Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २९

श
श्रीगुरुजी
Sun, 04/15/2018 - 16:28
🗣 189 प्रतिसाद
कर्नाटक विधानसभेची निवडणुक १२ मे रोजी आहे. इंडिया टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल. भाजप - ७८ ते ८६ कॉन्ग्रेस - ९० ते १०१ निजद - ३४ ते ४३

प्रतिक्रिया द्या
53760 वाचन

💬 प्रतिसाद (189)
ध
धर्मराजमुटके Sun, 04/15/2018 - 19:15 नवीन
तुमच्या अभ्यासानुसार भाजपा कर्नाटकात हरायला पाहिजे कारण जे कर्नाटकात हरतात तेच केंद्रात सत्तेत येतात असे तुम्ही कुठेतरी लिहिल्याचे वाचले. बघुया काय होते ते. तुमच्या म्हणण्यानुसार घडले तर काँग्रेस ला काही दिवस आनंदात काढता येतील आणि भाजपा ला २०१९ ला आनंदोत्सव साजरा करता येईल. एकंदरीत विन विन सिच्युएशन आहे !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/16/2018 - 11:48 नवीन
१९८३ पासून असा इतिहास आहे की राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष व केंद्रात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष वेगवेगळे असतात किंवा एकाच पक्षाला दोन्हीकडे सर्वाधिक जागा मिळाल्या तर राज्यात व केंद्रात वेगवेगळे पक्ष सरकार स्थापन करतात. १९८९ ला थोडासा अपवाद होता. त्यावेळी राज्यात खांग्रेसला बहुमत होते व केंद्रात १९५ जागा जिंकून खांग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु केंद्रात सरकार स्थापन झाले ते जनता दलाच्या वि. प्र. सिंगांचे. २००४ मध्येही थोडीशी वेगळी परिस्थिती होती. तेव्हा राज्यात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष होता तर केंद्रात खांग्रेसला सर्वाधिक जागा होत्या. परंतु केंद्रात इतर पक्षांच्या मदतीने व राज्यात निजदच्या मदतीने खांग्रेसचेच सरकार स्थापन झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
विशुमित Mon, 04/16/2018 - 13:07 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Mon, 04/16/2018 - 13:07 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Mon, 04/16/2018 - 13:32 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/16/2018 - 10:36 नवीन
महाराष्ट्रातील या गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षानंतर वीज व एस टी सेवा पोहोचली. http://indianexpress.com/article/india/maharashtra-bulumgavan-village-gets-electricity-bus-service-70-years-after-independence-5138660/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/16/2018 - 10:54 नवीन
हैदराबादमधील ऐतिहासिक मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने अखेर ११ वर्षानंतर निकाल दिला आहे. सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने स्वामी असीमानंदसह पाचही आरोपींना दोषमुक्त केले आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 04/16/2018 - 13:01 नवीन
मग बॉम्बस्फोट कोणी केला? 54 साक्षीदार फिरले याचे कुतूहल वाटले. ही फाईल रिओपन होऊन लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com Mon, 04/16/2018 - 13:08 नवीन
परकीय शक्ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Mon, 04/16/2018 - 13:44 नवीन
देशात २५-३० वर्षे जे बॉम्बस्फोट करीत आहेत त्यांच्यापैकीच कोणीतरी यामागे असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
manguu@mail.com Mon, 04/16/2018 - 15:12 नवीन
खून , कट , स्फोट अशा खटल्यातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटणारे या देशाने १९४८ पासून पाहिले आहेत आणि तुम्ही फक्त २५ वर्षाच्या गोष्टी करता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Mon, 04/16/2018 - 15:59 नवीन
संशयाचा फायदा देऊन/सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटणे आणि राजकीय कारणासाठी नाव खटल्यात गोवलेले असताना कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने निर्दोष सोडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि १९४८ पासून त्याची सुरुवात झाली आहे. पण तुम्हाला तो समजणार नाही तेंव्हा सोडून द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
भ
भंकस बाबा Tue, 04/17/2018 - 16:35 नवीन
मंगू मेल्या पयल्यापासून तू इतिहासात कच्चाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Mon, 04/16/2018 - 15:54 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
T
Topi Mon, 04/16/2018 - 14:52 नवीन
ज्या NIA च्या अधिकाऱ्यांनी पुरेसा सबळ पुरावा नसताना ही यांना तुरुंगात टाकले त्यांचेवर देशाची दिशाभूल केल्याबद्दल खटला चालवून शिक्षा करता येईल का?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 04/16/2018 - 15:08 नवीन
तशी सोय नाही. पोलिसाना तपासात आरोपी मिळणे व कोर्टात ते गुन्हेगार सिद्ध होणे , या दोन भिन्न प्रक्रिया आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Topi
ग
गामा पैलवान Mon, 04/16/2018 - 18:26 नवीन
एका बकरवाल माणसाची मुलाखत इथे आहे : https://www.facebook.com/tgtpost/videos/2122302284655399/ त्यात मुलाखतदाता १ मिनिट ३८ सेकंदांनंतर स्पष्टपणे म्हणतोय की त्यांचा राज्य पोलिसांवर आजिबात विश्वास नाही. हत्येनंतर ७ दिवसांनी मुलीचं प्रेत मिळतं ते म्हणे हिंदू मंदिरात! जनता असल्या भूलथापांवर विश्वास ठेवायला मूर्ख आहे का? रोहिंगे मुस्लिम येण्याआधी कोणी कधी असले प्रकार ऐकले होते का या प्रांती? मग रोहिंगे घुसल्यावर जर हा प्रकार होत असेल तर जे कळायला पाहिजे ते कळून येतं, नाहीका? रोहिंग्यांनी अत्याचार करायचे आणि नाव मात्र हिंदूंचं. खासा न्याय आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 08/09/2021 - 17:36 नवीन
मुलाखतीचा सुधारित दुवा : https://www.facebook.com/watch/?v=1676421599101165 -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 04/17/2018 - 14:00 नवीन
बाबरी मशीद असा उल्लेख न करता राममंदिर हे योग्य नाव वापरल्याबद्दल सरसंघसंचालक श्री. मोहन भागवत यांचं अभिनंदन! बातमी : भारतीयांनी नव्हे विदेशी शक्तींनी पाडले राम मंदिर -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 04/17/2018 - 14:45 नवीन
म्हणूनच आपले संस्कृती रक्षक विदेश्यांकडून ठोकून ठोकून कबुल करून घेण्यासाठी विदेशात तळ ठोकून आहेत.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 04/17/2018 - 16:42 नवीन
हे असेच मुद्दे काढले जातील अशी खात्री वाटते. सर्वत्र अपयशी होत असलेल्या सरकारचा बचाव अश्या प्रकारे थातूरमातूर मुद्दे मिडियाला चघळायला देऊन करण्याचा जुनाच डाव भागवत खेळताहेत. हे आता वाढत जाईल.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 04/17/2018 - 18:17 नवीन
हा हा.. ते आशिफा प्रकरण पण यांचाच डाव आहे वाटतं.. कळलंच नव्हतं मला आजपर्यंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
M
manguu@mail.com Tue, 04/17/2018 - 20:23 नवीन
कठुआतील ८ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. त्यात चंद्र प्रकाश गंगा आणि चौधरी लाल सिंह हे भाजपचे दोन मंत्री सहभागी झाले होते. या दोन्ही मंत्र्यांना जनक्षोभामुळे आधीच राजीनामे द्यावे लागले असून आज उरलेल्या सर्व ९ मंत्र्यांचे राजीनामे भाजप नेतृत्वाने घेतल्याने जम्मू-काश्मीरच्या राजकारणात भूकंप झाला आहे.  मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या इशाऱ्यामुळे भाजपला हा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. ज्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत त्यांची खाती बदलली जातील. मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जातील. याबाबत मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले जात आहे.  मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याला ११ मंत्रिपदं आलेली आहेत. या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर फेरबदल करताना यातील काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची तर काही नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/18/2018 - 08:15 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 04/18/2018 - 09:12 नवीन
रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पासाठी गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नाणारमध्ये तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. खरंतर नाणारमध्ये सर्व जमिनी या स्थानिक शेतक-यांच्या आहेत. मात्र फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, नाणारमध्ये जमीन खरेदी करणा-यांपैकी ८६ पैकी ३८ जण व्यापारी असून यामध्ये मोदी, जैन, शाह, झुनझुनवाला यांची नावे आहेत. २ मे २०१७ ते १९ जानेवारी २०१८ दरम्यान म्हणजे फक्त आठ महिन्यांत व्यापा-यांनी जवळपास ५५९ एकर जमीन खरेदी केली आहे. यावरुन राजकारणी आणि व्यापा-यांची साटंलोटं असल्याचं सिद्ध होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘एकीकडे स्थानिक विरोध करत असताना जमीन खरेदी करणा-या व्यापा-यांनी जे आता मालक आहेत त्यांनी आधीच एनओसी देऊन टाकली आहे. व्यापा-यांना या प्रकल्पाची माहिती कशी काय मिळाली ? इथल्या जमीन खरेदी करण्यात त्यांना अचानक इतका रस का आला ? याचा थेट अर्थ आहे की, काही राजकारण्यांनी व्यापा-यांना नाणारमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे व्यापा-यांना तब्बल २०० टक्के नफा होणार आहे आणि तोदेखील सफेद पैशांमध्ये’, असं संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी म्हटलं आहे. https://www.loksatta.com/maharashtra-news/559-acres-land-purchased-by-trading-community-in-jusy-8-months-1665140/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 09:38 नवीन
जमीन विकणा-यांनी विकताना अक्कल गहाण ठेवली होती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Wed, 04/18/2018 - 11:02 नवीन
घाणेरडी पत्रकारिता, त्याला फॉलो करणारे अंधविरोधक मग काय आनंदी आनंद!! ************************************* ८६ पैकी ३८ म्हणजे साधारणपणे ४५ टक्के व्यापारी. उरलेले कोण हे सांगणे गरजेचे नसते! या ३८ पैकी ४ म्हणजे साधारण १०-११% तथाकथित गुजराती. बाकीचे कोण हे सांगणे गरजेचे नसते. आणि या सगळ्यातून सांगायचे काय आहे तर बघा बघा आधी जमिनी विकत घेऊन मग गुजरात्यांच्या फायद्यासाठी प्रकल्प आणणार आहेत. आणि वरून दाखला विकणाऱ्यांचा. त्यांना स्वतःचं भलं बुरं कळत नसणारच ना? गन पॉईंट वर जमिनी घेतल्या असतील तर वरील बातमीत काही तरी अर्थ असता आणि कारवाईची, विरोधाची आवश्यकता असती. या असल्याच गोष्टी माध्यमांची विश्वासार्ह्यता रसातळाला घेऊन जात आहे. ************************************* बादवे, तुमचं नाणार प्रकल्पाबद्दल काय मत (काही असलं तर) आहे? कि वरील प्रतिसादामागे काही विशेष हेतू आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 11:13 नवीन
जवळपास ८६ शेतक-यामनी आपली ५५९.७७ एकर जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. ही जमीन मे २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान खरेदी करण्यात आली आहे. १८ मे २०१७ रोजी राजापूरमध्ये जमीन अधिग्रहणाचं परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर या जमिनींची खरेदी-विक्री झाली. ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यांच्यात मोदी, जैन, मुदीराज, वाधवा, मुदियार, सिंघव, निलवर, शाह, दोशी, कटारिया, केडिया, चंदर, थाववरी, रथी आणि झुनझुनवाला यांचा समावेश आहे. यांच्यात काही जाधव, कारंजे, देवळेकर, जोशी असे महाराष्ट्रीयनदेखील आहेत. जमीन अधिग्रहणाची सूचना मे २०१७ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एखाद्याने जमीन विकत घेतली तर एवढाआरडाओरडा कशासाठी? विकणा-यांना अक्कल नव्हती का? विकण्याची सक्ती होती का? सरकार जमीन विकत मागतंय तर द्यायची तयारी नाही. पण खाजगी व्यक्तीला विकून मोकळे झाले. मग आता प्रॉब्लेम काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ड
डँबिस००७ Wed, 04/18/2018 - 12:04 नवीन
बादवे, तुमचं नाणार प्रकल्पाबद्दल काय मत (काही असलं तर) आहे? कि वरील प्रतिसादामागे काही विशेष हेतू आहे? बीटाकाका, त्यांचा एकच हेतु, फुकटचे १५ लाख कधी मिळणार ! तो पर्यंत गरळ ओकतच रहाणार !! बर मिळाल्यावरही गरळ बंद होईल ह्याची खात्री नाही !!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 04/18/2018 - 12:09 नवीन
हिंदू मुस्लिम ख्रिस्चन सगळ्या राजांच्या तिजोर्या आमच्या बापजाद्यानीच भरून दिल्यात. कधीतरी राजतिजोरीतून १५ लाख आलाच पे आउट तर मी बिनधास्त घेईन. तुम्हाला नको असतील तर तेही मला द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 13:09 नवीन
त्यांचा एकच हेतु, फुकटचे १५ लाख कधी मिळणार ! साफ चूक. गरळ ओकणे हे कागलकरचे एकमेव जीवनध्येय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
M
manguu@mail.com Wed, 04/18/2018 - 12:09 नवीन
इंद्राणी मुखर्जीने चिदंबरमविरुद्ध कोर्टात जबाब दिला होता म्हणे. भक्त लोक नाचत होते की म्हणे असा जबाब फिरवता येत नाही. स्वामी असीमानंदानी कुणासमोर जबाब दिला होता ? तो जबाब कसा फिरला ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 13:06 नवीन
सगळंच "म्हणे"? पुरावे आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Wed, 04/18/2018 - 12:48 नवीन
काय करावं अशा पत्रकारितेला? https://timesofindia.indiatimes.com/sports/off-the-field/cwg-gold-medalist-manu-bhaker-humiliated/articleshow/63801731.cms https://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/shooting/i-was-not-insulted-clarifies-manu-bhaker/articleshow/63808796.cms व्हीव्हीआयपी लोकांसाठी सुवर्णपदक विजेतील खाली बसवलं अशी बोंब ठोकणारे यानंतर काही स्पष्टीकरण देतील का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 13:04 नवीन
यासाठी मोर्चे काढून मोदींचा राजीनामा नाही मागितला अजून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
र
राघव Wed, 04/18/2018 - 15:12 नवीन
सी.ए., सी.एस, ऑडीटर्स साठी रेग्यूलेशन्स च्या ड्राफ्टवर सेबी गांभीर्यानं विचार करतेय, ज्यामुळे शेअरधारकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना काम करावे लागेल. तसेच या कामात केल्या गेलेल्या चुका आणि हलगर्जीपणासाठी दंड ठोठावल्या जाऊ शकतो आणि गरज पडल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रीया देखील सुरू होऊ शकते. यासाठी ड्राफ्ट कन्सलटेशन पेपर तयार करण्यात आलेला आहे अणि आवश्यक त्या चर्चा अन् मतं विचारात घेऊन पुढचे पाऊल उचलण्यात येईल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/cas-cs-valuers-may-face-disgorgement-penalties-from-sebi/articleshow/63664982.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/18/2018 - 16:07 नवीन
चला. पुरस्कार परती पर्व क्रमांक २ सुरू होणार. याही पर्वात नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. त्यामुळे प्रयोग रंगून यशस्वी होणारच. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/intellectual-peoples-attacks-on-government/articleshow/63813311.cms बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पर्व क्र. १ सुरू झाले होते व मतदान झाल्याक्षणी पर्वाची समाप्ती झाली होती. आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पर्व क्र. २ सुरू होईल आणि १२ मे रोजी मतदान झाल्यानंतर या पर्वाची समाप्ती होईल. पर्व क्रमांक ३ नोव्हेंबर २०१८ मध्ये राजस्थान, म. प्र., छत्तीसगड इ. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू होईल. एक शंका - पुरस्कार परतीच्या प्रथम पर्वात सर्व पुरस्कार परत दिले होते. आता या द्वितीय पर्वात परत देण्यासाठी पुरस्कार कोठून आणणार? का आधी परत केलेल्या पुरस्कारांचीच झेरॉक्स देणार?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 04/18/2018 - 19:37 नवीन
भाजपाच्या मंदिर प्रश्नाचंही तेच दुखणे आहे. एकदा बांधून टाकले की मग दुसर्या वेळेला काय करायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Wed, 04/18/2018 - 19:42 नवीन
२०१४ ला भाजपा राममंदिर मुद्द्यावर निवडून आला होता आणि आता भारतभरात त्याच मुद्द्यावर पसरला आहे ह्या भ्रमात (की सुप्त दुखण्यात?) खुश राहा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Wed, 04/18/2018 - 19:34 नवीन
बुद्धिजीवींची नवे तर बघा!! मला तरी असली भूमिका घेऊन स्वतःला बुद्धिजीवी म्हणवून घेण्याची लाज वाटली असती. ************************ लोकशाहीचे अपहरण......दुसऱ्या एका धाग्यावरचा प्रतिसाद परत इथे टाकतो.... हाहाहाहा.....लोकशाही धोक्यात आहे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच हास्यास्पद होत चाललेलं आहे असे वाटते. *********************** या देशात, एक थोर नेत्याची हत्या एका अमुक जातीच्या माणसाने केली म्हणून त्या अमुक जातीच्या लोकांना देशोधडीला लावण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली. या देशात, आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली. या देशात, एका धर्माच्या माणसांनी एका पंतप्रधानांची हत्या केली म्हणून त्या धर्माच्या लोकांना चुन चुन के मारण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली. या देशात, एका विशिष्ट जातीचे धर्माचे लोक त्यांच्या मूळ प्रदेशातुन अक्षरशः हाकलून काढण्यात आले, मारून टाकण्यात आले तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली. या देशात, एका रेल्वेच्या डब्यात पट्रोल टाकून जाळण्यात आले, त्याची परिणीती म्हणून दोन धर्मात खुनी खेळ खेळला गेला तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली. आज ज्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली असे काही लोकांना वाटतेय त्यांनी अशा घटनांचा इतिहास जरूर तपासावा. स्वतःचा दांभिकपणा स्वतःलाच कळून लोकशाही मजबूत असल्याची जाणीव नक्की होईल. ************************* आपले नावडते सरकार आल्यावर जळफळाट होणे तसे स्वाभाविक आहे. म्हणजे हा ईव्हीएम घोटाळा आहे असे वाटणे, पैसे वाटून जिंकले आहेत वाटणे, जाती धर्माचे राजकारण करून जिंकले वाटणे, काहीच विकास होत नाही वाटणे वगैरे समजू शकतो. पण लोकशाही धोक्यात आहे...हे मात्र अनाकलनीय आहे.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 04/18/2018 - 20:05 नवीन
डिजिटल व्यवहार वाढले असतील तर देशात रोख चलन टंचाईचे कारण काय असावे?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 04/18/2018 - 20:12 नवीन
मा.गो. मोर्चे काढायला निमित्त हवं ना, म्हणून अचानक मोठमोठ्या रोख रकमा काढून रोखपेढ्या रित्या करण्यात आल्या आहेत. पण काळजी करू नका. शासन आवश्यक तेव्हढ्या नोटा वितरीत करतंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
M
manguu@mail.com गुरुवार, 04/19/2018 - 04:21 नवीन
दोनचार मोठे लोक इतके पैसे काढून घेऊन ब्यान्क ठप्प करु शकतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
महेश हतोळकर गुरुवार, 04/19/2018 - 07:11 नवीन
RBI बॅंकेला पैसे (नोटा, नाणी) देते. बॅंक ठरवते, ATM मध्ये किती ठेवायचे आणि cash counter वर किती. ही दोन-चार धेंडं ATM मधून पैसे काढणार नाही तर थेट ATM लागते जाणारे पैसेच पळवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 04/19/2018 - 09:52 नवीन
गामाजी , चावट लोकानी जर मुद्दाम जास्त पैसे काढून नेलेत तर रिजर्व ब्यान्क जास्तीच्या नोटा का वितरित करत आहे ? ब्यान्केतले पैसे कुणी नेले तर ती तूट रि ब्या का व कशी भरेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/19/2018 - 10:56 नवीन
ते तुमच्या आवाक्यापलिकडचं आहे. तेव्हा जास्त विचार करून डोक्याला ताप करून घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 04/19/2018 - 12:42 नवीन
ते बोलतात - पैसे कुणीतरी काढून नेलेत. मग बोलतात - काळजी नका करु . रिजर्व ब्यान्क देईल छापून. कुणीतरी पैसे नेले तर रि ब्या त्याची तूट कशी भरुन काढेल ? , हे समजणे माझ्या आवाक्याबाहेरचेच आहे, म्हणूनच विचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/19/2018 - 15:28 नवीन
.... कारण की द्रव्यता व्यवस्थित राहील इतक्या नोटा वितरीत करणे हे राखीवपेढीचं काम आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मार्मिक गोडसे Wed, 04/18/2018 - 20:27 नवीन
काही आधार?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/19/2018 - 05:36 नवीन
गा. पैं. गप्प का? पैसे कोणी काढले हे कळणे फार कठीण नाही. एव्हाना त्यांची लिस्ट तयार झाली असती. सरकार इतके सुस्त का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा