Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - ऑगस्ट 2018

स
सोमनाथ खांदवे
Wed, 08/01/2018 - 03:09
🗣 266 प्रतिसाद
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते . आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.  सात जिल्ह्यात कलम १४४ लागू  हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

प्रतिक्रिया द्या
82317 वाचन

💬 प्रतिसाद (266)
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 08/16/2018 - 02:14 नवीन
किती दुतोंडीपणा हो? कन्हैयाचा विषय तुम्ही स्वतः या धाग्यावर काढलात (ज्याची इथे गरज नव्हती पण असो ) आणि आता मला म्हणताय
दीड महिन्यांपूर्वी च्या भिडे गुरूजींच्या धाग्यावरील कन्हया बद्दल ची "तुम्ही" अर्धवट ठेवलेली चर्चा आता पुन्हा सुरू करताय ?

चर्चा "मी" तिथेही सुरु केली नव्हती आणि इथेही केलेली नाही!(तुमच्याशी तर नाहीच नाही)

काही अतिउत्साही स्वयंघोषित देशभक्त (जे स्वतः देश सोडून डॉलर छापायला बाहेर राहतात आणि फावल्या वेळेत देशभक्तीची सर्टिफिकेट वाटतात) जे आरोप करत होते पीएचडीबद्दल त्याचे मी उत्तर दिले, हे मी वरच्या प्रतिसादात लिहिले आहेच. आपल्याला मराठी कळत असेल अशी अपेक्षा आहेच! तुम्ही जे बोलला होतात कि मी त्याचे तिथे "गुणगान" करत होतो ते दाखवून द्या, मग पुढचं बोला. मी कन्हैया बद्दल तुमच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील नाही, त्याची विचारधारा निवडायला तो स्वतंत्र आहे आणि त्यातला जे मला पटेल त्याला समर्थन द्यायला मी स्वतंत्र आहे आणि जे पटणार नाही ते नाकारायलाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम? बाकी पंप्र जेव्हा "गेल्या ६०वर्षात काहीच प्रगती झाली नाही" म्हणतात तेव्हा त्यांना विचारायला जाता का हो? फक्त तुम्हीच प्रगती करताय काय म्हणून, काँग्रेस पण काहीतरी केलं असेल कि! प्रत्येकाची एक "राजकीय" मांडणी असते. कन्हैयाची पण असेलच, त्याचा तुम्हाला काय त्रास आहे ते मात्र कळलं नाही! आणि तुम्हाला वेगळा धागा हवा आहे म्हणत आहेत ना, इथे बघा.. शांतपणाने सगळी झालेली चर्चा बघा आणि तिथे टीका करा. टीका करण्याला काहीच हरकत नसावी पण वरच्या ट्रेड मार्क यांच्या प्रतिसादात असल्या प्रमाणे समोरच्याला (म्हणजे मलाच! :D ) "संबोधने" देऊन प्रतिमा हनन करणे हे ट्रोलिंग आहे. मग त्यानुसार प्रत्युत्तर द्यावे लागते आणि चर्चा खुंटते (बऱ्याच लोकांना हेच हवे असते) आणि हो मुद्द्यावर परत येत... सापडला का एकदाचा व्हिडीओ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 08/16/2018 - 23:31 नवीन
भक्त म्हणणे म्हणजे ट्रोलिंग करणे आहे होय? म्हणजे मोदींच्या म्हणा किंवा भाजप किंवा रास्व संघाच्या बाजूने बोलणाऱ्याला नुसते भक्तच नाही तर इतर विशेषणांनी संबोधण्यात येते त्याला काय म्हणतात? तुमच्या प्रतिसादांमधून तुम्ही कन्हैयाला बरंच मानता असं दिसतंय, मग भक्त फक्त मोदींना मानणारेच असतात का? काही अतिउत्साही स्वयंघोषित देशभक्त आता इथे पण तुम्ही मला ट्रोल करताय, काय? (जे स्वतः देश सोडून डॉलर छापायला बाहेर राहतात आणि फावल्या वेळेत देशभक्तीची सर्टिफिकेट वाटतात) जे आरोप करत होते पीएचडीबद्दल जळू नका हो! मी कोणालाही देशभक्तीची सर्टिफिकेट वाटत नाहीये. पण ज्यांच्या देशभक्तीविषयी थोडी सुद्धा शंका आहे अश्या लोकांबरोबर मला जोडलं जायचं नाहीये. बादवे, कामानिमित्त दुसऱ्या देशात राहणे हे देशद्रोहाच्या क्याटेगरीत मोडत नाही, स्पष्ट करतो कारण तुमचा सूर तसाच दिसतोय. पीएचडी बद्दल म्हणाल तर कन्हैया काही एकटाच पीएचडी करतोय का? इतर असंख्य पीएचडी करणारे काम करता करता पीएचडी करत असतात. अगदी फुल्ल टाइम काम करणे जमत नसेल तरी पार्ट टाइम किंवा इंटर्न म्हणून असं काहीतरी काम करतात. कन्हैया असं काही करतो का? बरं त्याचा पीएचडी चा विषय कुठला? तर आफ्रिकन स्टडीज! पीएचडी कधी चालू केलं तर २०११ मध्ये ७ वर्ष झाली अजून आफ्रिकन स्टडीज पूर्ण झालं नाही. त्याचे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले आहेत, आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. मोठा भाऊ आसाममध्ये कुठल्यातरी कंपनीत सुपरवायजर म्हणून काम करतो. त्यांची एक एकर शेती पण आहे पण बहुधा कोणी त्याकडे लक्ष देत नसावे. म्हणजेच घरची परिस्थिती काही फारशी बरी नाही, आई आणि आजारी वडील यांना सोडून हा बाकीचे उद्योग करत बसतोय. पण तो त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला, माझा आक्षेप आहे तो हे बाकी नसते उद्योग करण्यावर. सरकारी अनुदान मिळतंय म्हणून ७ वर्ष झाली तरी पीएचडी पूर्ण व्हायचं नाव घेत नाही. खूपच अवघड विषय दिसतोय! त्याची विचारधारा निवडायला तो स्वतंत्र आहे आणि त्यातला जे मला पटेल त्याला समर्थन द्यायला मी स्वतंत्र आहे आणि जे पटणार नाही ते नाकारायलाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम? मग मी माझी विचारधारा निवडली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? फुकटात सगळं पदरात पाडून, देशाच्या प्रगतीला कुठलाही हातभार ना लावता वर "हमे चाहिये आझादी" (न जाणे कशापासून) असल्या घोषणा देणे हे माझ्या मते देशद्रोह असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असले लोक निदान घरभेदी तर म्हणलेच पाहिजेत. जवळपास ३० वर्षाचं झाल्यावर सुद्धा स्वतः काम न करता "हमे चाहिये गरिबीसे आझादी" म्हणतोय याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही? आफ्रिकन स्टडीज मध्ये पीएचडी करून त्याला तसंही काय काम मिळणार आहे म्हणा. तुम्ही आणि कन्हैया दोघेही मोदीविरोधी आहात हे मी समजू शकतो. तुम्हाला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण याची विरोधाची पातळी त्याच्या ट्विटर अकाउंट वर जाऊन बघा. एका ट्विटमध्ये तर लिहिलय - स्वतःच्या पत्नीनंतर मेहबूबाला पण सोडणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. दुसऱ्या एकात लिहितोय "कुछ दिन तो गुजारो मोदीराज मे, फट के आ जायेगी हाथ मे". समस्त चॅनेल आणि सोशल मेडियामधून मोदींना यथेच्छ शिव्या घालून वर हे लोक मोदी आम्हाला बोलू देत नाहीत, भाषणस्वातंत्र्याची गळचेपी होतीये हे कसं काय म्हणू शकतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ड
डँबिस००७ गुरुवार, 08/09/2018 - 14:04 नवीन
आम्ही २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो आणि यातून पूर्ण समूहाचा ७००रुपये नफा होतो! १ केजी सीताफळ मार्केट मधली किंम्मत = ८० ते ९० रु/ किलो २५केजी सीताफळ किंम्मत = २००० रु. ( ८० रु किंम्मत धरुन ) २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो म्हणजे एकुण = ७५० रु च्यायला २५ किलो सीताफळ मार्केट मध्ये विकण परवडणार की : १२५० रु चा लॉस करुन वर पल्प करायची मेहनत वर लॉस, बहोत बडा लोचा है इसमे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
माहितगार गुरुवार, 08/09/2018 - 14:29 नवीन
साहेब लोचा मुंबई पुणे किंवा मोठ्या शहरातील मार्केट प्राईस उत्पादकाला मिळत असते ह्या समजण्यात आहे. तुम्ही ज्या ८०/९० किंवा दिडशे किंवा प्रसंगी अडिचशे च्या दराने फळे घेता तो दर उत्पादकाला व्यापार्‍याकडून कधीच मिळत नसतो. त्यांना मिळणारा दर हा पेरीशेबल गूड्सचे भाव पाडून २५ किलोस ५० रुपये इत्यादी मिळतात हे त्या भगिनीने सांगितलेच आहे. समजा फळांचे दर मार्केट मध्ये वाढले तर प्रक्रीया केलेल्या उत्पादनावर प्रॉफीट अधिक मिळावयास हवा कमी नव्हे. आपण सिताफळाची मार्केट व्हॅल्यू लक्षात घेतली तेव्हा सिताफळ पल्प पासून बनणारे सिताफळ रबडी, सिताफळ आईसक्रीमचे मार्केट भाव लक्षात घेतले का ? नसतील ते पहावेत. सहकारी क्षेत्रात प्रक्रीया कृत उत्पादनाचे उत्पादन वितरण आणि भाव विषयक निर्णय चुकूनही तोटा येऊ शकतो किंवा तिथेही फसवणूक भ्रष्टाचार होनारच नाही याची शाश्वती देता येत नाही पण नेमके अकाउंटींगचे आकडे मिळत नाहीत तो पर्यंत हे सगळे कयास झाले आणि कयासांच्या आधारावर मोदींची बदनामी करणे ठिक त्याचा त्यांना सराव आहे. खेडे गावातील नेतृत्व करणार्‍या अशिक्षीत स्त्रीस केवळ मांडणी न जमल्यामुळे बदनामीस हकनाक तोंड द्यावे लागणे आणि भारत भरच्या स्त्री स्व-मदत गटांची माध्यमांच्या आणि बातमीदारांच्य अनिअभिज्ञते मुळे अथवा हलगर्जीपणामुळे हकनाक बदनामी होणे कित्पत श्रेयस्कर आहे या बाबत साशंकता वाटते असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
माहितगार गुरुवार, 08/09/2018 - 14:43 नवीन
लोच्यांया जागा वेगळ्या अधिकारी स्तरीय असू असतात. जसे की सिताफळ प्रक्रीया करणार्‍या पल्पिंग मशिन विकणारी कंपनी आहे. या नव्हे पण अशा कंपन्यांचे विक्रेते सरकारी अनुदान नेमके कोणत्या स्कीम मध्ये कोणत्या आधिकार्‍याकडून जाते ते बघतील आणि त्याच्याशी संधान बांधतील आणि प्रकल्प अनुदान लवकर मंजूर व्हावे म्हणून अमुक एक टक्के अधिकार्‍यांच्या हातावर टिकवू शकतात. नरसिंह राव पंतप्रधान असताना मनमोहन सिंग अर्थ मंत्री असताना पि.एम आर.वाय. स्वयं रोजगार स्कीम आली - अशा स्किम्स नंतर दलित, आदिवासी, ओबीसी यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्या महामंडळातून येत राहील्या - त्यात तरुणांना अमुक एक अनुदान मिळे . या साठी डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रीज सेंटर कडे अ‍ॅप्रोच करावा लागे आणि नेमके तिथे विवीध कंपन्यांचे सप्लायर डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रीज सेंटरच्या अधिकार्‍यांना पटवून स्वतःचे इप्सित साध्य करुन घेत. जवळून तटस्थपणे बरेच काही बघितलेय. लिहिन कधि तरी योग आल्यास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
माहितगार गुरुवार, 08/09/2018 - 14:46 नवीन
जर लिहिले तर व्यक्ती / मंत्री किंवा राजकीय पक्षांकडे बोटे न दाखवता नाव न घेताच लिहिन; त्यामुळे असे कुणी हित संबंधी कुणि असे काही लिहिणार म्हणून वाचतील तर बावचळून जाण्याचे कारण नसावे हे असे कुणि वाचक आलेच तर लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ड
डँबिस००७ गुरुवार, 08/09/2018 - 15:11 नवीन
माहितगार साहेब, जवळून तटस्थपणे बरेच काही बघितलेय. लिहिन कधि तरी योग आल्यास तुम्ही लिहाच !! मला म्हणायच हे आहे की कोणत्याही व्यवसायाचा पाया हा प्रॉफिट हाच अशु शकतो. तोटा होत असताना ही व्यवसाय दोन तीन वर्ष करत असणे म्हणजे अक्कलशुन्यपणाच कारण व्यवसायासाठी घरुन पैसे कोण नेणार ? फार वर्षांपुर्वी मुंबई होलसेल मार्केट मध्ये साबण वडी , त्यांच्या मार्केट भावा पेक्षा ही स्वस्त मिळत असे. त्या व्यापार्याला विचारल तर तो म्हणाला नफा हा त्या कार्टन बॉक्स ( (ज्या कार्टन बॉक्स मधुन साबणाच्या व ड्या येतात ) विकुन मिळतो साबणाच्यावड्या विकुन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 08/09/2018 - 19:19 नवीन
....त्या व्यापार्याला विचारल तर तो म्हणाला नफा हा त्या कार्टन बॉक्स ((ज्या कार्टन बॉक्स मधुन साबणाच्या व ड्या येतात ) विकुन मिळतो साबणाच्यावड्या विकुन नाही.
=)) असे नसते हो सरजी, टर्नओव्हर नामकी भी कोई चीज होती है. व्यापारी अजून बरचं काय काय करतात. आपण म्हणता तो व्यापारी नक्कीच नफ्यात असेल. स्वयंरोजगार चालू करणार्‍ञां नवागतांना मी नेहमीच हे व्यापारी धोरण अंगिकारण्यासाठी सांगत असे. व्यवसाय फायद्यात नसताना फायद्यात असल्याचे सांगावे आणि फायद्यात असेल तर नुकसानीत करतोय म्हणून सांगावे, या पॉलीसीचे स्ट्रॅटेजिक बेनीफीट असतात आणि भारतीय व्यापारी यात पारंगत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सतिश गावडे गुरुवार, 08/09/2018 - 20:02 नवीन
व्यवसाय फायद्यात नसताना फायद्यात असल्याचे सांगावे आणि फायद्यात असेल तर नुकसानीत करतोय म्हणून सांगावे, या पॉलीसीचे स्ट्रॅटेजिक बेनीफीट असतात आणि भारतीय व्यापारी यात पारंगत असतो.
याबद्दल अधिक लिहावे जमल्यास. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
शाम भागवत गुरुवार, 08/09/2018 - 20:24 नवीन
मलापण वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ट
ट्रम्प गुरुवार, 08/09/2018 - 16:37 नवीन
अरं देवा ! किती डू आई डी हायेत तुमचं .शेफाली ताई आणि शब्दबंबाळ पण तुमीच हाईसा वाटत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/08/2018 - 11:59 नवीन
हा पुण्य प्रसुन वाजपेयी म्हणजे तोच तथाकथित संतुलित पत्रकार ना, ज्याने खालील मुलाखत घेतली होती ! ---
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 08/09/2018 - 09:42 नवीन
ह्या पुण्य प्रसुन वाजपेयी सारखे भाट पत्रकार, संतुलित पत्रकारितेच्या नावावर लोकांना कश्या शेंड्या लावतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे खालचा व्हिडिओ. ---
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 08/09/2018 - 14:37 नवीन
बेंगळुरू मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटक सरकारने सात मिनिटांच्या शपथग्रहण सोहळ्यावर ४२ लाख रूपये खर्च केले. अरविंद केजरीवाल यांनी ताज वेस्ट एंडमध्ये २३ मे रोजी सकाळी ९.४९ वाजता चेक इन केले. आणि २४ मे रोजी सकाळी ५.३४ वाजता चेकआऊट केले. ज्या दिवशी ते आले त्यादिवशी इन-रूम डायनिंग, खाण्या-पिण्याचे बिल ७१०२५ रूपये आणि बेव्हरेजचे ५००० रूपयांचे बिल झाले. आता काय म्हणावे असल्या आम आदमींना ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/09/2018 - 17:02 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/indias-economy-is-an-elephant-starting-to-run-says-international-monetary-fund-1727888/
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/09/2018 - 17:05 नवीन
भारतीय अर्थव्यवस्था धावणाऱ्या हत्तीप्रमाणे: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही बातमी लोकसत्तानेपण दिलीय म्हणून मला ही बातमी वाटली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/09/2018 - 17:13 नवीन
मूळ बातमी India's economy is an elephant that's starting to run, says IMF अशी आहे. बातमीच्या शीर्षकाचे भाषांतर करताना केलेला बदल लोकसत्ताने का केला (पक्षी : नकारात्मक सनसनाटी निर्माण करण्याच्या हेतूने केला का ?), हे त्या वर्तमानपत्राचा पूर्वेतिहास पाहता समजण्यासारखे आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 08/09/2018 - 17:46 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डँबिस००७ गुरुवार, 08/09/2018 - 18:14 नवीन
डॉ, सही प्रतिक्रीया ! वर्तमानपत्राचा पूर्वेतिहास आहेच तसा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
त
तेजस आठवले गुरुवार, 08/09/2018 - 18:07 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे हत्ती भरपूर वेगात पळू शकतो.बाकी 'सामना' चे मुखपत्र असल्याने आणि इतर बऱ्याच कारणांमुळे लोकसत्तेबाबत माझा पास. :) 'आमच्या वाघाच्या डरकाळीमुळेच हत्ती पळायला लागला आहे' अशी बातमी उद्याच्या लोकसत्तेत छापली गेली तर आश्चर्य नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/10/2018 - 06:41 नवीन
हत्ती ताशी २४ किमी वेगाने पळू शकतो. परंतु तो चारही पाय एकदम उचलत नसल्याने (#) हत्ती "पळतो" हे व्याख्येप्रमाणे बरोबर नाही असे शास्त्रज्ञांचे मत होते. # याच कारणाने हत्तीला उडी मारता येत नाही. परंतु हत्ती चारी पाय एकदम न उचलता एका वेगळ्याच तर्हेने धावण्याचा वेग गाठतो. जिज्ञासूंनी खालील दुवा वाचून पाहावा. https://news.stanford.edu/pr/03/elephants49.html 'आमच्या वाघाच्या डरकाळीमुळेच हत्ती पळायला लागला आहे' अशी बातमी उद्याच्या लोकसत्तेत छापली गेली तर आश्चर्य नाही. ह ह पु वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/10/2018 - 13:09 नवीन
भारतिय अर्थव्यवस्था धावणार्‍या हत्तीप्रमाणे = भारतिय अर्थव्यवस्थेच्या हत्तीसारख्या धावण्यामुळे आजूबाजूच्या बर्‍याच चांगल्या गोष्टी उध्वस्त होऊ शकतात. कारण, धावणार्‍या हत्तीची उपमा त्याच्या वेगापेक्षा जास्त त्याने होणार्‍या नुकसानाकरताच जास्त दिली जाते. लोकांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे अजून काही बर्‍यावाईट अर्थांनाही वाव आहे. :) India's economy is an elephant that's starting to run = हत्तीसारख्या ताकदवान असलेल्या भारतिय अर्थव्यवस्थेने आत्ता कुठे वेग पकडायला सुरुवात केली आहे... या वाक्यरचनेत, "भारतिय अर्थव्यवस्था तगडी आहे आणि ती भविष्यात अजून वेगवान होण्याचा संभव आहे" असा सकारात्मक रोख आहे. *** 'आमच्या वाघाच्या डरकाळीमुळेच हत्ती पळायला लागला आहे' अशी बातमी उद्याच्या लोकसत्तेत छापली गेली तर आश्चर्य नाही. हहपुवा. पण, पूर्वेतिहासाच्या पार्श्वभूमीवर, असे खरोखरच झाले तरी आश्चर्य वाटणार नाही. ;)
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 08/10/2018 - 13:56 नवीन
Give me chance I will make better Rafael Aircraft -- Congress MP Rajesh Jakhar गेल्या तीस वर्षांपासुन भारतीय शास्त्रज्ञ तेजस नावाच विमान विकसित करत आहेत !! त्यावेळेला ह्या राजेश जाखर ला कदाचीत विमान बनवायला येत नव्हत !
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 08/10/2018 - 15:19 नवीन
मुख्यमंत्र्यांचा गृह खात्यावर वचक नाही याचे हे दुसरे उदाहरण , पाहिले महाराष्ट्र बँकेच्या म्यानेजर ला अटक करणे . महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथून वैभव राऊत याला अटक केली असून त्याच्या घरातून आणि दुकानात काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात स्फोटकं बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. तसंच आठ देशी बॉम्बही मिळाले आहेत. दरम्यान हिंदू जनजागृती समितीने वैभव राऊतची अटक ही ‘मालेगाव पार्ट २’ असल्याची शंका येत असल्याचं म्हटलं आहे. वैभव राऊत सनातन संस्थेचा साधक असल्याचा बातम्यांमध्ये उल्लेख आहेत. वैभव राऊत धडाडीचा गोरक्षक असून तो ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’ या गोरक्षण करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होता अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 08/11/2018 - 15:53 नवीन
BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) ने कधी पासून मोबाईल निर्मिती करायला सुरुवात केली ? कारण राहुल गांधींनी छत्तीसगडच्या प्रचारात आरोप केलाय की मोदींनी BHEL कडून मोबाईल का खरेदी केले नाहीत. --- https://www.jagran.com/politics/national-congress-president-rahul-gandhi-tongue-slips-says-bhel-instead-of-bsnl-in-chhattisgarh-public-meeting-trolled-on-twitter-18305679.html
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 08/11/2018 - 16:59 नवीन
वैभव राऊतच्या घरून जप्त करण्यात आलेली स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी-आव्हाड Updated: Aug 11 2018 03:35 p.m. | Written by लोकसत्ता ऑनलाइन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटके पकडली. ही सगळी स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भातले ट्विटच जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. महाराष्ट्रात अराजक माजेल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप आव्हाड यांनी केला आ
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 08/11/2018 - 17:05 नवीन
हा महाराष्ट्रातील दिग्विजय सिंग आहे. तो सतत काहीही बरळत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
म
मार्मिक गोडसे Sat, 08/11/2018 - 17:11 नवीन
जसं प्रधानसेवकांनी सहाशे कोटी मतदार म्हटले होते तसलाच प्रकार आहे हा. BSNL ऐवजी BHEL बोलून गेले राहूल गांधी.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Mon, 08/13/2018 - 16:34 नवीन
BSNL manufactures mobiles?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Mon, 08/13/2018 - 19:39 नवीन
BSNL भागीदार कंपन्यांकडून हँडसेट बनवून प्री पेड पॅकेज मध्ये देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
स
सोमनाथ खांदवे Sat, 08/11/2018 - 17:37 नवीन
मला एक गोष्ट नाही समजली महाराष्ट्रात सरकार कुठल्याही पक्षाचे असुद्या निवडणुकीच्या अगोदर कथित हिंदू दहशतवादी का सापडतात ? आणि यामुळे नक्की कुठल्या पक्षाचा फायदा होतो ? राहिला प्रश्न आव्हाडांच्या बेलगाम वक्तव्याचा , मराठा मतदारांनी भाजप सेना आणि दोन्ही काँग्रेस यांच्या पैकी कोणालाही मतदान न करता सरळ NOTA चा वापर करावा जेणे करून मराठी मतदारांना निवडणुकीतील मतदाना पुरते वापरणे बंद होईल .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 08/14/2018 - 10:56 नवीन
आर्टीकल ३५अ रद्दबादल करण्यासाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर सध्या देशात आर्टीकल ३५अ वर जोरदार चर्चा चालु झालेली आहे. १९५४ नंतर देशाच्या संविधानात प्रेसिडेंशीयल ऑर्डर खाली काही गोष्टी घुसडल्या गेल्या त्यात आर्टीकल ३७० हे एक मुख्य होते. गेल्या ७० वर्षांत ह्या टेंपरवरी आर्टीकल ला हात लावायची कोणत्याही सरकारची हिंम्मत झालेली नाही. काय आहे आर्टीकल ३५अ : Article 35A of the Indian Constitution is an article that empowers the Jammu and Kashmir state's legislature to define “permanent residents” of the state and provide special rights and privileges to those permanent residents.[1][2] It was added to the Constitution through a Presidential Order, i.e., The Constitution (Application to Jammu and Kashmir) Order, 1954 - issued by the President of India on 14 May 1954, exercising the powers conferred by the clause (1) of the Article 370 of the Indian Constitution, and with the concurrence of the Government of the State of Jammu and Kashmir.[3] १९४७ नंतर पाकिस्तानने काश्मिरमध्ये तुर्की अतिरेकी लढवय्ये पाठवुन तिथल्या काश्मिर भागाचा कब्जा घेतला. आज त्या भागाला आपण पाकिस्तान ने बळकावलेला काश्मिर अस संबोधतो. भारताने तो भाग परत मिळवण्याचा खास असा प्रयत्न कधी केलाच नाही. त्या वेळेला तिथल्या ६ ते ७ लाख हिंदु जनतेने तिथुन पळ काढलेला होता, ते तिथुन जम्मु काश्मिरमध्ये स्थलांतरीत झाले. त्या आश्रित लोंकांना आर्टीकल ३५अ खाली आश्रित लोकच समजतात. मुळचे काश्मिरी भारतीय १९५४ नंतर ना भारतीय राहीले ना काश्मिरी राहीले. ६ ते ७ लाख लोक आजही जम्मुच्या रस्त्यावर रहातात. ह्या लोकांच्यावतीने काही लोकांनी सुप्रिम कोर्टात आर्टीकल ३५अ रद्द व्हावा ह्यासाठी याचीका दाखल केलेली आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 08/14/2018 - 10:58 नवीन
भारतात दर वेळेला हिंदु जनतेलाच हाल अपेष्टा कष्ट का भोगावे लागतात ?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 08/14/2018 - 15:47 नवीन
कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा, दोन तासात 94 कोटी गायब!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 08/15/2018 - 11:57 नवीन
कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा, दोन तासात 94 कोटी गायब! हा प्रकार येणार्या संभाव्य धोक्याकडे ईशारा करतोय, डीजीटल बँकेच्या सुरक्षा यंत्रणा सुसज्ज, सक्षम, व अद्ययावत असणे गरजेच आहे हे अधोरेखीत होत आहे. पैसे वाचवण्याच्या प्रकारा मुळे थातुर मातुर सुरक्षा यंत्रणा राबवुन काम होणार नाही . एकंदरीत सुरक्षा यंत्रणा म्हणजे पैश्याचा अपव्यय हा भारतातील लोकांचा दृष्टीकोण असतो. अति महत्वाचा क्लोज सर्कीट कॅमेरा बर्याच ठिकाणी अजुन लावलेला नाही. जर लावलेला असेल तर तो काम करत नसतो. सगळ्याच गोष्टी लाल फितीत अडकवुन काम होणार नाही. लोकांची मेंटॅलीटी बदलली पाहीजे हा भारत देशाच्या विकासात एक महत्वाचा भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ट
ट्रम्प Tue, 08/14/2018 - 19:22 नवीन
फॉरेन मधील आर्य चाच्यांनी लुटले .
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 08/15/2018 - 19:55 नवीन
भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजाराने आज मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वात भारताने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. Image removed.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 08/16/2018 - 11:22 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/city/meerut/this-i-day-hindu-mahasabha-sets-up-first-hindu-court-on-the-lines-of-shariat-court/articleshow/65413883.cms
हे काय चाललंय देशात काही कळत नाही! :-( आधी शरीया कोर्टाच्या मागण्या आता हे हिंदू कोर्ट. मागच्या आठवड्यात संविधान जाळले गेले, मनुस्मृती झिंदाबाद अश्या घोषणा दिल्या गेल्या. नक्की कोणत्या मार्गावरून जातोय आपला देश??
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 08/16/2018 - 14:08 नवीन
उत्तुंग व्यक्तिमत्व... सर्वसमावेशक नेतृत्व... अमोघ वक्तृत्वाचे धनी आणि अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताची आण्विक तटबंदी भक्कम करणारे भारताचे माजी पंतप्रधान 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर असलेल्या वाजपेयींची प्रकृती वयोमानानुसार खालावली होती. मागील ९ आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्यानं रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वाजपेयींच्या निधनामुळं अवघा देश हळहळला असून त्यांच्या रूपानं भारतीय राजकारणातील समन्वयी युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 08/16/2018 - 14:09 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 08/16/2018 - 14:10 नवीन
बातमी
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 08/19/2018 - 07:06 नवीन
केल्याने भाजप नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना रात्री अटक करण्यात आली आहे. सय्यद मतीन यांच्याविरोधात जातीय तेढ निर्माण करणे आणि दंगल घडविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मतीन याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक प्रमोद राठोड, राज वानखेडे आणि विजय आवताडे यांच्याविरोधातदेखील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? शिवसेनचे राजू वैद्य यांनी 'भारतरत्न' अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. मात्र सय्यद मतीन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. यानंतर संतापलेले नगरसेवक प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे हे मतीन यांच्यावर धावून गेले. यापुढे जाऊन त्यांनी मतीन यांना बेदम मारहाण करुन सभागृहाबाहेर बाहेर काढलं. तसंच सय्यद मतीनला कायमस्वरुपी निलंबित करावं, अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे. सय्यद मतीन यांना मारहाणीनंतर संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील भाजप संघटना मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड केली. तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवकासह एमआयएमच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही पक्षाची भूमिका नाही : इम्तियाज जलील श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणं ही एमआयएमची भूमिका नाही, ते सय्यद मतीन यांचं वैयक्तिक मत होतं, असं स्पष्टीकरण एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिलं. एमआयएम या नगरसेवकाच्या पाठीमागे उभं राहणार नसून याला समर्थन देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 08/19/2018 - 16:10 नवीन
स्वमत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 08/19/2018 - 16:47 नवीन
विनाकारण वाद उत्पन्न करून रस्त्यावर नंगानाच करणाऱ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना असंच बदडल पाहिजे . ममता , मायावती आणि सोनिया सोडून , पाकिस्तान च्या इम्रान ने सुद्धा भारतातील विरोधी नेत्यांप्रमाणे वाजपेयींच्या निधनानंतर सदभावनेने प्रतिक्रिया दिल्या , आणि ही बांडगुळाची जात विखारी प्रतिक्रिया देण्याची हिंमत करतेच कशी ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 08/20/2018 - 09:43 नवीन
तुमच्या मते विखार कमी होण्यासाठी काय व्हावयास हवे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
श
शाम भागवत Mon, 08/20/2018 - 10:31 नवीन
बायकांना सोडून पुरूषांना बदडल पाहिजे अस काहीस म्हटले की ते. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ट
ट्रम्प Mon, 08/20/2018 - 11:50 नवीन
सहिष्णुते च्या चांगुलपणा मूळे पूर्वी किती राजे मेले ? किती राजघराणी तैमुर च्या वंशजांनी क्रूरपणे बुडवली याची मोजदाद आहे का ? यांचा धार्मिक विखार कधीच कमी होऊ शकत नाही . आपल्या देशाच्या पायातील साखळदंड आहे ही जमात . जगाच्या पाठीवर मला एक ही मुस्लिम देश आठवत नाही की ज्याने विज्ञानाची कास धरून प्रगती केली . मुस्लिम बहुल देशात धार्मिक कट्टरते मूळे सतत यादवीसुदृश परिस्थितीती असते . मला वाटतंय सतराव्या शतकात अमेरिके ने ब्रिटिश विरोधात दीर्घकालीन स्वातंत्र्ययुद्ध करून विजय मिळवला , आणि त्यावेळी आपल्या भारतात पेशवे व इतर हिंदू राजे आपापल्या परीने मोगला विरुद्ध लढत होते . तीच अमेरिका आता सर्व शक्तिमान झाली आहे आणि आपण अजून सुद्धा पाकिस्तान व पाकिस्तान चे भारतातील समर्थक यांच्या बरोबर दोन हात करण्यात वेळ घालवत आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 08/20/2018 - 14:25 नवीन
तुम्ही तुमच्या मते असलेल्या समस्या - नेहमीची ऐकीवातील एक बाजू- सांगत आहात, आपणास अभिप्रेत सोल्यूशन्स काय आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Mon, 08/20/2018 - 18:10 नवीन
स्वित्झर्लंड ला राहायला जाणें =) = ) आपल्या पूर्वजांना सोल्युशन नाही सापडले तर मी पामर सांगणारा कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
न
नगरीनिरंजन Sun, 08/19/2018 - 20:20 नवीन
पुरुषांची गरज नाही म्हणणाऱया प्रियांका चोप्राने लग्न केलं म्हणे. तेही चक्क एका पुरुषाशी. तो अमेरिकन, गोरा, सिंगर व पैसेवाला आहे हे सगळे निव्वळ योगायोग. तसा मला भारतीय फेमिनिस्टांबद्दल प्रचंड आदर आहे. भारतीय ब्राऊन पुरुष आहेतच मेले पर्व्हर्ट आणि आंबटशौकीन. खुशाल पिग्गीचॉप्स बघायला जातात पैसे देऊन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा