललं आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला भाजपला 'टक्कर' देणाऱ्या काँग्रेसनंही २७ महापालिकांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र, मागील निवडणुकांच्या तुलनेत भाजपला १६ पालिकांमधील सत्ता गमवावी लागली आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 02/19/2018 - 14:56 नवीन
येथे रेल्वे मेट्रो डबे बांधणी प्रकल्प होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे हा मराठवाड्यातील पाहिलाच मोठा प्रकल्प असावा
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 11:09 नवीन
आप के मूंह में घी शक्कर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
माहितगार Mon, 02/19/2018 - 15:29 नवीन
yes, nonprofits can behave badly.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 02/20/2018 - 02:59 नवीन
https://www.loksatta.com/sahyadriche-vare-news/articles-in-marathi-on-bjp-government-1634207/ भाजपाच्या नगरपालिका कार्याचा सुंदर आढावा . राज्यात भाजपचा झेंडा सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिकसह विदर्भातील महापालिकांवर गेल्या वर्षी फडकला. मात्र सत्तांतरानंतरही भाजपला कोठेही गुणात्मक फरक दाखवता आलेला नाही. गटबाजी हे बहुतांश शहरांतील भाजपचे दुखणे झाले आहे. परिणामी जुन्याच भ्रष्टाचाराचे मतलबी वारे महानगरपालिकांमध्ये तसेच वाहत आहेत, असेच चित्र समोर येत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/20/2018 - 04:28 नवीन
'लाँचिंग' आणि 'लिंचींग' हा नव्या भारताचा धर्म होत चालला आहे. एकतर आपल्या देशात काही ना काही नवे मोठ्या झोकात 'लाँच' तरी केले जाते, किंवा मग कुणाला तरी माथेफिरू झुंडीच्या हाती मारून तरी टाकले जाते. या घटना उघड्या डोळ्यांनी अनुभवताना त्यांच्याबद्दल सरकारमधील कुणालाच बोलायची इच्छा होत नाही. किमान वाईट वाटले, असेही कुणी म्हणत नाही. त्या अखलाख, पेहलू खान, जुनैद सारख्या मुस्लिमांसाठी आपले संविधान कुठे शिल्लक राहिले आहे? देशात मानवधर्माच्या ऐवजी आज अधर्म आणि विधर्म आपले राज्य राबवत आहेत. महंमद अली जिनांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपण भारताला 'हिंदू पाकिस्तान' बनवू पाहत आहोत,' असा घणाघात स्वराज अभियानचे संस्थापक प्रा. योगेंद्र यादव यांनी केला. (सौजन्यः मटा)
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 02/20/2018 - 07:21 नवीन
त्या अखलाख, पेहलू खान, जुनैद सारख्या मुस्लिमांसाठी आपले संविधान कुठे शिल्लक राहिले आहे?
सगळं घोडं इथे पेंड खातंय असा माझं वैयक्तीक मत बनत चाललं आहे. ह्या अशा घटनांचा आणि त्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा जेन्यूयननेस इथे येणाऱ्या आणि न येणाऱ्या नावांमुळे कमी होत जातो. सिलेक्टिव्ह निषेध करून राजकीय फायदा घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे आणि समाज अजूनच दुभंगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 11:12 नवीन
आमच्या माहितीप्रमाणे पाकिस्तान जिन्नांनी नव्हे तर नेहरूंनी बनवला. अखंड भारत गृहित धरून ब्रिटीशांनी जितके काही स्वातंत्र्यांचे पर्याय दिले होते ते सर्वच्या सर्व मुस्लिम लिगला मान्य होते. कृपया अज्ञान पसरावू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 11:14 नवीन
शब्दांच्या उच्चारांत साम्य आढळले म्हणून काहीही प्रतिसाद लिहू नये. आपला देश वरचे वर महान होत चाललाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/20/2018 - 04:30 नवीन
ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...' असं जिच्याबद्दल सध्या सगळीकडं बोललं जातंय, त्या प्रिया प्रकाश वारियार हिचं मन मात्र वेगळ्याच तरुणावर जडलंय. हा तरुण दुसरा-तिसरा कुणी नसून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रियानं हा 'हार्टब्रेकिंग' खुलासा केलाय. 'मला क्रिकेट पाहायला खूप आवडतं आणि धोनी हा मला खूप आवडतो,' असं तिन सांगितलंय. तिच्या या 'क्रश'ची चर्चाही सध्या सोशल मीडियात रंगली आहे. (सौजन्य: मटा)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 02/20/2018 - 07:52 नवीन
सरकारने नीरव मोदीचं आधार कार्ड रद्द केलं आहे. अाता त्याच्याजवळ रुपये तर 11000 कोटी असतील पण तो मोबाईल फोनचं सिमकार्ड घेवू शकणार नाही. आणि आधार रद्द झाल्यामुळे त्याला गॅस सबसिडीसुद्धा मिळणार नाही . बस म्हणावं बोंबलत !! याला म्हणतात मास्टरस्ट्रोक..
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 02/20/2018 - 08:26 नवीन
फॉर्वर्डस खाली फॉर्वर्डस असं लिहिण्याचा संकेत पाळत चला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 02/20/2018 - 09:10 नवीन
बिटाकाका , शहाण्या लोकांना विनोद कळतात आणि त्यावर हसतात . साखरेची सालं काढत बसत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 02/20/2018 - 09:29 नवीन
मला हसू आले नाही असे लिहिले आहे का वर कुठे? नाही तुम्हाला स्वतःला शहाणे म्हणून घ्यायचे असेल तर तसे सांगा, म्हणून टाकू कि तुम्ही लै शहाणे! हाय काय आन नाय काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
स्वधर्म Tue, 02/20/2018 - 08:34 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अर्धवटराव Tue, 02/20/2018 - 14:32 नवीन
=)) =))=)०)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 11:18 नवीन
आता २०१९ मधे चिदू पुन्हा अर्थमंत्री बनेल तेव्हा एक ७ मॅचांची सिरिज पाहायला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा