भटकंती

फोटो ओळखा 2

Primary tabs

संदर्भ -
Photo Olkha 1

नमस्कार.

मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.

काही सोपे नियम -

एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

अनिंद्य

बरोबर !
भारतातली सर्वात मोठी मशीद.
मी मोबाईलवर काढला आहे फोटो.

खंडेराव

नाही सांगायला मजा येतीय :-) भीमबेटका नाही..

खंडेराव

अगदी भारतीय आहे..वरच्या एका फोटोंमध्ये याच्या शेजारचे दुसरे स्थळ आलेले आहे

गोरगावलेकर

गुगलला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही
उत्तर : द ग्रेट कैनियन गांदीकोटा, आंध्र प्रदेश

खंडेराव

ही जागा जवळ आहे गंदी कोटा पासून पण गंदी कोटा नाही. या आहेत बेलम गुफा. भारतीय उपखंडातल्या 2 नंबरच्या लांब आणि मोठ्या गुफा. तीन किलोमीटर पेक्षा जास्त लांबी आहे

गोरगावलेकर

ठीक आहे.
पूर्ण गुण नाहीत पण काठावर पास होण्याइतपत तरी द्याल कि नाही.

अनिंद्य

ह्या बेलम गुफांशी काही संबंध आहे की नाही हे माहित नाही पण आंध्र-तेलंगणा ग्रामीण भागात एक 'बेलम' नामक मिठाई करतात - फक्त आख्खे काजू, गूळ आणि साजुक तूप एवढेच घटक. दिसायला ओबडधोबड पण स्वर्गीय चव.

गुफा बघून मिठाई आठवणारा मी एकटाच असावा जगात :-)

अवांतराबद्दल क्षमस्व !

निशाचर

:) बेल्लम म्हणजे गुळ. तिकडच्या गुळाच्या गोड पदार्थांच्या नावात बरेचदा बेल्लम शब्द असतो.

खंडेराव

अगदी इंटरेस्टिंग माहिती...मी शोधायचा प्रयत्न केला तेव्हा सापडले की या गुहांचे नाव शेजारच्या बेलम गावावरून पडले आहे, आणि बेलमचा नक्की गूळ किंवा मिठाईशी संबंध असणार..

समर्पक

बेलम हा शब्द संस्कृत 'बिलं' वरून आलेला आहे. मराठीत बीळ...
आंध्रातच ओडिशाच्या सीमेवर अशाच 'बोरा' गुंफा आहेत, बोरा म्हणजे भोक

निशाचर

विजय मंदिर किंवा बीज मंडल, विदिशा

गोरगावलेकर

सापडले !
पण उत्तर सांगत नाही.
मुघल सैन्याने कळसाचा भाग नष्ट केला आहे. त्यानंतर मंदिराचे रक्षण व्हावे या हेतूने गर्भगृह चौथऱ्याच्या समपातळीत आणून मंदिराच्या दगडांमधूनच मिनार बांधून मशीद असल्याचा भास निर्माण केला गेला. सर्व बाजूंनी भिंत बांधून मंदिर झाकले गेले.

निशाचर

खजुराहो नाही.
गोरगावलेकरांनी बरोबर शोधलं आहे.

डावी कडे राजगड आहे, तर उजवीकडे तोरणा,
पाबे घाटातली खिंड पार केली की हे दोघे अचानक समोर येतात
पैजारबुवा,

चौकटराजा

मला फोटो दिसत आहे , बाकी कोणालाच नाही किंवा कसे ?

फोटोला "पब्लिक शेअर" केलेले नाही. तुम्ही गुगलमध्ये लॉगिन केलेले असल्यामुळे तुमच्या अल्बममधील फोटो तुम्हाला दिसतो. इतरांना अ‍ॅक्सेस नसल्याने त्यांना दिसत नाही.

प्रचेतस

दिसतोय.
ठिकाण नक्की नाही ओळखता येत पण बहुधा फ्रान्स किंवा इटलीमधील कारंजे

गोरगावलेकर

बरोबर आहे. प्रश्नातच उत्तर मिळाले .
The Palace of Versailles
फ्रांस

संजय पाटिल

सगळी मिपाकर मंडळी मिळून वल्ली सरांची परिक्षा घेतायत कि काय असे वाटतेय....

dadabhau

जामी मस्जिद / होशंग शहाची कबर ....खरे तर मांडवगड चे सगळे महाल/पुरातन अवशेष हे ओरिजिनली राजा भोज कालीन वा नंतर चे हिंदू आणि जैन architecture आहेत...

चौथा कोनाडा

पर्फे़ट दादाभौ ! ही वास्तू मांडू, मध्यप्रदेश येथिल होशंग शहाची कबर, जामी मस्जिदची आहे. डोळे दिपवणारी आहे.

मांडवगड चे सगळे महाल/पुरातन अवशेष हे ओरिजिनली राजा भोज कालीन वा नंतर चे हिंदू आणि जैन architecture आहेत...

+ १, बरोबर

चौकटराजा

काहीसे बरोबर ... पण ... या पण साठी एक हिंट .. या वरून काही मिपाकर मोटार सायकल वरून गेले आहेत ...

मी गेलो त्यावेळेस त्यावेळेस, खूप बर्फवृष्टी झाली असल्याने मे महिन्याचा शेवटच्या आठवडा असूनही रोहतांग पास बंद होता... त्याच्या अलिकडे १२ किमीवरून परतावे लागले. पण, परतीच्या जागेअगोदरच्या किमान ८-१० किमीवर अगदी असाच नजारा होता.

हिमाचल प्रदेशात, मनालीकडून "शोलंग नाला"कडे जाताना, मे महिन्यात सैन्याने बर्फ तोडून साफ केलेला असा रस्ता पाहिला होता.

एखादा दगड आणून समोर ठेवला तरी प्रचेतस तो कोणत्या ठिकाणचा आहे हे नक्की सांगणार ! ;) :)

प्रचेतस

बरीचशी ठिकाणे माहीत असल्याने काही फोटो ओळखता आले.

प्रचेतस

मार्तंड सूर्य मंदिर, काश्मिर.
ह्या मंदिरावरील लघुपट मागे कुठल्याश्या चॅनेलवर पाहिला होता.

प्रचेतस

मग शंकराचार्य मंदिर? पण ते लहानसं आहे खूप

गोरगावलेकर

अवंतीपुर, काश्मीर.
कारगिल युद्धाच्या वेळी मी येथेच होते. सुदैवाने कुठेही न अडकता सहल सुखरूप पार पडली होती.

प्रचेतस

बाणेरची बाणेश्वर लेणी. अगदी भर पुण्यात बाणेरला हे अश्ममंदिर आहे. आवारात काही वीरगळ आणि बळीशिळा आहेत.

खंडेराव

बघून येईल..

इथून जवळच सोमेश्वर वाडी चे मंदिर आहे, ते हि अगदी छान आहे..

प्रचेतस

सोमेश्वराच्या मंदिराच्या आवारात दोन वीरगळ आहेत त्यापैकी एक वीरगळ गाणपत्य संप्रदायातील वीराचा आहे कारण त्या शिळेवर शिवपिंडीऐवजी गणेशमूर्ती कोरली आहे.

चौथा कोनाडा

आता पुढचा "फोटो ओळखा" टाकेन तेव्हा "सदरच्या स्पर्धेत टाईम्स ऑफ इंडियाचे कर्मचारी, मिसळपाव संपादक मंडळाचे सदस्य आणि वल्ली प्रचेतस यांना भाग घेता येणार नाही" अशी फूटनोट टाकणार :-)

गोरगावलेकर

सलीम सिंग की हवेली, जेसलमेर.
जैसलमेर भेटीत पटवो की हवेली पाहिली पण वेळेअभावी ही मात्र नाही पाहिली.