लोकसभा निवडणूक विरोधीपक्ष जागावाटपाचा फार्मुला कसा असावा ?
समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ?
पर्याय पहिला
१.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन
१.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
पर्याय दुसरा
समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले
२.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन
२.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
काँग्रेस पार्टी स्वतःच्या मुलाला सॅक्रिफाईझ करणार नाही.हारजीतेने काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना किंsssचितसाही धक्का लागत नाही. उलट त्यांचे प्रवक्ते पुढे येऊन हा सोनिया-राहूल यांचा नैतिक विजय कसा आहे; आणि हार होण्यामागे विपक्षाची/आपल्या पक्षातील कनिष्ठ नेत्यांची चूक व मतदार जनतेचा वेडेपणा कसा आहे हे सांगत असतात. रागा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणात उतरल्यापासून आत्तापर्यंत २७ पराभवांत असेच झालेले आहे. तरीही, बळीबिळी जाणे दूरच पण रागांची "निवडणुकीने आणि एकमताने" पदोन्नती करून पक्षाचे अध्यक्षपद दिले गेले आहे... ते तहहयात राहिल असेच सद्याचा काँग्रेसी इतिहास सांगतो. उलट २८+ व्या पराभवाचे मेडल म्हणून त्यांच्यासाठी अजून एक नवीन वरिष्ठ पद तयार केले जाण्याचीच शक्यता जास्त आहे ! =))पण यनावालांची कृपा आहे. अस्तिकांचे (जे ९९% आहेत) मेंदू कूजलेले असतात, त्यांना साधी अक्कल नसते, असं ते म्हणत होते तेव्हा त्यांना पाठींबा देणारे खूप होते. म्हणून माझी ही हिंमत झाली.)एक निरिक्षण : तुम्ही मधूनच एकदम शालजोडी दूर करून, अचानक... डायरेक्ट डोक्यात हाणता, त्या कौशल्याला दाद ! हे फार विरळ कसब आहे !! :) ;) बाकी राजकारणाच्या चिखलातली हाणामारी दूरून बघण्यात जास्त मजा वाटत असल्याने, त्या मुद्द्यांना पास. :)