Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - ऑगस्ट 2018

स
सोमनाथ खांदवे
Wed, 08/01/2018 - 03:09
🗣 266 प्रतिसाद
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते . आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.  सात जिल्ह्यात कलम १४४ लागू  हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

प्रतिक्रिया द्या
82317 वाचन

💬 प्रतिसाद (266)
स
सोमनाथ खांदवे Sat, 08/04/2018 - 07:42 नवीन
तो नं मोबाईल मध्ये असल्याने आपल्या प्रायव्हसी ला धोका आहे का ? आहे तर कसा ? नाही तर जनतेला सावधान चा इशारा देऊन मोदी सरकार ला पेचात टाकण्याचे काम मीडिया करत आहे का ? काय गोंधळ चाललंय काही कळतं नाही . अँड्रॉइड सगळ्या मोबाईल कंपन्या आणि आपण फुकट वापरतो असे असताना तो आधार चा नं ' गूगल च्या चुकीने अँड्रॉइड च्या मोबाईल मध्ये आला इथं पर्यंत मान्य ' आता त्या पासून आपल्याला त्रास काय आहे हेच समजतं नाही. .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/04/2018 - 09:43 नवीन
आता त्या पासून आपल्याला त्रास काय आहे हेच समजतं नाही. . आपल्याला ( जनतेला) त्रास काय आहे ह्याच कोणाला ही पडलेल नाही !! हे सर्व आधार कार्ड बद्दल असल्याने राजकीय पक्ष गोंधळ माजवत आहेत. त्रृणमुल कॉ पक्षाने ह्या प्रकरणात सु . कोर्टात याचीका सुद्धा सादर केलेली आहे.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 08/04/2018 - 17:07 नवीन
पंतप्रधान मोदींच्या ' वन नेशन वन इलेक्शन ' या संकल्पनेला सर्व पक्षांनी जरी पाठिंबा दिला असला तरी एकट्या काँग्रेस च्या सिब्बल , सिंघवी , खर्गे आणि चिदंबरम या नेत्यांनी विधी आयोगा समोर विरोध केला आहे . माणस सारखी निवडणूक मध्ये व्यस्त राहतात ( हा उदात्त हेतू दाखवायला ) म्हणून कदाचित भाजप ने ही संकल्पना आणली आहे पण ऐका झटक्यात देशाच्या राजकारणा बाहेर जाऊ या भीतीने फक्त काँग्रेस ने विरोध सुरू केलेला दिसतोय . 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पना संघराज्याविरोधी: काँग्रेस http://mtonline.in/qInmJb/dga via @mataonline: http://app.mtmobile.in
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 08/05/2018 - 14:32 नवीन
येत्या २१ अॉगस्ट रोजी प्रतीक्षीत असलेली IPPB (Indian Postal Payment Bank) सुरु होत आहे !! भारतीय डाक सेवेची १.५५ लाख ब्रँच देशभरात कार्यरत आहेत . ह्या मुलभुत सुविधांचा फायदा घेत बँकेची सेवा देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचणार आहे !! मा. पं प्र मोदीजींनी पाहीलेले स्वप्न खरे ठरत आहे !! देशात पोस्टाच्या जाळ्याचा अधिकतम फायदा लोकांना मिळण्यासाठी २०१८ व दुरद्रुष्टी असलैले मोदीजींना सत्तेत याव लागल !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/05/2018 - 14:39 नवीन
IPPB (Indian Postal Payment Bank) यशस्वीरित्या कार्यरत केल्यास... १. भारतिय बँकिंग क्षेत्र शेवटच्या नागरिकापर्यंत पोचविण्याचा क्रांतीकारक बदल घडवून आणणे आणि २. भारतिय डाकसेवेच्या सद्या कालबाह्य झालेल्या संसाधनांचा व देशभरच्या जाळ्याचा नवीन रुपात पुनर्जन्म करणे ही दोन अभूतपूर्व उदिष्ट्ये साध्य होतील, यात संशय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Sun, 08/05/2018 - 16:19 नवीन
डॉ साहेब , अचुक प्रतिसाद !! जागतीक पातळीवर डाकसेवा आता कालबाह्य झालेली आहे. अश्यावेळेला योग्य पावल उचलत हातात असलेल्या संसाधनांचा , प्रशिक्षित मनुष्षबळाचा व देशभरच्या जाळ्याचा नवीन रुपात पुनर्जन्म करणे हे ऊच्च प्रतिभा असलेल्या नेत्यालाच शक्य आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अभ्या.. Sun, 08/05/2018 - 18:09 नवीन
डिअर एक्काकाका, आपल्या आशावादाचे कौतुक वाटते पण पोस्ट हे खरच बॅकिंगला पर्याय होते का? पोस्टातले डिपॉझीट पैसे आणि मनिऑर्डर म्हनजेच बॅकिंग का? इतके दिवस माहीती तंत्रज्ञानाची इतकी प्रगती होऊन संपर्काची नवनवीन साधने तयार होत असताना पोस्ट झोपलेले होते, पण बँका नव्हत्या झोपलेल्या. इव्हन आयटीक्षेत्रही झोपलेले नव्हते. माझ्या मते पोस्टाला बॅकिंग व्यवहारात पडायची गरजच नव्हती. त्यांचे संपर्काचे इन्फ्रास्ट्रक्चर जर इतके जोरात आणि इफेक्टिव्ह असते तर आजही कार्यरत असलेल्या प्रायव्हेट कुरीयर कंपन्यांकडे पाहा. त्या नाही बंद पडल्या. उलट त्यांनी आधुनिक तंत्राचा जास्त वापर केला. आपल्या पार्सलची आणि डाकेची प्रत्येक स्टेज आणि स्टेटस आज ग्राहकाला कळते (पोस्ट ही हे करायले आहे पण त्यांचा ह्यातला वाटा किती?) ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ इतकी वाढली की त्या लॉजिस्टिक्स आणि डिस्ट्रीब्युशनसाठी कंपन्यानी सेपरेट सिस्टिम(फ्लिपकार्टची इकार्ट प्रमाणे) चालू केल्या. कित्येक बेरोजगारांना ह्यात रोजगार मिळतोय. कधीही रस्त्यावर पाहा एकतरी डिलिव्हरीबॉय बॅगा लटकवून फिरताना दिसतोच, अंगाडिया सारख्या सर्व्हिसेस (बेकायदा अस्ल्या तरी) आजही चालू आहेत, सर्व बँकानी आता नेटबॅ़किंग आणि अ‍ॅप्स अ‍ॅव्हेलेबल करुन दिले आहेत. पेटीएमसारखे मनी ट्रान्सफरचे पर्याय स्मार्टफोन धारकांना उपलब्ध आहेत, भीम सारखे युपीआयचे पर्याय स्मार्ट्फोन नसणार्‍या पण सर्वांना उपलब्ध आहेत. मोठ्या शहरात सुध्दा आता मोबाईल शॉपीच्या टपर्‍यातून मनी ट्रान्सफर करुन दिली जाते. पोस्ट अशा गोष्टीपासून दूर राहिले. आता फक्त ग्रामीण आणि अगदी रिमोट नागरिकांना बॅकिंग अ‍ॅव्हेलेबल करुन देण्यासाठी पोस्टाला राबवणे म्हनजे मूर्खपणा आहे. आधीच्या इन्फ्रास्टक्चरचा आणि मनुष्यबळाचा, आयटीचा दूरडृष्टीने आणि सफाईने वापर करीत पोस्टाने वेळेवर हालचाली केल्या असत्या तर कित्येक क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली होती. ह्यासाठी आधीचे सरकार आणि त्यांची धोरणे, लालफीत, सरकारी कर्मचार्‍यांची निवांन्त मनोवृत्ती ह्या कारणामागे खुशाल लपता येईल पण आता देर आये दुरुस्त आये असे म्हणायलासुध्दा मन धजावत नाही कारण....चिडीया चुग गयी खेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Mon, 08/06/2018 - 06:28 नवीन
पोस्ट खाते हे रेल्वे सारखे सरकारी खाते राहिले. याचे कारण पोस्टातील कर्मचारी नसून सरकारी बाबूशाही आहे. जगभरात रेल्वेचा वेग कुठच्या कुठे गेला असताना ८८ वर्षांपूर्वी चालू झालेली मुंबई पुणे डेक्कन क्वीन ३ तास १० मिनिटातच मुंबई पुणे अंतर कापते आहे. बी एस एन एल/ एम टी एन एल मागे राहण्याचे कारण सुद्धा हेच आहे. असलेली प्रचंड साधनसंपत्ती कशी वापरायची याबद्दल असलेली प्रचंड बंधने हेच एक मोठे कारण आहे. आजही भारतभरात आडजागी स्पीडपोस्ट २७ रुपयात आपले पत्र एक किंवा २ दिवसात पाठवते जेथे कुरियर कंपन्या जात नाहीत. शहरात बसलेल्या माणसांना याची किंमत समजून येत नाही. आजही बुलेट ट्रेनचे "तंत्रज्ञान" भारतात येऊ घातले आहे त्याला पण मिपावरच केवढा विरोध झाला. अशीच स्थिती ३० वर्षांपूर्वी संगणक येण्याबद्दल होती. डाव्या राजकारण्यांनी प्राणपणाने त्याचा विरोध केला होता. आजही सर्व दूर पोहोचलेल्या पोस्टबद्दल सामान्य माणसाला आपुलकी वाटते. त्याचा फायदा सामान्य माणसाला होऊ शकला तर काय हरकत आहे? अगदी पोस्ट खाते फारसा नफा मिळवू शकले नाही तरी गरीब माणसाला मूलभूत सुविधा उपलब्ध करू शकले तरी भारताच्या प्रगतीत तो एक मोठा मैलाचा दगड ठरू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 08/06/2018 - 07:06 नवीन
अस्थानी प्रतिसाद, पोस्ट 27 रुपयात कुठेही पत्र पाठवले आणि लोकांना पोस्टॅबद्दल आपुलकी आहे हा यूएसपी धरून त्याला बँकिंग क्षेत्रात कन्व्हर्ट करा आणि त्याला विरोध म्हणजे कम्प्युटर बुलेटट्रेनला विरोध आणि करणारे डावे राजकारणी हे गृहितकच म्हणजे भक्तीची परमसीमा आहे. आता अचानक बाबूशाही एकटी कारणीभूत असा साक्षात्कार असेल तर ती एकटी कारणीभूत नव्हती आणि ती संपलेली नाही. उलट बाबूशाहिवरच अवलंबून ठेवण्यासाठीच अशी पावले उचलली जात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डँबिस००७ Mon, 08/06/2018 - 08:29 नवीन
लोकांना पोस्टॅबद्दल आपुलकी आहे हा यूएसपी धरून त्याला बँकिंग क्षेत्रात कन्व्हर्ट करा जनरल जनतेला मोबाईल फोनच्या क्रांती नंतर पोस्ट अॉफिसच्या पोस्ट सेवेत रस राहीला नाही हे मान्य करायला हरकत नसावी ! गेली ४०-४५ वर्षे पोस्ट अॉफिस पोस्ट सेवे बरोबरच बर्याच ईतर सेवा देत आहे ज्यात पोस्ट बचत योजना , ईंदिरा विकास पत्र वै. याचा अर्थ पोस्ट अॉफिस हे बँकिंग क्षेत्रात फार पुर्वी पासुन आहेच ! आताच्या मोबाईल क्रांतीनंतर पोस्टाने कोर बँकिंग कडे जाणे जास्त सयुक्तिक ठरावे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सुबोध खरे Tue, 08/07/2018 - 16:49 नवीन
@ अभ्या. आपल्याला प्रतिसाद कळलंच नाहीये सबब त्यावर अजून वाद घालण्यात काहीच अर्थ नाही त्यावर माझा पास. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Tue, 08/07/2018 - 17:22 नवीन
अ‍ॅक्चुअली, कळण्यासारखा प्रतिसाद असता तर मीही घातला असता वाद पण असो म्हणता आहात तर असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुनील Mon, 08/06/2018 - 11:20 नवीन
अशीच स्थिती ३० वर्षांपूर्वी संगणक येण्याबद्दल होती. डाव्या राजकारण्यांनी प्राणपणाने त्याचा विरोध केला होता विरोध फक्त डाव्यांनी केला होता????? राजीव गांधींना "कम्प्युटर बॉय" म्हणून हिणवण्यात तत्कालीन भाजप नेतेदेखिल मागे नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
ट्रम्प Mon, 08/06/2018 - 13:26 नवीन
भाजप त्या वेळी बालवयात होती , त्यामुळे त्यांच्या बालचुका सोडून द्यायच्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
श
शाम भागवत Sun, 08/05/2018 - 16:43 नवीन
यानंतरचे पाऊल आहे पेमेंट बँकेचे रूपांतर कर्ज देणार्‍या बँकेत करणे. आता त्याची वाट पहायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Sun, 08/05/2018 - 17:22 नवीन
Indian Postal Payment Bank will have various offerings. गेल्या वर्षांपासुन जनतेला मिळणार्या सबसीडीचे पैसे (गॅस व ईतर ) आधार कार्डाला जोडले गेले त्यामुळे सबसीडीचे पैसे (गॅस व ईतर ) सरळ बँक खात्यात टाकणे शक्य झाले !! जनधन योजने अंतर्गत एका क्षमते पर्यंत नविन खाती उघडली गेली ! तरी सुद्धा दुर्गम भागात बँक नसल्याने तिथे रहाणार्या जनतेला जनधन योजने अंतर्गत नविन खाती उघडली गेली नाहीत. पण त्या पुढे जाउन Indian Postal Payment Bank मुळे दुर्गम भागातल्या जनतेला बँकेची सुविधा उपलब्ध होईल ! Indian Postal Payment Bank मार्फत केंद्र व राज्य सरकारच्या योजनेत ह्या जनतेला ओळख होईल व त्यानंतर सहभागी होता येईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
माहितगार Sun, 08/05/2018 - 15:18 नवीन
नेहरु कालीन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिक्षेपाची उदाहरणे खालील रिपब्लिक टि व्ही चर्चेत आलेली दिसतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात नेहरु कमी पडले असतील तर टिका केलीच पाहिजे. अर्थात नेहरुंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले तर आम्ही का नाकारु नये असे सरसकटीकरणही टळणे श्रेयस्कर असावे
According to you, did Nehru threaten freedom of expression? : Anand Ranganathan, Scientist and Author -- No: Rajiv Desai
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 08/06/2018 - 08:59 नवीन
माओ नक्षली वाघा उरमामी व त्याची बायको मुडे माधी (वय २० वर्षे फक्त) यांनी २९ जुलैला ओरीसात आत्म समर्पण केले . त्या दोघांना पकडुन देणार्यास प्रत्येकी पाच लाख रु च ईनाम सरकारने जाहीर केल होत. गरीब गावकरी जनता व आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी CPI Maoist ने चालवलेल्या नक्षली चळवळीत ओढले गेलेल्या वाघा उरमामीला १० वर्षांनंतर ह्या चळवळीतला फोल पणा लक्षात आला ! देशभरात गेले पाच सहा दशक CPI Maoist सशस्त्र नक्षली चळवळ चालवत आहे आणी कोणत्याही सरकारने त्यांना अडकाठी केलेली नाही
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 08/06/2018 - 09:37 नवीन
...देशभरात गेले पाच सहा दशक CPI Maoist सशस्त्र नक्षली चळवळ चालवत आहे आणी कोणत्याही सरकारने त्यांना अडकाठी केलेली नाही
समजले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 09:28 नवीन
तुमचा हेतू राजकीय असला तर असू दे बापडा (तो प्रत्येकाचा हक्कच आहे) पण तुमचे हे खालील विधान
देशभरात गेले पाच सहा दशक CPI Maoist सशस्त्र नक्षली चळवळ चालवत आहे आणी कोणत्याही सरकारने त्यांना अडकाठी केलेली नाही
साफ अज्ञानमूलक आहे, खालील दोन चित्रे बोलकी आहेत (आभार विकिपीडिया) Image removed. (नक्षलवादग्रस्त भाग २००७) Image removed. (नक्षलवादग्रस्त भाग २०१३) एकंदरीत दोन्ही चित्रे पाहता, चित्र सुस्पष्ट व्हावं, असो!. मागील सरकारांनी जाणीवपूर्वक "अर्बन नक्षल" किंवा नक्षल समर्थक संघटनांवर अंकुश ठेवला नाहीये इतकं म्हणायला मात्र नक्कीच वाव आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
माहितगार Mon, 08/06/2018 - 17:37 नवीन
Pakistan will be going to the IMF for the 13th time. हा पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन मधील लेख केवळ पाकीस्तानच्या आर्थीक अडचणी माहित करुन घेण्यासाठी नव्हे तर आय.एम.एफची कार्य प्रणाली थोडक्यात समजून घेण्यासाठी वाचावा. श्रीमंत देशातील ४ पाकीस्तानी मित्रराष्ट्रांचा प्रभाव असतानाही पाकिस्तानची अर्थव्यवस्था कशी वापरुन घेतली जाते हे पहाण्यासाठी वाचावा. त्या शिवाय इस्लामिक राष्ट्रांना ऋण व्यवहारास धार्मिक अनुमती नसतानाही सौदी इराण पाकीस्तान ते उर्वरीत इस्लामिक राष्ट्रांचा ऋण व्यवहारातील सहभागाची दुटप्पी गंमत बघण्यासाठी वाचावा.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 15:38 नवीन
तामिळनाडूचे भूतपूर्व मुख्यमंत्री, करुणानिधी ह्यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 08/07/2018 - 16:46 नवीन
तामिळनाडूचे भूतपूर्व मुख्यमंत्री, करुणानिधी यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
श
शब्दबम्बाळ Wed, 08/08/2018 - 08:44 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ट
ट्रम्प Tue, 08/07/2018 - 17:35 नवीन
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांनी मंगळवारी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूचे आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे. करुणानिधी हे दक्षिणेतील दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक होते. तामिळनाडूच्या राजकारणात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. आज करुणानिधींना आपण राजकारणी म्हणून ओळखत असलो तरी त्यांचा प्रवास चित्रपटांपासून सुरु झाला होता. तामिळनाडूच्या या लोकप्रिय नेत्याविषयी जाणून घ्या काही खास गोष्टी. - एम. करुणानिधी म्हणजेच मुत्तुवेल करुणानिधी यांचा जन्म ३ जून १९२४ रोजी तिरुकुवालाईमध्ये झाला. करुणानिधी यांनी एकूण तीन विवाह केले. त्यांच्या तीन पत्नींपैकी पद्मावती यांचे निधन झाले आहे. करुणानिधी यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. पद्मावतीपासून त्यांना एमके मुथू हा मुलगा आहे. दयालुपासून त्यांना एमके अलागिरी, एमके स्टालिन, एमके तमिलरासू आणि मुलगी सेल्वी अशी चार मुले आहेत. रजतिपासून त्यांना कनिमोळी ही मुलगी आहेत. कनिमोळी राज्यसभेवर खासदार आहेत. - करुणानिधी वयाच्या १४ व्या वर्षीच राजकारणात उतरले. हिंदी-हटाओ आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते. १९३७ साली शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. दक्षिणेत या निर्णयाला मोठा विरोध झाला. करुणानिधी सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले होते. लेखणीला हत्यार बनवत त्यांनी हिंदी भाषेला अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात जोरदार लेखन केले. हिंदी भाषेविरोधात रेल्वे ट्रॅकवर उतरुन त्यांनी आंदोलन केले. - हिंदी विरोधी आंदोलनानंतर करुणानिधी यांचे लेखन-वाचन सुरु होते. वयाच्या २० व्या वर्षी तामिळ चित्रपट कंपनी ज्यूपिटर पिक्चर्समधून त्यांनी पटकथा लेखक म्हणून आपल्या करीयरची सुरुवात केली व अनेक लोकप्रिय तामिळ चित्रपटाच्या कथा लिहिल्या. - द्रमुकच्या स्थापनेनंतर एम. करुणानिधी यांनी अण्णादुराई यांचा विश्वास संपादन केला व त्यांचे निकटवर्तीय बनले. तामिळनाडूत पक्षाचा पाया भक्कम करण्याची आणि पैसे गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. करुणानिधी यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या निभावली. या दरम्यान त्यांचे तामिळ चित्रपटात लेखन सुरुच होते. समाजातील वाईट गोष्टी आणि द्रविड अस्मितेचे विषय त्यांनी चित्रपटातून मांडले. - १९५७ साली द्रमुक पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला. त्यावेळी पक्षाचे एकूण १३ आमदार निवडून आले त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होता. त्यानंतर द्रमुकची राज्यातील लोकप्रियता वाढत गेली व अवघ्या दहावर्षात या पक्षाने तामिळनाडूचे राजकारणच बदलून टाकले. १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला पहिल्यांदा पूर्ण बहुमत मिळाले व अण्णादुराई तामिळनाडूतील बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. सत्ता मिळाल्यानंतर दोन वर्षातच १९६९ साली अण्णादुराई यांचे निधन झाले. - अण्णादुराई यांच्यानंतर करुणानिधींनी द्रमुकची धुरा संभाळली व मुख्यमंत्री बनले. त्यानंतर १९७१ सालच्या निवडणुकीत करुणानिधी यांनी स्वबळावर सत्ता मिळवली व मुख्यमंत्री बनले. या प्रवासात त्यांना लोकप्रिय अभिनेते एमजी रामचंद्रन यांची साथ मिळाली. पण ही मैत्री फारकाळ टिकली नाही. एमजीआर यांनी अण्णाद्रमुक हा स्वतंत्र पक्ष स्थापना केला. १९७७मध्ये एमजीआरनी करुणानिधी यांचा मोठा पराभव केला. - ६० वर्षाच्या राजकीय करीयरमध्ये करुणानिधी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. सर्वाधिक १३ वेळा आमदार बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. First Published On: Aug 07 2018 08:03 p.m.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/08/2018 - 08:51 नवीन
श्रद्धांजली !! >>देशाचे मोठे नुकसान झाले आहे. >> हे कसे ते कळले नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ज
जेम्स वांड Wed, 08/08/2018 - 12:28 नवीन
हे क्षेत्रीय पक्ष, पर्यायाने क्षेत्रीय इच्छा आकांक्षा ह्यांचे एक महत्वाचे स्तंभ होय. भारतीय व्यवस्था संघराज्यवादी पूर्णपणे नसली तरी क्षेत्रीय भाषिक, सांस्कृतिक, इत्यादी वेगळेपण जपायला म्हणून "अर्ध संघराज्यवादी" (क्वासी फेडरल) स्ट्रक्चर जपून असते. करुणानिधी अश्या क्षेत्रीय नेत्यांत एक वजनदार आवाज नक्कीच होते, अन कदाचित शेवटचे होते (नवीन पटनाईक अजून आहेत पण ते अल्पसंतुष्ट असून त्यांचे आक्रमक क्षेत्रीय समस्या मांडायचे पिंड नाहीये) म्हणून त्यांच्या (करूननिधींच्या) जाण्याने संघराज्य व्यवस्थेला बऱ्यापैकी धक्का पोचला आहे (जी व्यवस्था केंद्र सरकारला चेक अँड बॅलन्स म्हणून गरजेची आहे) , ह्या रीतीने त्यांचे जाणे थोडेफार नुकसान नक्कीच असावे देशाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
शब्दबम्बाळ Wed, 08/08/2018 - 08:42 नवीन
गोदी मीडिया जोमात! abp news च्या २ पत्रकारांनी दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय बनला. तस पाहिलं तर ही त्या वाहिनीची अंतर्गत गोष्ट असायला हवी होती पण ज्या रीतीने घटनाक्रम झाला त्यावरून सरकारला आपल्या धोरणांवर टीका करणाऱ्या पत्रकारांना कसे बाजूला करायचे आहे ते दिसत आहे. ध्रुव राठीच्या एकाच व्हिडीओ मध्ये बऱ्याच गोष्टी एकत्र सांगितल्या आहेत म्हणून तो इथे देत आहे. (असेही पोस्टकार्ड न्यूज च्या बातम्या मिपावरती चालतात मग घ्या हे ही चालवून! ;) ) थापा मारण्यात आणि फक्त थापच लोकांपर्यंत पोहोचवण्यात सरकार कित्ती "दक्ष" आहे हे दिसेल यातून! RSF ही संस्था पत्रकारिता स्वातंत्र्य आणि देश यावर २००२ पासून अहवाल प्रकाशित करते. यावर्षी भारताचे स्थान घसरून १३८ (१७० देशांमध्ये) या स्थानावर आले आहे! त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या एक स्थान वरती आहोत आपण, त्यांचा नंबर १३९ आहे!! मी गेल्या काही वर्षांचे आकडे पहिले. 2009 india 105, pak=159 2011-12 india 131 pak 151 2013 india 140 pak 159 2015 india 136 pak 159 संदर्भ- Deadly threat from Modi’s nationalism यावरून पाकिस्तान मजल मारून वरती आलेला दिसतो आहे तर भारताची अधोगती सुरु आहे! २०१४ च्या निवडणुकांआधी भारताचे स्थान भलतेच घसरले होते. असीम त्रिवेदीसारख्या व्यंगचित्रकारावर देशद्रोह खटला भरलेला जो महिन्यातच मागे घ्यावा लागला. आत्ता देखील हीच परिस्थिती येऊ घातली आहे. फरक इतकाच आहे कि काँग्रेस च्या काळात सगळे चॅनल सगळ्या घोटाळ्यावरून, भ्रष्टाचारावरून सरकारला फैलावर घेत होते, आता फक्त आणि फक्त स्तुती कराल तरच प्रगती कराल नाहीतर "घरी बसाल" असे चित्र तयार होत आहे. फेसबुक वरती एक राजकीय कार्टून शेअर केले म्हणून कमल शुक्ला या संपादकाला "देशद्रोह" कलम लावून आत टाकले. असेही "देशद्रोह" हे या राजकारण्यांचे आवडते कलम आहे. कारण याचे देशाशी काही देणे घेणे नाही. यावरती वेगळ्या(कन्हैयाच्या) धाग्यावर लिहितो वेळ मिळाला कि (मिपावर्ती मराठी टंकता येत नसल्यामुळे दुप्पट वेळ लागत आहे!) यांना मत देऊन चुकी केली असे वाटणे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे... :(
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 08/08/2018 - 11:01 नवीन
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले पाहीजे यात वाद नाही. पण पत्रकारीतेचे एकुणच व्यवसाय म्हणून चारीत्र्य साशंकीत झालेले नाहीना अशी शंका वाटते - काही इकडची चाटूगिरी करतात काही तिकडची - तटस्थतेचा बळी दिल्या नंतर इकडच्या असो अथवा तिकडच्या चाटूगिरीसाठी जनतेला किती प्रेम शिल्लक राहील या बाबत साशंकता वाटते. बाकी RSF ह्या संस्थेच्या तटस्थतेचे आणि पारदर्शकतेचे कौतुक जॉन रोसेंथॉल यांच्या लेख १ आणि लेख २ मधून उघडे पडत असावे. मनमोहन सिंग कालीन अशा (उदाहरणर्थ) बातमीने भाजपाचे शुद्धीकरण होणार नाही, त्याच वेळी होलीअर दॅन दाऊ चा नैतिक अधिकारही कितपत शिल्लक रहात असावा या बाबत साशंकता वाटते. भारतीय पत्रकारीता आणि राजकारण दोन्हींना त्यांचे आदर्श चारीत्र्य प्राप्तीसाठी अजून अवकाश बराच असावा असे वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
माहितगार Wed, 08/08/2018 - 11:19 नवीन
केरळचे ते उदाहरण राज्यसरकारी होते, मनमोहन कालीन दिल्ली पोलीस , सुप्रीम कोर्टाने लिव्हरेज देई पर्यंत खासदारांच्या बाबतीत स्टिंग ऑपरेशन करणार्‍या पत्रकारांच्या मागे पडली होती असे या वृत्तावरुन दिसते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
शब्दबम्बाळ Wed, 08/08/2018 - 22:04 नवीन
कमाल करते हो सरजी! मी लिहिलेल्या प्रतिसादात पहिला मुख्य मुद्दा "न आवडणाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या सरकारचा होता" तसेच हीच बाब अधोरेखित करणाऱ्या RSF रिपोर्ट बद्दल होता. आपण त्या प्रतिसादाखाली २ उपप्रतिसाद दिलेत. त्यातल्या एकाही प्रतिसादात आपण "सध्याच्या सरकारच्या काळात सुरु असलेल्या दबावतंत्राबद्दल" किंवा "भारताच्या घसरणाऱ्या पत्रकारिता स्वतंत्र्य निर्देशांकाबद्दल" अवाक्षरही काढले नाहीत! त्याऐवजी आपण काय केलेत? १.
"काही इकडची चाटूगिरी करतात काही तिकडची - तटस्थतेचा बळी दिल्या नंतर इकडच्या असो अथवा तिकडच्या चाटूगिरीसाठी जनतेला किती प्रेम शिल्लक राहील या बाबत साशंकता वाटते."
म्हणजेच सगळे पत्रकार कसे वाईट आहेत आणि अर्थातच ते वाईट असल्याने त्यांसोबत काय होते याविषयी जनतेला कशाला प्रेम शिल्लक राहील अशी शक्यता आपण बोलून दाखवलीत. थोडक्यात प्रसूनजींना काढले काय किंवा राजीनामा दिला काय "जनतेला"(की तुम्हाला) ममत्व वाटणार नाही हे स्वतःच अनुमान काढलेत. २.
बाकी RSF ह्या संस्थेच्या तटस्थतेचे आणि पारदर्शकतेचे कौतुक जॉन रोसेंथॉल यांच्या लेख १ आणि लेख २ मधून उघडे पडत असावे.
आपण दिलेले संदर्भ (जे हल्ली आपण अभावानेच देता) हे २००७ चे आहेत!! तब्बल ११ वर्ष जुने! पण त्यासंबंधी काहीही न लिहिता, या संदर्भांवरून RSF कशी थापडी आहे जणू हेच सिद्ध होते हे दर्शवण्याचा आपण प्रयत्न करत आहेत. याला म्हणतात "what अबाऊट गिरी" वाचणाऱ्याच्या मनात संस्थेच्या विश्वासार्हते बद्दल संभ्रम निर्माण करायचा जेणे करून हे आकडे विश्वासार्ह वाटू नयेत. जा जगात अस्तित्वात येणारी कुठलीही संस्था हि मर्त्य मानवानेच निर्माण केली असल्याने त्या संस्थेला कुठून ना कुठून पैसे/लोक/स्थळ यांचे संबंध हे लागणारच! आपण जी लिंक शेअर केली आहे त्याचे लेखक बायज्ड नाहीत हे कसे सिद्ध कराल? RSF च्या वेबसाईट वरती निर्देशांक कसा काढला जातो त्याची संपूर्ण पद्धती दिलेली आहे ती जाऊन बघू शकता. या खेरीज जगातल्या काही विश्वासार्ह संस्था हि यादी वापरतात! "The Index is a point of reference that is quoted by media throughout the world and is used by diplomats and international entities such as the United Nations and the World Bank." भारताचे स्थान कुठल्या यादीमध्ये वरती गेले की आम्ही जल्लोष करतो पण खाली जाताना दिसले कि प्रथम संस्थेवरती शंका घेणे हेच काम होते. नुट्रीशन इंडेक्स वरती पण हाच आरोप केला गेला होता. ३.
मनमोहन सिंग कालीन अशा (उदाहरणर्थ) बातमीने भाजपाचे शुद्धीकरण होणार नाही, त्याच वेळी होलीअर दॅन दाऊ चा नैतिक अधिकारही कितपत शिल्लक रहात असावा या बाबत साशंकता वाटते.
"असीम" चे उदाहरण देऊन मीच पहिल्या प्रतिसादात काँग्रेस बद्दल मत हे मांडले होते खरंतर, पण आपल्याला सध्याच्या सरकारवर टिप्पणी करण्याऐवजी मागच्या सरकारच्या वेळी काय झाले आणि मग ते पण वाईट होते हे आधी मांडावे वाटत आहे! म्हणून आत्ता विशेष काही वेगळे होत नसून फक्त भाजपाला आम्ही त्यापेक्षा चांगले कसे हे दाखवता येणार नाही अशी साशंकता दिसते. दोन्ही संपूर्ण प्रतिसादांमध्ये तुम्ही कुठेही "आत्ता" जे होत आहे त्यावर शून्य भाष्य केलं आहे. अशावेळी तुमच्या "कथित" निष्पक्ष भूमिकेबद्दल संशय येणे साहजिक आहे. बाकी आपण कोब्रा पोस्ट ची बातमी देऊन उत्तम काम केलेत बर का!! त्यांनी हल्लीच स्टिंग ऑपरेशन केलं होत ज्यात बरेच लोक अडकले होते. PAYTM वाले सुद्धा कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे समोर आले होते. झी न्यूज सारखे डझनभर चॅनल कसे "पेड न्यूज" दाखवतात हे ही समोर आले होते. साहजिकच मुख्य मीडिया ने हा रिपोर्ट प्रसारित केलाच नाही!! या रिपोर्टचे २ पार्ट होते. मी खाली एक व्हिडिओ देत आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये इतर भागांच्या लिंक मिळतील. बरेच धक्के बसतील बघून हे सगळे PAYTM चा फौंडर म्हणतो की "कैसे कैसे काम कारवाये संघ ने हम से क्या बतायें" तेव्हा काय बोलणार?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 08/09/2018 - 07:01 नवीन
....डझनभर चॅनल कसे "पेड न्यूज" दाखवतात हे ही समोर आले होते....
साहेब, माझ्याकडे ( ंइ सर्वीसला आलेल्या कंपनीकडे) जाहीरातीसाठी चिक्कार पैसा आहे अशा आशेने पुरेशा विवीध वृत्तसंस्थांनी स्वतःहून आम्ही पेड न्यूज देतो बरंका म्हणून सांगितलेला व्यक्तिगत अनुभव माझ्या गाठीशी आहे, यात मागच्या पिढीत आदर्श समजल्या जाणार्‍या पत्रकारांची नव्या (बायलॉजीकल) पिढीचाही समावेश होता. आताच्या काळात एकीकडे संपादकीय धोरणाची निश्च्चिती वृत्त संस्थांच्या जाहीरात विभागा कडून होते. तर दुसरीकडे पत्रकार मंडळी स्वतःची पत्रकारीता ब्लॅकमेलींगसाठी वापरताना दिसतात. तुम्ही कोणत्याही पक्षात असा त्यांच्या चंगळीची व्यवस्था करावी लागते. चंगळ केलीत तर सारे आलबेल नाही तर ब्लॅकमेल असे साधे सरळ हिशेब आहेत. सरकारी कंत्राटांचा शेकडो कोटींचा संबंध असतो ज्याच्या हाती कंत्राटे पडतात ते सरकारी बाजूने माध्यमांना पोसतात आणि ज्यांच्या पदरात कंत्राटे पडत नाहीत ते विरोधी बाजूने माध्यमांना पोसतात. राजकीय पक्ष, माध्यमे आणि पत्रकार त्यांच्या संघटना कोणत्याही असोत त्यांच्याकडे निष्पक्षतेच्या अपेक्षेतून न बघीतलेले बरे असावे. पेड न्यूज बद्दलचा एक लेख कोणत्याही पक्षास टार्गेट न करता मी जानेवारी २०१४ (मोदी सत्तेवर पोहोचण्याच्या आधी) काथ्याकुट चर्चेस घेतला होता, (मिपाकरांना त्या मुद्याचे महत्व कदाचित न उमगल्या मुळे फाट्यावर मारला गेला हा भाग वेगळा) तेव्हा पेड न्यूज बद्दलची मते मी भाजपा सरकारच्या सोईने बनवलेली नाहीत हे लक्षात घ्यावे. त्या शिवाय माझ्या वरच्या प्रतिसादात "भाजपाचे शुद्धीकरण होणार नाही, त्याच वेळी (विरोधी बाजूकडे) होलीअर दॅन दाऊ चा नैतिक अधिकारही कितपत शिल्लक रहात असावा या बाबत साशंकता वाटते. हे वाक्य माझ्या वरच्या प्रतिसादात सुस्पष्टपणे लिहिलेले आहे. इंदिरा गांधी काळ जगजाहीर आहे, नेहरुकाळात झालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिक्षेपाबाबतचा युट्यूब मी वर लावलेला आहे. तिथेही माझे वाक्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात नेहरु कमी पडले असतील तर टिका केलीच पाहिजे. अर्थात नेहरुंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले तर आम्ही का नाकारु नये असे सरसकटीकरणही टळणे श्रेयस्कर असावे असेच आहे.
...दोन्ही संपूर्ण प्रतिसादांमध्ये तुम्ही कुठेही "आत्ता" जे होत आहे त्यावर शून्य भाष्य केलं आहे. अशावेळी तुमच्या "कथित" निष्पक्ष भूमिकेबद्दल संशय येणे साहजिक आहे....
अर्थात नेहरुंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले तर आम्ही का नाकारु नये असे सरसकटीकरणही टळणे श्रेयस्कर असावे; मनमोहन सिंग कालीन अशा (उदाहरणर्थ) बातमीने भाजपाचे शुद्धीकरण होणार नाही, हि दोन वाक्ये कशाची द्योतक आहेत ? निष्पक्ष लेखनाची अपेक्षा करणारा वाचकाचे मनही निष्पक्ष आणि ओपन माईंडेड असावयास लागत नाही का ? याच धाग्यावर माझी आसाम विषयक भूमिका आहे ती तुम्ही कशी मोजता ? आता या ठिकाणी चर्चेचा मुख्य विषय प्रसून वाजपेयींचे ते वार्तांकन अपुर्ण आणि अस्पृहणियच आहे हे मी खालच्या प्रतिसादात व्यवस्थित दाखवून दिले आहे. स्त्रीयांच्या स्व-मदत गटांना उद्योग विषयक मार्गदर्शनासाठी रिसोर्स पर्सन म्हणून मी व्यक्तिशः फिरलो आहे ( मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी काँग्रेसच्या काळात ) . जाहीरात खर्च झेपत नाहीत प्रॉडक्टची वेगळी ओळख निर्माण करणे औघड जाते असे लक्षात आले तर मी त्या महिलांना सुप्रिया सुळेंशी संपर्क करुन त्यांना ब्रँड अंबॅसॅडर करता येते का पहा म्हणालो तेव्हा मी काय राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक होतो का काय ? कि मोदींनी एका महिला स्व-मदत गटास प्रसिद्धी दिली याचे महत्व समजून घेताना मोदी समर्थक होतो. कोणत्या ऐश्वर्या राय आणि कोणते सचिन तेंडूलकर आणि कोणते प्रसून वाजपेयीं सारखे पत्रकार स्त्रीयांच्या स्व-मदतगटांचे ब्रँड अँबॅसॅडर म्हणून वेळ आणि श्रम खर्च करतात ? स्त्रीयांच्या स्व-मदतगटांसाथी काही पॉझीटीव्ह नाही करता आले तर कमीत कमी काही निगेटीव्ह होणार नाही हे बघीतले जावयास नको हे बघण्याचे तारतम्य तथाकथित आदर्श पत्रकारांना नको का ?
...भारताचे स्थान कुठल्या यादीमध्ये वरती गेले की आम्ही जल्लोष करतो पण खाली जाताना दिसले कि प्रथम संस्थेवरती शंका घेणे हेच काम होते.
सॉरी व्यक्तीशः मी कोणत्याही अशा जल्लोशात सामील होत नाही. अगदी अशात भारताची अर्थ व्यवस्थेचा आकार किती वाढला या बद्दल चालू-घडामोडी धाग्यात मिपाकर मित्रांनी पोस्ट टाकली मी त्याच्या मर्यादा सुस्पष्ट केल्या. त्यानंतर त्यांच्या बाजूचे ट्रोलींगही सहन केले. परदेशी एन जी. ओ. धुतल्या तांदळासारख्या नाहीत संबधीतांचे हित संबंध जपले जाण्यासाठी त्या वापरुन घेतल्या जातात हेही तेवढेच खरे आहे त्यामुळे परकीय एनजीओ च्या जल्लोष असो वा टिका मी तरी विमुटभर मिठासोबतच घेतो कारण माझ्या देशाचे हित अहित करण्यास माझे देश बांधव समर्थ आहेत त्यासाठी परदेशी एन जी ओंच्या फुटपट्ट्यांवर विसंबण्यची आवश्यकता नसावी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शाम भागवत गुरुवार, 08/09/2018 - 16:30 नवीन
पेड न्यूज बद्दलचा एक लेख कोणत्याही पक्षास टार्गेट न करता मी जानेवारी २०१४ (मोदी सत्तेवर पोहोचण्याच्या आधी) काथ्याकुट चर्चेस घेतला होता, (मिपाकरांना त्या मुद्याचे महत्व कदाचित न उमगल्या मुळे फाट्यावर मारला गेला हा भाग वेगळा) तेव्हा पेड न्यूज बद्दलची मते मी भाजपा सरकारच्या सोईने बनवलेली नाहीत हे लक्षात घ्यावे.
मागाजी, एक दुवा द्यायचा. तो पण एका इंग्रजी लेखाचा आणि या एकोळी धाग्याला लेख म्हणायचे. परत मिपावाल्यांनी तो फाट्यावर मारला म्हणून अश्रू ढाळायचे. हे फार होतय असे तुम्हाला वाटत नाही का? तुमचे वाचन चांगले आहे. भरपूर अनुभव आहे, इंग्रजी चांगले आहे; तर करा की भाषांतर त्या इंग्रजी लेखाचे आणि द्या मराठीमधे सारांश. तुम्ही दिलेला दुवा मराठी लेखाचा असता तर मी असे काही सुचवलेच नसते. त्या लेखाखाली आलेल्या प्रतिक्रियापण एकत्रीतपणे सारांशरूपाने देता आल्या असत्या तर त्या लेखाच्या भाषांतराची खुमारी आणखीनच वाढली असती. "व्हॅल्यू अ‍ॅडेड" ह्या शब्दाचे महत्व, या विषयावर सविस्तर लेख लिहिण्याइतके ज्ञान तुमच्याकडे नक्कीच आहे. मी दुवा वाचला आहे. २०१४ चा असला तरी आजही तो कालबाह्य झालेला नाही. त्यावर ३-४ प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्या वाचाव्यात. मी त्या लेखाचा भाषांतर करण्याचा छोटासा प्रयत्नही करून पाहिला आहे. ते भाषांतरही तिथेच एका प्रतिसादात चिकटवले आहे. आणि मगच हे लिहितो आहे. तुम्ही इंग्रजीत असलेले चांगले लेख सारांश रूपाने मिपावर आणले आणि त्यानंतर तुमचे विचार त्यावर मांडलेत तर तुमच्या प्रत्येक धाग्याची मिपाकर आतुरतेने वाट पहातील. असे करणे हे कष्टदायक असले तरी ते लाभदायक नक्की असेल. पण त्यासाठी आदित्य कोरडेसाहेबांसारख्या लोकांचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक आहे. असो. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ट
ट्रम्प Wed, 08/08/2018 - 13:19 नवीन
" यावरती वेगळ्या(कन्हैयाच्या) धाग्यावर लिहितो " हे सोडून बाकीच्या मुद्द्यांना अंशतः समर्थन . बाकी काहीही असो कन्हया चा तुम्हाला लैच कळवळा राव , होऊन जाऊ द्या एकदा कन्हया वर चर्चा , काढा तुम्ही धागा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ट
ट्रम्प Wed, 08/08/2018 - 13:40 नवीन
सगळेच पत्रकार जनतेचा आवाज बनण्याचे कार्य करत नाहीत . प्रत्येक वर्तमानपत्र किंवा tv न्युज चॅनेल वर उच्च पदावर पोहचलेले पत्रकार हे सत्ताधारी किंवा विरोधक यांचे तळवे चाटत स्वतःचे खिसे भरण्याचे काम करत असतात .यात तुम्हाला एकही निष्पक्ष पणे पुढाऱ्यांचे बुरखे फाडणारा पत्रकार सापडणार नाही . कायम भाजप ला झोडणारी बरखादत्त निरा रडीया केस मध्ये बोलका बाहुला पंतप्रधान च्या काळात कशी सापडली होती हे आठवून बघा . https://jansatt.wordpress.com/2010/11/19/%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
माहितगार Wed, 08/08/2018 - 15:42 नवीन
प्रसून वाजपेयींचे उत्पन्न द्विगुणीत होण्याबद्दलच्या आक्षेप बद्दलचे हे वार्तांकन युट्यूबवर अनेक वेळा बघीतले. सांगितलेले गेलेले आकडे लिहिले आणि कॅल्क्युलेटरही वापरले . छत्तिसगढ राज्यात कांकेर नावाच्या गावात १२ स्त्रीयांनी स्व-मदत सहकारी गट स्थापन केला. सरकारी प्रशिक्षण घेऊन, सिताफळे तशीच विकण्या एवजी सिताफळांचा पल्प बनवून विकण्याचा प्रकल्प चालू केला . पहिल्या वर्षी त्याचे सिताफळाचे आईसक्रीम बनवून २५ हजार मिळवले हे विक्री उत्पन्न आहे की निव्वळ नफा हे वार्तांकनातून क्लिअर होत नाही. तसेच १२ स्त्रियांनी नेमके किती पैसे या सहकारी व्यवसायात आणले ? यंत्र सामुग्री आणि वितरण व्यवस्थेवर काय गुंतवणूक केली ? दर वर्षी किती किलो सिताफळे प्रोसेस केली , नेमके कोण कोणते खर्च केले याची अकाऊंटींग्च्या दृष्टीने नफा नेटकेपणे मोजण्यासाठी लागणरी माहिती या वार्तांकनातून मिळत नाही. मुद्दा सिताफळ विषयक सहकारी व्यवसाया बद्दल असताना , प्रसून वाजपेयी आणि त्यांची टिम धान म्हणजे तांदळापासूनच्या उत्पन्नाकडे चर्चा नेऊन जाणीव पुर्वक विषयांतर करताना दिसतात. त्या उत्पादनासाठी लागणारे खर्च आणि उत्पन्न लिहून काढण्यास वेळ देताना दिसतात, मग चर्चेचा मुख्य विषय असलेल्या सिताफळ व्यवसाया बद्दल पूर्ण माहिती जसे त्यांचे पासबूक खर्च लिहिण्याच्या वह्या सर्व पडताळून एखाद्या अकाउंटंट कडून तपासून का घेत नाहीत ? स्वतःला अकांटंसीचे ज्ञान नसेल तर ठिक एबीपी माझा तील यांचे सॅलरी मोजणार अकाउंटंटना विचारले तरी नफा मोजण्यासाठी नेमक्या कोणत्या माहितीची कमतरता आहे याची माहिती मिळाली असती. प्रत्येक व्यवसाय प्रत्येक वेळी फायद्यात असेल असे नाही. सरकारी आधिकार्‍यांनी त्यांच्या पातळीवर व्हॅल्यू अ‍ॅडीशन होऊन नफा मिळवता येईल अशा व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. केवळ अकाउंटींगचे ज्ञान नसले तर, सुशिक्षीतांना नफा नीट मोजता येत नाही, त्या तर अशिक्षीत स्त्रिया. मोदींसमोर बोलणार्‍या स्त्रिने पुर्वी व्यापारी २५ किलो सिताफळे ५०-६० रुपायांना घेऊन जात, आता एक किलो रसाला १५० रुपये मिळतात २५ किलो सिताफळांचा अंदाजे ५ किलो रस निघतो त्याचे ७०० रुपये मिळतात अशी माहिती दिली. २५ किलो मागे सिताफळांना ५० रुपायांएवजी रस काढल्यामुळे ७०० रुपये मिळत असतील तर फायद्याचे सर्वसाधारण गुणोत्तर चक्क दहापट होत असेल समजा काही रक्कम यंत्र सामुग्री रेफ्रीजरेशन आणि वितरणावर खर्च होत असेल ती वजा जाता जे काही अधिकचे दोन पैसे मिळतात ते नक्कीच आर्थीक प्रगतीत भर घालतात. पंतप्रधान मोदींनी त्या स्त्रीयांना टिव्हीवर उदाहरण म्हणून पेश करण्या आधी अकाउंटट लोकांचा अहवाल मागवून घेतला असता तर प्रसुन वाजपेयींना हा वार्तांकनीय गोंधळ घालण्याचा चान्स मिळाला नसता. सरकारी अधिकार्‍यांनी हाताशी हिशेब आकडेवारी अधिक व्यवस्थितपणे ठेवणे गरजेचे असते. स्त्रीयांच्या स्व-मदत गटांना प्रोत्साहन देणे हि केवळ भाजपा नव्हे काँग्रेस काळापासून प्रयत्न चालू आहेत. त्यातील यशाची उदाहरणे स्वतः पंतप्रधानांनी सादर करणे अत्यंत चांगली गोष्ट आहे. छत्तीसगढ सारख्या नक्षल ग्रस्त भागात व्यावसायिक यशाची उदाहरणे नैराश्य दूर करण्यासाठी मदत करणारी असू शकतात. पत्रकारांनी चिकित्सा करुन काही चुकत असेल तर नजरेस आणावे पण सर्वसामान्य माणसाचा आत्मविश्वास खचेल असे तमाशे करु नयेत. हे मोदीच काय एबिपीच्या मालकांना मीही सुनावले असते. या पत्रकारांनी गावात जाऊन अर्धवट माहितीच्या बळावर वृत्तांकनाचे पाप केले नाही त्या पेक्षा मोठे पाप त्या अशिक्षीत महिलांचा परस्परावर असलेल्या विश्वासाला आणि आत्म विश्वासाला मार्गदर्शन न करता खचवण्याचे काम केले ते खचितच स्पृहणिय नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
माहितगार Wed, 08/08/2018 - 15:49 नवीन
एक कळत नाही, नेटके विश्लॅषण करुन विरोधकांना नेमक्या मुद्यांवर उघडे पाडण्यात बाबत स्वतः भाजपा समर्थक एवढे उदासिन का असतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ट
ट्रम्प Wed, 08/08/2018 - 16:34 नवीन
मस्त , छान सडेतोड प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 08/09/2018 - 08:52 नवीन
आपण व्हिडीओ अनेकदा पाहिलात म्हणता तरीही आपल्याला गावाचा सरपंच उत्पन्नाबाबत काय म्हणत आहे, तसेच चंद्रमणी यांचा जो १२ महिलांचा गट आहे त्यातल्या इतर महिला आम्हाला काहीच फायदा झालेला नाही हे सांगताना दिसले कसे नाही याचे आश्चर्य वाटले!! आणि जरा काय आकडेमोड केलीत तेही लिहायचे होते म्हणजे कळले असते सगळ्यांना. आता पुन्हा व्हिडीओ सुरु करा आणि १०:११ पासून १२:२७ पर्यंत बघा! महिला काय म्हणतात "दुप्पट उप्तन्न राहील बाजूला आम्हाला आम्ही गुंतवलेले पैसे देखील परत मिळत नाहीयेत" (" जय प्रगती" गटाची प्रत्येक महिला महिन्याला १००रुपये गुंतवत होती, ५ वर्ष! असे पहिली महिला सांगते. ६००० रुपये झाले ५ वर्षांची गुंतवणूक. आता गेल्याच वर्षी २५००० रुपये गटाला म्हणजेच १२ जणींना मिळून मिळाले हे सांगतात. म्हणजे २५०००/१२ = २०८३ रुपये प्रत्येकी इतके भरघोस वार्षिक नफा बर का!) बर आता दुसरी महिला म्हणते कि हे २५००० आम्हाला मिळाले नाहीत कारण ते गटाच्या खात्यात होते जे यावर्षी ४५००० झालेत, आम्ही गुंतवलेले स्वतःचे पैसे पकडून! म्हणजे जवळपास ४००० रुपये एका महिलेला मिळणार. त्यांच्यानुसार हे उत्पन्न २ वर्षांचे मिळून झाले बर का आता. आता चंद्रमणी यांनी स्वतः सांगितलेला हिशोब बघूया! आम्ही २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो आणि यातून पूर्ण समूहाचा ७००रुपये नफा होतो! आता समूहात आहेत १२जणी, मग प्रत्येकीला ७००/१२= ५८ रुपये फायदा रोजचा! आपण दिवसाचा नफा जवळपास ६० रुपये पकडू, जरी सीताफळ हे वर्षभर विकणार नसले तरी मासिक उत्पन्न काढूयात!

प्रत्येकी मासिक उत्पन्न = ६०*३०= १८०० रुपये!!!

आणि या महिलेला राष्ट्रीय चॅनेल वर बोलावून विचारण्यात आले कि "तुमचे उत्पन्न दुप्पट झाले का? तसेच तुमचे दुप्पट झाले असेल तर तुमच्या समूहातल्या बाकी सदस्यांचे देखील झालेच असेल ना?" या दोन्ही प्रश्नांचे उत्तर "हो" असे दिले गेले. आता दुप्पटच का? तर सरकारचे दुप्पट उत्पन्नाचे व्हिजन काय आहे ते सगळ्यांना माहित आहेच, त्यामुळे तेच एकदा पाहणाऱ्यांच्या मनावर बिंबवायचा हा सरळ प्रयत्न होता! महिला बचत गट, आणि अनेक समूह याना मदत मिळायलाच हवी आणि मार्गदर्शन पण! परंतु स्वतःच्या थापा त्या महिलांवर का थोपवता? जोडधंद्यांतून १८०० रुपये मासिक उत्पन्न, धान्याच्या शेतीतून कुटुंब चालवणे शक्य नाही हे स्वतः त्यांनी देखील सांगितले आहे. मग सरकार काय शेतकऱ्याची थट्टा करायला बोलावते का अश्या लोकांना? एखाद्या खाजगी कंपनी मध्ये काम करणाऱ्या माणसाने जर सांगितले कि कंपनीने त्याचा पगार चक्क दुप्पट केला आहे तर सहकार्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही पण नंतर जर कळले कि त्याचा पगार महिना ४०००रुपये होता आणि आता ८०००रुपये केला आहे तर जोडाच काढतील नाही का?(हा पगार देखील वर लिहिलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त ठेवला आहे!) आणि त्या व्हिडीओ मध्ये प्रसून स्वतः सांगतात कि पहिल्यांदा "शेतीतील" उत्पन्न दुप्पट झाले का हे विचारले त्यामुळे लपवाछपवी तरी दिसत नाही कि जणू शेतीचे उत्पन्न विचारले आणि सीताफळाचे म्हणून दाखवले. चुकी नक्कीच म्हणू शकता. जेव्हा सरकारने पत्रक प्रसिद्ध केले कि फक्त सीताफळ उत्पन्नाबाबत चर्चा होती तेव्हा पुन्हा संपूर्ण रिपोर्ट केलाच त्यांनी! -ABP news made a mistake when the reporter asked the income of the farmer relating it to paddy. -Chandramani Kaushik income hasn’t got doubled, neither from Paddy nor from Sitafal. -Farmers are living in dismal condition with income even less than of NAREGA workers. -Past three years have seen multiple protests from farmers all over India. It is time government focusses on solving their real issues instead of cherry-picking few farmers and showing that the schemes brought by them are successful.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 08/09/2018 - 10:45 नवीन
१) विषय सिताफळ प्रक्रीया सहकारी महिला उद्योगा पुरता मर्यादीत आहे. जी चर्चा सिताफळ प्रक्रीया सहकारी महिला उद्योगा बाबत आहे ती तिथेच मर्यादीत ठेऊया. ग्रामीण अर्थ जिवन हा बराच मोठा विषय आहे. इतर बाबतीत म्हणजे एकुण उत्पन्नाशी सरमिसळ करण्याची घाई करण्याचे काही कारण नाही. २) जेव्हा सविस्तर चर्चा करतो आहोत तेव्हा, प्रसून वाजपेयींनी दिलेले त्यांच्या सोईचे तुकडे बघण्या पेक्षा, पंतप्रधानांचे गावकर्‍यांशी झालेले व्हिडीओ कॉन्फरन्सींग मूळातून अभ्यासावे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग विशीष्ट सरकारी स्कीमच्या यशाची बाजू दाखवण्यासाठी प्री प्लान्ड आहे यात वाद नाही. सिताफळ प्रक्रीया उद्योगातून होणार्‍या उत्पादना बाबत महिला बोलावयास लागते , त्या पुर्वी धानच्या शेतीतून उत्पन्न कमी पडते आहे हेच तीही सांगते आहे, आणि ते मोदी शांत पणे ऐकतात. त्यात उत्पन्न दुप्पट होत असल्याचा मोदी किंवा चंद्रमणींचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. चंद्रमणी जेव्हा सिताफळ प्रक्रीया उद्योग बद्दल बोलण्यास सुरु होते तेव्हा मोदींच्या चेहर्‍यावर स्मित येते . मोदी उत्पन्न दुप्पट झाले का विचारतात तेव्हा सिताफळ उद्योगातील उत्पन्न दुप्पट झाले का हाच त्याचा आशय असू शकतो. ज्या अर्थी तिनशे स्त्रीयांना उद्योगाशी जोडून घेतले असे चंद्रमणी म्हणते पल्पिंग मशिन वगैरेचे उलेख करते तेव्हा अगदीच चिल्लर उद्योग केला असे नसावे. आता त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे पंतप्रधान मोदी 'मुल्य्वृद्धी / व्हॅल्यू अ‍ॅडीशन करुन उत्पादनाची विक्री करावी म्हणजे उत्पन्न वाढते' हि अर्थशास्त्रीय संकल्पना ग्रामस्थांशी चर्चा करु लागतात आणि पंतप्रधान मोदी 'मुल्य्वृद्धी / व्हॅल्यू अ‍ॅडीशन करुन उत्पादनाची विक्री करावी म्हणजे उत्पन्न वाढते' हे देशातील ग्रामीण जनतेस संदेश देणे हाच मोदींच्या कार्यक्रमाचा हेतू दिसतो. हा हेतू साध्य करण्यासाठी असे एखादे सकारात्मक उदाहरणाचे पंतप्रधानांनी ब्रँड अँबॅसॅडर होणे केव्हाही चांगली गोष्ट आहे. ३) प्रसून वाजपेयींचे वार्तांकन म्हणजे चार्टर्ड अकाउंटटचा प्रॉफीट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्सशीट असणारा ऑडीट रिपोर्ट नव्हे. ४) प्रसून वाजपेयींचे वार्तांकन कांकेरच्या या महिलागटाच्या सिताफळ प्रक्रीया उद्योगातील अनेक आकडेवारी गोळाच करत नाही. मूळ प्रकल्प अहवाल, त्यांच्या हिशेबाच्या वह्या गुंतवणूकी आणि खर्च, फिक्स एक्सपेन्सेस , व्हॅरीएबल एक्सपेन्सेस , खेळते भांडवल, बँकाम्चे कर्जव्याज इत्यादी कशाचिही माहिती प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनातून पुढे येत नाही. कि ज्यावरुन नफ्याचे व्यवस्थित मोजणी करता येईल. पल्पिंग मशिनचा उल्लेख आहे पल्पिअंगमशिनची इन्व्हेस्टमेंटसाठीचे पैसे झाडाला उगवत नसावेत. आईस्क्रीम बनवण्यासाठी महिलांनी स्वतःची मशिनरी वापरली की दुसर्या कुणाची भाड्यानी वापरली याचे उल्लेख नाहीत. एकुण किती सिताफळे प्रोसेस केली याचे उल्लेख नाही. एके वर्षीचा नफा २५००० आहे तर दुसर्‍या वर्षी नफा का नाही याचे अकाऊंटींग उत्तराचा अभाव आहे. बँकेचे मशिनरीवर लोनसाठी जेस्टेशन पिरियड दिला असेल तर पहिल्यावर्शी कॅश हातात खेळेल पण पुढच्या वर्षी नफा होऊनही बँकेचा परतावा दिल्यामुळे हातात पैसे खेळतीलच असे नाकेव, असेच असेल असे नाही, प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनातील माहिती निष्कर्ष काढण्यासाठी परिपूर्ण नाही एवढा पहिला मुद्दा आहे. ६) प्रसून वाजपेयींनी रोजचे उत्पन्न ७०० रुपये आहे असा निष्कर्ष कसा काढला याची कल्पना ते देत नाहीत. समजा रोजचे उत्पन्न रुपये ७०० असले तरी पुर्वी जर रोज २५ किलो सिताफळे जशीच्या तशी विकून २५ किलो सिताफळांचे ५० रुपये मिळत असतिल आणि आता ७०० मिळत असतील प्रक्रीया केल्यामुले होणारी मुल्यवृद्धी दहापट व्हावी. आता प्रसून वाजपेयींच्या भागाकाराची तुलना कुठे चुकते ते सांगतो. आधी २५ किलो सिताफळांचे ५० रुपये मिळत त्या ५० ला १२ ने भाग द्या त्याचे ४ रुपये १६ पैसे होतात. आणि मग ७०० रुपयांना १२ ने भाग द्या त्याचे ५८ रुपये ३३ पैसे होतात. आता ४ रुपये १६ पैसे पुर्वी मिळत त्याच्याशी ५८ रुपये ३३ पैसे ची तुलना करा म्हणजे १४ पटीच्या आसपास मुल्यवृद्धी होत असल्याचे दिसून येते. ७) आता माझ्या वर विश्वास वाटत नसे, (आणि लगेच वाटणार नाहीच कारण चष्मे ) तर चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटट ना हे व्हिडीओ आणि माझे विश्लॅषण दाखवून त्यांचे मत घ्या. जी माहिती परिपूर्ण नाही त्या बेसिसवर निष्कर्ष काढणे योग्य आहे का त्यांना विचारा. ८) आणि मग महिलांना आणि देशाला तुम्ही फसवलेच जात आहात हा निष्कर्ष लादून दिशाभूल करणे नैतिक गुन्हाच कि नाही हे स्वयंरोजगार आणि स्व-मदत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी फिल्डवर मनोभावे काम करतात त्यांना विचारा. एवढे करुन चष्मे उतरवून बघता आले नाही तर केवळ बकळ सदीच्छा देऊ शकतो त्या आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Fri, 08/10/2018 - 07:27 नवीन
चालू द्या! उद्या सरकारने निष्कर्ष काढला की देशातील सगळ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची कि देशातल्या प्रत्येकाची? हे दावे सरकारने स्वतः आणि लोकांनी पडताळून पाहायला नकोत का? का तिथेही पंप्र लोकांना आशा दाखवत आहेत पण हे पडताळणी करणारे लोक त्यावर विरजण घालत आहेत म्हणाल? १.
"जी चर्चा सिताफळ प्रक्रीया सहकारी महिला उद्योगा बाबत आहे ती तिथेच मर्यादीत ठेऊया. ग्रामीण अर्थ जिवन हा बराच मोठा विषय आहे. इतर बाबतीत म्हणजे एकुण उत्पन्नाशी सरमिसळ करण्याची घाई करण्याचे काही कारण नाही."
मी सगळी आकडेमोड सीताफळ उद्योगावर केली आहे. मग पुन्हा ग्रामीण जीवन वगैरे कुठून काढलात काय माहित! मला काहीही घाई नाही. २.
ज्या अर्थी तिनशे स्त्रीयांना उद्योगाशी जोडून घेतले असे चंद्रमणी म्हणते पल्पिंग मशिन वगैरेचे उलेख करते तेव्हा अगदीच चिल्लर उद्योग केला असे नसावे.
तुम्ही नक्की काय बघताय मला खरंच कळत नाहीये! ३०० स्त्रिया?? अहो १०-१५ बायकांचा उल्लेख करतात त्या! अवघड आहे राव! जाऊदे दमलो आता सांगून, जर त्या महिलांना खरंच फायदा होत असता तर त्या तक्रार करताना दिसल्या नसत्या. माणसाला पैसे मिळत आहेत हे तरी कळत जरी कमी शिकलेला असला तरी! माझा मुद्दा हाच आहे की जर दिवसाला ६०-७० रुपये कमावणाऱ्या महिलेला तुम्ही उत्पन्न दुप्पट झाल्याची रोल मॉडेल दाखवणार असाल (समूहाचे खरे उत्पन्न इतका कारनामा झाल्यावर सरकारला सिद्ध करता आले असते पण ते अजूनही झालेच नाही) तर शेतकरी कशाला इतक्या भानगडीत पडेल? फक्त आमची योजना चांगली आहे हे दाखवायला? आणि चष्मे शोधण्यापेक्षा आकड्यांनी सिद्ध केलत तर मी नक्कीच मानेन हि खात्री देतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 08/10/2018 - 08:32 नवीन
माझा मुद्दा हाच आहे की जर दिवसाला ६०-७० रुपये कमावणाऱ्या महिलेला तुम्ही उत्पन्न दुप्पट झाल्याची रोल मॉडेल दाखवणार असाल (समूहाचे खरे उत्पन्न इतका कारनामा झाल्यावर सरकारला सिद्ध करता आले असते पण ते अजूनही झालेच नाही) तर शेतकरी कशाला इतक्या भानगडीत पडेल?
मान्य आहे सरकारने चार्टर्द अकाऊंटटचा रिपोर्ट उपलब्ध झाल्यावर दावा केला म्हणजे अधिक बरे झाले असते, पण तरीही म्हणून प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनाला चार्टर्द अकाऊंटटचा रिपोर्ट चा दर्जा देता येतो का हे आपल्या परिचयातील चार्टर्ड अकाऊंटला विचारावे.
जाऊदे दमलो आता सांगून, जर त्या महिलांना खरंच फायदा होत असता तर त्या तक्रार करताना दिसल्या नसत्या.
एवढ्यात दमलायसा ? फक्त सांगण्याची सवय झाली की असे होत नाही ना ? जरा कान देवून मूळ प्रसारण ऐकावे म्हणजे ३०० चा आकडा कुठून येतो ते कळेल. नफा/तोटा मोजण्यासाठी प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनात कोणती माहिती नाही हे आपणास प्रतिसादात लिहूनही लक्षात घेणे अवघड जाते, आता माझ्या वर विश्वास वाटत नसे, (आणि लगेच वाटणार नाहीच कारण चष्मे ) तर चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटट ना हे व्हिडीओ आणि माझे विश्लॅषण दाखवून त्यांचे मत घ्या. जी माहिती परिपूर्ण नाही त्या बेसिसवर निष्कर्ष काढणे योग्य आहे का त्यांना विचारावे. हे क्लिअर वेगळा पॉईंट टाकून लिहिले तरी पहात नाही. त्यातर अशिक्षीत स्त्रिया आहेत कोणी पत्रकार संपूर्ण अकाऊंटीग न तपासता चुगल्या पोहोचवून भांडणे लावून देण्याची व्यवस्था करतो हे शहाण्पणाचे लक्षण आहे का ?
---३०० स्त्रिया??...
यूट्यूब व्हिडिओ पहाण्याचे कुणाचे काही सुटत आहे का ? ते प्रसून वाजपेयींचे तुकडे बाजूस ठेऊन मूळ प्रसारण पहाण्यास सुचवले होते . खाली दिला होता पुन्हा एकदा देतो. आणि अजून एक तुमच्या प्रतिसादातील कॅल्कुलेशन मध्ये 'रोज' हा शब्द पुन्हा पुन्हा येतोय तो नेमक्या कितव्या मिनीट सेकंदाला कोणत्या महिला सदस्याच्या तोंडात कोणत्या युट्यूब मध्ये येतो ते सांगावे मूळ प्रसारण दोनदा पहा ओळखीतल्या चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटटला माझा प्रतिसाद दाखवून त्यांचे मत कळवा, मग पुढे बोलू. तो पर्यंत दोन मूळ प्रसारणे पुन्हा एकदा. आणि चंद्रमणीचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
माहितगार गुरुवार, 08/09/2018 - 11:29 नवीन
. हे डायरेक्ट पि एम ओ वेबसाईटवर कसे शोधायचे माहित नाही. मोदींच्या स्त्री स्व-मदत गटांशी व्हिडीओ कॉन्फरन्सीम्ग मधील ज्यांना चुका काढायच्या असतील त्यांनी खालील युट्यूब पहाव्यात त्यात आणखीही उणीवा मिळतील नाही असे नाही, पण स्त्री स्व-मदत गटांची संकल्पना या स्त्रीया नेमके काय करण्याचे प्रयत्न करत आहेत ह्याची थोडीफार ओळख होण्यास मदत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ट
ट्रम्प गुरुवार, 08/09/2018 - 12:48 नवीन
शब्दबंबाळ साहेब , मी तो व्हिडिओ पहिला , खेडेगावातील बायका कॅम्येरा समोर सफाईदार बोलू शकत नाहीत .त्यामुळे आपण आपली बुद्धी वापरून व्यवस्थित अर्थ काढायचा असतो .शब्दांचा किस पाडून लांबलचक प्रतिसाद लिहण्यापेक्षा सीताफळ शेती कशी करतात या वर वाचन करायचे . थोडा लॉजिकल विचार करा 25 kg चीं सिताफळांचा पल्प काढण्याचे काम एक बाई करू शकते तिथे तुम्ही ते काम 12 जणी करतात अस का रंगवता ? " आम्ही २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो " इथं पर्यंत त्या महिलेचे वाक्य आहे , म्हणजे 700 रु प्रत्येकीला मिळतात असा अर्थ होती . " आणि यातून पूर्ण समूहाचा ७००रुपये नफा होतो!आता समूहात आहेत १२जणी, मग प्रत्येकीला ७००/१२= ५८ रुपये फायदा रोजचा!आपण दिवसाचा नफा जवळपास ६० रुपये पकडू . " हे सगळं तुम्ही जोडलं आहे . त्या महिला त्यांचे कर्तृत्व आनंदाने सांगत आहेत तर तुम्ही त्यांच्या आनंदावर ( प्रसून , बरखा , कन्हया , कुबेर यांच्या सारखे) विरजण का घालताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Fri, 08/10/2018 - 07:06 नवीन
मला खरंच सडेतोड प्रतिसाद द्यायचा मोह आवरावा लागतोय... नाहीतर उत्तम रीतीने तुमच्या पद्धतीचा प्रतिसाद दिला असता! जिथे तिथे नुसते ट्रोलिंग करण्यापेक्षा जरा समोरची माहिती तरी नीट बघत जावा हो! एक व्हिडीओ बघितला तर नुसता! तेवढाही नीट बघता येत नसेल तर काय बोलायचं... आता एक काम करा पुन्हा व्हिडीओ लावा आणि ८:०० पासून ९:०० पर्यंत बघा! चंद्रमणी स्वतः सांगताना दिसतील कि ७०० रुपये हा एकटीच नाही तर संपूर्ण समूहाचा(१२ लोक) उत्पन्न आहे. अहो इथे तर डोकं लावायची पण विशेष गरज नाही हो पण बघा प्रयत्न करून! तुमचे विधान
" आम्ही २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो " इथं पर्यंत त्या महिलेचे वाक्य आहे , म्हणजे 700 रु प्रत्येकीला मिळतात असा अर्थ होती ."
आता आपल्या हिशोबाने मांडणी करूया हा!(जरी तसे नसले तरीही) प्रत्येक महिला रोज २५केजी सीताफळ प्रोसेस करत असेल तर १२ महिलांचे मिळून ३०० केजी सीताफळ होतात!! तेही एका दिवसाला! हा तर उद्योग समूह झाला! बर असो, एकीचे रोजचे उत्पन्न ७०० रुपये पकडले तर मासिक उत्पन्न किती होते? ७००*३०=२१००० रुपये एका महिन्याचे उत्पन्न तेही प्रत्येकीचे!! इतके पैसे पल्प काढून मिळायला लागले तेही दर महिना तर इंजिनीरिंगची नवीन पोरं ८०००-१०००० मिळणारा पगार सोडून पळतील कि हो पल्प काढायला! :D शिवाय इतके भरघोस उत्पन्न असते तर समूहाच्या बायका स्वतःच का तक्रार करत असत्या कि फायदा होत नाहीये, गुंतवलेले पैसे देखील मिळत नाहीयेत? त्यामुळे नेक्स्ट टाइम कोणाला बुद्धी वापरायला, लॉजिक लावायला, शब्दांचा कमी खिस पडायला सांगत असाल तेव्हा जरा विचार करा... चर्चा नीट देखील केल्या जाऊ शकतात, जमल तर बघा!
त्या महिला त्यांचे कर्तृत्व आनंदाने सांगत आहेत तर तुम्ही त्यांच्या आनंदावर ( प्रसून , बरखा , कन्हया , कुबेर यांच्या सारखे) विरजण का घालताय ?
मला त्या रिपोर्ट मध्य महिला तक्रार करताना दिसल्या... तुम्हाला कुठे आनंदाने सांगताना दिसल्या? बाकी अर्णव वगैरे "पत्रकार" आपले लाडके असतील दिसतंय बाकीचे विरजण घालणारे! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
म
माहितगार Fri, 08/10/2018 - 08:33 नवीन
माझा मुद्दा हाच आहे की जर दिवसाला ६०-७० रुपये कमावणाऱ्या महिलेला तुम्ही उत्पन्न दुप्पट झाल्याची रोल मॉडेल दाखवणार असाल (समूहाचे खरे उत्पन्न इतका कारनामा झाल्यावर सरकारला सिद्ध करता आले असते पण ते अजूनही झालेच नाही) तर शेतकरी कशाला इतक्या भानगडीत पडेल?
मान्य आहे सरकारने चार्टर्द अकाऊंटटचा रिपोर्ट उपलब्ध झाल्यावर दावा केला म्हणजे अधिक बरे झाले असते, पण तरीही म्हणून प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनाला चार्टर्द अकाऊंटटचा रिपोर्ट चा दर्जा देता येतो का हे आपल्या परिचयातील चार्टर्ड अकाऊंटला विचारावे.
जाऊदे दमलो आता सांगून, जर त्या महिलांना खरंच फायदा होत असता तर त्या तक्रार करताना दिसल्या नसत्या.
एवढ्यात दमलायसा ? फक्त सांगण्याची सवय झाली की असे होत नाही ना ? जरा कान देवून मूळ प्रसारण ऐकावे म्हणजे ३०० चा आकडा कुठून येतो ते कळेल. नफा/तोटा मोजण्यासाठी प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनात कोणती माहिती नाही हे आपणास प्रतिसादात लिहूनही लक्षात घेणे अवघड जाते, आता माझ्या वर विश्वास वाटत नसे, (आणि लगेच वाटणार नाहीच कारण चष्मे ) तर चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटट ना हे व्हिडीओ आणि माझे विश्लॅषण दाखवून त्यांचे मत घ्या. जी माहिती परिपूर्ण नाही त्या बेसिसवर निष्कर्ष काढणे योग्य आहे का त्यांना विचारावे. हे क्लिअर वेगळा पॉईंट टाकून लिहिले तरी पहात नाही. त्यातर अशिक्षीत स्त्रिया आहेत कोणी पत्रकार संपूर्ण अकाऊंटीग न तपासता चुगल्या पोहोचवून भांडणे लावून देण्याची व्यवस्था करतो हे शहाण्पणाचे लक्षण आहे का ?
---३०० स्त्रिया??...
यूट्यूब व्हिडिओ पहाण्याचे कुणाचे काही सुटत आहे का ? ते प्रसून वाजपेयींचे तुकडे बाजूस ठेऊन मूळ प्रसारण पहाण्यास सुचवले होते . खाली दिला होता पुन्हा एकदा देतो. आणि अजून एक तुमच्या प्रतिसादातील कॅल्कुलेशन मध्ये 'रोज' हा शब्द पुन्हा पुन्हा येतोय तो नेमक्या कितव्या मिनीट सेकंदाला कोणत्या महिला सदस्याच्या तोंडात कोणत्या युट्यूब मध्ये येतो ते सांगावे मूळ प्रसारण दोनदा पहा ओळखीतल्या चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटटला माझा प्रतिसाद दाखवून त्यांचे मत कळवा, मग पुढे बोलू. तो पर्यंत दोन मूळ प्रसारणे पुन्हा एकदा. आणि चंद्रमणीचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ट
ट्रम्प Fri, 08/10/2018 - 13:37 नवीन
काही तरी गोंधळ झालेला दिसतोय , मी नक्की कोणता व्हिडिओ बघणे अपेक्षित आहेत ते तारीख, पोस्टिंग ची वेळ सहित द्या म्हणजे माझ्या पण डोळ्यावरील भाजप प्रेमाचे कातडे दूर होण्यास मदत होईल . एका प्रतिसादात तुम्ही 10.11 ते 12 .27 या वेळेचा व्हिडिओ बघा म्हणताय तर एकदा 8 त 9 या वेळेचा बघा म्हणताय . नक्की कोणती वेळ आणि कुठल्या तारखेचा किती वाजता पोस्ट केलेला व्हिडिओ ते पण सांगा , आपण हा सगळा गोंधळ मिटवून टाकू . एकदा तुम्ही कन्हया चा व्हिडिओ टाकून त्याचे गुणगान करत होता , तो व्हिडिओ पहिल्या नंतर मी उपस्थित केलेले मुद्द्यांवर स्पष्टीकरण द्यायच्या ऐवजी अंतर्धान पावले ,आता तसे नका करू . थोडक्यात अंतर्धान होण्याची इमेज नका बनवून घेऊ .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Tue, 08/14/2018 - 08:21 नवीन
महिगारांच्या ज्या प्रतिसादाला तुम्ही "सडेतोड" असा प्रतिसाद दिला आहे त्यातच त्यांनी एक व्हिडीयोची लिंक दिली आहे त्याबद्दल बोलतोय. त्यातला वेळेचा तुकडा हि सांगितलंय तुम्हाला... तुम्ही तो प्रतिसाद पूर्ण वाचला असावा अशी अशा करतो
एकदा तुम्ही कन्हया चा व्हिडिओ टाकून त्याचे गुणगान करत होता
आपल्याला गुणगाण चा अर्थ कळत असावा अशी अपेक्षा आहे. ट्रेंड मार्क यांनी वाट्टेल तसे आरोप केले आणि गायब झाले, ते कसे बिनबुडाचे आहेत (पीएचडी बद्दल) हे मी स्पष्ट केले. तसेच अजून काही शंका असतील तर त्याचा स्वतःचा व्हिडीओ पहा म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील हे सांगितले होते. यात आपल्याला "गुणगान" कुठे दिसले? त्याखाली आपण मात्र ट्रोलिंग करायला सुरुवात केलीत... त्याच्या उच्चारांचा आधार घेऊन कमी लेखण्याचा प्रयत्न केलात त्यामुळे असल्या प्रतिसादांना मी फाट्यावर मारतो. अजून एक, या कांकेर च्या महिला सीताफळाचा उच्चार "छिताफळ" असा करतात, भारी वाटत ऐकायला ते! पण मी काय म्हणतो करा कि इथं पण जरा उच्चारांवरून ट्रोलिंग? कसे... माझ्या इमेज ची चिंता नसावी, स्वतःची मात्र करू शकता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रेड मार्क Tue, 08/14/2018 - 22:39 नवीन
कन्हैया भक्ताबरोबर कुठे वाद घालणार म्हणून मी उत्तर दिलं नाही. तो एवढा पीएचडी करतोय म्हणजे मिती बुद्धिवान असेल आणि त्याचे भक्त पण तेवढेच बुद्धिवान असणार. आम्ही पामर कुठे पासंगाला पण पुरणार नाही. तुमचे धन्यवाद मानतो, माझ्या ज्ञानात भर टाकलीत की पीएचडी करणाऱ्यांनी काम न करता फक्त सरकार अनुदान देतंय म्हणून काही न केलेलं चालतं. तसेच एकूणच आकलनशक्ती आणि हुशारी जास्त असल्याने त्यांना विचारस्वातंत्र्यही जास्तच असलं पाहिजे. म्हणून ते काहीही बोलले, कुठल्याही घोषणा दिल्या तरी त्या बरोबरच असल्या पाहिजेत. तळटीप: माझी कन्हैयावरून (किंवा उमर खालेद, शेहला रशीद वगैरे) वाद घालायची अजिबात इच्छा नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. तुम्ही त्याला दैवत मानत असाल तर तुमच्यासाठी चांगलंच आहे. आणि हो मला माझ्या इमेजची चिंता आहेच. माझ्या कुठल्याही आयडी वरून मला देशद्रोहाचं समर्थन करायचं नाही किंवा ज्यांची निष्ठा संशयास्पद आहे अश्या लोकांबरोबर कुठल्याही तर्हेने जोडलं जायचं नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ट
ट्रम्प Wed, 08/15/2018 - 07:46 नवीन
दीड महिन्यांपूर्वी च्या भिडे गुरूजींच्या धाग्यावरील कन्हया बद्दल ची तुम्ही अर्धवट ठेवलेली चर्चा आता पुन्हा सुरू करताय ? अरे वा छानच आहे ! तुम्ही म्हणाला होता म्हणून तुम्हाला मी वेगळा धागा काढण्यासाठी समर्थन दिले होते , म्हणजे काय कन्हैया बद्दल सगळे विषय भविष्यात एकाच धाग्यावर सापडतील . तो माझा प्रतिसाद पुढील प्रमाणे होता . एव्हलांचं प्रूफ टेंट के लिये सिर्फ भाजप को जिम्मेदाड पकड रहे है ? काँग्रेस ने क्यो नही लिये ? 2) बिहाड में जो दलितो की हत्याये हुई उसके लिये भाजप क्यो ? नितीश कुमार जिम्मेदाड नही है ? 3) दलितो की बुक बॅन के बारे में बोलते वक्त मनुस्मृती बॅन के बारे में क्यो नही बोले ? 4) आरक्षण के बारे में बोलते वक्त गटड साफ करने वाले और मंदीड के पुजाडी की बात करते करते प्रायव्हेट कम्पनी में आरक्षण क्यो नही ऐसा उन्होंने सवाल किया . कीधड की लिंक कीधड जोड रहे हैं वो ? प्रायव्हेट कम्पनीयो में भला गटड साफ कडने वाले और मंदिड के पुजाडी का क्या काम , वाहां टॅलेंटेंड लोगो को ही चूनते है फिर वॊ किसीं भी जाती से हो . सिड्फ गव्हर्नमेंट में आरक्षण के नाम पर कुछ भी चलता हैं . 5) हमारे भारत में दलितो की जीवन अवस्था के लिये सिर्फ चार साल पुराणी भाजप की सरकार जिम्मेदाड है ? दलितो की जीवन अवस्था के लिये काँग्रेस की कोई जिम्मेदाडी नही ? अगर है तो आज तक हमने श्रीमान कन्हया कुमार जी को काँग्रेस के खिलाफ बोलते वक्त हमने नही देखा . अगर आपने देखा है तो डालीये बीडीओ . 6) कन्हया कुमार जी बिहाड से आये है और बिहाड की जो दुरावस्था लालूप्रसाद ने की है , कन्हया जी ने उनके बारे में भी कभी गुस्सा आज तक नही दिखाया ? ऐसा क्यो ? सभी प्रॉब्लेम के लिये सिड्फ भाजपा की गलती है क्या ? त्याच्या उच्चरा प्रमाणे लिहिलेल्या शब्द फाट्यावर मारा पण कन्हया बद्दल उपस्थित केलेले प्रश्न फाट्यावर मारणे म्हणजे शुद्ध पळपुटेपणा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा