Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकसभा निवडणूक विरोधीपक्ष जागावाटपाचा फार्मुला कसा असावा ?

म
माहितगार
Sat, 03/17/2018 - 16:41
🗣 154 प्रतिसाद
समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ? पर्याय पहिला १.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन १.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल पर्याय दुसरा समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले २.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन २.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल

प्रतिक्रिया द्या
36398 वाचन

💬 प्रतिसाद (154)
श
शाम भागवत Sat, 03/17/2018 - 17:18 नवीन
थोडक्यात मोदींना पर्याय सुचवा. :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/17/2018 - 17:25 नवीन
अ मिलियन डॉलर क्वेश्चन ! लोकसभेच्या निवडणुकीत एकतर सर्वप्रथम काँग्रेसला जिंकणे अवघड आहे हे मान्य करु . किमान भाजपा जास्तीत जास्त टफ फाईट कशी देता येईल याचा व्हिचार त्यांनी केला पाहिजे. जागा वाटप हा एक क्रिटिकल प्रश्न आहे , त्याला बरीच डेटा अ‍ॅनालिसिस ची मदत घेता येईल. बरेच अ‍ॅडव्हान्सड लेव्हल काम करायचे आहे ह्यात ! पण किमान पहिले ट्रिव्हियल आयटरेशन इथे लिहायला हरकत नाही ! १. ज्या जागांवर मागल्या बेळेस जो मतदार जिंकलेला , त्याला त्या जागेची सीट द्यावी. २. जेथे मागल्या निवडनुकात जिंकलेले पण मोदी लाटेत हरले त्यांना त्या जागी दुसरी संधी द्यावी. ३. जेथे मित्रपक्श थोडक्यात विजया पासुन हुकला तिथे त्यांना समर्थन द्यावे , निवडनुक पुर्व युती करावी! ४. जिथे निर्विवाद पणे भाजपा जिंकणार आहे तिथे भाजपाच्या आमदाराला फोडण्याचा प्रयत्न करावा , जास्तीत जास्त अपक्श कसे उभे रहातील ह्याचा प्रयत्न करावा. हे झाले बेसिक फर्स्ट आयटरेशन . २०१४ नंन्तर मधल्या काळात झालेल्या निवडणुका , इतर घडामोडी , जनतेचा कल , वगैरे मुद्दे लक्शात घेवुन जास्तीत जास्त परफेक्ट सीट अ‍ॅलोकेशन ऑप्टिमायझेशन करता येईल, एकदा सीट ठरल्या की पुढील प्रचाराची स्ट्रेटेजी ठरवता येईल. - डिस्क्लोजर : आम्ही बिजिनेस अ‍ॅनालिस्ट आहोत . आमचा कोणत्याही राजकीय पक्शाशी संबंध नाही. राजकीय पक्षांनी अधिक डिटेल्ड कन्सल्टन्सीसाठी व्यक्तीगत संपर्क करावा .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/17/2018 - 17:34 नवीन
काँग्र्सने हे लक्षात घेणे गरजेचे आहे की राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे मटेरियल नाही. रादर राहुलगांधी पंतप्रधान म्हणुन नको ह्या एका विचारामुळे काँग्रेसची कित्येक मते नोटाला जात असतात. पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणुन कोणालाही जाहीर केले नाही तर तसेही अवघडच आहे . युती केली तरी नितिशकुमार अन ममतादी सारखे कोणी पंतप्रधान पदाचे दावेदार होतील हे वाटणे अशक्य आहे . ते टेबल वर केवळ न्युसन्स पॉवर घेवुन येतात बाकी काही नाही . तुर्तास पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणुन शशी थरुर हे एकच नाव जस्टीफाय करता येण्यासारखे आहे ! पण त्याही पेक्शा बेस्ट म्हणजे तसेही हि निवडणुक जिंकण्याची शक्यता कमी असल्याने राहुललाच पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणुन घोषित करावे अन त्याचा दणदणीत पराभव झाला तरी हरकत नाही , २०२४ मध्ये मात्र प्रियांका वढेरा ह्यांना ट्रंपकार्ड म्हणुन बाहेर काढावे , तो वर भाजपाविरोधात प्रचंड अ‍ॅन्टी ईंकम्बसी ही असेल , २०२४ च्या विजयासाठी अत्ता २०१९ मध्ये एक प्यादे सॅक्रिफाईझ करायला हरकत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
त
तेजस आठवले Sat, 03/17/2018 - 18:07 नवीन
काँग्रेस पार्टी स्वतःच्या मुलाला सॅक्रिफाईझ करणार नाही. तसेच शशी थरूर यांची पुढची वाटचाल सुनंदा पुष्कर मृत्यू निकालावर ठरेल. नितीश कुमार काहीतरी हालचाल करणार असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/17/2018 - 19:27 नवीन
काँग्रेस पार्टी स्वतःच्या मुलाला सॅक्रिफाईझ करणार नाही. हारजीतेने काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना किंsssचितसाही धक्का लागत नाही. उलट त्यांचे प्रवक्ते पुढे येऊन हा सोनिया-राहूल यांचा नैतिक विजय कसा आहे; आणि हार होण्यामागे विपक्षाची/आपल्या पक्षातील कनिष्ठ नेत्यांची चूक व मतदार जनतेचा वेडेपणा कसा आहे हे सांगत असतात. रागा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणात उतरल्यापासून आत्तापर्यंत २७ पराभवांत असेच झालेले आहे. तरीही, बळीबिळी जाणे दूरच पण रागांची "निवडणुकीने आणि एकमताने" पदोन्नती करून पक्षाचे अध्यक्षपद दिले गेले आहे... ते तहहयात राहिल असेच सद्याचा काँग्रेसी इतिहास सांगतो. उलट २८+ व्या पराभवाचे मेडल म्हणून त्यांच्यासाठी अजून एक नवीन वरिष्ठ पद तयार केले जाण्याचीच शक्यता जास्त आहे ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
त
तेजस आठवले Sun, 03/18/2018 - 12:54 नवीन
+१ सत्य. पण ते पचवायची तयारी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बिटाकाका Sun, 03/18/2018 - 13:11 नवीन
एक नवीन वरिष्ठ पद तयार केले जाण्याचीच शक्यता
आधीच तयार असलेले अजून एक बाकी आहे, यूपीए अध्यक्षपद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
त
तेजस आठवले Sat, 03/17/2018 - 18:09 नवीन
किंवा मोदी कोणीतरी असा चेहरा पुढे करतील की जनता त्याच्या मागे जाऊ शकेल आणि मोदी पडद्यामागून सूत्रे हलवू शकतील. काँग्रेस च्या पुढच्या खेळ्या मोदी काय करतात यावरच अवलंबून असल्याने (स्वतःचा काहीच अजेन्डा नसल्याने); मोदी शांतपणे आणि सावध हालचाली करतील आणि शेवटच्या क्षणापर्यंत वेळ काढतील.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/17/2018 - 20:19 नवीन
विरोधकांची सर्वात मोठी गोची अशी आहे की... १. त्यांच्यात सद्यातरी काँग्रेस हा एकच पक्ष आहे जो राष्ट्रिय पक्ष असा दावा करतो... आणि तेही सद्य परिस्थिती लक्षात घेऊन नाही तर केवळ भूतकाल विचारात घेऊन ! बाकी सगळे पक्ष राज्यस्तरीय किंवा त्यापेक्षा कमी प्रभावाचे आहेत. २. काँग्रेसकडे सर्व विरोधी पक्ष एकत्र करून, एकत्र ठेवून, नेतृत्व करेल असा एकही नेता नाही. ज्या कोणाची नावे घेतली जातील त्यांची काँग्रेसमधून गच्छंती होईल. याशिवाय, काँग्रेसने (विषेशतः रागा यांनी) हातमिळवणी केलेला प्रत्येक पक्ष निवडणूकीत बुडाला आहे. (याला एकच अपवाद म्हणजे बिहार, तेथे काँग्रेस तीन क्रमांकाची लिंबूटिंबू पार्टनर होती.) त्यामुळे, कोणत्याही नवीन आघाडीत काँग्रेसचे निर्विवाद नेतृत्व असणे ही गोष्ट ऐतिहासिक झाली आहे. सद्या काँग्रेसला बाहेर ठेवून (विनाभाजप-विनाकाँग्रेस) तिसरी आघाडी बनविण्याचे प्रयत्न चालले आहेतच. :) ३. विरोधी पक्षांची मोट बांधली गेलीच तर आघाडीतले जे महत्वाचे चारपाच नेते आहेत ते पंतप्रधानपदावर नजर ठेवूनच काम करतील आणि प्रतिस्पर्ध्याचा पत्ता कसा काटता येईल इकडे लक्ष देतील... कारण, निवडणूकीनंतर मिळालेले आपले पद राखण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्ध्यांची ताकद व महत्व ताब्यात/कमी ठेवणे हा पंतप्रधान होणार्‍याचा सहाजिक सर्वोच्च उद्येश असेल. अश्या वस्तूस्थितीत, विरोधी पक्षांना, निवडणूकीअगोदरच पंतप्रधानपदाच्या दावेदाराचे एक नाव पुढे करणे सद्य परिस्थितीत शक्य वाटत नाही. तसे करण्याने युती न बनण्याची किंवा ती अल्पकाळासाठी बनून भंगण्याचीच शक्यता जास्त आहे. थोडक्यात... असंख्य वैचारिक मतभेद असलेल्या पक्ष आणि नेत्यांची एखादी युती बनलीच तर, तर इतर काहीपेक्षा वैयक्तिक/पक्षिय हितसंबंध राखणे हा सर्वोच्च उद्येश डोळ्यासमोर ठेवून बनेल. वर वर मैत्रीचे कितिही प्रदर्शन केले तरी, आतल्या गोटात, युतीमध्ये आपले हितसंबंध वरचढ राखण्यासाठी युतीतल्याच कोणाचे किती पाय ओढायला हवेत आणि कोणाशी किती दोस्ती करायला हवी याचे आडाखे मांडूनच प्रत्येकाची कृती होईल. यदाकदाचित युतीला बहुमत मिळालेच तर, कोणत्या मागण्या पुढे करून आपला हितसंबंध (पंतप्रधानपद, महत्वाचे मंत्रीपद, इतर पदे, आर्थिक फायदा, राजकिय फायदा, इ) साधायचा याची गणिते मांडूनच निवडणूकीच्या नंतर कारवाया केल्या जातील (मात्र, याचा विचार व त्यानुसार मोर्चे बांधणी निवडणुकीच्या अगोदरपासून सुरू असेल, हेवेसांन). डझनावारी लहानमोठ्या व परस्पर विरोधी हितसंबंध असलेल्या पक्षांची मोट बांधणे आणि टिकवणे किती कठीण असते हे सांगायला नकोच... त्यांच्या दुर्दैवाने अश्या ताकदीचा एकही नेता विरोधी पक्षांकडे नाही, एखाद्याला नेता केलेच तर ती एक कमकुवत तडजोड (fragile compromise) असेल.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Mon, 03/19/2018 - 02:04 नवीन
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अर्धवटराव Sun, 03/18/2018 - 01:10 नवीन
अपेक्षेप्रमाणे आजच्या घटकेत काँग्रेस, युपीए, भाजप, एनडीए, तिसरी आघाडी अशी पंचरंगी तालीम चालली आहे. त्यातले ऑलमोस्ट सगळेच दोन वा अधीक आघाड्यांवरुन इतरांशी व स्वतःशी देखील लढताहेत. विरोधी पक्षांनी भाजपाविरोध हा एककलमी कार्यक्रम सिरीयसली घेतला तर भाजपचा पराभव अटळ आहे. उत्तर प्रदेशात सपा+बसपा, महाराष्ट्रात काँग्रेस+ राष्ट्रवादी असं समीकरण, राजस्थान-गुजरात-पंजाब-हरयाणामधे भाजपचा घटलेला जनाधार, एन्डीएच्य घटकपक्षांची नाराजी... एव्हढ्या भांडवलावर भाजपच्या १०० जागा आरामात फिरतील. पण... केवळ भाजपा विरोध हा एककलमी कार्यक्रम नसणार.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 03/18/2018 - 05:40 नवीन
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या कल्पनेचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केले आहे. हे सर्व पक्ष एकत्र आले तरी त्यांच्या नरेंद्र मोदींचा पराभव करण्याची क्षमता नसल्याचा टोला लगावला. विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरही त्यांनी भाष्य केले. ३०० हून अधिक खासदारांचा पाठिंबा असलेल्या एनडीएचे सरकार लोकसभेत अविश्वास ठरावाचा सहज सामना करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 03/18/2018 - 15:48 नवीन
लाक्षागृह सिंड्रोम झाला आहे , त्याची लक्षणे दिसू लागली आहेत. लाक्षागृह जाळल्यावर दुर्योधन रोज सकाळी पांडवांबाबत विचारणा करत होता. त्याला भिती वाटत होती , हे चुकुन परत आले तर ? तशीच गत झाली आहे. पूर्ण बहुमतात सत्ता मिळुनही सुख भोगता येईनासे झाले आहे . सकाळ झाली की राहूल , सोनिया , इंदिरा , नेहरु आणि बापूजी , मायावती , ममता , नायडू , यादव इ इ ची आठवण होते. भीती वाटते .. हे परत आले तर ... ? तोंडाने रोज बोलायचे , काँग्रेस नष्ट झाली , सभेत ओरडून सांगायचे , पण आतून धास्ती - कुणीतरी परत आले तर ... !!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 03/18/2018 - 15:58 नवीन
@ manguu@mail.com चर्चा धाग्यातून नेहमीच्या राजकीय विवादा पलिकडे जाऊन काही पर्याय सुचवण्यास सुचवले आहे भाजपावादीमंनी सध्या सत्तेत असताना धागा उद्देशाकडे दुर्लक्ष करणे समजता येते . तुम्ही विरोधी पक्षाच्या कोणत्यातरी एखाद्या गटाचे समर्थक दिसता तेव्हा धागा लेखाच्या अपेक्षेप्रमाणे प्रॅक्टीकल गठबंधनासाठी प्रॅक्टीकल पर्याय सुचवून पहावेत असे वाटते. बाकी विरोधक समर्थकांची जशी मर्जी , असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
प
प्रसाद गोडबोले Sun, 03/18/2018 - 17:42 नवीन
प्रत्येक धाग्यावर विषयांतर करणे आणि बहुतांश वेळा कोणत्यातरी द्वेषाची गरळ उगाळणे हे वारंवार करुनही त्यांच्यावर कारवाई का बरे होत नसावी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बिटाकाका Sun, 03/18/2018 - 16:47 नवीन
अवांतर टाकणे छंद आहे बहुतेक! ----------------------------------- हाहाहा, कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं म्हणतात. मोदींची लोकप्रियता घसरली आहे म्हणायचं आणि प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता दिवसभर फक्त मोदी मोदी करत असतो, ते एक असोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Sun, 03/18/2018 - 16:47 नवीन
अवांतर टाकणे छंद आहे बहुतेक! ----------------------------------- हाहाहा, कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं म्हणतात. मोदींची लोकप्रियता घसरली आहे म्हणायचं आणि प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता दिवसभर फक्त मोदी मोदी करत असतो, ते एक असोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Sun, 03/18/2018 - 17:21 नवीन
>>>> लाक्षागृह सिंड्रोम झाला आहे , त्याची लक्षणे दिसू लागली आहेत. कागलकरांना टॉयलेट सिंड्रोम झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
प
पगला गजोधर Sun, 03/18/2018 - 17:45 नवीन
राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले, आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून.... :(
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 03/18/2018 - 18:24 नवीन
निवडून आलेले लोक असे काय दिवे लावतात म्हणून कोण येईल याची १-२ वर्षे आधी चर्चा करावी?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 03:39 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माहितगार Mon, 03/19/2018 - 05:21 नवीन
निवडून आलेले लोक असे काय दिवे लावतात म्हणून कोण येईल याची १-२ वर्षे आधी चर्चा करावी?
वस्तुतः कोण निवडून येईल ह्या साठी धागा लेख चर्चा लावलेली नाहीच मुळी. धागा लेखाचा उद्देश पुरेसा स्पष्ट आणि तसा फार्युला सुचवण्यापर्यंत मर्यादीत आहे. पण अनुषंगिकावर चर्चा अधिक होते आहे. मी धागा लेखात काही बदल करावयास हवा होता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 05:32 नवीन
. मी धागा लेखात काही बदल करावयास हवा होता का ?
फक्त टायटल, "मोदीं व आर एस एस मुक्त, भारत कसा करता येईल" असं करून पहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 06:04 नवीन
पप्पूच्या पणजोबांपासून सर्व पिढ्यांनी संघमुक्त व पाकयुक्त भारत करण्याचा जिवापाड प्रयत्न केला. ते भारतातून मुक्त झाले, पण भारत संघयुक्त होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 08:25 नवीन
देशात एक अत्यंत सबल सत्ताधारी पक्ष आणि तितकाच सबल आणि प्रगल्भ विरोधी पक्ष असला पाहिजे. मध्यंतरांत विचारधारा इ इ बदलत असतील तर प्रमुख ३-४ पक्ष हवेत. =================== आत्ताची स्थिती दुर्दैवी आहे. बीजेडी सोडला तर कुठलाच प्रादेशिक पक्ष आवडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 03/19/2018 - 08:39 नवीन
.....प्रादेशिक पक्ष आवडत नाही
पण भारतीय मतदार प्रादेशिक पक्षांना मते देतो आहे हि वस्तुस्थिती आहे. या प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीयस्तरावर राजकीय दृष्ट्या एकत्र ठेऊ शकेल असा फार्मुला उपयूक्त असेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 09:10 नवीन
प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय राजकारण आणि समस्या काहीही कळत नाहीत. दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे सगळे पक्ष थर्ड क्लास आहेत. असं काही असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 09:53 नवीन
महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक पक्श अत्यंत थर्ड क्लास आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माहितगार Mon, 03/19/2018 - 10:01 नवीन
हा वैचारीक खंडन आणि राजकीय प्रतिवाद करण्यातील तसेच सिस्टीमॅटीक पणापासून दूर पळणारा भारतीय आळस नाही ना ? फर्स्ट सेकंड थर्ड इत्यादी क्लास सब्जेक्टीव्ह नसतात, मतदाराचे मत मत नसते का ? काल प्रसून जोशींनी खूप छान मत मांडले . मत मत असते कोणतेही मत कमी दर्जाचे नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 13:12 नवीन
वैचारिक आळस इ इ अजिबात नाही. वैश्विक मताधिकार दिला आहे म्हणजे लोकांची त्याची लायकी आहे असं होत नाही. १९८४ मध्ये "कोणालाही माहीत नसलेल्या" राजीव गांधीला "माय मेली म्हणून" मत देणारांना अक्कल नसते. मागच्या बिहारच्या निवडणूकित भ्रष्टाचारासाठी जेलमधल्या लालूच्या सीटा नितिशपेक्षा जास्त आल्या. २०१४ मधे अजिबात कोणती लायकी नसलेल्या पप्पूला २५% मते मिळाली. गुजरातमधे डाव्यांचं असतं तसं उजव्यांचं अखंड सरकार चालू आहे. ======================= भारतात चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या लोकांना सुद्धा अजिबात काही राजकीय जाण नसते. ज्ञान नसतं. विचार तर नसतोच नसतो. असल्या लोकांचं चयन काहीही असू शकतं. जात, पात, धर्म, अधर्म, सेक्यूलरीझम, आदल्या रात्री पाजवलेली दारू, खाऊ घातलेलं चिकन, फिरवलेला पैसा, आणि मूर्ख बनवायसाठी काहीही बोलणार्‍या नेत्यांचा अंध अनुनय हे सगळं मंजे इलेक्शन. कोंबड्यांची झुंज बघितल्यासारखा "राजकीय जाणकारांचा" निवडणूकीतला रस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 13:16 नवीन
भारतात चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या लोकांना सुद्धा अजिबात काही राजकीय जाण नसते. ज्ञान नसतं. विचार तर नसतोच नसतो. असल्या लोकांचं चयन काहीही असू शकतं. !!
सर, हे वरील सर्व कुणाकडे आहे ? आपल्याकडे आहे असा आपला दावा आहे काय ? २०१४ च्या लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल, ह्याच राजकीय जाण नसलेल्या, ज्ञान नसलेल्या , विचार नसलेल्या लोकांचं चयन होतं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 13:29 नवीन
२०१४ च्या लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल, ह्याच राजकीय जाण नसलेल्या, ज्ञान नसलेल्या , विचार नसलेल्या लोकांचं चयन होतं का ?
अर्थातच. अर्थातच. ==================== भाजप चांगला पक्ष आहे हे या लोकांचं नशीब आहे. पण त्यांना भाजपला का मत द्यावं याची अक्कल नाही. २०१४ मधे भाजपनं जिंकायला जे जे केलं ते ते कुणी केलं असतं तर तेही जिंकले असते. २००९ मधे सोनियाबाईच्या २००४ च्या त्यागावर भाळून काँग्रेसला पुन्हा निवडून दिलं होतं. २०१४ मधे भाजपचं मार्केटींग नसतं तर त्यांना २००९ पेक्षा कमी सिट मिळाल्या असत्या. बिनामोदीचा भाजप ही तितकाच चांगला आहे, पण मोदी नसला तर भाजप सॉलिड आपटेल. हेच भाजपच्या मतदारांच्या बुद्धीचं गमक नाही का? ======================== जाण तर जाऊच द्या. द्वेष हा देखील एक निकष आहे इतकं हिणकस राजकारण आहे. हिंदी द्वेष करा, तामिळ नाडू पक्का. ब्राह्मण द्वेष करा, मुसलमान पक्का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 13:20 नवीन
१९४७ मध्ये ज्यांच्या चुकांनी लाखोनी कापले गेलेले, जेव्हा भारतात आले तेव्हा इथल्या सरकारकडून अत्यंत हिनप्रकारे वागवून घेतलेले, ज्यांनी त्यांचे सुवर्णमंदिर उध्वस्त केले, ज्यांनी त्यांच्या देशभर हजारोनी कतली केल्या अशा काँग्रेसलाच नेहमी नेहमी निवडून देणार्‍या पंजाबी लोकांना अक्क्ल आहे असं मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 13:24 नवीन
नै सर, कळलं तुम्ही काय म्हणताय ते ! "अमुक ह्याला अक्कल नाही", "अमुक ह्याला समज नाही" वैगरे... हे सर्व अक्कल समज कुणाकडे आहे ? आपल्याकडे आहे असा आपला दावा आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 13:39 नवीन
हे सर्व अक्कल समज कुणाकडे आहे ? आपल्याकडे आहे असा आपला दावा आहे काय ?
माझ्याकडे आहे. अर्थातच असं वाटतं म्हणूनच मी सामान्य मतदाराला अक्कल नाही असं म्हणतोय. (अर्थातच हे शिष्ट नाही. पण यनावालांची कृपा आहे. अस्तिकांचे (जे ९९% आहेत) मेंदू कूजलेले असतात, त्यांना साधी अक्कल नसते, असं ते म्हणत होते तेव्हा त्यांना पाठींबा देणारे खूप होते. म्हणून माझी ही हिंमत झाली.) =========================
नै सर, कळलं तुम्ही काय म्हणताय ते !
काही काही समाज काही काही शिकले, जगात सर्वात प्रगत म्हणवताहेत. तसं इकडे काही होतंय का, लक्षण आहे का याच्यावर आमचा कॉल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 13:42 नवीन
हे सर्व अक्कल समज कुणाकडे आहे ? आपल्याकडे आहे असा आपला दावा आहे काय ?
माझ्याकडे आहे. अर्थातच असं वाटतं म्हणूनच मी सामान्य मतदाराला अक्कल नाही असं म्हणतोय.
स्पष्ट उत्तरासाठी धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/19/2018 - 16:58 नवीन
पण यनावालांची कृपा आहे. अस्तिकांचे (जे ९९% आहेत) मेंदू कूजलेले असतात, त्यांना साधी अक्कल नसते, असं ते म्हणत होते तेव्हा त्यांना पाठींबा देणारे खूप होते. म्हणून माझी ही हिंमत झाली.) एक निरिक्षण : तुम्ही मधूनच एकदम शालजोडी दूर करून, अचानक... डायरेक्ट डोक्यात हाणता, त्या कौशल्याला दाद ! हे फार विरळ कसब आहे !! :) ;) बाकी राजकारणाच्या चिखलातली हाणामारी दूरून बघण्यात जास्त मजा वाटत असल्याने, त्या मुद्द्यांना पास. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 03/19/2018 - 13:45 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माहितगार Mon, 03/19/2018 - 13:48 नवीन
तुमची सहती नेमकी कोणत्या प्रतिसादाला आहे माहित नाही पण तसे ते शक्यतो गुलदस्त्यात राहण्याचाही फायदा असेल तावातावाने चर्चा करणार्‍या प्रत्येकाला मनातन जरासे हायसे वाटेल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
द
दिगोचि Mon, 03/19/2018 - 02:01 नवीन
समजा महागठबन्धनामुळे २०१९ची निवडणूक भाजपा हरली तर यातील विजेत्याकडॅ फक्तं मोदीन्चा पराभव एवढेच ध्येय आहे त्यामुळे हे देशासाठी काय करणार आहेत तसेच निवदूनआल्यावर पन्तप्रधान कोण होणार व ज्यात लाच सघ्त्घेता येइल ती मन्त्रीपदे कोणाला मिळणार यात मारामारी नक्की होइल त्यामूळे देशाचे अतोनात नुकसान होईल. भ्रश्टाचार बोकाळेल लाचलुचपत वाढेल. मागल्या ७० वर्शात जे झाले ते होइल व चर्चिलचे भारताविशयीचे भवितव्य खरे ठरेल. आशा आहे की मोदी परत निवडून येतील.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Mon, 03/19/2018 - 04:02 नवीन
तुमचा प्रतिसाद वाचून एका सुप्रसिद्ध कवितेची आठवण झाली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगोचि
ग
गौतमीपुत्र सातकर्णि Mon, 03/19/2018 - 07:15 नवीन
मोकलाया दाहि दिश्या ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
द
दिगोचि Mon, 03/19/2018 - 02:08 नवीन
महागठबन्धनात असे नेते आहेत ते पन्तप्रधन व्हवयाची स्वप्ने बालगून आहेत. त्यात प्रमुख म्हणजे शरद पवार, राहुल गान्धी, लालु यादव, ममता बानर्जी, आदि. या लोकामधे युद्ध होईल ते कित्येक महिने धुमसत राहिल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 03/19/2018 - 07:37 नवीन
@ दिगोचि आपली मातृभाषा कुणाची जहागीर नसते. आपली भाषा आपल्या आईने जशी शिकवली आणि आपण जसे शिकलो तसे लिहित रहा. आपल्या प्रतिसादांसाठी आभार. आणि वैचारीक प्रतिवाद न जमण्यामुळे केलेल्या कुजकट प्रतिसादांचा जाहीर निषेद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगोचि
स
सुनील Mon, 03/19/2018 - 05:39 नवीन
पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
मतदार या गोष्टीला फार महत्त्व देतो असे वाटत नाही. चटकन आठवणारी दोन उदाहरणे - १९७७ च्या ऐतिहासिक निवडणूका. तत्कालीन जनता पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीरच केला नव्हता. तरीही त्यांना बहुमताने निवडून दिले गेले. दुसरे उदाहरण २००४ चे. भाजपातर्फे अटलजींचे नाव निश्चित होते. काँग्रेसने नाव जाहीरच केले नव्ह्ते. तरीही मतदारांनी काँग्रेसला सर्वाधिक जागा (युपिएला बहुमत) मिळवून दिले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 06:06 नवीन
२००४ व २००९ मध्ये संपुआला बहुमत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 03/19/2018 - 06:15 नवीन
मुद्दा तो नाहीच. पंतप्रधानापदाचा उमेदवार जाहीर केलेला नसतानाही मतदारांनी काँग्रेसला सर्वाधिक जावा मिळवून दिल्या, हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुनील Mon, 03/19/2018 - 06:16 नवीन
जागा, असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
म
माहितगार Mon, 03/19/2018 - 06:49 नवीन
पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल ........... मतदार या गोष्टीला फार महत्त्व देतो असे वाटत नाही.
मतदार महत्व देतो की नाही हा मुद्दा वेगळा , स्वतः निवडूण आलेले राजकरणी महत्व देतात की नाही हा मुद्दा आहे. निवडून आल्यानंतर पुरेशी स्टॅबीलीटी पंतप्रधान पदावरील व्यक्तीस मिळण्याच्या दृष्टीने मिळावी या साठी व्यक्ती कोण असावी हे डिसाईड करुन नको आहे . गठबंधनाच्या पंतप्रधान पदावरील निवडीसाठी राजकीय फार्मुला काय असावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 07:25 नवीन
ठबंधनाच्या पंतप्रधान पदावरील निवडीसाठी राजकीय फार्मुला काय असावा ?
हे फ्याड अध्यक्षीय लोकशाहीत, अध्यक्षाचे नावे मत मागणे वैगेरे.. माहितीगारजी, आपल्याकडे अध्यक्षीय लोकशाही नाही, तर संसदीय लोकशाही आहे, या छोट्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा