ताज्या घडामोडी - भाग २३
'जिओ' मुळे अजून एक दूरभाष कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याआधी टाटा टेलिकॉम व रिलायन्स कम्युनिकेशन्स (अनिल अंबानी) या दोन कंपन्या बंद पडलेल्या आहेत. आता एअरसेल ही कंपनी दिवाळखोरीसाठी अर्ज करीत आहे. एअरसेलने संचालक मंडळ बरखास्त करत दिवाळखोर जाहीर करावे यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका कंपनीच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत.
https://www.loksatta.com/arthasatta-news/telecom-company-aircel-national-company-law-tribunal-bankruptcy-rs-15500-crore-debt-sbi-1633902/
💬 प्रतिसाद
(201)
स
सुखीमाणूस
गुरुवार, 02/22/2018 - 05:18
नवीन
http://www.esakal.com/pune/marathi-news-sharad-pawar-raj-thackeray-world-marathi-academy-bvg-group-99266
या बातमीत शरद पवार म्हणतात दलित व आदिवासी सोडून सर्वांना आर्थिक निकष लावून आरक्षण दिले पाहिजे.
हे असे त्यान्चे आजकाल चे मत की श्रोते कोण आहेत याप्रमाणे केलेले विधान?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/22/2018 - 05:24
नवीन
ते बोलतात तसे करत नाहीत
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 02/22/2018 - 06:51
नवीन
हि सगळी मुलाखतच एक विनोद वाटली. पूर्णतः राजकीय पद्धतीची मुलाखत, मुलाखतकाराने प्रश्न विचारायच्या ऐवजी स्वतःची मते सांगून मग यावर तुमचे काय म्हणणे आहे असे विचारणे आणि मग त्यावर परत राजकीयच उत्तर. मला वाटले एक उत्तम मुलाखत होईल पण भ्रमनिरास झाला. रॅपिड फायर त्यामानाने बरा होता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/22/2018 - 09:21
नवीन
ही मुलाखत म्हणजे जिल्हा परीषदेच्या शाळेतील दोन नापास विद्यार्थी विद्यापीठात मेरीट मध्ये आलेल्या विद्यार्थ्याचे कुठे, कसे चुकतंय याची चर्चा करत होते.
- हे दोघेही अत्यंत उपद्रवी व निरूद्योगी आहेत.
- दोघांचीही राजकीय इनिंग संपलेली आहे, परंतु आपली इनिंग संपलीये हे दोघांनाही समजलेलं नाही.
- दोघांनाही प्रसिद्धीची नितांत गरज आहे. मोदींना शिव्या दिल्या की फुकट प्रचंड प्रसिद्धी मिळते हे दोघांनाही माहिती आहे.
म्हणून हा मुलाखतीचा खटाटोप!
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 02/22/2018 - 10:50
नवीन
जिल्हा परिषदेच्या शाळेचा उल्लेख अनावश्यक वाटला.
- Log in or register to post comments
ए
एकच वादा ओन्ली दादा
Sat, 02/24/2018 - 08:14
नवीन
मास्तर जरा धीराने घ्या.
सगळंच सर्वकाळ टिकत नसतं.
हे जाऊ द्यात दोघे नापास आहेत पण अर्रर्र कॉप्या करून मेरिट मधी आलेलं पण काय कामाचं नाही. त्यातल्या काही कॉप्या उचलून काटाव पास झालेलं त्याच तर काय विचारूच नका. परीक्षा झाली तरी अभ्यास करतेय अजून.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/24/2018 - 12:52
नवीन
या मुलाखती पासून स्फूर्ती घेऊन महापलिकेच्या शाळेत सातत्याने अनुत्तीर्ण झालेला एक ढ विद्यार्थी स्वत:च स्वत:ची मुलाखत घेऊन स्वत:च्याच वृत्तपत्रात स्वत:च छापणार आहे म्हणे.
मुलाखतीचा विषय अर्थातच "विद्यापीठात मेरीट मध्ये आलेल्या विद्यार्थ्याचे कुठे, कसे चुकतंय याचे सडेतोड विश्लेषण"!
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/22/2018 - 11:03
नवीन
जो पक्ष सत्तेत असतो तो नेहमी जातीय आरक्षणच ठेवतो. आर्थिक आरक्षण बाजूला ठेवतो.
विरोधी पक्ष हे उलट करायला सांगत असतो.
भाजपा विरोधी पक्षात असताना असेच करत होता.
आता पवारसो विरोधकात असल्याने ते तसे बोलताहेत.
- Log in or register to post comments
ए
एकच वादा ओन्ली दादा
Sat, 02/24/2018 - 08:19
नवीन
maangu राव तुम्ही राव लय हुशार आहात बरका. तुमच्या सारखा एखादा आमच्या पक्षात पाहिजे होता. बघू विचार करू तुमचा. यंदा महाराष्ट्रात माझ्याकडंच सगळी सूत्रं आहेत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 02/22/2018 - 14:23
नवीन
अपेक्षेच्या मानाने अगदीच पुचाट झाली मुलाखत.
- Log in or register to post comments
ए
एकच वादा ओन्ली दादा
Sat, 02/24/2018 - 08:08
नवीन
यासाठी तर मी त्यांच्या कोणत्याच सभेत जायला टाळतो. ताप आला म्ह्णून सांगतो, तिथे जाऊन डोक्याला ताप करून घेन्या पेक्षा.
- Log in or register to post comments
ए
एकच वादा ओन्ली दादा
Sat, 02/24/2018 - 08:06
नवीन
श्री सुखीमाणूस , श्री मंगुरू, आमचे जेष्ठ तटस्थ बिटाकाका, आमचे विरोधक मुलुखमैदान तोफजी श्रीगुरुजी, श्री अर्धवटराव, आमचे कारकर्ते मार्मिकजी गोडसे आणि व्यासपीठावर असणाऱ्या इतर सदस्य आणि वाचक मंडळींना दादांचा नमस्कार. (हि स्टाईल आहे आमची लोकांची नावं वाचायची)
तिकडे आम्ही हल्लाबोल करत उन्हातान्हाचं हिंडतोय, टपरीवर जाऊन कॉफी-भेळ खाऊन पक्षाचा खर्च वाचवतोय आणि इकडे आमचे साहेब त्यांच्या कॉलेजात जाऊन मुलाखती देतात. मी म्हणतो द्या कि मुलाखत पण त्यांचे मित्र सगळंच सांगत सुटले कॉलेजचं राव. कॉलजेजमधली प्रकरणं कुठं बारक्या पोरासोरांसमोर सान्गत असत्यात का? फक्त मित्रामधीच चर्चा करायची असते हे भानच विसरून गेले. काकी समोर बसल्यात हे पण कळंना.
आणि त्या राजाला तरी कळायला पाहिजे आपण कोणाला काय विचारतोय ते.
राजा तर एवढा आव आणत होता कि जणू हा दुनियेच्या आक्रीत मुलखात घेणारा.
त्याच्यात त्याने सगळे स्वतःच्या घरचेच प्रश्न मांडत बसला. शेवटी विचारतोय *राज का उद्धव*. लंका इथे सखा पुतण्याला जवळ करत नाही आणि म्हणे *राज का उद्धव.*
राजीनामे घेतले आणि आत्मक्लेश करायला लावले होते. त्यावेळेस सांगत होतु, आमदार माझ्या मागे आहेत, ह्या कराडच्याला वीरचा कॅनॉल दाखवू. चांगला मुख्यमंत्री झालो असतो. पुढीची टर्म पण ह्या नागपूरकरांच्या घशात गेली नसती. पण नाही. कंट्रोल जाईल ना. पण आता बसा पाहुणचार करत.
.जाऊ द्या जास्त नाही बोलत, नाहीतर हे पत्रकार मंडळी बस्त्याल लिहून *काका-पुतण्याचे* मतभेद. कुठे नसत्यात, पण आम्ही त्यांना सोडून नवा संसार मांडणार नाही लगेच. संस्कार लागतात त्यासाठी.
आरक्षणाचा मुद्दा यांच्या कोणाच्या पल्ले पडणार हाय का ? दुसरे म्हणजे आमच्या काकांचा डोक्याला जास्त डोकं लावत नका बसू. याड लागल सैराट सारखं. आता ते मुंबईच वाघ बसलाय खुळ्यासारखा सामन्यात लेख पाडत
ते काय आहे ते ताई आणि मलाच माहित आहे, आठवले म्हणून सांगितले. विनोदाचा भाग सोडून द्या. कारण *त्या* विनोदाला भागच नाही. धरणापासून आता ताक पण फुंकून पितो.
माणूस मी सरळ स्वभावाचा आहे. मनात काही ठेवत नाही काय असेल ते तोंडावर. कुचूकुचू करायला आपल्याला जमत नाही. काम होत असेल तरच हो म्हणतो नाहीतर सरळ सांगतो हे काम होणार नाही, महाराष्ट्रात कोणाकडं पण जा, ते होणारच नाही.
एवढे बोलून तुमची रजा घेतो. काही काम असेल तर बिनधास्त फोन करत राहा, मी सदैव तुमच्या मदतीला आहे.
ये सुरेश गाडी काढ बाबा. जायचंय पुढे दुसऱ्या सभेला.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 02/24/2018 - 11:59
नवीन
हाहाहा..!!
दादा प्रयत्न आवडला..!
खरंच काटेवाडीचे का तुम्ही?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 02/24/2018 - 15:08
नवीन
छान जमलाय बाज.
पुतणेसाहेबांचं खरच असं असतं म्हणतात. त्यांचं सरकार असतानाची गोष्ट. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर काहि लोचा झाला आणि ट्राफीक नडलं. एका म्हातर्या बाबाला काहि मेडीकल कि काय अर्जन्सी होती. त्याने सरळ फोन लावला पुतणे साहेबांना. थोड्याच वेळात पोलीस आले आणि त्याला लगोलाग मुंबई पोचवुन त्याचे प्राण वाचवले.
- Log in or register to post comments
ए
एकच वादा ओन्ली दादा
Mon, 02/26/2018 - 11:20
नवीन
तेव्हा उपमुख्यमंत्री होतो. कोणी कधी बी फोन करायचं. आता पण करतात. मी म्हणतो माझ्याकडून कामं करून घेता अन मतदान कमळला कर्ता. जाऊ दे म्हणतो परत. जनतेचे काम महत्वाचं आहे. एकदा दुपारी डब्बा खात होतु तर मोरगावरुण एकाचा फोन,आला. *दादा, ग्रामपंचायतीवाले खांबावर बल्ब बसवत नाहीत*. त्याला म्हणलं आता मी येऊ का का खांबाव चढायला. जिल्हा परिषद अध्यक्षाला फोन लावून सांगितलं, जिथं असशील तिथनं पहिला मोरगावला जा आणि खांबावर बल्ब बसवून झाले कि मला फोन कर. आजच्या आज नाही झालं तर तुझं कनेक्शनचं तोडतो मग.
प्रशासन सत्तेत नसताना पण आपला नंबर दिसला कि खुडचिवन उठ्ट्यात आणि बाहेर जाऊन फोनवर बोलतात. ह्या फेकड्याना साधा शिपाईपण इचारत नाही अजून.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 02/26/2018 - 11:38
नवीन
फोन नंबर द्या , म्हणजे कधी प्रॉब्लेम आला तर कॉल करुन अनुभव घेइन :)
- Log in or register to post comments
ए
एकच वादा ओन्ली दादा
Mon, 02/26/2018 - 13:14
नवीन
985005122
खराय. नुसता मिस कॉल देऊ नका.
प्रॉब्लेम आला तरच फोन करा.
- Log in or register to post comments
श
शलभ
Mon, 02/26/2018 - 13:40
नवीन
हे मस्त केलत.
मला पण अजित दादा आवडतात मोठ्या साहेबांपेक्षा जास्त. कामाचा आवाका मोठा आणि त्यांची जरब पण. काहितरी बोलून गेले तर लोकांनी खूप ताणलं ते.
पण सिंचन घोटाळा नडला.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 02/26/2018 - 17:30
नवीन
दादोबा,
985005122 ? एखादा आकडा गहाळ झालाय का ?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Mon, 02/26/2018 - 17:45
नवीन
जाऊ दे म्हणतो परत. जनतेचे काम महत्वाचं आहे.
हो ना जनतेच्या कामातच पडले न पडले ७०,००० कोटी मिळतात. तेज्याला मोबाईल नंबरात ९ आकडे वेगळे अन सत्तर हजार कोटीत पूज्य मोजणे वायले! मजाय दादा
टीप :- मला 'शुद्ध भाषिक' समजण्याचा प्रकार करू नका दादा ;)
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/22/2018 - 17:02
नवीन
'टान्स्परन्सी इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्थेने २०१७ चा 'ग्लोबल करप्शन इंडेक्स' जाहीर केला असून भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत आजही ८१ व्या स्थानी असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. २०१५ मध्ये या यादीत भारत ७९ व्या स्थानी होता. त्यात किंचित सुधारणा झाली असली तरी भ्रष्टाचार रोखण्यात अपेक्षित यश मिळालेले नाही, हेच यावरून दिसत आहे.
https://m.maharashtratimes.com/india-news/india-ranks-81st-in-global-corruption-perception-index/articleshow/63032929.cms
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/22/2018 - 18:31
नवीन
https://m.maharashtratimes.com/business/business-news/rotomac-pens-owner-vikram-kothari-son-arrested-by-cbi/articleshow/63033344.cms
रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारी या दोघांना अखेर अटक करण्यात आली आहे. देशातील ७ बँकांकडून कर्ज घेऊन त्यांची ३ हजार ७०० कोटींची फसवणूक केल्याचा कोठारी व कुटुंबीयांवर आरोप आहे. याप्रकरणी गेल्या ४ दिवसांपासून कोठारी पिता-पुत्राची सीबीआयकडून कसून चौकशी सुरू होती. या चौकशीतून ठोस पुरावे हाती लागल्यानंतर आज या दोघांनाही अटक करण्यात आली.
"याची चौकशी आमच्या काळातच सुरू झाली होती".
- श्री. रा. रा. पप्पू
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Fri, 02/23/2018 - 05:57
नवीन
आज (२३ फेब्रुवारी) बातमी वाचली ती अशी:
महाराष्ट्रातील आठ जिल्हा सहकारी बँकांकडे जुन्या नोटांच्या रूपात असलेले १०१ कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने बदलू द्यायचे नाकारले असून, 'तोटा म्हणून तुमच्या हिशेबात दाखवा' असे त्यांना सांगितले आहे.
प्रथमदर्शी तरी हा अगदी सरळसरळ अन्याय दिसतोय. (बातमीत असेही म्हटले आहे की या नोटा बलून द्यायला रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०१६ पासूनच नकार दिला आहे.) सरकारचा जिल्हा सहकारी बँकांवर रोष असेल, त्यास काही कारणेही असतील, पण जर ही बातमी खरी असेल तर बाब चिंताजनक आहे.
Frankly, सरकार इतक्या आततायीपणे वागेल ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते आहे. जाणकारांनी यावर थोडा अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/23/2018 - 06:33
नवीन
फडके साहेब
निश्चलनीकरणाच्या दिवसानंतर सहकारी बँकांना जुन्या नोटा घेण्यासाठी मनाई होती. शिवाय रात्री आठ वाजता प्रत्येक बँकेत किती रोख रक्कम आहे हे रिझर्व्ह बँकेला रोज कळवावे लागते.( याच साठी निश्चलनीकरणाचा निर्णय बँकांच्या कडे असलेली रोख रक्कमॅच हिशेब रिझर्व्ह बँकेकडे पोहोचल्यावर रात्री आठ वाजता जाहीर केला होता)
त्यामुळे ८ नोव्हेंबर २०१६ रात्री ८ वाजता यादिवसानंतर सहकारी बँकांनी स्वीकारलेल्या नोटा या बेकायदेशीर ठरतात.
साधा सरळ हिशेब आहे. या बँकांच्या संचालक मंडळाने/ किंवा त्यांच्या संबंधितांनी आपल्या जुन्या नोटा बदलून घेण्याचा हा भ्रष्ट प्रयत्न आहे. अर्थात तो नाही झाला तरी यांच्या जुन्या नोटा आता बँकेचा तोटा म्हणून सामान्य ग्राहकांच्या बोडक्यावर बसणार आहे.
एवढं सगळं झाल्यावरहि ३० जून २०१७ पर्यंत हिशेब केलेल्या नोटा भरण्यासाठी सरकारने परवानगी दिली होती. आता याना बेहिशेबी नोटा सुद्धा बदलून हव्या असतील तर कठीण आहे.
सगळे कसे साळसूदपणे अन्याय झाला आणि सरकार आणि रिझर्व्ह बँक मात्र हडेलहप्पी करीत आहे म्हणून टाहो फोडत आहेत
Even as the window to deposit scrapped notes in the Reserve Bank of India closed on Thursday, 31 district central cooperative banks (DCCBs) in Maharashtra were still left with around Rs200 crore in old currency. The RBI argued that the banks collected these notes after they were demonetised on November 8 last year.
http://profit.ndtv.com/news/economy/article-government-allows-co-operative-banks-to-deposit-old-notes-with-rbi-1714848
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Fri, 02/23/2018 - 07:19
नवीन
धन्यवाद, डॉक्टर साहेब.
वाटलेच होते असे काहीतरी असणार. Times of India आणि त्यांची भावंडे, अशा कोणत्याही गोष्टीला त्यांना हवा असलेला रंग देण्यात पटाईत आहेतच.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Fri, 02/23/2018 - 07:24
नवीन
बँकांच्या संचालक मंडळाने/ किंवा त्यांच्या संबंधितांनी आपल्या जुन्या नोटा बदलून घेण्याचा हा भ्रष्ट प्रयत्न आहे. अर्थात तो नाही झाला तरी यांच्या जुन्या नोटा आता बँकेचा तोटा म्हणून सामान्य ग्राहकांच्या बोडक्यावर बसणार आहे.
खरं आहे. ह्या बँकांच्या खातेदारांना विनाकारण शिक्षा होतेय. वर्षभरापासून ह्या खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसेही मिळालेले नाही. दिल्लीतील एका खाजगी बँकेच्या शाखेतही असा गैरव्यवहार झाला होता, परंतु त्यावर अशी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/23/2018 - 09:02
नवीन
सहकारी ब्यान्का हे इतर पक्षांचे प्रमुख अंग असल्याने हा निर्णय त्याना बुडवायलाच केला होता.
सहकारी ब्यान्क , जिचे director शहा होते , ती मात्र सुरु होती.
http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/%E2%80%98Rs.-500-cr.-deposited-in-co-op-bank-where-Amit-Shah-is-director%E2%80%99/article16967013.एचे
सहकारी ब्यान्केत अफरातफर होते , हे कारण सरकारने दिले.
पण नोटाबंदीच्या काळात नव्या नोटा य्याक्सिस , आयशीआयशी अशा मोठ्या ब्यान्कातूनच बेकायदेशीरपणे बाहेर आल्या. त्या मात्र अगदी व्यवस्थित् सुरु आहेत.
काहीतरी अचाट केले , म्हणून कुठल्यातरी नोटा ० करायला हे केले.
नोटाबंदीच्या ऐन काळातच voluntary disclosure चीही संधी दिली ... मग ती का दिली ? आणि त्यात सर्वाधिक पैसा देणारी व्यक्ती गुजरातचीच निघाली, हीही एक गंमत.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/23/2018 - 09:04
नवीन
http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/%E2%80%98Rs.-500-cr.-deposited-in-co-op-bank-where-Amit-Shah-is-director%E2%80%99/article16967013.ece
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/23/2018 - 14:41
नवीन
ब्यांका सगळ्याच आजही सुरु आहेत.
बाकी हा पृथ्वीराज चव्हाणांनी नुसता आरोप केला आहे.
त्याचे पुढे काय झाले ते सांगा कि
तसा त्यांनी आपल्याच पक्षातील दिग्गजांवर आरोप केला होता त्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला.
Chavan in an interview to 'Telegraph' has claimed that the Adarsh report had brought out former CM Ashok Chavan's 'quid pro quo involvement' in Adarsh scam and had also put under scanner former CMs Vilasrao Deshmukh and Sushilkumar Shinde. However, Prithviraj claimed that he could not send Deshmukh, Shinde and Chavan 'to jail' (as) it would have hit the party' (and) 'party would have split'.
Read more at:
//economictimes.indiatimes.com/articleshow/44819087.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/adarsh-scam-cm-prithviraj-chavan-claims-ashok-chavans-involvement/articleshow/44819087.cms
आणि हे ते मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसलेले असताना म्हणाले
म्हणजे पहा आता
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Fri, 02/23/2018 - 11:30
नवीन
कृपया अज्ञान पसरावू नये.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/23/2018 - 14:13
नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/One-time-60-penalty-for-voluntary-cash-disclosure/articleshow/55628590.cms
आणि नंतर बोल्ले ६० % द्या अन ४० % घेऊन गप बसा.
विसरलेत का ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 02/24/2018 - 11:11
नवीन
कोण आणि केंव्हा बोलले हो काळा पैसा वाल्याना अटक करू?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sat, 02/24/2018 - 11:37
नवीन
Don't underestimate a government based on honesty. We are using technology to trace people who deposited money. You can see how people are being arrested with black money.
http://www.thehindu.com/news/national/We-need-to-free-country-from-black-money-corruption-Modi/article16904719.ece
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 02/23/2018 - 06:25
नवीन
https://www.loksatta.com/aurangabad-news/teacher-appeal-jalna-administration-not-to-close-school-1635714/
आज सकाळी सकाळी हि बातमी वाचली. मनाला खूप वेदना झाल्या.
असे दुर्मिळ शिक्षक दुर्गम भागात शिक्षण द्यायचे एवढे पवित्र काम करतात. शाळा चालू राहावी म्हणून सगळ्यांचे उंबरे झिझवतात पण सरकारी आदेशापुढे त्यांचे चालत नाही आहे.
धोरणे आखणाऱ्याने सारासार विचार करून ती आखली आहेत का हा प्रश्न पडतो.
फक्त सगळे चोर आणि भ्रष्टाचारी एवढेच डोक्यात ठेवून काम करत असतील अवघड आहे.
माझी मुलगी सर्व सोयीयुक्त ५ किमी शाळेत जाती तरीही ती परत घरी येईपर्यंत रोज किमान मी ४ वेळा फोन करत असतो.
त्या दुर्गम भागातील मुलांचे भवितव्य काय?
सरकारने अशा अपवादात्मक परिस्थितील शाळांबाबत विचार करावा, असे वाटते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/23/2018 - 07:13
नवीन
शासकीय बाबूंना शिक्षणाचे काहीही घेणे देणे नसते. त्यांना फक्त कागदी घोडे नाचवणे ठाऊक असते. एकीकडे अंत्योदयाचे मोठे पोवाडे गातात पण प्रत्यक्ष काही नसते. अर्थात या प्रकरणात हा नियम बदलणे किंवा त्याला अपवाद करणे फक्त सक्षम अधिकाऱ्याच्या हातात असते आणि हा सक्षम अधिकारी मंत्रालयात शिक्षण खात्यात बसलेला असतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांनी या बांबूचे बूड हलवले तरच काही काम होईल. जिल्हा पातळीवर कितीही खेटे घाला काहीही होणार नाही.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 02/23/2018 - 11:35
नवीन
बातमी वाचून वाईट वाटले..सरकरी यंत्रणेने नियमांचा उपयोग सदसदविवेक बुद्धी राखून करावा हि अपेक्षा. काल लोकसत्ता मध्ये अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यावर आलेला लेख वाचून असेच वाईट वाटले. लहान मुले कोणत्याही देशाचे भविष्य असतात. गुंड, भ्रष्ट, आणि ताकतवर लोकासाठी झुकणाऱ्या शासकीय यंत्रणेने अश्या प्रकरणात (वरील प्रकरण) योग्य ती खात्री करून लवचिकता दाखवावी हि अपेक्षा.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 02/23/2018 - 12:24
नवीन
माझ्या घराच्या १०० पाऊलावर अंगणवाडी आहे.
तेथील अंगणवाडी परिचारिका लहान मुलांची इतकी काळजी घेतात कि खुद्द त्यांचे पालक पण घेत नसतील.
मुलांचे वजन अर्धा किलो ने जरी कमी झाले तर BDO त्यांना जाब विचारतो.
निर्सरी पेक्षा त्या चांगल्या शिकवत आहेत. मराठी बरोबर इंग्रजी मुळाक्षरे-अंक शिकवले जातं. पोषक आहार देखील चांगल्या पद्धतीने बनवला जातो.
माझ्या मुलीला शनिवारी सुट्टी असते, ती फुंसुक वंगडु सारखी जाऊन बसते वर्गात. त्या बसून पण देतात.
कारण वस्तीवर अंगणवाडी असल्यामुळे आणि यावर्षी पट कमी असल्या कारणाने, ती बंद करतील कि काय याची त्यांना भीती आहे.
.............
अवांतर : अंगणवाडी सेविकांनी आघाडी सरकार विरोधात रान पेटवले होते आणि भाजप ला भरघोस मतदान केले होते. (आमच्या एक मामी तालुक्यात त्यांच्या गटाचे नेतृत्व करत होत्या) . पण भाजपने त्या बदल्यात त्यांना उचित मोबदला दिला नाही, हे खेदाने नमूद करू इच्छितो.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Fri, 02/23/2018 - 12:49
नवीन
हा अंदाज कि कसे?
========================
सद्य सरकारने मध्यंतरी मानधन ५००० वरून ६५०० केले व सेवाजेष्ठतेनुसार अधिकचे मानधन देण्याचे मान्य केले. मला वाटते फडणवीसांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेशी बोलून यापेक्षा अधिक देणे सद्य स्थितीमध्ये शक्य नसल्याचे सांगितल्यावर त्यांचा संप मिटला होता. काहीतरी ४०० कोटीची तरतूज ह्या निर्णयासाठी करावी लागली होती.
========================
(तथाकथित) मतदानाच्या बदल्यात मोबदला? हा काय प्रकार आहे?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 02/23/2018 - 13:44
नवीन
पटेल- पाटीदारांनी भाजप विरोधी मतदान केले हे म्हंटले जाते. त्यावेळेस "हा अंदाज कि कसे?" असेच म्हणतो ना. अगदी तसे समजा.
.........
Rs 5,000 to Rs 6,500 अंगणवाडी सेविका आणि Rs 2,500 to Rs 3,500 अंगणवाडी हेल्पर्स असे मानधन वाढवले आहे. ते पण १ एप्रिल २०१८ पासून लागू होणार आहे. जरी संप मागे घेतला असला तरी अंगणवाडी संघटना त्याबद्दल समाधानी नाही आहे.
यावर त्या खात्याच्या मंत्री म्हणत आहेत की राज्यावर आर्थिक ओझे आहे त्यामुळे आहे त्याच्यावर च समाधानी राहा (बातमीत तसे लिहले नाही, शोधत बसाल. वाडीतल्या सेविका सांगत होत्या)
बातमी नुसार फडणवीस यांनी सरकारकडून नियुक्त केलेल्या समितीनुसार मानधन वाढवण्याची असमर्थता व्यक्त केली असून 8,500 ते 13,000 रुपये देण्याची शिफारस त्या समितीने केली होती.
http://indianexpress.com/article/cities/mumbai/anganwadi-workers-call-off-strike-in-maharashtra-4878425/
...............
स्टेक होल्डरच ठरवत असतात मतदान कोणाला करायचे ते.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 02/23/2018 - 13:49
नवीन
स्टेक होल्डरच ठरवत असतात मतदान कोणाला करायचे ते.
पूर्वी दिसला पंजा हाण शिक्का. २०१४ नंतर दिसलं कमळ हाण शिक्का. काही लोक काही का असेना पंजा एके पंजा आणि काही कमळ एके कमळ.
पण हे स्टेक होल्डर निर्णायक मतदान करून ठरवत असतात सरकार कोणाचे आणायचे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/23/2018 - 15:54
नवीन
विशुमित
२ लाख अंगण वाडी कर्मचारी आणि सहायिका आहेत. प्रत्येकी १००० आणि १५०० रुपये वेतन वाढ करण्याने सरकारच्या तिजोरीवर दर वर्षी ३६३ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत परंतु सरकारी अर्थ खात्याला हा बोजा दर वर्षी आणि वाढीव प्रमाणात पडणार आहे.
शेती कर्जमाफीमुळे राज्याची आर्थिक अवस्था अगोदरच बिकट आहे. अगोदरचेच कर्ज किती आहे ते मी बोलत नाही.(४ लाख १३ हजार कोटी)
त्यात आता केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला कि तो राज्याला आज ना उद्या लागू करावाच लागेल. याची तरतूद कशी करायची हा सध्या त्यांच्या पुढे असलेला यक्ष प्रश्न आहे.
पिचकणारी माणसे ३६३ कोटी काही जास्त नाही हे म्हणणारच आहेत मग आमदारांचा पगार कसा वाढवला ६० कोटींचा अतिरिक्त बोजा पडलाच ना.
(POLITICAL COMPULSION) राजकीय अपरिहार्यता.
परंतु
मनात असले तरीही काही वेळेस राज्यशकट चालवणाऱ्या माणसाला असे निर्णय घेता येत नाहीत कारण CASCADING EFFECT होतो म्हणजेच एका वर्गाच्या कर्मचाऱ्यांना संप केल्यास पगार वाढ दिली तर इतर कर्मचारी ज्यांना अगोदरच चांगला पगार आहे ते सुध्दा पगारवाढ मागतात.
राज्याची स्थिती सुधारत आहे. पण राज्याला विकास कामाना निधी उपलब्ध करून द्यायचे असेल कुठेतरी पट्टा आवळायलाच लागतो.
असे असूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रास्त पगार मिळणे हा त्यांचा हक्क आहे याबद्दल शंका नाहीच. परंतु collective bargaining साठी लागणारी संघटित शक्ती त्यांच्याकडे नाही हे त्यांचे दुर्दैव.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/23/2018 - 16:00
नवीन
http://www.firstpost.com/business/maharashtra-budget-2018-states-debt-increases-but-so-has-income-potential-4351519.html
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/23/2018 - 18:48
नवीन
State , central च्या लोकाना सातवेच कशाला , पाचवे सहावेच वेतन द्यावे.
पोस्टात ppf भरायला गेलो की software काम करत नाही , नेट स्लो आहे , ही कायमची उत्तरे ... कंप्लेंट बुक द्या म्हटले तर तेही दिले नाही.
मी चिडून पत्र लिहिले होते ... If your software is of १६ th century , why are you paying २१ century salary to your workers ?
We private sector people work in half salary and we give better quality than you.
त्यांचे १ अपोलोजी लेटर आले .. २ ओळींचे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 02/24/2018 - 08:02
नवीन
मोगा खान
चिडून काय उपयोग?
नोकरशाही म्हणजे "मतिमंद हत्तीण आणि अजीर्ण झालेल्या अजगरा" चे संकरित अपत्य आहे.
तुम्ही कितीही हलवा ती काही ढीम हलत नाही.
मी तुम्हाला खुल्ली ऑफर दिली होती.
आर्मीत भरती व्हा म्हणून. तुम्हालाही ७ व्य वेतन आयोगाचा फायदा मिळेल.
बाकी लोकांना सरकारचे काहीच नको आहे पण नोकरी मात्र सरकारच हवी आहे.
का ते समजले ना?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Fri, 02/23/2018 - 16:26
नवीन
१ एप्रिल २०१८? १ ऑक्टोबर २०१७ पासून लागू झालेली आहे.
==================
बसाल शोधत? मीच लिहिलंय वर ते, वाचत चला!
==================
जाती जातीच्या घोळक्याने मतदान करणारेही स्टेक होल्डर्सच असतात, त्यामुळे त्या वाक्याला काही अर्थ नाही. पाटीदारांच्या मतदानाचा अंदाज नव्हे विश्लेषण आहे. पाटीदार बहुल भागांमधून आलेल्या मतांच्या आकडेवारीने ते ठरवले आहे. तसे काही अंगणवाडीसाठी ठरवता येते का?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 02/24/2018 - 11:51
नवीन
ओके तारखा करेक्टेड.
........
कुठे लिहलय??
........
2014 ला काय जातीच्या आधारावर मतदान झाले होते का?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 02/24/2018 - 12:55
नवीन
प्रतिसाद वाचा. २०१४ ला झाले तरच ते जातीवर आधारित मतदान असेल का?
- Log in or register to post comments
ए
एकच वादा ओन्ली दादा
Sat, 02/24/2018 - 10:31
नवीन
विशुमित पाटील,
तुम्ही आमच्या तालुक्यातलं दिसता. लढ बापू. कच खाऊ नको.
लय लाजायचं बुजायचं नाय, रेटून बोलायचं. कोणी आईच्या पोटातून हुशार होऊन जन्माला येत नाही.
दादा आहे पाठीमागे, घाबरायचं काम नाय अजिबात.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 02/24/2018 - 11:29
नवीन
होय दादा. :)
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/23/2018 - 15:44
नवीन
(तथाकथित) मतदानाच्या बदल्यात मोबदला? हा काय प्रकार आहे?
अगदी अगदी ... आणि काय तो मोबदला ? तर पगार ५००० चा ७००० व्हावा !
किती ती क्षूद्र इच्छा !! पगारवाढीची तामसी इच्छा !!!
मोबदलाच मागायचा तर राममंदिरच्या मोबदल्यात मत असे सात्विक काहीतरी मागायचे !!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »