कर्नाटक विधानसभेची निवडणुक १२ मे रोजी आहे. इंडिया टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल.
भाजप - ७८ ते ८६
कॉन्ग्रेस - ९० ते १०१
निजद - ३४ ते ४३
तुमच्या अभ्यासानुसार भाजपा कर्नाटकात हरायला पाहिजे कारण जे कर्नाटकात हरतात तेच केंद्रात सत्तेत येतात असे तुम्ही कुठेतरी लिहिल्याचे वाचले. बघुया काय होते ते. तुमच्या म्हणण्यानुसार घडले तर काँग्रेस ला काही दिवस आनंदात काढता येतील आणि भाजपा ला २०१९ ला आनंदोत्सव साजरा करता येईल. एकंदरीत विन विन सिच्युएशन आहे !
१९८३ पासून असा इतिहास आहे की राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष व केंद्रात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष वेगवेगळे असतात किंवा एकाच पक्षाला दोन्हीकडे सर्वाधिक जागा मिळाल्या तर राज्यात व केंद्रात वेगवेगळे पक्ष सरकार स्थापन करतात. १९८९ ला थोडासा अपवाद होता. त्यावेळी राज्यात खांग्रेसला बहुमत होते व केंद्रात १९५ जागा जिंकून खांग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु केंद्रात सरकार स्थापन झाले ते जनता दलाच्या वि. प्र. सिंगांचे. २००४ मध्येही थोडीशी वेगळी परिस्थिती होती. तेव्हा राज्यात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष होता तर केंद्रात खांग्रेसला सर्वाधिक जागा होत्या. परंतु केंद्रात इतर पक्षांच्या मदतीने व राज्यात निजदच्या मदतीने खांग्रेसचेच सरकार स्थापन झाले होते.
महाराष्ट्रातील या गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षानंतर वीज व एस टी सेवा पोहोचली.
http://indianexpress.com/article/india/maharashtra-bulumgavan-village-gets-electricity-bus-service-70-years-after-independence-5138660/
संशयाचा फायदा देऊन/सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटणे
आणि
राजकीय कारणासाठी नाव खटल्यात गोवलेले असताना कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने निर्दोष सोडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
आणि १९४८ पासून त्याची सुरुवात झाली आहे.
पण तुम्हाला तो समजणार नाही तेंव्हा सोडून द्या
एका बकरवाल माणसाची मुलाखत इथे आहे :
https://www.facebook.com/tgtpost/videos/2122302284655399/
त्यात मुलाखतदाता १ मिनिट ३८ सेकंदांनंतर स्पष्टपणे म्हणतोय की त्यांचा राज्य पोलिसांवर आजिबात विश्वास नाही. हत्येनंतर ७ दिवसांनी मुलीचं प्रेत मिळतं ते म्हणे हिंदू मंदिरात! जनता असल्या भूलथापांवर विश्वास ठेवायला मूर्ख आहे का?
रोहिंगे मुस्लिम येण्याआधी कोणी कधी असले प्रकार ऐकले होते का या प्रांती? मग रोहिंगे घुसल्यावर जर हा प्रकार होत असेल तर जे कळायला पाहिजे ते कळून येतं, नाहीका?
रोहिंग्यांनी अत्याचार करायचे आणि नाव मात्र हिंदूंचं. खासा न्याय आहे.
-गा.पै.
हे असेच मुद्दे काढले जातील अशी खात्री वाटते. सर्वत्र अपयशी होत असलेल्या सरकारचा बचाव अश्या प्रकारे थातूरमातूर मुद्दे मिडियाला चघळायला देऊन करण्याचा जुनाच डाव भागवत खेळताहेत. हे आता वाढत जाईल.
कठुआतील ८ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. त्यात चंद्र प्रकाश गंगा आणि चौधरी लाल सिंह हे भाजपचे दोन मंत्री सहभागी झाले होते. या दोन्ही मंत्र्यांना जनक्षोभामुळे आधीच राजीनामे द्यावे लागले असून आज उरलेल्या सर्व ९ मंत्र्यांचे राजीनामे भाजप नेतृत्वाने घेतल्याने जम्मू-काश्मीरच्या राजकारणात भूकंप झाला आहे.
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या इशाऱ्यामुळे भाजपला हा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. ज्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत त्यांची खाती बदलली जातील. मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जातील. याबाबत मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले जात आहे.
मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याला ११ मंत्रिपदं आलेली आहेत. या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर फेरबदल करताना यातील काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची तर काही नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पासाठी गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नाणारमध्ये तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. खरंतर नाणारमध्ये सर्व जमिनी या स्थानिक शेतक-यांच्या आहेत. मात्र फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, नाणारमध्ये जमीन खरेदी करणा-यांपैकी ८६ पैकी ३८ जण व्यापारी असून यामध्ये मोदी, जैन, शाह, झुनझुनवाला यांची नावे आहेत. २ मे २०१७ ते १९ जानेवारी २०१८ दरम्यान म्हणजे फक्त आठ महिन्यांत व्यापा-यांनी जवळपास ५५९ एकर जमीन खरेदी केली आहे. यावरुन राजकारणी आणि व्यापा-यांची साटंलोटं असल्याचं सिद्ध होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
‘एकीकडे स्थानिक विरोध करत असताना जमीन खरेदी करणा-या व्यापा-यांनी जे आता मालक आहेत त्यांनी आधीच एनओसी देऊन टाकली आहे. व्यापा-यांना या प्रकल्पाची माहिती कशी काय मिळाली ? इथल्या जमीन खरेदी करण्यात त्यांना अचानक इतका रस का आला ? याचा थेट अर्थ आहे की, काही राजकारण्यांनी व्यापा-यांना नाणारमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे व्यापा-यांना तब्बल २०० टक्के नफा होणार आहे आणि तोदेखील सफेद पैशांमध्ये’, असं संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी म्हटलं आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/559-acres-land-purchased-by-trading-community-in-jusy-8-months-1665140/
घाणेरडी पत्रकारिता, त्याला फॉलो करणारे अंधविरोधक मग काय आनंदी आनंद!!
*************************************
८६ पैकी ३८ म्हणजे साधारणपणे ४५ टक्के व्यापारी. उरलेले कोण हे सांगणे गरजेचे नसते! या ३८ पैकी ४ म्हणजे साधारण १०-११% तथाकथित गुजराती. बाकीचे कोण हे सांगणे गरजेचे नसते. आणि या सगळ्यातून सांगायचे काय आहे तर बघा बघा आधी जमिनी विकत घेऊन मग गुजरात्यांच्या फायद्यासाठी प्रकल्प आणणार आहेत. आणि वरून दाखला विकणाऱ्यांचा. त्यांना स्वतःचं भलं बुरं कळत नसणारच ना? गन पॉईंट वर जमिनी घेतल्या असतील तर वरील बातमीत काही तरी अर्थ असता आणि कारवाईची, विरोधाची आवश्यकता असती. या असल्याच गोष्टी माध्यमांची विश्वासार्ह्यता रसातळाला घेऊन जात आहे.
*************************************
बादवे, तुमचं नाणार प्रकल्पाबद्दल काय मत (काही असलं तर) आहे? कि वरील प्रतिसादामागे काही विशेष हेतू आहे?
जवळपास ८६ शेतक-यामनी आपली ५५९.७७ एकर जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. ही जमीन मे २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान खरेदी करण्यात आली आहे. १८ मे २०१७ रोजी राजापूरमध्ये जमीन अधिग्रहणाचं परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर या जमिनींची खरेदी-विक्री झाली. ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यांच्यात मोदी, जैन, मुदीराज, वाधवा, मुदियार, सिंघव, निलवर, शाह, दोशी, कटारिया, केडिया, चंदर, थाववरी, रथी आणि झुनझुनवाला यांचा समावेश आहे. यांच्यात काही जाधव, कारंजे, देवळेकर, जोशी असे महाराष्ट्रीयनदेखील आहेत.
जमीन अधिग्रहणाची सूचना मे २०१७ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एखाद्याने जमीन विकत घेतली तर एवढाआरडाओरडा कशासाठी? विकणा-यांना अक्कल नव्हती का? विकण्याची सक्ती होती का? सरकार जमीन विकत मागतंय तर द्यायची तयारी नाही. पण खाजगी व्यक्तीला विकून मोकळे झाले. मग आता प्रॉब्लेम काय आहे?
बादवे, तुमचं नाणार प्रकल्पाबद्दल काय मत (काही असलं तर) आहे? कि वरील प्रतिसादामागे काही विशेष हेतू आहे?
बीटाकाका,
त्यांचा एकच हेतु, फुकटचे १५ लाख कधी मिळणार ! तो पर्यंत गरळ ओकतच रहाणार !!
बर मिळाल्यावरही गरळ बंद होईल ह्याची खात्री नाही !!
हिंदू मुस्लिम ख्रिस्चन सगळ्या राजांच्या तिजोर्या आमच्या बापजाद्यानीच भरून दिल्यात.
कधीतरी राजतिजोरीतून १५ लाख आलाच पे आउट तर मी बिनधास्त घेईन.
तुम्हाला नको असतील तर तेही मला द्या.
इंद्राणी मुखर्जीने चिदंबरमविरुद्ध कोर्टात जबाब दिला होता म्हणे. भक्त लोक नाचत होते की म्हणे असा जबाब फिरवता येत नाही.
स्वामी असीमानंदानी कुणासमोर जबाब दिला होता ? तो जबाब कसा फिरला ?
काय करावं अशा पत्रकारितेला?
https://timesofindia.indiatimes.com/sports/off-the-field/cwg-gold-medalist-manu-bhaker-humiliated/articleshow/63801731.cms
https://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/shooting/i-was-not-insulted-clarifies-manu-bhaker/articleshow/63808796.cms
व्हीव्हीआयपी लोकांसाठी सुवर्णपदक विजेतील खाली बसवलं अशी बोंब ठोकणारे यानंतर काही स्पष्टीकरण देतील का?
सी.ए., सी.एस, ऑडीटर्स साठी रेग्यूलेशन्स च्या ड्राफ्टवर सेबी गांभीर्यानं विचार करतेय, ज्यामुळे शेअरधारकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना काम करावे लागेल. तसेच या कामात केल्या गेलेल्या चुका आणि हलगर्जीपणासाठी दंड ठोठावल्या जाऊ शकतो आणि गरज पडल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रीया देखील सुरू होऊ शकते. यासाठी ड्राफ्ट कन्सलटेशन पेपर तयार करण्यात आलेला आहे अणि आवश्यक त्या चर्चा अन् मतं विचारात घेऊन पुढचे पाऊल उचलण्यात येईल.
https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/cas-cs-valuers-may-face-disgorgement-penalties-from-sebi/articleshow/63664982.cms
चला. पुरस्कार परती पर्व क्रमांक २ सुरू होणार. याही पर्वात नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. त्यामुळे प्रयोग रंगून यशस्वी होणारच.
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/intellectual-peoples-attacks-on-government/articleshow/63813311.cms
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पर्व क्र. १ सुरू झाले होते व मतदान झाल्याक्षणी पर्वाची समाप्ती झाली होती. आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पर्व क्र. २ सुरू होईल आणि १२ मे रोजी मतदान झाल्यानंतर या पर्वाची समाप्ती होईल.
पर्व क्रमांक ३ नोव्हेंबर २०१८ मध्ये राजस्थान, म. प्र., छत्तीसगड इ. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू होईल.
एक शंका - पुरस्कार परतीच्या प्रथम पर्वात सर्व पुरस्कार परत दिले होते. आता या द्वितीय पर्वात परत देण्यासाठी पुरस्कार कोठून आणणार? का आधी परत केलेल्या पुरस्कारांचीच झेरॉक्स देणार?
बुद्धिजीवींची नवे तर बघा!! मला तरी असली भूमिका घेऊन स्वतःला बुद्धिजीवी म्हणवून घेण्याची लाज वाटली असती.
************************
लोकशाहीचे अपहरण......दुसऱ्या एका धाग्यावरचा प्रतिसाद परत इथे टाकतो....
हाहाहाहा.....लोकशाही धोक्यात आहे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच हास्यास्पद होत चाललेलं आहे असे वाटते.
***********************
या देशात, एक थोर नेत्याची हत्या एका अमुक जातीच्या माणसाने केली म्हणून त्या अमुक जातीच्या लोकांना देशोधडीला लावण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, एका धर्माच्या माणसांनी एका पंतप्रधानांची हत्या केली म्हणून त्या धर्माच्या लोकांना चुन चुन के मारण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, एका विशिष्ट जातीचे धर्माचे लोक त्यांच्या मूळ प्रदेशातुन अक्षरशः हाकलून काढण्यात आले, मारून टाकण्यात आले तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, एका रेल्वेच्या डब्यात पट्रोल टाकून जाळण्यात आले, त्याची परिणीती म्हणून दोन धर्मात खुनी खेळ खेळला गेला तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली.
आज ज्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली असे काही लोकांना वाटतेय त्यांनी अशा घटनांचा इतिहास जरूर तपासावा. स्वतःचा दांभिकपणा स्वतःलाच कळून लोकशाही मजबूत असल्याची जाणीव नक्की होईल.
*************************
आपले नावडते सरकार आल्यावर जळफळाट होणे तसे स्वाभाविक आहे. म्हणजे हा ईव्हीएम घोटाळा आहे असे वाटणे, पैसे वाटून जिंकले आहेत वाटणे, जाती धर्माचे राजकारण करून जिंकले वाटणे, काहीच विकास होत नाही वाटणे वगैरे समजू शकतो. पण लोकशाही धोक्यात आहे...हे मात्र अनाकलनीय आहे.
मा.गो.
मोर्चे काढायला निमित्त हवं ना, म्हणून अचानक मोठमोठ्या रोख रकमा काढून रोखपेढ्या रित्या करण्यात आल्या आहेत. पण काळजी करू नका. शासन आवश्यक तेव्हढ्या नोटा वितरीत करतंय.
आ.न.,
-गा.पै.
RBI बॅंकेला पैसे (नोटा, नाणी) देते. बॅंक ठरवते, ATM मध्ये किती ठेवायचे आणि cash counter वर किती.
ही दोन-चार धेंडं ATM मधून पैसे काढणार नाही तर थेट ATM लागते जाणारे पैसेच पळवतात.
गामाजी ,
चावट लोकानी जर मुद्दाम जास्त पैसे काढून नेलेत तर रिजर्व ब्यान्क जास्तीच्या नोटा का वितरित करत आहे ?
ब्यान्केतले पैसे कुणी नेले तर ती तूट रि ब्या का व कशी भरेल ?
ते बोलतात - पैसे कुणीतरी काढून नेलेत.
मग बोलतात - काळजी नका करु . रिजर्व ब्यान्क देईल छापून.
कुणीतरी पैसे नेले तर रि ब्या त्याची तूट कशी भरुन काढेल ? , हे समजणे माझ्या आवाक्याबाहेरचेच आहे, म्हणूनच विचारतोय.
जवळपास ८६ शेतक-यामनी आपली ५५९.७७ एकर जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. ही जमीन मे २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान खरेदी करण्यात आली आहे. १८ मे २०१७ रोजी राजापूरमध्ये जमीन अधिग्रहणाचं परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर या जमिनींची खरेदी-विक्री झाली. ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यांच्यात मोदी, जैन, मुदीराज, वाधवा, मुदियार, सिंघव, निलवर, शाह, दोशी, कटारिया, केडिया, चंदर, थाववरी, रथी आणि झुनझुनवाला यांचा समावेश आहे. यांच्यात काही जाधव, कारंजे, देवळेकर, जोशी असे महाराष्ट्रीयनदेखील आहेत.जमीन अधिग्रहणाची सूचना मे २०१७ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एखाद्याने जमीन विकत घेतली तर एवढाआरडाओरडा कशासाठी? विकणा-यांना अक्कल नव्हती का? विकण्याची सक्ती होती का? सरकार जमीन विकत मागतंय तर द्यायची तयारी नाही. पण खाजगी व्यक्तीला विकून मोकळे झाले. मग आता प्रॉब्लेम काय आहे?त्यांचा एकच हेतु, फुकटचे १५ लाख कधी मिळणार !साफ चूक. गरळ ओकणे हे कागलकरचे एकमेव जीवनध्येय आहे.