Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फुकटात विनासायास वेटलॉस

श
शाम भागवत
Tue, 07/03/2018 - 09:09
🗣 313 प्रतिसाद
वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय. ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे ....... थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय. कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो! घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार. तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये. तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल. त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली. मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका. सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही. आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा! तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते. त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे. बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती. डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत. पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात. २०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे. खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/ डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4 मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे. एक महत्त्वाची सूचना : ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये. -------------------------------------------------------------- (श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.) एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते. यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात. तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा. https://youtu.be/99iQOs-u_HU

प्रतिक्रिया द्या
162643 वाचन

💬 प्रतिसाद (313)
ओ
ओम शतानन्द Fri, 08/31/2018 - 07:49 नवीन
result बघून व शरीरावरील परिणाम दुष्परिणाम बघून पुढचे ठरवणार म्हणजे जर result चांगले असतील तर ही पद्धत कायम ठेवणार , आतापर्यंतच्या अनुभवावरून तरी हिच पद्धत कायम ठेवावी असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 09/05/2018 - 03:44 नवीन
डॉ. दिक्षितसरांचे व्याख्यान सार दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा । अहो,दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा ।।ध्रु।। चहामध्ये दूध अगदी थोडेसेच टाका। डायबिटीस असेल तर ग्रीन टी, ब्लॅक टी, नारळ पाणी प्या। दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।१। दोन जेवणामध्ये हवे तेवढे ताक प्या। दही मात्र त्यासाठी घरचेच वापरा।। दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।२। जेवताना आवडीचे सर्व काही खा। अहो! पिझ्झा, बर्गर काय वडापाव सुद्धा खा। हे मात्र सगळे जेवणाच्या ५५ मिनिटातच संपवा। दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।३। दिवसातला पाऊण तास व्यायामाला द्या। चाला, पळा, पोहा किंवा सायकल तरी चालावा। दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।४। विनाखर्चिक, विनासायास वेटलॉस कसा होतो बघा। पाच सात किलो वजन बघता बघता कमी करा। दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।५। नियमितपणे 'एच बी ए 1 सी' करा । व फास्टिंग शुगर नव्हे 'फास्टिंग इन्शुलिन' टेस्ट करा। दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।६। 'दोनच वेळा जेवा' हा मंत्र जगाला द्या आणि डायबिटीसला भारतातूनच नव्हे तर जगातून हद्दपार करा। दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।७। दिक्षित सरांचे आभार मनापासून माना। त्यांनी दिलेला हा मंत्र घरोघरी पोचवा। दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।।८।।
  • Log in or register to post comments
क
केडी Wed, 09/05/2018 - 12:13 नवीन
जुलै च्या ८ तारखेला दीक्षित सरांचा लेक्चर टिळक स्मारक मध्ये ऐकलं आणि दुसऱ्या दिवस पासून त्यांचा डाएट प्लॅन सुरु केला. त्यांचं व्याख्यान ऐकताना वारंवार ते आपलीच गोष्ट सांगत आहेत असं राहून राहून वाटत होत माझ्या वजनाने शंभरी कधीच पार केलेली, पण त्यामुळे आलेले प्री - हायपरटेन्शन मुळे त्रास सुरु झालेले, घरात उगाच होणारी चीड चीड, रात्री झोप न लागणे, भरपूर व्यायाम केला तरीही न कमी होणारे वजन ह्यामुळे खरं तर एक नैराश्य आलेलं...त्यात स्वतःला खायची प्रचंड हौस आणि थोडा फार जमत असणारा स्वैपाक त्यामुळे जिभेवर ताबा असा न्हवताच ..सगळे डाएट, डॉक्टर वजन कमी करायचे सेंटर्स करून झालेले आज दोन महिने होऊन गेलेत ....वजन १०० च्या खाली आलंय, आणि हे सगळं फक्त २ वेळ पाहिजे ते खाऊन..गेल्या दोन महिन्यात पिझ्झा, चिकन पासून ते २ वेळा भात, बर्गर, कॅन्टीन मधली तेलकट बिर्याणी हे सगळं खाऊन ...व्यायाम केल्यामुळे फरक जाणवतोय ..पोट आत गेलंय .....कुठेही थकवा नाही कि ऍसिडिटी चा त्रास नाही पार्टी ला गेलो किंवा जेवायला बसलो कि मोबाईल वर ५० मिनिटाचा टाईमर लावतो .... त्या नंतर खाणे बंद .... ऑफिस मध्ये सकाळचा नाश्त्याचा डब्बा घेऊन जातो (साबुदाणा खिचडी कशी सोडायची हो! :-))...तो डब्बा देखील जेवणाच्या वेळेत खातो... अधे मध्ये हल्ली भूक लागत नाही...ग्रीन टी ची सवय आधी पासून होती त्यामुळे ते पिणे सुरु आहे .... एकंदर चांगलं सुरु आहे...उत्साह वाढलायं, व्यायाम करायला मज्जा येते आहे... हे डाएट नसून लाईफ स्टाईल आहे, आणि मला पटलेले आहे, त्यामुळे ३ महिने किंवा ६ महिने करून पाहू पेक्षा, मी हे बहुदा आता कायम स्वरूपी अवलंबिन .... ह्या मागे प्रुव्हन सायन्स आहे, आणि मला तरी खूपच फरक पडलाय...रात्री झोप शांत लागत आहे, बीपी चा त्रास जाणवत नाहीये..चिडचिड कमी झाली आहे त्यामुळे, जय जग्गन्नाथ!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 09/06/2018 - 03:23 नवीन
अभिनंदन शेफ केडी आणि पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केडी
स
सस्नेह गुरुवार, 09/06/2018 - 12:53 नवीन
शाम भागवत यांना अनेक धन्यवाद ! हा धागा वाचून कुतूहलाने मी डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान युट्युबवर पाहिले. माझे वजन प्रमाणापेक्षा एक किलोसुद्धा जादा नाही. तरीही काही पचनविषयक प्रॉब्लेम्स होते. जडपणा, मंदपणा, डोकेदुखी, बीपी नसूनही अधेमधेच शूट होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे इ. त्रास होत होता. एक प्रयोग म्हणून गेले पंधरा दिवस डॉ. दीक्षित यांची आहारपद्धती वापरू लागले. आणि आश्चर्यकारक पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले ! १. अपचन, गॅसेस, वारंवार ढेकर इ. सर्व बंद झाले. २. भूक असली तरी काही वेळा नावडती भाजी वागिरे असेल तर घशाखाली उतरत नसे. तसे आता होत नाही. ‘नावड’ हे प्रमाण कमी कमी होते आहे. कोणतेही अन्न गोड लागते आहे. ३. भूक अशी सणसणीत लागते की अन्नाचा कण न कण अप्रतिम रुचकर लागतो आहे. बोटे चाटून चाटून जेवावेसे वाटतेय. ४. पूर्वी जडपणा, अस्वस्थता, मरगळ वाटत असे, ते बंद होऊन दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक अतिशय उत्साही वाटते. ५. माझे वजन आधीचेच प्रमाणात असल्यामुळे मी दुपारी म्हणजे दोन जेवणांच्या मध्ये एखादे फळ आणि संध्याकाळी एक कप कॉफी (कमी दूध कमी साखर) अशी घेते तरीही इतके चांगले रिझल्ट्स मिळाले आहेत. ६. मी सकाळी नऊला बाहेर पडते व संध्याकाळी सातला घरी येते. त्यामुळे मला दोन वेळचे डबे न्यावे लागत होते, ज्याचे ओझेही व्हायचे आणि दोन वेळचे काय बॉ न्यायचे आणि कधी ते बनवायचे हा रोजचा प्रश्न. तो मिटला. दुपारसाठी जाता जाता एखादे फळ नेणे सोयीस्कर पडते. डॉ. दीक्षित यांना हजारो धन्यवाद __/\__
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/10/2018 - 21:51 नवीन
@ स्नेहांकिता:
मी सकाळी नऊला बाहेर पडते व संध्याकाळी सातला घरी येते.
तुम्ही किती किती वाजता जेवता, आणि काय काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Tue, 09/11/2018 - 04:04 नवीन
मी १० ला ऑफिस मधे पोचते. गेल्या गेल्या पोळी भाजी कोशिंबीर डबा खाऊन घेते. दुपारी लंच टाईम मधे एखादं सफरचंद किंवा सीताफळ, केळ मिळेल ते फळ. मग साडेचारला कमी दुधाची कॉफी एक कप. संध्याकाळी साडेआठला पूर्ण जेवण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ख
खटपट्या Tue, 09/11/2018 - 08:11 नवीन
पोळीऐवजी ज्वारी,बाजरी किंवा नाचणीची भाकरी खाउन बघा. खूप फरक पडेल. गव्हाच्या पोळीमधे ग्लुटेन जास्त असते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Tue, 09/11/2018 - 09:09 नवीन
भाकरी केव्हाही पोळीपेक्षा चांगलीच ! बादवे, माझे वजन प्रमाणात असल्याने कमी करण्यची गरज भासत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सुबोध खरे Wed, 09/19/2018 - 07:00 नवीन

भाकरी हि पोळीपेक्षा चांगली हा एक खोलवर रुजलेला गैरसमज आहे.

कोणतीही गोष्ट पारंपरिक म्हणून चांगली यातून तो आला आहे कि काही पारंपरिक वैद्यकशास्त्रानी तो मुद्दाम रुजवला आहे हे मला माहित नाही. परंतु या बद्दल मी बरेच वाचन केले असता असे लक्षात आले कि आपण खातो तो

गहू आणि ज्वारी यात गुणात्मक दृष्ट्या कोणताही फरक नाही

आणि पोळी पेक्षा भाकरी चांगली या गृहीतकाला पुष्टी देणारा कोणताही पुरावा नाही. गव्हाच्या आणि ज्वारीच्या ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये फारसा फरक नाही तसेच दोन्हीच्या कॅलरी मुल्यातही फरक नाही. तेंव्हा भाकरी मधुमेही माणसांना चांगली हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही आपण पोळी खातो ती काही मैद्याची नसते तर पूर्ण गहू दळूनच केलेली असते त्यामुळे

आपण खातो ती पोळी हि खरं तर ज्वारीच्या भाकरी पेक्षा पोषणमूल्यात्मक दृष्टीने जास्त चांगली आहे.

हे मी मुद्दाम एवढ्यासाठी लिहीतो आहे कि बऱ्याच स्त्रियांना (विशेषतः नोकरी करणाऱ्या) आपण रोज भाकरी करू शकत नाही त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आहे असा न्यूनगंड असल्याचे जाणवले. आणि बऱ्याच पुरुषांना पोळी ऐवजी भाकरी खायची असते पण नोकरीवर भाकरी खाणे शक्य नसते. कारण पोळी सारखी ती काही तासांनी मऊ राहात नाही किंवा तिची घडी सुद्धा सहज करता येत नाही आणि ( डब्यात नेता येण्यासारख्या) कोरड्या भाज्यांबरोबर भाकरी फारच कोरडी होते. ज्यांना पोळी आवडते किंवा सोयीची आहे त्यांनी मुद्दाम पोळी सोडून भाकरी खाण्याची अजिबात गरज नाही. साध्या शब्दात असलेला एक लेख जिज्ञासूंसाठी पाठवत आहे. Jowar is tasty, but wheat wins hands down when it comes to nutrition https://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-metroplus/chapati-vs-jowar-roti/article2240303.ece तेंव्हा भाकरी खायची तर चवीसाठी जरूर खा पण आपण भाकरी खातो आहोत म्हणजे आपण जास्त आरोग्यपूर्ण खातो आहोत हा गैरसमज सोडून द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
साबु Wed, 09/19/2018 - 14:37 नवीन
गहु विकत घेउन दळुन आणलेल पीठ चान्गले की विकतचे पीठ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सस्नेह Fri, 10/12/2018 - 11:40 नवीन
विकतचा आटा याबद्दल इथे पहा https://www.youtube.com/watch?v=zQWYUb2slKw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साबु
स
सस्नेह Fri, 10/12/2018 - 11:43 नवीन
https://www.youtube.com/watch?v=zQWYUb2slKw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ख
खटपट्या Tue, 10/09/2018 - 13:20 नवीन
डॉक्टर, मी भाकरी बंद करुन एक आठवडा पोळी खाउन पाहीली. तर पोट वाढल्यासारखं वाटलं. भाकरीपेक्षा पोळीत ग्लुटेन जास्त असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 10/09/2018 - 15:30 नवीन
गहू आणि गहू वर्गीय तृणधान्ये( ओट राय बार्ली) यात ग्लूटेन हे प्रथिन असते. ज्वारी बाजरी तांदूळ नाचणी यात ग्लूटेन अजिबातच नसते. ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी आहे त्यांना ग्लूटेन मुळे वाता(गॅसेस)चा त्रास होऊ शकतो. यामुळे पोट फुगल्यासारखे वाटू शकते. एका आठवड्यात पोट सुटण्याची शक्यता फारच कमी आहे. आपल्याला वाताचा त्रास (इतर कारणांमुळे) होत आहे कि खरच ग्लुटेनची ऍलर्जी आहे हे पाहणे आवश्यक ठरेल. काकतालीय न्यायाने हे झालेले नाही हे तपासणे आवश्यक आहे. अन्यथा उगाचच ग्लूटेन ऍलर्जी म्हणून लोक गव्हाचे विविध रुचकर पदार्थ खायला मुकतात. (भारतात साधारण १ % लोकांना हा त्रास असतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मराठी_माणूस Wed, 10/10/2018 - 13:05 नवीन
ज्वारी आणि गव्हा बद्दल जे समज/गैरसमज आहेत ते प्रयोगशाळेच्या ( पॄथःकरण करुन) माध्यमातुन दुर करणे शक्य आहे का नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 10/12/2018 - 05:27 नवीन
बरेचसे गैरसमज हे केवळ वाचनाने दूर करता येतील. आणि बहुतांश गोष्टी या अगोदरच प्रयोगशाळेत तपासून झालेल्या आहेत. परंतु सत्य हे "जुनं ते सर्वच सोनं" आणि " जुनं ते सर्वच कालबाह्य" या दोन अर्धसत्यांच्या मध्ये आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ख
खटपट्या Fri, 10/19/2018 - 14:37 नवीन
ओके आता कळाले. मला ग्लुटेन ची अ‍ॅलर्जी आहे का ते चेक करुन घेतो. कोणत्या चाचण्या कराव्या लागतील? म्हणजे रक्ततपासाणी च्या ज्या लॅब असतात त्यांना काय सांगायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 10/19/2018 - 15:06 नवीन
दुर्दैवाने ग्लुटेनची ऍलर्जी आहे कि नाही याचे साधे सरळ सोपे उत्तर नाही आणि सर्व रक्ततपासण्या १०० % खात्रीशीर नाहीत. त्यासाठी एन्डोस्कोपीकरावी लागते. काही वेळेस सोपी चाचणी म्हणजे तुम्हाला नक्की काय त्रास होतो आहे तो पाहणे आणि लिहून ठेवणे. यानंतर ७ ते १० दिवस गव्हाचे सर्व पदार्थ संपूर्ण वर्ज्य करून पहा. जर तुम्हाला होणाऱ्या त्रासातून पूर्ण सुटका झाली तर तुम्हाला ग्लुटेनची ऍलर्जी आहे असे समजून पुढच्या चाचण्या करता येतील आणि तुमच्या त्रासात ५० % सुद्धा फरक पडला नसेल तर हि ग्लुटेनची ऍलर्जी नाही असे समजून दुसरी कारणे शोधणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 11/26/2018 - 08:38 नवीन
त्रास असा काहीच नाही. फक्त थोडा जरी आहार वाढवला तर पोट पुढे येते. आता मी दिक्षितांचा अहार प्लान फॉलो करतच आहे. पण कधी दोन दिवस तीनवेळा जेवलो तर लगेच पोटाचा घेर वाढल्यासारखा वाटतो...मग मी व्यायाम वाढवून थोडा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 11/26/2018 - 15:04 नवीन
मोजण्याची पट्टी आणि वजनाचा काटा हे जास्त खात्रीशीर असतात. ))०!०((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
शाम भागवत Tue, 09/11/2018 - 15:59 नवीन
@स्नेहांकिता माझे अनुभव ही तुमच्यासारखेच असल्याने मला माझे अनुभव लिहायला जरा आधार मिळाला आहे. धागा काढून झाल्यावर २ किंवा ३ महिन्यांनी तपशीलवार लिहावयाचा विचार आहे. (खर तर कच्चा मसुदा डोक्यात तयार आहे.) तुमचा अनुभव वाचून अनेकींना स्फूर्ती मिळू शकेल. भारतीय स्त्रियांसाठी ही जिवनशैली एक वरदान ठरणार आहे. ही जीवनशैली जसजशी स्विकारली जाऊ शकेल त्याप्रमाणात त्याचे श्रम नक्की कमी होतील याबद्दल मी याअगोदर लिहिले होते पण काहिंना ते आवडले नव्हते. याबाबत मला कालच एक व्हॉटसअ‍ॅप मेसेज आलाय. तो एका स्त्री कडून आलाय. आज तो माझ्या बायकोला दाखवला. तिला तो आवडला व खरच काम कमी झालय अस तिचही मत आहे म्हणून येथे चिकटवतोय. अन्यथा धाडस करवत नव्हते.
दीक्षितांची कमाल काय सांगू सखे दीक्षितांची कमाल अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल ||धृ|| दीक्षितांनी सांगितलं दोनच वेळा जेवा भात अन् पोळ्या जरा कमीच खावा लाटल्या पोळ्या मी चारच काल || १ || अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल प्रथिनं वाढवा दीक्षितांचा सल्ला भाजीपाला उसळी सॅलड्वर हल्ला कापिते मी फळं आता धरून ताल || २ || अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल येता-जाता नका भरू हो तोबरा फसव्या भुकेला पाण्याचा उतारा पाजिते मी पाणी करून दीक्षितांची ढाल || ३ || अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल पाऊण तास चाला दीक्षितांचा मंत्र साडेचार किमी चे पाळा तुम्ही तंत्र फिरायला लागले मी पांघरून शाल || ४ || अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल चहा नि कॉफी बाजूला सारा ताकाचा पेला तुम्ही हळूच पुढे करा पाहुण्यांना संत्री देते सोलून मी साल || ५ || अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल दीक्षितांची योजना सार्‍यांना कळवा लठ्ठपणा, मधुमेह जगातनं पळवा तुम्हालाही सांगते नाहीतर फसाल || ६ || अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल प्रज्ञा रामतीर्थकर ९ सप्टेंबर २०१८
@palambar तुम्हाला झालेले फायदे जरूर लिहा. त्यामुळे इतरांनाही स्फूर्ती मिळते. तुमच्या सारखे अनुभव घेऊन लिहिणारे लोक इथे येतील अशी कल्पना करूनच तर हा धागा काढला आहे. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
P
palambar Sun, 09/09/2018 - 17:20 नवीन
मी दोन महिने दिक्षीतांचे डाएट पाळते आहे, अतिशय चांगले रिझल्ट आहेत, डाॅ दिक्षीत इतक्या कळकळीने याचा प्रसार करत आहेत. त्यांचे यूट्यूबवरची भाषणे नीट ऐकली तर बर्‍याच शंका कमी होतील. त्यांची यावर पुस्तके देखील आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 09/11/2018 - 16:04 नवीन
@palambar तुम्हाला झालेले फायदे जरूर लिहा. त्यामुळे इतरांनाही स्फूर्ती मिळते. तुमच्या सारखे अनुभव घेऊन लिहिणारे लोक इथे येतील अशी कल्पना करूनच तर हा धागा काढला आहे. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar
अ
अर्धवटराव Tue, 09/11/2018 - 04:52 नवीन
एव्हढ्या मोठ्या प्रमाणात मिपाकरांचे एकमत झालेले बघुन डोळे पाणवले. हा दिवस दाखवल्याबद्द्ल दिक्षीत सरांचे आभार. आपल्याला हा प्रकार झेपेल असं वाटत नाहि :(. दोनच वेळा खाणे ठीक आहे... पण ते ब्रेकफस्ट, लंच, संध्याकाळचे स्कॅक्स आणि डिनरपुर्वी कि नंतर हे प्रथम ठरवावं लागेल ;)
  • Log in or register to post comments
च
चष्मेबद्दूर गुरुवार, 09/13/2018 - 09:03 नवीन
मि पा वरची चर्चा आणि डॉक्टरांचे व्हिडिओ बघून मी सुद्धा या आहार आचाराला सुरवात केली त्याला जेमतेम दोन आठवडे झालेत. सगळ्यांप्रमाणेच मलासुद्धा अनेक शंका होत्या, तरीपण तसंच पुढे गेले. एक छान उपयोग झालाय म्हणजे माझी ऍसिडिटी होण्याचं प्रमाण खूपच कमी झालंय. कडकडून भूक लागली आणि फक्त पाणी किंवा ताक प्यायलं तरी देखील पित्त होत नाहीये, छातीत जळजळ होत नाहीये, हा अनुभव खूपच छान आहे. मी अजून माझ्या रक्त तपासण्या केल्या नाहीयेत, पुढल्या आठवड्यात करून त्यांच्या कायप्पा ला पाठवून देणार आहे. तत्तपूर्वी एक अजून सांगायचे आहे, प्रथिनांचे प्रमाण कमी झाले तर पाय दुखी किंवा अशक्तपणा, अशी लक्षणं दिसतात का? ४६ gms दर दिवशी असं प्रथिनांचे प्रमाण मला गुगलवर सापडलं. पण हे कसं आणि कशातून घ्यायचं याचं मार्गदर्शन डॉक्टरांच्या कायप्पा ग्रुप वर केलं जातं का? आणि दुसरं म्हणजे दिवसभरात लागणारी शक्ती म्हणजे उदा.ऑफिस ला जाणे, शिक्षक म्हणून काम करणे, या सगळ्यासाठी जी शक्ती लागते, ती या दोन वेळच्या आहारातून कशी भागवली जाते?( सध्या मी घरीच आहे, म्हणून मला हा प्रश्न पडलाय) आपल्या पैकी कोणाला माझ्यासारखा अनुभव आला असेल तर त्यांनी काय उपाय केला? ( मला मधुमेह नाही. )
  • Log in or register to post comments
स
सुमेरिअन Tue, 09/18/2018 - 21:07 नवीन
चार आठवडे झाले हा डाएट चालू करून. २.५ किलो वजन कमी झालं आहे. या डाएट चा सगळ्यात मोठा फायदा वाटलं तो म्हणजे पाळायला सोप्पं आहे. १. ब्लॅक कॉफी घेतली तर चालते का या डाएट मध्ये? डॉ. दीक्षितांनी ताक, नारळ पाणी, ग्रीन टी चालेल असा सांगितलं आहे विडिओ मध्ये. २. मी अमेरिकेला असतो. त्यामुळे कुठल्या व्याख्यानाला जाता आलं नाही. मला या डाएटच्या व्हाट्सअँप समूहामध्ये कसा ऍड होता येईल ते कोणी सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 09/19/2018 - 07:06 नवीन
ब्लॅक कॉफी घेतली तर चालते चिंता नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमेरिअन
स
सुमेरिअन Wed, 09/19/2018 - 18:28 नवीन
धन्यवाद डॉक्टर साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Wed, 09/19/2018 - 18:19 नवीन
ज्यांना कुणाला या अभियानाच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुप मधे सामील व्हायच असेल त्यांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना किंवा त्यांनी नेमलेल्या खालील व्यक्तिंना दिलेल्या फोन नंबरवर पाठवावेत. या दोन रिपोर्ट शिवाय सभासदत्व मिळत नाही. हे फोन नंबर विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या पुस्तकाच्या १५ व्या आवृत्तीमधे पान क्रमांक १४० वर दिलेले आहेत. क्र्मांक नाव शहर व्हॉटस अ‍ॅप क्रमांक 1 श्री. अरूण नावगे , मुंबई 8999406017 2 डॉ. वेदा नलावडे , पुणे 9545529255 3 डॉ. संतोष ढुमणे , पुणे 9890886727 4 डॉ. संगिता पंडित , पुणे 9822022416 5 श्री. संदीप सोनवणे , नाशिक 9422256450 6 श्री. अमोल भागवत , मुंबई 9757399529 7 श्री. ए जी चौधरी , ठाणे 9821862424 8 डॉ. अंजली दीक्षित , औरंगाबाद 9423779765 9 श्री. बाळासाहेब कदम , फलटण 9422033382 10 सौ. शर्मिला इनामदार , ठाणे 9769695940 11 डॉ. विमल डोळे , लातूर 9850056648 12 डॉ. नंदनवनकर , नांदेड 9823121986 13 डॉ. हेमंत अडीकणे , नागपूर 9420515123 14 श्री. अतुल कुलकर्णी , सोलापूर 9423067399 15 डॉ. शिल्पा तोतला , औरंगाबाद 9823281391 16 डॉ. सुजाता लाहोटी , औरंगाबाद 9325205455 17 अनिता बाहेकर , औरंगाबाद 9422211854 18 डॉ. आशिष चव्हाण , आंबेगाव, पुणे 9975051000 19 डॉ. सौ. सीमा दहाड , औरंगाबाद 8888849809 20 डॉ. राजेश दाते , दौंड 9422224298 21 डॉ. निकोसे , अमरावती 9422912614 22 श्री. दीपक कुलकर्णी , पुणे 9850217641 23 मुक्ता गाडगीळ , पुणे 9822171517 24 डॉ. गौतम शाह , धुळे 9881278698 25 डॉ. श्रीराम गोसावी , पालघर 9028381578 26 डॉ. गजानन जत्ती , सोलापूर 8237005707 27 डॉ. सुभाष जोशी , बीड 8275387063 28 डॉ. जयश्री कालानी , परभणी 9422925227 29 डॉ. राजकुमार कालानी , परभणी 9422176227 30 श्री. राजू अकोलकर , नागपूर 9096399222 31 डॉ. अर्चना बिर्ला , जळगाव 9226219302 32 सौ. वर्षा मालखरे , औरंगाबाद 9850184084 33 मनोज गोविंदवार , जळगाव 8237513242 34 डॉ. ए एन मस्के , सोलापूर 7030884546 35 डॉ. शैलेश नागपूरे , वर्धा 9503509430 36 सौ. शिल्पा उनकुले , पुणे 8975469006 37 डॉ. सुधीर चौधरी , औरंगाबाद 9822874194 38 डॉ. शालीनी , ओतूर पुणे 9975721202 39 डॉ. शर्मीली सूर्यवंशी , नांदेड 9325565009 40 श्री. शिवशंकर स्वामी , औरंगाबाद 9422210371 41 श्री. साकेत देशपांडे , बंगळूरू 9886843808 42 प्रा. प्रदीप पाटील , औराद शहाजानी 7588876455 43 सौ. रचना मालपाणी , लातूर 9422110282 44 श्री. उल्हास सावजी , औरंगाबाद 9049711106 45 सौ. वैशाली तोष्णीवाल , नगर 9657607268 46 श्री. रवी जगन्नाथन , ठाणे 9819576176 47 सौ. रेखा मुंदडा , धुळे 9422706111 48 डॉ. मनिषा चौरे , शिरूर 9270152610 49 डॉ. संध्या दळे , चेन्नई 9790799599 तसेच लेखात दिलेल्या लिंकमधील व्हीडीओमधे सांगितल्याप्रमाणे effortlessjag@gmail.com येथे मेल करा. किवा डॉ. दिक्षीतांचा फोन नं. ९९२२९९४७७७ आहे. या नंबरवर व्हॉट अ‍ॅपवर तुमचा प्रश्न विचारा. किंवा त्यांचा इमेल drjvdixit@gmail.com येथे कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमेरिअन
स
सुमेरिअन Wed, 09/19/2018 - 18:30 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Wed, 09/19/2018 - 18:37 नवीन
मा. संपादकीयांनी लोकांच्या सोयीसाठी वरील माहिती गाभा मधे हलवली तरी माझी काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
पिलीयन रायडर Wed, 09/19/2018 - 16:31 नवीन
माझी आई हे बऱ्यापैकी करते आहे. सणवार असल्याने कधी तरी वेळ पाळल्या जात नाही. मला जाणवलेल्या गोष्टी तिचं वजन 4 किलो ने कमी झालंय, जे नजरेला कळत आहे. भूक ओव्हरॉल कमी झालीये, 2 दा खाल्लं की तिचं पोट नीट भरत आहे. झोप गाढ लागतेय, लवकर झोपून जाते पण मला तिची एनर्जी जरा कमी झालीये असं वाटलं. त्याहूनही मसल मास कमी झालं की काय असं तिच्या कडे बघून वाटलं. हात वगैरे जरा गळल्यासारखे वाटले. तिलाही थोडं थोडं असंच वाटतंय. ती चालायला जाते, पण अजून वेगळा काही व्यायाम करत नाहीये. अजून थोडे दिवस बघू काय होतंय. माझ्या वडिलांना इन्शुलिन घ्यावं लागतं, त्यांना तरी त्यांच्या डॉकटरने हे डाएट करायला मनाई केली आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 09/19/2018 - 18:29 नवीन
आईंसाठी प्रथिनांसाठी काय करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 09/20/2018 - 17:25 नवीन
बहुदा ती काहीच करत नाहीये वेगळं. रोजचं जेवणच फक्त. त्यात डाळी, कोशिंबीर, उसळी वगैरे असतं तेच काय ते. पण मी तिला ह्यावर जरा नीट लक्ष द्यायला सांगेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
P
palambar Wed, 09/19/2018 - 18:18 नवीन
@चष्मेबद्दूर , आहारातील प्रथिने वाढवा व कर्बोदके कमी करा असे दीक्षित सांगतात, त्यासाठी पनीर, उसळी, सोया पनीर फुटाणे इ. मी जेवणात आधी खाते. राजमा, हरबरे, छोले, उकडून त्यात कांदा,लिंबू,चाट मसाला इ घालून फार छान लागते. चीज सुध्दा खाऊ शकता. दुसरा तुमचा प्रश्न दिवसभरात शक्ति पुरते का? तर हो , सुरवातीला सवय होईपर्यंत त्रास होतो पण आठवड्यानंतर सर्व त्रास थांबतो. (हे दीक्षितांच्या ग्रूप मधे सांगितले आहे) पाणी पण मधे मधे प्यायले पाहिजे. प्रथिनांसाठी मी बदाम, सोयाबीन, जवस, शेंगदाणे, अक्रोड, तीळ, चीया सीड्स, फुटाणे , सुर्यफूल व लाल भोपळा बी असे सर्व भाजून एकत्र पावडर करून ती रोज दोन चमचे घेते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 09/19/2018 - 18:29 नवीन
माझ्या पण हेच मनात आले होते. मोड आलेली धान्ये पचायला चांगली. त्यात जर काही दाणे मेथीचे असतील तर फारच उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar
च
चष्मेबद्दूर गुरुवार, 09/20/2018 - 06:13 नवीन
कडधान्ये खाऊन मला त्रास होतो, पोटात दुखणे वगैरे. ती वाफवून घेतली तरी मी जास्त नाही खाऊ शकत. प्रयोग करून झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
च
चष्मेबद्दूर गुरुवार, 09/20/2018 - 06:12 नवीन
मी रोज दिवसभरात 1 वाटी घट्ट डाळ, 2.५ चमचे (साधे) प्रोटीनेक्स पावडर दुधातून हे तर घेतोच पण जर नॉन व्हेज असेल तर ते यात additional होईल. असं असून सुद्धा मला थकवा येतोय. यात मी चालण्याचा व्यायाम करू शकत नाहीये. असंच अजून कुणाला झालेलं दिसत नाहीये, मला प्रत्यक्ष डॉ नाच विचारावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar
श
शाम भागवत गुरुवार, 09/20/2018 - 07:39 नवीन
डाॅ. ना भेटाच. मला वाटतेय प्रथिनांचे प्रमाण जास्त होतय किंवा ती पचत नाहीयेत. किंवा कार्बोहैड्रेट कमी पडताहेत. काहीतरी चुकताय नक्की. व्हाॅटसॲप ग्रुप मधे सामिल व्हा. दोन रिपोर्टस् अत्यावश्यक. नेहमीच्या जेवणात खूप मोठा बदल केलाय का? मांसाहार करणाऱ्यांनी प्रोटिन्स आवर्जून वाढवण्याची जरूरी नसावी. डाॅ खरे बघू काय म्हणतात ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चष्मेबद्दूर
श
शाम भागवत गुरुवार, 09/20/2018 - 07:58 नवीन
तो पर्यंत हे वाचून बघा https://www.livehindustan.com/news//article1-story-463763.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
च
चष्मेबद्दूर गुरुवार, 09/20/2018 - 09:04 नवीन
तुम्ही दिलेला लेख वाचला, त्याप्रमाणे मोजमाप करून बघते. मी एका वेळेला जास्त खाऊ शकत नाही, त्यामुळे देखील असं होत असावं. सल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
मराठी कथालेखक गुरुवार, 09/20/2018 - 14:17 नवीन
विटॅमिन्सची कमतरता झाली असेल .. मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या घेवून बघा. Matilda Forte चांगली आहे. झालंच तर जेवणातून साखर एकदमच पुर्ण बंद करु नका. फळे खा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चष्मेबद्दूर
I
II श्रीमंत पेशवे II गुरुवार, 09/20/2018 - 06:54 नवीन
मंडळी , प्रयोग चालू करून आज २ महिने पूर्ण झाले आहेत माझे वजन ७६ वरून ६८ झाले आहे पोटाचा घेर विलक्षण कमी झालाय ,सगळ्या विजारी सैल व्हायला लागल्या आहेत. गणेशोत्सव छान पार पडला ........ मित्र मंडळी आणि शेजारी यांचेकडे बाप्पांचे दर्शन घ्यायला गेल्यावर अगोदर 2 मिनिटे विनासायास ची माहिती देऊन दिलेला प्रसाद डब्यात घेऊन आलो. आणि विशेष म्हणजे मी चालू केलेला प्रयोग पाहून माझ्या समोर राहणारे काका वय ५५ वजन ८७ किलो यांना हि हा चालू करण्यास प्रवृत्त केले. खूप समाधान वाटले.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/20/2018 - 07:40 नवीन
लगे रहो. :) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II श्रीमंत पेशवे II
च
चष्मेबद्दूर Sun, 09/23/2018 - 13:55 नवीन
नावाची एक कॅप्सूल रोज घेतेय. शिवाय भरपूर पाणी, पातळ ताक, साखर एकदम बंद नाही केली, जेवणात मोठे बदल नाही केले, फक्त वेळा पाळतेय, असो. ग्रुप मध्ये सामिल झाले की कळेल.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 09/26/2018 - 14:28 नवीन
रिकाम्यापोटी व्यावाम करु नये असे सगळे जिम इन्स्ट्रक्टर सांगतात... हे कितपत योग्य आहे? दोन वेळ जेवणारांना आपल्या व्यायामाबाबत खुप बदल करावे लागत असतील मग.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 09/30/2018 - 03:23 नवीन
ऑ, मी तर ऐकलंय उपाशीपोटी केलेला व्यायाम हा जास्त परिणामकारक असतो. उपाशीपोटी जेव्हा इन्शुलिनची पातळी कमी असते तेव्हा ग्लुकॅगॉन सक्रिय असते आणि तेव्हा व्यायाम केला तर पहिल्यांदा ग्लुकोज नंतर ग्ल्याकोजेन आणि शेवटी चरबीच्या साठ्याला हात घातला जातो असे सांगतात. डॉ. जेसन फंग ची टू कम्पार्टमेंट्सची (फ्रिज आणि फ्रिजर) थेअरी देखील हेच सांगते. मग जिम इन्स्ट्रक्टर बरोबर कि डॉ. फंग? मिपावरचे डॉ. खरे किंवा इतर मंडळी खरे काय ते सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
च
चामुंडराय गुरुवार, 10/04/2018 - 03:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
म
माझीही शॅम्पेन Mon, 10/08/2018 - 15:45 नवीन
व्यायाम म्हणजे नक्की काय हे आधी स्पष्ट झालं तर डॉक लोक आणखी मार्गदर्शन करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा